*कविता - पैसा*
पैसा माध्यम जगण्याचं
जगण्या साठी साधन घेण्याचं
नैतिकतें नी कमावून जीवन
आपलं सुखी समृद्ध करण्याचं
पण हे सारं माणूस विसरला
पैशाचे मागे वेड्या सारख धावत सुटला
खूप सारा पैसा जमवू लागला
अन यातून वाम मार्गाला लागला
अनैतिकता येथे पावन झाली
लबाडी चोरी रीश्वत खोरी वाढली
राजवाड्या सारखी घरे बांधली
पण माणसे मनाने कंगाल झाली
माहीत आहे पैसा सोबत येत नाही
तरीही माणसाची हाव कमी होत नाही
तेंव्हा एक विनवणी दादा ताई माई
पैशा पेक्षा माणुसकी ही श्रेष्ठ रे भाई
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment