कविता - नवचेतना
नवचेतना ठेवून अंगी जसा,
अंतःकरणात तरंग उठावा
डोह मनाचा नितळसा असा
स्पष्ट खोल तळाशी दिसावा
थोपवून नेत्रातील अश्रू
पापण्यासही व्हावे जड
काळजास करुनी कठोर
स्वप्न असे का? अवघड
आठवणीतल्या सागरतळाशी
मन अचानक गुंता करती
अलगद सोडविता यावा गुंता
अवघड स्वप्न साकार करती
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे.*
No comments:
Post a Comment