✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/01/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा 💥 जन्म :- ● १८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ. ● १८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक. ● १८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक ● १९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक ● २००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक. ● १९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक. ● १९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *परीक्षेतला तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात देणार विद्यार्थ्यांना टिप्स* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबईत 26 जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर 'नाईट लाईफ' सुरु केली जाणार आहे. त्यानुसार मुंबईत अनिवासी भागातील सर्व थिएटर, मॉल्स, रेस्टॉरंटस् 24 तास खुले ठेवण्यास परवानगी दिली जाणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बहुचर्चित होट्टल महोत्सवाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन, उद्या होईल समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई, पुणे: शहर आणि परिसरासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दोन दिवसांत वाढला असून अनेक ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले. उत्तर महाराष्ट्राला शनिवारी थंडीच्या लाटांचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर आणखी दोन दिवस बोचऱ्या थंडीचा मुक्काम राहील असा अंदाज आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना 22 जानेवारी ऐवजी आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भयाच्या आईने मात्र फाशीला उशीर होत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन, 21 ओव्हरमध्ये एकही धाव न देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आजही बापू नाडकर्णी यांच्या नावावर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राजकोट, 17 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं दमदार कमबॅक केला. दुसऱ्या सामन्यात भारतानं 36 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *एका शेतकऱ्याची आत्मकथा* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आनंदवन* *-प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त'* नागपूर *📞-९४२१८०३४९८ अंगणवाडी ही छान छान छान खुलून दिसते मुलांचे उद्यान सवंगड्यासंगे नित्य चाले खेळ सहज त्यांच्यात जुळे ताळमेळ खेळीमेळीतून घडे तन मन सात्त्विक घासाने फुलते जीवन *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जपानमध्ये हिंद स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली होती ?* रासबिहारी बोस 2) *मानवी उदरातील लहान आतड्याची लांबी किती असते ?* 6 मीटर 3) *बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?* राबडी देवी 4) *शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता ?* यकृत 5) *मानवी छातीच्या पिंजऱ्यात किती बरगड्या असतात ?* 24 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती विजया वाड, प्रसिद्ध साहित्यिक 👤 पी. आर. कमटलवार, धर्माबाद       जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 👤 रामनाथ खांडरे, करखेली 👤 त्र्यंबक आडे, नांदेड 👤 महेश गोविंदवार, सहशिक्षक, माहूर 👤 कृष्णा कोकुलवार, नांदेड 👤 शैलेश मुखेडकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो , कालच्या दिवसाच्या* *विचारात गुंतून पडू नका,आजच्या* *आनंदावर विरजन* *कशासाठी टाकता, जो* *काही काल होता,त्याची जाणीव स्व* *ला* *देखील करू नका,कारण* *काल विचारांमध्ये राहील *पण आज अस्तित्वात आहे तो* *हातातून जाऊ देऊ नका,* *So be happy* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वृद्ध झालेला कुत्रा* एका कुत्र्याने आपल्या तरुणपणी फार जनावरांची शिकार करून आपल्या मालकाचा लोभ संपादन केला होता. त्यावेळी त्याचा मालक त्याला कुरवाळीत असे व चांगले पदार्थ खाऊ घालीत असे. पुढे त्या कुत्र्याला म्हातारपण आले, तेव्हा पूर्वीसारखे शिकारीचे काम त्याच्याकडून होईनासे झाले. अशा अवस्थेत एके दिवशी इतर सगळ्या कुत्र्यांच्या पुढे जाऊन त्याने एका सशाची तंगडी पकडली, परंतु म्हातारपणामुळे त्याच्या तोंडात दात नव्हते, त्यामुळे ससा धरावा तितक्या बळकटपणे धरता आला नाही व तो ओढाताण करून सुटून गेला. ते पाहून त्या मालकास फार राग आला. हातातील काठीने तो त्याला मारू लागला. तेव्हा तो कुत्रा त्याला म्हणाला, 'अरे कृतघ्न माणसा ! क्षणभर थांब आणि तुझी चाकरी मी किती वर्षे इमाने इतबारे केली आहे, याचा विचार कर. ससा धरण्याच्या कामी मी माझ्याकडून काहीही आळस केला नाही. पण माझे दात पडले त्याला माझा काय इलाज ? म्हातारपणामुळे माझ्याकडून काम होत नाही, यामुळे तुला राग येतो, पण जर तू माझ्या पूर्वीच्या चाकरीकडे लक्ष देशील, तर तुझा माझ्यावरचा राग बराच कमी होईल.' *तात्पर्य :ज्याने तारुण्यात आपली चाकरी इमानाने केली त्या नोकराला त्याच्या म्हातारपणात क्रूरपणे वागविणे हे कृतघ्नतेचे लक्षण आहे..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment