*कविता - तारेवरची कसरत*
आज जमाना खूप बदलला आहे
पूर्वी सारखा जीवनातला साधेपणा
जवळपास लयास जात आलेला आहे
आधुनिक तेच्या नावाखाली खर्च वाढला आहे
नौकरी व्यवसाय शेती सर्वच क्षेत्रात
स्पर्धा ही अगदी टोकाला जात आहे
माणसे सतत मानसिक तणावात राहत आहे
जणू जगण्यातला आनंद हरवला आहे
आपला शेजारी प्रगती करीत आहे
हे पाहवत नाही कुणाला त्याचा मत्सर
हेवा दावा ह्यातच जीवन सम्पत आहे
खर सुख जणू गायब होताना दिसत आहे
महागाईच्या झळा सर्वाना बसत आहे
कितीही कमवा ते कमीच पडत आहे
म्हणून तुम्ही कुणाला एकांती विचारा
तो म्हणेल संसार ही तारेवरची कसरत आहे
~~~~~~~~~~~~~
*✍प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment