*गौरव मराठीचा*
माय माझी मराठी
मी तीच लेकरू
किती करावी कौतुके
माझ्या प्रेमळ मायेचे
तिच्याच अंगा खांद्यावर
मी वाढलो असे
मराठी मायेच्या पदराखाली
वाघिणीचे दूध असे
तिच्या शब्दांचा रुबाब
काय वाखानावा
अक्षरा अक्षरात असे
साखरेचा गोडवा
दुसरी कुठलीच भाषा
नाही इतुकी समृद्ध
समास व्याकरण अलंकार
यांनी नेहमी सज्ज
कवी कुसुमाग्रज यांनी खूप
नटविले या मायेला
म्हणून मायेचा गौरव दिन
त्यांच्या जन्म दिनाला ।
~~~~~~~~~~~~~
✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड.
No comments:
Post a Comment