कविता - श्वास माझा
रीत आभाळ, सुंदर पहाट
जगण्याची जाणीव आहे
जीवनातील उणीव आहे
माझी ती सखी श्वास माझा
नदीचा किनारा, सागरी लाटा
प्रीतीचा पसारा, नयनी साठा
माझी अभिलाषा,तिचा प्रतिसाद
माझ्या नाद, तिचा आवाज
मोहक फुलांची माळ जशी
सुरेख माझी सखी तशी
माझं काव्य तिचा साज
जिवलग माझी सखी अशी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment