चारोळी - स्पर्धेकरिता
जग हे बंदी शाळा
1)
जीवनाचे अर्घ्य तुला
तेव्हाच मी दिले होते
जग हे बंदी शाळा आहे
तेव्हाच मला कळले होते.
2)
मनातील भावना ओठाशी येतात
भावनांचे हिंदोळे मनी झुलतात
जग हे बंदिशाळा आहे म्हणून
नयनधारा आपोआप वाहतात
3)
आठवणींचा गहिवर होताच
मन माझं पाणावत.......
जग हे बंदी शाळा आहे
हेच नजरेनं तुला खुणावतं......
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment