*क्रांती*
पोटात भुकेची आग
पीळती आतली आतडी
पण त्यावर करुनी मात
गरजले क्रांती कारक जोरात
पावला गणिक पेटते निखारे
होऊन धावले त्यावरी
ना घरादाराचा केला विचार
धावले क्रांतिकारक जोरात
पायात लोह दंडाची शृंखला
ना कारागृहाची मनी भीती
भारत मातेच्या मुक्तीचा ध्यास
धडपडती क्रांती कारक जोरात
आईला समजावती रडू नकोस तू
देशासाठी देऊ आम्ही हे प्राण
सरणावरी जरी पेटलो आम्ही
त्या ज्वालातून उगवेल पुन्हा *क्रांती*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment