*चित्र चारोळी - स्पर्धेसाठी*
1)
लखलखती दुर्बीण घेऊन हाती
कणाकणाने शहानिशा करी
उभी राहुनी वरी ताठ ती
ज्ञानबिंदू ने तर्कही करी
2)
विज्ञानाची धरुनि कास
अवकाशाचा करिते ती अभ्यास
सत्यधारित ज्ञान हे सांगते तिचे
स्वीकारा विज्ञान आणि तंत्रज्ञानास
3)
आत्मविश्वासाचे लेवून पंख
घेत आहे ती उत्तुंग भरारी
प्रगतीपथावर नेऊनी स्वतःस
दावीते नारीशक्तीची करारी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment