✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/03/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जय जवान , जय किसान* https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_24.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९७: मदार तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड करण्यात आली 💥 जन्म :- ● १९२६: ललित लेखक रवींद्र पिंगे  💥 मृत्यू :-  ● १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री ● १८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सर्व केंद्रीय मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, घाबरण्याऐवजी काळजी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन, तर शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, भाजपकडून भागवत कराड तर दिग्गजांना बाजूला सारत काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित, चंद्रकांत खैरे, एकनाथ खडसे, संजय काकडेंची संधी हुकली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशात कोरोनाचे 73 तर महाराष्ट्रात 11 रुग्ण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती, आरोग्य खात्याकडून विशेष खबरदारी, राज्यातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नसल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जेरुसलेम : चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा तसेच लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत असून इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा केला आहे. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात शिवजयंती तिथीनुसार साजरी, मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण तर औरंगाबादेत राज ठाकरेंचं शिवरायांना अभिवादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कोरोनाचा हापूस आंब्यावर परिणाम, विमान वाहतूक बंद असल्यानं निर्यात बंद, शेतकरी चिंताग्रस्त, कोरोनामुळे शिर्डीत येणाऱ्या भक्तांची संख्या रोडावली, राज्यात अनेक यात्रा उत्सव रद्द, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही फटका, 70 टक्के बुकिंग परदेशी पर्यटकांकडून रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *कोरोनामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेदरम्यानचे पुढील दोन एकदिवसीय सामने प्रेक्षकांविना होणार, तर आयपीएलवरही कोरोनाचं सावट कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजा* - उत्तम सदाकाळ, जुन्नर, (पुणे) 9011016655 आजा आधाराचा वड आजा बळकट खोड दिशा देतो जगण्याला आजा संस्काराचे झाड आजा सांगतो कहाणी आजा गातो गोड गाणी मेळा जमतो मुलांचा रोज आजा भोवताली पाठी घेतो लेकरांना घोडा बनतो रे आजा हट्ट धरल्या लेकरांचे लाड पुरवितो आजा आजा असता घरात घर भरलेले वाटे तीर्थे सारी आजा ठाई देव आजामध्ये भेटे बदलत्या दुनियेत नसे किंमत नात्याला नातवांच्या हितासाठी जपा आपुल्या आजाला *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" अनेक वेळा चांगले क्षण, आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा कोणता ?* करबुडे 2) *भारताच्या मध्यभागातून कोणते वृत्त जाते ?* कर्कवृत्त 3) *जगातील सर्वात प्राचीन धर्मग्रंथ कोणता ?* ऋग्वेद 4) *कोणता रक्तगट सर्वांना चालतो ?* O+ 5) *कोणत्या वृक्षाला पन्नास वर्षांनी फळे येतात ?* ओक *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रेरणाताई वरपूडकर 👤 सुरज माने 👤 भगवान कांबळे, पत्रकार, धर्माबाद 👤 रुस्तुम शेख *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट, या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरून जावा. ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. सद्गुरूंकडून मिळालेले नाम ह्रदयापासून आणि भौतिकतेचा विसर पडून जर आपण घेत राहिलो, तर त्यापासून येणारी अनुभूती ईश्वरासमीप नेते.* *नामामुळे व्यक्तीच्या ठिकाणी निरलस, निर्भय वृत्ती वस्तीला येते. अशा व्यक्तीच्या प्रत्येक चलनवलनात फक्त आणि फक्त देव आणि देशप्रेमच लपलेले असते. येता-जाता, उठता-बसता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा अविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा भेद नाम्मोच्चाराने दूर होतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ज्याच्या मुखात नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. हेच वेदपुराणे, उपनिषदे, महाकाव्य यांनी वेगवेगळ्या शब्दांत सुगमतेने सांगितले आहे. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरीता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात, मित्रांनो* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...* *की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..* *सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...* *आपली होऊन जातात...* *तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा...* *नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...* *शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...* *त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....* *शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते* *तर मनाची सुंदरता,* *टिकून राहाते शेवटपर्यंत...* *शरीराला वय असतं....* *मनाला ते कधीच नसतं...* *शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...* *शरीर तर असतं निमित्तमात्र...* *माणसाच्या स्वभावात गोडवा...* *शालीनता...* *प्रामाणिकपणा...* *आणि विनयशीलता असेल...* *तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...* *तरी ती हवीहवीशीच वाटते...* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,* *देवघरातील समईच्या तेजापुढं* *आपण नतमस्तक होतो...* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं...* *आपल्यासोबत असणं...* *ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?* *नशिबानं कधी भेटलीच...* *तर हळुवार जतन करून ठेवावीत...* *कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?* *माणूस बनुया,माणस जपुया,* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात आपल्याला श्रीमंत व्हायचे असेल तर पहिल्यांदा प्रामाणिकपणा अंगी बाळगायला हवा.कारण प्रामाणिकपणा अंगी बाळगल्यामुळे आपणास खोटे बोलण्याची सवय लागत नाही, आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो,कुणीही आपल्याकडे संशयीत भावनेने पाहत नाही, नातेसंबंध,मित्र आणि इतरांमध्ये प्रामाणिकपणा असल्यामुळे विश्वासाचा पाया मजबूत होतो, आपल्या प्रामाणिकपणाची वेळोवेळी इतरांना प्रचिती आल्यामुळे आपल्याकडे वाईट नजरेने किंवा वेगळ्या विचाराने पहायची हिम्मत कुणी करणार नाही.एवढेच नाही तर आपल्या जीवनात जीवन जगण्याचा पाया मजबूत होतो तर प्रामाणिकपणे जीवन जगण्याचे ध्येय आपल्या जीवनात सातत्याने ठेवल्यामुळे आपल्याला कुणापुढे मान खाली करून माफी मागायची गरज नाही.जीवनात प्रामाणिकपणा असणे म्हणजे आपल्या ताठ मानेने स्वाभिमानाने जगण्याचे मंत्र शिकले आहे असे होईल. आपण इतरांच्या जगण्याकडे पाहिले आणि आपल्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीकडे पाहिले तर आपण फार श्रीमंत आहोत हे लक्षात येईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड. 🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चूक कळली* एक होते तळे. त्यात होते बेडूक. बाजूला होते मैदान तेथे मुले खेळत. खेळ म्हणून तळ्यात दगड फेकत. पाणी उंच उडे. मुलांना गंमत वाटे. मुलांना आनंद होत होता. आणि ती आणखी पाण्यात दगड मारत होती. पण ती दगड बेडकांना लागत असे. मुलांचे पाण्यात दगड मारणे असे रोजच चालत असे. बेडूक घाबरून गेले. मग एकदा काय झाले पाण्यातून एक बेडूक पुढे आला. मुलांना विचारू लागला, " तुम्ही दगड का मारता?" मुले म्हणाली, " पाण्यात दगड मारणे हा आमचा खेळ आहे." आम्हाला त्यात आनंद वाटतो, आम्हाला खूप खूप मज्जा येते." बेडूक म्हणाला. " तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो". तुम्ही मारलेले दगड आम्हाला लागतात आणि आमच्या तील बेडकांना ती दगडं लागतात व आमचा जीव जातो. मुलांना हे ऐकून खूप वाईट वाटले. आपले चुकले हे मुलांना कळले. मुलांना आपली चूक कळली. त्या दिवशीपासून मुलांनी दगड पाण्यात मारणे हा खेळ सोडून दिला. तात्पर्यः आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही हि काळजी सर्वांनी घ्यायला हवी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment