कविता - दर्याचा राजा
इवलेसे सुंदर विश्व माझे
सागरी उसळत्या लाटा
शांत निळाईत रंगलेला
समुद्रकाठच्या पहाट वाटा
वास्तव्याच्या आयुष्यातला
संकटाचा सामना करणारा मी
तुझ्या विश्वात बागडणारा
आकाशाची साथ असणारा मी
जगावेगळे नाते असे आपले
डोळ्यात अश्रू सोबत घेऊन मी
तुझा अफाट पसारा पाहत
सागरा दर्याचा राजा आहे मी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment