कविता - आयुष्याचा मध्यबिंदू
काळजाच्या अंतरंगात माझ्या
दडलंय खुप काही
तुझ्या सहवासाने मी
अनुभवलंय खूप काही
तुझी आयुष्यभराची साथ
ही आयुष्यभराचा मध्यबिंदू
म्हणून जीवनात राहून गेली
हीच खंत मनात मज राहिली
नयनातूनी अश्रू ओसंडले
तरीही तुझेच स्वप्न पडले
तळहातावर किती जपले तरी
जगण्याचे स्वप्न माझे दुभंगले....
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment