कविता - आसवांचा पूर
सुखाची आस कधी ना बाळगली
आसवांचा पूर वाहिला तरी ना थांबली
वेदनांना मी माझ्या जाणून घेते
घाव मनाचे माझ्या सोसून घेते
काळजात भाव जेव्हा दाटते
तेव्हा नेत्रास समजावून सांगते
जगण्याची ओढ कधी न होती
विचार मनास कधी न स्पर्शती
वेदनांना मीच माझ्या जाणते
अबोलत्या मनासही मीच बोलते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment