*कविता - आकाश*
आकाश एक पोकळी
जीला ना सुरुवात ना अंत
दृश्य फ़क्त नजरेच्या टप्यात
पूर्ण विश्वाला व्यापलेली
ढगांनी अच्छादलेलं आभाळ
आपण नजरेत सामावू शकतो
पण त्या पलीकडचं अस्तीत्व
बघायला नेत्र वेगळे पाहिजे
आकाशाच घटा घटात सामावन
हे काही ठरवून नसतंच मुळी
पण प्रत्येक घटाला मात्र वाटते
हे आकाश फक्त माझंच आहे
क्षितिजा पर्यंत दिसणार आकाश
पण कधीही न संपणार क्षितिज
पृथ्वीच्याशेवटच्या टोकावरून सुध्दा
दूर दूर दिसणार हे क्षितिज
आकाशाशी प्रत्येकाच नात असावं
स्वतः ला ही आकाशातच पहावं
आकाशाला स्वतः मध्ये सामावून घ्यावं
आणि आपणही मग आकाशच व्हावं!
आकाशच व्हावं!
~~~~~~~~~~~~~
प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
No comments:
Post a Comment