✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 17/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत. 💥 जन्म :- ● १८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा. 💥 मृत्यू :- ● १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान. ● १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा. ● १९७८-पुरुषोत्तम शिवराम रेंगे, कादंबरीकार,नाटककार ● १९८६-जे कृष्णमूर्ती,भारतीय तत्त्वज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा मंत्र्यांनीही घेतली शपथ, दिल्लीच्या विकासासाठी मुख्यमंत्री केजरीवालांची नरेंद्र मोदींना साद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *काल रविवारी पाचवी व आठवी वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न, नांदेड जिल्ह्यात 44 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : तब्बल तीन तासांनंतर खेड-शिवापूर टोलनाक्यावरचं आंदोलन मागे, MH12 आणि MH14 पासिंग असलेल्या गाड्यांना टोलमाफ, केंद्रीय मंत्री गडकरींसोबत बैठक होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दक्षिण कोकणची काशी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे या यात्रेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नाशिकचा दौरा रद्द करुन शरद पवार मुंबईत, आज राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक, एल्गार प्रकरणाच्या समांतर तपासासाठी पवार आग्रही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पासष्टाव्या अॅमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये 'गली बॉय'चा डंका; सर्वश्रेष्ठ अभिनेता, अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचाही मान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर, यंदा 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना चेन्नईत रंगणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला, राजे शिवाजी होऊ या ....!* महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला काळ म्हणजे छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा काळ होय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला राजे शिवाजी महाराज यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या नावाचा जयजयकार आज ही घराघरातून केला जातो. सर्वधर्मसमभाव म्हणजे काय असते ? याची शिकवण त्यांनी आम्हांला दिली आहे........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे...... https://shopizen.page.link/rvrhZva95nYpy2Np7 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ➖➖➖➖➖➖➖➖ *_स्वप्नातच सहल..!_* *© शशी त्रिभुवन, अस्तगाव(अहमदनगर)* *चलभाष : 8275032897* ➖〰〰〰〰〰〰〰➖ स्वप्नातच काढली सहल ढगांच्या त्या दूर देशात, आमच्यासारखी पोरं पोरी ढगांच्या त्या शूर वेशात! पांढरे करडे घालून झगे पळत सुटत ती गडगडा, ढगोबा आजोबांचा तर आवाज नुस्ता कडकडा! पाणी कसं होतं तयार पाहिली ना मज्जा यार; धार धार धरताना ती गोंधळ नि फज्जा यार! वाफ कोंडून घेते आभाळ पाहिलं तेही यंत्र मोठ्ठं, हॅन्डल फिरवत होतं कोण? कळलं नाही मात्र पोट्टं! गुरुजी म्हणे फारच चौकस इथे तिथे तुझेच सवाल, शिकवलेलं विसरलास ना- उत्तर तर लिहिलेस काल! प्रश्न प्रश्न घोकत मी मग स्वप्नातून झालो जागा, सहलीचा केला हिरमोड अभ्यासावर काढला त्रागा! ➖〰〰〰〰〰〰〰➖ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कन्याकुमारी भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?* दक्षिण 2) *ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले पहिले भारतीय कोण ?* दादाभाई नवरोजी 3) *कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?* दापोली 4) *जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप कोणता ?* दीक्षाभूमी, नागपूर 5) *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कोठे आहे ?* दुबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, पुणे 👤 अशोक इंदापूरे, सोलापूर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद 👤 रविकिरण एडके 👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके 👤 अजिंक्य गव्हाणे पाटील 👤 अंकुश चव्हाण 👤 माधव संगावार 👤 अरुनी शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण ईश्वरापाशी 'संकटे येऊ नयेत' अशी प्रार्थना करतो. संकटे माणसाला माणसासारखे वागायला लावतात. माणसे संकटातच परमेश्वराची आठवण काढतात. तेंव्हा अहंकार गळून पडतो. माणसे नम्रतेने, प्रामाणिकपणे वागू लागतात. आपल्या चूका शोधू लागतात. संकटेच सामर्थ्य वाढवीत असतात. प्रगती घडवीत असतात. आपण अडचणीत असताना सभोवतालच्या माणसाची खरी पारख होते. अडचणींमध्ये कुणी साथ दिली, साथ सोडून कोण गेले आणि अडचणीत कोणी आणले हेही कळते. त्यामुळे आपण हुशार बनतो, निर्भय बनतो, अनुभवी बनतो. जीवन यशस्वी करण्यास समर्थ होतो. संकटांमुळेच पाय जमिनीवर राहतात.* *जगात जे नवीन शोध लागले त्यापैकी बहुतेक अडचणींमुळेच लागले. 'गरज ही शोधाची जननी आहे' असे आपण म्हणतो ते खरे आहे. कोणतीही परिस्थिती स्विकारण्याची मानसिक तयारी हवी. प्रतिकूलतेवर मात करून ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्याकडे हवे. जगताना कोंडी, प्रश्न, अडचणी आणि संकटे आहेत म्हणूनच जीवन जगण्यात मजा आहे. पत्त्यांच्या खेळात हुकूमाची पाने हातात नसताना डाव जिंकणे आधिक आनंददायी असते. अंधारामुळे प्रकाशाचे खरे महत्व कळते. गरिबीमुळेच पैशाचे मूल्य समजते. दु:खामुळे सुखाची गोडी समजते. पराभवामुळे विजयाचा खरा आनंद समजतो. माणसाने पराभवही उत्सवासारखा साजरा करावा, कारण पराभवातून माणूस शिकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलंस कमी होतो, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात. प्रत्येकाचं आयुष्य शून्यापासून सुरू होतं असतं.. परंतू त्या शून्यापुढे आकडे स्वतःच्या कर्तृत्ववाने लावावे लागतात...! निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो; तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो. आयुष्याची खरी सुरुवात तर तुमच्या वाडवडिलांच्या ख-या पुण्याईने सुरु झाली.जीवनाचा ' मध्य ' तर तुमच्या कर्तृत्वाने सिद्ध करायचा आहे.तो तुम्हाला चांगला करायचा आहे की,वाईट हे तुम्हालाच ठरवायचे आहे.कारण हे मात्र तुमच्या हातात आहे.यासाठी तुम्हाला कुणाच्या भरवशावर बसता येत नाही किंवा नशिबावर अवलंबून राहता येत नाही.म्हणून तुमच्या जीवनातला मध्यच महत्त्वाचा आहे.आणि शेवट मात्र आपल्या हाती नाही.भविष्यात केव्हा काय घडेल याचे काही ठामपणे सांगता येत नाही.म्हणून जे आज आणि आता तुमच्यासमोर आहे ते सत्य आहे ते स्वीकारा आणि त्याला कौशल्याने, धैर्याने आणि परिस्थितीनुरूप उत्तर द्यायला पुढे रहा.यातच तुमच्या जीवनाचे खरे सार आहे. अशोक कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गाढव आणि निर्दय मालक* एक खूप गरीब गाढव होते. त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे. असेच ते गाढव म्हातारे झाले. एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले. रस्ता अवघड आणि खांचखळग्यांचा होता. त्यामुळे गाढव धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले. मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला. तेव्हा, गाढव मान वर करून म्हणाले, ''अरे, दुष्ट माणसा, हे सगळे नुकसान तुझ्याचमुळे झाले. तू जर मला नीट खाऊ घातले असतेस तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे ओझे मी सहज उचलू शकलो असतो.'' तात्पर्य : काही लोक कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासही कमी करीत नाहीत *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment