कविता - राखी
भाऊ बहिणीचे नाते
असे अतूट बंधन धागे
धागे असते हे प्रेमाचे
नसते नाते हे स्वार्थाचे
पावित्र्याच्या या बंधनास
जपूया आपण सर्वजण
सण रक्षाबंधनाचा करुया
गोडवा वाढवूया मिळून
बहिणीची माया असते
आईसम ती सांभाळते
भावासाठी ती आपला
जीव ओवाळून टाकते
सासीरवाशीण बहीण
वाट पाहते भावाची
डोळे येतात भरुन तिचे
अशी असते उब मायेची
डोळ्यातून वाहती धारा
बंधू घेतो मायेने जवळी
नात्यातील हा बंध सारा
बहिण भावास ओवाळी
प्रेम आणि जिव्हाळ्याची
राही काळजात साठवण
सण राखीचा येता मग
येती माहेराची आठवण
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment