*कविता - परिवर्तन*
अज्ञानाचा करून नायनाट
उगवून ज्ञानमय पहाट
परिवर्तन असे घडवून आणले
फुले दांपत्य स्त्रीशिक्षणास झिजले
शिक्षणा वाचून नाही उद्धार
शिक्षण हेच प्रगतीचे द्वार
संघर्ष त्यांनी करून जीवनभर
शिक्षणाचे महत्व सांगितले वारंवार
शिक्षण हे सत्य चिरंतन जाणले
घराघरातून ज्ञानदीप उजळवीले
ध्येय ठेवून सदा सुनिश्चित
भविष्यातील सुजान घडविले
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment