कविता - अर्पण
जीवनात माझ्या सुखदुःखात
तुझीच साथ हवी मला
अर्पण करून माझे जीवन
स्वप्नातही तुझेच प्रेम हवे मला
तुझ्या त्या मधुर वाणीमुळे
तुझ्या त्या स्मितहास्यामुळे
दुःख मी माझे विसरून जाते
मग जगण्यावर मी मात करते
तुझी आठवण येताच मला
मन माझे गहीवरुन येते
तुझ्या त्या अबोल प्रीतीमुळे
मग मीच मला सावरते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment