कविता - भाषेची श्रीमंती
लिहूनी नित्य नियमाने सकस
भाषेची श्रीमंती शब्दात वाढवूया
माय मराठीचा अभिजात गोडवा सर्वजण सदा मुखात ठेवूया
कथा, कविता साहित्याचा
समृद्ध विचारांचा ठेवा वाढवूया
माधुर्य,आपलेपणा मराठीचा
लिखाणातून आपल्या दाखवूया
मराठी भाषा आहे वात्सल्याची
खाण, मराठी भाषा आहे
आमची शान, मनामनात आहे
आम्हा मराठी भाषेचा अभिमान
अमृताहुनी गोड आहे मायमराठी
शब्दशब्दास स्वतंत्र अर्थ देनारी
भाषेची श्रीमंती लाभलेली ही
माझी मराठी भाषा मराठी
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
Superb
ReplyDelete