कविता - समाधान
आयुष्यात काही वेळा
अडचणी भरपूर येतात
पण त्यावर मात करून
समाधान मानावे लागते
दिवसामागून दिवस सरत
असतात, रोज नवं काहीतरी
जीवनात शिकवीत असतात
आनंद त्यात शोधावे लागतात
भविष्याचा विचार करावा
लागते, आयुष्याला नवे वळण
द्यावे लागते, अडचणी भरपूर
असल्या तरी स्वीकारावे लागते
जीवनात संकटे येतील जातील
संकटांना घाबरायचे नसते
संघर्ष करण्याची,संकटांना
झेलण्याची हिम्मत ठेवायची असते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे*
No comments:
Post a Comment