गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी
1)
सण नारळी पुनवेचा
चल जोडी न साजरा करू,
समिंदराची पूजा आपण
सजूनधजून आनंदाने करू
2)
चल ग पारू बिगीबिगी
मी दर्याचा राजा तू ग राणी
ताट पूजेचे हातात घेऊनी
पूजा दर्याची करू दोघे मिळुनी
3)
सण नारळी पौर्णिमेचा आला
कोळी बांधवास आनंद झाला
नटूनथटून निघाले बघा जोडीदार
दर्यास जाता मनी हर्ष झाला
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे*
*ता. हदगाव जि. नांदेड.*
No comments:
Post a Comment