*गणपती बाप्पा मोरया*
बाप्पाचा आगमनाने
आनंद सर्वत्र हो झाला
गणपती बाप्पा मोरया
जयघोष निनादू लागला
तुमच्या स्वागताची मी
तयारी केली आहे भारी तुमच्या येण्याने बाप्पा
शोभा आली माझ्या घरी
मुषकावर स्वार होऊन
आले बाप्पा तुम्ही घरी
तुमच्या आवडीचा केला
नैवेद्य मोदक लाडू भारी
मनोभावे पुजते बाप्पा
मी तुमची सजलेली मुर्ती
तुमच्यामुळे मिळते आम्हा
जगण्यासाठीची स्फूर्ती
श्रीगणेशा करून कोणत्याही कामाची होते सुरूवात
भक्तास तारुणी तुम्ही संकटावरही करता मात
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिला सेनकुडे
ता.हदगाव.
No comments:
Post a Comment