✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/01/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००९-अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी ● १९९९-गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर 💥 जन्म :- ● १९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती. ● १९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर. 💥 मृत्यू :- ● २००२-रामेश्वरनाथ काओ, RAW या भारतीय गुप्तचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ● १९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पर चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधणार संवाद, या कार्यक्रमात विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींना भेटण्याची आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईतील नाईट लाईफचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, अपुऱ्या पोलीस यंत्रणेमुळे 26 जानेवारीपर्यंत अंमलबजावणी अशक्य, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांशी चर्चा करावी, संजय राऊत यांचा प्रस्ताव, कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचाही पुनरुच्चार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *साईबाबा यांच्या जन्मस्थळाच्या वादावरुन शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. शिर्डीच्या ग्रामस्थांकडून ग्रामसभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार काल मध्यरात्रीपासून हा बंद मागे घेण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा शुल्कात वाढ, मंदिर संस्थानच्या विश्वस्तांचा निर्णय, शुल्क एक हजाराहून दीड हजारावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बेपत्ता गिर्यारोहक अरुण सावंत यांचा मृतदेह सापडला; कोकण कड्याच्या दरीत पडून दुर्दैवी मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई मॅरेथॉनवर इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व, डेरारा हरिसा ठरला विजेता तर महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा, ज्येष्ठ नागरिकाचा धावताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *क्रिकेटची बातमी - बंगळुरु येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी केला पराभव. या विजयासह भारतानं ही मालिका 2-1 अशी खिशात घातली.* •••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विकासात शिक्षकांचे योगदान ( जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/विकासात-शिक्षकांचेही-योग/ लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। मित्र ।।* - कु. साक्षी विलास आंबेवार वर्ग सहावा जि. प. प्रा. कन्या शाळा, धर्माबाद आपण सारे मित्र मिळून काढूया चित्र सकाळी लवकर उठू या दात स्वच्छ घासू या आपण सगळे बहीण भाऊ सगळे मिळून लाडू खाऊ देऊ या सगळ्यांना सुख घेऊ या सगळ्यांचे दुःख सल्ला घेऊनच काम करू पुस्तकांनाच मित्र बनवू बचत करायला शिकू या समाजाची सेवा करू या *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळेच महान गोष्टी आकार घेत असतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कर्नाटकातील नृत्यप्रकार कोणता ?* यक्षगाण 2) *चीनचे चलन कोणते ?* युआन 3) *ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे ?* यमुना 4) *शाहू महाराजांचे मूळनाव काय होते ?* यशवंतराव 5) *'श्रीमानयोगी' या कादंबरीचे लेखक कोण ?* रणजित देसाई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोर पाटील, यूनिक कंप्यूटर 👤 अहमद लड्डा, क्रीडा शिक्षक 👤 संतोष शेटकर 👤 आदित्य कोंपलवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रोजची प्रसन्न सकाळ ही नवी उमेद देणारी देणगी असते. पूर्व दिशेची अद्भूत रंगांची उधळण ही रोजच नवी असते. पक्षांची रोज नवी नादमधूर सूरांची मैफील रंगते. पक्षांच्या सुरेल किलबिलाटानं मन प्रसन्न होतं. चालण्याच्या व्यायामानिमित्त नेहमीच दिसणारी तीच ती झाडं; पण रोजच कशी नवी, टलटवीत, हिरवीकंच दिसतात! नयनरम्य फुलांचे घोस मनाला नवा तजेला देतात. कालच्या सुंदर घोसातील फुलं आज मात्र कोमेजून मातीत गळून पडली होती. झाडावरच्या घोसातील मुग्ध कळ्यांचं हळुवार उमलणं, उमलत्या पाकळ्यांची सुबक लकब मनाला मोहविणारी होती. मातीत गळून पडलेली कोमेजलेली फुलं आपला सुगंध घेऊन मातीत एकजीव होण्याची ही अदिम ओढ तर नसावी ना!* *फुलांचं फुलणं, झाडांचं डवरणं हे जितकं अद्भूत, सुंदर; पानांचं, फुलांचं गळून मातीत एकजीव होणंही तितकंच अदभूत आणि सुंदर. मातीसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा किती विनम्र भाव. सृजनसोहळा मन प्रसन्न करणारा तसाच आणि तितकाच निर्वाण सोहळाही. ही तर निसर्गाचीच अद्भूत किमया. उदय, विकास, अंत या अवस्था अपरिहार्य, अटळ तशा स्विकाराहार्यही असाव्यात. पण माणूस प्राणी हा उदय-विकासाचे टप्पे मनापासून स्वीकारतो. अंताचा टप्पा स्वीकारणं हे मात्र अवघड, असह्य होतं. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला निसर्गाचा हा नियम लागू आहे. बुद्धिमान, विवेकनिष्ठ माणसाला मात्र कळतं, पण वळत नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌸🌸🌸 🌸 🌸 🌸 🌸🌸 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हावे असे वाटते.आपलं एक नाव* *असावं,कुठेतरी ,कुणीतरी आपली आठवण काढावी असे वाटते.मग* *यासाठी माणूस जीवापाड मेहनत करून, सुखांना पारखे करून* *मार्गक्रमण करत असतो. मान-अपमान सहन करत,घोर संघर्ष* *करत आपली नौका पार करत असतो.* *पण हे करत असताना प्रमाणामध्ये सर्व काही असावे हे विसरून* *चालणार नाही.धुतराष्ट पुत्रप्रेमाने वेडा होतो,यातून महाभारत घडते.कैकयी याच अट्टाहासाने* *रामायण घडवून आणते.तर गोपिकाबाई या* *अतिमहत्वकांक्षे मुळे अभागी स्त्री म्हणून ओळखल्या जाते.आपल्या* *पती आणि मुलांचे मरण ती डोळ्यादेखत पाहते.* *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज* *आहे.* *उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा;* *परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि* *समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ* *स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल,* *तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा* *नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला* *कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत.* *शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार* *आहे.* *स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव.* *राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या* *अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते.* *आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान* *राजाचा खून करायलाही* *तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• विचारामुळेच माणूस विचारशील बनतो.त्याच्या मनाचे चांगले विचार असतील तर त्याच्या कृतीमध्ये साकारताना दिसतात.मग ती कृती चांगली असेल तर त्याच्या वर्तनातही चांगले दिसायला लागते.ते त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार कृतीतून स्पष्ट होतात.ते त्याच्या स्वतःच्याही भल्यासाठी व इतरांच्याही भल्यासाठी इष्ट असतात.पण तेच विचार जर वाईट असतील तर ते त्याच्या जीवनासाठी व इतरांच्या जीवनासाठीही हानीकारकच ठरतात. त्यामुळे विचार हा नेहमी चांगलाच करायला हवा. त्यात स्वतःबरोबर इतरांचेही कल्याण होण्यास मदत होईल. - व्यंकटेश काटकर, नांदेड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधान मानने* एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का? तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.' *तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.प्राप्त परिस्थितीत समाधानी असणे चांगले .* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment