समूहगीत
तू नव्या जगाची आशा,
जय जय भारत देशा ll धृ ll
तपोवनातून तुझ्या उजळती,
उपनिषदांची वाणी
मातीमधुनी तुझ्या जन्मल्या,
नवरत्नांच्या खाणी
जययुग धर्माचा देशा, जय नव सूर्याच्या देशा ll१ll
श्रमातून पिकलेली शेती,
पहा डोलती धुंद,
घामाच्या थेंबातून सांडे,
हृदयातील आनंद,
जय हरितक्रांतीच्या देशा,
जय विश्वशांतीचा देशा ll२ll
पहा झोपड्या कंगालांच्या,
थरथरल्या भोवताली,
अन्यायाला जाळीत उठल्या,
झळकत लाख मशाली,
जय लोकशक्तीच्या देशा,
जय दलित मुक्तीच्या देशा ll३ll
तू नव्या जगाची आशा,
जय जय भारत देशा llधृll
संकलित
No comments:
Post a Comment