कविता - पैसा
पैसा मिळवण्यासाठी माणूस
लालची झाला ,भरभरून कमवायला लागला तेव्हा माणूस मात्र माणुसकीच विसरून गेला
पैसा मिळवण्यासाठी माणूस काही करण्याची तयारी ठेवतो कारस्थानाचा विळख्यात तो स्वतः पैशाच्या लालसेपायी पूर्णतः फसतो
भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा त्याला काही पचत नाही आणि पैसा बोलू लागतो तेव्हा त्याला ही गोष्ट सांगितलेली रुजत नाही
अरे कधी समजेल तुला हे मानवा, क्षणभंगुर आहे हे जीवन आपले,सोडून दे आता तरी लालसा नाही येणार रे तुझ्यासोबत वरती हे पैसा
मेहनत व कष्टाची कमाई करून तरी बघ माणसा! हव्यास आणि लालचीपणा सोडून तरी बघ, पाप-पुण्याचा हिशेब आहे इथेच, अनुभव तुला येईल इथेच.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment