*प्रायश्चित्त*
चुका होतात प्रत्येकाकडूनच
माफ करण्यास मन मोठ लागते
प्रायश्चित्ताने मिटून जाते सारं
फक्त योग्य वेळ यावी लागते
माणूस असतो चुकीचाच पुतळा
जो काम करतो तोच चुकतो
बिनकामी माणसास नसते काही चुकातूनच माणूस घडत राही
चुकांवर पांघरून टाकू नये
धैर्य द्यावे चुका मान्य करायचे
प्रायश्चित करावे मग त्याचे
मनास समाधान मिळेल त्याचे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
shreya
ReplyDelete