कविता - सावर रे
घन निळ्या निळ्या आकाशात
पावसाचे थेंब थेंब बरसती
तव सावर रे माझ्या मना
ओथंबूनी मन माझे जाती
बळीराजाचा आहे तुझ्यावर
विश्वास, तूच आहेस त्याचा
जगण्याचा श्वास आणि ध्यास
तुझ्या आगमनाचे करतो स्वागत
रूप तुझे किती रे पावसा
कधी अंतःकरण सुखावते
तर कधी पुरात कुणाचे
मग आयुष्य सारे संपते
थैमान घालती पावसाचे पाणी
आभाळ गर्जूनी भयभीत करती
तुफान वादळ वारा सुटून मग
प्राणीजीवन विस्कळीत करती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment