कविता - गनिमी कावा
शत्रूवर मात करण्यासाठी
केला गनिमी कावा शिवबांनी
विश्वास होता त्यांच्या मनी
जिंकायचे शत्रुस नेहमीनेहमी
स्वराज्याचे हित जोपासले
रयतेसंगे नाते त्यांनी जडले
रयतेच्या सुखासाठी त्यांनी
जीवनभरआयुष्य आपुले वेचले
शिकवण होती आई जिजाऊँची
ताकद होती तलवारीची
शपथ घेतली स्वराज्य हिताची
रयतेच्या सुख आणि शांतीची
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment