*सोहळा*
पाऊस डिजिटल विशेषांकाचा
सोहळा हा असा हर्षआनंदाचा
सारे मिळून साजरा करूया
गौरव मराठीचे शिलेदारांचा
पावसाच्या गंध प्रेमाचा असा
इंद्रधनुच्या सप्तरंगात स्पर्शावा
विशेषांकाचा हर्ष आनंद मनात
गंधित करून अनुभवता यावा
आसुसलेली असते सृष्टी
नक्षत्राच्या पावसासाठी परी
सुगंध दरवळतो सारीकडे
धरतीवर येता पावसाच्या सरी
असा हा आठवणींचा सोहळा
पाऊस विशेषांकाच्या रूपाने
आ. राहुल सरांच्या मेहनतीने
व सर्व ताईं,दादांच्या सहकार्याने
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*©️मराठीचे शिलेदार समूह.
No comments:
Post a Comment