*कविता - गोकुळातील दहीहंडी*
गोकुळात रंगला सोहळा
बालकान्हा हा जन्मला
नंदलाल यशोदामाईस हो
आनंद साऱ्या गोकुळा झाला
यशोदा नंदन हा भारी
खोड्या करतो घरोघरी
वृंदावनी रचतो रासलीला
यशोदेचा हा नंदलाला
गोकुळाष्टमी बघा आलिया
दहीहंडी वरवर चढूया
थरावरी थर मिळून लावूया
गाणी आनंदाने गाऊया
गोपी संगे कान्हा खेळतो
रंगात रंगुनी नाचतो गातो
सवंगड्यांसह दहीहंडी
तो गोकुळात फोडतो
सण कृष्ण जन्माष्टमीचा
गाणी गातात सुवासिनी
कान्हा यशोदा, देवकीचा
पाळणा झुलतो यशोदांगणी
〰️〰️〰️〰️〰️〰️
प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment