*कविता - आमच्यासारखे आम्हीच*
ना कुणावरही रुसू
ना कुणालाही हसू
आमच्यासारखे आम्हीच
फक्त असू आणि दिसू
ना कुणाशी स्पर्धा करू
ना कुणाचा हेवा करू
सर्वांशी आम्ही मात्र
सौख्य व्यवहार करू
ना कुणाच्या भावना दुखवू
ना कुणाची अवहेलना करू
ना कुणाचा तिरस्कार करू
सर्वांवर आम्ही प्रेमच करू
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment