*ऊब मायेची*
(दि.०८-०१-२०२०)
ऊब मायेची असावी
अनाथास ती लाभावी
घरट्यातला पिलांची
माय पिलास दिसावी
असा मायेचा ओलावा
कुठ नाही फिटणारा
त्याचा पाझराने जीव
बाळाचा आतुरणारा
सानुल्याची ग माय
जशी असते दुधाची ग साय
असा जीव वेडा सारा
मायेचा असतो झरा न्यारा
कोणा?कोणा? मी सांगू
ऊब माऊलीची कशी?
तिची सावलीही असते
जगाहुनही न्यारी जशी
〰〰〰〰〰〰〰
*श्रीमती प्रमिला सेनकुडे*
No comments:
Post a Comment