कविता - तपस्या
जीवन प्रत्येकाचे नसते सुखी
संकट आणि संघर्षाचे असते
भोग भोगावे लागतात त्यांच्या
खडतर आयुष्यात दुःख असते
जरी दुःख आणि कष्ट असले
तरी संघर्ष ते मात्र करतात
जीवनाची तपस्या असली तरी
जीवन आनंदात जगतात
आयुष्यात मोठे संकट आले
तरी, प्राण पणाला लावून दूर
त्याला सारतात, जीवनाच्या
कठीण तपस्यात मार्ग काढतात.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment