✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- वैतंगी दिन - न्यू झीलँड. बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया. ● १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या. ● १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ● २००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. ● २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध. ● २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले. 💥 जन्म :- ● १९१२ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण. ● १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार. 💥 मृत्यू :- ● १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज. ● १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते. ● १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस. ● २००१ - बॅ.विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या नावाने ट्र्स्टची स्थापना करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेमध्ये केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नागपूर महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या; खासदार गोपाळ शेट्टी यांची मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोरोना व्हायरसमुळे झालेला आजार बरा करण्याकरीता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईः उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळानं तीन मोठे निर्णय घेतले आहेत. कंपनी एकत्रीकरण दस्तांच्या मुद्रांक शुल्कावर कमाल मर्यादा 50 कोटीपर्यंत वाढवण्याला मंजुरी देण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *ट्वेंटी-20 मालिकेतील मानहानीकारक पराभव, कर्णधार केन विलियम्सला झालेली दुखापत या दुहेरी संकटातून वाट काढत यजमान न्यूझीलंड संघानं वन डे मालिकेत दणक्यात सुरुवात केली. भारताचा केला पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आयसीसीने भारतीय संघावर सामन्यानंतर दंड ठोठावला आहे. भारतीय संघाने निर्धारीत वेळेनंतर चार षटके टाकली होती. या षटकांसाठी आयसीसीने भारताय संघातील खेळाडूंच्या मानधनावर ८० टक्के दंड ठोठावला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लिहिते व्हा......!* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मसाला भात* - गणेश दत्तू लोंढे कासारी ता बार्शी जि सोलापूर रंगला अमुचा खेळ विटी दांडू चावडीसमोरी ताकतीने मारली विटी बघताच गेली पत्र्यावरी म्हातारी ओरडत आली घेऊन हाती काठी आम्ही भिऊन पळालो घेऊन दांडू विटी दमलो थकलो खेळून गडबडीत आलो घरी आई उभी होती रागाने वाटेत दारी आईनं केला होता बटाटा, मिरची टाकून भात मांडी घालून बसलो मी मसाला भात खात *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रक्त शुद्धीकरणाचे काम कोणता अवयव करतो ?* फुफ्फुस 2) *जगातील सर्वात जुना खेळ कोणता ?* पोलो 3) *'सरोवराचा देश' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?* फिनलँड 4) *ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला ?* प्रिस्टले 5) *जगातील सर्वात मोठे महासागर कोणते ?* पॅसिफिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते, दै. सकाळ, जालना 👤 कोंडेवार साईनाथ, भैसा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रचंड थकवा आल्यानंतर, दमल्यानंतर हळूहळू आपण आपला मूळ लयीतला श्वास गवसणं किती विलक्षण असतं. स्वत:चा ठाव लागणं, स्वत:चा थांग लागणं, जणू पुनर्जन्मच. म्हणून जगण्याच्या सुलभीकरणात थकवा गमावून बसू नये. थकव्या थकव्यात फरक करावा. प्राणपणानं जीव लावून खरंखुरं थकावं आणि थकव्याच्या गर्भातून स्वत:चं सर्जन होताना अनुभवावं. अर्थात इतकं सगळं घडलं तरी बाहेरच्या जगाला तुम्ही निव्वळ दमलेले, थकलेले दिसता. त्यांना जाणवतं की, तुमचा श्वास फुललाय, छातीचा भाता वरखाली होतोय. तुमच्या आप्तांना तुमची चिंता वाटते. त्यांना वाटतं की, तुम्ही इतकी दगदग करू नये. सकस, पौष्टिक अन्न खावं. आप्तांची चिंता रास्त असते.* *तरीसुद्धा आपली शक्ती पणाला लावून थकणं-दमणं योग्य असतं. थकण्याला घाबरून, न थकण्याचे उपाय शोधणं हा सर्वथा अलाभाचा व्यवहार आहे. त्यानं थकणं घटेल आणि आपले नवनवे जन्मही घटतील. श्वास फुलल्याशिवाय कसं कळणार श्वास घेतो आपण, छातीचा भाता वरखाली झाल्याशिवाय कसं कळणार की, प्राणवायुचं चलनवलन किती सुखाचं असतं. तो फुफ्फुसांना व्यापतो म्हणजे काय होतं हे कसं समजणार ? श्वासोच्छ्वासानं शरीरावर उठणा-या लाटांचं उठणं-विरणं कसं निरखता येणार? शक्तीपाताच्या अग्रावर जाऊन कोसळण्याच्या क्षणी स्वत:चा थांग सापडण्याची धडधड ऐकू येण्याला तुलना नाही. हेच थकव्यातलं सर्जन आणि हाच सर्जनाचा थकवा..!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परि जन्मली सारी वेडी मुले. ही केशवसुत याची कविता भारत मातेचे पुत्र नक्कीच प्रत्येक क्षेत्रात खरी करून दाखवतात. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पाकिस्तानविरुद्ध सेंच्युरी मारणे आणि उत्तुंग षटकार ठोकून भारतीय टीमला विजयी करणे हे कोट्यवधी क्रिकेटप्रेमी भारतीयांचं स्वप्न असावं! एकोणीस वर्षांचा यशस्वी जयस्वाल हे स्वप्न आज जगला! १९ वर्षांखालील (U-19) वर्ल्ड-कपमध्ये नाबाद १०५ धावा करून, पाकिस्तानचा धुव्वा उडवून हे स्वप्न जगला. पण ही इतकीच गोष्ट नाहीये त्याची! एके काळी झोपडीत किंवा फुटपाथवर राहून, पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणारा अत्यंत गरीब घरातला मुलगा, भारतीय U19 टीमचं प्रतिनिधित्व करून टीमच्या विजयाचा शिल्पकार बनू शकतो हा ‘भारतीय स्वप्ना’चा उत्तुंग षटकार आहे!! उत्तर प्रदेशातल्या एका अत्यंत छोट्या खेड्यातल्या गरीब घरातला हा मुलगा, वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्याच्या वेडापोटी मुंबईत आला. एका डेअरीमध्ये राहायची जागा मिळाली आणि क्रिकेट अॅकॅडमीत प्रवेश मिळाला. डेअरीतली पडेल ती कामं करून हा पोट भरायचा आणि दिवसभर क्रिकेट खेळायचा. क्रिकेटमुळे हा फार कामं करत नाही म्हणून डेअरीवाल्याने ह्याला हाकलून दिलं.मग त्याच्या एका काकांच्या मदतीने मुंबईतल्या मुस्लिम समाजाच्या एका तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्याला राहायला जागा मिळाली. तंबू/झोपड्या असं राहायचं ठिकाण. उन्हाळ्यात तिथे राहणं असह्य झालं की उघड्यावर, रस्त्यावर झोपायचं; पण काहीही झालं तरी दिवसभर क्रिकेट खेळायचं!! पोट भरण्यासाठी तो पाणीपुरी विकायचा!!ज्वाला सिंग नावाच्या एका क्रिकेट कोचला त्याचा खेळ आवडला आणि यशस्वीचं आयुष्य बदललं. ज्वाला सिंगने त्याला स्वतःच्या घरी राहायला नेलं. कोचिंग देत घडवलं आणि यशस्वी जोरदार क्रिकेट खेळायला लागला.२०१५च्या Giles Shield interschool च्या एका मॅचमध्ये ३१९ रन्स ठोकून आणि १३ विकेट्स घेऊन तो ‘लाइमलाइट’मध्ये आला आणि गेली पाच वर्षे तो ज्युनियर क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये धडाकेदार विक्रम करत आहे!! यंदाच्या U19 ‘वर्ल्ड कप’ मध्ये तो भारतीय टीमसाठी जोरदार पराक्रम करत आहे अन् २०२०च्या ‘आयपीएल’साठी ‘राजस्थान रॉयल्स’ने दोन का अडीच कोटी रुपयांच्या करारावर त्याला टीममध्ये घेतले आहे!!अमेरिकेत, आपल्या टॅलेंटने झटपट मिलियन डॉलर्स कमावणे ह्याला ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणतात. तसंच आपल्या टॅलेंट आणि कष्टांच्या जोरावर भरपूर पैसे आणि प्रसिद्धी मिळवणे, तीही क्रिकेट किंवा बॉलिवुडमध्ये, हे कदाचित ‘इंडियन ड्रीम’ म्हटलं पाहिजे!यशस्वी जयस्वाल हे एका अत्यंत यशस्वी इंडियन ड्रीमचं उदाहरण आहे!!त्यानं यशाचे नवनवे उत्तुंग षटकार मारत राहावेत अन् असे अनेक यशस्वी ‘ड्रीमर्स’ भारतात तयार होत राहावेत ही मनोमन सदिच्छा!! अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात एखादे चांगले ध्येय आपल्या मनात नाश्चित करुन ते पूर्ण करण्यासाठी अनेक बिकट प्रसंगाशी सामना करावा लागतो. त्याच्याशिवाय ध्येयाचा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही.केवळ ध्येय मनात ठेवले आणि आपण काहीच प्रयत्न केले नाही तर आपण आपल्या जीवनात अपयशी ठरलो आहोत हे निश्चित समजावे.म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कोणताही खडतर प्रवास करण्याची तयारी ठेवावी लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खर्या भक्ताला रत्नांचे मूल्य दगडांइतकेच!* एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते. पुरंदरदासांच्या पत्नीने घरी तांदूळ निवडतांना त्यांत काही मौल्यवान रत्ने असल्याचे पाहिले. तिने ती तांदळातून निवडून काढून कचरापेटीत फेकून दिली. भक्त पुरंदरदास प्रतिदिन राजसभेत जात होते. राजा प्रतिदिन त्यांना हिरे दोन मुठी तांदळात मिसळून द्यायचा; परंतु त्याच्या मनात विचार यायचा, पुरंदरदास धनाच्या लोभापासून मुक्त नाहीत. जर ते मुक्त असते, तर ते पुन्हा भिक्षेसाठी राजसभेत आले नसते.एके दिवशी राजा पुरंदरदासांना म्हणाला, भक्तराज, लोभ मनुष्याला आध्यात्मिक प्राप्तीपासून दूर करतो. आता तुम्ही स्वतःच स्वतःविषयी विचार करावा. राजाच्या तोंडून असे ऐकल्यावर भक्त पुरंदरदासांना अतिशय वाईट वाटले. ते दुसर्या दिवशी राजाला आपले घर दाखवायला घेऊन गेले. त्या वेळी पुरंदरदासाची पत्नी थाळीत तांदूळ घेऊन ते निवडत होती. त्या वेळी राजा आणि पुरंदरदासांची पत्नी यांच्यात पुढील संभाषण झाले. राजा : देवी, तुम्ही काय करत आहात ? ती (पुरंदरदासाची पत्नी) : महाराज, कोणीतरी भिक्षेत तांदळासह काही मौल्यवान रत्नेही मिसळून आम्हाला देतो. मी त्या दगडांना निवडून वेगळे करत आहे. राजा : तुम्ही त्यांचे काय करणार ? ती : घराबाहेरील कचरापेटीत फेकून देईन. आमच्यासाठी या दगडांचे काही मूल्य (किंमत) नाही. राजाने त्यांना दिलेली ती सर्वच मौल्यवान रत्ने कचरापेटीत पडलेली पाहिली. तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला आणि त्याने त्या भक्त-दांपत्याच्या पायाशी लोटांगण घातले.आणि म्हणाला खरोखरच खरा भक्त कधीच धनाची लालसा करीत नाही.त्यास मौल्यवान रत्नाचे मूल्यही दगडासमान असते. संदर्भ : (ऋषीप्रसाद, एप्रिल २०१०) *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment