✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 एप्रिल 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_6.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••♦️ *_जागतिक आरोग्य दिन_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ९७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९६: सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला**१९८९: लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला.विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.**_१९४८: जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो._**१९४०: पोस्टाचे तिकीट निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.**१९३९: दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.**१९०६: माऊंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नेपल्स शहर बेचिराख झाले.**१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.*♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९५: निलम कृष्णा ठोंबरे -- कवयित्री**१९८९: ज्ञानेश्वर बाबासाहेब शिंदे -- कवी**१९८७: डॉ.राजकुमार तरडे -- लेखक* *१९८०: प्रा. डॉ. राजेंद्र अशोक गवळी -- कवी, लेखक**१९७७: विनोद सूर्यनारायण कुलकर्णी -- लेखक**१९७३: अतुल कहाते -- प्रसिद्ध लेखक, माहिती तंत्रज्ञान, जागतिक घडामोडी, अर्थशास्त्र, संगणकशास्त्र,इ. विषयावर लेखन* *१९६८: डॉ.राम देशपांडे -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक* *१९६२: राम गोपाल वर्मा -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता**१९६१: सुनील छत्रपाल केदार -- माजी मंत्री* *१९५७: प्रवीण प्र. वाळिंबे -- लेखक, 'स्वरप्रतिभा' दिवाळी अंकाचे संपादक**१९५४: दिवाकर मधुकरराव चौकेकर -- कवी, लेखक* *१९५३: प्रभाकर सोपानराव सुर्वे -- कवी, लेखक* *१९५१: राहुल रवैल --- हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक**१९४९: शरद भास्करराव गायकवाड -- लेखक, प्रकाशक* *१९४२: जितेंद्र – सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९४०: महादेवराव सुकाजी शिवणकर --- माजी मंत्री,माजी खासदार**१९३९: रजनी भास्कर कविमंडन -- कवयित्री, लेखिका (मृत्यू: २४ ऑगस्ट २०१० )**१९३८: काशीराम राणा – भाजपाचे माजी लोकसभा सदस्य (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२ )**१९३८: अरुण सावळेकर -- प्रसिद्ध साहित्यिक**१९२५: चतुरानन मिश्रा – माजी केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २ जुलै २०११ )**१९२०: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न’ (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२ )**१९१७: प्रा. दत्तात्रेय केशव बर्वे -- मराठी कथालेखक आणि बालसाहित्यकार(मृत्यू: २४ डिसेंबर १९८१ )* *१९११: वामन लक्ष्मण कुलकर्णी -- समीक्षक, टीकाकार ( मृत्यू: २५ डिसेंबर १९९१ )**१९०६:कृष्णाजी विठ्ठल सोमण -- प्रख्यात ज्योतिषतज्ज्ञ आणि गणित अभ्यासक (मृत्यू: ३ जुलै १९७२)**१८९१: सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ )**१८६०: विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९५१ )**१७७०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी.त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (मृत्यू: २३ एप्रिल १८५० )**१५०६: सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक.(मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (जन्म: ८ जानेवारी १९२६ )**२००१: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ.जी.एन.रामचंद्रन – संशोधक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑक्टोबर १९२२ )**१९७७: राजा बढे -- संपादक, चित्रपट अभिनेते, नाटककार कादंबरीकार, गायक, कवी, गीतकार (जन्म: १ फेब्रुवारी १९१२ )**१९४७: हेन्री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ३० जुलै १८६३ )**१९३५: डॉ.शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (जन्म: २९ एप्रिल १८६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रासंगिक लेख*... आरोग्यम धनसंपदा ....*मनुष्य पृथ्वी तलवार जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत मानवाच्या शरीराचा आरोग्याशी संबंध येतो. शरीर सुदृढ असेल तर त्याचे आरोग्य देखील सुदृढ असते. आरोग्य सुदृढ असेल तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप सोईस्करपणे पार पडत असतात. इंग्रजीत एक म्हण आहे Sound in Body is Sound In Mind अर्थात शरीर मजबूत तर मन मजबूत. मात्र आपले आरोग्य चांगले नसेल तर आपल्या जवळ सर्व काही असून ते काहीच कामाचे नसते. म्हणून प्रत्येक जण............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशात नवा वक्फ कायदा लागू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विधेयकाला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अयोध्या, काशी, दिल्ली, नागपूरसह देशभरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेतकरी नेते डल्लेवाल यांनी 131 दिवसांनंतर उपोषण सोडले, महापंचायत बोलावून केली घोषणा; केंद्रीय कृषी मंत्री शिवराज यांनी आवाहन केले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूत पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पूलाचा – ‘न्यू पंबन ब्रिज’ चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहपाठ न केल्याने आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा, पालघरमध्ये पालकवर्गात संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्याकडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, उपचार चालू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - गुजरात टायटनने सनरायजर्स हैद्राबादला सात विकेटने हरविले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामदास धडेकर, शिक्षक, उमरी 👤 पृथ्वीराज काळे 👤 मदन पोखरे 👤 मोसीन खान 👤 गिरीश देशपांडे 👤 संदीप कंजे👤 चैतन्य मोहिते पाटील 👤 मारोती बनेवार 👤 प्रदीप वसंत शिंदे 👤 गंगाप्रसाद इरलोड 👤 निहार घनश्याम पटले, गोरेगाव, जि. गोंदिया*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 35*सर्व प्राण्यात पविन्न स्थान* *दुध आहे माझे आयुर्वेदाची खान* *उपयूक्त आहे मी कामधेनू म्हणून* *प्राचीन ग्रंथात ठेवले आहे नोंदून* *करतात गौरव माता म्हणून**अन्न पचवितो रवंथ करून**ओळखा पाहू मी आहे कोण?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - दूध ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळविता येईल. जर विचार दुर्बल असतील तर अपयश पदरी पडेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक आरोग्य दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) जागतिक आरोग्य दिवस २०२५ ची थीम काय आहे ?३) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?४) 'सतत काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) WHO चे फूल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) ७ एप्रिल २) निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य ३) जिनिव्हा ( स्वितझर्लंड ) ४) दीर्घोद्योगी ५) World Health Organization*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌞 *सौर वारा म्हणजे काय ?* 🌞 *************************हलत्या हवेला वारा म्हणतात. आपण शाळेतच हे शिकतो. पण सूर्यावर तर हवाच नाही हेही आपण शिकतो. मग तिथून वारा कसा काय वाहू लागेल ? हे खरं आहे. पण सौरवारा याचा शब्दश: अर्थ न घेता त्याचा भावार्थ समजून घ्यायला हवा. सूर्याच्या अंतरंगात अणुमिलनाच्या अणुभट्ट्या सतत धडधडत असतात. तिथलं तापमानही त्यामुळे कोट्यवधी अंशांइतकं वाढलेलं असतं. त्यापायी मग या ताऱ्याभोवती असलेलं वायूचं वातावरणही तापतं. या बाहेरच्या प्रभावळीतल्या वायूंचं प्लाझ्मा रूपात अवस्थांतर होतं. म्हणजेच त्या वायूच्या रेणूंचे घटक असलेले विद्युतभारधारी मूलकण स्वतंत्र होतात. त्यांच्याठायी असलेल्या प्रकार ऊर्जेमुळे वेगवानही होतात. सूर्यापासून दूरवर जाऊ पाहतात. जेव्हा पोटातल्या आगीपायी खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्या वेळी त्यातून राख, राळ आणि लाव्हा दूरदूरवर फेकला जातो. त्याचप्रकारे सूर्याच्या प्रभावळीतील प्लाझ्मा दूरदूरवर, संपूर्ण सौरमालिकेवर फेकला जातो. *या वेगवान मूलकणांच्या बहुतांश प्रोटॉनच्या, झोतालाच सौरवारा असं म्हणतात.* तसा हा सतत वाहतच असतो. पण अधूनमधून सूर्यावर काही वादळी घटना घडतात. सोलर फ्लेअर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तुफानांच्या वेळेस सौरवाराही वेगांनं वाहतो. त्याचा वेग सेकंदाला ९०० किलोमीटरपर्यंतही वाढतो.या झोताचा मारा संपूर्ण सौरमालिकेवर होत असतो. कोणताही ग्रह किंवा उपग्रह त्याच्या तावडीतून सुटत नाही. तरीही सूर्याला जवळ असणाऱ्या ग्रहांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. वेगानं जाणाऱ्या प्रोटॉनच्या अंगी चुंबकीय बलही असतं. त्यामुळे त्या झोताचा प्रसार झालेल्या सर्वच प्रदेशावर चुंबकीय क्षेत्रही फैलावतं. सूर्य स्वतःभोवती गिरकी मारत असल्यामुळे या चुंबकीय क्षेत्राचा आकार एखाद्या स्प्रिंगसारखा किंवा गोलगोल जिन्यासारखा होतो. त्या क्षेत्राचा एक बुडबुडा तयार होऊन तो साऱ्या सौरमालिकेला गवसणी घालतो.ज्या ग्रहांना स्वतःचं चुंबकीय क्षेत्र नसतं त्यांना मग या चुंबकीय क्षेत्राच्या हमल्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागतं. पृथ्वीचं स्वतःचं चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे त्यावर आदळून हे मूलकण इतरत्र विखुरले जातात. पृथ्वीचा बचाव होतो. धरतीचं चुंबकीय क्षेत्र आणि सौरवारा यांच्यामध्ये होणाऱ्या या अभिक्रियेपोटीच धरतीच्या अतिउत्तरेच्या आणि अतिदक्षिणेच्या आकाशात नयनरम्य रंगांची उधळण करणाऱ्या आॅरोरांचा आविष्कार बघावयास मिळतो. आज आपण अवकाशात अनेक उपग्रह स्थापित केलेले आहेत. त्यांना चुंबकीय संरक्षक आवरण नसतं. त्यामुळे सौरवाऱ्याच्या झोतात सापडून त्यांच्या कामात बाधा येऊ शकते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देवा तूं प्रथम कर्म भोगिसी । सगरीं जळचरूं मछ जालासी । कमठे पाठीं न संडी कैसी । मर्में कावाविसी केलेंज तुज ॥१॥ अपवित्र नाम आधीं वराह । याहुनि थोर कूर्म कांसव । अर्ध सावज अर्ध मानव । हे भवभाव कर्मांचे ॥२॥ खुजेपणीं बळीसी पाताळीं घातलें । तेणें कर्में तयाचें द्वार रक्षिलें । पितयाचेम वचनीं मातेसी वधिलें । तें कर्में भोगविलें अंतरली सीसा । भालुका तीर्थीं वधियेलें अवचिता । नाम अच्युता तुज जाहलें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला त्रास सहन करावा लागतो. पण त्याच त्रासामधून कधीकधी आपल्याला नवी दिशा सुद्धा मिळत असते.पण काही त्रास आपण स्वतःहून करवून घेतो. विनाकारण इतरांच्याकडे लक्ष देऊन आपली वेळ वाया घालविण्यात आणि आनंद शोधण्यात आपण.स्वतःला. धन्य समजून घेत असतो. त्यामुळे त्याचा कुठेतरी त्रास होत असतो. म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आद्यगुरु शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्य हि होते. प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येवून थांबले. तेंव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणू लागला,"आचार्य ! आपण किती महान आहात, आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे. हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते. कदाचित यापेक्षा महासागराइतकेही तुमचे ज्ञान असू शकेल."त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला, शिष्य या कृतीकडे पाहत होता. पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले," बघ, किती पाणी आले या दंडावर? एक थेंब इतकेच ना! अरे! मला किती ज्ञान आहे ते सांगू का? जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान." जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 एप्रिल 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12H7wso5zHu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌐 *_राष्ट्रीय सागरी दिवस_* 🌐 •••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील ९५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.**१९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस.नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.**१९५५: प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला**१९४९: भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली**१९३०: २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.**१६७९: राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेले. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व.१०]**१६६३: दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात आक्रमण केले. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.*🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: मुग्धा वैशंपायन -- झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका**१९९३: प्रा. केशरचंद नारायण राठोड -- लेखक, कवी* *१९८५: आरती सिंग -- अभिनेत्री* *१९८०: नरेंद्र पाटील --- कवी**१९७९: प्रज्ञाधर ढवळे -- कवी**१९७७: रुपाली गांगुली -- भारतीय अभिनेत्री**१९७५: प्रा. डॉ. विनोद देवचंद राठोड -- लेखक, कवी तथा कादंबरी सूचीकार**१९७१: संदीप नारायण राक्षे -- कवी, लेखक, चित्रपट निर्माता**१९६९: महेश रामराव मोरे -- कवी, कादंबरीकार* *१९६३: उषा नाईक -- भारतीय अभिनेत्री, मराठी चित्रपटांमध्ये काम* *१९६१: प्रशांत पुरुषोत्तम दामले -- प्रसिद्ध मराठी अभिनेता**१९६०: महावीर शाह -- हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध भारतीय टेलिव्हिजन आणि रंगमंच अभिनेता (मृत्यू: ३१ ऑगस्ट २००० )* *१९५३: अनुराधा कौतिकराव पाटील -- सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका व विविध पुरस्काराने सन्मानित**१९५१: डॉ. सर्जेराव जयवंतराव भामरे -- लेखक**१९४९: डॉ. राम पंडित-- प्रसिद्ध मराठी गझलकार**१९४७: प्रकाश देशपांडे -- इतिहास-साहित्य संस्कृतीचे गाढे अभ्यासक* *१९४७: शाहीर विजय रामचंद्र जगताप -- प्रसिद्ध शाहीर, लेखक, संपादक**१९४६: आनंद बाबू हांडे -- प्रसिद्ध लेखक**१९४६: ललिता इनामदार -- लेखिका**१९४२: मधुकर सीताराम जोशी (मधू जामकर) -- प्रतिभावंत कवी व उत्तम समीक्षक**१९४०: वासंती अरुण मुझुमदार -- ललितलेखिका, कवयित्री (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००३ )**१९३६: वसंत कोकजे -- लेखक, कवी**१९३०: राम विठ्ठल नगरकर -- विनोदी नट, रामनगरी प्रसिद्ध आत्मचरित्र (मृत्यू: ८ जून १९९५ )**१९२३: शांता मुकुंद किर्लोस्कर -- कथाकार, कादंबरीकार, संपादक(मृत्यू: १५ सप्टेंबर २००७ )**१९२०: डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे माजी नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू: ९ जुलै २००५ )**१९२०: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४ )**१९०९: अल्बर्ट आर.ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू: २७ जून १९९६ )**१९०८: बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक,राजकारणी,माजी केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू: ६ जुलै १९८६ )**१८९०: आनंदराव कृष्णाजी टेकाडे -- कवी, गीतकार (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६४ )**१८७७: माधवराव विनायक किबे (सरदार) -- संशोधक, लेखक (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६३ )**१८५६: बुकर टी.वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५ )**१८२७: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२ )*🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: सुधीर सखाराम नाईक -- भारतीय क्रिकेटपटू(जन्म: २१ फेब्रुवारी १९४५ )**२०२१: अनिस चिस्ती -- इस्लाम धर्माचे व तत्त्वज्ञानाचे, तसेच उर्दू भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक**२०१३: राम उगावकर -- कवी, शाहीर, गीतकार (जन्म: ५ मार्च १९२९ )**२००२: मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म: १९४६ )**१९९८: रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री**१९९६: भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक**१९९३: दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४ )**१९९२: सॅम वॉल्टन -- वॉलमार्टचे संस्थापक (जन्म: २९ मार्च १९१८ )**१९६४: गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार**१९४०: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१ )**१९२२: पंडिता रमाबाई – विधवा,परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,संस्कृत पंडित (जन्म: २३ एप्रिल १८५८ )**१९१७: शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तोडणे सोपे पण जोडणे अवघड*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यसभेतही वक्फ विधेयक झाले मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रातल्या गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्र शासनाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई :- गोराई येथे नवीन 'बर्ड पार्क' सुरू ! 70 प्रजातींच्या 500 हून अधिक पक्षांना पाहता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई : नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील ८ मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या ८७व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षकांच्या सिंगापूर दौऱ्यामुळे अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यास मदत होईल - शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संग्राम निलपत्रेवार , नांदेड👤 हणमंत पवार👤 काझी मुजाहिद सय्यद👤 मोहमंद अफजल शेख👤 गोविंद दळवी👤 लोकेश शिंदे👤 गोविंद सोनपीर👤 गणेश सावंत , शिक्षक, भोकर👤 ईश्वर वाडीकर, शिक्षक, देगलूर👤 सुरेश घाळे👤 अनिल ईबीतदार👤 राजश्री संगपवाड👤 निलेश चंदेकर👤 लक्ष्मण सिरमलवार, धर्माबाद👤 नागेश यमेवार👤 संतोष पाटील चंदनकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 34*रंग आहे माझा श्वेत**ज्यात जीवनसत्व अनेक**प्रथिनांचा आहे मी राजा**पूर्णान्न खाऊन येईल मजा**ओळखा पाहू मी कोण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - साप ( नाग )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखरच कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात ?२) १९९१ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील कोणत्या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली ?३) कोणाच्या प्रयत्नांमुळे १ जानेवारी १८८२ पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस 'रविवार' सुट्टी देण्यात आली ?४) 'अंग राखून काम करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) १९ जुलै १८६९ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी किती बँकांचे राष्ट्रीयीकरण केले ? *उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरु २) लिट्टे LTTE ३) नारायण मेघाजी लोखंडे ४) अंगचोर ५) १४ बँक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *फंगस / बुरशी* 📙एखादा अन्नपदार्थ उघडा राहिला, तर त्यावर बुरशी धरू लागते. एखादे लाकूड पावसात भिजत राहिले, तर त्यावर सुद्धा झपाट्याने बुरशी धरते. या बुरशीमुळे अनेक गोष्टींचा वापर करणे अशक्य होऊन बसते. एवढेच नव्हे तर या बुरशीमुळे मानवांत, प्राण्यांत, वनस्पतीत कित्येक आजारांचाही उद्भव झालेला दिसतो.पिकांवर पडणारे बुरशीजन्य रोग बघताबघता सर्व पीक नष्ट करतात. ज्वारी - बाजरीवर पडणारा काळा बुरा, आंब्याच्या मोहरावर धरणारा चिकटा, मक्यावर पडणारी कोळशी ही बुरशीजन्य रोगांची काही उदाहरणे. पावसाळ्याच्या दिवसांत कातडीचे होणारे विकार, पायाला होणाऱ्या चिखल्या, डोक्यातील कोंडा, प्राण्यांचे झडणारे केस हेही आजार बुरशीजन्य. म्हणजे बुरशी ही वाईटच असते, असे मानायची गरज मात्र नाही. खरे सांगायचे म्हणजे बुरशीकडे निसर्गाने एक फार मोठे काम सोपवलेले आहे. नको असलेली प्रत्येक गोष्ट नष्ट करायला, पुन्हा जमीन समृद्ध करायला सर्व प्रकारची बुरशी मदत करत असते.फंगस ही वेगळी जीवसृष्टी आहे. आता सजीवांच्या सहा सृष्टी मानल्या जातात. अशा या वनस्पतीला स्वतःच्या पोषणासाठी कोणत्यातरी जिवंत वा मृत सजीवावर अवलंबून राहावे लागते. तिचे अस्तित्व त्यामुळेच फक्त सजीव वा त्यांचे अवशेष यांच्याशी संबंधित राहते. बुरशी एकपेशीय असेल व बहुपेशीय. एकपेशीय म्हणजे आपल्या माहितीचे यिस्ट वा किण्व. बहुपेशीय बुरशीचे उदाहरण कुत्र्यांच्या छत्र्या किंवा मशरूम. यालाच अळंबी पण म्हणतात. अळंबी खायला चविष्ट लागतात. म्हणून त्यांची लागवडही केली जाते. मोठाल्या तंतुरूप पेशींनी अळंबी वाढतात. एखाद्या मेलेल्या झाडाच्या खोडावर पावसाळ्यात बघता बघता अळंबी वाढलेली दिसतात. पण याआधी त्या खोडाच्या आतील चहूबाजूंनी बुरशीचे प्रवेश करून ते खोड पोखरलेले असते.बुरशीच्या असंख्य जाती निसर्गात आढळतात. मोजदाद अशक्य व्हावी एवढ्या जाती आज ज्ञात आहेत; पण नवीन जातींचा पत्ता ज्या वेगाने लागतो, तो लक्षात घेतला तर किमान 'तीन एक लाख प्रकारच्या जाती' पृथ्वीवर असाव्यात. बुरशीचे सर्व पुनरुत्पादन साध्या द्विभाजन पद्धतीने होत जाते. जेव्हा प्रतिकूल हवामान असेल तेव्हा स्पोअर जमिनीवर विखुरली जातात. बुरशीचा सलग पसरत गेलेला थर कित्येक मीटरपर्यंत जमिनीवर आढळतो. तसेच काही मीटर खोलवर ही बुरशी आढळते. बुरशीचा एखादा तंतू किंवा एखादे स्पोअर अनुकूल हवामानात इतक्या प्रचंड वेगाने तंतूनिर्मिती करते की या वेगापुढे अन्य कशाचीही पुनरुत्पादनाची गती कमीच पडावी. एखाद्या बुरशीच्या कणापासून जेमतेम चोवीस तासांत एक किलोमीटर लांबीची पुनर्निर्मिती होऊ शकते. बुरशीसाठी कवक हाही शब्द वापरला जातो.अळंबी खाण्यासाठी, यीस्ट पदार्थ फसफसण्यासाठी, चीजला चव आणण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांच्या निर्मितीसाठी बुरशी वापरली जाते. उपयुक्त बुरशीचे वापर आठवले म्हणजे बुरशीबद्दलची किळस जरा कमी होईल.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून !*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्या मताने कसेही बोलत असतील आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला हो ला हो असं प्रतिसाद देत राहिल्याने त्यांना आनंद होतो आणि ते, आपल्याला जवळ करत असतात.पण, एखाद्या वेळी त्यांचे बोलणे आपल्या मनाला पटले नाही की लगेच आपला विरोध करायला सुरूवात करतात. कदाचित या विषयी आपल्याला अनुभव आला असेलच. म्हणून जे कोणी चांगले सांगत असतील त्यांचे विचार आवर्जून ऐकून घ्यावे. पण,काही विचार पटत नसतील तर एकदाचे बाजूला झालेले बरे कारण, बरेचदा असं होतं की, हो ला हो लावल्याने कधी काळी अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका गावात एक विद्वान अर्थतज्ज्ञ रहात होता . त्याची ख्याती सर्वदूर पसरलेली होती ...तिथल्या स्थानिक राजाने एकदा चर्चा करायला त्याला बोलवले,भरपूर वेळ चर्चा झाली मग राजा म्हणाला " महाशय तुम्ही अर्थशास्त्रात खरेचं फार विद्वान आहात पण मग तुमचा मुलगा असा बावळट का ? काही त्याला शिकवा. त्याला सोने आणि चांदी यात जास्त मुल्यवान काय इतके सुध्दा कळत नाही " आणि मोठ्याने हसू लागला ....हे ऐकून त्या विद्वानाला फार वाईट वाटले ... तो घरी गेला .... त्याने मुलाला विचारले " बाळा मुल्यवान काय आहे सोने का चांदी ? "" सोने " क्षणाचाही विलंब न लावता मुलगा उत्तरला" हो तुझे उत्तर बरोबर आहे . मग तो राजा असा का हसला ?म्हणाला तुला सोने आणि चांदी यात मुल्यवान काय माहीत नाही ..!माझी चार लोकात खिल्लीउडवली जाते .. तुला माहीत आहे मुल्यवान काय आहे..!!मुलगा म्हणालाराजा रोज त्याच्या वाड्याजवळ छोटा दरबार भरवतो ...रोज मी शाळेत जातो त्या रस्त्यातचं राजाचा वाडा आहेमी दिसताचं राजा मला बोलावून घेतो .. त्याच्या सोबत गावातीलसारे लोकं प्रतिष्ठीत तिथेचं असतात .... राजा एका हातातसोन्याचे नाणे आणि एका हातात चांदीचे नाणे माझ्या समोरधरतो आणि मला सांगतो यातले सगळ्यात किमती नाणे उचल ..आणि मी चांदीचे नाणे उचलतो .. त्यामुळे तिथे असलेले सगळेमोठ्याने हसतात ... सार्यांना मजा वाटते ....... असे रोज घडतेमुलाला सोने चांदी यातला फरक कळतो तरी हा रोज असे का करतो चांदीचे नाणे मुल्यवान म्हणून उचलतो हे मात्र त्याला उमगले नाही. न राहून त्याने मुलाला विचारले " मग तु सोन्याचे नाणे का उचलत नाही ?असल्या मुर्खपणा करुन माझी अब्रु चार लोकात का काढतो ?"मुलगा जरा हसला मग विद्वानाचा हात धरुन त्याला आत घेवून गेलाकपाटातून त्याने एक पेटी काढली आणि उघडली. ती पेटी चांदीच्यानाण्यांनी भरलेली होती ...हे पाहून विद्वान अवाकचं झाला ..मुलगा म्हणाला " ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे उचलेल त्या दिवशी हा खेळ बंद होईल .. त्यांना मला मुर्ख सिध्द करुन मजा येत असेलतर येवू द्या .. पण जेव्हा मी हुशार होईल तेव्हा मला काहीचं मिळणार नाही. मुर्ख असणे वेगळे आणि मुर्ख समजणे वेगळे "सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा !!!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 एप्रिल 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/sLZfHuz1NoyP6od8/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔆 *_ या वर्षातील ९४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔆 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार**१९८४: भारताचा पहिला अवकाशयात्री राकेश शर्मा यांचे सोविएत अवकाशायन सोयुझ टी- ११ द्वारे उडान**१९६८: मेम्फिस,टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली**१९६८: ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले**१९४९: पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश व अमेरिकन फौजांनी रुमानियातील बुखारेस्टवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात ३००० नागरिक ठार झाले.*🔆 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: विजय गंगाप्रसाद देवडे -- लेखक* *१९८०: शेख पीरपाशा ईसाक -- कवी* *१९७६: विजय निळकंठ वाटेकर -- कवी**१९७२: अजय देशपांडे -- लेखक, कवी, गझलकार, समीक्षक* *१९७१: हेरंब कुलकर्णी -- मराठी वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करणारे लेखक**१९६९: पल्लवी जोशी -- भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती* *१९६८: बबन मारोतराव आव्हाड -- लेखक, कवी* *१९६६: स्मिता श्रीनिवास आपटे -- लेखिका**१९६१: डॉ. सुधीर अनंत काटे -- कवी, लेखक* *१९६०: राजेंद्र विश्राम देसले -- चरित्रकार, कथा लेखक* *१९५९: नामदेव राठोड -- कवी**१९५८: नारायण वामनराव जोशी -- लेखक, धडपड मंच संयोजक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५८: अरुण धोंडिबा घोडे (देशमुख) -- प्रसिद्ध लेखक, चित्रकार , अनुवाद, पत्रकार**१९५६: प्रकाश (अप्पा) जाधव -- लेखक* *१९५५: प्रेमा नारायण -- अभिनेत्री-नर्तिका**१९५४: परवीन बाबी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल (मृत्यू: २० जानेवारी २००५ )**१९५३: सुरेश माणिकराव कुलकर्णी -- मुक्त पत्रकार, लेखक**१९५२: चंद्रशेखर नार्वेकर(एन.चंद्रा) -- भारतीय निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक* *१९४९: नंदकुमार जयराम मुरडे -- कवी, लेखक**१९४८: महावीर रामचंद्र जोंधळे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, बालसाहित्यकार, पत्रकार**१९४७: मच्छिंद्र कांबळी -- मालवणी नटसम्राट मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते,प्रसिद्ध नाट्यनिर्माते (मृत्यू: ३० सप्टेंबर २००७ )**१९४६: प्रभाकर लक्ष्मण मयेकर -- मराठी नाटककार, कथाकार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०१५ )**१९३०: निळू फुले -- प्रसिद्ध मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते (मृत्यू : १३ जुलै २००९ )**१९३८: किशोर दिपचंद हिवाळे -- लेखक* *१९३८: प्रा. डॉ.अजीज नदाफ -- मराठी साहित्यिक, मराठी शाहिरीचे अभ्यासक, पुरोगामी वैचारिक चळवळीतील कार्यकर्ते* *१९३३: रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज (मृत्यू: १७ जानेवारी २०२० )**१९२६: प्रा. बाळ केशव सावंगीकर -- लेखक**१९२१: हरि कृष्ण लाल भगत -- माझी केंद्रीय मंत्री (मृत्यू: २९ ऑक्टोबर २००५ )**१९१९: भालचंद्र महाराज कहाळेकर -- व्यासंगी अध्यापक,कुशल संघटक,प्रभावी भाषोपासक (मृत्यू: २८ मे १९७५ )**१९०२: पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (मृत्यू: १ एप्रिल १९८४ )**१८४२: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८९१ )**१८२३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता,(मृत्यू: १९ नोव्हेंबर १८८३ )* 🔆 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔆••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गोविंद मल्हार कुलकर्णी -- समीक्षक( जन्म: २१ डिसेंबर १९१४ )**२०००: नरेश कवडी -- भाषातज्ञ, कथाकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीचे चिकित्सक अभ्यासक आणि अनुवादक (जन्म: ५ ऑगस्ट १९२२ )* *१९९६: आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (जन्म: ५ जुलै १९२० )**१९८७: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (जन्म: ७ मार्च १९११ )**१९७९: पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी (जन्म: ५ जानेवारी १९२८ )**१९६८: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या (जन्म: १५ जानेवारी १९२९ )**१९२३: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (जन्म: ४ ऑगस्ट १८३४ )**१६१७: जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक (जन्म: १५५०)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मतदार राजा जागा हो ....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना मोठा झटका; दरकपातीला स्थगिती, 850 रुपयांचे वीजबिल 1000 रू. राहणार *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अमेरिकेतील टॅरिफ टॅक्सप्रणालीचा जगभरातील देशांना शॉक; भारतावर डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाचा होणार परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; 2.6 रेक्टर स्केलचा हादरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रात वादळवारे.. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस; भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू कक्षात आग, सतर्कतेनं 66 बाळं सुखरुप*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र, रोजगाराच्या आंतरराष्ट्रीय संधी; ओंग मिंग फुंग यांची मुंबईला भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; सचिन तेंडुलकरच्या लेकीचं क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 हेरंब कुलकर्णी , शिक्षणतज्ञ👤 अंकुश शिंगाडे , साहित्यिक, नागपूर👤 भोजराज शंकर , जारीकोट👤 प्रताप रायघोळ 👤 रमेश येलमे मंगनाळीकर 👤 चंद्रकांत अमलापुरे, शिक्षक, नायगाव👤 बापूराव वाघमारे 👤 राजेंद्र देसले 👤 श्याम पांचाळ 👤 गणेश G. कोकुलवार, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 डूमणे शिलवंत 👤 शिवाजी भोसले 👤 श्याम लोलापोड 👤 राम गंगाधर नाइनवाड👤 प्रवीण पाटील *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 33*वळणावळणाची धरती मी वाट**पाय नाहीत तरी धावतो सुसाट**बदलून कपडे फिरतो सारे रान**घेतो मी चाहूल जरी नसतील कान**जेंव्हा मी बघतो उंचावून मान**सर्वच धावतात वाचविण्यास प्राण**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारे व्यक्ती जीवनात यशस्वी होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "हाथी घोडे, तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजिर मे जकडा राजा मेरा, अब भी सब पे भारी है!" या काव्यपंक्ती कोणत्या चित्रपटातील आहेत ?२) सन १९६९ मध्ये 'मिझो नॅशनल फ्रंट' ( MNF ) या संघटनेची स्थापना कोणी केली ?३) मुंबईत ११ जुलै १८५९ रोजी पहिली कापड गिरणी कोणी सुरु केली ?४) 'भाषण ऐकणारे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जम्मू काश्मीरला मिळणारी पहिली वंदे भारत ट्रेन केव्हापासून धावणार आहे ? *उत्तरे :-* १) छावा २) लालडेंगा ३) कावसजी दावर ४) श्रोते ५) १९ एप्रिल २०२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅरॅसिटॅमॉल कशासाठी वापरतात ?* 📙 औषधांच्या दुकानात जाऊन बर्याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील. क्रोसिन, मेटॅसीन, पॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये 'पॅरॅसिटॅमॉल' नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते. या औषधामुळे ताप कमी होतो. मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो. साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे. घरात मेलेल्या उंदराचा वास येत असेल तर अत्तर टाकून व सेंट फवारून काही काळ तो वास घालवता येईल; पण दुर्गंधी कायमची घालावयाची असल्यास मेलेला उंदीर शोधून तो फेकून देण्याखेरीज दुसरा उपाय नाही. तसेच ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही.ताप केव्हा येतो, किती वेळ राहतो, जास्त असतो वा कमी, यावर रोगांचे (जसे हिवताप, क्षयरोग) निदान अवलंबून असते. त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते. ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते. त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे. खरे तर अंग थंड पाण्याने पुसणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो. प्रसंगी या उपायांचा वापर करावा.सर्दी, खोकला अशा सामान्य रोगात येणार्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही. ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देव दगडाचा भक्त हा मावेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥१॥ ऐसे देव तेहि फोडिले तुरकीं । घातले उदकीं बोभातीना ॥२॥ ऐसिया देवासी वाहिले टिळे डोळे । भक्त बाळे नागविले ॥३॥ ऐसीहि दैवतें नको दावूं देवा । नामा म्हणे केशवा विनवितसे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी आपल्याकडे रागाने बघण्याऐवजी आपल्याकडे बघून हसत असेल तर जास्त मनावर घेऊ नये.निदान ती व्यक्ती हसण्याचा तरी प्रयत्न करत असते. म्हणजेच त्या हसण्यामागे काहीतरी दडले असणार. ज्या व्यक्तीला या प्रकारचे गुण दिसत असतात ती समोरची व्यक्ती वाईट असेलच असेही नाही. म्हणून लहान, सहान गोष्टीवरून वाद करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्तअसण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हाराजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होतचालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेमकाही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्येपाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढे पुढे गेला आणि दलदलीत फसला. वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्यनव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावतआले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पणहत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊलागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला,राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला, "महाराज! तत्काळ युद्धाचे नगारेवाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुमदिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेरपडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते.राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले. ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणीअसल्यास प्रगती होते. जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते .. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 एप्रिल 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/wgv78RucPVxLfzas/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☢️ *_ या वर्षातील ९३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☢️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☢️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: आय.एन.एस.आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.**१९७५: बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला.**१९७३: मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ.जोएल अँगेल याला केला**१९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना* ☢️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☢️ •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: निरंजन मुडे -- कवी* *१९७७: डॉ. रमेश तुळशीराम रावळकर -- कवी, लेखक, संपादक* *१९७१: माधुरी मगर-काकडे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: रवींद्र सूर्यभान साळवे -- कवी, लेखक**१९७१: आशिष नंदकिशोर जायस्वाल -- राज्य मंत्री म.राज्य**१९७०: विनोद पितळे -- पत्रकार, लेखक, कवी**१९६७: सुधीर फाकटकर -- विज्ञान तंत्रज्ञान प्रचारक तथा लेखक* *१९६५: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू: १३ ऑगस्ट २००० )**१९६५: लीलाधर सदाशिव महाजन -- कवी, लेखक* *१९६४: श्रीकांत बोजेवार -- प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, चित्रपट पटकथाकार* *१९६२: जयाप्रदा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री**१९६१: डॉ. शंकर किसन बोराडे -- स्तंभलेखक, समीक्षक (मृत्यू: २६ नोव्हेंबर २०२३ )**१९५९: संदीप वासलेकर -- मराठी तत्त्वज्ञ, संघर्ष निवारण आणि जगाचे भवितव्य या विषयांवर आपले विचार मांडतात**१९५५: हरिहरन अनंत सुब्रमणी -- भारतीय पार्श्वगायक,भजन आणि गझल गायक* *१९५१: रवीप्रकाश कुलकर्णी-- चरित्र लेखक, पत्रकार* *१९५१: डॉ. किशोर रघुनाथ पवार -- प्रसिद्ध विज्ञान लेखक,व्याख्याते* *१९५१: बन्सीलाल तुकाराम कदम -- कवी, लेखक**१९५१: अलका शशांक कुलकर्णी -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९४८: रमेश नारायण गोळे -- लेखक**१९४१: दत्ता बाळ -- तत्त्वचिंतक, ग्रंथकार (मृत्यू: ३ सप्टेंबर १९८२ )**१९४१: कृष्णराव पंढरीनाथ ऊर्फ शशिकांत देशपांडे -- मराठी लेखक, संपादक**१९३४: जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ**१९२९: सर्वोत्तम ठाकूर -- प्रसिद्ध लेखक**१९१४:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू: २७ जून २००८)**१९०४: रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१)**१९०३: कमलादेवी चट्टोपाध्याय– मॅगसेसे पुरस्कार विजेत्या(१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९८८ )**१८९५: कृष्णराव भाऊराव बाबर -- प्रसिद्ध लेखक ( मृत्यू:९ जून १९७४)**१८८२: द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(मृत्यू: २१ जून १९२८ )*☢️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☢️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: किशोरी आमोणकर --- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका(जन्म: १० एप्रिल १९३१ )* *१९९८: हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक**१९९८: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १९०० )**१९९२: उद्धव जयकृष्ण शेळके -- प्रसिद्ध कथाकार,कादंबरीकार (जन्म: ८ ऑक्टोबर १९३१ )**१९८८: डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर -- एक श्रेष्ठ भारतीय पुरातत्त्वज्ञ, संशोधक, शैलचित्रे अभ्यासक (जन्म: ४ मे १९१९ )* *१९८५: डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: १३ मार्च १८९३ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**_१६८०: छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आईच्या हातचे जेवण*वेगवेगळ्या कारणामुळे जी व्यक्ती आपल्या घरापासून दूर राहतात. त्यांना प्रत्येक वेळी जेवण करताना प्रामुख्याने आईच्या हातच्या जेवणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *तेलंगणा ओबीसी आरक्षण- संसदेच्या मंजुरीसाठी दिल्लीत निदर्शने, राहुल गांधी उपस्थित राहणार; सीएम रेड्डी यांनी विधानसभेत 42% आरक्षण केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 केले सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात जुनी वाहनं स्वच्छेने स्क्रॅप केल्यास नव्या वाहनावर १५ टक्के कर सवलत देण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जुनी पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्रातील मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारणार, माध्यमिक शिक्षक महामंडळाच्या सभेत निर्धार, सर्वांना एकत्रही करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अवयवदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना 42 दिवसांची रजा:सरकारी डॉक्टरांची परवानगी आवश्यक; अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा केंद्राचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत बदल ; शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करण्याचे दिले अधिकार, शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भागवत जेटेवाड , केंद्रप्रमुख👤 चक्रधर शिंदे 👤 माधव धुप्पे 👤 प्रकाश साखरे , धर्माबाद👤 तुकाराम पचलिंग👤 संतोष अंबालगोंडे 👤 शिराळे माधव 👤 रंगराव वाकोडे 👤 संभाजीराव गुनाळे 👤 नागभूषणम M बुसा 👤 कामाजी सरोदे 👤 गंगाधर सुगांवकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 32*दळणवळणाचे महत्वाचे साधन**वाहून नेते भारदार वजन**धावते धातूच्या रस्त्यावर**पोहचते नेहमी अचूक वेळेवर**शरीर माझे लांबच फार**शिट्टी वाजवून होते पसार**ओळखा पाहू मी आहे कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. प्रभावती आनंदराव जवादवाड, विज्ञान शिक्षिका, जि. प. हा. नायगाव (बाजार) जि. नांदेड कालच्या कोड्याचे उत्तर - कोकिळा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिबाचे चक्र सतत फिरत असते, म्हणूनच कोणी हरखून जाऊ नये किंवा हतबलही होऊ नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' असे कोणास म्हटले जाते ?2) संविधानाचे कायदे सल्लागार कोण होते ?3) भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले ?4) संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आले ?5) भारतीय प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2) बी. एन. राव 3) 26 नोव्हेंबर 1949 4) 26 जानेवारी 1950 5) 26 जानेवारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ॲस्पिरिन कशासाठी वापरतात ?* 📙 *************************सध्याच्या काळात अॅस्पिरिनचा उपयोग ठाऊक नसलेला माणूस सापडणे ही बाब परग्रहावर जीवसृष्टी सापडण्याइतकीच कठीण आहे ! पण तरीही या औषधाचा योग्य वापर कसा करायचा, या गोळीचे दुष्परिणाम काय होऊ शकतात; याची शास्त्रशुद्ध माहिती मात्र फारच थोडय़ा जणांना असते.अॅस्पिरिन या औषधातील मूलभूत घटक म्हणजे अॅसेटाइल सॅलिसिलीक अॅसिड. एका गोळीत त्याचे प्रमाण ३०० मिलीग्रॅम इतके असते. अॅस्पिरिनचा वापर डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, दातदुखी, कानदुखी, मासिक पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, मुक्कामार लागल्यावर, लचक, मुरगळणे इत्यादीसाठी वेदनाशामक म्हणून होतो. या खेरीज ताप कमी होण्यासाठी आणि सूज कमी होण्यासाठीही ॲस्पिरिन वापरतात. ॲस्पिरिन हे एक स्वस्त असे बहुगुणी औषध आहे.परंतु अॅस्पिरीनचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. पोटात आम्लता वाढते, जळजळ होते. मळमळ, आंबट ढेकर, उलटी व क्वचित उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणेही दिसून येतात. अॅस्पिरीनचे वावडे असणाऱ्यास खाज सुटणे, दम लागणे अशी लक्षणे दिसतात. ॲस्पिरिनमुळे रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. अॅस्पेरीनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी गोळी रिकाम्या पोटी घेऊ नये. एकतर काहीतरी खाऊन मगच घ्यावी किंवा एक ग्लास पाणी व त्याबरोबर थोडासा खायचा सोडा घेऊन मगच घ्यावी. आम्लपित्ताचा त्रास असेल, जठरात अल्सर असेल, रक्तस्रावाची प्रवृत्ती असेल किंवा गरोदरपणात दिवस भरत आले असतील; तर ही गोळी घेऊ नये. अॅस्पिरीनमुळे ताप, सूज, वेदना कमी झाल्या तरी मूळ रोग बरा होत नाही. त्यामुळे मूळ रोगावर उपचार करणे जास्त महत्त्वाचे ठरते. दम्याच्या रुग्णांनी ही गोळी घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो न घेतलेलीच बरी.डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षितयांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुर्घट तें दुःख लागों नेदी भक्ता । त्याची तुज चिंता असे फार ॥१॥ आणि प्रकार घडे तो निकट । पैठणीं प्रकट रूप दावीं ॥२॥ जेथुनि सत्वर निघाले स्वदेशा । मुक्त केलें महिषा मार्गीं जाण ॥३॥ जाणती प्रेमळ कीर्तानासी नर । समाधि निरंतर म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग ती कोणीही असो, ज्या परिस्थितीतून बाहेर पडते त्या परिस्थितीत असताना तिला जे काही अनुभव आलेले असतात त्याच अनुभवाच्या आधाराने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असते एवढेच नाही तर त्या अनुभवाला आपला गुरू मानून आपले संपूर्ण जीवन समर्पित करत असते. म्हणून म्हणतात ना की, प्रत्येकांचा अनुभव हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणून कोणाला तुच्छ लेखून त्याची टिंगलटवाळी करू नये. कोणाची वेळ कधी बदलेल हे कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी*इसाप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्याने समाजात अत्युच्च स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने इसापला विकत घेतले होते त्याचे नाव होते क्झेनथस, इसाप आपल्या आचरणातून क्झेनथसला सतत शिकवण देत असे.ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्झेनथसने इसापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. इसापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवढयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दगड रस्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दगड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला.हे सर्व पाहून इसाप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. क्झेनथसने इसापला विचारले तू तर म्हणाला इथे फक्त एक माणूस आहे पण इथे तर प्रचंड गर्दी दिसते. इसाप उत्तरला,'' इथे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दगडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दगड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे मी आपणास सांगितले.'' क्झेनथस निरूत्तर झाला.तात्पर्य- फक्त जीवंत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा इतरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 एप्रिल 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/dmDpjpYGtDVvmEc2/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील ९२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय**१९९८: कोकण रेल्वे वरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस या गाडीचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातुन झाला**१९९०: स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना**१९८४: सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता**१९८२: फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.**१८७०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली*💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 💮 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८५: सचिन शिवाजीराव बेंडभर पाटील-- प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,कथाकार, बालसाहित्यिक* *१९८१: मायकेल जॉन क्लार्क -- ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू* *१९७९: गणेश भारतराव रासने -- लेखक* *१९७६: अनधा जोशी मुधोळकर -- लेखिका* *१९७३: श्याम श्रीराम ठक -- प्रसिद्ध वऱ्हाडी कवी**१९७१: बबन शिंदे -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९७०: नारायण ऊमाजी खरात -- कवी* *१९६९: अजय वीरु देवगण – प्रसिद्ध अभिनेता**१९६७: सुनील किसनराव गायकवाड- उंब्रजकर -- मराठी व हिंदीमध्ये लेखन करणारे लेखक**१९५९: भीमराव संपतराव सरवदे -- लेखक* *१९५७: प्रा. अविनाश राजाराम कोल्हे -- प्रसिद्ध लेखक**१९५३: रवींद्र दामोदर लाखे -- कवी आणि नाट्यदिग्दर्शक**१९५२: दीपक पराशर -- भारतीय अभिनेता**१९५२: भारती बाबुराव हेरकर -- कवयित्री, लेखिका**१९५२: प्रा.अशोक नारायणराव आहेर -- सुप्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार* *१९५१: डॉ.अलका सर्वोत्तम चिडगोपकर -- प्रसिद्ध लेखिका, समीक्षक* *१९५०: मोहन गणुजी नाईक ( भीमणीपुत्र) -- प्रसिद्ध लेखक,गोरबोली(बंजारा)अभ्यासक**१९४२: किरण नगरकर -- भारतीय इंग्रजी कादंबरीकार,नाटककार आणि पत्रकार.(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१९ )* *१९२६: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (मृत्यू: १५ जून १९७९ )**१९२०: नानासाहेब शिरगोपीकर -- ट्रीकसीन्ससह भक्तिप्रधान नाटकं सादर करणारे कलाकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४ )**१९१०: शंकर दत्तात्रय भोसले -- कवी, लेखक(मृत्यू: १६ जून १९७२ )**१९०७: गजानन जहागीरदार --- मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक(मृत्यू: १३ ऑगस्ट १९८८ )**१९०२: बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या’याद पियाकी आये’,’का करु सजनी’ इ. ठुमर्या लोकप्रिय आहेत.(मृत्यू: २५ एप्रिल १९६८ )**१८९८: हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – भारतीय इंग्रजी कवी,नाटककार,संगीतकार हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(मृत्यू: २३ जून १९९० )**१८८४: विनायक सीताराम सरवटे -- स्वातंत्र्यसैनिक,राजकीय नेते आणि लेखक (मृत्यू: २६ जानेवारी १९७२ )**१८७५: वॉल्टर ख्राइसलर – ’ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४० )**१८०५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (मृत्यू: ४ ऑगस्ट १८७५ )* 💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१७: अजय झनकर-- प्रख्यात लेखक आणि चित्रपट निर्माते(जन्म: १ सप्टेंबर १९५९ )**२००९: गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (जन्म: ८ जून १९१७ )**२००५: पोप जॉन पॉल (दुसरा) (जन्म: १८ मे १९२० )**१९९२: आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते**१९८८: मनू गंगाधर नातू -- समीक्षक, निबंधकार,संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १९१९ )**१९३३: के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा,यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.(जन्म: १० सप्टेंबर १८७२ )**१८७२: सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (जन्म: २७ एप्रिल १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकसहभागातून शाळेची प्रगती*गावाला शाळेचा आधार असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा, असे म्हटले जाते. यातूनच मग दोघांचाही विकास होतो. शाळेला प्रत्येक वेळी धनाने म्हणजे आर्थिक साहाय्य करावे असे ही काही नाही. तनाने व मनाने केलेले सहकार्य देखील शाळेच्या विकासात मोलाची भूमिका असू शकते. म्हणूनच लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकांनी सरकारी शाळा म्हणजे आपली शाळा समजून त्या शाळेविषयी आत्मीयता जपली पाहिजे, तरच भविष्यात ह्या शाळा टिकू शकतील.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 'गुड न्यूज', जीएसटी कलेक्शनमधून सरकारच्या तिजोरीत 1.96 लाख कोटी रुपये झाले जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : हवामान खात्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरातसह १४ राज्यांमध्ये पुढील दोन दिवस पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिपेक्स 2025 मध्ये 400 श्रेष्ठ प्रकल्पांचे प्रदर्शन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रासाठी तब्बल 854 समर स्पेशन ट्रेन; मुंबई, पुण्यातून भारताच्या कानाकोपऱ्यात जाता येणार फिरायला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जेजुरी गडावरील भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम, माजी विश्वस्तांची भेसळ रोखण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रसरकारने पेन्शनचे नियम बदलले, NPS किंवा UPS पैकी एकाचच घेता येणार लाभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - लखनऊ मध्ये खेळलेल्या सामन्यात PBKS ने LSG ला 8 विकेटने हरवले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव शिरसाठ पाटील, SSA, नांदेड👤 राघवेंद्र कट्टी , फोटोग्राफर, नांदेड👤 जीवनसिंग खासावत , साहित्यिक, भंडारा 👤 कृष्णा येरावार , शिक्षक, धर्माबाद👤 बबन शिंदे , साहित्यिक, नांदेड👤 दिलीप नागोराव जाधव👤 मारोती होरके👤 रितेश चव्हाण👤 रविंद्र भागडे👤 वैजनाथ जाधव👤 सूर्यकांत भोगेवार👤 नामदेव जाधव👤 दिलीप भद्रे👤 कवी प्रशांत गवई👤 राजेश्वर माळगे, धर्माबाद👤 शेख समीर👤 प्रभाकर पवार👤 विलास थोरमोठे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 31*आम्रवृक्षावर बसून गातो**पक्षी हा मधुर आवाजात**अंडी कधी उबवत नाही**ठेवतो दुस-यांच्या घरट्यात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - मोर ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देठापासून गळलेले फळ परत जोडता येत नाही. तद्वतच तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1) जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे ?2) संविधान सभेचे पहिले सत्र केव्हा भरविण्यात आले होते ? 3) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?4) संविधान तयार होण्यासाठी किती कालावधी लागला ?5) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* 1) भारत 2) 9 डिसेंबर 1946 3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4) 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. 5) डॉ. राजेंद्र प्रसाद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *केंद्रशासित प्रदेश*केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्देशिलेले भारतीय भूभाग आणि सदर परिशिष्टात न उल्लेखिलेले परंतु भारतभूमीत समाविष्ट असलेले इतर प्रदेश म्हणजे केंद्रशासित प्रदेश होत.भारतीय संविधानात सुरुवातीस राज्याचे चार वर्ग पाडण्यात आले होते. ब्रिटिश अमदानीत चीफ कमिशनर प्रमुख अधिकारी असलेल्या अजमीर, कूर्ग व दिल्ली ह्या प्रांतांना ‘क’ राज्याचा दर्जा देण्यात आला. भारतात विलीन झालेल्या संस्थानांपैकी रेवा, बुंदेलखंड व बधेलखंड ही मध्य प्रदेशातील व पंजाबच्या उत्तर सीमेजवळील संस्थाने अतिशय मागासलेली असल्यामुळे आणि शेजारच्या प्रांतात त्यांना विलीन करण्यासंबंधी एकमत नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे विंध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश असे दोन प्रांत करण्यात आले. कच्छ, मणिपूर, त्रिपुरा ही संस्थाने पाकिस्तानच्या सीमेलगत असल्याने ती केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असणे आवश्यक वाटले. भोपाळमध्ये मुसलमानांची संख्या जास्त असल्यामुळे आणि विलासपूर येथे भाक्रानानगल हे प्रचंड धरण बांधले जात असल्यामुळे त्यांनाही वेगळ्या ‘क’ राज्याचा दर्जा मिळाला. अंदमान आणि निकोबार बेटांना ‘ड’ राज्य संबोधण्यात आले.या अकरा केंद्रशासित प्रदेशांपैकी भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात अनेकांना शेजारच्या राज्यांत विलीनीकरण झाले. १९५६ मध्ये अंदमान बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा आणि दिल्ली एवढेच केंद्रशासित प्रदेश उरले. दाद्रा व नगरहवेली (१९६१), गोवा, दीव, दमण (१९६२), पाँडिचेरी (१९६२) ही राज्ये भारतात सामील झाल्यावर त्यांची भर वरील राज्यांत पडली. पंजाब राज्यातून हरयाणा राज्य वेगळे झाल्यावर (१९७०) त्यांची संयुक्त राजधानी म्हणून चंडीगढ शहर केंद्रशासित बनले. तसेच आसाममधील मिझो जिल्हा आणि अरुणाचल प्रदेश यांस हा दर्जा १९७२ मध्ये देण्यात आला. याउलट १९७० मध्ये हिमाचल प्रदेश, १९७२ मध्ये मणिपूर, त्रिपुरा यांना संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. अशा रीतीने १९७४ मध्ये ९ केंद्रशासित प्रदेश राहिले, ते असे: अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, चंडीगढ, दाद्रा व नगरहवेली, दिल्ली, गोवा, दीव, दमण, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि पाँडिचेरी.या प्रदेशांचे प्रशासन संविधानाच्या २३९ ते २४१ अनुच्छेदांन्वये चालविण्यात येते. राष्ट्रपती हाच या प्रदेशाचा कार्यकारी प्रमुख असतो. यांतील काही प्रांतांत, उदा., गोवा, पाँडिचेरी व मिझोराम यांत, विधानसभा व मंत्रिमंडळे स्थापन करण्यात आली असली, तरीही या सर्व राज्यांच्या संबंधी कायदे करण्याचा अंतिम अधिकार संसदेला आहे.(स्रोत : मराठी विश्वकोश)*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुरुनि आलों तुझिया भेटी । सांगावया जिवींच्या गोष्टी गा विठोबा ॥१॥ बोल गा बोल मजशी कांहीं । दृष्टी उघडुनी मजकडे पाही गा विठोबा ॥२॥ अरे तूं कृपाळु दीनाचा । महा उदार थोरा मनाचा गा विठोबा ॥३॥ भक्तें पुंडलिकें गोविलासी लोभें । प्रेमें प्रीतीच्या वालभें गा विठोबा ॥४॥ युगें अठ्ठावीस भरलीं । धणी अजुनी नाहीं पुरली गा विठोबा ॥५॥ प्राण होती माझे कासाविस । नामा म्हणे कां धरिलें उदास गा विठोबा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो म्हणूनच म्हणतात ना की, स्वभावाला औषध नसते. प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात म्हणून विचार जुळत नाही. पण, ज्यांच्या विचारातून किंवा स्वभावातून आपल्याला थोडेतरी शिकायला मिळत असेल तर आपण त्यांच्याकडून शिकून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. भलेही आपण कितीही हुशार किंवा अनुभवी असले तरी एखाद्या वेळी, आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता पडत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि कोंबडी*एक कोल्हा एका खोपटात शिरून काही तरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली. पण ती उंच माळ्यावर बसली होती. यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना. मग तिला युक्तीने खाली आणून मारून खावी या हेतूने कोल्हा तिला म्हणाला, ‘कोंबडीताई तुझी हाल हवाल कशी आहे? तू बरेच दिवस आजारी असून घरातच निजून असतेस असं समजलं. तेव्हापासून तुझ्या काळजीनं मला झोप येईना. खरंच ताई, आता तू बरी आहेस का? थोडावेळ खाली उतर म्हणजे मी तुझी नाडी तरी पाहीन.’ याप्रमाणे अघळपघळ बोलून कोल्हा तिची स्तुती करीत असता कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, ‘खरच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे. असा आजार मला कधीही झाला नव्हता. मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की, तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस. कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाहीत, आणि म्हणून माझ्यानं खाली येववत नाही. तरी आता तू यावेळी जा. सध्या मी इतकी अशक्त आहे की, जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील.’तात्पर्य – वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसर्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की, त्या माणसाला काही तरी स्वार्थ साधावयाचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 एप्रिल 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EKsaKRjB9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📔 *_ या वर्षातील ९१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📔 *_महत्त्वाच्या घटना:_* 📔•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००४: ’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली**१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्न’**१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.**१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर,आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली.६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.**१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.**१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली**१९३५: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली**१९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण**१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.**१९१२: भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली झाली* *१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली**१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.* 📔 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📔 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८१: महादेव माने -- लेखक* *१९७५: आनंदा भगवान वारंगणे-पाटील -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९७५: शोभा राजेंद्र अवसरे -- कवयित्री**१९७४: रामेश्वर परशराम घोलप -- लेखक**१९७३: अशोक पाटील -- लेखक**१९७१: रतन मोतीराम आडे -- प्रसिद्ध कवी* *१९७०: ओंकार दशरथ राठोड -- कवी**१९६८: प्रा. डॉ. प्रेमाला रमेश मुखेडकर-- लेखिका* *१९६७: अयुब पठाण लोहगावकर -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६५: उमेश मोहिते -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९६३: शोभा वेले-- कवयित्री, लेखिका* *१९६०: किशोर रामदास मेढे -- प्रसिद्ध कवी, अनुवादक* *१९५७: डेव्हिड इव्हॉन गोवर -- इंग्लिश क्रिकेट समालोचक आणि माजी क्रिकेटपटू* *१९५६: बाळकृष्ण मुरलीधर बाचल -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६: डॉ. जयमाला चंद्रशेखर डुंबरे -- लेखिका* *१९५४: प्रा. विश्वनाथ श्रीधर बापट (विसूभाऊ)- प्रसिद्ध एकपात्री कलाकार, कवी, लेखक**१९५१: सुभाष वामन अहिरे -- कवी, लेखक* *१९४३: प्रा. जोगेंद्र लक्ष्मण कवाडे -- माजी खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ, पत्रकार* *१९४२: जयकुमार फासगोंडा पाटील तथा जे. एफ. पाटील -- ज्येष्ठ अर्थतज्ञ, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष, लेखक (मृत्यू: ७ डिसेंबर २०२२)* *१९४१: अजित लक्ष्मण वाडेकर – भारताचे क्रिकेट संघाचे माजी कप्तान (मृत्यू: १५ ऑगस्ट २०१८)**१९३९: डॉ. तारा भवाळकर -- वैचारिक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ प्रसिद्ध मराठी लेखिका, संशोधक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक, ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षा**१९३८: वामन गोविंद होवाळ -- कथाकार**१९३७: मोहम्मद हमीद अन्सारी -- भारताचे माजी उपराष्ट्रपती**१९३६: तरुण गोगोई – आसामचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२० )**१९१९: शांता भास्कर मोडक -- मराठी नाट्य-चित्र अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २८ एप्रिल २०१५ )**१९००: न्या. सुरेश वसंत नाईक -- लेखक, कवी**१८८९: डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (मृत्यू: २१ जून १९४० )**१८१५: ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर (मृत्यू: ३० जुलै १८९८ )**१६२१: गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.(मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५ )* 📔 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📔•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१५: कैलाश वाजपेयी-- प्रतिभावान हिंदी कवी (जन्म: ११ नोव्हेंबर १९३६ )**२०१२: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे माजी अध्यक्ष (जन्म: १८ मार्च १९२१ )**२०१२: प्रा. द. सा. बोरकर-- झाडीबोली साहित्यांचे अभ्यासक कादंबरीकार,कवी (जन्म: २८ जुलै १९३९ )**२००८: प्राचार्य राम डोके --ज्येष्ठ विनोदी साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ (जन्म: १६ फेब्रुवारी १९२७ )**२००६: राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार चरित्रकार (जन्म: ११ डिसेंबर १९२५ )**२०००: संजीवनी मराठे – कवयित्री (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६ )**१९९९: श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक (जन्म: २२ जून १९१५ )**१९८९: रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर--भाषातज्ज्ञ, संशोधक,संस्कृत पंडित(जन्म: १ जानेवारी १९०० )**१९८९: श्रीधर महादेव तथा एस.एम.जोशी – समाजवादी,कामगार नेते,पत्रकार(जन्म:१२ नोव्हेंबर १९०४ )**१९८४: दत्ता भट-- मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक(जन्म: २४ डिसेंबर १९२४ )**१९८४: पं.नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ४ एप्रिल १९०२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रोजच होतंय एप्रिल फुल*एक एप्रिल रोजी लोकांना एप्रिल फुल करण्याची एक प्रथा आहे. एप्रिल फुल म्हणजे मूर्ख बनविणे. फक्त आजच्या दिवशी लोकांना मूर्ख बनविले तर माफ असते कारण शेवटी कळते की एप्रिल फुल केलंय. पण कधी कधी याचा खूप राग येतो. एका हिंदी गाण्यात हे म्हटलं आहे, " एप्रिल फुल बनाया, तो उनको गुस्सा आया ।" मित्रांनो, हे ही खरंय, मित्रांना खूप राग येईल अशा प्रकारचा कोणतेही कृत्य करू नये............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात भारत होणार जागतिक नेता - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हळदीला मिळाला आतापर्यंतचा सर्वाधिक दर, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 14 हजार 911 प्रति क्विंटल भाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *म्यानमारच्या भूकंपातील बळींचा आकडा २ हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2014 बॅचमधील बनारसची रहिवासी निधी तिवारी बनल्या पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता - भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्याचे दर एक लाख रुपयापासून अवघे 6 हजार दूर, तोळ्याचा भाव आता आवाक्याबाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात KKR चा दारुण पराभव, मुंबईचा पहिला विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोमेश पाटील सूर्यवंशी👤 साईनाथ कंदेवाड👤 विनायक भाई राजयोगी 👤 दत्ता वंजे, साहित्यिक, नांदेड👤 सदाशिव मोकामवार, धर्माबाद👤 हरिहर पाठक 👤 शीतल संखे , शिक्षिका, पालघर👤 गिरीश पांपटवार, धर्माबाद👤 प्रकाश नांगरे, शिक्षक, नांदेड👤 सतिश गर्दसवार , धर्माबाद👤 अनिल पाटील, साहित्यिक, जळगाव👤 रवी कोटूरवार , धर्माबाद👤 संध्या जिरोणेकर 👤 कुणाल सोनकांबळे 👤 दिगंबर जगदंबे👤 मनिषा जोशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 30*अंगात घालतो निळा अंगरखा**रुबाब माझा बादशहा जसा !**सौंदर्याने पाडतो भुरळ लोकांना**थुईथुई नाचतो नर्तक कसा ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - अक्रोड ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुगंधी फुलांचा दरवळ आसमंतात पसरण्यास, योग्य दिशेने वारा वाहावा लागतो, पण चांगल्या लोकांच्या कीर्तीच्या दरवळास वाराही लागत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिनलढे, उनपर है धिक्कार!'* ह्या काव्यपंक्ती कोणत्या चित्रपटातील आहेत ?२) प्रगतीपथावर असलेला आशिया खंडातील सर्वात लांब ( १३ किमी ) झोजिला बोगदा कोठे आहे ?३) मिझोरम या राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?४) 'ऐकायला व बोलायला न येणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) सन १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री यांचे निधन कोठे झाले ? *उत्तरे :-* १) छावा २) जम्मू काश्मीर ३) लालडेंगा ४) मूकबधिर ५) ताश्कंद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *फुफुसे* 📙 डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते.नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय.वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते.फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दास जाल्यावरी करिसी उदास । मनीं तें तुम्हांस आणी देवा ॥१॥ सोशिले प्रवास जन्मजन्मांतर । करिसी अव्हेर आम्हांलागीं ॥२॥ भार खांद्यावरी घेऊनी हिंडवी । होसी मजविशि पाठमोरा ॥३॥ श्रांत सावकाश गाती इतिहास । काय कासाविस होय तुम्हां ॥४॥ नामा म्हणे नको वाउगे उदीम । न सोडीं मी नाम केल्या कांहीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गोड फळाला लवकर कीड लागत असते तसंच कडू असलेल्या फळाला सुद्धा कीड लागत असते.फरक एवढेच की, कीड गोडाला पूर्ण संपवून टाकते पण, कडू फळाला मात्र पूर्णपणे संपवू शकत नाही कारण त्याचा अर्कच एवढे कडू असते की, उशीरा का होईना त्या किडीवर भारी पडत असतो. आपण सुद्धा त्या कडू असलेल्या अर्क कडून शिकण्याचा प्रयत्न करावे कारण तोच अर्क त्या फळाला किटका पासून वाचवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरे दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य :- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. तेव्हा आपली माणसे जपा त्यांना कधी दुखवु नका, आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर करा !!!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_12.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥 *_राष्ट्रीय नौका दिन_* 🚥•••••••••••••••••••••••••••••••••••• 🚥 *_ या वर्षातील ८८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🚥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🚥•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.**१९७६: महाराष्ट्र विधान परिषदेत सक्तीच्या कुटुंब नियोजनाचा ठराव मंजूर* *१९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.**१९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना**१९३०: ’प्रभात’चा ’खूनी खंजिर’ हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.**१८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. या घटनेतुनच १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची सुरूवात झाली.**१८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.*🚥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🚥••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: कार्तिक रामदास झेंडे -- कवी, लेखक,वक्ता, विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९८६: अक्षय मुकुंद जोग -- लेखक**१९७८: भार्गवी चिरमुले -- मराठी अभिनेत्री**१९७७: प्रज्ञा कुलकर्णी -- कवयित्री* *१९७४: प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे -- कथाकार विविध वृत्तपत्रांतून लिखाण* *१९७१:डॉ.मिलिंद यादव धांडे -- कवी* *१९६६: गणेश रामदासी -- कवी, लेखक, संचालक,माहिती व जनसंपर्क म.रा.**१९४८: नागनाथ कोतापल्ले – प्रसिद्ध साहित्यिक,शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०२२ )**१९३९: जगदीप -- हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते.जगदीप यांचे खरे नाव सैयद इश्तियाक जाफरी(मृत्यू: ८ जुलै २०२० )**१९३६: मधुसूदन रामचंद्र कोल्हटकर --- शिक्षणतज्ज्ञ,पूर्व सचिव शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य**१९३५: श्रीनिवास हवालदार -- ज्येष्ठ कवी, लेखक**१९३०: विश्वनाथ खैरे -- लोकसंस्कृतीचे आणि भारतविद्येचे (इंडॉलॉजी) प्रतिभावंत अभ्यासक* *१९३०: सर अनिरुद्ध जगन्नाथ -- मॉरिशसचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान(मृत्यू: ३ जून २०२१ )**१९२९: उत्पल दत्त – रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारे कलाकार (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३ )**१९२६: पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (मृत्यू: २१ मार्च २०१० )**१९१८: सॅम वॉल्टन -- वॉलमार्टचे संस्थापक (मृत्यू: ५ एप्रिल १९९२ )* *१९१४: धुमाळ उर्फ अनंत बळवंत धुमाळ -- भारतीय चित्रपटसृष्टीतील एक विनोदी अभिनेता (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९८७ )**१९०५: पुरुषोत्तम मंगेश लाड -- संतसाहित्याचे गाढे अभ्यासक,अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १९५७ )**१८६९: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (मृत्यू: १ जानेवारी १९४४ )* 🚥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🚥••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: गिरीश बापट -- माजी मंत्री,माजी खासदार (जन्म: ३ सप्टेंबर १९५० )**२०१९: डॉ.पद्माकर विष्णू वर्तक -- ज्येष्ठ वैद्यकीय तज्ञ संशोधक व लेखक (जन्म: २५ फेब्रुवारी १९३३ )**१९९७: पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (जन्म: ११ सप्टेंबर १९१५ )**१९७१: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (जन्म: २ नोव्हेंबर १८८६ )**१९६४: शंकर नारायण तथा ’वत्स’ जोशी – इतिहास संशोधक* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••30 मार्च रविवारी गुढीपाडवा त्यानिमित्ताने विशेष लेख*विकारी विचारांवर विजयाचा दिवस*चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभ देखील करतात ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, 7.7 रिश्टर स्केल शक्तीशाली भूकंपाने बँकॉकमध्ये हाहाकार; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शाळेतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा नियोजन शून्य निर्णय; राज्य सरकारला 65 कोटी रुपयांचा फटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरुच राहणार, महावितरण विभागाला कोट्यावधी रुपयांचा निधी वर्ग, लाखो शेतकऱ्यांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नाशिकच्या त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये आजपासून येणार खात्यात !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंकजकुमार पालीवाल, शिक्षक नेते, पाचोरा 👤 धीरज कोयले👤 पिराजी शेळके 👤 प्रदीप मनुरकर, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 29*थंड प्रदेशातील छोटेसे हे फळ**माणसाला देतो प्रचंड बळ**कठीण कवच फोडा पटकन**चव कळण्यासाठी खावे चटकन*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - मासा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो परिस्थितीशी जितका जास्त जुळवून घेऊ शकतो तोच तितका जास्त टिकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'प्रेमाचे प्रतीक'* म्हणून कोणत्या पक्ष्याकडे पाहिले जाते ?२) आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार कोठे आहे ?३) भारत सरकारने लोकशिक्षण देण्याच्या हेतूने 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' ( FTII ) या संस्थेची स्थापना कोठे केली ?४) 'ईश्वर आहे असे मानणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) नोटा छापण्याचे काम कोण करते ? *उत्तरे :-* १) पांढरे कबूतर २) नवी दिल्ली ३) पुणे ( १९६० ) ४) आस्तिक ५) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाराष्ट्रातील सात आश्चर्ये* :जगात जशी सात आश्चर्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील काही अद्भुत आणि सुंदर स्थळांना जून २०१३ रोजी आश्चर्यांचा दर्जा दिला आहे. जगभरातून साधारणपणे २२ लाख मतांच्या आधारे ही सात आश्चर्ये निवडण्यात आलेली आहेत. चला तर बघूया कोणती आहेत ती आश्चर्ये :१) *विश्व विपश्यना पॅगोडा(स्तूप)* :हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.२) *छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)* :हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.३) *अजिंठा लेणी* :इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक या काळात या बौद्धलेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण २९ लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे. ४) *कास पठार* :या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.५) *रायगड किल्ला* :स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.६) *लोणार सरोवर* :एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.७) *दौलताबादचा किल्ला* :हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥ नामा म्हणे नाम विर्वाणीचें बीज । मजसाठीं गुज दावियेलें ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कागद आणि पेनीचे नाते हे जगावेगळ असते त्यांच्या आधाराने कितीही लिहिले तरी ते, दोघे कधीच कंटाळत नाही हीच त्यांच्यातील खरी महानता आणि त्याग असते. म्हणून या दोघांकडे बघून माणसाने जगण्याचा प्रयत्न केले पाहिजे. ते, दोघेही एकदाचे संपून जातात मात्र त्यांचे मोलाचे योगदान, सहनशीलता अनेक पिढ्यांना मार्गदर्शक बनून नव्याने जगायला प्रेरणा देत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चंदनाची बाग**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."**मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारासारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते. मानवी जीवन अनमोल आहे. असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.**तात्पर्य - या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 मार्च 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/seeQPxsVALxnWC8G/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☀️ *_ या वर्षातील ८७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: ’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.**१९९२: उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर.वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला**१९७९: अमेरिकेतील ’थ्री माईल आयलंड’ या बेटावर असलेल्या अणूभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली.**१९४२: रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली**१९३०: तुर्कस्तानमधील कॉन्स्टँटिनोपाल आणि अंगोरा शहरांची नावे बदलुन अनुक्रमे इस्तंबुल आणि अंकारा अशी करण्यात आली**१८५४: क्रिमियन युद्ध – फ्रान्सने रशियाविरुद्ध युध पुकारले.**१७३७: बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.*☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️ •••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: भरत बलवल्ली -- स्वराधीश,एक युवा दिग्गज शास्त्रीय गायक* *१९८२: प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर -- लेखक**१९८१: रोहिदास ज्ञानदेव भागवत -- कवी**१९७५: अक्षय खन्ना -- भारतीय अभिनेता**१९७४: चंद्रशेखर सांडवे -- दिग्दर्शक, अभिनेते, लेखक तसेच सांस्कृतिक कलादर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष**१९७३: जयश्री देविदास पाटील -- कवयित्री, लेखिका**१९७२: प्रतिभा मगर -- कवयित्री**१९७१: प्रा. डॉ.अजय दिनकरराव कुलकर्णी -- लेखक, संपादक* *१९६८: नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू**१९६६: डॅा. संध्या राजन अणवेकर -- कवयित्री, लेखिका* *१९६३: राजकुमार सुदाम बडोले -- माजी मंत्री तथा लेखक* *१९५४: मून मून सेन -- भारतीय अभिनेत्री**१९४९: प्रा. डॉ.विजय पांढरीपांडे -- जेष्ठ साहित्यिक, विचारवंत,अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित* *१९४४: भारती पांडे -- प्रसिद्ध लेखिका**१९२७: विना मजुमदार -- भारतीय शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: ३० मे २०१३ )**१९२६: पहलान रतनजी " पोली " उमरीगर-- भारतीय क्रिकेट खेळाडू(मृत्यू: ७ नोव्हेंबर २००६ )**१९२५: राजा गोसावी – अभिनेता (मृत्यू:२८ फेब्रुवारी १९९८)**१९०३: बाळकृष्ण मोरेश्वर कानिटकर -- पुराण वांड्:मय,शैक्षणिक व विज्ञानविषयक लेखन(मृत्यू: ४ ऑक्टोबर १९७१ )**१८६८: मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (मृत्यू: १८ जून १९३६ )* ☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२४: कमलेश अवस्थी -- प्रसिद्ध गायक (जन्म: १९४५)**२०२१: पंडित नाथराव नेरळकर --- मराठवाड्यातील प्रख्यात शास्त्रीय गायक ( जन्म: १६ नोव्हेंबर १९३५)**२००६: बबनराव नावडीकर (मूळ नाव: श्रीधर यशवंत कुलकर्णी) -- मराठी गायक, कवि,लेखक व कीर्तनकार(जन्म: १९ ऑगस्ट, १९२२ )* *२०००: शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख**१९९२: आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू (जन्म: २४ नोव्हेंबर १८७७ )**१९८८: श्रीनाथ त्रिपाठी -- भारतीय संगीतकार (जन्म: १४ मार्च १९१३ )* *१९८४: विष्णू प्रभाकर लिमये -- प्राच्यविद्या अभ्यासक, लेखक, संपादक (जन्म: २८ एप्रिल १९०० )**१९४१: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (जन्म: २५ जानेवारी १८८२ )**१५५२: गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू (जन्म: ३१ मार्च १५०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जुनी चालीरिती आणि कोरोना काळातील परिस्थिती*कोरोना काळात जुन्या चालीरीती ची पुन्हा एकदा ओळख झाली. त्यावर टाकलेला प्रकाश ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारत-रशिया व्यापारात नवा टप्पा ! 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरचं लक्ष्य - डॉ. जयशंकर यांची घोषणा"*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *UN कडून आयुष्मान भारत योजनेचं कौतुक ! भारताचा शिशु मृत्यूदर 70 टक्के घटला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राजस्थानमधील उष्ण वाऱ्यांमुळे मध्यप्रदेशात पारा 40 अंशांवर:हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी; हरियाणासह 10 राज्यांमध्ये वादळाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा प्रभाव, पुण्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन; विविध क्षेत्रातील तज्ज्ञ होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली कार्यक्रमांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी । ४३ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वानंद बेदरकर, निवेदक, नाशिक 👤 जयश्री पाटील, शिक्षिका तथा कवयित्री, वसमत 👤 सुधाकर भोसले, शिक्षक, नांदेड 👤 अब्राहम खावडिया👤 श्री पाटील 👤 जयवर्धन भोसीकर, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 किरण कदम👤 प्रल्हाद धडे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 28*जलचर हा प्राणी**पाण्यात पोहतो**अन्न म्हणूनही**उपयोगी पडतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - गुरुत्वाकर्षण••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत देणारे हात अधिक पवित्र असतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी महिला कोण ?२) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात, त्या ठिकाणास काय म्हणतात ?३) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे ?४) 'इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगात तांदळाचे उत्पादन व निर्यात करणारा प्रथम क्रमांकाचा देश कोणता ? *उत्तरे :-* १) सिरिशा बांदला ( जन्म - आंध्रप्रदेश ) २) अभिलेखागार ३) नवी दिल्ली ४) वतन ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जेवण्याची योग्य पद्धत*डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवणे का उत्तम?आधुनिक जीवनशैलीनुसार आपला आहार करण्याची पद्धत बदलून गेली आहे. आता पाट पाणी घेऊन जमिनीवर जेवण्याऐवजी डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत रुढ झाली आहे. पण प्राचीन काळापासून सुरू असणारी जमिनीवर बसून जेवणाची पद्धत ही आरोग्यासाठी जास्त फायद्याची आहे.डायनिंग टेबलवर बसून जेवण्यामुळे आरोग्यविषयक अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. जे लोक जमिनीवर बसून पारंपरिक पद्धतीने जेवतात, त्यांना लहान मोठे आजार होत नाहीत. याचं कारण म्हणजे जमिनीवर मांडी घालून आपण जेवायला बसतो, तेव्हा आपण एका विशिष्ट योगासन घालून बसलेलो असतो. या आसनाला सुखासन म्हणतात.सुखासनामुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होत. शरीरावर कुठल्याही प्रकराचा अतिरिक्त भार नसतो. सुखासनात बसल्यामुळे अन्न पचनात बाधा येत नाही. शऱीर ताठ राहातं आणि त्यामुळे अन्न नलिकेतून जेवण योग्य पद्धतीने पोटात जातं. डायनिंग टेबलवर बसून जेवल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना ॥१॥ तूतें वेद नेणें तूतें शास्त्र नेणें । तुझें नाम नेणें गातूं असे ॥२॥ त्रिविद्या तूं पारु दोहींचा वृत्तांतु । सत्त्व राहे तीतूं जयालागीं ॥३॥ निर्गुण निराकार केशव उदार । नामा म्हणे पार उतरतील ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या डोक्यावर असलेल्या केसांमध्ये किती मळ आहे ते, आपल्याला माहीत नसते त्यासाठी आधी ते केस धुतल्यावरच कळत असते. तसेच दुसऱ्याच्या मनात काय सुरु आहे याविषयी सुद्धा आपल्याला काहीच माहीत नसते. म्हणून जसे आपण, आपले केस धुत असतो तसंच दुसऱ्याला ओळखण्यासाठी आपले विचार सुद्धा तेवढेच सकारात्मक असणे आवश्यक आहे. कारण बरेचदा असं होतं की, चांगले माणसं आपण ओळखू शकत नाही अन् चुकीचे माणसं जवळ करताना आनंद मिळत असतो पण,तोच मिळणारा आनंद एक दिवस आपल्या आयुष्याची वाट लावत असते म्हणून आपण थोडी सावधगिरी बाळगायला हवी. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आनंदाची गोष्ट*लहान मुलाला काजु फार आवडत असल्याने एकदा काजुच्या बरणीत हात घालुन त्याने मुठ भरली. पण बरणीचं तोंड निमुळतं असल्याने हात काही बाहेर निघेना.. त्याने बराच प्रयत्न केला पण तरीही निघेना, त्याची ही धडपड बघणारी आजी त्याला सांगु लागली, *बाळा ती मुठ भरली आहेस ना ती सोड*, काजु बरणीत टाकुन दे, मग आपोआप हात बाहेर निघेल.. त्या लहान मुलाचा आजीवर खूप विश्वास आणि आपली आजी जे सांगेल ते बरोबर ह्या भोळ्या मनाने त्याने ते ऐकले आणि हातातली काजु सोडुन दिले. आणि खरंच आजीने सांगितल्याप्रमाणे त्याचा अडकलेला हात बाहेर निघाला.. आणि त्याचा चेहरा आनंदाने खुलला.. ही गोष्ट मला बरंच काही सुचवून गेली.. *किती गोष्टी धरून ठेवल्यात आपण, दुःख, राग, लोभ , क्रोध, मत्सर.. जुन्या कडु आठवणी* पण आपण धरुन बसलेलो आहोत.. आणि त्या मुला सारखंच स्वतःला अडकवुन बसलोय..तेव्हा लक्षात आलं की जीवनात दुःख असं नाहीच आहे.. *आपण धरुन ठेवलंय सगळ* ... हे तर लक्षातच घेतलं नाही कधी की अरे, फक्त सोडायचा अवकाश.... *आहे तो सगळा आनंदच आनंद..!* 😊😊😊😊😊😊😊😊•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 मार्च 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/XHcodnP6pdn4xQJ5/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌸 *_जागतिक रंगभूमी दिन_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_ या वर्षातील ८६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌸 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌸•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे ’राष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर**१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ’तानसेन पुरस्कार' प्रदान**१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅम आणि के.एल.एम.या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे. खराब हवामान व पायलटच्या चुकीमुळे ही घटना घडली.**१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत 'पिकल्स' नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.**१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.**१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली* 🌸 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६: संतोष कुळे --- लेखक**१९६८: डॉ. वसु भारद्वाज -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक* *१९६६: अलका श्याम माईणकर -- कवयित्री* *१९५६: श्याम बळीराम आस्करकर -- लेखक, नाट्य कलावंत* *१९५२: सुरेश चुनीलाल थोरात -- कवी, लेखक* *१९५१: अरूण गंगाधर कोर्डे -- कथा लेखक**१९५१: भारत जगन्नाथ सासणे -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, नाटककार व ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष**१९४८: विनया खडपेकर-- 'राजहंस प्रकाशन'च्या संपादिका, प्रसिद्ध लेखिका* *१९४५: ॲड.शिवाजीराव मोघे -- माजी मंत्री* *१९४२: सीमा देव -- मराठी अभिनेत्री**१९४१: ऑस्कर फर्नांडिस -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: १३ सप्टेंबर २०२१)* *१९३९: डॉ. मीना सुधाकर प्रभू -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: १ मार्च २०२५)**१९३२: सुधाकर काशिनाथ भालेराव -- प्रसिद्ध लेखक(मृत्यू: १४ जून २०१४)**१९२९: पंडित मनोहर चिमोटे -- ख्यातनाम संवादिनी वादक (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ )**१९२७: अब्दुल लतीफ खान -- भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि वादक(मृत्यू: २३ एप्रिल २००३ )* *१९२७: डॉ. नारायण कृष्णराव शनवारे -- नाट्यलेखन,संवेदनशील मनाचे लेखक (मृत्यू: ८ जून २००६ )**१९२३: धर्मपाल गुलाटी -- मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक(मृत्यू: ३ डिसेंबर २०२० )**१९२३: मंगेश भगवंत पदकी -- कवी, कथाकार(मृत्यू: १८ ऑक्टोबर १९९९ )**१९०५: जनार्दन लक्ष्मण रानडे -- भावगीत गायक(मृत्यू: १९ डिसेंबर १९९८ )**१९०१: कार्ल बार्क्स- हास्यचित्रकार (मृत्यू: २५ ऑगस्ट २००० )**१८४५: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३ )* 🌸 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌸••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे-- मराठीतील लेखक, हेसंशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत(जन्म: २८ जून १९३७ )* *२०१८: डॉ. मधुकर केशव ढवळीकर -- पद्मश्री पुरस्कारविजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ (जन्म:१६ मे १९३० )**२००८: पंढरीनाथ गंगाधर नागेशकर -- प्रसिद्ध तबलावादक (जन्म: १६ मार्च १९१३ )**२०००: प्रिया राजवंश -- भारतीय अभिनेत्री (जन्म: ३० डिसेंबर १९३६ )**१९९७: भार्गवराम आचरेकर – संगीत नाटकातील अभिनेते व गायक( जन्म: १० जुलै १९१० )**१९९२: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले – साहित्यिक,गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य (जन्म: १५ जानेवारी १९३१ )**१९६८: युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर (जन्म: ९ मार्च १९३४ )**१९६७: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ,’इलेक्ट्रो केमिकल अॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले.(जन्म: २० डिसेंबर १८९० )**१९५२: काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ११ जून १८९४ )**१८९८: सर सय्यद अहमद खान – भारतीय शिक्षणतज्ञ,समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात घेऊ या काळजी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अवैध वृक्षतोड करणाऱ्याकडून एक लाख रुपयाचा दंड वसुल करावा - सर्वोच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उद्योगनगरीत २६ बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, १८ मुन्ना भाईंवर गुन्हे दाखल, उल्हासनगर पालिकेची धडक मोहिम*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे : तुळशीबागेत श्रीरामनवमी उत्सवाचे २६४ वे वर्ष, ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *साईभक्तांसाठी एक मोठी बातमी ! आता साक्षात साईबाबांच्या मूळ चरण पादुका देशभरातील विविध राज्यांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - तमिळ चित्रपट दिग्दर्शक भारतीराजा यांचा मुलगा अभिनेता मनोज यांचं वयाच्या ४८व्या वर्षी मंगळवारी चेन्नईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्युझिलंने 60 चेंडूत संपवला सामना, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, 4-1 ने गमाविली मालिका.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गायत्री यनगंदलवार, शिक्षिका, धर्माबाद👤 सुनील खंडेलवाल, संपादक👤 धनंजय मांजरमकर👤 जगदीश्वर भूमन्ना जंगलोड👤 प्रमोद मोहिते👤 साईनाथ कल्याणकर, धर्माबाद👤 वैदेही चिलका*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 27*वर फेेकलेली वस्तू नेहमी येते खाली**जगप्रसिद्ध आहे हा न्यूटनचा शोध**काय म्हणतात सांगा मुलांनो**झाला का तुम्हाला बोध ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - सूर्य ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना अन्यायाकडे डोळेझाक करायची सवय असते त्यांना प्रकाशाची कूस कुरवाळता येत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात ट्युलिप उद्यान कोठे आहे ?२) अंतराळात जाणारी भारतीय वंशाची पहिली महिला कोण ?३) महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध म्हणून कोणाची निवड झाली ?४) 'आग विझवणारे यंत्र' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) जगात सर्वाधिक सैन्यबळ कोणत्या देशाकडे आहे ? *उत्तरे :-* १) श्रीनगर २) कल्पना चावला ३) अण्णा बनसोडे ४) अग्निशामक यंत्र ५) व्हिएतनाम*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बधिरीकरण, भूलशास्त्र*📙 मज्जातंतूंद्वारे वेदना मेंदूपर्यंत पोचवणे जेव्हा थांबवले जाते, तेव्हा त्या प्रक्रियेला बधिरीकरण म्हणतात. एखादे ऑपरेशन करायचे असेल की, रुग्णाला डॉक्टर भूल देतात. त्यामुळे त्याला वेदना समजेनासा होतात. मग ऑपरेशन सहज शक्य होते. या भूल देण्याच्या विविध पद्धतींना भूलशास्त्र (Anesthesiology) असे म्हटले जाते. आपल्याला नेहमीच्या बघण्यातून, ऐकण्यातून दोनच प्रकार माहित असतात. ज्या जागी कापायचे ती जागा इंजेक्शन देऊन बधिर करणे हा पहिला, तर दुसऱ्यामध्ये रुग्णाला पूर्ण गुंगी आणून बेशुद्ध केले जाते. या पूर्ण गुंगी आणण्याच्या प्रकाराला १८४० मध्ये सुरुवात झाली. त्याआधी शस्त्रक्रिया म्हणजे रुग्णांचे व डॉक्टरांचे दोघांचेही हालच असत. दारू पाजून वा अफूचा डोस देऊन रुग्णाला बांधून घालून शस्त्रक्रिया उरकल्या जात. वेदना असह्य झाल्याने त्याचा चाललेला आरडाओरडा ऐकत डॉक्टरांना शस्त्रक्रिया पार पाडाव्या लागत.पण जेव्हा क्लोरोफॉर्मचा प्रथम शोध लागला, तेव्हा हा प्रकार कमी झाला. त्यानंतर इथर आला. हल्ली नायट्रस ऑक्साईड हा वायूही वापरला जातो. याहीपुढे जाऊन आता सोडियम पेंटाथॉल हा द्रवपदार्थ शिरेतून टोचून भूल देण्याची पद्धत वापरली जाते. शिवाय ट्रायलिनचाही वापर केला जातो. पूर्वीच्या या हल्लीच्या पद्धतीमध्ये भूल दिल्यावर रुग्णाच्या वेदनांच्या संवेदना मेंदूकडे पाठवणे थांबते. याच जोडीला मेंदूला ग्लानी येते. त्यामुळे पाहिजे तितका वेळ घेऊन व्यवस्थित शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. संपूर्ण भूल देण्याखेरीज पाठीच्या मणक्यांमध्ये विविध पातळ्यांवर औषध टोचून त्याखालील भाग बधीर करता येतो. रुग्ण शुद्धीवर राहून त्याला टोचलेल्या भागाखालील भागांना वेदना समजत नाहीत. यालाच 'स्पायनल अॅनेस्थेशिया' म्हणतात. या प्रकारात वेदनांचे संवहन थांबवले जाते.एखाद्याच्या पायावर हातावर शस्त्रकर्म करायचे असेल तर त्या दिशेला जाणारी प्रमुख नस (Nerve) उगमाच्या जागी बधीर करायचे औषध टोचून पूर्ण हात वा पाय बधिर करण्याचीही पद्धत आहे. याला वा या अनुषंगाने वापरल्या जाणाऱ्या भुलेला 'ब्लॉक अनास्थेशिया' असे नाव दिले जाते. दात काढण्यासाठी दातांचे डॉक्टर अशा प्रकारे दातांच्या मुळांशी असलेल्या नसा बधिर करतात. डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी आणखीनच वेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे, त्यापूरतीच जागा इंजेक्शन देऊन बधिर केली जाते. गंमतीने म्हणावयाचे तर अगदी उघड्या डोळ्याने रुग्ण ऑपरेशन सहन करतो. भूलशास्त्र जस जसे प्रगत होत गेले तसतशी शस्त्रक्रियेच्या शास्त्रातही प्रगती होत गेली. आजकाल हृदय वा मेंदूवरही शस्त्रक्रिया शक्य होत आहे, ती केवळ त्यामुळेच.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥ आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥ भलारे भला मज जालासि शहाणा । भेष पळविलें शास्त्रपुराणा ॥३॥ नामा म्हणे केशवा मज मारून दवडी । पुढती न धरावि सोय माझी पुढती फुडी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गंमत बघणारे आणि गंमत करणाऱ्यामध्ये खूप फरक असतो. कारण गंमत करणारा कधी काळी दु:खात असणाऱ्या व्यक्तीला कसं हसवता येईल या प्रयत्नात असतो आणि गंमत बघणारा व्यक्ती, एखाद्याचे वाटोळे कधी होईल आणि ते सर्व होताना बघून आनंद कशाप्रकारे घेता येईल याची वाट बघत असतो. अशा विचारसरणीमुळे अनेकांची वाट लागत असते म्हणून कोणाला हसवता येत नसेल तर कोणाची गंमत बघण्यात आनंद घेऊ नये.आपली कधी, कोण गंमत बघणार आहे ती वेळ कधीच सांगून येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आरसा*एका गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’तात्पर्य : आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 मार्च 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/161GTyM5Et/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☸️ *_जागतिक संगीतोपचार दिन_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील ८५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना**२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.**१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.), येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या**१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली ’चिपको’ आंदोलनाची सुरूवात**१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली**१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली. हा परिसर पुढे किर्लोस्करवाडी म्हणून ऒळखला जाऊ लागला**१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले. या प्रभावी भाषणामुळे त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व देशमान्य झाले.**१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.* ☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: प्रतिभा सुरेश खैरनार -- कवयित्री* *१९८५: केदार महादेव जाधव -- भारतीय माजी क्रिकेटपटू**१९८५: प्रॉस्पर उत्सेया – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू**१९८२: डॉ. क्षितिज कुलकर्णी -- नाट्य लेखक**१९६५: प्रकाश राज -- भारतीय अभिनेता, प्रसिद्ध तमिळ तेलुगू खलनायक व सहनायक.राष्ट्रिय पुरस्कार विजेता अभिनेता**१९५७: सुनील शिवाजी माने -- कवी* *१९५७: हृदय बलवंत चक्रधर -- प्रसिद्ध कवी**१९५६: उमेश कदम -- कादंबरीकार**१९५५: जयराज मोरेश्वर फाटक -- प्रशासकीय सेवेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी**१९५४: अॅड. विलास विश्वनाथ कुळवेकर -- कवी, लेखक* *१९४७: अजित सिंग वर्मन -- भारतीय चित्रपट संगीतकार (मृत्यू: १५ डिसेंबर २०१६ )**१९४३: प्रा. डॉ. यशवंत मनोहर -- सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक, विचारवंत**१९३९: प्रा. पुष्पा भावे -- स्त्री चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या,ख्यातनाम समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०२० )**१९०९: बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा.द. सातोस्कर – साहित्यिक,संशोधक,’दैनिक गोमंतक’चे पहिले संपादक (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००० )**१९०७: महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक,शिक्षणतज्ञ,प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७ )**१८७५: सिंगमन र्ही – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ जुलै १९६५ )**१८७४: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (मृत्यू: २९ जानेवारी १९६३ )* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: प्रा. विमलताई गाडेकर -- विदर्भातील ख्यातनाम कवयित्री,लेखिका व समाजसेविका(जन्म: २ फेब्रुवारी १९५१)**२०२०: सतीश गुजराल -- भारतीय चित्रकार, भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे धाकटे बंधू (मृत्यू: २५ डिसेंबर १९२५ )* *२०१२: माणिकराव गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ – प्रसिद्ध गीतकार व कवी (जन्म: १० मे १९४० )**२०१०: अनंत पाटील -- ख्यातनाम गीतकार, नाटककार (जन्म: २२ डिसेंबर १९४१ )**२००८: बाबुराव बागूल – सुप्रसिद्ध साहित्यिक (जन्म: १७ जुलै १९३० )**२००३: हरेन पंड्या -- गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या* *१९९९: आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (जन्म: ११ डिसेंबर १९४२ )**१९९७: नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती (जन्म: ९ सप्टेंबर १९१० )**१९९६: के. के. हेब्बर – चित्रकार (जन्म: १९११ )**१९९६: डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक (जन्म: ७ सप्टेंबर १९१२ )**१८२७: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचे निधन.मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, (जन्म: १६ डिसेंबर १७७० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*हे असंच का घडतं .......?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर, नियोजन सुरु, संघ कार्यालयासह दीक्षाभूमीला भेट देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परिवहन विभागाचा मोठा निर्णय! आता सर्व व्यावसायिक वाहनांवर 'मराठी भाषेत' सामाजिक संदेश लिहिणे बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *न्यूझीलंडमध्ये ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा मोठा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ * 1 एप्रिल 2025 पासून भारतात लागू होणाऱ्या नवीन बँकिंग नियमांमुळे क्रेडिट कार्डवरील भत्ते, एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यातील नियमांवर परिणाम होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक : बचतगटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांचे ब्रँडिंग व मार्केटिंग करावे, महिला बालविकासचेविभागीय उपायुक्तपगारे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण पावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - पंजाब किंगचा गुजरात टायटनवर 11 धावानी विजय, कर्णधार श्रेयस अय्यर ची तुफानी खेळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 महेश मुटकुळे👤 श्रेयस पेंडकर, धर्माबाद👤 राजेश जेठेवाड, साहित्यिक, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 26*याचे दुसरे नाव रवी**देतो चोहीकडे प्रकाश**उर्जा व उष्णतेचा स्त्रोत**त्याचे घर आहे आकाश*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - इंद्रधनुष्य Rainbow••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शिक्षणाचे उद्दिष्ट संवादी व्यक्तिमत्त्वाचे निर्भय स्त्री-पुरुष निर्माण करणे हे आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'संविधानाचे यश, पावित्र्य, ते संविधान राबविणाऱ्यांच्या निती आणि नियतीवर अवलंबून असते', असे कोण म्हणाले होते ?२) 'शुद्धबीजा पोटी, फळे रसाळ गोमटी', असे कोणी म्हटले होते ?३) अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म कोठे झाला ?४) 'आपल्या लहरीप्रमाणे वागणारा' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द सांगा ?५) वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्सनुसार जगातील सर्वात दुःखी देश कोणता ?*उत्तरे :-* १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) संत तुकाराम महाराज ३) कर्नाल, हरियाणा ४) स्वच्छंदी ५) अफगाणिस्तान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बॅटरीसेल / घट* 📙 टॉर्च किंवा बॅटरीचे नावीन्य सध्यातरी कोणालाच वाटत नाही, किंबहुना प्रत्येक घरातून दिवे गेले, तर रात्रीच्या वेळी वापरासाठी एक बॅटरी हजर असतेच. याच कारणाने बॅटरी तयार करणारी मोठी कंपनी स्वतःला 'एव्हरेडी' म्हणवून घेते. पण याखेरीजही बॅटरीसेल्सचा किंवा ड्रायसेल्सचा उपयोग आपल्या जीवनात नेहमीच होत असतो. ट्रान्झिस्टर रेडिओ असो, टेपरेकॉर्डर असो वा कोणतेही पोर्टेबल म्हणजे इकडून तिकडे सहज नेता येण्यायोगे मशीन असो, ते सहसा या ड्रायसेल्सवरच चालते. एखादा छोटासा पेन सेल असेल वा चार ते सहा मोठे सेल्स असतील; पण आपल्या जीवनातील काही जरुरीच्या क्षणी तेच उपयोगी पडतात. विद्युतऊर्जा विविध प्रकारे तयार केली जाते व साठवली जाते. विद्युतघट हा प्रकार मुख्यत: रासायनिक ऊर्जेच्या निर्मितीतुन तयार केला गेला. व्होल्टानी तयार केलेला विद्युतघट हा अवजड, हलवण्यास कठीण होता. त्याच्याच पुढील आवृत्त्या डॅनियल, लेक्लांशे यांनी काढल्या. याचाच सुटसुटीत अवतार म्हणजे ड्राय बॅटरीसेल किंवा निर्द्रव विद्युतघट.या घटात जस्ताचे बाह्यावरण ऋण ध्रुवाचे काम करते. यात मध्यभागी जस्ताशी संपर्क न येता कार्बनची कांडी ठेवलेली असते. ही घन ध्रुवाचे काम करते. सर्व घट अमोनियम व झिंक क्लोराइडच्या विशिष्ट मिश्रणाने भरला जातो. कार्बनकांडीच्या जवळचा भाग ग्राफाईट व मॅगनीज डायऑक्साइडच्या मिश्रणाने झाकला जातो. तोंड सील केल्यावर घटत्या तयार होतो. हे झाले प्राथमिक वर्णन. अलीकडच्या घटात यापेक्षा अधिक विविध परिणामकारी संयुगेही वापरली जातात. पण त्याबद्दल प्रत्येक कंपनी गुप्तता पाळते. या प्रकारचे घट वापरायला सुरुवात झाली, तेव्हा ते पावसाळ्यात चिघळत असत. हल्लीचे घट संपूर्णपणे पॉलिमर कोटेड असतात. फक्त ऋण व घन भाराच्या जागा मोकळ्या सोडलेल्या असतात. बॅटरीच्या वापरासाठी, ट्रान्झिस्टरसाठी, एखाद्या यांत्रिक मोटारच्या वापरासाठी विविध प्रकारचे ड्रायसेल्स तयार करण्यातही काही कंपन्यांनी आघाडी मिळविली आहे. काही कंपन्यांनी तर काही फेरबदल सेलमध्ये करून हेच ड्रायसेल्स पुन्हा सक्षम करण्याची (Recharge) यंत्रणाही सज्ज केली आहे. सध्या विजेवर वापरल्या जाणाऱ्या अनेक छोट्या गोष्टींचा वापर आपण करतो. लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल, डिजिटल कॅमेरा, कॅल्क्युलेटर यांसाठी पुन्हा पुन्हा चार्ज करता येणारे विविध आकारांचे, प्रकारांचे व क्षमतांचे सेल वापरात आले आहेत. आपल्या देशात सध्या उत्तम प्रकारचे बॅटरीसेल्स सहज उपलब्ध आहेत. वापरून झाल्यावर ड्रायबॅटरीसेल निरुपयोगी होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥ तुजविण जिवलग दुजें कोण होईल । तें माझें जाणेल जडभारी ॥३॥ मी दोन अपराधी तुझा सरणागत । तुजविण माझें हित करिल कोण ॥४॥ करुणा कल्लोळिणी अमृत संजीवनी । चिंतितो निर्वाणीं पाव वेगीं ॥५॥ नामा म्हणे तुजविण जालों परदेशी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षभरात अनेक सण,उत्सव येत असतात. ते प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जात असतात. त्या शिकवणीतून थोडे तरी आपण शिकण्याचा प्रयत्न करावे. व इतरांनाही त्या विषयी सांगावे. कारण चांगले सांगितल्याने आपले नुकसान होत नाही तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *काठीची जादू*एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत. त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे. या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, 'हा नोकर चोर आहे. त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.' शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले. तात्पर्य :- करावे तसे भरावे•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 मार्च 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Bk4qSZ4VJ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील ८४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१३: मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना**२०१३: मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना**२०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.**१९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला**१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.**१८९८: शिवरामपंत परांजपे यांचे ’काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.**१६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.*🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: आणि वसंत दीक्षित-- हास्य ,विडंबन कवी**१९६९: डॉ. भगतसिंग पाटील -- लेखक, कवी**१९६९:श्रीपाद विनायक अपराजित --- 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक, कवी, लेखक* *१९६०: प्रसाद कृष्णराव नातु -- कथाकार**१९५६: मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक**१९५२: माधव गंगाराम फुलारी -- कवी, लेखक* *१९४८: फारुख शेख -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २८ डिसेंबर २०१३ )**१९४७: सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक**१९४५: सत्वशीला विठ्ठल सावंत -- भाषातज्ज्ञ, कोशकार अनुवादक म्हणून प्रसिद्ध (मृत्यू: १ मे २०१३ )**१९४५: कुमुदिनी काटदारे -- जयपूर घराण्यातील गायिका**१९३३: कृष्णाजी रामचंद्र सावंत -- नाट्य अभ्यासक**१९३३: वसंत गोवारीकर – भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ (मृत्यू: २ जानेवारी २०१५ )**१९३२: वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – सुप्रसिद्ध लेखक व कथाकथनकार (मृत्यू: २६ जून २००१ )**१९३१: सुशीला केशव जोशी -- कथा, कादंबरीकारी लेखिका**१९३१: उषा परांडे -- कादंबरीकार, कथाकार* *१९२४: मधुसूदन पांडुरंग भावे -- प्रसिद्ध कवी, गीतकार (मृत्यू: १९ मे २००३ )**१९१६:संबानंद मोनप्पा पंडित -- प्रसिद्ध भारतीय चित्रकार (मृत्यू: ३० मार्च १९९३ )**१९०६: कुमुदिनी रांगणेकर -- कादंबरीकार, कथाकार,अनुवादक(मृत्यू: १७ मार्च १९९९ )**१८९६: रघुनाथ वामन दिघे -- मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार (मृत्यू: ४ जुलै १९८० )**१८५०: विठ्ठल भगवंत लेंभे -- मराठी कवी (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१४: संजय दिनकर कुलकर्णी -- मराठी पत्रकार आणि लेखक (जन्म: १९५० )* *२०१४: नंदिनी कर्नाटकी(बेबी नंदा)- हिंदी आणि मराठी चित्रपटामधील भारतीय अभिनेत्री (जन्म: ८ जानेवारी १९३९ )**१९९८: आशा पोसले -- या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साबिरा बेगम या पाकिस्तानी चित्रपटांच्या पहिल्या नायिका(जन्म: १९२७ )* *१९९३: मधुकर केचे – प्रसिद्ध साहित्यिक (जन्म: १७ जानेवारी १९३२ )**१९९१: वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: १६ सप्टेंबर १९०७ )**१९४०: ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (जन्म: ११ डिसेंबर १८६७ )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आत्महत्या : एक चिंतन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *केंद्र सरकारनं खासदारांच्या पेन्शनसह डीएमध्ये केली वाढ; दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरुन 2,500 रुपये तर मूळ वेतनही 1 लाखांवरुन 1,24,000 रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *3 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार केंद्राने द्यावा, अशी शिफारस करणारा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने केला मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू - पालकमंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजस्थानात तापमान 40 अंशांवर, मध्यप्रदेशात 39 अंशांवर, ओडिशामध्ये पावसाचा इशारा, पंजाबमध्ये तापमान 4 अंशांनी वाढेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *100 दिवसात पुढच्या 25 वर्षांची सोय; महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाची अव्वल कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - दिल्ली कॅपिटलचा लखनऊवर एक विकेटने विजय, आशुतोष शर्माचे धडाकेबाज फटके*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पिराजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 सचिन पेटेकर 👤 अनिल पेंटावार 👤 जगदीश उरडे👤 अभिनंदन एडके, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 25*सप्तरंग घेऊन हा**आकाशात अवतरतो**पृथ्वीवरील लोकांना**खूप खूप आवडतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - चंद्र ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सज्जनतेचा बुरखा पांघरून मनाची दृष्टता जात नाही. मनाच्या दृष्टतेचे मूळच नष्ट केले पाहिजे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फेसबुकची स्थापना कोणी केली ?२) वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्सनुसार सलग आठव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश कोणता ?३) नुकतीच सुनीता विल्यम्स आपला सहकारी बुच विल्मोरसोबत पृथ्वीवर कोणत्या यानातून सुखरुप परतल्या ?४) 'अस्वलाचा खेळ करणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) IPL मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज कोण ? *उत्तरे :-* १) मार्क झुकरबर्ग २) फिनलंड ३) स्पेसएक्सच्या ड्रॅगन यान ४) दरवेशी ५) ख्रिस गेल ( ३५७ षटकार )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *भिजलेल्या कपड्याचा रंग गडद का दिसतो ?* 📒धुतलेला कपडा पिळून त्यातलं पाणी काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी काही पाणी उरतंच. असा ओला कपडा मग दोरीवर घालून आपण सुकवत ठेवतो. त्या वेळी जरा बारकाईनं लक्ष दिलंत तर दिसून येईल, की तो कपडा रंगीत असेल तर ओला असताना त्याचा रंग गडद दिसतो; पण सुकला की पुन्हा आपला मूळचा हलका रंगच तो परिधान करतो. पावसात भिजल्यामुळं ओल्या झालेल्या कपड्यांचा रंगही गडद झालेला दिसतो. ही किमया कशी घडते ?सुती कपडा कापसाच्या धाग्यांपासून तयार केलेला असतो. कापसाचा धागा हा एक नैसर्गिक धागा असून जेव्हा ते धागे उभे-आडवे धरून गुंफले किंवा विणले जातात तेव्हा त्यांची ही गुंफण तशी सैलसरच असते. त्या धाग्यांमध्ये भरपूर पोकळी असते. त्या पोकळीत हवा भरून राहते. शिवाय हे धागे तेवढे गुळगुळीत नसतात. त्यांचा पृष्ठभाग तसा ओबडधोबडच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांच्यावर प्रकाशकिरण पडतात तेव्हा त्यांचा बराचसा अंश त्या पृष्ठभागावरून विखुरला जातो. तुलनेनं कमी अंश परावर्तित होतो. असा परावर्तित प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि त्यांचा रंग फिकट असल्याचं आपल्याला दिसतं.जेव्हा हाच कपडा ओला होतो तेव्हा पाणी त्याच्यात शिरतं. ते धाग्यांमधल्या पोकळीतल्या हवेची हकालपट्टी तिथं साचून राहतं. त्यामुळं मग त्या धाग्याच्या पृष्ठभागावरून विखुरणाऱ्या प्रकाशकिरणांचं प्रमाण कमी होतं. आता जास्त किरण धाग्यावरून परावर्तित होतात. अधिक प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. रंग गडद झाल्याचा आभास निर्माण करतो. तेच पाणी निघून गेलं, की पूर्वीसारखी हवा धाग्यांमधल्या पोकळीतली आपली जागा पटकावते. परत एकदा जास्त प्रकाश विखुरला जातो.रेशीम किंवा पॉलिएस्टरसारखेकृत्रिम धागे वेगळे असतात. त्यांचा पृष्ठभाग ओबडधोबड नसतो. तो अधिक गुळगुळीत असतो. ते जेव्हा गुंफले किंवा विणले जातात तेव्हा त्या उभ्या-आडव्या धाग्यांमध्ये पोकळी राहत नाही. गुळगुळीत पृष्ठभागामुळं अधिक प्रकाश परावर्तित होतो. असा कपडा भिजला तरी पाणी फारसं पोकळीत भरत नाही. प्रकाशाच्या परावर्तित प्रमाणात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे तशा कपड्याचा रंग गडद झाल्याचं जाणवत नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माय माउली आस केली थोरी । वास निरंतरीं पंढरिये ॥१॥ स्वरूप दाखवी एक वेळां मज । धरूं नको लाज पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे तुज भक्तिचिये पैं पिसें । पुरविसी आस दुर्बळाची ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपकार स्मरावे*अज्ञात वासात असताना पांडव एका गरीबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्याला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावर आली. घरातल्या कोणाला पाठवावे ? चर्चा सुरू होती. संकट मोठे होते – पण कुंतीन ठरविले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे. पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप! पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली अखेरीस भीमानही शब्द खरे करून दाखविले. बकासुराचा वध करून गावावरचे संकट दूर केले. संकटकाली आपल्याला आश्रय देणाऱ्या त्या गरीबाच्या उपकार्याचीही फेड केली.*तात्पर्य : उपकाराची जाण ठेवावी*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 मार्च 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/166agnM8xo/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🧿 *_जागतिक क्षयरोग निवारण दिन_*🧿•••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ८३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• *_जागतिक क्षयरोग निवारण दिन: इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग निवारण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो._**२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.**१९९८: ‘टायटॅनिक‘ चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.**१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.**१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.**१९२४: मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेची पुण्यात स्थापना**१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन**१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.**१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.**१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला*🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८७: मुग्धा चाफेकर -- भारतीय अभिनेत्री**१९८७: शाकिब अल हसन -- बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू* *१९८२: प्रा. डॉ. देविदास साधू गेजगे -- लेखक, संपादक* *१९८२: प्रा. महादेव श्रीराम लुले (देवबाबू) -- प्रसिद्ध कवी, लेखक, समीक्षक, निवेदक* *१९७९: इमरान अनवर हाशमी -- भारतीय अभिनेता**१९७४: सुजाता चंद्रकांत नगराळे -- लेखिका* *१९७०: श्रीकांत कवळे -- लेखक* *१९६७: प्रा. बापू मल्हारराव घोक्षे -- नाटककार, समीक्षक* *१९६७: डॉ. ज्योती मिलिंद रामपूरकर -- लेखिका**१९६५: कालीदास नारायण चवडेकर -- कवी, गझलकार* *१९६१: वंदन राम नगरकर -- प्रसिद्ध एकपात्री कलाकार, लेखक, व्यक्तिमत्व विकास तज्ञ (मृत्यू: २१ मार्च २०२३ )**१९५४: हसन मुश्रीफ -- मंत्री, वैद्यकीय शिक्षण म.रा.**१९५२: सुरेश भगवानजी रेवतकर -- कवी, लेखक**१९५१: टॉमी हिल्फायगर – अमेरिकन फॅशन डिझायनर**१९५०: प्रल्हाद कक्कर -- भारतीय जाहिरात चित्रपट दिग्दर्शक**१९४७: प्रा. डॉ. आरती मदन कुलकर्णी -- ज्येष्ठ मराठी लेखिका, भाषाशास्त्राच्या अभ्यासक* *१९३०: स्टीव्ह मॅकक्वीन – हॉलिवूड अभिनेता (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८० )**१९२९: शंकरराव गेणूजी कोल्हे -- माजी मंत्री म.रा.(मृत्यू: १६ मार्च २०२२ )**१९२३: प्रा. उषा लिमये -- कवयित्री, कादंबरीकार (मृत्यू: २००७ )**१७७५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५ )**१६०८: समर्थ रामदास (नारायण सूर्याजी ठोसर) -- महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक (१३ जानेवारी १६८१ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२३: प्रदीप सरकार -- भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: ३० एप्रिल १९५५ )**२०१४: कुलदीप पवार -- मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते(जन्म: २४ डिसेंबर १९४९ )* *२०१०: मोहन वाघ -- छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार तसेच नेपथ्यकार (जन्म: ७ डिसेंबर १९२९ )* *२००७: श्रीपाद नारायण पेंडसे – प्रसिद्ध मराठी कथालेखक व कादंबरीकार (जन्म: ५ जानेवारी १९१३ )**२००५: व्ही.बलसारा -- भारतीय संगीतकार (जन्म: २२ जून १९२२ )**१९५७: पुरुषोत्तम मंगेश लाड -- संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक (जन्म: २९ मार्च १९०५ )**१९०५: ज्यूल्स व्हर्न – फ्रेन्च लेखक (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८ )**१८८२: एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७ )**१८४९: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १७८० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवन सुंदर आहे .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गट शेती द्वारे परिवर्तन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन धोरणाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे भोवले, एसटीने ई-शिवनेरीच्या चालकाला केले बडतर्फ, खासगी कंपनीला ठोठावला 5 हजारांचा दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय विद्वान गायत्री चक्रवर्ती यांना हॉलबर्ग पुरस्कार, कोलंबिया विद्यापीठातील पहिल्या कृष्णवर्णीय प्राध्यापक, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ट्विटरच्या ब्लू बर्डचा झाला लिलाव; 35 हजार डॉलर्सला विकला गेला लोगो*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार - राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मेळा प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IPL 2025 - इशान किशनच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने आपल्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय साकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष गुंडेटवाड, शिक्षक, नांदेड👤 राम मठवाले, शिक्षक, धर्माबाद👤 सोमनाथ वाळके, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, बीड👤 कोंडबा पाटील 👤 महेश्वर काळे👤 प्रदीप जोंधळे👤 गणेश कदम, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 24*रात्रीचा दिवा आकाशात**चमचम चमकतो नभात**म्हणतात मला रजनीनाथ**रात्रभर देतो तुम्हाला साथ*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - संगणक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसाने प्रत्येक विषयाचा विचार करावा, त्यावर प्रयोग करावा व नंतर निर्णय घ्यावा. दुसरा म्हणतो म्हणून मान्य करू नये.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) यंदाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे ?२) छत्तीसगड राज्यात प्रथमच 'ज्ञानपीठ' सन्मान मिळविणारे कवी कोण ?३) साहित्य जगतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ? ४) सर्वाधिक 'ज्ञानपीठ सन्मान' कोणत्या भाषेतील कवी/लेखकाला मिळाले आहे ?५) मराठी भाषेतून किती व कोणत्या लेखकांना ज्ञानपीठ सन्मान प्राप्त झाला आहे ? *उत्तरे :-* १) विनोद शुक्ल, हिंदी कवी व लेखक २) विनोद शुक्ल ३) ज्ञानपीठ पुरस्कार ४) हिंदी, १२ ज्ञानपीठ ५) चार - वि. स. खांडेकर (१९७४), वि. वा. शिरवाडकर (१९८४), विंदा करंदीकर (२००३), भालचंद्र नेमाडे (२०१४)*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✂ *बायाॅप्सी म्हणजे काय ?* ✂ ************************रोगाचं किंवा व्याधीचं निश्चित निदान करण्यासाठी अनेक परीक्षांचा वापर केला जातो. स्टेथोस्कोपने फुप्फुसाची परीक्षा करणं, तापमापकानं शरीराचं तापमान मोजणे, रक्तदाब मोजणे यासारख्या परीक्षा सहज करता येतात. त्यावरून निदान होत नसेल तर मग रक्त, मूत्र, विष्ठा, थुंकी यासारख्या शरीरद्रवांची परीक्षा केली जाते. त्याही पुढे जाऊन क्ष-किरण परीक्षा, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन, एमआरआय यासारख्या परीक्षाही केल्या जातात. त्याच्या मदतीनं शरीरातील काही अवयवांमध्ये बिघाड झाला आहे अशी शंका आल्यास मग त्या अवयवाचा एक छोटासा तुकडा काढून त्यातील पेशींची सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनं परीक्षा केली जाते. पॅथालॉजिस्ट ही परीक्षा करतात. त्याच्या साहाय्यानं मग त्या पेशी निरोगी अवस्थेत आहेत की त्यांच्यात काही बदल झाले आहेत हे ठरवलं जातं; आणि बदल झाले असेलच तर ते भद्र आहेत की अभद्र आहेत याचा निर्णय केला जातो. अवयवाचा नमुना परीक्षेसाठी काढून घेण्याच्या या पद्धतीलाच बायाॅप्सी असं म्हणतात. एखाद्या अवयवाची असामान्य वाढ झालेली असली किंवा तिथे एखादी गाठ आलेली असली तर ती कर्करोगाची आहे की नाही हे ठरवण्यासाठी सहसा बायाॅप्सीचाच वापर केला जातो; परंतु काही वेळा कर्करोगाव्यतिरिक्त इतर व्याधींच्या निदानासाठीही बायाॅप्सी केली जाते.बायाॅप्सी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीला इन्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. पण काही वेळा त्या गाठीचा किंवा वाढलेल्या भागाचा तुकडाच न घेता संपूर्ण गाठच काढून टाकली जाते. त्याला एक्सिजनल बायाॅप्सी असं म्हणतात. रोगनिदानासाठी केल्या जाणाऱ्या बायाॅप्सीसाठीही निरनिराळय़ा पद्धती वापरल्या जातात. अतिशय मऊ अवयव असले तर केवळ घर्षणाचा वापर करून नमुना मिळवला जातो. यासाठी कापूस गुंडाळलेल्या काठीचा, कॉटन बडचा वापर होतो. तोंडाच्या आतल्या भागात तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होण्याची भीती असते. त्या रोगाचा प्रत्यक्ष प्रादुर्भाव होण्यापूर्वी काही पूर्वलक्षणं दिसतात. ती पाहण्यासाठी कॉटन बड तिथं जोरानं घासून तिथल्या पेशी मिळवता येतात. त्यांचं निरीक्षण करून कर्करोग होण्याच्या शक्यतेचं निदान केलं जाऊ शकतं. काही अवयवांच्या पेशी मिळवण्यासाठी बारीक सुई त्याच्यात घुसवून तेथील पेशी खेचून बाहेर काढल्या जातात. काही वेळा मोठ्या परिघाची सुई वापरून त्या अवयवाच्या गाभ्यातला भाग कोरून काढला जातो, तर काही वेळा सरळ सरळ चाकू लावून लहानशी शस्त्रक्रिया करून तो तुकडा कापून काढला जातो. *बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माझी माउली मी बो तुझा तान्हा । पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे ॥१॥ तूं माझी गाउली मी तुझें वासरूं । नको पान्हा चोरूं पांडुरंगे ॥२॥ तूं माझी हरिणी मी तुझें पाडस । तोडी भवपाश पांडुरंगे ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । चारा घाली मत्र पांडुरंगे ॥४॥ कासवीची दृष्टी सदा बाळावरी । तैसी दया करीं पांडुरंगे ॥५॥ नामा म्हणे विठो भक्तीच्या वल्लभा । मागें पुढें उभा सांभाळिसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्ती मग कोणीही असो मनाने निर्मळ आणि स्वभावाने प्रेमळ असते सोबतच कोणाकडेही लक्ष न देता आपले कार्य नित्यनेमाने करत असते. ती व्यक्ती स्वप्नात सुद्धा कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ती प्रत्यक्ष सुद्धा असे कधीच वागू शकत नाही अशा व्यक्तीला सज्जन म्हटले जाते. म्हणून अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे. भलेही अशा सज्जन व्यक्तीकडून काही मिळत नसेल तरी कधी न मिटणारी संपत्ती मिळते. त्या संपत्तीचा कधीही अंत होत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *इतिहासातील एक मनोरंजक घटना* स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो, तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, *विन्स्टन चर्चिल,*तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ *अलेक्झांडर फ्लेमिंग,* आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, *पेनिसिलीन.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 मार्च 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/03/world-water-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••🔴 *_ जागतिक जल दिवस_* ••••••••••••••••••••••••••••••••••🔴 *_जागतिक मुकाभिनय दिवस_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील ८१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••• 💧💧💧 *_'जागतिक जल दिन' एक आंतरराष्टीय दिवस प्रत्येक वर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे._* *१९९९: लता मंगेशकर व भीमसेन जोशी यांना ’पद्मविभूषण’**१९७१: ओरिसात राष्ट्रपती राजवट सुरू**१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.**१९५५: ब्रह्मदेश व भारत यांच्यात रेडिओ टेलिफोन दळणवळण सुरू झाले**१९४७: शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे भारतात आगमन**१९४५: अरब लीगची स्थापना**१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली*🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९८८: आदित्य सील -- भारतीय अभिनेता**१९८१: रणजीत नारायण पवार -- लेखक* *१९७६: विशाखा सुभेदार -- टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री**१९७२: अश्विनी एकबोटे -- प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना(मृत्यू: २२ ऑक्टोबर २०१६ )**१९५९: सुरेश नावडकर -- प्रसिद्ध ललित लेखक* *१९५८: देवका जगन्नाथ देशमुख -- कवयित्री, लेखिका,संपादिका* *१९५२: मंगला शिवदास कुलकर्णी -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५१: चारुदत्त लक्ष्मण(सी. एल.) कुलकर्णी -- सुप्रसिद्ध दूरदर्शन मालिका अभिनेते तथा प्रसिद्ध चित्रकार, कवी, लेखक* *१९४९: विलास बाबूराव मुत्तेमवार -- माजी खासदार* *१९४८: लक्ष्मण ढवळू टोपले -- लेखक, कवी* *१९४३: नंदा अनंत सुर्वे -- मुक्त पत्रकार तथा प्रसिद्ध लेखिका* *१९२४: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५ )**१९२४: पंडित अमरनाथ -- भारतीय शास्त्रीय गायक आणि चित्रपट संगीतकार(मृत्यू: ९ मार्च १९९६ )**१९११: देवीसिंह व्यंकटसिंह चौहान -- इतिहास या विषयाचे एक अभ्यासक (मृत्यू: डिसेंबर २००४ )**१९०६: भगवंत भिकाजी सामंत -- शिक्षणतज्ञ व सूचिकार* *१८७७: सदाशिव कृष्ण फडके -- लेखक (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९७१ )**१८५७: शंकरशास्त्री रघुनाथशास्त्री गोखले -- लेखक (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९०४ )* *१७९७: विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट (मृत्यू: ९ मार्च १८८८ )*🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: सागर सरहदी -- हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक, संवाद लेखक, दिग्दर्शक(जन्म: ११ मे १९३३ )**२०१७: गोविंद श्रीपाद तळवलकर -- इंग्रजी-मराठीतले पत्रकार व लेखक वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक (जन्म: २२ जुलै १९२५ )* *२००७: निसार बज्मी -- संगीतकार (जन्म: १ डिसेंबर १९२४ )**२००५: रामासामी गणेशन(जेमिनी गणेशन) भारतीय अभिनेते(जन्म: १७ नोव्हेंबर १९२० )**२००४: बॅरिस्टर व्ही.एम.तथा ’भाऊसाहेब’ तारकुंडे – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक,मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ (जन्म: ३ जुलै १९०९ )**१९९१: कविवर्य यादव मुकुंद पाठक (शशिमोहन)-- कवी विदर्भ साहित्य संघाचे पूर्व अध्यक्ष (जन्म: २५ जून १९०५ )**१९८४: प्रभाकर आत्माराम पाध्ये -- संपादक, साहित्यिक, सौंदर्यमीमांसक,समीक्षक(जन्म: ४ जानेवारी १९०९ )**१८३२: योहान वूल्फगाँग गटें – जर्मन महाकवी, लेखक, कलाकार आणि राजकारणी.गटें यांनी कालिदासाच्या ’शाकुंतल’चे जर्मनमधे भाषांतर केले होते. (जन्म: २८ ऑगस्ट १७४९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक जलदिन त्यानिमित्ताने" पाणी " या विषयावर लेख *" जल है तो कल है "*........... आज जागतिक जलदिन आहे. तसेच उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यानिमित्ताने पशु-पक्षी यांना पिण्यासाठी पाण्याची जमेल तशी व्यवस्था करू या, एखादा वाटसरूला तहान लागली असेल आणि आपल्याजवळ महागडे पाण्याचे बॉटल असेल म्हणून दुर्लक्ष न करता त्याला पाणी पाजवा, दारावर येणाऱ्या कामकरी कष्टकरी माणसांना पिण्यासाठी पाणी द्यावे. एखादेवेळी जेवण नाही दिलं तरी चालेल पण तहानलेल्या लोकांना नक्की पाणी द्या, हीच यानिमित्ताने आपणा सर्वांना विनंती............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भारताचा कोळसा उत्पादनात ऐतिहासिक कामगिरी, एक अब्ज टणाचा टप्पा पार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रात CBSE अभ्यासक्रम लागू करण्याविषयी आमदारात मतभेद*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई : वांद्रेमध्ये नवे पुराभिलेख भवन - सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये तब्बल 19 टक्क्यांची वाढ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) टोल वाढीची केली अधिकृत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कृषी क्षेत्रातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : महायुतीच्या पाच उमेदवारांचा विधान परिषदेत बिनविरोध विजय, दोन्ही सभागृहात महायुतीचे वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज कोलकातामधील ईडन गार्डन्स येथे आयपीएल 2025 उद्घाटन समारंभ, अभिनेत्री आणि गायिका करणार लाईव्ह परफॉर्मन्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सनीदेवल जाधव, शिक्षक नेते, उस्मानाबाद👤 रमेश कत्तूरवार, धर्माबाद👤 अमित बडगे 👤 श्रीमंत ढवळे 👤 शंकर वर्ताळे 👤 गणेश मैद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 23*देतो ज्ञान शिकवतो विज्ञान**उंदीर असतो नेहमी मदतीला**क्षणात देतो संपूर्ण माहिती**सलाम याच्या संशोधकाला*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - डोळे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसंग कितीही बाका असू द्या, संयम आणि बुद्धिमत्तेचा निकष या दोहोंच्या जोरावर आपण त्यातून तरतो व उतावीळपणा केला तर डुबतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ चा *'महाराष्ट्र भूषण'* पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?२) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे मूळ गाव कोणते ?३) 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'चे स्वरूप काय आहे ?४) महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?५) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जन्म केव्हा झाला ? *उत्तरे :-* १) राम सुतार, ज्येष्ठ शिल्पकार २) गोंदूर, धुळे ३) २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल ४) महाराष्ट्र भूषण ५) १९ फेब्रुवारी १९२५*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय ?* ⏰ *************************'आजीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' असा प्रश्न छोट्या केशवकुमारांना पडला होता. आजच्या विज्ञानयुगातला मुलगा मात्र थोडासा वेगळा प्रश्न विचारेल. 'या पेशीच्या जवळी घडय़ाळ कसले आहे चमत्कारिक ?' कारण सर्व सजीवांचा मूळ घटक असलेल्या पेशींच्या अंगीही असलंच एखादं चमत्कारिक घड्याळ असावं, अशीच त्यांची वागणूक असते. नाहीतर फुलं नेहमी दिवसाच्या विशिष्ट वेळेलाच कशी फुलली असती ? फळझाडांना विशिष्ट ऋतूतच कसा मोहर आला असता ? प्राण्यांचा विणीचा हंगाम विशिष्ट दिवसांपुरताच कसा राहिला असता ? एवढंच काय पण आपल्यालाही विशिष्ट वेळेसच झोप कशी आली असती ? आणि त्या झोपेतूनही विशिष्ट वेळेसच जाग कशी आली असती ? याचं कारण आपण सगळे ज्या वातावरणात राहतो त्याचाही एक नैसर्गिक ताल असतो. दिवस रात्रीचं चक्र तर आपल्या ओळखीचं आहेच, पण निरनिराळ्या ऋतुंचंही चक्र पर्यावरणात नांदत असतं. या चक्राशी जुळवून घेण्यानंच आपलं जगणं अधिक सुसह्य होतं, हे सजीव फार पूर्वीच शिकले आहेत. उत्क्रांतीच्या ओघात ही जुळवून घेण्याची प्रक्रिया अंगी रुजली आहे. त्यामुळं आपल्या अनेक शरीरक्रियाही अशाच प्रकारे चक्राकार होत असतात. झोप, भुक यासारख्या शरीरक्रियांमधील ताल तर आपल्या माहितीचाच आहे. पण शरीराचं तापमान, रक्तदाब, संप्रेरकांचा पाझर हाही या तालानुसार होत असतो. वैज्ञानिकांनी यालाच सर्केडियन र्हीदम असं नाव दिलं आहे. दैनिक ताल. म्हणजेच एक दिवसाचं चक्र. याव्यतिरिक्त एका दिवसाहून कमी कालावधीचंही चक्र असतं. तसंच एका दिवसाहून अधिक कालावधीचंही चक्र असतं. स्त्रियांची मासिक पाळी हे या दुसर्या प्रकारच्या चक्राचं उत्तम उदाहरण आहे. हे चक्र किंवा हा ताल वातावरणातल्या काही सूचक घटकांना दाद देत असतो. दिवसचक्र हे सूर्यप्रकाशावर अवलंबून असतं. त्यामुळं दिवस आणि रात्र यावेळच्या शरीरक्रिया वेगवेगळ्या होत असतात. माणूस गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा अंधार यांच्याशी जुळवून घेत त्याच्या शरीरक्रियांचा ताल सुरू झाला. त्यानंतर माणसांनं दिव्याचा शोध लावून दिवस आणि रात्र यांच्यातला फरक कमी केला असला तरी हा मुळ ताल तसाच राहिला आहे. अंधारकोठडीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना बाहेर दिवस आहे की रात्र आहे याचा पत्ताच लागत नाही. तरीही त्यांच्या झोपेच्या आणि जाग येण्याच्या वेळांमध्ये फारसा फरक पडत नसल्याचंच दिसून आलं आहे. आपल्या मेंदूमधील सुप्राकायॅस्मिक न्युक्लियस या भागाकडून या अंगभूत घड्याळाचं नियंत्रण होतं.डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातुन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका । तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥ तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी । तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥ तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी । तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥ तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी । तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता । तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥ नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा । मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाला दोन शब्दाने असो वा कोणत्याही साहित्याने किंवा कशानेही साथ द्यायची नसेल तर देऊ नये. पण ज्यांचे आपुलकीचे नाते जुळलेले आहेत त्यांचे नाते तरी तोडू नये. भविष्यात सांगता येत नाही कधी कोणावर, कशी वेळ येईल कारण माणसाचं जीवन हे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "बोलक्या पैशाची थैली" एके दिवशी एका तेल्याचे व एका कसायाचे बाजारात खूप जोरदार भांडण झाले. शेवटी ते भांडण काही केल्या मिटत नाही, असे पाहून दाद मागण्यासाठी ते दोघे बिरबलसमोर आले. भांडण कशावरून सुरू झाले असे बिरबलाने विचारल्यावर कसाई म्हणाला, 'महाराज मी माझ्या दुकानात मांस विकत असताना हा तेली तिथे आला. तेल घेण्यासाठी मी भांडे आणावे म्हणून घरात गेलो. तेवढ्यात याने माझी पैशाची थैली उचलून घेतली व आता ही थैली त्याची आहे, असे म्हणतो.' तेली म्हणाला, 'महाराज, हा कसाई साफ खोटे बोलतो. त्याने तेल घेतले व पैसे दिलेच नाहीत. पण उलट माझी पैश्याची थैलीसुद्धा त्याचीच असल्याचे सांगत आहे. " सारा प्रकार आपल्या डोळ्याने पाहणारा कुणीच साक्षीदार नव्हता. कुणाची बाजू सत्य काही स्पष्टपणे कळतच नव्हते. बिरबलाने नोकराला सांगून पाणी किंचित कोमट करुन आणण्यास सांगितले. त्या कोमट पाण्यात त्याने थैलीतली सर्व नाणी ओतली. नाणी पाण्यात पडताच त्यांना लागलेले तेल सुटे होऊन पाण्यावर तरंग लागले. त्यावरून ते पैसे तेल्याचेच होते हे सिद्ध झाले. बिरबलाने पैसे बाहेर काढून ताब्यात घेण्यास तेल्याला सांगितले व कसायाला लबाडी केल्याबद्दल महिनाभर तुरुंगात पाठविले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 मार्च 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/EMQKpdbbxWmoFLTc/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🪴 *_जागतिक वन दिवस_* 🪴••••••••••••••••••••••••••••••••••••🪴 *_जागतिक काव्य दिन_* 🪴•••••••••••••••••••••••••••••••• 🪴 *_ या वर्षातील ८० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪴•••••••••••••••••••••••••••••••••••• *_२१ डिसेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेद्वारे एक ठराव मंजूर करून दरवर्षी २१ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय वन दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली._**२००३: जळगाव महानगरपालिका अस्तित्वात आली**२०००: फ्रेंच गयानातील कोअरु येथून 'एरियन ५०५' या वाहकाद्वारे भारताचा 'इन्सॅट ३ बी ' हा उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला**१९९०: नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.**१९८०: अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.**१९७७: भारतातील आणीबाणी संपुष्टात आली**१९३५: शाह रझा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव ईराण करावे असे आवाहन केले.**१८७१: ऑटो व्हॉन बिस्मार्क हा जर्मनीचा चॅन्सेलर बनला.**१८५८: इंग्रज सेनापती सर ह्यू रोझ याने झाशीस वेढा दिला.**१६८०: शिवाजी महाराजांनी कुलाबा (रायगड) किल्ल्याची बांधणी सुरू केली.* 🪴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस_* 🪴••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: अक्षय श्रीरंग शिंपी -- कवी, अनुवादक, लेखक**१९८६: हेमंत ढोमे -- अभिनेता, दिग्दर्शक* *१९८२: अभिजीत केळकर -- अभिनेता**१९७८: अपूर्व असरानी -- भारतीय चित्रपट निर्माता* *१९७८: राणी मुखर्जी – अभिनेत्री**१९७६: प्रा. डॉ. नोमेश मेश्राम -- कवी* *१९७६: वैभवी घोडके - कवयित्री**१९७१: प्रदीप नारायण विघ्ने -- कवी, लेखक* *१९६७: हेमंत दिवटे -- प्रसिद्ध कवी, अनुवादक* *१९६७: इब्राहिम अफगाण -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक, पत्रकार**१९६०: राजेश महाकुलकर -- कवी, लेखक**१९५३: जयश्री जयशंकर दानवे - प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९४६: ॲड. राम हरपाळे -- लेखक, व्याख्याते* *१९३४: बुटासिंग -- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: २ जानेवारी २०२१ )**१९२९: श्रीपाद गंगाधर कावळे -- कवी (मृत्यू: २००१ )**१९२८: राम पटवर्धन -- मराठी अनुवादक आणि संपादक (मृत्यू: ३ जून २०१४ )**१९२५: पीटर स्टीफन पॉल ब्रूक -- इंग्रजी थिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक(जन्म: २ जुलै २०२२)**१९२१: चंद्रकांत कल्याणदास काकोडकर -- प्रसिद्ध कादंबरीकार(मृत्यू: २३ नोव्हेंबर १९८८ )**१९१६: उस्ताद बिस्मिल्ला ख़ाँ -- भारतातील प्रख्यात शहनाई वादक,भारत रत्न (मृत्यू: २१ ऑगस्ट २००६ )**१९१३: मनोहर महादेव केळकर -- लेखक* *१९१२: ख्वाजा खुर्शीद अन्वर -- पाकिस्तानी चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार(मृत्यू: ३० ऑक्टोबर १९८४ )**१८८७: मानवेंद्रनाथ रॉय – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २६ जानेवारी १९५४ )**१८४७: बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक (मृत्यू: २ डिसेंबर १९०६ )**१७६८: जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ मे १८३० )*🪴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन_* 🪴••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: वंदन राम नगरकर -- प्रसिद्ध एकपात्री कलाकार, लेखक, व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ (जन्म: २४ मार्च १९६१ )**२०१०: पांडुरंग लक्ष्मण तथा ’बाळ’ गाडगीळ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक (जन्म: २९ मार्च १९२६ )**२००५: दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (जन्म: ६ नोव्हेंबर १९१५ )**१९९२: मोरेश्वर रामचंद्र वाळंबे -- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(जन्म: ३० जून १९१२ )**१९८५: सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (जन्म: २० मार्च १९०८ )**१९७४: श्रीधर बाळकृष्ण रानडे -- मराठी कवी, रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक.(जन्म: २४ जून १८९२ )**१९७३: यशवंत रामकृष्ण दाते – कोशकार. चिं.ग.कर्वे यांच्या साहाय्याने त्यांनी ’महाराष्ट्र मंडळ कोश’ स्थापन करून आठ खंडांचा ’महाराष्ट्र शब्दकोश’ तयार केला. (जन्म: १७ एप्रिल १८९१ )**१९७३: शंकर घाणेकर -- ’आतुन कीर्तन वरुन तमाशा’ या नाटकाचा प्रयोग करत असतानाच नटवर्य शंकर घाणेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(जन्म: १० फेब्रुवारी १९२६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक काव्य दिनानिमित्त मनस्वी शुभेच्छा..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *31 मार्च 2026पर्यंत देश नक्षलमुक्त करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वाहनांना HSRP बसविण्यासाठी आयुक्तांनी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर या 5 जिल्ह्यांना शुक्रवारपासून पावसाचे अलर्ट, तापमान चाळीशीपारच !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र विशेष अभय योजना मंजूर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्वपूर्ण घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईच्या राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना " लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार २०२५" राज्यपालांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *यावर्षी फक्त पहिल्या वर्गासाठी CBSC पॅटर्न लागू होणार असून कसल्याही प्रकारची फी मध्ये वाढ होणार नाही - शिक्षण मंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साहेबराव कदम, बाभळी, धर्माबाद👤 शिवा जी. गुडेवार👤 पी. अनिल, तेलंगणा👤 स्नेहलता कुलथे, साहित्यिक👤 प्रवीण बडेराव👤 हर्षल जाधव👤 संतोष खोसे, उस्मानाबाद👤 गणेश धुप्पे👤 विलास सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 22*दोन भाऊ सारखेच आम्ही**शेजारी असूनही भेट नाही**अवघ्या सृष्टीचा आनंद घेऊ**उत्तर लवकर सांगा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - अंडे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील यश तिने आज काय प्राप्त केले यावर नव्हे, तर त्यासाठी किती प्रमाणात अडथळे ओलांडले, यावरून ठरते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे मूळ गाव कोणते ?२) सुनीता विल्यम्सचा जन्म केव्हा व कोठे झाला ?३) अंतराळात सर्वाधिक वेळ घालविणाऱ्या पहिल्या महिला कोण ?४) ५ जून २०२४ ला सुनीता विल्यम्स व बुच विल्मोर यांनी कोणत्या यानातून अंतराळात प्रस्थान केले ?५) १ फेब्रु. २००३ मध्ये कल्पना चावला कोणत्या अंतराळ यानातून पृथ्वीवर परत येत असताना आपले प्राण गमावले ? *उत्तरे :-* १) झुलासन, गुजरात २) १९ सप्टेंबर १९६५ ( युक्लिड ओहिओ, अमेरिका ) ३) सुनीता विल्यम्स ४) बोईंगच्या स्टारलायनर यान ५) कोलंबिया अंतराळ यान *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बाळाची गर्भावस्था व पोषण* 📙 मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते. माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात. याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात, बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते व या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो. त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो. पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते. बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥ माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आधी देणारे कमी होते पण घेणारे मात्र जास्त होते.आज त्याही पेक्षा घेणाऱ्यांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. म्हणून कधी घेणाऱ्यांना पुजले जाते का. ..? या विषयी विचार करण्याची गरज आहे. कारण, देणाऱ्यांनाच दाता म्हणतात घेणाऱ्याला नाही. घेण्यासाठी तर आपल्याकडे संपूर्ण आयुष्य पडले आहे. माणसाचा जन्म मिळाला हेच सर्वांत श्रेष्ठ समजून देण्यासाठी वेळ, आपले हात, नि:स्वार्थ भावना व मन स्वच्छ, असणे आवश्यक आहे. घेण्यासाठी कुठेही वणवण भटकावे लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान* एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेकच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा." कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली. *तात्पर्य : कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 मार्च 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15wS3UnUYH/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟠 *_जागतिक चिमणी दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील ७९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••••••*१९५६: ट्युनिशियाला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले**१९१७: महाडचा ’चवदार तळे’ सत्याग्रह**१९१६: अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.**१८५४: रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाला ’ग्रँड ओल्ड पार्टी’ असेही म्हणण्यात येते.**१८५८: झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारताच सेनापती सर ह्य रोज यांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला.**१६०२: डच इस्ट इंडिया कंपनीची स्थापना* 🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟠 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: पुष्पलता युवराज मिसाळ -- कवयित्री* *१९७७: गायत्री जोशी -- भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री**१९७४: डॉ. शील बागडे -- कवयित्री**१९७२: संजय दयाराम तिजारे -- कवी* *१९६६: प्रवीण दशरथ बांदेकर -- मराठी साहित्यिक**१९६६: अलका याज्ञिक – प्रसिद्ध भारतीय गायिका**१९५८: अशोक लोटणकर -- प्रसिद्ध ललित कथाकार, कवी, समीक्षक**१९५५: दया मित्रगोत्री -- प्रसिद्ध कवयित्री**१९५२: आनंद अमृतराज -- भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा टेनिस खेळाडू**१९५१: मदनलाल उधौराम शर्मा -- माजी क्रिकेटपटू**१९५१: प्रा. विजय जनार्दन कविमंडन -- प्रसिद्ध कवी, लेखक, अनुवादक**१९५०: डॉ.भारती जयंत सुदामे -- प्रसिद्ध लेखिका,मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन व अनुवाद* *१९४७: प्रा. वसंत केशव पाटील -- ललित लेखक, कथाकार, कवी, गझलकार आणि राष्ट्रीय स्तरावरील भाषांतरकार साहित्यक* *१९३९: सुधीर दळवी -- भारतीय अभिनेता, मनोज कुमारच्या शिर्डी के साई बाबा या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात साईबाबाची भूमिका साकारली**१९२४: राम नारायण गबाले -- मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक (मृत्यू: ९ जानेवारी २००९ )**१९२४: ईश्वर बगाजी देशमुख -- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ६ फेब्रुवारी २००६ )**१९२१: पी. सी. अलेक्झांडर-- भारतातील मल्याळी राजकारणी व मुलकी सेवेतील माजी अधिकारी,महाराष्ट्राचे माजी राज्यपाल (मृत्यू: १० ऑगस्ट २०११ )**१९२०: वसंत कानेटकर – नाटककार (मृत्यू: ३१ जानेवारी २००० )**१९११: माधव मनोहर -- समीक्षक, नाटककार, लेखक (मृत्यू: १६ मे, १९९४ )**१९०८: सर मायकेल रेडग्रेव्ह – ब्रिटिश अभिनेता (मृत्यू: २१ मार्च १९८५ )**१८२८: हेन्रिक इब्सेन – नॉर्वेजियन नाटककार,दिग्दर्शक आणि कवी (मृत्यू: २३ मे १९०६ )* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🟠••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे -- मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध (जन्म: ३ सप्टेंबर १९२३ )**२०१४: खुशवंत सिंग -- भारतीय लेखक, वकील, पत्रकार (जन्म: २ फेब्रुवारी १९१५ )**१९५६: बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (जन्म: १ डिसेंबर १९०९ )**१९२५: लॉर्ड कर्झन– ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय(जन्म: ११ जानेवारी १८५९ )**१७२७: सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (जन्म: २५ डिसेंबर १६४२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक चिमणी दिवस* त्यानिमित्ताने एक रचना ..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले ; फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, बहुपर्यायीऐवजी विस्तृत उत्तरं लिहावी लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अमेझॉनचा कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 14000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर हिंसाचार प्रकरणाचा म्होरक्या फहीम खानच्या मुसक्या आवळल्या, 500 जणांचा जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप; महिला पोलिसांवरही हात टाकण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *व्युमो ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो पुण्यातील हिंजवडीत जळून खाक; चौघांचा होरपळून मृत्यू, अनेक जण जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधीमंडळातील कामकाज चुकीच्या पद्धतीनं! सभापती राम शिंदेंसह तालिका सभापती चित्रा वाघ यांच्यावर विरोधकांचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएलच्या मोक्याच्या क्षणी बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होऊ शकतो, अशी माहिती आता समोर येत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश चिंतावार, शिक्षक नेते, नांदेड 👤 गंगाधर अडकीने, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, नांदेड 👤 रामदयाल राऊत 👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड 👤 गणेश गुरुपवार, नांदेड 👤 रमेश कोंडेकर 👤 सर्जेराव ढगे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 21*एका बाटलीत रंग दोन**बाहेरून कडक आतून मऊ**संडे असो वा असो मंडे**प्रत्येकाला आवडतो हा खाऊ**याचे उत्तर सांगा पाहू ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - गवती चहा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील यश तिने आज काय प्राप्त केले यावर नव्हे , तर त्यासाठी किती प्रमाणात अडथळे ओलांडले, यावरून ठरते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'जागतिक चिमणी दिवस'* केव्हा साजरा केला जातो ?२) पहिला जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?३) जगात चिमण्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत ?४) चिमणी या पक्ष्याला इंग्रजी व हिंदीमध्ये काय म्हणतात ?५) आपण जागतिक चिमणी दिवस का साजरा करतो ? *उत्तरे :-* १) २० मार्च २) २० मार्च २०१० ३) ४३ जाती ४) House Sparrow व गौरैया ५) चिमण्यांचे संवर्धन व संरक्षण करणे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *साखर* 📙****************साखर शुद्ध स्वरुपात पांढर्या दाणेदार रुपात वापरली जाणे बरेच अलिकडचे. साखरेचे विविध रासायनिक प्रकार असतात. त्यांचे फ्रुक्टोज फळात, ग्लुकोज पिष्टमय पदार्थात, लॅक्टोज दुधात, माल्टोज बार्लीत असते. आपण वापरतो त्या साखरेत शंभर टक्के सुक्रोज असते. साखर ऊस (sugarcane), बीट (sugarbeet) यापासुन तयार केली जाते. भारतात मात्र ऊसापासुनच साखर बनते. साखरेचे स्वरुप दृश्य स्वरुपात थोडेफार बदलते असु शकते. पिठी साखर, साखरेचे चौकोनी ठोकळे, आयसिंगसाठीची साखर, ब्राऊन रंगाची साखर असे प्रकार वापरले जातात. पण मुलत: ही सारी साखरच असते. साखर खाऊन तात्काळ कॅलरीज मिळतात. पण त्यातुन शरीराची पोषण करणारी द्रव्ये म्हणजे प्रथिने आजिबात मिळत नाहीत. यामुळे जास्त साखर खाल्ली तर अनुत्पादक व निरुपयोगी कॅलरी पोटात जात राहतात. जास्त साखर खाऊन वजन वाढत जाण्याची शक्यता यातुनच उद्भवते. गोड सारेच चांगले लागते, तरीही ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.साखर बनवणे दिसायला सोपे. पण प्रत्यक्षात कटकटीचे आहे. कारण व्यापारी तत्वावर साखर बनवायला लागणारी यंत्रसामग्री फार मोठी असते व त्यासाठी भांडवलही भरपुर लागते. या उद्योगाला लागणारा कच्चा माल त्याच प्रमाणात उपलब्ध असणेही महत्वाचे. म्हणजे कारखान्याच्या क्षेत्रातच उसाची पुरेशी लागवड झालेली असणे आवश्यक ठरते. तसेच येथुन उत्पादन होणारा ऊसाचा पुरवठा एकाचवेळी न होता सलग काही महिने होणेही महत्वाचे राहते. साखर तयार करताना ऊस छाटुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे केले जातात. बीट वापरले तर त्यांचे काप केले जावुन पाण्यात भिजवुन मग त्यांचा लगदा बनतो. ऊसाचा रस वा बीटाचा लगदा हा नंतर उकळला जातो. त्यात अन्य रसायने मिसळुन त्याचे ब्लिचिंग केले जाते. त्याच वेळी तपकिरी काळपट मळी एका बाजुला व साखरेचा पाक दुसर्या बाजुला काढला जातो. विशिष्ट आकाराच्या जाळीतुन हा पाक गाळला जातानाच वाळतो व साखरेचे दाणे बनतात. यांत्रिक पद्धतीने लगेच पोती भरुन हवाबंद केली जातात. भारत, माॅरिशस, क्युबा हे साखर उत्पादनातील प्रमुख देश आहेत. ब्राझिलचाही नंबर खुपच वर येतो. युरोप व ब्रिटनमध्ये बीटापासुन साखर बनवली जाते. पण बरिचशी साखर आयात करणेच सोयीची मानली जाते. मळीपासुन अल्कोहोल बनवता येतो. शिवाय काही रसायनेही त्यापासुन बनु शकतात. केवळ मळी जर तशीच नष्ट करायचे ठरवले ते कठीण असते. झपाट्याने बुरशी धरणारा व अत्यंत वाईट वास येणारा असा हा पदार्थ असल्याने त्याची विल्हेवाट लावणे हा अनेक साखर कारखान्यांपुढे मोठाच प्रश्न असतो. पण ही पुरक उत्पादने निर्माण केली तर खुप प्रश्न व नफाही वाढतो. साखरेचा भारतातील घरगुती दरडोई वापर आजही अन्य उत्पादनांच्या मानाने कमीच आहे. सारे भारतीय घरी वापरतात ती साखर व बिस्किटे, केक्स, आईस्क्रीम, मिठाई, पेढे यांसाठी वापरली जाणारी साखर यात जवळपास दुपटीचा फरक पडतो. एक चमचाभर साखरेतुन किती कॅलरीज आपल्या पोटात जातात माहित आहे ? पस्तिस ते चाळीस कॅलरीज आपण त्यावेळी खातो. म्हणजे तीन चमचे साखर सहज तोंडात टाकणारी व्यक्ती एका पोळीचा ऐवज खाऊन बसते. अशा साखर खाण्यानेच हल्ली लोकांचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥ प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥ नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आचार, विचार आजही रूढ झाल्या दिसतात.जसे की, एखाद्याची निंदा करणे, वारंवार अपमान करणे, कुणाची निंदा करू नये,असे असतानाही अनेक जण सतत निंदा करत असतात.मात्र ह्याच निंदेमुळे स्वतःचा विकास होत नाही मात्र,अनेकांना त्यातून नवी वाट सापडत असते. असा त्यांचा समज होऊन जातो. जर...दुसऱ्यांचा विचार करणे योग्यच आहे. मात्र तो, सकारात्मक असावा. आपण आपल्यात त्याच प्रकारचे बदल घडवून आणायला पाहिजेत. पण, व्यर्थ गोष्टींच्या आधाराने नाही तर. ..माणुसकीच्या नात्याने केलेले नि:स्वार्थ भावनेचे कार्य असावेत ते,कधीही मिटत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *..... ट्रेन.......*पिंकी खूप गोड मुलगी आहे. पिंकी इयत्ता दुसरीत शिकते. एके दिवशी त्याला त्याच्या पुस्तकात ट्रेन दिसली. त्याला त्याचा रेल्वे प्रवास आठवला, जो त्याने काही दिवसांपूर्वी त्याच्या पालकांसोबत केला होता. पिंकीने चौक वाढवला आणि मग काय, भिंतीवर ट्रेनचं इंजिन लावलं . त्यात पहिला बॉक्स जोडला गेला, दुसरा बॉक्स जोडला गेला, जोडलेले असताना अनेक बॉक्स जोडले गेले. चौक संपल्यावर पिंकी उठली आणि पाहिली की वर्गाच्या अर्ध्या भिंतीवर ट्रेन उभी होती. मग काय झालं – ट्रेन दिल्लीला गेली, मुंबईला गेली, अमेरिकेला गेली, आजीच्या घरी गेली आणि आजोबांच्या घरीही गेली.नैतिक शिक्षण – मुलांचे मनोबल वाढवा उद्याचे भविष्य आजपासून घडवूया.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 मार्च 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15AGvxog1L/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟦 *_ या वर्षातील ७८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟦 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.**२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला.कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.**१९७२: भारत आणि बांगलादेश यांच्यात२५ वर्षासाठी शांतता व मैत्री करार**१९३२: ’सिडनी हार्बर ब्रिज’ सुरू झाला**१९३१: अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली.**१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या 'प्रभाकर' या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.**१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन* 🟦 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟦 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८४: तनुश्री दत्ता -- भारतीय सिने-अभिनेत्री**१९८३: सत्य प्रयागबाई कुटे -- कवी, लेखक, संपादक* *१९८२: प्रा. डॉ. व्यंकटी रावसाहेब पावडे -- लेखक**१९७५: वर्षा वेलणकर -- लेखिका, अनुवादक* *१९६५: लक्ष्मण पुंडलिकराव उगिले -- प्रसिद्ध लेखक**१९६३: समता रविराज गंधे -- कथाकार, कवियत्री**१९५६: बाळकृष्ण भास्करराव सोनवणे -- कवी, लेखक**१९५२: मोहन बाबू (डॉ.एम.मोहन बाबू), आंध्र प्रदेशातील अभिनेता, निर्माता, राजकारणी* *१९४८: विमल यशवंत बागडे -- कवयित्री* *१९४५: माया परांजपे -- स्त्री सौदर्यप्रसाधन कलेच्या तज्ज्ञ, लेखिका (मृत्यू: २३ सप्टेंबर, २०१९ )**१९४३: योगेश गौर(योगेश) -- हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिणारे गीतकार (मृत्यू: २९ मे २०२० )* *१९४३: मारियो जोस मोलिना-पास्केल हेन्रिकेझ -- मेक्सिकन भौतिक रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑक्टोबर २०२०)**१९३९: अब्बास अली बेग -- भारतीय क्रिकेटपटू**१९३८: सई परांजपे – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका**१९३८: गणेश पंढरीनाथ ओतूरकर -- बहुभाषिक शब्दकोश निर्मिती,वाड्मय निर्मिती पुरस्कारप्राप्त लेखक (मृत्यू: १७ ऑक्टोबर २०२२ )**१९३८: रामचंद्र गोविंद परांजपे (बाबासाहेब) -- संस्थापक, माजी खासदार (मृत्यू: २६ एप्रिल १९९१ )**१९३६: सत्यदेव दुबे -- भारतीय पटकथाकार, संवादलेखक,नाट्य-अभिनेते,चित्रपट -अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते ( मृत्यू: २५ डिसेंबर २०११)**१९३३: वसुधा दिवाकर दुनाखे -- कवयित्री, लेखिका* *१९२३: शांता आपटे-- अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९६४ )**१९२१: प्रभाकर बाळकृष्ण जोग -- पुण्यातील एक प्रसिद्ध वकील, लेखक* *१९००: जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू:१४ ऑगस्ट १९५८)**१८९७: शंकर विष्णू तथा ’दादा’ चांदेकर – चित्रपट संगीतकार**१८८४: नारायण भास्कर खरे -- भारतीय राजकारणी, अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष (मृत्यू: १९७० )**१८२१: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (मृत्यू: २० ऑक्टोबर १८९०)* 🟦 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟦••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: डॉ.मुरलीधर गोडे -- अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिकांवर अधिराज्य गाजविणारे कवी, गीतकार(जन्म: १८ जून १९३७ )**२०११: नवीन निश्चल -- भारतीय अभिनेता (जन्म: १८ मार्च १९४६ )**२००८: सरआर्थर सी.क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (जन्म: १६ डिसेंबर १९१७ )**२००२: नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (जन्म: ४ ऑगस्ट १९३१ )**१९९८: इ. एम. एस.नंबूद्रीपाद – केरळचे माजी मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १३ जून १९०९ )**१८९२: जनार्दन बाळाजी मोडक -- मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक(जन्म: ३१ डिसेंबर १८४५ )**१९८२: जीवटराम भगवानदास तथा ’आचार्य’ कॄपलानी – स्वातंत्र्यसेनानी,गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ )**१८८४: केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य (जन्म: १६ मे १८२५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पाणी म्हणजे जीवन आहे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी, नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि माफी नाही, नागपूर दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, विरोधकांकडून एकही अर्ज नाही; 5 नवीन आमदारांची यादी समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडचे सहाय्यक जिल्हाधिकारी कवली मेघना यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती, तर मीनल करनवाल यांची जळगाव येथे बदली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NEET PG परीक्षा 15 जूनला ; मात्र अनेकांकडून 2 ऐवजी एकाच सत्रात परीक्षा घेण्याचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; लवकरच तंज्ज्ञांसोबत सल्लामसलत, निवडणूक आयोगाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या T -20 सामन्यात न्युझिलंडने पाकिस्तानला पाच विकेटने हरविले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक सोनवणे, उपक्रमशील शिक्षक, धुळे👤 विजय अतकूरकर, धर्माबाद👤 प्रकाश गताडे, उमेद फाउंडेशन, कोल्हापूर 👤 केदार पाटील ढगे, बिलोली 👤 व्यंकटी पावडे, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 20*गवतासारखी पाने आहेत मात्र**चहात औषध म्हणून टाकतात**ताप खोकला आणि सर्दीला**लगेच पळवून लावतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - प्रथिने Protins••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानसंपादनेचा प्रारंभ साक्षरतेपासून होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कार २०२४ ची सर्वोत्तम महिला हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले ?२) हरियाणातील गुडगाव येथे असलेल्या सैफ अली खान या बॉलिवूड अभिनेत्याच्या राजवाड्याचे नाव काय ?३) मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ! हा संदेश कोणी दिला ?४) 'अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे ? *उत्तरे :-* १) सविता पूनिया २) पतौडी पॅलेस ३) रामदास स्वामी ४) अष्टावधानी ५) खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 *अणुबॉम्बचे काय दुष्परिणाम होतात ?* 💥************************दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले. या अणुबॉम्बमुळे हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांचे अतोनात नुकसान झाले. लाखो लोक मरण पावले. त्याहून कित्येकपट जखमी झाले. नंतर कित्येक वर्ष अनेक लोकांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. अनेकांना कर्करोग झाले. नंतर जन्मलेल्या बालकांमध्ये जन्मजात वैगुण्ये निर्माण झाली. मानसिक परिणाम झाले ते वेगळेच. सध्याच्या अणुबॉम्बची शक्ती जपानवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे यदाकदाचित जर अणुयुद्ध झालेच तर पूर्ण जगाचा विध्वंस होईल.अणुबॉम्बचे दुष्परिणाम अनेक गोष्टींमुळे आहेत. एक म्हणजे प्रचंड उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे सर्व काही जळून खाक होते. स्फोटांच्या हादऱ्यामुळे घरे इमारती पडून होणार्या अपघातात अनेक लोक मरतात. थोड्या दूरच्या ठिकाणी असलेले लोक भाजून निघतात. स्फोटाचा हादरा व उष्णता यांच्या परिणामांशिवाय प्रचंड प्रमाणात होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे व स्फोटानंतर तयार होणार्या विनाशक पदार्थांमुळेही अनेक दुष्परिणाम होतात. आपल्या शरीरावर किरणोत्सर्गाचे अनेक परिणाम होतात. तात्कालिक परिणामांमध्ये मळमळ, उलट्या, जुलाब, थकवा व रक्तदाब कमी होणे ही लक्षणे दिसतात. १ ते २ आठवड्यात व्यक्ती मरण पावते. काही लोक जिवंत राहतात पण त्यांच्या शरीरात विकृती निर्माण होतात. किरणोत्सर्गाच्या दूरगामी परिणामांमध्ये त्वचेचे, रक्ताचे कर्करोग यांचा समावेश होतो. गरोदरपणात जर किरणोत्सर्गाला सामोरे जावे लागले तर होणारे मूलही जन्मजात वैगुण्य असलेले निपजू शकते.एकूण अणुबॉम्ब म्हणजे जणू मानवाचा आणि माणुसकीचा शत्रूच होय. आपल्या सुंदर जगाचा नाश होऊ द्यायचा नसेल तर यासाठीच जगात संपूर्ण अण्वस्त्रबंदी व्हायला हवी. नाहीतर एक ना एक दिवस "पूर्वी पृथ्वीवर माणूस नावाचा प्राणी राहत असे. . ." असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥ नामा म्हणे नाम विर्वाणीचें बीज । मजसाठीं गुज दावियेलें ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ प्रसंगी एखादी वस्तू किंवा सामान गहाण ठेवणे वाईट नाही कारण ती, परिस्थिती त्या, प्रकारची असते काही दिवसांनी ते गहाण ठेवलेले सामान सुद्धा सोडवले जाऊ शकते.पण, आपला मेंदू जर गहाण ठेऊन असेल तर मात्र आपल्या स्वभावात किंवा व्यवहारात खूप काही फरक पडू शकतो. म्हणून कितीही काही झाले तरी अशी चूक करू नये ही छोटीशी चूक खुप महागात पडू शकते.म्हणून शक्य तेवढे स्वतंत्र निर्णय घेण्याचा व स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.*तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 मार्च 2025💠 वार - मंगळवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/07/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♻️ *_ या वर्षातील ७७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♻️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♻️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना ’गंधर्व पुरस्कार’ तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना ’अप्सरा पुरस्कार’ जाहीर**१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला**१९४०: अमळनेर येथे साने गुरुजींनी सुरू केलेल्या 'काँग्रेस'या साप्ताहिकाचा शेवटचा अंक निघाला**१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास**१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी ’अमेरिकन एक्सप्रेस’ची स्थापना केली.*♻️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७४: प्रा. डॉ. उद्धव भाले -- लेखक**१९७०: देवेंद्र गावंडे -- निवासी संपादक लोकसत्ता तथा प्रसिद्ध लेखक* *१९६८: प्रा. डॉ. शंतनू रामचंद्र कुळकर्णी -- प्रसिद्ध कवी* *१९५९: मंगला मधुकर रोकडे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संपादिका* *१९५८: सुनील केशवराव बर्दापूरकर -- गायक, संगीतकार, लेखक**१९५७: रत्ना पाठक शाह -- भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका* *१९५६: वासंती वर्तक -- दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका व लेखिका* *१९५५: संजय श्रीकृष्ण पाठक -- प्रसिद्ध विज्ञान लेखक* *१९५५: रावसाहेब दादाराव दानवे -- भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री**१९५५: अरुण बुधाजी सोनवणे -- गझलकार* *१९५१: डॉ. श्रीकांत कार्लेकर -- प्रसिद्ध लेखक**१९४८: एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (मृत्यू: २६ जून २००५ )**१९४६: नवीन निश्चल -- भारतीय अभिनेता (मृत्यू: १९ मार्च २०११ )**१९४५: प्रा. अनिल सोनार -- प्रसिद्ध नाटककार, लेखक, कवी (मृत्यू: २३ जानेवारी २०२५)**१९४३: विंग कमांडर अशोक प्रभाकर मोटे -- भारतीय वायुसेनेचे अधिकारी ऐतिहासिक अशा कारगिलसह तीन प्रमुख युद्धांमध्ये सहभाग (मृत्यू: २५ डिसेंबर २०२० )**१९३८: बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा ’शशी कपूर’ – अभिनेता (मृत्यू: ४ डिसेंबर २०१७ )**१९३४: दशरथ तोंडवळकर -- कलावैभव'चे सर्वेसर्वा,ज्येष्ठ नाट्यनिर्माते (मृत्यू: ७ ऑगस्ट २०१० )**१९३२: तुळशीराम माधवराव काजे-- प्रतिभावंत कवी (मृत्यू: १४ सप्टेंबर २०१८ )* *१९२६: अक्कितम अच्युथन नंबूथिरी -- भारतातील मल्याळम भाषेतील कवी, 'अक्कितम' या नावाने प्रसिद्ध,त्यांनी रचलेल्या बालीदर्शनम या काव्यसंग्रहासाठी १९७३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: १५ ऑक्टोबर, २०२० )**१९२१: एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, माजी केंद्रीय मंत्री व बी.सी.सी. आय.चे अध्यक्ष (मृत्यू: १ एप्रिल २०१२ )**१९१९: इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१ )**१९०५: मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका (मृत्यू: ७ मे २००१ )**१९०४: लक्ष्मणराव सरदेसाई -- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८६ )**१९०१: कृष्णाजी भास्कर तथा ’तात्यासाहेब’ वीरकर – शब्दकोशकार,अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक* *१८८१: वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार,’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक,लेखक व नाटककार (मृत्यू: ३ जून १९५६ )**१८६९: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४० )**१८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट(मृत्यू: १ जून १९४४ )**१८५८: रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३ )* ♻️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♻️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: भालचंद्र कुलकर्णी -- ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते (जन्म: २९ जुलै १९३५ )**२०२०: अशोक शेवडे -- प्रख्यात मुलाखतकार , लेखक (जन्म: २४ जानेवारी १९४४ )* *२०१६: आशा अनंत जोगळेकर -- प्रसिद्ध नृत्यांगना (जन्म: १० सप्टेंबर १९३६ )**२०११: दिनकर निलकंठराव देशपांडे -- मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक(जन्म: १७ जुलै १९३३ )**२००४: वसंत केशव दावतर -- समीक्षक (जन्म: २७ ऑगस्ट १९२५ )**२००१: विश्वनाथ नागेशकर – चित्रकार (जन्म: १९१० )**१९७५: हरी रामचंद्र दिवेकर -- स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते,संस्कृत लेखक(जन्म: ५ नोव्हेंबर १८८५ )**१९०८: सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते. (जन्म: २५ मे १८३१ )**१८९४: रावबहादुर शंकर पांडुरंग पंडित-- वेदाभ्यासक,उत्तम प्रशासक(जन्म: १ जानेवारी १८४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दीर्घकथा - लक्ष्मी*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *न्युझिलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी घेतली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या मागणी साठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सरकारला दिले ३९६ कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *माधव नेत्रपेढीच्या नव्या प्रकल्पासाठी PM मोदी 30 मार्च रोजी नागपुरात, 11 वर्षांनंतर पंतप्रधान-सरसंघचालक एकाच व्यासपीठावर येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *स्पेसएक्स 10 क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल होताच सुनिता विल्यम्स व बूच विल्मोर यांचा आनंद गगनात मावेना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच NPS पेन्शन प्रकरणे चालविण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून केला पराभव आणि ट्रॉफीवर कोरलंय नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास भंडारे 👤 बालाजी अगोड👤 लक्ष्मण नरवाडे👤 इरफान शेख *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 19*डाळींमध्ये याचे अस्तित्व**दुधामध्येही असते सत्त्व**मजबूत करण्या शरीर ठेवण**याचे करावे दररोज सेवन*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - पांढऱ्या पेशी ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••' वाचन ' हा मनोरंजनाचा सर्वात स्वस्त प्रकार आहे. पण त्यातून मिळणारा आनंद हा इतर करमणुकीच्या मिळणाऱ्या आनंदापेक्षा दीर्घकाळ टिकणारा असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नुकतीच प्रकाशित झालेली पोवारी बोलीभाषेतील *मायबोली* या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?२) हॉकी इंडियाच्या वार्षिक पुरस्कार २०२४ चा सर्वोत्तम पुरूष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले ?३) भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामाच्या पत्नीचे नाव काय होते ?४) 'अरण्याचा राजा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) काटे सावर या झाडाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) हेमंत पटले, गोंदिया २) हरमनप्रीत सिंह ३) वसुंधरा ४) वनराज ५) सावर, सेमल, शाल्मली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *स्टेनलेस स्टीलला गंज का चढत नाही ?* 📒साध्या पोलादाला गंज चढतो. तो त्या धातूला कुरतडत राहतो. कालांतरानं त्याचा भुगाच करतो. हे असं का होत ? हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्याची जी रासायनिक प्रक्रिया होते त्यातून तयार होणारी संयुगं साध्या लोखंडावर किंवा पोलादावर गंजाची पुटं चढायला कारणीभूत असतात. ही संयुगं पोलादाच्या पृष्ठभागावर एक परत तयार करतात. ही आयर्न ऑक्साईड किंवा हायड्रॉक्साईडची पुटं अस्थिर असतात. हवेतल्या, पाण्यातल्या ऑक्सिजनशी त्यांचा सतत संपर्क येतच राहतो. एवढंच काय, पण या पुटांमधून शिरकाव करून घेत पुढं पुढं जात त्यांच्या खालच्या पोलादाशीही तो संधान साधतो. आणखी संयुगं तयार करतो. त्यामुळे इतर काही उपाययोजना केली नाही तर मग या पुटांची जाडी वाढत राहते. डोळ्यांना सहज दिसेल इतकी ती वाढते. यालाच आपण गंज म्हणतो. त्यातील संयुगांच्या तपकिरी रंगामुळं तर ती अधिकच सहजपणे दिसून येतात.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलादात क्रोमियम, सिलिकॉन, मँगेनीज, कार्बन हे धातू मिसळून त्यापासून मिश्रधातू तयार करण्यात येतो. यालाच स्टेनलेस स्टील म्हणतात. काही स्टेनलेस स्टीलमध्ये निकेल किंवा मॉलिब्डेनम हे धातूही मिसळलेले असतात. जेव्हा असं स्टेनलेस स्टील हवेतल्या किंवा पाण्यातल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याची प्रक्रिया त्या मिश्रधातूतल्या लोखंडाशी होण्याआधी क्रोमियम किंवा निकेल यांसारख्या धातूंबरोबर होते. त्यांच्या संयुगामुळंही गंजाची एक रेण्वीय जाडीची परत तयार होते पण ती स्थिर असते. तिच्यामधून शिरकाव करून घेत खालच्या लोहाशी प्रक्रिया करणं ऑक्सिजनला शक्य होत नाही. त्यामुळे लोहाची संयुगं तयार होत नाहीत. एवढंच नाही, तर जे काही थोडंफार क्रोमियम किंवा निकेल उरलं असेल त्याच्याशीही ऑक्सिजन प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे जे काही गंजाचं अतिशय पातळ पुट तयार झालं असेल, त्याची जाडीही वाढत नाही. ते अतिशय पातळ म्हणजे केवळ एका रेणूच्या जाडीएवढंच असल्यामुळं आणि त्याचा रंगही तपकिरी नसल्यामुळं डोळ्यांना ते दिसत नाही. म्हणजे स्टेनलेस स्टीललाही गंज चढतो पण तो अतिशय मामुली स्वरूपातला असल्यामुळं आणि त्याची वाढ होत नसल्यामुळं त्या धातूचं नुकसान मर्यादित राहतं. सतत वाढत जाऊन ते मूळ धातूला कुरतडत खाऊन टाकत नाही.या सर्वात कळीची भूमिका बजावली जाते ती क्रोमियमकडून. त्यामुळेच इतर धातू असोत-नसोत, स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियमचा समावेश निश्चित असतो. किंबहुना, किमान दहा टक्के क्रोमियमचा अंतर्भाव केलेला असल्याशिवाय अशा धातूला स्टेनलेस स्टील असल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दंभें गर्वें मदें घेरलेंसे भारी । अनुस्रलों केसरी पंचानना ॥१॥ तूतें वेद नेणें तूतें शास्त्र नेणें । तुझें नाम नेणें गातूं असे ॥२॥ त्रिविद्या तूं पारु दोहींचा वृत्तांतु । सत्त्व राहे तीतूं जयालागीं ॥३॥ निर्गुण निराकार केशव उदार । नामा म्हणे पार उतरतील ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात. पण तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात. बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो. म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. *एक सुंदर कथा* ... 🐪एका व्यापार्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापा्याने उंट विकत घेऊन घरी नेला !घरी पोहोचल्यावर व्यापा्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरा रत्नांनी परिपूर्ण आहेत ..!सेवक ओरडला, "बॉस, तू एक उंट विकत घेतला, परंतु त्याबरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा!"व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते.व्यापारी म्हणाले, "मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!" नोकर मनात विचार करत होता "माझा बॉस किती मूर्ख आहे ...!"तो म्हणाला, "मालक कोण आहे हे कुणालाही कळणार नाही!" तथापि, व्यापार्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान दगड काजवेखाली लपवले होते!आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!व्यापारी म्हणाला, "मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!" जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता!शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला, " खरं तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते." या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले ! पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाला तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या होत्या ? व्यापारी म्हणाले: ... *"माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."*विक्रेता मूक होता!यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे. *ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान अन प्रामाणिकपणा, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 मार्च 2025💠 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1BMsTyNy3G/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟪 *_ या वर्षातील ७६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟪 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟪•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७: मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ**१९७०: शहर व औद्योगिक विकासासाठी 'सिडको' ची स्थापना**१९६९: गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.**१९६७: चौथी लोकसभा अस्तित्वात**१९५८: ’व्हॅनगार्ड-१’ या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण**१७६९: ईस्ट इंडिया कंपनीने बंगाल मधील कापड आणि मलमल उद्योगावर कडक निर्बंध लादले**१६७२: इंग्लंडने नेदरलँड विरुद्ध युद्धाची घोषणा केली* 🟪 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस :_*🟪 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: श्वेता सुधीर चंदनकर -- कवयित्री**१९९०: सायना नेहवाल -- भारतीय सुप्रसिद्ध बॅडमिंटनपटू* *१९८१: सुनील पुंडलिक बडक -- कवी**१९७९: उज्ज्वला यशवंत सामंत -- लेखिका* *१९७९: शर्मन जोशी – अभिनेता**१९७७: डॉ.कविता मुरुमकर -- कवयित्री, कादंबरीकार**१९७५: पुनीत राजकुमार -- भारतीय अभिनेता, पार्श्वगायक, चित्रपट निर्माता, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता (मृत्यू: २९ ऑक्टोबर २०२१ )**१९७४: श्वेता बच्चन-नंदा -- भारतीय स्तंभलेखिका**१९७२: सीमा भारंबे -- कवयित्री, लेखिका* *१९६८: अरुण इंगवले -- कवी, समीक्षक**१९६५: प्रदीप बाबुराव देशमुख -- कवी* *१९६४: दमयंती मोहन भोईर -- कवयित्री, लेखिका* *१९६३: ज्योती हेगडे -- खंदरबनी घराण्यातील रुद्र वीणा आणि सतार कलाकार* *१९६२: कल्पना चावला --- अमेरिकन अंतराळवीर,भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला(मृत्यू: १ फेब्रुवारी २००३ )**१९५४: प्रकाश गोपाळाव पोहरे -- दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा लेखक* *१९५३: डॉ. राजा धर्माधिकारी-- प्रसिद्ध हास्य कवी, कलाकार* *१९५२: सावळीराम गोपाळ तिदमे -- ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार**१९५१: सुनील शंकर इनामदार -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार**१९४६: पृथ्वीराज चव्हाण -- भारताच्या काँग्रेस पक्षामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री**१९३९: बंगारू लक्ष्मण -- भारतीय जनता पक्षाचे पूर्व अध्यक्ष, माजी केन्दीय मंत्री (मृत्यू: १ मार्च २०१४ )* *१९३८: बाळ भागवत -- दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे लेखक* *१९२०: शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५ )**१९१०: अनुताई बालकृष्ण वाघ -- आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९९२ )**१९०९: रामचंद्र नारायण दांडेकर –भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (मृत्यू: ११ डिसेंबर २००१ )**१९०३: वामन नारायण देशपांडे -- लेखक व कवी (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९७५ )*🟪 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟪••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: जयराम कुलकर्णी -- मराठी भाषेतील चित्रपट अभिनेते (जन्म: १७ ऑक्टोबर १९३२ )**२०१९: मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर --- भारतीय जनता पक्षाचे राजकारणी, गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १३ डिसेंबर १९५५ )**२०१८: प्रा. जैमिनी भाऊराव कडू -- लेखक, विचारवंत पत्रकार व साहित्यिक(जन्म: २ नोव्हेंबर १९५२ )* *२०००: ’राजकुमारी’ दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: १९२४ )**१९९९: कुमुदिनी रांगणेकर -- कादंबरीकार, कथाकार, अनुवादक(जन्म: २५ मार्च १९०६ )**१९८५: दत्तात्रय गजानन "दत्तू" फडकर -- कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अष्टपैलू खेळाडू(जन्म: १२ डिसेंबर १९२५ )**१९५७: रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७ )**१९५६: आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८९७ )**१९५२: सदाशिव नारायण ठोसर -- कवी, नाट्यसमीक्षक व नाटककार (जन्म: १८८२ )**१९३७: ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्हे – बडोद्याचे राजकवी,’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत. (जन्म: २६ जानेवारी १८९१ )**१९२७: काशिनाथ नारायण साने -- इतिहास अभ्यासक व पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष(जन्म: २५ सप्टेंबर १८५१ )**१८८२: विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार (जन्म: २० मे १८५० )**१७८२: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १७०० )* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भ्रष्टाचार बनलाय शिष्टाचार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली कृतज्ञता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *घर बांधणाऱ्यासाठी खुशखबर ! घरकुलातील घर बांधण्यासाठी मिळणार पाच ब्रास मोफत वाळू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *संत तुकाराम बीज निमित्ताने देहूत पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सुनिता विल्यम्स व बुच विलमोर या अंतराळवीरांची सुटकेची चिन्हे दिसू लागली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात उन्हाळ्याच्या तीव्रतेत मोठी वाढ, नागरिक त्रस्त, नागपूरमध्ये तब्बल ४५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर, संदीप जोशी, दादाराव केचेंसह छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकरांना उमेदवारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई : मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी केला पराभव, महिला प्रीमियर लीग २०२५ वर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाराम गुरुपवार, आरोग्य विभाग, नांदेड 👤 अमरसिंग चौहान, भंडारा 👤 माधव कांबळे, शिक्षक, कंधार👤 प्रतिक जाधव, नांदेड 👤 अंगद कांडले, नायगाव👤 जयानंद मठपती 👤 विलास पाटील, देगलूर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 18*शरीरातील हा शूर शिपाई**करतो रोगापासून संरक्षण**उभी करूनी फौज त्याची**करतो आपले सदैव रक्षण**कमी झाली यांची संख्या**सारेच होती मग परेशान*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - वटवृक्ष••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणावा , पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) काटे सावर या झाडाचे शास्त्रीय नाव काय आहे ?२) काटे सावर या झाडाला इंग्रजीत काय म्हणतात ?३) भारतातील कोणत्या शहराचे भौगोलिक उपनाव 'वननगर' आहे ?४) 'अरण्याची शोभा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) काटे सावर ही वनस्पतीला संस्कृतमध्ये कोणत्या नावाने ओळखली जाते ? *उत्तरे :-* १) Bombax Ceiba २) Silk Cotton Tree ३) डेहराडून ४) वनश्री ५) शाल्मली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिसे* 📙 ***************शिसे म्हणजे जडशीळ स्वरूपाचा धातू. यालाच लेड असे इंग्रजीत नाव आहे. पुरातन काळापासून ज्ञात असला तरी त्याचे दुर्गुण मात्र याच शतकात कळु लागले. पण गम्मत कशी असते बघा, दुर्गुण कळले म्हणून वापराची पद्धत बदलली व त्याच वेळी त्याचे नवीन उपयोग कळुन त्या दृष्टीने वापर सुरू झाला.अत्यल्प शिशाचे प्रमाण मानवी शरीरात कायमचे दोष निर्माण करू शकते. मेंदू व मज्जातंतूंच्या कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींची सुरुवात होऊन बधिरता, जडत्व येऊन हळूहळू हालचालीच बंद होत जातात. तसेच रक्तामधील पांढऱ्या पेशींची संख्या शिशामुळे कमी होत जाते. भूक मंदावते व प्रतिकारशक्तीही कमी होते. या बाबी कळल्या, त्यांचे नेमकेपण ज्ञात झाले आणि शिशाचा अनेक वर्ष चालू असलेला पाण्याचे नळ, घराचे पत्रे, मासेमारीचा हुक यातील वापर थांबत गेला. आज तर हा उपयोग जवळपास होतच नाही. मग शिशाचा नवीन वापर कुठे सुरू झाला ? तर क्ष - किरणांचा वापर जगभर सुरू झाला व शिशाचे झगे (अॅप्रन) या प्रत्येक ठिकाणी दिसु लागले. सर्व प्रकारची रेडिओअॅक्टिव्ह किरणे फक्त शिशाचा पत्रा सहजरित्या अडवतो. अर्थातच हा गुण कळल्यानंतर अणुभट्ट्या, आण्विक साधने, क्ष किरणांशी संबंधित काम करणारे त्यांच्यासाठी हातमोजे, झगे, बूट, गरजेनुसार भिंतीच्या विटांना लावलेले जाड पत्रे या ठिकाणी आज शिशाचा वापर होतो. शिशाचा अॅप्रन घालून काम करणे खरे त्रासदायकच असते. कारण मुळात हा धातू जड. पण त्याची ही शक्ती लक्षात आल्यावर त्याला पर्याय नव्हता. एखाद्या धातूच्या वापरातील बदलाचे स्वरूप शिशाएवढे अन्य दुसरे क्वचितच सापडेल. शिशाचे अन्य वापर म्हणजे मोटारच्या बॅटरीत आजही शिसे वापरतात. धातूंच्या वस्तू सांधण्यासाठी शिशाचेच डाग दिले जातात. विशेषत: मोठ्या आकाराचे हवाबंद लोखंडी पाइप सांधायला याचा वापर होतो. शिशाला लॅटिनमध्ये प्लंबम असे नाव आहे. आपल्या घरातील नळाचे काम करणारा प्लंबर हा शब्द यावरूनच आला. आज पाण्याचे नळ शिष्याचे नसले, तरी प्लंबरच घेऊन ते दुरुस्त करत असतो. शिशाचा धोकादायक वापर आजही केला जातो, तो म्हणजे पेट्रोलमध्ये ज्वलन चांगले व्हावे म्हणून शिसाचे अत्यल्प प्रमाणात घातलेले असते. काही देशांत हा वापर बंद केला गेला आहे. पण आपल्याकडे व जगात बव्हंशी ठिकाणी आज अजून हा वापर होतोच. या पेट्रोलच्या वापरातून निघणारा धूर हा श्वसनाद्वारे आसपासच्या लोकांच्या रक्तात मिसळला जातो. त्याचे दुष्परिणाम दिसायला कित्येक वर्षे जावी लागतात. पण मोठ्या शहरांतून वाढत असलेले वाहनांचे प्रमाण लक्षात घेता ही वेळ फार दूरवरची नव्हे. या बाबतीतील जागरूकता अद्याप पेट्रोल निर्माण व वितरण करणाऱ्या कंपन्यांनी दाखविलेली नाही. शेवटचे पण महत्त्वाचे, शिसपेन्सिलीत असते ते शिसे नव्हे; तो असतो कार्बनचा प्रकार, ग्राफाईट.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••त्यां चाळविलें अनंत सेवका । तोचि चाळा मज दाविसी निका ॥१॥ आदि अंतीं तुझ्या जाणितल्या खुणा । आतां काय करिसी पंढरीच्या राण्या ॥२॥ भलारे भला मज जालासि शहाणा । भेष पळविलें शास्त्रपुराणा ॥३॥ नामा म्हणे केशवा मज मारून दवडी । पुढती न धरावि सोय माझी पुढती फुडी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की, वयाने, अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते. अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुख नि दु:ख*एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले, " गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलोपावली दुख का ...?" त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणावयास सांगितले.गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरघळवले. त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यायवयास लावला आणि विचारले, "पाण्याची चव कशी वाटली ? " तेव्हा शिष्य म्हणाला, "अतिशय खारट".त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले... सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले... आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले?शिष्याकडून ऊत्तर आले... अतिशय मधुर.गुरुजींनी विचारले, "मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही. पण... पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुःखाचे पण तसेच आहे. मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुःखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो. पण.... मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा सुतराम ही परिणाम होत नाही."*विशाल मनाने जगा... मनाची संकुचित अवस्था टाकून द्या...*जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही... पण काही जण पेल्यासारखे लहान मन करुन जगतात ते सदैव दुःखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुःखाचा सुतराम परिणाम होत नाही... !!*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18qXRqsk7A/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟥 *_जागतिक ग्राहक दिन_*🟥•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_ या वर्षातील ७४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟥 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟥•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९०: सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.**१९८५: symbolics.com हे internet वरील पहिले डोमेन नेम नोंदले गेले.**१९६१:ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.**१९५९: महिला गृहउद्योग संस्था (लिज्जत पापड) या संस्थेची मुंबईत गिरगाव येथे स्थापना**१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.**१९१९: हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन**१९०६: रोल्स रॉईस (Rolls Royce) कंपनीची स्थापना झाली.**१८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.**१८३१: मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.**१८२७: टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली**१८२०: मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले**१५६४: मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.* 🟥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟥 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: विक्रम मालन अप्पासो शिंदे -- कवी, लेखक, संपादक* *१९९३: आलिया भट्ट -- भारतीय सिने-अभिनेत्री* *१९८४: डॉ. दत्ता घोलप -- लेखक, संपादक**१९८३: धर्मवीर भूपाल पाटील -- कवी, पत्रकार* *१९८३: हनी सिंग -- गायक, गीतकार आणि अभिनेता**१९८२: ऋतुजा देशमुख -- अभिनेत्री* *१९८१: स्वाती गणेश पाटील -- कवयित्री* *१९८०: प्रा. डॉ सारीपुत्र तुपेरे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७९: डॉ. पोर्णिमा शिरिष कोल्हे -- लेखिका* *१९७९: प्रा. प्रज्ञा मनिष पंडित --लेखिका, कवयित्री, समुपदेशक**१९७८: बबलू विनायकराव कराळे -- कवी, कथाकार* *१९७५: संगिता धनराज बोरसे -- कवयित्री**१९७५: उदल हंजारी राठोड -- कवी**१९७२: विलास भीमराव कोळी - लेखक**१९७०: डॉ. मच्छिंद्र चोरमारे --कवी, समीक्षक* *१९६५: डॉ. अंजुषा अनिल पाटील -- लेखिका* *१९६५: पोपटराव काळे -- प्रसिद्ध काजवाकार तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९६१: गोविंद हरीभाऊ सालपे -- कवी* *१९६०: दशरथपंत नारायणराव अतकरी -- कवी* *१९५४: ईला अरुण -- अभिनेत्री, टीव्ही व्यक्तिमत्त्व आणि राजस्थानी लोकसंगीत आणि लोकसंगीत-पॉप गायिका**१९५१: सुरेखा प्रकाश हरसुलकर -- लेखिका, अनुवादक**१९५१: प्रा. डॉ. प्रकाश पांडुरंग गोसावी -- प्रसिद्ध बालसाहित्यिक**१९५०: डॉ. अशोक चौसाळकर -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विरभद्र धोंगडे -- लेखक, कवी**१९४४: पुंडलिक भाऊराव गवांदे -- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९३५: लक्ष्मण त्र्य. जोशी -- प्रसिद्ध ज्येष्ठ संपादक, लेखक* *१९३४: कांशीराम -- भारतीय राजकारणी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक (मृत्यू: ९ ऑक्टोबर २००६ )**१९३४: गजमल माळी -- लेखक,कवी व नाटककार (मृत्यू: २८ फेब्रुवारी २०१७ )**१९२३: दत्ता खानविलकर -- ज्येष्ठ फौजदारी वकील, लेखक तथा माजी मंत्री (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०१४ )**१९२३: मीरा देव बर्मन -- भारतीय वित्त गीतकार आणि संगीतकार (मृत्यू: १५ ऑक्टोबर २००७ )**१९१५: त्र्यंबक गोविंद माईणकर -- भाषातज्ज्ञ, लेखक(मृत्यू: १७ सप्टेंबर १९८१ )**१९१५: ह. वि. पळणीटकर -- विदर्भातील एक नाटककार, कवी व लघुकथालेखक (मृत्यू: २८ जानेवारी १९९४ )**१९०१: विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (मृत्यू: २४ मे १९९९ )**१८६८: हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर -- ज्यांना सेव्ह दादा म्हणूनही ओळखले जाते,ते भारतात चित्रपट बनवणारे पहिले भारतीय होते(मृत्यू: २० फेब्रुवारी १९५८ )**१८६०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९३०)**१७६७: अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जून १८४५ )* 🟥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟥••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: इम्तियाज खान -- भारतीय अभिनेता(जन्म: १५ ऑक्टोबर १९४२ )**२०१९: श्रीधर उपाख्य अप्पासाहेब इंदूरकर -- संगीताच्या अभ्यासकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक,जेष्ठ संगीततज्ञ (जन्म: २७ मार्च)* *२०१६: नीळकंठ पुरुषोत्तम जोशी -- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान आणि भारतीय मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक (जन्म: १६ एप्रिल १९२२ )**२०१६: शंकर भाऊ साठे -- कादंबरीकार आणि शाहीर(जन्म: १६ ऑक्टोबर १९२५ )**२०१५: नारायणभाई महादेवभाई देसाई -- गांधी कथाकार (जन्म: २४ डिसेंबर १९२४)**२०१५: मधुकर अरकडे -- ज्येष्ठ कवी-गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९५२ )**२०१४: सुधीर मोघे -- मराठी कवी, गीतकार व संगीतकार (जन्म: ८ फेब्रुवारी १९३९ )**२०१३: कल्लम अंजी रेड्डी- फार्मास्युटिकल उद्योगातील एक भारतीय उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९३९ )**२००९: वर्मा मलिक -- चित्रपट गीतकार (जन्म: १३ एप्रिल १९२५ )* *१९९२: डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी,गीतकार व शायर (जन्म: १९२५)**१९३७: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (जन्म: १० डिसेंबर १८९२ )**१८६५: गोविंद नारायण माडगांवकर--- मराठी लेखक (जन्म: १८१५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मृत्यू : एक अटळ सत्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केली चर्चा, मुंबईत आयआयसीटी उभारणार - फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डिजिटल परिवर्तन पुरस्कार 2025 साठी भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत आयुष्मान योजना लागू होईल, 18 मार्चला लाँचिंग शक्य, जेपी नड्डा उद्घाटन करतील; 10 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सोने - चांदीचा दर वाढला असून सोनं ९० पार झालं असून चांदीचा दर लाख रुपयांवर गेला आहे. मागील दोन महिन्यात सोन्याचा दर १० हजारांनी वाढला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : पुणे जिल्ह्यात आजपासून दोन रुपयांनी महागणार दूध, गायीचे ५८ ₹ तर म्हशीचे दूध ७४ ₹ लिटर दराने मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *निर्माते दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचे वडील बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते देब मुखर्जी यांचे काल पहाटे झाले निधन, मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रायपूरमध्ये युवराज सिंगने मारले 7 षटकार, सचिनच्या बॅटनेही केली चांगली कामगिरी, इंडिया मास्टर्स संघ ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत पोहोचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विलास फुटाणे, प्रकाशक, औरंगाबाद👤 राजेंद्र महाजन, सहशिक्षक, औरंगाबाद👤 गणेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 विठ्ठल पावडे, सामाजिक कार्यकर्ते, नांदेड👤 वैभव खांडेकर 👤 बालाजी मामीलवाड👤 लक्ष्मीकांत धुप्पे👤 अंबादास पवार👤 लक्ष्मण चिंतावार, धर्माबाद👤 शुभम सांगळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 17*स्त्रिया पुजती पौणिर्मेला**प्राणवायूचा अखंड झरा**साधूसमान लांब दाढी**बहुपयोगी आहे हा खरा*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - लहान आतडे••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यश म्हणजे दहा टक्के गुणवत्ता व नव्वद टक्के कष्ट यांचा सुंदर मिलाफ आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता ?२) 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका कोणी साकारली ?३) EMI चा full form काय आहे ?४) 'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिवस' केव्हा साजरा केला जातो ?५) अतिरिक्त मद्यपानाने कशाची कमतरता जाणवते ? *उत्तरे :-* १) जमसांडे, सिंधुदुर्ग २) अक्षय खन्ना ३) Equated Monthly Installment ४) १५ मार्च ५) थायमिन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙 आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तूं माय माउली म्हणोनि आस केली । विठ्ठलें पाहिली वास तुझी ॥१॥ मज कां मोकलिलें कवणा निरविलें । कठिण कैसें जालें ह्रदय तुझें ॥२॥ तुजविण जिवलग दुजें कोण होईल । तें माझें जाणेल जडभारी ॥३॥ मी दोन अपराधी तुझा सरणागत । तुजविण माझें हित करिल कोण ॥४॥ करुणा कल्लोळिणी अमृत संजीवनी । चिंतितो निर्वाणीं पाव वेगीं ॥५॥ नामा म्हणे तुजविण जालों परदेशी । केव्हां सांभाळिसी अनाथनाथे ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःसाठी जगताना आनंद तर वेळोवेळी मिळत असतो. पण, पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला समाधान मिळत नाही. कारण समाधान ही संपत्ती कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. ती संपत्ती फक्त आपल्यापाशीच असते. जेव्हा, इतरांसाठी आपल्या हातून एखादे नि:स्वार्थ भावनेचे कार्य होत असतात त्यातून जो समाधान मिळतो तेच समाधान जगावेगळे असते म्हणून ती संपत्ती कशाप्रकारे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करून बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रसंगाचे भान ठेवावे*एका सरोवरात कुबु ग्रीव् नावाचे कासव राहत होते. दोन हंस तिथे जलविहारासाठी येत. कासवाशी त्यांची मैत्री झाली. कासवाला ते चांगल्या चांगल्या कथा सांगत. एक वर्षी अवर्षणामुळे सरोवर आटले. हंस कासवाला म्हणाले, लवकरच राहिलेला चिखल सुद्धा आटेल. मग तुझं कसं होईल? सह विचारातून एक युक्ती सुचली. एक लांब काठी दोन बाजूंनी हंसाने तोंडात धरावी व मध्यभागी कासवाने पकडावे. हंसाने उडत उडत दुसऱ्या तलावात जावे. त्यांनी कासवाला उडत उडत दुसऱ्या तलावात घेऊन जावे. त्यांनी कासवाला बजावले, मधे कोणत्याही कारणासाठी तोंड उघडू नको. नाहीतर उंचावरून पडून प्राण गमावशील.उड्डाण सुरू झाले मधेच एका गावातील लोक आश्चर्याने पाहत म्हणाले, “हे हंस गोल गोल काय नेत आहेत?” कासव रागावले ते हंसाला म्हणणार होते. “या मूर्खांना एवढेही समजत नाही का?” त्यासाठी त्याने तोंड उघडले आणि कासव जमिनीवर पडले.तात्पर्य - समाजात वागत असताना आपल्याला प्रत्येक वेळी प्रसंगाचे भान ठेवूनच वागले पाहिजे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 मार्च 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/03/holi-dhulivandan.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील ७२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: वेस्ट इंडीजमधे ९ व्या क्रिकेट विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेचे उद्घाटन झाले.**१९९९: जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृअहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती करणार्या (Lake Tapping) आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन**१९९७: मदर तेरेसा यांचे वारस म्हणून कोलकात्यातील ’मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ ने सिस्टर निर्मला यांची नियुक्ती केली.**१९६३: असामान्य क्रीडा नैपुण्यासाठी अर्जुन अवार्ड देणे सुरू* *१९४०: अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.**१९३०: क्लाईड डब्ल्यू. टॉमबॉग या शास्त्रज्ञाने प्लूटो ग्रह शोधल्याचे हारवर्ड कॉलेज येथील वेधशाळेला कळवले. मात्र या ग्रहाचा शोध त्याला १८ फेब्रुवारी १९३० या दिवशीच लागला होता.**१९१०: पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.**१७८१: विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रवींद्र भास्कर सोनवणे -- लेखक, कवी**१९७८: अनुषा रिझवी -- चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९७४: नितीन राजेंद्र देशमुख -- प्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक**१९६८: श्रीकांत पांडुरंग चौगुले -- प्रसिद्ध लेखक**१९५८: अश्विनी अनिल कुलकर्णी -- लेखिका* *१९५७: ऋतुजा चैतन्य माने -- कवयित्री, लेखिका* *१९५६: लोकनाथ यशवंत -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, लेखक**१९५१: यशोधरा पोतदार-साठे -- मराठी कवयित्री* *१९४६: जनार्दन कृष्णाजी पाटील (मगर) -- लेखक, समाजकार्य**१९४६: शकुंतला गंगाधर सोनार -- कवयित्री, लेखिका* *१९४६: अभिलाष -- सुप्रसिद्ध गीतकार 'इतनी शक्ति हमें देना दाता' (मृत्यू: २७ सप्टेंबर २०२० )**१९४६: श्रीराम विनायक साठे -- ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०२३ )**१९४३: प्रा. वामन सुदामा निंबाळकर -- कवी विचारवंत व लेखक (मृत्यू: ३ डिसेंबर २०१० )**१९४०: प्रा. डॉ. हेमालता दत्तात्रय साने -- लेखिका* *१९३६: डॉ. वनमाला पानसे -- कवयित्री, लेखिका* *१९३३: सुलोचना चव्हाण --- मराठी गायिका, लेखिका (मृत्यू: १० डिसेंबर २०२२ )**१९२६: रविन्द्र पिंगे – ललित लेखक (मृत्यू: १७ ऑक्टोबर २००८)**१९२६: लीला भालचंद्र गोळे -- संतांवर परिचयात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका**१९०१: केशव बाबूराव लेले -- मूर्तिकार, हलत्या चित्रांचे प्रदर्शनकार व कलाप्रसार.(मृत्यू: ५ जानेवारी १९४५ )**१८९३: डॉ.वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू: ३ एप्रिल १९८५ )**१८८१: दत्तात्रय विष्णू आपटे -- इतिहास संशोधक,संपादक(मृत्यू: २७ ऑक्टोबर १९४३ )**१७३३: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (मृत्यू: ६ फेब्रुवारी १८०४ )*☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: सदानंद चांदेकर -- ज्येष्ठ रंगकर्मी (जन्म: ५ सप्टेंबर १९४९)**२०१७: प्रा. मालतीबाई किर्लोस्कर -- प्रसिद्ध लेखिका (जन्म: १९२३ )**२००४: उस्ताद विलायत खाँ – सतारवादक (जन्म: २८ ऑगस्ट १९२८ )**१९९६: शफी इनामदार –अभिनेते व नाट्यनिर्माते (जन्म: २३ ऑक्टोबर १९४५ )**१९९३: डॉ. मधुकर(मधू) शंकर आपटे -- ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते (जन्म: १ मार्च १९१९ )**१९९४: श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते**१९६७: सर फँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १ ऑगस्ट १९२४ )**१९५९: गंगाधर भाऊराव निरंतर -- कादंबरीकार,ललित लेखक(जन्म: १५ जून १९०६ )**१९५५: वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (जन्म: २३ जून १९०६ )**१९०१: बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १८३३ )**१८९९: दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’-- अर्वाचीन मराठी कवी(जन्म: २७ जून १८७५ )**१८००: बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' (जन्म: १२ फेब्रुवारी १७४२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*होळी व धुलीवंदन* निमित्ताने खास लेख आणि कविता ..... वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई : जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जन्म-मृत्यूच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधिमंडळाच्या उभय सभागृहात निवेदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *1 एप्रिलपासून लागू होणार नवीन टीडीएस नियम ! FD-RD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना होणार मोठा फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लवकरच 100 व 200 ₹ च्या नोटा येणार, RBI ची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सर्वसामान्यांना मोठा दिलासा, तब्बल २१ महिन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती घसरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *‘एअरटेल’ पाठोपाठ ‘जिओ’चा स्टारलिंकसाठी अँलन मस्कच्या ‘स्पेस एक्स’शी करार; मोबाईल टॉवरशिवाय मिळेल इंटरनेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC क्रमवारीत शुभमन गिल ठरला प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्काराचा मानकरी, कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भगवान शंकरराव कांबळे, पत्रकार, धर्माबाद👤 शेख रुस्तुम, जि. प. नांदेड 👤 सुरेश बोईनवाड👤 साईनाथ बोंबले 👤 लक्ष्मण वडजे 👤 कामाजी धूतुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 16*लांबी याची खूप मोठी**तरी म्हणतात याला लहान**नाव जरी लहान असले तरी**शरीरात कार्य याचे आहे महान*ओळखा पाहू कोण ...?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - रक्त ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादे कार्य आपण न्यायबुद्धीने करत आहोत, असा आपला विश्वास असेल तर त्यात अपयश आले तरीही आपला संघर्ष चालू ठेवावा.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ?२) ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील 'सामनावीर'चा किताब कोणी पटकावला ?३) जगात सर्वात जास्त वाघ असणारे प्रथम तीन देश कोणते ?४) 'क्षुधा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) तिसऱ्यांदा ( २००२, २०१३, २०२५ ) २) रोहीत शर्मा ( ७६ धावा ) ३) भारत ( ३,२६५ ), रशिया ( ५०८ ), बांगलादेश ( ४०० ) ४) भूक ५) ५८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📙 *बर्फ* 📙 बर्फाची गंमत भारतीयांना विसाव्या शतकात सहज समजू लागली. त्याआधी देवदर्शनाला हिमालयात जाणाऱ्यांनाच बर्फ ज्ञात होता. एकोणीसाव्या शतकात मोठाच आटापिटा करून बोट भरून बंदिस्त अवस्थेत बर्फ युरोपातून प्रथम आयात केला गेला. त्या नाविन्याचे वर्णन आजही इतिहासात कुठे कुठे वाचायला मिळते. येथे पोहोचेपर्यंत त्यातील फक्त एक तृतीयांश बर्फ मूळ स्वरूपात शिल्लक होता. आज मात्र सहजगत्या बर्फ व बर्फाचे पदार्थ कोणालाही खायला वा हाताळायला मिळतात. बर्फाची इतकी सवय झाली आहे की, उन्हाळ्यात सरबतात बर्फ नसला तर ते पिववत नाही, अशी आपली स्थिती झाली आहे. शुद्ध पाणी शून्य डिग्री सेंटीग्रेडला पूर्णपणे गोठते. या घन पदार्थाला आपण 'बर्फ' म्हणतो. पाणी गोठताना आकाराने प्रसरण पावते. त्यामुळे बर्फाचा आकार नेहमीच्या मूळ पाण्याच्या आकारमानापेक्षा मोठा राहतो. बर्फ नेहमीच पाण्यावर तरंगतो, त्याचेही कारण हेच. याचा फार मोठा फायदा निसर्गतः सजीवांना झाला आहे. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा फारच मर्यादित आहे. त्यातील जवळजवळ दहा टक्के पाणी हे फक्त बर्फाच्या स्वरूपात आहे. हे जर उपलब्ध नसते तर बर्फाळ प्रदेशात मानवच काय पण अन्य कोणाही सजीव प्राण्यांची वस्ती शक्यच झाली नसती. आर्क्टिक प्रदेशात अनेक ठिकाणी समुद्राच्या खार्या पाण्याने वेढलेला भाग असून नद्या, तळी, सरोवरे यांचा फारसा मागमूस नसूनही वस्ती आहे; याचे कारण बर्फ पाण्यावर तरंगते व हे बर्फरुप पाणी सहज वापरता येते. बर्फाचे जगभर व्यापारी उत्पादन केले जाते. फ्रिझरमध्ये पाण्याचे तापमान कमी केले जाऊन बर्फ बनवतात. या बर्फाचा वापर मुख्यतः सर्व प्रकारचे मांस, मासे, भाजीपाला, दूध असे नाशवंत पदार्थ टिकवण्यासाठी केला जातो. पूर्णतः एअरकंडिशन शीत खोली बांधणे फार खर्चाचे काम असल्याने बर्फाच्या लाद्या वापरून हा सर्व माल हाताळला जातो. समुद्रावर गेलेला मोठा ट्रॉलर दुसऱ्या दिवसांपासून मासेमारी करत, गोळा करत पाचव्या दिवशी परततो. त्यानंतर हा माल म्हणजे मासे गावोगावी जातात. थेट सातव्या दिवशी ते लोकांच्या हातात पडून मग वापरले जातात, ते या बर्फाच्या लाद्यांमुळेच. बर्फाचा सरसकट वापर व उपलब्धी ही नाशवंत माल टिकवणारे वरदानच आहे.पाणी गोठताना प्रसरण पावते, याचे काही फायदे, तर काही तोटे आहेत. फायदे म्हणजे गोठवलेले बर्फ पाण्यावर तरंगत राहते. या संपर्कात आलेले पाणी, प्रथम चार डिग्री सेंटिग्रेड तापमान आल्यावर जड होते. हे जड पाणी तळाला जाते. खालचे हलके पाणी वर येते. बर्फ पाण्यापेक्षा हलका असल्याने तो पाण्यावर तरंगतो. म्हणून जीवसृष्टी अस्तित्वात आहे. कारण बर्फ जड असता, तर हिवाळ्यात तयार झालेला बर्फ समुद्राच्या तळाशी जाऊन बसला असता. उन्हाळ्यात तो काही पूर्णपणे वितळला नसता; कारण सूर्याची उष्णता समुद्राच्या तळापर्यंत पुरेशी पोहोचत नाही. पुन्हा हिवाळ्यात गोठलेले बर्फ तळाशी गेले असते. असे होता होता सारे महासागर हिवाळ्यात वरपासून खालपर्यंत बर्फाचे, तर उन्हाळ्यात वरवरचा बर्फ वितळून उथळ तळी झाली असती. अशा परिस्थितीत जीवसृष्टी तगणार कशी ? हे चित्र जरा तपशिलाने पाहण्यासारखे आहे. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन बहुधा ऑक्सिजनच्याच जवळपास असतात. म्हणून ऑक्सिजनजवळ ऋणभार, तर त्या दोन पायांच्या व धनभार तयार होतो. म्हणूनच मीठ विरघळते, तेव्हा धनविद्युतभार असलेला सोडियम आणि ऋणविद्युतभारीय क्लोरिन पाण्याच्या रेणूच्या दोन वेगवेगळ्या जागी चिकटतात. या गुणधर्मामुळेच पाणी हे एक उत्तम द्रावक झाले आहे. पाणी गोठते, तेव्हा पाण्याचे रेणू एकमेकांत घट्ट बसू शकत नाहीत; कारण सजातीय विद्युतभार एकमेकांना दूर ढकलतात. म्हणून त्यांची पिंजऱ्यासारखी पोकळ रचना तयार होते आणि ती पाण्याहून हलकी असते. बर्फ पाण्याहून जड करायचा असेल, तर हे सारे गुणधर्म बदलावे लागतील. मग पाणी उत्तम द्रावक राहणार नाही आणि शरीरात विरघळलेले सर्व पदार्थ 'साका' होऊन खाली बसतील आणि क्षणार्धात जीवसृष्टी खलास होईल.पाणी बर्फ होताना प्रसरण पावण्याचा फार मोठा तोटा म्हणजे सर्व प्रकारचे पाणी वाहून नेणारे पाइप हिवाळ्यात तडकून फुटण्याची शक्यता निर्माण होते. यासाठी काळजी म्हणून, पाइप जमिनीत खोल घातले जातात. तरीही ही तक्रार अनेक ठिकाणी उद्भवतेच. इंजिने गार राखण्यासाठी मोटार, ट्रक व अन्य वाहनांत पाणी वापरले जाते, तेही गोठते. यासाठी अलीकडे पाणी गोठू नये म्हणून अॅण्टीफ्रिज मिक्श्चर वापरले जाते. याचा वापर केल्यास पाण्याचा गोठणबिंदू खूपच खाली म्हणजे उणे बत्तीस डिग्री सेंटीग्रेड इतका उतरतो. मानवी प्रयत्नांनी, संशोधनाने या गोष्टीवर मात करायचा प्रयत्न सतत चालू असला, तरीही बर्फाने उद्भवणाऱ्या आणखी एका तोट्याच्या बाबतीत वा धोक्याच्या बाबतीत मानवी प्रयत्न अपुरेच पडतात. डोंगराच्या कड्यांना असलेल्या फटींतून आत जिरलेले पाणी गोठते व त्यामुळे अनेकदा कडे कोसळणे, दरडी कोसळणे हे अगदी अनपेक्षितरित्या घडते.डोंगरउतारावरचे स्केटिंग, बर्फाच्या मैदानावर हॉकी वा अन्य कसरती खेळ हा बर्फाचा एक गमतीदार गुण वापरून खेळले जातात. अर्थात या गुणांची जाणीव आपल्याला नंतर झाली. दाब दिल्यावर बर्फ वितळतो. स्केटचा दाब पडल्यावर तयार होणाऱ्या पातळ पाण्याच्या थरावरून स्केट वेगाने पुढे सरकते. काही सेकंदांतच मागे पुन्हा पाण्याचा बर्फ तयार होतो. अवजड सामान लादलेली स्लेड किंवा बर्फावरील ढकलगाडी मोजकेच कुत्रे मजेत ओढू शकतात. या गुणामुळेच.भारतात बर्फ नैसर्गिकरीत्या अचानक पहावयाला मिळतो, ते गारांच्या स्वरूपात. पावसाचे गोठलेले थेंब वजनाने गारांच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतात. गारांचा पाऊस असे 'बर्फरूप' आपल्याला दाखवतो. बर्फामध्ये गाडले गेलेले प्राणी, मानव, अवशेष, अन्नपदार्थ अनेक वर्षांपर्यंत जसेच्या तसे उत्तम राहू शकतात. नुकताच एक आदिमानवी देह बर्फात गाडला गेलेला सापडला. त्याचे सर्व अवयव अगदी नुकताच मृत्यू झाल्याप्रमाणे सापडले, हे आश्चर्यकारकच होते. बर्फाळ प्रदेशाचे गूढरम्य आकर्षण मानवाला कायमच वाटत आले आहे. बर्फाने अनेकांना जीवानिशी गिळले असले, तरीही गिर्यारोहणाच्या छंदात कसलाही खंड पडेल असे वाटत नाही.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥ मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥ तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥ नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दुसऱ्याची वाट लावून आनंद घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. जो पर्यंत अंगात ताकद आणि हातात पैसे, धनसंपत्ती भरभरून असते तो पर्यंत ह्या सर्वच गोष्टी करायला ही जास्त वेळ लागत नाही. पण, जेव्हा ह्या सर्वच व्यर्थ गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागतात तेव्हा मात्र मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर पडत नाही. कारण असा एक कोणीतरी असते तो दिसत नाही मात्र योग्य वेळ आल्यावर त्याची चालते त्यावेळी कितीही शक्तीशाली माणूस असेल तरी त्याच्यासमोर कोणाचे चालत नाही. म्हणून कोणाची वाट लावून आनंद घेण्यात किंवा समाधान मानण्यात सुंदर असे आयुष्य गमावू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *ही कथा आहे विन्स्टन चर्चिलची*लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’ पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात पदवी प्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपीठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा फ्रश्न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 मार्च 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Y1ueW6qbu/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ७१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रांतील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा ’यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला**१९९९: सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला**१९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड ’नाटो’ (NATO) मधे सामील झाले.**१९९३: मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिक जण ठार तर हजारो लोक जखमी**१९९२: स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.**१९८६: केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन शंकराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली**१९६८: मॉरिशस (इंग्लंडपासून) स्वतंत्र झाला**१९५४:साहित्य अकादमीची स्थापना**१९३०: ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली**१९१८: रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे हलविण्यात आली.**१९१२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेल्या ’संगीत मानापमान’ या नाटकाचा पहिला प्रयोग किर्लोस्कर नाटक मंडळीने मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला.* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ. राजकुमार बबन शेलार -- लेखक**१९८४: श्रेया घोषाल -- हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची पार्श्वगायिका**१९८२: मनोज कुलकर्णी -- लेखक* *१९८१: अनधा विनय तांबोळी -- कवयित्री, लेखिका**१९८१: बाळासाहेब धोंगडे -- प्रकाशक, संपादक**१९७३: राम पांडुरंग गायकवाड -- कवी* *१९६९: प्रा. कल्याण पांडुरंग राऊत -- कवी* *१९६९: फाल्गुनी पाठक -- भारतीय गायिका आणि संगीतकार**१९६१: डॉ.मालिनी अनिल अंबाडेकर -- कवयित्री* *१९५६: चंदन दास -- लोकप्रिय भारतीय गझल गायक**१९४३: डॉ.अविनाश बिनीवाले -- भाषाभ्यासक आणि बहुभाषाविद् लेखक* *१९४१: प्रा. जवाहर प्रेमराज मुथा -- ज्येष्ठ कवी, प्रसिद्ध लेखक, संपादक**१९४०: डॉ. श्रीकांत वामन चोरघडे -- बालरोगतज्ज्ञ व बालमानसशास्त्रज्ञ, लेखक, संपादक**१९३३: कविता विश्वनाथ नरवणे -- ज्येष्ठ मराठी लेखिका (मृत्यू २८ ऑगस्ट २०२०)**१९२६: सुमन पुरुषोत्तम बेहरे -- लेखिका**१९२३: गजानन रामचंद्र कामत -- मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक (मृत्यु: ६ ऑक्टोबर २०१५ )**१९१५: डॉ. अ. ना.देशपांडे (अच्चुत नारायण देशपांडे) -- मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे सिद्धहस्त लेखक वाङ्मयेतिहासकार (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९० )**१९१३: यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९८४ )**१९११: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती (जन्म: १२ ऑगस्ट १९७३ )**१९०४: जगन्नाथ जनार्दन पुरोहित -- महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य.(मृत्यू: २० ऑक्टोबर१९६८ )* *१८९१: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९५९ )**१८२४: गुस्ताव किरचॉफ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ ऑक्टोबर १८८७)* 🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: प्रा.मधुकर शंकर वाबगावकर (म.श.)-- लेखक, समीक्षक (जन्म:२३ जानेवारी १९३५ )**२००१: रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक (जन्म:२५ मे १९२७)**१९९९: यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक (जन्म: २२ एप्रिल १९१६ )**१९८१: मारुतीराव परब -- भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक (जन्म: १२ फेब्रुवारी १९२७ )**१९६०: विठ्ठल वामन हडप -- ऐतिहासिक कादंबरीकार,नाटककार(जन्म: १८ नोव्हेंबर १८९९ )**१९५९: जनार्दन सखाराम करंदीकर -- संपादक (जन्म: १५ फेब्रुवारी १८७५ )**१९४२: रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक (जन्म: २३ सप्टेंबर १८६१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शाळेची वेळ वाढविल्याने गुणवत्ता वाढेल का ?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्त्रियांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण करावे, कळवण महाविद्यालयातडॉ. पगार यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात यावा, भंडारा मुख्याध्यापक संघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे महसूल विभागाची कार्यशाळा, नागरिकांच्या हिताचे निर्णय वेळेत घ्या, तंत्रज्ञानाचा वापर वाढवा - विभागीय आयुक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अकोला - जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; जि.प.च्या कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन:काळ्याफिती लावून निषेध; मिनी मंत्रालयासमोर आंदोलन, 11 मागण्यांचा आग्रह*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आता प्रार्थना स्थळ, मशिदीवरील भोंग्यावर होणार कारवाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *यावर्षी एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सरकारने कुस्ती महासंघावरील निलंबन घेतले मागे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी संघ निवड शक्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय भोसले, नांदेड👤 डॉ. प्रशांत मुदकोंडवार, नांदेड👤 किरण सोनटक्के👤 उत्तम सोनकांबळे👤 पार्थ पवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 15*रंग माझा लाल तांबडा**वाघ असो वा कोंबडा**प्रत्येक सजीवात राहतो**शरीराला मी उर्जा देतो*मी कोण ओळखा पाहू उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे , ती माणसास पशू कोटीतून वर काढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारताने कितव्यांदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली ?२) ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील 'सामनावीर'चा किताब कोणी पटकावला ?३) जगात सर्वात जास्त वाघ असणारे प्रथम तीन देश कोणते ?४) 'क्षुधा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) तिसऱ्यांदा ( २००२, २०१३, २०२५ ) २) रोहीत शर्मा ( ७६ धावा ) ३) भारत ( ३,२६५ ), रशिया ( ५०८ ), बांगलादेश ( ४०० ) ४) भूक ५) ५८*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☀ *उष्माघात म्हणजे काय ?* ☀ भारतामध्ये काही भागात तापमान ४९ सेल्सियस इतके जास्त असू शकते. उन्हाळ्यामध्ये दरवर्षी अनेक लोक उष्माघाताने वा या उच्च तापमानामुळे मरण पावतात. राजस्थान, ओरिसा तसेच महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यातही उष्माघाताने मृत्यू होतात. उष्माघात याचा सोपा अर्थ उष्णतेचा आघात वा त्रास असा होतो. यात खूप ताप येणे, घाम न येणे, चक्कर येणे, लघवी न होणे, बेशुद्धी येणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रसंगी मृत्यूही होतो. अति उष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतात व पेशीमधील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातील सर्व पेशींमध्ये असेच होते व बहुतेक वेळा मेंदू सूज होऊन व्यक्ती मरते. आधी रुग्णास चक्कर येते, झटके येतात व दम लागतो. कधी कधी हृदयविकाराचा झटकाही येतो.उष्माघातावर तात्काळ उपचार करणे आवश्यक ठरते. रुग्णाला सावलीत नेऊन त्याच्या अंगावर ओली चादर टाकावी व त्याला वारा घालावा. थंडगार पाण्यात त्याला उभे केले तर फारच चांगले. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्याचे हातपाय चोळावेत. त्याला क्षार व पाणी द्यावे. (लिंबू सरबत वैगरे पदार्थ) असे उपचार लवकर सुरू झाल्यास व्यक्ती बचावते. अन्यथा मृत्यू येण्याची शक्यता खूप जास्त असते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नये, फिरायचे असल्यास डोक्यावर टोपी घालावी व पांढरे फडके बांधावे, थंडगार पाणी वारंवार प्यावे, वारंवार तोंड गार पाण्याने धुवावे. असे केल्याने उष्माघाताची शक्यता कमी करता येईल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं आकाश मी शामिका । तूं लिंग मी साळूंका । तूं समुद्र मी चंद्रिका । स्वयें दोन्ही ॥१॥ तूं वृंदावन मी चिरी । तूं तुळशी मी मंजिरी । तूं पांवा मी मोहरी । स्वयें दोन्ही ॥२॥ तूं चांद मी चांदणी । तूं नाग मी पद्मिणी । तूं कृष्ण मी रुक्मिणी । स्वयें दोन्ही ॥३॥ तूं नदी मी थडी । तूं तारूं मी सांगडी । तूं धनुष्य मी स्तविता । तूं शास्त्र मी गीता । तूं गंध मी अक्षता । स्वयें दोन्ही ॥५॥ नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा । मी कुडि तूं आत्मा । स्वयें दोन्ही ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती परिस्थितीवर मात करून हिंमतीने जगत असते तिला कशाचीही भीती वाटत नाही व कोणासमोरही न घाबरता परखडपणे बोलण्याचा प्रयत्न करत असते. कारण त्या परिस्थितीत असताना सुद्धा तिला जे, अनुभव आलेले असतात तेच अनुभव आधार बनून मार्गदर्शन करत असतात म्हणूनच म्हणतात ना की, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो. आपणही त्या गुरूचे सदैव स्मरण करावे व पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे कारण जीवन हे अनमोल आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *निश्चय*एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला. काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एके दिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली. कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही. भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.त्याने राजाला असा सल्ला दिला, ”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले, सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला. त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.नशीब जर काही ‘अप्रतिम’ देणार असेल तर त्याची सुरुवात ‘अशक्य’ गोष्टीने होते….!🚀•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 मार्च 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ७० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.**२००१: बॅडमिंटनपटू पी.गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले.या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.**२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला.त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली**१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते 'सरस्वती सन्मान' पुरस्कार प्रदान.**१८८९: पंडिता रमाबाईंनी मुंबईत "शारदा सदन" ही विधवांसाठी व कुमारीकांसाठी शाळा सुरू केली**१८८६: अमेरिकेतील फिलाडेल्फिया विद्यापीठातून डॉक्टर होणारी पहिली भारतीय महिला आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना पदवी प्रदान**१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.*♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शुभांगी सदावर्ते -- अभिनेत्री* *१९८५: अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज**१९८१: भावना कुलकर्णी-भालेराव -- बालकथाकार, कवयित्री**१९७७: वृषाली हरीश कुलकर्णी -- कवयित्री, कथालेखिका* *१९७४: जान्हवी जगन्नाथ सारंग -- कवयित्री**१९६६: मोहित चौहान -- भारतीय गायक**१९६०: रमेश चिल्ले -- कवी, लेखक* *१९६०: डॉ. श्रीदेवी शंकरअप्पा कडगे(आनेराव) -- लेखिका**१९५८: पुरुषोत्तम गं. निकते -- कवी* *१९५४: विनोद दुआ -- भारतातील हिंदी टेलिव्हिजन पत्रकार आणि कार्यक्रम संचालक (मृत्यू: ४ डिसेंबर २०२१ )**१९५२: प्रा. डॉ. विश्वास किसन पाटील -- लेखक**१९४९: डॉ. लिना विलास मोहाडीकर -- लेखिका* *१९४५: डॉ अनधा केसकर -- कादंबरीकार, कथाकार**१९४०: दया डोंगरे -- ज्येष्ठ अभिनेत्री* *१९३८: प्रा. डॉ. सुनंदा देशपांडे -- लेखिका, समीक्षक* *१९३५: प्रा. डॉ. श्रीराम घनश्याम पंडित -- प्रसिद्ध लेखक, कवी तथा संस्कृत विषयाचे अभ्यासक**१९२९: मालती मोरेश्वर निमखेडकर -- कवयित्री, कथाकार (मृत्यू: २०१६ )**१९२३: मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य (माधव गोविंद वैद्य) -- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते,भाष्यकार,पत्रकार, संपादक, संस्कृत साहित्याचे अभ्यासक (मृत्यू:१९ डिसेंबर २०२०)**१९२२: सरोज अहंकारी -- बालसाहित्यिक कवयित्री, लेखिका**१९१७: धोंडो विठ्ठल देशपांडे -- लेखक, समीक्षक (मृत्यू: १९ जुलै १९९३ )* *१९१६: हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २४ मे १९९५ )**१९१५: विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४ )**१९१२: शंकर गोविंद साठे -- मराठीतले कवी, कथालेखक आणि नाटककार(मृत्यू: २४ डिसेंबर २००० )*♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: कमलाकर नाडकर्णी -- ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक (जन्म: १० जानेवारी १९३५ )**२०१३: ब्रिज मोहन व्यास -- बॉलीवूडचा एक भारतीय अभिनेता(जन्म: २२ ऑक्टोबर १९२० )**२००६: स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (जन्म: २० ऑगस्ट १९४१ )**१९९३: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: २५ एप्रिल १९१८ )**१९८०: अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे -- सर्वोदयी नेते व विचारवंत(जन्म: ७ ऑक्टोबर १८९७ )**१९७९: यशवंत कृष्ण उर्फ आप्पासाहेब खाडिलकर -- नवाकाळचे दुसरे संपादक (जन्म: १५ जानेवारी १९०५ )**१९७०: अर्ल स्टॅनले गार्डनर – अमेरिकन लेखक आणि वकील (जन्म: १७ जुलै १८८९ )**१९६५: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. (जन्म: १२ डिसेंबर १८९२ )**१९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१ )**१९४३: ॲड. यादव माधव उपाख्य अण्णासाहेब काळे -- विदर्भाच्या इतिहासाचे सखोल अभ्यासक (जन्म: १८ फेब्रुवारी १८८२ )**१६८९: छत्रपती संभाजी महाराज -- मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती (जन्म: १४ मे १६५७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* या समूहात join..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद, पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्ली: भारतीय जनता पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महिला नेत्याचे नाव लवकरच जाहीर करण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जगातील ४०% मुलांना ते बोलू किंवा समजतील अशा भाषेत शिक्षण मिळत नाही - युनेस्कोचा अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जेजुरी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, मराठमोळा पोशाख हवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवे शिक्षण धोरण आणि त्रिभाषिकतेवरून संसदेत गदारोळ, द्रमुक खासदार घोषणाबाजी करत शिक्षणमंत्र्यांकडे गेले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्याचे नवगृहनिर्माण धोरण योजना आणणार, आतापर्यंत 44 लाख 7 हजार घरकुले मंजूर, सरकारकडून अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *निवृत्तीबात रोहित शर्मा स्पष्टच बोलला; जे काही आहे ते सुरु राहील, अफवांना हवा देऊ नका, मी वनडेतून आत्ताच निवृत्त होणार नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भाऊसाहेब उमाटे, इतिहास संशोधक, लातूर👤श्री प्रलोभ कुलकर्णी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जि. प. हा. वाघी जि. नांदेड.👤 विजय नागलवार, अभियंता, पुणे👤 सूर्यकांत सोनकांबळे👤 रमेश कवडेकर👤 संदीप दुगाडे👤 संतोष देवणीकर, शिक्षक, देगलूर👤 जब्बार मुलाणी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 14*हा एक चमत्कारिक कागद**आम्ल अल्कलीत रंग बदलतो**पहा मुलांनो गंमत जवळून**जादूची हा कांडी फिरवतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - जीभ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे कार्य तडीस न्यायचे असते ते चिकाटीने केले तर त्यात नक्कीच यश मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय लोक 'मॉरिशस' या देशाला संक्षिप्तमध्ये काय म्हणतात ?२) मॉरिशसमध्ये किती टक्के भारतीय लोक राहतात ?३) मॉरिशस हा देश केव्हा स्वतंत्र झाला ?४) मॉरिशस या देशाची राजधानी कोणती ?५) मॉरिशस या देशाची लोकसंख्या किती आहे ? *उत्तरे :-* १) मोरस २) ७० टक्के ३) १२ मार्च १९६८ ४) पोर्ट लुईस ५) १३ लाख*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की सातारच्या पेढ्यांना कंदी पेढे असच कां म्हणतात?*अहो मग भिडू कशा साठी आहे? आम्ही सांगायलाच बसलोय.गोष्ट आहे दीडशे वर्षापूर्वीची. भारतात ब्रिटीश राजवट सुरु होती. साताऱ्यात छत्रपतींच्या संस्थानावर देखील ब्रिटीश रिजंट बसवण्यात आले होते. हे अधिकारी इंग्लंडवरून आलेले होते. त्यांना गोड खाण्याची सवय होती. मग ते कायम वेगवगेळ्या मिठाईच्या शोधात असायचे.सातारा जिल्ह्यातील जो पाटणकडचा डोंगराळ भाग आहे तिथे त्याकाळात शेतीच प्रमाण कमी होतं. लोकांच उपजीविकेच साधन मुख्यसाधन हे पशुधन होतं. तिथल्या गायी म्हैशीच वैशिष्ट्य म्हणजे त्या रानावनात वाढलेल्या होत्या. विकतचा चारा हा प्रकार तिथे नव्हता. यामुळे त्यांचं दुध घट्ट आणि अस्सल असायचं. शिवाय ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं होतं. हे दुध जवळच मोठ शहर म्हणून सातारला पाठवून दिल जायचं.काहींनी या दुधाला कढईत उकळून त्यात साखर किंवा गुळ टाकली. हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवले. ते एका करंडीमध्ये भरून ब्रिटीश अधिकाऱ्यांना पेश केले. ब्रिटीशांना ही मिठाई प्रचंड आवडली. त्यांना करंडी म्हणता येत नसल्यामुळे त्यांनी त्याला कँडी म्हणायला सुरवात केली. पुढे याच कँडीच आपल्या सातारकरांनी कंदी केलं. साधारण याच काळात छत्रपतींच्या नवव्या वंशजानी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खडकलाट या गावातून काही मिठाई बनवणाऱ्या कुटुंबाना साताऱ्यात आणून वसवलं होतं. त्यांनी बनवलेले कंदी पेढे लोकप्रिय होत गेले. पुढे त्यांनाच लाटकर अस ओळखल जाऊ लागले. कंदी पेढ्याला सातासमुद्रापार नेलं ते मात्र तुळजाराम मोदी या हलवायांनी. त्यांनी सत्तरवर्षापूर्वी विमानात, लंडनमधील सुप्रसिद्ध ठिकाणी या कंदी पेढ्यांच्या जाहिराती लावल्या. त्यामुळेच हा पेढा कानाकोपऱ्यात पोहचला.आजही एवढ्या वर्षांनी एवढी तंत्रज्ञानात सुधारणा होऊनदेखील मोदी आणि लाटकर हलवाई मात्र कंदी पेढ्याचा खवा आजही कढईतच भाजतात व प्रत्येक पेढा हातावरच वळला जातो. खव्याची भाजणी विशिष्ट प्रकारे केल्यामुळे पेढ्याची पौष्टिकता, चव व टिकाऊपणा वाढतो. म्हणूनच गेली १०० वर्ष सातारच्या कंदी पेढ्यांची चव आणि गुणवत्ता तशीच टिकून आहे. भारतात अनेक ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत. पेढ्याची जन्मभूमीच मथुरा ही आहे. उत्तरेतून ठाकूरराम रतन सिंह यांनी हे पेढे दक्षिणेत धारवाड येथे आणले. त्यांना धारवाडी पेढे म्हणून ओळखल जात.महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणचे पेढे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यात कोल्हापूरचे फिक्के पेढे, कुंथलगिरीचे पेढे, वाडीचे पेढे व खूप काही. मात्र इतर पेढ्यांच्या तुलनेत सातारचे पेढे हे खवा जास्त भाजल्यामुळे भुरकट दिसतात. कमी साखर हे या पेढ्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. परिणामी हा पेढा सहा ते आठ दिवस सहज टिकतो. सातारच्या कंदी पेढ्याची सिक्रेट रेसिपी म्हणजे हे पेढे डबल भाजलेले आहेत, हे पेढे सह्याद्रीतल्या रानातला चारा खाणाऱ्या गाई म्हैशीपासून बनलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे इथल्या पेढ्यांमधेय सातारच्या माणसांचा स्वॅग मिक्स झालाय. या सगळ्या मुळे सातारच्या पेढ्याचा ब्रँड जगात फेमस झालाय.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥ माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन जगत असताना अनेक माणसं भेटत असतात. त्यातील सर्वजण एक सारखे विचाराचे असतील असेही नाही. सोबत ते आपल्याला समजून घेतीलच असेही नाही. त्यातील काही माणसं मार्गदर्शक, दिशादर्शक असतात तर काहीजण व्यावसायिक, चालाख व अति स्वार्थी व्यापारी असतात म्हणून जरा सावध रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 मार्च 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛟 *_केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) स्थापना दिवस_*••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ६९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९८: भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद**१९७७: सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.**१९७२: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ’सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.**१९५२: केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला**१९२२: प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना शिक्षा झाली.**१९१५: गांधीजींनी शांतिनिकेतन मध्ये स्वावलंबनाचे धडे सुरू केले* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: मंगेश गंगाधर सावंत -- कवी* *१९९४: गायत्री दातार -- मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री**१९९३: प्रनूतन मोहनीस बहल -- अभिनेत्री* *१९९०: प्रितम सोन्याबापू पवळ(प्रेमकवी)-- प्रसिद्ध कवी, पत्रकार* *१९८७: चिराग संदीप पाटील -- अभिनेता**१९८६: गुलाब रमेश बिसेन -- लेखक**१९८२: कृष्णा प्रल्हाद शिंदे -- कवी**१९८१: प्रा. डॉ. सुधाकर पंडितराव बोथीकर -- लेखक**१९८१: सतीश दराडे -- मराठीचे प्रसिद्ध कवी आणि गझलकार (मृत्यू: ८ सप्टेंबर २०२४ )**१९७९: उत्तम भास्कर चारोस्कर -- लेखक**१९७८: चिन्मय कोल्हटकर -- हार्मोनियम वादक आणि संगीतकार*. *१९७७: शिल्पा तुळसकर --- मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री* *१९७६: रमेश शिवाजी इंगवले -- कवी* *१९७५: अजित परब -- भारतीय संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार* *१९७४: प्रा. डॉ. घ.ना.पांचाळ -- कवी**१९७४: वीरभद्र गणपती मिरेवाड -- कवी लेखक* *१९७२: किरण विश्वनाथ भावसार -- कवी, बालसाहित्यिक**१९६६: संदिपान एकनाथ पवार -- कवी, लेखक**१९६६: डॉ. मुरारी सोपानराव काळे -- लेखक* *१९६४: प्रा. डॉ. विद्याधर देवदास बन्सोड -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५८: राजाराम सूर्यवंशी -- लेखक**१९५४: सदानंद भणगे -- प्रसिद्ध मराठी लेखक**१९५२: प्रा. अशोक बागवे -- मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी, गीतकार लेखक* *१९४९: पदमा खन्ना -- भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना* *१९४९: न्यायमूर्ति हेमंत लक्ष्मण गोखले -- पूर्व मुख्य न्यायाधीश**१९४९: मनोहर सदाशिव नाईक -- लेखक व्याख्याते (मृत्यू: १९ ऑक्टोबर २०२० )**१९४५: माधवराव शिवाजीराव शिंदे – केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज (मृत्यू: ३० सप्टेंबर २००१ )**१९४४: स्वाती बाळकृष्ण सामक -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९३९: असगरअली इंजिनिअर -- ज्येष्ठ लेखक प्रख्यात विचारवंत (मृत्यू: १४ मे २०१३ )* *१९३६:अॅड. सूर्यकांत जागोबाजी डोंगरे -- महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते ( मृत्यू: १९ जुलै २०१४ )**१९२९: कविवर्य मंगेश पाडगावकर -- मराठीतील नामवंत कवी (मृत्यू: ३० डिसेंबर २०१५ )**१९२६: सखाराम कृष्ण देवधर -- ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (मृत्यू: ४ जानेवारी १९९७ )**१९१८: ’स्वरराज’ छोटा गंधर्व (मृत्यू: ३१ डिसेंबर १९९७ )**१९१६: शरदचंद्र गोपाळराव टोंगो -- विदर्भातील लेखक तसेच पत्रकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९ )* *१९१३: माधव गोपाळ देशमुख -- समीक्षक( मृत्यू: २४ जून १९७१ )**१९१०: मोहंमद सादिक -- ब्रिटिशकालीन भारतातले हिंदी चित्रपट दिग्दर्शक(मृत्यू: ३ ऑक्टोबर १९७१ )**१९०४: रघुनाथशास्त्री गोपाळ कोकजे-- लेखक (मृत्यू: १९७६ )**१८७१: नारायण दाजीबा वाडेगावकर -- संस्कृत, व्याकरणशास्त्राचे भाष्यकार (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९५० )**१८६३: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज,सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती,विधवा विवाहाला संमती दिली.(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३९ )*🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: श्रीकृष्ण बेडेकर -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक संपादक (जन्म: ६ डिसेंबर १९४४ )* *_१९९९: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार (जन्म: २७ फेब्रुवारी १९१२ )_**१९९०: प्रा. बा. र. देवधर -- संगीत तज्ज्ञ, गुरुवर्य (जन्म: ११ सप्टेंबर १९०१ )* *१९८५: कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव (जन्म: २४ सप्टेंबर १९११ )**१९८४: इंदर सेन जोहर(आयएस जोहर) -- भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक (जन्म: १६ फेब्रुवारी १९२० )* *१९७१: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (जन्म: ४ नोव्हेंबर १८९४ )**१९५९: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं.मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (जन्म: १३ नोव्हेंबर १८७३ )**_१८९७: सावित्रीबाई फुले –भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका (जन्म: ३ जानेवारी १८३१ )_**१८७२: जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (जन्म: २२ जून १८०५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, २ कोटी ५२ लाख महिलांना हप्त्याचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीत पहिले ब्राह्मण भवन आणि वसतिगृह, गुढीपाडव्याला होणार समाजार्पण; 500 विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात पहिलं विवाहपूर्व समुपदेशन व संवाद केंद्र नाशिक मध्ये सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कुंभमेळ्यात खादी उत्पादनाची विक्रमी विक्री, 12 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मसूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लागू, पिवळ्या वाटण्यास मुदतवाढ - केंद्र सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 4 विकेट्स ने हरवून भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, कर्णधार रोहित शर्मा ठरला मॅन ऑफ दि मॅच*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दत्तप्रसाद पांडागळे, नांदेड जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद👤 शिवराज विठ्ठल सावंत, शिक्षक, सिंधुदुर्ग👤 वीरभद्र मिरेवाड, शिक्षक तथा कवी,नायगाव👤 तुळशीराम सिरमलवार, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नवाथे, शिक्षक, बिलोली👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 गायत्री यनगंदलवार, शिक्षिका, धर्माबाद👤 साईनाथ शिरपुरे, भाजपा कार्यकर्ते, धर्माबाद👤 शिवप्रसाद जाधव👤 माधव आप्पा पडोळे👤 ऍड. शिवाजी जाधव👤 रमेश यंगे👤 संतोष पवार👤 उमाकांत बनगडकर👤 पवन पाटील ढगे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*बत्तीस सैनिक तुटून पडतात**बारीक तुकड्यात पाणी मिसळते**एक महाराणी मात्र मजेत**आस्वाद त्यांचा आनंदाने घेते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - दात••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञान , आळस आणि अंधश्रद्धा या तीन गोष्टीमुळे माणसाची अधोगती होते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेने कोणाला पहिले 'ब्रँड ॲम्बेसेडर' नियुक्त केले आहे ?२) जगात सर्वात जास्त खजूर कोणत्या देशात पिकतो ?३) बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जाई ?४) 'क्षय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जहागीर आर्ट गॅलरी' कोणत्या शहरात आहे ? *उत्तरे :-* १) विद्या बालन, अभिनेत्री २) इजिप्त ३) अंबाजोगाई ४) झीज, ऱ्हास ५) मुंबई*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *टेस्ट ट्युब बेबी म्हणजे काय ?* 📙**************************गर्भाशयाबाहेर कृत्रिम गर्भधारणा घडवुन आणल्याने वंध्यत्व असलेल्या बर्याच स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. कृत्रिम गर्भधारणा होऊन मुल जन्माला आले ते सर्वप्रथम इंग्लंडमध्ये. १९७८ मध्ये इंग्लंड येथे एडवर्ड आणि स्टेप्टो यांनी कृत्रिम गर्भधारणेने मुल जन्मल्याची माहिती जगाला दिली. १९८६ पर्यंत जगात ११००० मातांमध्ये यापद्धतीने गर्भधारणा झाली होती. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा पद्धतीने जन्माला येणार्या मुलांना टेस्ट ट्युब बेबी असे म्हटले जाते. या पद्धतीत काय करतात ते अाता पाहु. सर्वप्रथम स्त्रीच्या बिजांडातुन बीज काढले जाते. तिच्या पतीच्या शुक्राणुबरोबर नियंत्रित अशा प्रयोगशाळेतील परिस्थितीत त्या बीजाचा संयोग घडवुन आणला जातो. नंतर हे फलन झालेले अंडे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. तेथे ते रुजते व त्यानंतर नैसर्गिकरीत्या जशी वाढ होते, त्याप्रमाणेच गर्भाची वाढ होते. प्रसूतीही नेहमीप्रमाणे होते. मूल ९ महिने ९ दिवस परीक्षानळीत वाढत नाही; हे आता तुमच्या लक्षात आले असेलच.मासिक पाळीच्या चक्रात बीजांडातुन स्त्रीबीज बाहेर येते. ते गर्भाशयाच्या दोन नलिकांद्वारे ओढुन घेतले जाते. नंतर या नलिकांमध्ये शुक्राणु व स्त्रिबीज यांचे मिलन होते. या नलिका जर रोगग्रस्त वा खराब झालेल्या असतील, तर स्त्रीला वंध्यत्व येते. अशा वंध्यत्वात टेस्ट ट्युब बेबी या पद्धतीचा खुपच उपयोग होतो व मातृत्वाला पारख्या होणार्या स्त्रियाही मुलाला जन्म देऊ शकतात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें ऐसें केलें ॥१॥ उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥ प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥ नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेल्या नि:स्वार्थ कार्याविषयी व परखडपणे मत व्यक्त करताना आपल्या मागे, पुढे निंदा, चुगली,टिंगल, टवाळी होत असेल किंवा आपल्यावर मोठ्याने हसत असतील तर तो, आपल्यासाठी आशीर्वाद समजावा. कारण ते, सर्व कार्य करण्याची तसेच ह्या फालतू गोष्टी कडे लक्ष न देण्याची आपल्याला योग्य ती कला जमलेली असते. आणि एका अर्थाने बघितले तर..ते काम पाहिजे तेवढे सोपे नाही. आणि ती कला प्रत्येकाला जमेलच असेही नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चोर आणि राजा*गौतम बुद्धा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने गौतम बुद्धाना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" बुद्ध म्हणाले"तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल". थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच गौतम बुद्धानां म्हणाला " तो बघा आजून एक चोर आला", गौतम बुद्ध म्हणाले "तो राजा आहे." मुलगा गौतम बुद्धाना म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे." गौतम बुद्ध म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे." "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत, ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1R3G1XFbNg/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_आंतरराष्ट्रीय महिला दिन_* 🏵️•••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ६७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले**१९५७: घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले**१९४२: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली**१९११: आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.**१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना**१६७३: शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा किल्ला ताब्यात घेतला*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: हरमनप्रीत कौर -- प्रसिद्ध भारतीय महिला क्रिकेट खेळाडू* *१९८०: सुनिता झाडे -- लेखिका, संपादिका* *१९७४: फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार**१९७२: सारिका राजेंद्र सोनजे -- कवयित्री, नाट्यकलावंत* *१९७१: वंदना निशिकांत ढवळे -- बाल साहित्यावर विपुल लेखन करणा-या लेखिका**१९६१: मालविका यशवंत देखणे -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: प्रा. डॉ. श्रीधर (राजा) दीक्षित -- प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे पूर्व अध्यक्ष व प्रमुख संपादक**१९५४: गणपत बलवंत व्यास -- कवी, लेखक* *१९५४: दिगंबर कामत -- गोव्याचे माजी मुख्यमंत्री* *१९५३: प्रा. गंगाधर गिते -- लेखक* *१९५३: वसुंधरा राजे शिंदे -- राजस्थान राज्याच्या पूर्व मुख्यमंत्री* *१९५३: विठ्ठल साठे -- लेखक, कादंबरीकार**१९५१: माधवी ओंकार घारपुरे -- प्रसिद्ध लेखिका* *१९३१: मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (मृत्यू: १३ जुलै २०१० )**१९३०: चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल १९७६ )**१९२८: प्रा. वसंत अनंत कुंभोजकर -- शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक**१९२१: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९८० )**१९१८: इंदुमती पारीख -- व्यवसायाने डॉक्टर , बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: १७ जून २००४ )**१८९३: दामूअण्णा बापूशेठ मालवणकर -- मराठी चित्रपट-नाटकांतून विनोदी भूमिका करणारे नट(मृत्यू: १४ मे १९७५ )* *१८८१: पंडित अनंत(अंतुबुवा) मनोहर जोशी -- हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्याल -शैलीचे भारतीय गायक (मृत्यू: १२ सप्टेंबर १९६७ )**१८७९: ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ (मृत्यू: २८ जुलै १९६८ )**१८६४: हरी नारायण आपटे – प्रसिद्ध कादंबरीकार (मृत्यू: ३ मार्च १९१९ )**१८३३: विश्वनाथ मंडलिक -- मुंबईतील प्रख्यात, वकील, लेखक (मृत्यू: ९ मे १८९९ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: सर जॉर्ज मार्टिन -- संगीत निर्माते (जन्म: ३ जानेवारी १९२६ )**२०१५: प्रा. मधुकर नारायण लोही -- ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: २४ मे १९२३ )**२००४: सुशांत रे तथा सिद्धार्थ रे - मराठी सिने-नाटकातील एक अभिनेता (जन्म: १९ जुलै १९६३ )**१९९४: देविका रानी -- हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री(जन्म: ३० मार्च १९०८ )**१९५७: बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: २४ ऑगस्ट १८८८ )**१९४२: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८ )**१७०२: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ नोव्हेंबर १६५० )* *_जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक महिला दिनानिमित्त प्रासंगिक लेख*जागतिक महिला दिन आणि ग्रामीण महिला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शाहिरा सीमा पाटील यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील माता रमाई आंबेडकर पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींचा गुजरात दौरा, काँग्रेस कार्यालयात बैठक, नेते आणि वॉर्ड अध्यक्षांसोबत 9 तासांत 5 बैठका घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान विद्या लक्ष्मी शिक्षण योजनेला दिली मंजुरी, योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दिले जाईल शैक्षणिक कर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेची रक्कम मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात एक लाखा हुन अधिक होर्डिंग्ज हटवले - उदय सामंत यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कारासाठी भारतीय खेळाडू शुभमन गिल यांना नॉमिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साहेबराव बोणे, विशेष शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी पा. कदम चिरलीकर👤 विकास खानापूरकर, शिक्षक, धर्माबाद👤 श्रीनिवास पा. भुतावळे👤 शरणप्पा नागठाणे, साहित्यिक, लातुर👤 संभाजी पाटील , शिक्षक,चाळीसगाव👤 मारोती भोसले, शिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 13*मी जन्मानंतर येतो**मृत्यूसोबत जातो**जेवताना मदत करतो**रागात घासला जातो**ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. लिना सुपारेजि. प. प्रा. शाळा सुरजखोड जि. नांदेडकालच्या कोड्याचे उत्तर - हवा, वायू••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या कोणत्याही गोष्टींचा त्रास इतरांना होणार नाही याची जाणीव सतत असावी.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अनंत मुकेश अंबानी यांचा ड्रीम प्रोजेक्ट *वनतारा ( वन्यजीव संरक्षण केंद्र )* कोठे आहे ?२) नुकतेच वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा'चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?३) वन्यजीव संरक्षण केंद्र 'वनतारा' किती एकरमध्ये पसरलेला आहे ?४) अमेरिका या देशाची कोणती अधिकृत भाषा होणार आहे ?५) 'जागतिक महिला दिवस केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) जामनगर, गुजरात २) नरेंद्र मोदी ३) ३००० एकर ४) इंग्रजी ५) ८ मार्च*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समतोल आहार म्हणजे काय ?* 📙 **************************आपला आहार समतोल असावा, चौरस असावा हा उपदेश ऐकून आपले कान किटले असतील. 'समतोल' म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे.समतोल आहार म्हणजे काय ? हे समजण्यासाठी प्रथम आहारात कोणते घटक असणे आवश्यक असते, हे आपण पाहू. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी हे अन्नातील सहा प्रमुख घटक होत. कार्बोदके शरीराला ऊर्जा पुरवितात. प्रथिने शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा मिळते, तसेच शरीराच्या महत्त्वाच्या क्रियाप्रक्रियांना मदत होते. अ, ब, क, ड, इ तसेच के ही जीवनसत्त्वे आपल्याला अत्यंत अल्प प्रमाणात लागतात. पण ती मिळाली नाही तर अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे सोडियम क्लोराइड सारखे हे क्षारही जगण्यासाठी आवश्यक असतात. पाणी हे तर साक्षात जीवनच ! शरीराच्या वचनांपैकी सुमारे ६४% वजन पाण्याचेच असते. हे सर्व घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण, रातांधळेपणा, मुडदूस, रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, अशक्तपणा, गलगंड, रक्तक्षय इ. कमी पोषणामुळे होणारे आजार वा लठ्ठपणासारखे अतिपोषणामुळे होणारे आजार होऊ शकतात. हे टाळावयाचे असल्यास समतोल आहार घेणे आवश्यक ठरेल. ज्या आहारात वर वर्णन केलेले सर्व घटक योग्य प्रमाणात असतील त्यास समतोल आहार असे म्हणतात. योग्य प्रमाणात म्हणजे व्यक्तीला आवश्यक असलेली ऊर्जा त्यातून मिळाली पाहिजे. जीवनसत्वे, क्षार, पाणी मिळाले पाहिजे. खेरीज अनपेक्षित वा आकस्मित प्रसंगासाठी जसे आजार, अपघात यासाठी अतिरिक्त पोषणही त्याद्वारे मिळायला हवे. एकूण ऊर्जेपैकी ६५ ते ७०% कार्बोदकातून, १५ ते २५ % स्निग्ध पदार्थांतून तर ५ ते १५% प्रथिनांपासून मिळावी. समतोल आहाराचा आपण अंगीकार केला तर निरोगी जीवनाकडे आपली वाटचाल सुरू राहील.आपण रोजचा आपला आहार बघितला तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी अशा कार्बोदके अधिक असलेल्या अन्नपदार्थांसोबत डाळी, भाजीपाला, तेल, तूप या गोष्टी; तसेच मांस, मासे, दूध, अंडी असे प्राणीज पदार्थ आपण वापरात आणत असतो. हे सर्व अन्नपदार्थ वेगवेगळे परिपूर्ण नसतात. परंतु यातील दोन तीन पदार्थ एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते. उदाहरणार्थ नुसत्या भाताऐवजी वरण-भात, डाळ-तांदळाची खिचडी, वरण- भाकरी, इडली-सांबार इत्यादी पदार्थांमुळे आहार परिपूर्ण होतो.*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझ्या दाखवीं मनातें । मग तुझ्या चरणातें न विसंबें ॥१॥ कासया शिणविसी थोडिया कारणें । काय तुझें उणें होईल देवा ॥२॥ चातकाची तहान पुरवी जळधर । काय त्याची थोरी जाऊ पाहे ॥३॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहोळा । काय त्याच्या कळा न्य़ून होती ॥४॥ कूर्मीं अवलोकीं आपुलिया बाळा । काय तिच्या डोळां दृष्टि नासे ॥५॥ नामा म्हणे देवा तुझाचि भरंवसा । अनाथा कुंवसा होसी तूंचि ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी व्यक्ती, फार मोठ्या आजारातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते की, मला पुनर्जन्म मिळाला आहे. कदाचित हे विचार योग्य असू शकतात. पण माणसाचा पुनर्जन्म खऱ्या अर्थाने त्याच दिवशी होतो ज्या वेळी त्याच्यासोबत धोका होतो आणि एवढेच नाही तर त्याला बाजूला करण्यासाठी कटकारस्थान रचले जाते ही सर्व परिस्थिती जाणून ती व्यक्ती, पुन्हा एकदा मोठ्या हिंमतीने जगून आपले विचार असोत किंवा कार्य नित्यनेमाने करत सत्याला समर्पीत होऊन जगत असते. आणि त्याच्या याच पुनर्जन्मामुळे आणि जगण्यातून अनेकांना नवी दिशा मिळत असते.म्हणून माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. शेवटी फुलांवरून चालायला अनेकजण असतात मात्र काटेरी वाटेवर एकट्यालाच चालावे लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हरिण व कोल्हा*एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 मार्च 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2024/03/world-womens-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_ या वर्षातील ६६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.**२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.**२००५: महिलांना मताधिकार मिळावा म्हणून कुवेत मध्ये संसदेसमोर प्रदर्शन* *१९४७: जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस कार्यकरणीचा राजीनामा दिला**१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याला टेलिफोनचे पेटंट मिळाले.* 🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: रोहन बेनोडेकर -- लेखक* *१९८८: आदर्श आनंद शिंदे -- मराठी गायक, भीमगीतांसाठी प्रसिद्ध* *१९८४: नितीन अरुण थोरात -- प्रसिद्ध कादंबरीकार, बालसाहित्यिक, स्तंभलेखक, पत्रकार, उपसंपादक, कथालेखक* *१९८२: नितीन साहेबराव वायाळ -- लेखक**१९७६: गणेश शिवाजी मरकड -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा उपजिल्हाधिकारी* *१९६९: साधना सरगम -- भारतीय प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९६४: छाया भालचंद्र उंब्रजकर -- कवयित्री, लेखिका* *१९५८: अनिल शर्मा -- प्रसिद्ध दिग्दर्शक**१९५५: अनुपम खेर – प्रसिद्ध चित्रपट अभिनेता**१९५५: ज्योत्स्ना आफळे --कवयित्री, लेखिका* *१९५२: सर विवियन रिचर्ड्स – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू**१९४९: गुलाम नबी आझाद -- राजकारणी माजी केंद्रीय मंत्री* *१९४२: वसंत काशिनाथ गोडबोले -- संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, हस्ताक्षरतज्ञ* *१९४०: प्रा. वसंत सुदाम वाघमारे -- कवी* *१९३८: मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे -- दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक (मृत्यू: ६ ऑगस्ट २०२० )* *१९३४: नरी कॉन्ट्रॅक्टर – भारताचा यष्टिरक्षक**१९३३: आत्माराम कृष्णाजी सावंत -- मराठीतले लेखक, नट,नाटककार, दिग्दर्शक, पत्रकार (मृत्यू: ४ मार्च १९९६ )* *१९३१: प्राचार्य डॉ. मधुकर सुदाम पाटील -- समीक्षक* *१९२८: डॉ. केशव रामराव जोशी -- संस्कृत पंडित, तत्त्वचिंतक (मृत्यू: १२ जून २०१३ )**१९२५: रवींद्र केळेकर -- कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक,२००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते(मृत्यू: २७ ऑगस्ट, २०१० )**१९१८: स्नेहलता दसनूरकर -- मराठी लेखिका, शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू: ३ जुलै २००३ )**१९१३: डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे -- व्यवसायाने डॉक्टर असतानाही,मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या लेखिका (मृत्यू: ८ ऑगस्ट १९९८ )**१९११: सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार (१९६४) विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ )**१९०३: रामचंद्रशास्त्री दत्तात्रेय किंजवडेकर -- संस्कृत पंडित (मृत्यू: २० एप्रिल १९४१ )**१९०२: शंकर भास्कर जोंधळेकर -- लेखक* *१८९६: यशवंत गंगाधर लेले -- नाटककार, नाट्यसमीक्षक**१८७०: नारायण कृष्ण गद्रे -- मराठी लेखक आणि चरित्रकार ह्यांनी नाटक,कविता, कादंबरी, चरित्र, इतिहास अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन केले आहे (मृत्यू: १४ जुलै १९३३ )**१८४९: ल्यूथर बरबँक – महान वनस्पतीतज्ञ (मृत्यू: ११ एप्रिल १९२६ )**१७९२: सर जॉन विल्यम हर्षेल – ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा संस्थापक (मृत्यू: ११ मे १८७१ )*🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६ )**२००३: योगीराज मनोहर हरकरे -- अध्यात्मिक क्षेत्रातील योगी पुरुष व वैदिक विश्वचे संपादक (जन्म: २२ डिसेंबर१९१४ )**२०००: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१ )**१९९६: नीळकंठ जनार्दन कीर्तने -- मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य टीकाकार, चिकित्सक आणि साक्षेपी संशोधक (जन्म: १ जानेवारी १८४४ )**१९९३: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (जन्म: २६ ऑक्टोबर १९०० )**१९६१: गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री,भारतरत्न (१९५७)(जन्म: १० सप्टेंबर १८८७ )**१९२२: गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या (जन्म: १५ ऑगस्ट १८६७ )**१६४७: दादोजी कोंडदेव -- शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक (जन्म: १५७७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक महिला दिनानिमित्त* कर्तृत्ववान महिलांची संघर्षगाथाभारतातील पहिल्या महिला न्यायाधीश - फातिमा बीबी तसेचभारतातील दुसरी महिला राष्ट्रपती - महामहिम द्रौपदी मुर्मु ..... यासह विविध लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर्षिल ट्रेकला दाखवला हिरवा झेंडा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'नमो ड्रोन दीदी' योजनेचा लाभ नलिनी देवरे बनल्या आत्मनिर्भर शेतकरी मदतनीस !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिला दिनानिमित्त राजस्थानमध्ये राहणाऱ्या महिलांना राज्य सरकारने दिले मोठे गिफ्ट, राजस्थान सरकारने संपूर्ण राजस्थानमध्ये रोडवेज बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची केली घोषणा *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पशुधन आरोग्य आणि आजार नियंत्रण अभियानाला केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रीड यांची भारत भेट । व्यावसायिक शिष्टमंडळासोबत महत्त्वपूर्ण करार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गोवर्धन शिंदे, शिक्षक, नांदेड👤 विश्वनाथ स्वामी👤 मारोती लोणेकर👤 मनोज घोगरे👤 शिवम जाधव👤 अविनाश मोटकोलू*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 12*मी सर्वत्र आहे, पण कोणाला दिसत नाही**माझ्याशिवाय कुणाचे पान ही हलत नाही**मी कोण ओळखा पाहू*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - सौ. लिना सुपारेजि. प. प्रा. शाळा सुरजखोड जि. नांदेडकालच्या कोड्याचे उत्तर - श्वास••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मस्तुतीने माणूस स्वतःचीच फसवणूक करून घेत असतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजचा क्रमांक - 1800 वा१) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?२) भारतातील कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत ?३) नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात भारतीय नद्यांमध्ये असणाऱ्या डॉल्फिनची संख्या किती आहे ?४) प्रसिद्ध गीर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?५) तिबेटी भाषेत माऊंट एव्हरेस्टला काय म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) डॉल्फिन २) उत्तरप्रदेश ३) ६,३२७ डॉल्फिन ४) गुजरात ५) माऊंट ऊमोलांग्मा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⏰ *वेळ* ⏰ **************वेळ पाळणे, घड्याळाबरहुकूम चालणे, दिवसाच्या चोवीस तासांतील वेळेचा नेमकेपणा साधणे याची खरी गरज जगामधील संपर्कसाधने वाढली, त्यावेळीच वाटू लागली. अन्यथा तोपर्यंत स्वतःचे गाव, पंचक्रोशीतला परिसर व तेथील घडामोडी या एकमेकांच्या सोयीनेच व्हायच्या. गावातील, देवळातील वा चर्चमधील टोले हेच घड्याळ, आसपासच्या लोकांना मारलेल्या हाका व केलेली सामुदायिक कामे हेच दिवसातील वेळ पाळण्याचे बंधन शतकानुशतके चालू होते. घड्याळाची निर्मिती, वापर सुरू झाला, तरी त्याची गरज फारच मोजक्यांना वाटे. या गावाहून त्या गावाला जाणारी गाडी, तिच्या सुटण्याच्या व पोहोचण्याच्या वेळा यांतील अंतर कमी होत गेले; दूरध्वनी,, दूरचित्रवाणी, विमाने यांचा वापर सुरू झाला आणि वेळेबाबत जागरुकता वाढली गेली. याआधी जागरुकता होती; नव्हती, असेही नाही; पण त्याची गरज मोजक्यांनाच वाटत होती. त्यावर उपाय शोधला गेला १८८४ साली. सुर्याचे उगवणे मावळणे हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यावर अवलंबून आहे व त्याचे समान भाग केले, तर (दर पंधरा रेखांशांनंतर एक) एकूण चोवीस वेगवेगळ्या वेळांचे भाग निश्चित केले गेले. शून्य अंश रेखांशाची रेघ म्हणजे जागतिक वेळेचा भाग. 'ग्रीनविच मीन टाईम' (GMT) या नावाने हा स्टॅंडर्ड वेळेचा भाग ओळखला जातो. तर तेथपासून दोन्ही बाजूंना म्हणजे पूर्वेला जावे, तसे दर पंधरा रेखांशांनंतर एक तास घड्याळ पुढे जाते. याउलट पश्चिमेला प्रवास करताना एक तास घडय़ाळ मागे केले जाते. या पद्धतीने प्रवास कसाही केला - चालत, मोटारने, विमानाने, अंतराळयानाने पण रेखांशांची मर्यादा बदलली की, तेथील माणूस काय वेळ वापरत असेल, याचा नेमका अंदाज आपल्या स्वतःच्या हातातील घडाळ्यावरूनच बांधता येतो. भारतातील वेळ व पाकिस्तानातील वेळ यांत एक तासाचा फरक आहे. तसेच म्यानमार व बांगलादेश यांच्या वेळेत व भारताच्या वेळेतही एक तासाचा फरक आहे. आता एखादा विमानाने पृथ्वीप्रदक्षिणेलाच निघाला, तर त्याच्यासाठी आणखीन एक प्रश्न उभा राहत होता, तो म्हणजे केवळ घड्याळ मागे पुढे करून भागत नव्हते, तर दिवसच बदलत होता. हा प्रश्न सोडवायला १८० अंश रेखांशावर सोय करण्यात आली. येथे जमीन नव्हती, म्हणजे समुद्रावर कोणी राहण्याचा प्रश्नच नव्हता. या प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करताना तारीख मागे करण्याची पद्धत पडली आहे किंवा याउलट केले जाते. घडाळ्यातील काटे दिवसातून दोनदा बाराची वेळ दर्शवतात; पण हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे, विमाने ही एक ते चोवीस तासांची पद्धत वापरतात. म्हणजे सकाळचे आठ वा रात्रीचे आठ असा गोंधळ न होता आठ व वीस या पद्धतीनेच वेळ सांगितली जाते. इंग्रजीत ए.एम. व पी.एम. असे म्हटले जाते. याचा अर्थ अँटीमेरिडीयम व पोस्टमेरिडियम म्हणजे सूर्य मध्यान्हाला येण्यापूर्वी वा नंतर असा आहे. हल्ली दूरचित्रवाणीवरून क्षणार्धात प्रक्षेपण जगभर दिसू शकते. यामुळे वेळेचे भान अधिकच आवश्यक आहे. ऑलिम्पिक खेळ, फुटबॉलची मॅच. महत्त्वाचा प्रसंग कोणत्या देशात किती वाजता होणार आहे, ते कळते; तरीही त्याची आपल्या इथली वेळ जर आपण ठरवू शकलो नाही, तर त्याला साक्षीदार होण्याची संधी कायम घालवून बसू. दुपारी तीन वाजता आई अमेरिकेतील मुलीला फोन करून तिची चौकशी करू लागली, तर झोपमोड झालेली, पहाटे तीन वाजता फोन वाजल्याने त्रासलेली मुलगीच आईशी फोनवर बोलू लागेल. वेळेचे भान हे घराघरात यामुळेच आवश्यक होत चालले आहे. स्वनातीत विमानाने प्रवास केल्यास दुपारच्या जेवणानंतर लंडन सोडले, तर त्याच दिवशी सकाळच्या नाष्ट्याला न्यूयॉर्क गाठता येते. जागतिक प्रवाशाला वेळेचे भान राखणे त्यामुळेच अत्यावश्यक ठरते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥ नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हवा अंगाला स्पर्शून जातो आणि त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. तरीही आपण त्याला बघू शकत नाही. कारण त्याला बघण्यासाठी आपल्याकडे तशी दूरदृष्टी नसते. तसंच समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या प्रती आपल्या मनात किती आदर, सन्मान आहे हे जाणून न घेता कोणाच्या सांगण्यावरून त्याचा अपमान करणे आपल्याला सहजपणे जमत असते.ही आजची वास्तविकता आहे. जसं वाऱ्याला बघण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी नसते तशीच दूरदृष्टी त्या व्यक्तीला जाणून घेण्याची नसते.हीच कमतरता आपल्यातील काही गुणांचा अंत करत असते. म्हणून जीवन जगत असताना आपल्यातही तेवढीच सत्यात ठेवणे गरजेचे आहे कारण, सत्याच्या वाटेवर चालणारी व्यक्ती कोणाचाही अपमान करत नाही हेच त्याच्यात महत्वाचे गुण असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जांभूळ आख्यान ही गोष्ट आहे द्रौपदीची..तिने आपद्धर्म म्हणुन पाच पतींशी विवाह केला..पण तरीही तिला पतिव्रता हा दर्जा दिला गेला..तिच्या पाच पतींनी आणखी वेगवेगळे विवाह केलेच..पण ते पुरुष होते त्यामुळे बहुपत्नीकत्व त्यांना परंपरेने बहाल केलं होतं.तर गोष्ट आहे द्रौपदीची..कुठल्या तरी समारंभाच्या वेळी कर्ण द्रौपदीच्या नजरेस पडला..तेव्हा तो पांडव आहे हे अर्थातच तिला माहिती नसणार.पण तरीही त्याचं देखणेपण पाहुन ती क्षणभर मोहीत झाली..आख्यानकार म्हणतात,” कर्णाला पाहुन द्रौपदीचं मन पाकुळलं ( पाघळलं).आख्यानकार आणखी पुढे म्हणतात की द्रौपदीला क्षणभर वाटुन गेलं की हा देखणा युवक सहावा पांडव असता तर?????आत्ता बारा महिन्यांची जशी विषम विभागणी झाली आहे त्याऐवजी ती सहा जणात दोन दोन महिने अशी झाली असती..अंतर्ज्ञानी कृष्णाच्या ही गोष्ट लक्षात आली..द्रौपदीच्या मनात परपुरुषाचा विचार येणं ही गोष्ट पांडवांच्या दृष्टीने धोक्याची होती..कारण द्रौपदी हे पांडवांना एकत्र बांधुन ठेवणारं सुत्र होतं.मग कृष्णाने वनविहाराचा बेत आखला..वनविहार झाल्यावर सर्वांना भूक लागली म्हणुन भीम फळं शोधण्यासाठी गेला..परंतु कृष्णाने आपल्या मायेने रानातली सर्व फळं नाहिशी केली..एका वृक्षावर एकुलतं एक जांभूळ शिल्लक होतं.भीमाने तेच तोडुन आणलं..त्या वनात कोणी एक ऋषी तप करीत होते..आणि बारा वर्षाचं तप पुर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी म्हणुन त्यांनी ते जांभूळ राखुन ठेवलं होतं असं शुभ वर्तमान कृष्णाने सर्वांच्या कानी घातलं..आता पांडवांच्यात घबराट पसरली..जांभूळ जाग्यावर दिसलं नाही तर ऋषींचा कोप होणार..कृष्णाने सांगितलं,की तुमच्यापैकी ज्याचं मन स्वच्छ आहे ,ज्याच्या मनात कधीच परपुरुषाचा/परस्त्रीचा विचार आलेला नसेल त्याने मनापासुन प्रार्थना करावी.जांभूळ आपोआप झाडाला जाऊन चिकटेल..म्हणजे आता तिथे द्रौपदीपेक्षा योग्य व्यक्ती नाहीच कोणी.सगळ्यांच्या नजरा आता द्रौपदीकडे..द्रौपदी मनातुन खजील.भयभीत.जांभूळ चिकटलं नाही तर तिच्या पातिव्रत्यावरच घाला..कारण काही क्षणापुरता का होईना पण कर्णाचा विचार तिच्या मनात आलाच होता..तिने मनोमन कृष्णाची करुणा भाकली,पुन्हा अशी चूक होणार नाही अशी मनोमन कबुली दिली आणि हात जोडुन प्रार्थना केली आणि काय आश्चर्य ?जांभूळ परत झाडाला चिकटलं..पण उलट्या बाजुने..द्रौपदीला तिच्या चुकीची सतत आठवण रहावी यासाठी कृष्णाने केलेली ही योजना..म्हणजे एका अर्थी उलटं जांभूळ हे पापाचं प्रतीक..म्हणुन त्याला देवाच्या पुजेत ,उपासाच्या फळामधे स्थान नाही..आख्यानकार आणखीही सांगतो, की जांभूळ खाल्लेलं लपवता येत नाही..जीभ जांभळी करुन सोडतं ते..थोडक्यात - केलेलं पाप लपत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 मार्च 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/12/astronomy.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *_राष्ट्रीय दंतचिकित्सक दिवस_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ६५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्कम करपात्र असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब**१९९९: जगप्रसिद्ध खजुराहो मंदिर समुहाच्या सहस्राब्दी सोहळ्याचे राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते उदघाटन**१९९८: विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर**१९९७: स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड**१९९२: ’मायकेल अँजेलो’ नावाचा संगणक विषाणू पसरण्यास सुरूवात झाली.**१९७५: इराण व इराक यांच्यात सीमाप्रश्नावर संधी झाली.**१९७५: मराठीतील पहिला राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता चित्रपट "श्यामची आई" मुंबईत प्रदर्शित**१९५३: जॉर्जी मॅक्सिमिलानोव्हिच सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.**१९४०: रशिया व फिनलंड मधे शस्त्रसंधी झाली**१९०५: शांतिनिकेतन येथे महात्मा गांधी व रवींद्रनाथ टागोर यांची पहिली भेट**१८४०: बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.**१७७५: सुरत येथे राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे आणि इंग्रज यांच्या तह झाला.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: जान्हवी कपूर -- हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९८१: सौरभ गोखले -- मराठी अभिनेता**१९६८: लक्ष्मण महादेव घागस -- लेखक, कवी* *१९६६: मकरंद देशपांडे -- रंगभूमीवरचा तसेच रुपेरी पडद्यावरचा नावाजलेला कलाकार, लेखक, दिग्दर्शक**१९६५: देवकी पंडीत – शास्त्रीय गायिका**१९६५: दादाजी भुसे -- मंत्री, शालेय शिक्षण विभाग म.रा.**१९५९: लेविन शाहुराव भोसले -- प्रसिद्ध लेखक* *१९५३: माधुरी तळवलकर -- प्रसिद्ध मराठी लेखिका**१९५२: पंडित राजाराम उर्फ राजा काळे-- भारतीय गायक,संगीतकार आणि भारतीय शास्त्रीय,आणि भक्ती संगीताचे अभ्यासक* *१९४८: राज एन. सिप्पी(राज सिप्पी)-- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९४१: डॉ. हेमंत लक्ष्मण विंझे -- व्यवसायाने डॉक्टर असलेले कवी, लेखक* *१९३७: वासुदेव नरहर सरदेसाई -- प्रसिद्ध मराठी गझलकार* *१९३६: माणिकलाल कोंडबाजी बारसागडे -- कवी, लेखक* *१९३४: डॉ.शशिकला जयंत कर्डिले -- प्रसिद्ध लेखिका,अनुवादक* *१९३४: मुरलीधर कापडी -- प्रसिद्ध दिग्दर्शक (मृत्यू: १२ ऑक्टोबर २००६ )* *१९२५: नयनतारा देसाई -- लेखिका* *१९१६: वसंत अंबादासराव तुळजापूरकर -- कवी* *१९०१: डॉ.श्रीनिवास नारायण बनहट्टी (श्री.ना. बनहट्टी) -- संशोधक, समीक्षक, संपादक (मृत्यू: २२ एप्रिल १९७५ )**१८९९: शिवराम लक्ष्मण करंदीकर -- चरित्र लेखक(मृत्यू: १७ जानेवारी १९६९ )**१४७५: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: श्रीकांत मोघे -- भारतीय चित्रपट आणि थिएटर अभिनेता (जन्म: ६ नोव्हेंबर १९२९ )* *२०१८: वसंत नरहर फेणे -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: २८ एप्रिल १९२८ )* *१९९९: सतीश वागळे – हिन्दी आणि मराठी चित्रपट निर्माते**१९९२: रणजित देसाई – सुप्रसिद्ध नामवंत मराठी साहित्यिक,’स्वामी’कार (जन्म: ८ एप्रिल १९२८ )**१९८७: इंदर राज आनंद -- हिंदी चित्रपटसृष्टीतील संवाद आणि पटकथा लेखक**१९८६: माधवराव खंडेराव बागल -- महाराष्ट्रातील सामाजिक-सुधारणा चळवळीतील कृतीशील कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत,लेखक आणि चित्रकार (जन्म: २८ मे १८९५ )* *१९८२: रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक,जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस (जन्म: ९ जुलै १९२१ )**१९८२: अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका (जन्म: २ फेब्रुवारी १९०५ )**१९८१: गोपाळ रामचंद्र परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक,नामवंत शास्त्रज्ञ,’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य( जन्म: १३ जानेवारी १८९७)**१९७३: पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (जन्म: २६ जून १८९२ )**१९६७: स. गो. बर्वे – कर्तबगार प्रशासक (जन्म: २७ एप्रिल १९१४ )* *१९५७: अमिया चक्रवर्ती -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता(जन्म: ३० नोव्हेंबर १९१२ )**१९०५: गोविंद शंकरशास्त्री बापट -- भाषांतरकार संस्कृतचे व्यासंगी पंडित (जन्म: ८ फेब्रुवारी१८४४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सूर्यमाला आणि ग्रह*सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्षल) व नेपच्यून (वरुण). प्लूटो हा त्याच्या शोधापासून (म्हणजेच १९३० पासून) सूर्यमालेतील नववा ग्रह मानला जातो...... चित्रासह पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मनुष्यबळ विकासावर मोदी सरकारचा भर, AI, स्टार्टअप, पर्यटन आणि आरोग्यात मोठी गुंतवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, आता प्रतिज्ञापत्रासाठी 500 ₹ शुल्क माफ, नागरिकांना दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक विमानतळासाठी नवा अध्याय ! HAL कडून नवीन धावपट्टीसाठी 200 कोटीची मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाकडून दिलासा ! 30 वर्षे जुन्या प्रकरणातील शिक्षेला तात्पुरती स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्य बँकेला 500 कोटीचे बॉण्ड वितरित करण्यास रिझर्व्ह बँकेची परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्राने साखर कारखान्यांना नाबार्ड किंवा NCDC मार्फत चार टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करावा - राजू शेट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमिफायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 60 धावाने केला पराभव, रविवारी भारतासोबत होणार अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक दगडे, सरपंच तथा पत्रकार बिलोली👤 सुरेश बावनकुळे, सहशिक्षक,भंडारा👤 गोविंद मानेमोड👤 अविनाश गायकवाड👤 दत्ताहरी शिवलिंग दुड्डे, धर्माबाद👤 माधव गोतमवाड👤 प्रा. सुरेश कटकमवार, नांदेड👤 राज शंकरोड👤 प्रकाश राजपोडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 11*जन्म मरणाच्या चक्रामध्ये**आहे हा एक लहानसा शब्द**घेत राहिलो सदैव तर जगतो**बंद झाल्यास होतो निःशब्द *उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - हृदय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही जीवनाची चतु:सूत्री आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) त्वचा खवल्यांनी आच्छादलेला असलेला एकमेव सस्तन प्राणी कोणता ?२) खवले मांजराला इंग्रजीत काय म्हणतात ?३) चीनच्या अंतराळ स्थानकाचे नाव काय आहे ?४) प्रतिष्ठेचा रणजी ट्रॉफी २०२५ कोणत्या संघाने पटकावले ?५) प्रसिद्ध तुळजाभवानी देवीचा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ? *उत्तरे :-* १) खवले मांजर २) Pangolin ३) तियांगोंग ४) विदर्भ ( तिसऱ्यांदा ) ५) धाराशिव/उस्मानाबाद*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🛰 कृत्रिम उपग्रह व त्याचा मागोवा सेकंदगणिक 🛰रॉकेट्सचा जनक गोडार्ड याने पहिले रॉकेट आकाशात सोडले, तेव्हा ते कसेकसे जाते आहे, कुठे पडणार आहे, याचा मागोवा चक्क दुर्बिणीतून घेतला गेला होता. त्यातही दिवसाउजेडी दोन उंच गेलेले रॉकेट शोधणे कठीण पडत होते.१९५७ साली पहिला उपग्रह अवकाशात गेला; पण ज्यावेळी त्याची कक्षा पृथ्वीच्या दुसऱ्या बाजुस जाई, तेव्हा त्याच्याशी संपर्क तुटत असे. १९६० साली यावर तोडगा म्हणून अमेरिका व रशिया या दोघांनीही आपापल्या मित्र राष्ट्रांतून संदेशग्रहणकेंद्रे उभारली. या विविध केंद्रांतून या उपग्रहांवर लक्ष ठेवणे त्यामुळे शक्य होऊ लागले. पण कसे ? त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारी गाडी सुरुवातीला पुण्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक केंद्र लक्ष ठेवेल, तर त्यानंतर गुजरातेतील एखादे केंद्र लक्ष देईल, तर राजस्थानमध्ये शिरल्यावर तिसरेच केंद्र यावर लक्ष केंद्रित करेल. या पद्धतीत जाशी रिले शर्यत असते, तसे लक्ष ठेवले जाई. काही दिवस तर असंख्य हौशी ज्योतिर्विद मंडळींनी या नोंदी करायला खूपच मदत केली.या तुलनेत आजची परिस्थिती विश्वासच बसणार नाही अशी आहे. उड्डाणाचे सुरुवातीचे अर्धे मिनिट व प्रत्यक्ष वातावरणामध्ये शिरताना म्हणजे अवकाशयान उतरताना चार मिनिटे सोडली, तर सतत मुख्य केंद्राशी थेट संपर्क असतो; मग अवकाशयान चंद्रावर असो, किंवा मंगळाच्या जवळ किंवा ग्रहमालेच्या पलीकडे चाललेले असो ! व्हाॅयेजर दोनचे उड्डाण २० ऑगस्ट १९७७ ला झाले. आज जवळपास ८००० दशलक्ष किलोमीटर प्रवास करून सूर्यमालेबाहेरील अवकाशात त्याने प्रवास सुरू केला आहे, पण त्याचे संदेश सतत ग्रहण केले जात आहेत. अजून कमीत कमी २५ वर्षे त्याचे संदेश आपल्याला मिळणार आहेत. एवढी प्रचंड झेप संदेशवहनात घेणे शक्य झाले आहे, ते विविध ठिकाणी, विविध कक्षांत, विविध उंचीवर काम करणाऱ्या उपग्रहांमुळेच.या उपग्रहांतील सध्या वापरला जाणारा प्रमुख उपग्रह म्हणजे TDRSS किंवा 'ट्रॅकिंग अँड डाटा रिले सिस्टीम सॅटेलाईट' होय. या उपग्रहातून अवकाशयानाकडे सतत संदेश पाठवणे, येणारे संदेश ग्रहण करून कंट्रोल टॉवरकडे पाठवणे एकाच वेळी केले जात असते. अमेरिकेतील ह्युस्टन व रशियातील कॅलिनीग्राद या मॉस्कोजवळील भागात प्रमुख नियंत्रणकेंद्रे काम करतात. त्यांना मिशन कंट्रोल्स असे म्हटले जाते. भारतातील असे केंद्र हसन येथे आहे.अवाढव्य हॉलमध्ये असंख्य कॉम्प्युटरच्या जंगलात चोवीस तास काम करणारे हे शास्त्रज्ञ अक्षरश: दर सेकंदागणिक आवकाशातील प्रत्येक यानाचा मागोवा घेत असतात. येणाऱ्या माहितीचा ओघ साठवून तिचे विश्लेषण करणे हे काम इतरत्र चालूच असते.असे सांगितले जाते की जमा केलेली माहिती इतकी प्रचंड असते की, अवकाशयान परतल्यावर तब्बल दोन दोन वर्षे त्यावर अनेकांना काम करावे लागते.पृथ्वीभोवती कृत्रिम उपग्रहांची सध्या गर्दी झाली आहे. त्यांची संख्या नक्की करणे कठीण व्हावे, इतकी ती मोठी आहे. पण पहिला उपग्रह 'स्फुटनिक' १९५७ साली सोडला गेला. त्याआधी मात्र पृथ्वीला एकच उपग्रह होता, तो म्हणजे चंद्र. स्पुटनिक हा रशियाने सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह.यानंतर झपाट्याने प्रगती होत गेली. १९६२ साली 'टेलस्टार' या उपग्रहाने अटलांटिक सागरावरून पलीकडे टीव्हीची चित्र पोहोचवली. यानंतर उपग्रहांचा दळणवळणासाठी सर्रास उपयोग सुरू झाला. भारतात सर्वत्र दूरचित्रवाणीचे जाळे पोहोचवण्याचे काम इन्सॅटच्या मालिकेने केले आहे. ते जगभर हे काम 'जिओस्टेशनरी उपग्रह' करतात. या प्रकारचे उपग्रह ३६,०००० किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती भ्रमण करतात. त्यांचा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचा काळ व पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा काळ सारखाच असतो, त्यामुळे हे या उंचीवर एकाच ठिकाणी असल्याप्रमाणे दिसतात. याचाच फायदा घेऊन या उपग्रहाच्या कक्षेतील सर्व शहरांकडे एका ठिकाणाहून पाठवलेले संदेश प्रक्षेपित केले जातात.उपग्रहांचा वापर दळणवळणाप्रमाणेच हेरगिरीसाठीही केला जातो. उपग्रहावरून घेतलेल्या फोटोमध्ये शंभर बाय शंभर मीटरमध्ये होणारे पृथ्वीवरील बदल स्पष्टपणे नोंदले जातात. स्वाभाविकच मोठी बांधकामे, अण्वस्त्रांच्या हालचाली, तटबंदी यांची पूर्ण नोंद करता येते; तीसुद्धा शत्रूच्या नकळत.उपग्रहांतर्फे पीक पाहणी, जंगल पाहणी, भूप्रदेश आराखडे तयार करणे ही कामे सहजगत्या पार पडतात. इन्फ्रारेड पाहणीमुळे आणखीही खूप गोष्टींचा खुलासा होतो. पिकांवर पडणार्या किडी, जमिनीखालील पाणी व प्रवाह यांचा सुद्धा खुलासा होऊ शकतो.उपग्रहांची निर्मिती ही तशी सहजशक्य असलेली गोष्ट झाली आहे, पण उपग्रह अवकाशात पाठवणे ही मात्र आजही मोजक्या राष्ट्रांचीच अखत्यारी आहे. काही हजार किलोंचे वजन अवकाशात पाठवण्याजोगे क्षेपणास्त्र तयार करणे ही त्यातील गोम आहे.उपग्रहांना मिळणारी ऊर्जा सौरऊर्जाच असते. उपग्रह अवकाशात स्थिर झाल्यावर त्याचे पंख उघडतात, या पंखांवर सौरऊर्जा ग्रहण करून वीज देणारे घटक असतात. अनेकदा हे पंख उघडण्यातच अपयश येते. हीच फार मोठी अडचण ठरून ऊर्जेविना उपग्रहाचे काम बंद पडते, पण सहज पंख उघडले, तर उपग्रह अनेक वर्षांपर्यंत बिनतक्रार काम देत राहतो.उपग्रहांचा मोठा फार मोठा उपयोग हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी झालेला आहे. जगभरचे ढगांचे फोटो, हवेतील दाबातील फरक उपग्रहांद्वारे झटकन समजतात. व त्यावरून धोक्याचा इशारे देता येतात. भारतीय दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवर याच छायाचित्रांच्या सहाय्याने रोज रात्री हवामानखाते अंदाज व्यक्त करत असते.उपग्रहाच्या काम करणाऱ्या दुर्बिणी हा एक वेगळाच विषय आहे. गरजेप्रमाणे विविध पद्धतींने काम करणाऱ्या दुर्बिणी आजवर अवकाशात पाठवल्या गेल्या आहेत.उपग्रहांमार्फत काम करणाऱ्या काही प्रसिद्ध दुर्बिणी पुढील प्रमाणे :-क्ष किरण : उहुरू (१९७२)आइन्स्टाइन (१९७८)रोसॅट (१९८८)अतिनिल : कोपर्निकस (१९७३)अधोरक्त : आयरॅस (१९८३)दृष्यप्रकाश : हिप्पोर्कास (१९८९) हबल (१९९०)जेम्स वेब (आगामी टेलिस्कोप)‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥ तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥ मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण । तया नारायणा गति कैसी ॥३॥ नामा म्हणे कैसें केशवा सांगणें । अज्ञानी ते नेणें कवणेंपरी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा,कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *दुकानदार व हत्ती* एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्यला जीव लावत असे. हत्ती रोज साकळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फुले सोंडेत घेऊन मिरवत-मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्तीज्याप्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत.लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता. रोजच्या सवयी प्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्यावजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदारने कारण नसतानाही स्वताचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखवला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकविण्याचे ठरविले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढयाच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला .हत्तीने ते घाणरडे पाणी दुकानदार , फुले आणि हारांवर फवारले. दुकानदाराचा सगळा माल खराब झाला. त्याला स्वत:ची चूक कळून आली. मात्र त्यसाठी त्याला मोठी किमंत मोजावी लागली. तात्पर्य - जसास तसे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 मार्च 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील ६४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण**१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड**१९९८: नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन**१९९७: ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन* *१९६६: मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत**१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.**१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.**१८५१: ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना**१६६६: शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.**१५५८: फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: चंद्रकांत थावरु राठोड -- कवी, लेखक* *१९७४: हितेन तेजवानी -- दूरचित्रवाहिनी माध्यमातील भारतीय अभिनेता**१९७३: श्रीमंत सखाराम ढवळे -- कवी* *१९७२:प्रा. शर्मिला सुनील गोसावी -- कवयित्री, लेखिका* *१९७०: डॉ. मिलिंद विनायक बागुल -- कवी, लेखक, संपादक* *१९६७: अंजली सत्यपाल श्रीवास्तव -- कथा लेखिका* *१९६७: प्रा. डॉ. रामनाथ गंगाधर वाढे -- लेखक, संशोधक* *१९६५: गजानन माधवराव माधसवार -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६३: सौरभ शुक्ला -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९५९: शिवराजसिंह चौहान -- केंद्रीय मंत्री,मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९५८: म. नास्सर -- भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, डबिंग कलाकार, गायक* *१९५७: संगीता बापट -- कवयित्री, गायिका, संगीततज्ञ* *१९५६: डॉ. मधुसूदन दत्तात्रेय गादेवार -- कवी, लेखक* *१९५२: प्रा. रामनाथ चव्हाण -- लेखक-संशोधक व नाटककार(मृत्यू: २० एप्रिल २०१७ )**१९४५: गोविंद गोडबोले -- प्रसिद्ध बालसाहित्यिक* *१९४४: डॉ. आनंद जोशी -- प्रसिद्ध लेखक, अनुवादक**१९२९: संतोष आनंद -- सुप्रसिद्ध भारतीय गीतकार**१९२९: राम उगावकर -- कवी, शाहीर, गीतकार (मृत्यू: ५ एप्रिल २०१३ )* *१९२८: अॅलिक पदमसी -- भारतीय थिएटर व्यक्तिमत्व आणि जाहिरात चित्रपट निर्माता(मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१८ )**१९२५: वसंत पुरुषोत्तम साठे -- पूर्व केंद्रीय मंत्री (मृत्यू: २३ सप्टेंबर २०११ )* *१९१८: श्रीरंगा वासुदेव 'रंगा' सोहोनी -- भारतीय क्रिकेटपटू (मृत्यू: १९ मे १९९३ )**१९१७: आनंदीबाई विजापुरे -- आत्मचरित्रकार, कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: २० ऑक्टोबर १९९९ )**१९१६: बिजू पटनायक – ओरिसाचे माजी मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू: १७ एप्रिल १९९७ )**१९१३: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २१ जुलै २००९ )**१९११: सुब्रोतो मुखर्जी -- भारतीय वायुसेनेचे पहिले वायुसेना प्रमुख(मृत्यू: ८ नोव्हेंबर १९६० )**१९१०: श्रीपाद वामन काळे -- निंबंधकार. संपादक**१९०८: सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू: २ जून १९९० )**१९०६: सुमंत मूळगावकर -- भारतीय उद्योगपती,टाटा मोटर्सचे आर्किटेक्ट(मृत्यू: १ जुलै १९८९ )**१९०५: हरिहर वामन देशपांडे -- लेखक (मृत्यू: २० एप्रिल १९६५ )**१८९८: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९७६ )**१८७३: लक्ष्मण नारायण जोशी -- मराठीतील ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक, ग्रंथसंपादक व पत्रकार(मृत्यू: १ जुलै १९४७ )**१८५६: राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी -- मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी(मृत्यू: २६ मार्च, १९२९ )**१५१२: गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: २ डिसेंबर १५९४ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: ह्युगो चावेझ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २८ जुलै १९५४ )**१९९५: जलाल आगा – चरित्र अभिनेता (जन्म: ११ जुलै १९४५ )**१९८९: बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक,गदर पार्टीचे एक संस्थापक* *१९८५: पु. ग. सहस्रबुद्धे –’महाराष्ट्र संस्कृती’कार(जन्म: १० जून १९०४)**१९६८: नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार (जन्म: ५ ऑगस्ट १८६९ )**१९६६: शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष**१९५३: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १८ डिसेंबर १८७८ )**१८२७: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join व्हावे..... त्याण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर, राज्यपालांनी स्वीकारला राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्ली - स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनतारा वन्यजीव प्रकल्पाचे उदघाटन, अनंत अंबानीच्या कामाचे केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात इलेक्ट्रिक बाईकच्या कंपनीला भीषण आग, 2000 दुचाकींचे साहित्य जळून खाक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *97 व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये अनोरा ची बाजी, तब्बल पाच पुरस्कारावर मोहोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी च्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी केला पराभव, 9 मार्च रविवारी होणार अंतिम सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मदनूरकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 माणिक आहेर, सहशिक्षक, नाशिक👤 गंगाधर नुकलवार, सहशिक्षक, देगलूर👤 गीता ढगे, सहशिक्षिका, बिलोली👤 दिनेश चव्हाण👤 रावसाहेब वाघमारे👤 उमाकांत पाटील विभूते👤 पोषट्टी सिरमलवार👤 आकांक्षा निगुडकर👤 रमेश मेरलवार, करखेली👤 अशोक कहाळेकर👤 बालाजी तिप्रेसवार👤 प्रकाश पडकूटलावार👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 10*ऑक्सीजन घेतो**रक्त शुद्ध करतो**सुक्ष्म वाहिन्यांद्वारे**शरीराला पोहचवितो*कोण ....?उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - गोगलगाय••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य, समता, स्वातंत्र्य यांचा मिलाफ आणि आचार, उच्चार विचार यांचे उगमस्थान म्हणजे शिक्षण होय.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ?२) शिक्षण हक्क कायद्यानुसार ( RTE ) किती टक्के जागा आरक्षित असतात ?३) भारतातील पहिले ज्योतिर्लिंग कोणते ?४) 'चाणाक्ष' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातील सर्वात लहान रेल्वे मार्ग कोणता ? *उत्तरे :-* १) महाबळेश्वर - पाचगणी २) २५ टक्के ३) सोमनाथ, गुजरात ४) हुशार, चतुर ५) नागपूर ते अजनी ( ३ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙 कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्हाॅसिस' असे म्हणतात. सिर्हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥ देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्या मनात खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार असतात. चांगल्या, वाईट परिस्थितीची जाणीव, श्रध्दा आणि स्वतः वर तेवढा विश्वास असतो.अशी व्यक्ती बिनधास्तपणे आपले कार्य सतत चालू ठेवत असते. अशी व्यक्ती चुकूनही कोणाचा अपमान करत नाही. कारण ह्या व्यर्थ गोष्टींकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशी व्यक्ती अभिमानाचे दुसरे नाव असते. अशाच व्यक्तीच्या आपण सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संस्कारीत मुलेच यशस्वी*नैतिक मूल्यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्या वर्गात येऊन पोहोचला व म्हणाला,''सर तुम्हाला आताच्या आत्ता प्राचार्यांनी काही महत्वाचे सांगण्यासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्वत:च्या हाताने तुम्हाला द्यायची खूप इच्छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्यावर तुम्हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्यांनी विचार केला व त्यांनी चॉकलेटस स्वत:च्या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वाट बघण्यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस खाल्ली त्यांनी आपले हात वर करा'' ज्यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविली तेव्हा त्यांना असे दिसून आले की ज्या मुलांनी स्वत:च्या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्य स्वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्च पदावर काम करत होते. ही सर्व संस्कारांची देणगी होती.तात्पर्य :- संस्काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्या हाती आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास व संयम न पाळल्यास योग्य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 12/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा*💥 ठळक घडामोडी :-१९८२-NABARD ची स्थापना१९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान२००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर२००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.💥 जन्म :-१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)१९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.१९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता२०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेच्या नव्या इमारतीवर भव्य 'अशोक स्तंभ', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील कोर्टात विनंती करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो ! रेल्वे बोर्डाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद8*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गिनीज बुकात नोंद झालेली जगातील सर्वात वृद्ध हवाईसुंदरी ( एअरहोस्टेज ) कोण ?२) जगातील पहिला मोबाईल कॉल कोणी केला ?३) जपानची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास काय नाव पडले ?४) मुळाक्षरे म्हणजे काय ?५) 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?*उत्तरे :-* १) बेट नॅश ( ८६ वर्षे ) , अमेरिका २) मार्टिन कूपर , ३ एप्रिल १९७३ ३) आबेनॉमिक्स ४) अक्षरांचा समूह जो भाषेत वापरतात त्यांना मुळाक्षरे म्हणतात. ५) कोलकाता *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिलीप इंगळे● हरिहर धुतमल● हितेश माधवी● साई गाडगे● प्रवीण दबडे पाटील● शिल्पा जोशी● नागेश पडकूटलावार● अविनाश पांडे● नमन यादव● सुनील देवकरे● अमरजुल हुसैन● दादाराव जाधव● नंदकुमार कौठकर● अभिजित राजपूत● माधव उमरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव*हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 मार्च 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_राष्ट्रीय सुरक्षा दिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ लाईनमन दिवस_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील ६३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण**१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना ’कॅग हॉल ऑफ फेम’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर**१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.**१९६१: १९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय.एन.एस.विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.**१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.**१९३८: सौदी अरेबियात प्रथमच खनिज तेल सापडले**१८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.**१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: वीणा जगताप -- भारतीय अभिनेत्री**१९८७: श्रद्धा दास -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८०: रोहन बोपन्ना_ भारतीय टेनिस खेळाडू**१९७७: निता प्रफुल्ल अलेल्वार -- कवयित्री, लेखिका**१९७३: प्रा. डॉ. केशव पाटील -- लेखक, संपादक* *१९७२: रवींद्र केदा देवरे -- कवी* *१९७१: रसूल दादूसाहेब पठाण -- कवी**१९७१: वैशाली गावंडे-कोल्हे -- कवयित्री, लेखिका* *१९६७: डॉ. निर्मला पी. भामोदे -- चरित्रकार, वक्त्या* *१९५९: बबन ओंकार महामुने -- कवी , कथाकार* *१९४९: प्रा. डॉ. वामनराव जगताप -- कवी, लेखक**१९४४: शरद पुराणिक -- विज्ञान लेखक**१९३९: गोविंद मोघाजी गारे --आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक,(मृत्यू: २४ एप्रिल २००६ )**१९३५: गणपती साबाजी सेलोकर - कवी* *१९३५: प्रभा राव -- राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्यांच्या माजी राज्यपाल (मृत्यू: २६ एप्रिल २०१० )* *१९२९: प्रल्हाद बापूराव वडेर -- कथाकार, समीक्षक**१९२२: दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००२)**१९२१: फणीश्वर नाथ 'रेणु'-- हिन्दी भाषेचे साहित्यकार(मृत्यू: ११ अप्रैल १९७७ )**१९०९: दामोदर अच्युत कारे -- गोमंतकीय मराठी कवी.हे बा.भ.बोरकरांचे समकालीन होते(मृत्यू: २३ सप्टेंबर १९८५ )**१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४ )**१८९५: दत्तात्रय केशव केळकर -- समीक्षक, लेखक (मृत्यू: ८ ऑगस्ट १९६९ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: रॉडनी विल्यम मार्श -- ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू(जन्म:४ नोव्हेंबर १९४७)**२०२१: जगन्नाथ केशव कुंटे -- लेखक (जन्म: १५ मे १९४३ )* *२०१६: पूर्ण ऐजिटक संगमा (पी.ए. संगमा) -- पूर्व लोकसभा अध्यक्ष (जन्म: १ सप्टेंबर १९४७ )**२०११: अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री,३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (जन्म: ५ नोव्हेंबर १९३० )**२००९: बापू वाटवे -- चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक(जन्म: १९२४ )**२०००: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (जन्म: ८ जानेवारी १९२४ )**१९९६: आत्माराम सावंत – नाटककार व पत्रकार(जन्म: ७ मार्च १९३३ )**१९९६: बिमल दत्ता -- लेखक आणि दिग्दर्शक(जन्म: २६ फेब्रुवारी १९२४)**१९९५: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (जन्म: २२ फेब्रुवारी १९२० )**१९८५: पुरूषोत्तम गणेश सहस्रबुद्धेह -- मराठी गंथकार आणि विचारवंत.(जन्म: १० जून १९०४ )**१९७६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जुलै १८८६ )**१९५२: सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२) ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ )**१९२५: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक,नाटककार,संगीतकार,चित्रकार व संपादक,रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (जन्म: ४ मे १८४९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* या समुहात join ..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्तासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गोपीचंद पडळकरांसह विधानपरिषदेच्या 5 रिक्त जागेवर निवडणूक कार्यक्रम जाहीर; 27 मार्च रोजी होणार मतदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्लीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 ते 26 मार्चदरम्यान, सूचनांसाठी मेल आणि व्हॉट्सअप नंबर दिले, दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणाल्या, आम्ही प्रत्येक वचन पूर्ण करू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विद्यार्थ्यांना शाळेत स्मार्टफोन आणण्यास बंदी नाही, दिल्ली हायकोर्टाने म्हटले, शिक्षणासाठी तंत्रज्ञान आवश्यक, धोरणे बनवून त्यावर नियंत्रण ठेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीसह १६ मागण्यांसाठी लढा, ५ मार्चला राज्यभरातील आगारांसमोर निदर्शने; उग्र आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सेमिफायनल सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤श्री गोवर्धन कोळेकर, ACP, औरंगाबाद👤 मारोती राचप्पा छपरे, माध्य. शिक्षक, जि. प. हा. धर्माबाद👤 मजहर सौदागर, सहशिक्षक 👤 साहेबराव पहिलवान, धर्माबाद👤 अनिल गडाख 👤 ज्ञानेश्वर नाटकर👤 गोविंद उपासे, सहशिक्षक👤 गोविंद कोंपलवार, सहशिक्षक👤 शिवाजी पाटील ढगे👤 शेख इस्माईल शेख लतीफ👤 लक्ष्मण बोधनकर, सहशिक्षक👤 लक्ष्मण कुमरवाड👤 सचिन पा. हंबर्डे धनंजकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 09*तिचे पोटात असतात पाय**हळूहळू ती सतत चालते**सोडत जाते चिकट स्त्राव**लहान मुलांना खूप आवडते*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - शीतसमाधी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे, कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगात सर्वात पहिले रेल्वे केव्हा धावली ?२) भारतात सर्वात पहिले रेल्वे केव्हा धावली ?३) भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण केव्हा झाले ?४) रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला ?५) 'रेल्वेचे जनक' कोणाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) सन १८२५ ( इंग्लंडमधील स्टॉकटन ते डार्लिंगटन ) २) सन १८५३ ( मुंबई ते ठाणे ) ३) सन १९५१ ४) जॉर्ज स्टीफनसन, इंग्लंड ५) जॉर्ज स्टीफनसन, सिव्हील इंजिनियर व मेकॅनिकल ( १७८१ - १८४८ )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *आटवलेलं दूध पिवळसर का होतं ?* 📒दुधाचा समावेश आपण द्रवपदार्थांमध्ये करत असलो तरी ते पाण्यासारखं द्रव नाही. वैज्ञानिक भाषेत त्याला कोलॉइड किंवा कोलॉईडल सस्पेन्शन असं म्हणतात. कारण त्यातल्या पाण्यात निरनिराळे कण विहरत असतात. यातले काही कण प्रथिनांचे असतात. त्यातही कैसिन हे प्रथिन जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचे कण बरेच असतात. त्याशिवाय रिबोफ्लेविन हे जीवनसत्त्व असतं. याचा रंग पिवळा असतो. त्याच्या नावातच या रंगाचा उल्लेख आहे. लॅटिन भाषेत फ्लेवस म्हणजे पिवळा. त्यापासूनच रिबोफ्लेविन हे त्याचं नाव त्याला मिळालेलं आहे. हे मात्र त्या पाण्यात विरघळलेलं असतं पण त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा पिवळा रंग त्या पाण्याला मिळत नाही. याव्यतिरिक्त चरबीचे म्हणजेच मेदाम्लांचे कणही त्या पाण्यात विहरत असतात.केसिन या प्रथिनात कॅल्शियमची रेलचेल असते. त्यामुळेच दूध अतिशय पौष्टिक बनतं. या केसिनचा रंग पांढरा असतो. झालंच तर त्यातील मेदाम्लांचा रंगही पांढरा असतो. दुधातून जी साय निघते ती या मेदाम्लांची बनलेली असते. तिच्या रंगावरून त्यांच्या पांढऱ्या रंगाची कल्पना यावी. दुधात केसिनचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याचेच कण पाण्यात जास्त विहरत असतात. त्यांच्यावरून परावर्तित होणारा प्रकाश दुधाला त्याचा पांढरा रंग देतो. त्यात भर पडते ती मेदाम्लांच्या कणांच्या सहभागाची. जितकं त्यांचं प्रमाण दुधात जास्त तितका त्याचा रंग पांढराशुभ्र होतो. सामान्य तापमानाला हे सारे कण सहजगत्या पाण्यात विहरत राहतात, ते खाली बसत नाहीत. त्यामुळे मग दुधाचा रंग पांढराच राहतो. शिवाय हे कण कमीत कमी प्रकाश शोषून घेतात. जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित होतो. त्यामुळे त्याचा पांढरा रंगच आपल्याला दिसतो.आपण जेव्हा दूध आटवतो तेव्हा त्यातल्या पाण्याची वाफ होऊन ते उडून जातं. त्याचं प्रमाण कमी होतं. त्याचं आकारमान कमी झाल्यामुळे त्यातल्या रिबोफ्लेविनचं प्रमाण वाढतं. रिबोफ्लेविनची घनता वाढल्यामुळे आता त्या पाण्याला त्याचा रंग मिळतो. ज्या पाण्यात केसिन आणि मेदाम्लांचे कण विहरतात त्याचाच रंग पिवळा झाल्यामुळे तोच साऱ्या दुधाचा होतो. गाईच्या दुधात रिबोफ्लेविनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते गोठवल्यावरही पिवळं होतं, कारण त्या पाण्याचे स्फटिक बनतात. उरलेल्या पाण्यातल्या रिबोफ्लेविनची घनता साहजिकच वाढते. त्यामुळे मग त्या पाण्याचा आणि परिणामी दुधाचाच रंग पिवळसर होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥ आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥ काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । इहीं निरंतर जाजावलें ॥३॥ बुडतिया अवचटें लाभे पैं सांगडी । ते जीवें न सोडी तैसें जालें ॥४॥ नामा म्हणे केशवा तूं कृपेचा सागर । झणीं माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चुका माणसाच्याच हातून न कळत सुद्धा होत असतात. पण, त्या चुकांविषयी समजावून सांगण्याच्या काही पद्धती असतात. म्हणून कोणालाही का असेना त्याची चूक जर लक्षात आणून द्यायची असेल तर आपणही तेवढेच प्रामाणिक असले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपल्या विषयी विचार केला जातो.पण, बोलणे वेगळे, वागणे वेगळे आणि विचार वेगळे असतील तर मात्र आपल्याकडे ही बघणारे अनेकजण असतात. म्हणून एकाकी कोणालाही चुकीचे ठरवू नये.बरेचदा असं होतं की एखाद्याला न वाचता चुकीचे ठरविल्याने त्याच्या स्वाभिमानाला किंवा त्याच्या चरित्राला डाग लागत असते. त्यावेळी भलेही तो माणूस बोलत नसेल पण, त्याचे मन जेव्हा दुखते तेच दुखावलेले मन अनेक पिढ्यांना सुखाने जगू देत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ परोपकार ❃* ••◆•◆•◆★◆•◆•◆•• "अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न - धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात. गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात. *_🌀तात्पर्य_ ::~**जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. "**प्रत्येकाला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 12/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा*💥 ठळक घडामोडी :-१९८२-NABARD ची स्थापना१९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान२००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर२००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.💥 जन्म :-१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)१९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.१९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता२०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेच्या नव्या इमारतीवर भव्य 'अशोक स्तंभ', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील कोर्टात विनंती करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो ! रेल्वे बोर्डाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद8*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गिनीज बुकात नोंद झालेली जगातील सर्वात वृद्ध हवाईसुंदरी ( एअरहोस्टेज ) कोण ?२) जगातील पहिला मोबाईल कॉल कोणी केला ?३) जपानची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास काय नाव पडले ?४) मुळाक्षरे म्हणजे काय ?५) 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?*उत्तरे :-* १) बेट नॅश ( ८६ वर्षे ) , अमेरिका २) मार्टिन कूपर , ३ एप्रिल १९७३ ३) आबेनॉमिक्स ४) अक्षरांचा समूह जो भाषेत वापरतात त्यांना मुळाक्षरे म्हणतात. ५) कोलकाता *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिलीप इंगळे● हरिहर धुतमल● हितेश माधवी● साई गाडगे● प्रवीण दबडे पाटील● शिल्पा जोशी● नागेश पडकूटलावार● अविनाश पांडे● नमन यादव● सुनील देवकरे● अमरजुल हुसैन● दादाराव जाधव● नंदकुमार कौठकर● अभिजित राजपूत● माधव उमरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव*हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जागतिक हस्ताक्षर दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.💥 जन्म :-१८९७ - भारतीय क्रांतिकारक, नेताजी सुभाषचंद्र बोस१९२६ - मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे💥 मृत्यू :- ११९९ - याकुब, खलिफा.१५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं आज होणार अनावरण, राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, सोहळा राजकीय असल्याची संजय राऊतांची टीका, तर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेडमधील शेतकऱ्याची लेक रेवा दिलीप जोगदंड हिची उत्तुंग भरारी! अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड, अमेरिकन सरकारकडून मिळाली शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिक शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड, दहा हजार वृक्षांवर कुऱ्हाड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *Hockey World Cup 2023: भारत विश्वचषकातून बाहेर, न्यूझीलंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रॉसओव्हर सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/ORst3MlDaR8~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *सुंदर हस्ताक्षर : एक दागिना?*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://m.facebook.com/story.php?story_fbid=1404197203040383&id=100003503492582&mibextid=Nif5ozलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नेताजी सुभाषचंद्र बोस*सुभाषचंद्र बोस (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५ ) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जानेवारी २३, १८९७रोजी ओडिशा मधील कटक शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतः ची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते तसेच बंगालचे विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकार ने त्यांना रायबहाद्दर हा किताब दिला होता.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता ठरला आहे ?२) एकदिवसीय क्रिकेटमध्ये झालेल्या १० द्विशतकापैकी भारताकडून किती द्विशतके झाली आहेत ?३) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ( UNSC ) कोणाला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे ?४) कर्नाटक राज्यातील सर्वात उंच शिखर कोणते ?५) पहिल्या भारतीय - अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर कोण बनल्या आहेत ?*उत्तरे :-* १) कोल्लम, केरळ २) सात ३) अब्दुल रहमान मक्की ४) मुल्यणगिरी ५) अरुणा मिलर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष बोधनकर, नांदेड👤 भालचंद्र गावडे, सोलापूर👤 दिनेश चिंतावाड, नांदेड👤 नम्रता उभाळे👤 यदुराज ढगे, चिरली👤 शंकर नरवाडे👤 श्याम खंडेलोटे👤 सुनील बंडेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥१९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?**प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमचे जीवन योग्य दिशेने जाण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाची किंवा योग्य दिशेची निवड करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा.म्हणजे तुमचे जीवन सुखी, समृद्ध आणि संपन्न होईल.याचा आनंद तुम्हालाही मिळेल आणि इतरांनाही मिळेल.त्यातून चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणाही मिळेल.नाही तर सागरातल्या भरकटलेल्या जहाजासारखे होईल.जर एखाद्यावेळी जहाजामध्ये दिशादर्शक होकायंत्र अचानक बंद पडले तर त्या जहाज चालविणा-या माणसाला आपले जहाज कुठे चालले आहे याचा अंदाजच लागत नाही.अर्थात भरकटलेल्या जहाजासारखीच आपल्याही जीवनाची दिशाहीन आणि ध्येयहीन वाटचाल होईल. यासाठी आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करा मग तुमच्या जीवनात कधीच अडथळे येणार नाहीत आणि जर का आलेच तर योग्य प्रकारे हाताळण्यात यश मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चल रे भोपळया टुणुक टुणुक*एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला.रस्त्यांत होते मोठे जंगल. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी होती हुषार. ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. पुढे गेल्या भेटला कोल्हा. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला.अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17/02/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.💥 जन्म :-१८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.१८९९ - बंगालचे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास१९५४: तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव 💥 मृत्यू :- १८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर, समाजसेवक१८८३ - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके१९६८: मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू १९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक१९८६ - जे. कृष्णमूर्ती, भारतीय तत्त्वज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिक्षक अधिवेशनात घोषणा; जुन्या पेन्शन योजनेवरही शिक्षण विभाग काम करत असल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विद्यापीठातील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप, मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बंगळुरु जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर, तर पुणे सहाव्या क्रमांकावर; टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उस्मानाबादचं नामांतर 'धाराशिव' करण्यास हरकत नाही, मात्र औरंगाबादचा विचार सुरु; केंद्र सरकारची न्यायालयात माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 223 कोटी रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मध्ये आजपासून भारत वि. ऑस्ट्रेलिया मध्ये दिल्लीत दुसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हर हर महादेव ! भारतातील 12 ज्योर्तिलिंगाचं घरबसल्या दर्शन.. खालील लिंकवरhttps://marathi.abplive.com/photo-gallery/news/india-mahashivratri-2023-12-jyotirlingas-in-india-twelve-jyotirlinga-images-with-name-and-place-1152141शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BgjVNBSFkuE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील पहिला माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ?२) खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेचे थीम काय आहे ?३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गावाचे नाव काय आहे ?४) शालेय पोषण आहार योजना केव्हा सुरू झाली ?५) भारतात प्रथमच कोणत्या ठिकाणी लिथियमचा साठा सापडलेला आहे ?*उत्तरे :-* १) जैसलमेर, राजस्थान २) हिंदुस्थान का दिल धडका दो ३) राळेगण सिद्धी ४) २२ नोव्हेंबर १९९५ ५) रियासी जिल्हा, जम्मू काश्मीर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण एडके👤 विकास गायकवाड👤 लक्ष्मण गंगाराम होरके*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येकालाच वाटतं की, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपल्याशी चांगले संबंध ठेवावेत ; परंतु आपल्यावर प्रेम करणारं कुणीच नाही असं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा थोडा तुम्ही तुमच्याच मनाला एकांतात प्रश्न विचारा की, असं काय झालं की, मला आपुलकीनं विचारणारी, माझ्यावर प्रेम करणारी माणसं मला का भेटत नाहीत ? याचं उत्तर तुम्हाला तुमचं मनच देऊ शकेल. मग मनच सांगायला लागेल की, तू तुझ्या आतल्या अंतःकरणात डोकावून पहा.**आपण जर थोडा स्वार्थ सोडला आणि इतरांना आपलसं केलं, त्यांच्याशी आपुलकीचं नातं जोडलं, त्यांच्याशी प्रेमानं नातं जोडून त्यांच्या सुखदुःखाशी जवळीकता साधली आणि निस्वार्थपणे त्यांच्याशी प्रामाणिकपणे व्यवहार केला तर सारेच आपल्यावर प्रेम करायला लागतील. हे जेव्हा तुमच्या मनाला पटेल तेव्हा सारेच लोक तुमच्यावरही प्रेम करायला लागतील. तुमचा तो एकाकीपणाही दूर होईल, संबंधही दृढ होतील आणि नातेही अगदी घट्ट व्हायला लागतील यात शंका येण्याचे कारणही राहणार नाही.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*इमानदारीचं फळ*सकाळची वेळ.शिल्पाने भाजीबाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सागितलं आणि गाडीतून उतरुन ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली.तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं. कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची.भाजीच्या गाडीवर एक नऊ-दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती.भाजी घेऊन शिल्पाने तिला पर्समधून पैसे दिले.तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली.बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं.चमकून तिने मागे वळून पाहीलं तर भाजीवाली मुलगी उभी होती."काय झालं?पैसे तर दिलेना मी तुला?"त्यामुलीने काही न बोलता पर्स पुढे केली."तुमची पर्स.गाडीवर राहीली होती."शिल्पाने ती पर्स हातात घेऊन पाहीली.पैसे,क्रेडिट कार्ड्स, बँकेचे कार्ड्स जागच्या जागी होती.तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं."थँक्स बेटा.काय नाव तुझं?""सोनाली"तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली.त्या मुलीने दुर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीच्या गाडीकडे निघाली.संध्याकाळी आँफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भुतकाळ आठवला.होय असंच तर घडलं होतं तिच्याबाबतीत! आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती.सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरुन सरकू लागला. अठरा वर्षांपुर्वीची ती गोष्ट.शिल्पा तेव्हा पाचवीत होती.दुपारची वेळ.शाळा आटोपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती.चालता चालता अचानक तिला आपल्या पायाने काहीतरी उडाल्याचं जाणवलं.पुढे जाऊन पहाते तर एक पाकिट पडलेलं दिसलं.उत्सुकतेने तिने ते उचललं आणि उघडून पाहीलं.नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट.तिचं ह्रदय धडधडू लागलं.आजच शाळेत बाई सांगत होत्या.ईमानदारीचं फळ गोड असतं म्हणून!ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं.काय करावं काय नाही या संभ्रमात तिनं आजुबाजुला पाहीलं.एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता.नक्कीच!नक्की त्याचंच असावं हे पाकिट.शिल्पा विचारातच त्याच्याजवळ पोहोचली.त्याच्या हाताला स्पर्श करुन तिने त्याचं लक्ष वेधून घेतलं."काय आहे?" बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्याने थोडं चिडूनच विचारलं."हे पाकिट तुमचं आहे?"शिल्पाने पाकिट पुढे करत विचारलं.पाकिट पाहून तो चमकला.झटकन त्याचा हात पँटच्या मागच्या खिशाकडे गेला."हो माझंच आहे ते.कुठं सापडलं?""त्या तिथे पडलं होतं" शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली.त्याने पाकिट उघडून पाहीलं.सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दिर्घ निश्वास सोडला.तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हाँर्न वाजला.त्या माणसाने पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली.शिल्पाही आपल्या रस्त्याने पुढे निघाली.घरी पोहोचतांना शिल्पा खुप आनंदात होतीआपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता.घरी जाऊन कधी एकदा आईला ही घटना सांगते असं तिला झालं होतं.ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती.तिचं ते झोपडीवजा घर धुराने भरलं होतं.शिल्पाने दप्तर एका बाजुला टाकून आईला मोठ्या अभिमानाने झालेली घटना सांगितली.तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल.पण पोळ्या करणं सोडून आई उठली.शिल्पाला धरुन हातातल्या लाटण्यानेच तिला मारु लागली."कारटे.इथे खायला काही नाहीये आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली.काय गरज होती तुला ते पाकीट परत करायची.टाकून द्यायचं होतं दप्तरात! तुझ्यावर कोणाला संशय आला असता?" बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती.शिल्पा जोरजोरात रडत होती,आईला 'नको ना मारु आई'अशी विनवण्या करत होती.आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच शिल्पाची सुटका झाली.संध्याकाळी तिचा बाप दारु पिऊन आला.शिल्पाचा रडवेला चेहरा पाहून त्याने काय झालं विचारलं.शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईने सगळी कहाणी त्याला सांगितली.शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानभुती दाखवेल.पण त्याने तिच्याच दप्तरातील पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली.सोबतीला शिव्या होत्याच.शिल्पाला मारणं चालू असतांना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता.इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते.शिल्पाला मारुन थकल्यावर तिचा बाप दारुच्या नशेत बडबडत बसला.मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली.दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सागितली.तिच्यासारख्याच झोपडपट्टीत रहाणाऱ्या त्या मुली.त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं. दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या झोपडीत ग्रुहपाठ करत असतांना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली.तिची आई दार उघडून बाहेर गेली."शिल्पा बाहेर ये.हे कोण आलेत बघ"धडधडत्या छातीने शिल्पा बाहेर आली.समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता.होय.तोच तो माणूस ज्याला तिने पाकिट उचलून दिलं होतं.तिला पाहून तो हसला."हीच ती मुलगी."तो शिल्पाच्या आईला म्हणाला." बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंही राहून गेलं.बोल काय पाहीजे तुला?"शिल्पा भांबावली.काय बक्षीस मागावं ते तिला कळेना." आईस्क्रीम चालेल?""हो आईस्क्रीम. मला आईस्क्रीम पाहीजे" शिल्पाच्या आधी तिचा बाहेर आलेला भाऊच आनंदाने ओरडला.शिल्पानेही मान डोलावली."चला तर मग.बसा गाडीत"त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनेच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले.शिल्पाच्या आईने नाराजीनेच त्यांच्याकडे पाहीलं.या आईस्क्रीम ऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमी तरी करता आली असती असं तिला वाटून गेलंं.शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ,पाणीपुरी खाऊ घातली.मग नंतर पोट भरुन आईस्क्रीम.ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता.एका मोडक्या खुर्चीवर शेठजी बसले." तुमची मुलगी खुप इमानदार आणि हुशारही आहे.आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले.खुप छान उत्तरं दिलीत तिने.मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावं"" शेठजी आम्ही बांधकामावर मजुरी करणारी माणसं.आम्हाला ते कसं परवडणार?"शिल्पाचा बाप हात जोडत म्हणाला." तुम्ही काही काळजी करु नका.ते काम माझ्याकडे लागलं.तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन.मात्र एक गोष्ट. तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही.आपण तिला होस्टेलवर ठेवू.त्याचाही खर्च मीच करेन."शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं.खाणारं एक तोंड कमी होणार होतं.तो म्हणाला."मग तर आम्हाला काहीच अडचण नाही.पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख!" शेठजींनी चक्र फिरवली.नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्चभ्रूंच्या शाळेत गेली.फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोराकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुट आले.नवीकोरी पुस्तकं, आधुनिक स्कुलबँग आली.त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून,बावचळून गेली.ती झोपडपट्टीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमणे मारायचे,टिंगलटवाळी करायचे.शिल्पा कोपऱ्यात जाऊन रडत बसायची.हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहीली आली . त्यानंतर शिल्पाने मागे वळून पाहीलं नाही.सातवीत स्काँलरशिप मिळवून तिने शेठजींवरचा आपला भार थोडा हलका केला.दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहीली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबत शेठजींनाही खुप आनंद झाला.एका नामांकित काँलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करुन दिला.बारावीत तर शिल्पाने कमालच केली.राज्यात ती पहीली आली.ते कळताच शेठजींनी तिला मेडिकल काँलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं.पण तिला आय.ए.एस.करायचं होतं.तिचा निर्णय ऐकून शेठजींनी तिला विरोध केला नाही.पदवी मिळवल्यावर शिल्पाने युपीएससीचा अभ्यास सुरु केला.कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली.एक झोपडपट्टीतील मुलगी कलेक्टर झाली. निकाल कळाल्यावर शेठजी तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेले.त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले.बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या मनाने शिल्पा भारावून गेली.शेठजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करुन दिली.' शिल्पा माझी मुलगीच आहे' असे ते सारखे म्हणत असतांना शिल्पाला अश्रु अनावर होत होते.तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं.तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंदाप्रित्यर्थ शेठजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं.शिल्पाच्या आईवडिलांच्या तर आनंदाला पारावर उरला नव्हता. एक मुलगी शिकली की घरादाराचा स्वर्ग बनवते हे शिल्पाने सिध्द केलं.नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिने आईवडिल आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं.भावाला चांगल्या काँलेजमध्ये घातलं.वयस्कर वडिलांना मजूरी सोडायला लावून दुकान उघडून दिलं. सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलिस अधिक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं."आज परत सकाळी कुठे ?"त्याने विचारलं."काल माझी पर्स इमानदारीने परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघालेय" हे सांगतांना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 एप्रिल 2024💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/GWa1vbjp8h2WrxSP/?mibextid=oFDknk••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक जलसंपत्ती दिन'_* *_भारतीय पंचायत राज दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील ११५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९९३:७३ वी घटना दुरुस्ती महिलांना ३३% आरक्षण* *१९९३:इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली**१९९०:डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.**१९७०:गाम्बिया प्रजासत्ताक बनले.**१९६८:मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.**१९६७:वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.**१९२९:इंग्लंड आणि भारत दरम्यान पहिले विमान उड्डाण* *१९२०:पोलंच्या सैनिकांचे युक्रेनवर आक्रमण**१८००:अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.**१७१७:[वैशाख व. ९, शके १६३९] खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला**१६७४:भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:मेघना सुधीर एरंडे-- भारतीय अभिनेत्री* *१९७८:प्रसाद रामचंद्र नामजोशी -- लेखक, दिग्दर्शक**१९७३:सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतरत्न**१९७०:डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९६३:डॉ.सुरुची सुधीर डबीर -- लेखिका* *१९४७:अरुण काकतकर-- दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते व लेखक* *१९५५:दिलीप मुरलीधर देशपांडे-- लेखक, ज्येष्ठ पत्रकार(विविध वृत्तपत्रामधून विविध विषयावर सातत्याने लेखन)**१९४३:पंडित श्रीराम शहापूरकर-- प्रसिद्ध हार्मोनियम वादक(मृत्यू:८ ऑक्टोबर २०१४)**१९४२:बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री,गायिका,चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका**१९३९:मीरा कोसंबी-- प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ(मृत्यू:२६ फेब्रुवारी २०१५)* *१९३८:मॅक मोहन -- हिंदी चित्रपटांमधील अभिनेता(मृत्यू:१० मे २०१०)**१९३६:पद्माकर गोवईकर-- मराठी नाटककार व कादंबरीकार(मृत्यू:२२ जुलै २००१)**१९३५:डॉ.बिंदुमाधव दत्तात्रय पुजारी-- व्यवसायाने डॉक्टर असलेले लेखक**१९३०:बाळ ठाकूर (भालचंद्र श्रीराम ठाकूर)--महाराष्ट्रातील प्रख्यात मुखपृष्ठ चित्रकार (मृत्यू:८ जानेवारी २०२२)* *१९२९:राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू:१२ एप्रिल २००६)**१९२४:प्रल्हाद नरहर जोशी--- संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक,कादंबरीकार(मृत्यू:५ जून २००४)**१९१०:राजा परांजपे –चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू:९ फेब्रुवारी १९७९)**१९०४:केशव नारायण काळे-- मराठीतील कवी,नाटककार,समीक्षक,चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(मृत्यू:२० फेब्रुवारी १९७४)**१८८९:सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू:२१ एप्रिल १९५२)**१८९६:रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार.’पाणकळा’,’सराई’,’पड रे पाण्या’,’आई आहे शेतात’,’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्या अतिशय गाजल्या.(मृत्यू:४ जुलै १९८०)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०११:सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म:२३ नोव्हेंबर १९२६)**२००६:गोविंद मोघाजी गारे-- आदिवासी संस्कृती,आदिवासी साहित्य,आदिवासी कला यांचे गाढे अभ्यासक(जन्म:४ मार्च १९३९)**२००४: इंदुमती गंधे-- विदर्भातील बालसाहित्यिक,अनुवादक(जन्म:२० नोव्हेंबर १९२०)**१९९९:सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म:१९२१)**१९९४:शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती,किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म:२८ मे १९०३)**१९९२:अनंत महादेव मेहंदळे-- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(जन्म:७ फेब्रुवारी १९२८)**१९७४:रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म:२३ सप्टेंबर १९०८)**१९७२:जामिनी रॉय – चित्रकार (जन्म:११ एप्रिल १८८७)**१९६०:लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील,महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक,केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म:१८६०)**१९४२:मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म:२९ डिसेंबर १९००)**१९३५:रघुनाथ पांडुरंग करंदीकर-- व्यासंगी कायदेपंडित,स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते,साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी(मृत्यू:२१ ऑगस्ट१८५७)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सचिन रमेश तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री मुकुंद कुलकर्णी यांचा लेख*मास्टर ब्लास्टर भारतरत्न पुत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *Lok Sabha Elections 2024: उष्णतेच्या लाटेमुळे मतदान होणार कमी? निवडणूक आयोगाने नेमली टास्क फोर्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन व्हेरिएंटचे यशस्वी प्रक्षेपण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिठीमुळे शेतीचे मोठं नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *खालापूर येथील S.H. केळकर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशातील मतदानाची टक्केवारी कमी होणे चिंताजनक काँग्रेस नेते माणिक ठाकरे यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार रुपयाची चोरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईने लखनऊ समोर ठेवले 211 धावाचे लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *पॅथॉलॉजी म्हणजे काय ?* 📙 शरीरांतर्गत अनेक क्रिया प्रक्रिया जन्मल्यापासून चालू असतात. शरीरक्रियाविज्ञानामध्ये त्यांचा वेध घेतला जातो. या कोणत्याही क्रियेमध्ये बिघाड झाला म्हणजे तो बिघाड शोधण्याची प्रक्रिया पॅथालॉजीमध्ये सुरू होते. रक्त, लघवी, थुंकी, रक्ताचे विविध घटक व त्यांचे बदलते प्रमाण या साऱ्यांची तपासणी करून त्यावरून निदान करण्यासाठी या शास्त्राची मदत सारखीच लागत असते. एवढेच नव्हे तर वरवर निरोगी दिसणाऱ्या माणसाच्या पॅथॉलॉजिकल तपासण्या केल्यास अनेक गोष्टी उघडकीला येऊ शकतात. उदाहरणार्थ, नुकताच शरीरात प्रवेश केलेला मधुमेह किंवा सतत थकवा जाणवत असेल, तर आढळणारा रक्तक्षय हा सहसा तपासणीतून अचानक सामोरा येतो.शरीरातील विविध द्रवांच्या चाचण्या घेण्यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी अनेक रासायनिक क्रिया करून मगच निष्कर्षाप्रत येता येत असे. या तंत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बायोमेडिकल उपकरणांमुळे झपाट्याने प्रगती होत गेली. रक्तातील तांबड्या, पांढऱ्या पेशी मोजण्यासाठी आता सेलकाऊंटरसारखे उपकरण उपलब्ध झाल्याने काही मिनिटांत संपूर्ण तपासणी अचूक पद्धतीत पूर्ण होऊ शकते. रक्तातील साखर, अल्बुमिन किंवा अनेक घटक काही सेकंदात मोजू शकणारी उपकरणे आता रुग्ण स्वतःच्या घरीही वापरू शकतो.शरीरातील नलिकाविरहित ग्रंथींचे (एंडोक्राइन ग्लँड) स्रावांचे प्रमाण मोजणे, विविध हार्मोन्सची शरीरातील पातळी मोजणे हे काही वर्षांपूर्वी अत्यंत त्रासाचे व गुंतागुंतीचे होते. ते आता विविध उपकरणे व त्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या आधीच रासायनिक प्रक्रिया केलेल्या पट्ट्या किंवा द्रावांमुळे कोणत्याही शहरातील प्रशिक्षित तंत्रज्ञ करू शकतो. असे तंत्रज्ञ करा तयार करण्याचे (DMLT / BM Tech) अभ्यासक्रम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या गावीही सुरू झाले आहेत. डॉक्टरी पदवी घेतल्यावर ३ वर्षांचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पॅथालॉजी व बॅक्टेरियॉलॉजी या विषयात तज्ज्ञ म्हणून काम सुरू करता येते. अधिक अनुभवानंतर शरिरातील कोणत्याही अवयवाचे सूक्ष्म तुकडे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून त्यांतील दोष निश्चित करता येतात. पेशींच्या रचनेचे बदल होऊन कॅन्सरची सुरुवात असेल असेल तर त्याचेही निदान तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच करतात. शरीरातील द्रवात सापडणारे जंतू कृत्रिमरित्या वाढवून त्यांच्यावरील उपाययोजना सुचवणे हा बॅक्टेरियॉलॉजीचा भाग असतो.अनैसर्गिक मॄत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे आवश्यक असते. अशा वेळी शरीरातील विविध भागांचे निरीक्षण करून मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ पॅथॉलॉजीस्टचीच मदत घेतली जाते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सन्मानाने सुख प्राप्त करण्याचे साधन म्हणजे शिक्षण.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जागतिक वसुंधरा दिवस - २०२४ ची थीम* काय आहे ?२) कांदा कापतांना कोणता वायू बाहेर पडतो ?३) पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या समूहास काय म्हणतात ?४) 'अंगार' या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा.५) तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?*उत्तरे :-* १) प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक २) अमोनिया ३) दिंडी ४) निखारा ५) तानसा नदी, ठाणे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 जगदीश पा. नवले, परभणी👤 भूमाजी मामीडवार👤 सौरभ कोटपल्लीवार👤 कवी विशाल मोरे👤 अझीझ पटेल👤 अनिरुद्ध उत्तरवार👤 महावीर जैन👤 दत्ता फत्तेपुरे, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *अभंगवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥१॥अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥४॥तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥५॥।। संत तुकाराम महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांपाशी बळ असते. मग ते बळ पैशाचे असो किंवा जबरदस्त संगतीचे असो किंवा अफाट धन संपत्तीचे. त्या बळामुळे माणूस मनाप्रमाणेच सर्वच काही कमावू शकतो, वाटू शकतो.पण, ज्याच्याकडे खऱ्या दर्जेदार शब्दांची व सत्य समजून घेण्याची ताकद असते ती ताकद मात्र ह्या सर्व, व्यर्थ ताकद पेक्षा कितीतरी महान असते. ही ताकद पैशाने विकत मिळत नाही तर संघर्षातून अनुभव आल्यानेच येत असते. म्हणून तिचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अध्यात्म आणि व्यवहार*एकदा आद्यशंकराचार्य आपल्या शिष्यांसह चालले असता समोरून अचानकपणे एक पिसाळलेला हत्ती धावत येताना दिसला. अर्थातच इतरांच्याबरोबरच शंकराचार्यही हत्तीच्या मार्गातून दूर पळू लागले. त्यांच्या शिष्यवर्गात काही. खट्याळ, तरुण शिष्यही होते. त्यातील एकजण धाडस करून त्यांना म्हणाला, “तुम्हीच आजच्या प्रवचनात म्हणालात की केवळ ब्रह्म हे सत्य आहे व हे दृश्य जग मिथ्या आहे. म्हणजे हा हत्तीही मिथ्या आहे. मग आपण का पळताहात ?’शंकराचार्य लगेच म्हणाले, “पण माझं पळणं हेही मिथ्याच आहे ?” तो तरुण शिष्य ओशाळला. त्याने त्यांची क्षमा मागितली.होतं काय की, ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ याचा चुकीचा अर्थ घेतल्याने अनेक घोटाळे होतात. व्यवहारात अध्यात्म आणू नये व अध्यात्मात व्यवहार आणू नये.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/07/hari-om-vitthala.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟫 *_ या वर्षातील १९७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟫 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड**१९९६: स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर**१९६२: शिक्षणक्षेत्रातील महत्त्वपूर्ण व यशस्वी प्रयोग मानल्या जाणार्या ’ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेचा पुणे येथे प्रारंभ**१९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाउ जाहीरनाम्यावर १८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतर आणखी ३८ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी त्याला मान्यता दिली.**१९२७: समाजाला कुटुंबनियोजन आणि लैंगिक समस्यांसंबधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने र. धों. कर्वे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९२६: मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट अशी उपनगरी बस सेवा सुरू झाली.**१६६२: इंग्लंडमधे प्रतिष्ठित असलेल्या ’रॉयल सोसायटी’ची स्थापना*🟫 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: सुभाष आ. मंडले -- लेखक* *१९८१: प्रा.नंदकुमार शिवाजी शेडगे -- लेखक, कवी* *१९८०: राहुल धर्मसिंग चव्हाण (पालत्या)-- कवी, लेखक* *१९७५: आबा गोविंदा महाजन -- महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यातील अधिकारी, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध लेखक* *१९६८: सुरज थापर -- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते* *१९६६: डाॅ. श्रीनिवास मेघ:श्याम आठल्ये -- लेखक, कवी**१९६०: प्रा.दिलीप नामदेवराव तितरमारे -- कवी* *१९५७: बळीराम रुपचंद जाधव -- लेखक**१९५६: डॉ. प्रभा दत्तात्रय वासाडे -- लेखिका* *१९५१: अनुराधा मराठे -- शास्त्रीय आणि सुगम संगीत गाणाऱ्या एक मराठी गायिका**१९५०: धनराज लहानुजी डाहाट -- कवी, लेखक, विचारवंत* *१९४९: प्रा.डॉ.अरुण चिंतामणराव प्रभुणे -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९४९: विजय कोंडके -- चित्रपट दिग्दर्शक**१९४७: आशा वसंतकुमार वडनेरे -- लेखिका, अनुवादक**१९४७: विजय विठ्ठल देवधर -- मराठी लेखक(मृत्यू : ३० नोव्हेंबर २०१२)**१९४३: दत्तात्रय सदाशिव (द.स.) काकडे-- सुप्रसिद्ध कादंबरीकार* *१९४१: माधव गुणाजी कोंडविलकर -- ज्येष्ठ साहित्यिक,कवी, कादंबरीकार (मृत्यू:१२ सप्टेंबर २०२० )* *१९३७: विश्वनाथ शंकर मोरे-- संगीतकार(मृत्यू: ३१ जानेवारी १९८६ )**१९३७: प्रल्हाद नामदेव चेंदवणकर-- कवी (मृत्यू:१६ जुलै २००३ )**१९३२: प्राचार्य नरहर कुरुंदकर – प्रसिद्ध साहित्यिक,विद्वान,टीकाकार,संपादक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२ )**१९३१: विठ्ठल उमप -- मराठी शाहीर व लोककलाकार( मृत्यू: २६ नोव्हेंबर, २०१० )**१९२७: प्रा.शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: २९ जून २०१० )**१९१९: बापू चंद्रसेन कांबळे-- भारतीय राजकारणी,लेखक,संपादक,न्यायशास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: ६ नोव्हेंबर २००६ )**१९१८: चित्रा जयंत नाईक--भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका(मृत्यू: १४डिसेंबर २०१० )**१९०५: चौधरी मुहम्मद अली – पाकिस्तानचे ४ थे पंतप्रधान (मृत्यू: २ डिसेंबर १९८० )**१९०४: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १० फेब्रुवारी २००१ )**१९०३: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २ आक्टोबर १९७५ )**१८९९: दत्तात्रय लक्ष्मण गोखले-- मराठी कवी**१६११: मिर्झा राजे जयसिंग (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७ )*🟫 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟫•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३: माधवी रणजित देसाई-- मराठीतील लेखिका (जन्म: २१ जुलै १९३३ )**२००४: डॉ. बानू कोयाजी – कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्या. त्यांना पद्मभूषण, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, रामेश्वरदास बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले. (जन्म: २२ ऑगस्ट १९१८ )**१९९१: जगन्नाथराव जोशी – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते (जन्म: १९२० )**१९८०: गजानन विश्वनाथ केतकर -- निबंधकार, विचारवंत, गीतेचे अभ्यासक,(जन्म: ८ ऑगस्ट १८९७ )**१९६७: नारायण श्रीपाद राजहंस तथा ’बालगंधर्व’ –गायक व नट(जन्म: २६ जून १८८८ )**१९१९: एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ आक्टोबर १८५२ )**१९०४: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही.(जन्म: २९ जानेवारी १८६० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आषाढी एकादशी निमित्ताने काही रचनाहरी ओम विठ्ठला । नाम तुझे मुखी ।।एकच प्रार्थना देवा । ठेव सर्वाना सुखी ।।..... रचना वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्राला जगातील सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याचे माझे ध्येय आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतांना म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *BRS पुन्हा महाराष्ट्रात कमबॅक करणार, विधानसभेला रंगत येणार, दोन पक्षांशी बोलणी सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य ? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो...विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील तफावतीमुळे हा गोंधळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रोहित आर्य यांचा भाजपमध्ये प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा-BSNL यांच्यात 15 हजार कोटींचा करार, जिओ, एअरटेलचं टेन्शन वाढणार ?*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *8 आमदारांची कॉंग्रेसमधून होणार हकालपट्टी ? विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळला नाही, 19 जुलैला होणार मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 च्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून हरविलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙 **************************ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू. आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू. हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्याचे तीन भाग आहेतः प्रथम जिज्ञासा - जी सत्याची आराधना असते , दुसरे ज्ञान - जी सत्याची उपस्थिती असते. व तिसरा विश्वास - जो सत्याचा उपभोग आहे. ------ बेकन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विम्बल्डन टेनिस स्पर्धेची महिला एकेरीची चॅम्पियन कोण ठरली आहे ?२) 'विदर्भाचे नंदनवन' असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते ?३) युरो चषक फुटबॉल स्पर्धा - २०२४ चा अंतिम सामना कोणत्या दोन संघादरम्यान झाला ?४) 'ठक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) झिका विषाणू कोणत्या नावाच्या डासापासून पसरतो ? *उत्तरे :-* १) बार्बरा क्रिचिकोवा, झेक प्रजासत्ताक २) चिखलदरा, अमरावती ३) स्पेन व इंग्लंड ४) लबाड ५) एडिस*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी हिवराळे, शिक्षक तथा पत्रकार👤 शुभम बतुलवार, धर्माबाद👤 राजेश्वर डोमशेर, उच्चश्रेणी पदोन्नत मुख्याध्यापक, नायगाव👤 श्रीकांत जोशी, शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल नागोबा हिमगिरे, शिक्षक, धर्माबाद👤 वसंत बोनगिरे👤 शंकर हंड्रे, शिक्षक, देगलूर👤 सचिन खंडगावे👤 गंगाधर वि. बिज्जेवार, सेवानिवृत्त शिक्षक, सिडको, नांदेड👤 राजू कदम👤 विजयकुमार पाटील घुलेकर👤 संतोष ईबीतवार, येवती, धर्माबाद👤 विष्णुराज कदम, पांगरी, धर्माबाद👤 नवाज शेख👤 पांडुरंग चंदवाड👤 आनंद गाजेवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दस द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन।रहने को अचरज नहीं जात अचम्भा कौन॥11॥अर्थ – इस शरीर को ही कबीर साहेब पिंजरा कहते है इसमें दस द्वार है , २ आँख , २ कान , २ नाक , १ मुँह , १ मल द्वार , १ मूत्र द्वार , कुल हुए ९ , और एक दसवा जो है जो की गुप्त है , उसी द्वार से इस शरीर में प्राण डाला जाता है और उसे बंद कर दिया जाता है , उसी द्वार को खोलने की चाभी सच्चे सद्गुरु के पास होता , जो भक्त सच्ची लगन से अभ्यास करता है , तो सद्गुरु की कृपा से वो १० वा द्वार खुलता है और वो स्वयं को जान पाता है और उस सत्यपुरुष को देख और जान पता है।।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वेळ सर्वांवर येते आणि एक दिवस निघून जाते. फक्त, त्या आलेल्या वेळेत हिंमत हारू नये. तर त्या बहुमूल्य वेळेचे आनंदाने स्वागत करावे. त्या वेळेत नेमकं काहीतरी विशेष असेल म्हणूनच वेळेचे येणे, जाणे आवश्यक असते असे म्हटल्या जाते. म्हणून त्या प्रसंगी स्वतः खंबीर रहावे व जगण्याचा प्रयत्न करावा. भविष्यात सांगता येत नाही त्याच वेळेपायी आपल्याला सर्वस्व काही मिळूही शकते. कारण राजाचा रंक आणि रंकाचा राव होण्यासाठी ती वेळच ठरवत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक डोळा असलेले हरीण* एका हरीणाचा एक डोळा फुटलेला होता , म्हणून ते, समुद्राच्या बाजूला आपल्याला मारायला कोणी येणार नाही ,' या विश्वासाने चरत असे , पण त्याची शिकार करण्यासाठी एक टपलेला शिकारी , होडीत बसून समुद्राच्या मार्गाने आला आणि त्याने 🔫 बंदुकीच्या गोळी ने त्याचा प्राण घेतला. मरतांना हरीण मनात म्हणाले , " अरेरे ! ज्या बाजूने धोका नाही असे वाटले त्या समुद्राकडून माझा घात झाला." *_🌀तात्पर्य_ ::~* *ज्याच्याबद्दल अतिशय विश्वास वाटतो, त्याच्याकडूनच बर्याच वेळा विश्वासघात होतो.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2024💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2023/11/ek-tarikh.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महाराष्ट्र कृषी दिन_**_राष्ट्रीय डॉक्टर दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १८३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९७:शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.**१९६४:न.वि.गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.**१९६२:सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.**१९६०:रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.**१९५५:’स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली.**१९४९:त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले.याचेच पुढे केरळ राज्य बनले.**१९४८:बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना**१९४७:फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.**१९०९:क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.**१८८१:कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.**१८३७:जन्म,मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:बाळासाहेब साहेबराव चन्ने -- लेखक कवी**१९८५:सहादेव पुरासे-- कवी**१९७९:विशाल सुधाकरराव कन्हेरकर-- कवी,लेखक* *१९७९:सुरेश मारोतराव हिवाळे-- कवी, लेखक* *१९७९:लीना भुसारी-खैरकर-- कवयित्री* *१९७८:रवींद्र उद्धवराव भयवाळ-- लेखक,समीक्षक,संपादक* *१९७८:लीलाधर रामेश्वरजी दवंडे--कवी, लेखक**१९७६:प्रा.डॉ प्रवीण श्रीकृष्ण बनसोड-- लेखक**१९७५:प्रा.डॉ.अनंता सूर-- प्रसिद्ध कवी लेखक,समीक्षक,संपादक* *१९७४:प्रा.डॉ.शिवाजी भिकाजीराव हुसे-- कवी,लेखक,संपादक* *१९७३:अशोक गोविंदरावजी इंजेगांवकर -- कवी,लेखक* *१९७३:गणेश शिवराम भाकरे -- प्रसिद्ध कवी* *१९७२:काशिनाथ (का.रा.) चव्हाण -- प्रसिद्ध कवी* *१९७२:अशोक पवार -- प्रसिद्ध लेखक* *१९७१:श्रीकांत बापूराव पेठकर-- लेखक कवी**१९७१:पंडित दिंगाबर कांबळे -- कवी, लेखक* *१९७१:सीमा गजानन भसारकर -- कवयित्री* *१९७०:परसराम रामा आंबी-- लेखक**१९६९:सुरेश महादेवराव देशमुख -- लेखक**१९६८:प्रा.धनंजय श्रीकृष्ण पटोकार -- कवी**१९६८:गौतम रामराव कांबळे-- कवी* *१९६७:विठ्ठल नागेश गावडे परवाडकर -- नाटककार,लेखक,कवी* *१९६७:संजय महिपती पाटील-- कवी,लेखक**१९६७:गोविंद चव्हाण-- नाट्य निर्माते (मृत्यू:१३ जुलै २०२०)**१९६६:उस्ताद राशिद खान – रामपूर- साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक**१९६५:उत्तम अमरसिंग राठोड-- कवी* *१९६४:अशोक सीतारामजी कोसरे - कवी, लेखक* *१९६३:रेखा अशोक ढोले-- कवयित्री* *१९६३:परमेश्वर श्रीराम व्यवहारे-- कवी, लेखक* *१९६३:अनिल मनोहर खोब्रागडे- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६३:डॉ सतीश पावडे-- लेखक,समीक्षक, नाट्यलेखक**१९६२:बा.बा.कोटंबे -- लेखक* *१९६२:जयकुमार चर्जन-- लेखक* *१९६२:गजानन श्रीराम निमकर्डे-- लेखक* *१९६१: वसंत नारायण चंन्ने-- कवी,लेखक* *१९६१:कल्पना चावला–भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर(मृत्यू:१ फेब्रुवारी २००३)**१९६०:सुदेश भोसले-- मिमिक्री आर्टिस्ट, प्रसिद्ध गायक* *१९६०:डॉ.किरण कृष्णराव नागतोडे-- प्रसिद्ध लेखिका* *१९६०:चुडाराम हिरामण बल्हारपुरे -- लेखक**१९६०:युवराज गंगाराम-- समीक्षक,लेखक, कवी* *१९५९:अमर हरसिंग राठोड -- लेखक तथा निवृत्त उपविभागीय अभियंता* *१९५८:रामचंद्र गोविंद कुलकर्णी- प्रसिद्ध कवी,लेखक तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८:प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक* *१९५७:प्रा.डॉ.दिलीप व्यंकटेश अलोणे -- प्रसिद्ध लेखक,निवेदक* *१९५६:आदित्य राज कपूर-- अभिनेता,चित्रपट निर्माता,लेखक**१९५४:सुधीर जाधव -- लेखक* *१९५४:प्रा.डॉ.राम बोडेवार -- लेखक* *१९५३:डॉ.युवराज सोनटक्के--प्रसिद्ध कवी, लेखक**१९५३:नंदू होनप-- मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक (मृत्यू:१७ सप्टेंबर २०१६)**१९५२:नरेश नारायण चव्हाण-- कवी* *१९५२:विठ्ठल पांडुरंग पाटील-- लेखक,कवी तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९५१:विठ्ठल उंदराची घोडे -- कवी,लेखक* *१९५०:प्रा.डॉ.सुभाष जगन्नाथ गढीकर -- लेखक,समीक्षक* *१९५०:डॉ श्रीपाल सबनीस-- सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९४९:वेंकय्या नायडू – माजी.उपराष्ट्रपती, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष**१९४९:प्रा.यशवंत माळी-- सुप्रसिद्ध कथाकार**१९४९:मेहुल कुमार-- भारतीय चित्रपट निर्माता,चित्रपट दिग्दर्शक आणि कथा लेखक**१९४८:अनंत प्रभाकर देशमुख--समीक्षक**१९४८:उद्धव पिठूजी नारनवरे-- लेखक**१९४६:हिरामण लांजे-- प्रसिद्ध कवी, लेखक,झाडी बोली साहित्याचे गाढे अभ्यासक* *१९४५:विजय पुरूषोत्तम नाईक-- प्रसिद्ध लेखक,अनुवादक,सकाळ वृत्त समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक**१९३९:दौलतभाई आयुब खा पठाण-- कवी, लेखक* *१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक,पद्मविभूषण**१९३७:शामराव गोविंदराव लाघवे-- लेखक* *_१९१३:वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,रोजगार हमी योजनेचे जनक,हरित क्रांतीचे प्रणेते राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले.रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि नंतर ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली (मृत्यू:१८ऑगस्ट १९७९)_**१९०७:प्रा.पा.कृ.सावळापूरकर -- लेखक,जुन्या पिढीतील संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९५)**१८८७:कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू:१९२०)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार,प्रकाशयोजक व नाट्य संघटक* *१९८९:प्राचार्य गणेश हरी पाटील – कवी, शिक्षणतज्ञ,बालगीतकार (जन्म:१९ आगस्ट १९०६)**१९६९:मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार**१९६२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी,भारतरत्न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, (जन्म:१ ऑगस्ट १८८२)**१९३८:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते,’वर्हाडचे नबाब’ (जन्म:२७ ऑगस्ट १८५४)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* *🙏श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - एक तारीख*गौरी आणि शंकर यांचा सुखाचा असा संसार होता. ना कोणाची कटकट ना कोणाची झिकझिक. महिन्याच्या एक तारखेला पगार झाला की शंकर घरी परत येत असताना बायकोसाठी गजरा घ्यायचा, लेकरांसाठी काही तरी खाऊ घ्यायचा आणि स्वतःसाठी .................. पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्याच्या मुख्य सचिव पदी पहिल्या महिला अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भुशी धरणावर पर्यटनासाठी गेलेले ५ जण गेले वाहून त्यात ४ मुलं आणि एका महिलेचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवीमुबंईतील बेलापूर व्हीलेज स्मार्ट होणार – आ. मंदा म्हात्रे*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ओबीसी बांधवानो शांतता बाळगा – मनोज जरांगे यांचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आरोग्य वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विराट कोहली आणि रोहित शर्मा पाठोपाठ रवींद्र जडेजानं देखील टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *द. आफ्रिकेला 7 धावाने हरवून भारताने T20 वर्ल्ड कप केले आपल्या नावावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙 *************************मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही.त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती. वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली.त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे. अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी माणसं कधीही साथ देत नाहीत."* *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा किताब कोणत्या संघाने जिंकला ?२) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ च्या अंतिम सामन्याचा 'सामनावीर' कोण ?३) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा 'मालिकावीर'चा किताब कोणी जिंकला ?४) टी - २० चा वर्ल्ड कप भारताने कितव्यांदा जिंकला ?५) टी - २० वर्ल्ड कप - २०२४ चा उपविजेता संघ कोणता ? *उत्तरे :-* १) भारत २) विराट कोहली ३) जसप्रीत बुमराह ४) दुसऱ्यांदा ५) दक्षिण आफ्रिका*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती प्रमिला सेनकुडे, उपक्रमशील शिक्षिका, हदगाव👤 लक्ष्मणराव मुपडे, शिक्षक, धर्माबाद👤 श्री. मोहन पवार, राळेगाव जि. यवतमाळ👤 गजानन कवळे, शिक्षक, उमरी👤 विशाल कन्हेरकर, साहित्यिक👤 श्रीकांत चरलेवार, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 मारोती कांडले, शिक्षक, किनवट👤 पंढरीनाथ खांड्रे, करखेली👤 बालाजी भगनूरे, शिक्षक, देगलूर👤 दिगंबर नागलवाड, शिक्षक, उमरी👤 डॉ. हनुमंत भोपाळे, समुपदेशक, नांदेड👤 भूमन्ना अबुलकोड, विमा प्रतिनिधी, धर्माबाद👤 नागोराव रायकोड, धर्माबाद👤 विलास नंदूरकर👤 मधुसूदन पांचाळ, शिक्षक, धर्माबाद👤 विजय निलंगेकर, पत्रकार तथा गायक, नांदेड👤 सय्यद इलियास जुक्कलकर, देगलूर👤 व्यंकटेश बतुलवार, शिक्षक, धर्माबाद👤 तुकाराम मुंगरे, मुख्याध्यापक, नांदेड👤 संजीव वाठोरे, शिक्षक, नांदेड👤 हणमंतु देसाई, संपादक, धर्माबाद👤 मोरेश्वर गायधने, शिक्षक, भंडारा👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 चंद्रकांत कदम, शिक्षक तथा कवी, नांदेड👤 बाबासाहेब डोळे👤 मारोती आर. भुसेवार👤 राजू पांचाळ👤 बालाजी भाऊराव डाके पाटील👤 अशोक तुळशीराम कांबळे, सेवानिवृत्त शिक्षक, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *कबीरवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बड़ा हुआ तो क्या हुआजैसे पेड़ खजूर। पंथी को छाया नहींफल लागे अति दूर।।(अर्थ- जिस प्रकार खजूर का पेड़ इतना ऊंचा होने के बावजूद आते-जाते राही को छाया नहीं दे सकता है और उसके फल तो इतने ऊपर लगते हैं कि आसानी से तोड़े भी नहीं जा सकते हैं। उसी प्रकार आप कितने भी बड़े आदमी क्यों न बन जाए लेकिन आपके अंदर विनम्रता नहीं है और किसी की मदद नहीं करते हैं तो आपका बड़ा होने का कोई अर्थ नहीं है।)।। संत कबीर ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समोरासमोर उभे राहून सत्य बोलण्याची, सत्य ऐकण्याची किंवा सत्य वाचण्याची ज्याच्यात हिंमत नसते. तीच व्यक्ती मागे राहून पाठीवर वार करण्यासाठी नेहमीच तरबेज असते. मग ते कशाच्याही माध्यमातून का असेना ? त्याला ते कार्य पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही. असेही काही बोलते, चालते माणसे समाजात असतात. ते मुक्या प्राण्यांपेक्षा सुद्धा घातक असतात. त्यांना कधीही घाबरू नये. तसेच याच समाजात सुद्धा काही चांगलेही माणसं असतात ज्याच्याच खरी सत्यता असते. तीच व्यक्ती, सत्याला समर्पित असते अशा व्यक्तीच्या कायम सहवासात रहावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वकष्टाची प्रचिती मौलिक*एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला. त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी, असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला. त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले. परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात ते फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही. ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे, याची त्याला जाणीव झाली. आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा लाभते. पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही*तात्पर्य* :- श्रमाचे, प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 ऑक्टोबर 2024💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~🟡 *आजचा रंग - पिवळा* 🟡नवरात्र विशेष - तुळजापूरची तुळजाभवानीLink - http://nasayeotikar.blogspot.com/2024/10/tulajabhavani.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *घटस्थापना दिवस* ••••••••••••••••••••••••••••••••🟡 *_ या वर्षातील २७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४: भारतातील सर्वात लांबवर धावणारी हिमसागर एक्सप्रेस कन्याकुमारी ते जम्मूतावी दरम्यान सुरू* *१९९०: पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.**१९३५: जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने इथिओपिया पादाक्रांत केले.**१९३२: इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८८०: पहिली मराठी संगीत नाटक "शाकुंतल" चा प्रयोग**१७७८: ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: प्रा. संतोष गोनबरे -- लेखक**१९७५: शुभानन चिंचकर -- लेखक**१९७२: शिल्पा जितेंद्र खेर-- लेखिका**१९६९: सुखचंद वाघमारे -- कवी* *१९६८: डॉ. शीतल शिवराज मालुसरे -- लेखिका, कवयित्री,निवेदिका* *१९६७: पुलिंद चंद्रकांत सावंत -- लेखक, अनुवादक**१९६६: सुनील बर्वे -- मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते**१९६४: प्रा. डॉ. गंगाधर विठोबाजी कायंदे-पाटील -- लेखक, विचारवंत* *१९६०: श्रीपाद अनिल गोरे -- लेखक* *१९४९: जे. पी. दत्ता – चित्रपट दिग्दर्शक**१९४५: मंजिरी ताम्हणकर -- लेखिका**१९४३: वामन नथुजी तिरबुडे -- लेखक* *१९४२: प्रा. प्रभाकर दत्तात्रय म्हारोळकर -- कवी, लेखक* *१९२८: प्रा.जनार्दन रा. कस्तुरे -- लेखक (मृत्यू: ६ ऑगस्ट २००६ )**१९२१: रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (मृत्यू: २३ जून १९९६ )**१९१९: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (मृत्यू: ९ जानेवारी २०१३ )**१९०६: गोविंद विनायक देवस्थळी -- संस्कृत विषयाचे अभ्यासक,संशोधक(मृत्यू: १४ मार्च १९९४ )**१९०३: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जानेवारी १९७२ )**१९०२: नारायण माधव सरपटवार-- विदर्भातील जुन्या पिढीतील नामवंत कवी (मृत्यू: २२ मार्च १९८८ )**१९०२: केशव रावजी पुरोहित -- पत्रकार, कादंबरीकार (मृत्यू: १० फेब्रुवारी १९६१ )**१९००: श्रीपाद शंकर नवरे -- लेखक,संपादक(मृत्यू: ७ डिसेंबर १९७८ )* *१८९८: राधाबाई पांडुरंग आपटे -- कवयित्री, लेखिका* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡 •••••••••••••••••••••••••••••••••••••• *२०२१: घनश्याम नायक -- भारतीय नाटक,आणि दूरदर्शन अभिनेता (जन्म: १२ मे १९४४ )**२०२०: प्रा. पुष्पा भावे -- स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार (जन्म: २६ मार्च, १९३९ )**२०१२: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे माजी राज्यपाल,दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६ )**१९९९: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (जन्म: १० जानेवारी १९०३ )**१९९९: अकिओ मोरिटा – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक (जन्म:२६ जानेवारी १९२१)**१९७३: साधना बोस --- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना (जन्म: २० एप्रिल १९७३ )**१९६६: अनंत बाळकृष्ण अंतरकर -- हंस, मोहिनी, नवल या नियतकालिकांचे संस्थापक संपादक ( जन्म: १ डिसेंबर १९११ )**१९५९: दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’- विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक(जन्म: २२ सप्टेंबर १९०९ )**१९४३: विष्णुपंत पागनीस -- ज्येष्ठ अभिनेते, गायक (जन्म: १५ नोव्हेंबर १८९२ )**१८९१: एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२ )**१८६७: एलियास होवे– शिवणयंत्राचा संशोधक (जन्म: ९ जुलै १८१९ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भारतातील कर्तृत्ववान महिला*... झाशीची राणी लक्ष्मीबाई ...राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर तर जन्मनाव मनकर्णिका असे होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीची नायिका राणी लक्ष्मीबाई होत्या, ज्यांनी अगदी लहान वयातच ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला होता. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.राणी लक्ष्मीबाई यांच्या धाडसी कार्याने फक्त इतिहासच नाही रचला तर, सर्व स्त्रियांच्या मनात एक धाडसी ऊर्जा निर्माण केली.मेरी झांशी नहीं दूगी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारी महाराणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि त्यांच्या विजयाच्या गाथा इतिहासाच्या पानावर लिहिल्या गेल्या आहेत. झांसी या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिश राज्याविरुद्ध लढा देण्याचे धाडस केले आणि नंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली. लक्ष्मीबाईं यांच्या पराक्रमाचे किस्से आजही आठवतात. राणी लक्ष्मीबाई यांनी त्याग आणि धैर्याने केलेल्या कृतीतून केवळ भारत देशच नाही तर संपूर्ण जगातील महिलांचे नाव गर्वाने उच्च केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे जीवन अमरत्व, देशप्रेम आणि बलिदानाची एक अनोखी गाथा आहे.पुढील भागात :- राजमाता जिजाऊसंकलन by नासा येवतीकर~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आरती सरीन बनल्या AFMS ( भारतीय सशस्त्र दल वैद्यकीय सेवा ) च्या पहिल्या महिला महानिर्देशक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *La Nina च्या प्रभावामुळे यंदा पडणार कडाक्याची थंडी, IMD ने दिला भारतीयांना हवामानाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पश्चिम आशियात युद्धाचा भडका...इराणचा इस्त्रायलवर तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा, स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जागावाटपात अधिकच्या 10 जागा मिळण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रयत्न, थेट गृहमंत्री अमित शाहांसोबत खलबतं; प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शाहांची दोनदा घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडक्या बहिणींना बोनस, नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार, 10 तारखेपर्यंत खात्यात पुन्हा 3 हजार जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, दोन वैमानिक आणि एका इंजिनिअरचा मृत्यू, दाट धुक्यामुळे अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इराणी चषक स्पर्धेत सरफराज खानचा विक्रम, मुंबईचा पहिला द्विशतकवीर तर चौथा तरुण खेळाडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवरात्रीच्या दिवसात आजचा रंग पिवळापिवळ्या रंगाबद्दल माहिती : - पिवळा हा मानवी इतिहासातला सर्वात जुन्या रंगांपैकी एक आहे. - पिवळा हा रंग सूर्यप्रकाशाचा असल्याने ऊर्जेशी संबंधित आहे. - पिवळा रंग लाल रंगाशी एकत्रितपणे उष्णता आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग आनंद आणि उर्जेचे प्रतीक आहे. - पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे. - पिवळा रंग एकाग्रता आणि स्मरणशक्तीसाठी चांगला असतो. - पिवळा रंग तेजस्वी आणि शुद्ध असल्याने लक्ष वेधण्यासाठी प्रभावी आहे. - पिवळा रंग डिझाइनमधील महत्त्वाच्या घटकांना ठळक करण्यासाठी वापरला जातो. - पिवळा रंग अंधारात लवकर ओळखू येतो. - स्कुल बस पिवळ्या रंगाचीच असतात. - घरात आणि परिसरात आपणास अनेक पिवळे वस्तू दिसतात त्याची यादी करू या. उदा. हळद*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *रोज एक full form* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*Cef - Capital Expenditure Fund (in finance)*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••संकटांना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता. -- कार्लाइल*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशी गाईला *'राज्यमाते'* चा दर्जा देणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ?२) देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) नामिबिया हा देश कोणत्या खंडात आहे ?४) 'बैल' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'झोत' या पुस्तकाचे लेखक कोण ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र ( २०२४ ) २) उत्तराखंड ( २०१८ ) ३) आफ्रिका ४) वृषभ, पोळ, खोंड ५) डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ साहित्यिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. रुपेश बालाजी सुंकेवार, देगलूर👤 कु. पूर्वा श्यामसुंदर माडेवार, पुणे👤 नागेश क्यातमवार, शिक्षक, नांदेड👤 साईनाथ राचेवाड, शिक्षक, बिलोली👤 संदीप कडलग, आरमुर, तेलंगणा👤 विश्वनाथ आरगुलवार, धर्माबाद👤 रणजित चांदवाले👤 पांडुरंग यलमलवाड👤 मारोती नरवाडे👤 शंकर पाटील👤 शंकर दरनगे👤 शिवाजी पांडुरंग मुटकुले👤 नागनाथ लाड, शिक्षक, कुंडलवाडी👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अंतकाळीं मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं । म्हणोनियां ह्रषिकेशी । शरण मी तुज आलों ॥१॥ नवमास गर्भवासीं । कष्ट जाले त्या मातेसी । ते निष्ठुर जाली कैसी । अंतीं दूर राहिली ॥२॥ जीवीं बाळाची आवड । मुखीं घालूऊनि करी कोड । जेव्हां लागली येमवोढ । तेव्हां दुरी राहिली ॥३॥ बहिणी बंधूचा कळवळा । तें तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशृंखळा । तेव्हां दुरी राहिली ॥४॥ कन्या पुत्रादिक बाळें । हे तंव स्नेहाचीं स्नेहाळें । तुझ्या दर्शनाहुन व्याकुळ । अंतीं दूर राहिलीं ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणाला अति सुख प्राप्त होते तर कोणी धन संपत्तीने मालामाल असतात. कोणाच्या पायाशी प्रसिध्दी लोळत असते तर कोणाच्या वाट्याला फक्त आणि फक्त माणसांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. यातील आपापल्या परीने योग्य असतात पण, शेवटपर्यत कोणतेही काहीच टिकून राहत नाही. कारण पाहिजे त्या प्रकारचे त्यातून समाधान मिळत नाही . म्हणून जेथून खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान मिळतो तेच श्रेष्ठ असते. शेवटी मानव सेवा हीच खरी सेवा म्हटले जाते. ज्याला या प्रकारची सेवा करण्याची संधी मिळत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो ती ,श्रीमंती कधीच संपत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कुंभाराचे प्रेम स्वरूप*आज मदन लाकूड तोडण्यासाठी इकडे तिकडे फिरला, पण त्याला एकही सुकलेले झाड सापडले नाही. त्याला निसर्गाची इतकी ओढ होती की त्याने कुऱ्हाडीच्या वाराने हिरवीगार झाडे तोडली नाहीत. त्यांनी झाडे आणि वनस्पतींना पुत्र मानले आणि मनुष्य कधीही पुत्राला मारू शकत नाही. मदन खूप गरीब होता, घरात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले होती. त्यांचा उदरनिर्वाह मदनच्या कामावरच चालत असे. मदन दिवसभर जंगलात फिरून लाकूड गोळा करायचा आणि संध्याकाळपर्यंत बाजारात विकायचा आणि खाण्यापिण्याचे पदार्थ घरी आणायचा. त्यामुळे संपूर्ण घराला दोन वेळची भाकरी खायला मिळत होती. न जाणो तो असा कोणता दिवस होता की आज त्याला एकही सुकलेले लाकूड किंवा वाळलेले झाड सापडले नाही. दमून तो एका जागी बसला.आज घरी नेण्यासाठी इतर कशाची व्यवस्था होऊ शकली नाही याचे त्याला खूप वाईट वाटले. विचार करता करता तो बेशुद्ध झाला आणि तिथेच पडून राहिला. निसर्ग नेहमीच माणसाचे रक्षण करतो, मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि निसर्गाच्या पुत्राप्रमाणे माणसाचे पालनपोषण करतो. मदनची अशी अवस्था पाहून प्रकृतीतही दुःखाचे वातावरण होते. मग अचानक एक विचित्र घटना घडते, झाडांवरून थंड वारा वाहू लागतो. मदनला अचानक जाग आली तेव्हा त्याला त्याच्या जवळ कपड्यांचे बंडल दिसले. झाडांवरून वाहणाऱ्या वाऱ्याने हे बंडल मदनाच्या जवळ आला. या बंडलचे रहस्य असे होते – काही दिवसांपूर्वी जंगली डाकू एका भल्या माणसाला लुटून पळून जात असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो डोंगरातील दुर्गम दरीत पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पडताना हा कपड्याचे बंडल दरोडेखोरांच्या हातातून निसटला आणि झाडाला लटकला. आज गरजेच्या वेळी मदनला त्या पैशातून मदत करता आली.नैतिक – जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा निष्पाप लोकांना त्रास देऊ नका तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला मदत करतो. जेव्हा तुम्ही निसर्गाची हानी करता तेव्हा निसर्गही तुमची हानी करतो, ही हानी दीर्घकालीन असते.••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 मार्च 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟣 *_जागतिक वन्यजीव दिन_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील ६२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ’ग्लोबल फायर’ या मुलुखावेगळ्या विमानातून एकट्याने आणि पुन्हा इंधन न भरता ६७ तासात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली**२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या 'शरच्चंद्र चटोपाध्याय' पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ.सरोजिनी वैद्य यांची निवड**१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ’ग्रॅमी पुरस्कार’ प्रदान**१९९१: रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे भरले**१९७३: ओरिसात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.**१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे सहावे कुलगुरू झाले.**१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार**१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.**१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.**१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.*🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: श्रद्धा कपूर -- भारतीय सिने-अभिनेत्री**१९८९: मिलन ज्ञानेश्वर बडगे -- लेखक* *१९८६: सुरजकुमारी गौरीशंकर गोस्वामी -- कवयित्री**१९८१: मेघराज यादवराव मेश्राम -- कवी, लेखक**१९७७: अभिजीत कुंटे – भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर**१९७७: अंकुश रा. शिंगाडे -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९७५: लोकेश गुप्ते -- मराठी फिल्म अभिनेता, दिग्दर्शक* *१९७०: इंझमाम उल हक – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९६७: शंकर महादेवन – गायक व संगीतकार**१९६२: प्रा. डॉ. प्रकाश नारायण मोगले -- लेखक, कवी* *१९६१: प्रमोद पांडुरंग काकडे -- लेखक, कवी**१९५८: शुभांगी चंद्रशेखर पासेबंद -- प्रसिद्ध लेखिका* *१९५५: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२ )**१९५४: डॉ. प्रल्हाद गोविंदराव लुलेकर -- प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते* *१९५३: सुधाकर विठ्ठल दिक्षीत -- प्रसिद्ध कथाकार**१९५१: डॉ. दिलीप गणेश देवधर -- आरोग्य विषयक लेखन करणारे लेखक**१९५०: अर्चना विनोद अलोणी -- लेखिका (मृत्यू: २९ जुलै २०२४ )* *१९४९: उत्तम धोंडू कोळगांवकर -- प्रसिद्ध कवी, बालसाहित्यिक* *१९४७: मृणालिनी माधव केळकर -- लेखिका, अनुवादक**१९४७: शंकर ऊर्फ काका बडे -- ज्येष्ठ मराठी कवी (मृत्यू:१ सप्टेंबर २०१६ )* *१९४३: माधवराव खाडिलकर -- लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते ( मृत्यू: ३ फेब्रुवारी २०२४)**१९४१: भालचंद्र शंकर देशपांडे -- प्रसिद्ध लेखक (मृत्यू: १३ ऑक्टोबर २०२४ )**१९४१: अनिल मेहता -- मेहता पब्लिकेशनचे संस्थापक**१९४१: गोविंद दिवाकर ठेंगडी -- कवी* *१९३९: एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू,शैलीदार फलंदाज (मृत्यू: ६ जुलै १९९९ )**१९३३: वामन गणपतराव इंगळे -- कवी, लेखक**१९३१: उस्ताद गुलाम मुस्तफा खान-- भारतीय शास्त्रीय संगीतकार (मृत्यू: १७ जानेवारी २०२१ )**१९२८: पुरुषोत्तम पाटील -- मराठी साहित्यातील ख्यातनाम कवी आणि संपादक. (मृत्यू: १६ जानेवारी २०१७ )**१९२६: रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (मृत्यू: ७ मार्च २०१२ )**१९२३: सदाशिव नथोबा आठवले -- ललितलेखक, इतिहासकार (मृत्यू: ८ डिसेंबर २००१ )**१९०८: यज्ञेश्वरशास्त्री माधव कस्तुरे -- वेदान्ततीर्थ, संपादक, संस्कृत आचार्य, लेखक (मृत्यू: २४ ऑगस्ट २००६ )**१९०३: विनायक सदाशिव सुखटणकर -- कथाकार,संपादक (मृत्यू: १८ सप्टेंबर १९७७ )**१८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल – स्कॉटिश - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोनचा संशोधक (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२ )**१८४५: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)**१८३९: जमशेदजी नसरवानजी टाटा – आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (मृत्यू: १९ मे १९०४ )*🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: विजय हरी वाडेकर -- लेखक (जन्म: २७ सप्टेंबर १९३९ )**२०११: रविंदर कपूर (गोगा कपूर) --भारतीय अभिनेता (जन्म: १५ डिसेंबर १९४० )**२०११: अनंत लाल -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १९२७ )**२०००: रंजना देशमुख -- लोकप्रिय मराठी अभिनेत्री (जन्म:२३ जुलै १९५५ )**१९९५: पं. निखिल घोष – तबलावादक (जन्म: १९१९ )**१९८९: नारायण गोविंद कालेलकर -- प्रसिद्ध मराठी भाषाशास्त्रज्ञ(जन्म: ११ डिसेंबर १९०९ )**१९८२: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (जन्म:२ ८ ऑगस्ट १८९६ )**१९६५: अमीरबाई कर्नाटकी – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: १९०६ )**१९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते,हिंदुमहासभेचे अध्यक्ष आणि निष्ठावान टिळकानुयायी.(जन्म: १२ डिसेंबर १८७२ )**१९१९: हरी नारायण आपटे – कादंबरीकार (जन्म: ८ मार्च १८६४ )**१७०७: औरंगजेब – सहावा मोगल सम्राट (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८ )**१७०३: रॉबर्ट हूक – इंग्लिश वैज्ञानिक (जन्म: १८ जुलै १६३५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••**फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* समुहात join ..... होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली : वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीतील १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना ३१ मार्चनंतर पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, अशी घोषणा पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जुन्नर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने नारायणगाव परिसरात स्वच्छता अभियानातून काढला १४ टन कचरा !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू, 26 मार्चपर्यंत चालणार अधिवेशन, 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारने केल्या १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मनोज कुमार शर्मा यांची कायदा-सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ( ITI ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून डिजिटल लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : सुप्रसिद्ध कलावंत व व्याख्याते शरद पोंक्षे यांना ‘अभिनय कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने न्यूझीलंडला 45 धावाने हरविले, 04 मार्च रोजी दुबईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार सेमी फायनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 दादाराव कदम, सहशिक्षक, धर्माबाद👤 दया घोडगे, सहशिक्षक, उमरी👤 सायन्ना नरावाड, सहशिक्षक, बिलोली👤 युनूस अली, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, धर्माबाद👤 कैलास कासराळीकर👤 सुरज कुमारी गोस्वामी, साहित्यिक, हैद्राबाद👤 किशन जाधव👤 एकनाथ पाटील👤 जयश्री उमरीकर👤 अनिल गड्डम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 08*बेडूकराव जमिनीत झोपतात**आठ महिने तेथेच राहतात**सांगा मुलांनो या निद्रेला**विज्ञानप्रेमी काय म्हणतात?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - साप••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पाणी तप्त लोखंडाची संगत धरतं. कमळाच्या पानाची सोबत धरणारे पाणी, मोत्यासारखं चमकतं जे शिंपल्यांची संगत धरतं त्याचं मोती होतं.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *जगातील दुसरे पुस्तकाचे गाव* कोणते ?२) महाराष्ट्रातील 'जंगल रेशीमचे गाव' कोणते ?३) प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात किती सफाई कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ करून वर्ल्ड रेकॉर्ड केले ?४) 'हिम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारतातली सर्वात मोठी जीवनदायिनी नदी कोणती ? *उत्तरे :-* १) भिलार, सातारा २) उचाट, सातारा ३) १५ हजार ४) बर्फ ५) गंगा ( २,५२५ किमी )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 क्लोन म्हणजे काय ? 📙 आरशातील प्रतिमाच जर आपल्यासमोर उभी राहिली, तर ? असे प्रत्यक्ष घडणे अजून तरी शक्य नाही. पण त्या दिशेने अनुवंशशास्त्राचे प्रयत्न मात्र सतत चालू आहेत. स्वतःचे बीज पुनरुत्पादनासाठी राखून ठेवावे व अनंत काळाने त्यापासून वंश निर्माण करावा इथपर्यंतच आपली प्रगती थाटलेली आहे.क्लोन म्हणजे हुबेहूब जुळणारी, तंतोतंत तशीच निर्मिती. अनेकदा जुळी भावंडे आपल्याला वेगळी ओळखता येत नाहीत, अगदी तशीच एखाद्याची जुळी आकृती प्रत्यक्षात तयार करता आली तर त्याला क्लोन असे म्हणता येईल. यालाच प्रतिकृती म्हणता येईल काय ? निदान इथे तरी आपण तसे म्हणू यात.विश्वामित्राचा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न फसल्याची पुराणात नोंद आहे. अद्यापतरी सर्व प्रयत्न तसेच फसत आहेत. मात्र वनस्पतींमध्ये तंतोतंत प्रकृत प्रतिकृती निर्माण करण्यात अनेक बाबतीत यश मिळालेले आहे. झाडाच्या फांदीचा छाट, झाडाचा कलमासाठी बांधलेला डोळा, पानफुटीचा तोडलेला तुकडा ज्याप्रमाणे झपाट्याने अगदी हुबेहूब मूळ प्रतिकृती तयार करतो, तसे प्राण्यांच्या बाबतीत करायचा मानवाचा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेत या दिशेने यश बेडकांच्या बाबतीत मिळाले आहे. डॉक्टर गार्डन यांनी ऑक्सफर्डमध्ये १९६२ मध्ये बेडकांच्या अंड्यातील केंद्रक काढून घेतला व त्या जागी दुसऱ्या बेडकाच्या आतड्यातील अंतस्त्वचेच्या पेशी घातल्या. या पद्धतीने त्यांनी काही लहान लहान बेडूक तयार करण्यात यश मिळवले आहे. हे लहान लहान बेडूक अगदी एकसारखे व मोठ्या मूळ बेडकाची आठवण करून देणारे होते, कारण त्याच्याच जनुकांपासून त्यांची निर्मिती झाली होती.प्रतिकृती निर्माण करण्यातला मुख्य टप्पा म्हणजे मूळ आकृतीचे जीन्स व जनुके मिळवणे व त्यांची कृत्रिमरित्या वाढ करून त्यांपासून प्रतिकृती तयार करणे हा आहे. बीजांड फलित झाल्यावर निर्माण होणारा वंश एकतर स्त्री व पुरुष या दोघांपैकी एकासारखा असेल व दोघांचे थोडे थोडे रंगरूप घेतलेला असेल; पण प्रतिकृती निर्माण करताना फलित बीजांड वापरण्याची कल्पनाच मुळात नसते ! डॉली या नावाने प्रसिद्ध झालेल्या मेंढीची या पद्धतीने निर्मिती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. सस्तन प्राणिवर्गातील क्लोन पद्धतीच्या निर्मितीचा हा पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो. मानवी निर्मिती अशाच पद्धतीने शक्य आहे, असे त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. मात्र याच डाॅलीला काही वर्षांतच संधिवाताच्या आजाराने पछाडले. त्यामुळे अशा क्लोननिर्मिती प्राण्याच्या सक्षम जीवन जगण्याबद्दल प्रश्न उभे राहिले आहेत.निसर्गतः झाडांवर वाढणारे, पंख असलेले काही मोजके किडे (Aphids) या प्रकाराने स्वतःची निर्मिती करू शकतात. ही गोष्ट तशी अपघातानेच लक्षात आली आहे. या किटकातील एकाच वेळी निर्मितीसाठी नर वा मादी हे भेद अस्तित्वात नाहीत, हे लक्षात आले. तरीपण एकाच कीटकापासून जवळपास शंभर शंभर कीटक जन्माला येत असल्याचे नोंदले गेले आहे. यातूनच ही प्रतिकृती निर्माणाची बाब लक्षात आली. मानव सध्या जेनेटिक इंजिनिअरच्या साहाय्याने क्लोनची निर्मिती करू पाहत आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तूं माझी जननी काय गे साजणी । विठ्ठले धांवोनि भेट देई ॥१॥ डोळे माझे शिणले पाहतां वाटोली । अवस्था दाटली ह्रदयामाजीं ॥२॥ मी तुझें पाडस गुंतलों भवपाशीं । माते धीर तुजसी कैसा धरवला ॥३॥ तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज । क्षुधें पीडिलों मज विसरशी ॥४॥ तूं माझी माउली मी तुझें वोरस । पुढती पुढती वास पाहतसे ॥५॥ नामा म्हणे विठ्ठले आस पुरवीं माझी । ओरसे वेळां पाजीं प्रेमपान्हा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तीनही ऋतूमध्ये थंडी, पाऊस आणि ऊन जर सारखेच पडत राहिले तर पाहिजे तसं शेतात पीक निघणार नाही. एवढेच नाही तर मानवी जीवनाला व पशुपक्ष्यांना देखील धोका होऊ शकतो म्हणून ते तीनही ऋतू आपापल्या योग्य वेळेत बदलत असतात आणि ते सर्वांना फायदेशीर ठरत असतात. तसंच माणसानी सुद्धा परिस्थिती बघून आपल्यात थोडाफार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे सर्व काही करताना मात्र आपले सकारात्मक विचार व आपला स्वाभिमान कधीच सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मदत*शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले*तात्पर्य - आपण दुसर्याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 मार्च 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/02/vasantdada-patil.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔵 *_जागतिक नागरी संरक्षण दिन_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील ६० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••••• *१९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.**१९९२: बोस्निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.**१९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.* *१९४८: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना**१९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.**१९४६: ’बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण झाले**१९३६: अमेरिकेतील महाकाय ’हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.**१९२७: रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.**१९०७: ’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना**१८७२: ’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली**१८०३:ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९१: ओम् भुतकर -- मराठी नाट्य-चित्र अभिनेते, नाटककार आणि कवी**१९८८: संदीप लहू राठोड -- कवी**१९८७: चैतन्य ताम्हाणे -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक* *१९८४: चंद्रकांत भोपाळकर -- लेखक**१९८४: विशाल भा. मोहोड -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९८३: मंगते चुंगनेजंग मेरी कोम -- सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सिंगपटू* *१९८२: नंदिता पाटकर -- अभिनेत्री* *१९८०: विक्रम सोनबा अडसूळ -- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, लेखक**१९८०: शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७५: मनिषा टीकारामसिंग पाटील -- कवयित्री, लेखिका* *१९६८: सलील अशोक अंकोला -- भारतीय क्रिकेटपटू**१९६८: चित्रा क्षीरसागर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९६३: यशोधन बाळ -- मराठी अभिनेते* *१९५६: डॉ. सुरेश काशिनाथ हावरे -- प्रसिद्ध लेखक, विविध पुरस्कारांनी सन्मानित* *१९५१: अमित खन्ना -- भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि पत्रकार* *१९५१: नितिशकुमार -- मुख्यमंत्री बिहार**१९५०: डॉ छाया प्रकाश कावळे -- प्रसिद्ध कथाकार**१९४७: प्रा. रणजित मेश्राम -- प्रसिद्ध लेखक, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते**१९४७: शांताराम राजाराम हिवराळे -- प्रसिद्ध कवी,समीक्षक* *१९४७: बशीर मोमीन कवठेकर --- साहित्यिक ज्यांनी मराठी भाषेत लावणी, नाटक,धार्मिक भक्तिगीते, देशभक्तीपर गीते याबरोबरच विविध प्रकारची लोक गीते लिहिली (मृत्यू: १२ नोव्हेंबर २०२१ )**१९४६: इलाही जमादार --- सुप्रसिद्ध गझलकार (मृत्यू: ३१ जानेवारी २०२१ )**१९४५: जनार्दन शां. संखे -- लेखक**१९४५: शोभा फडणवीस -- माजी मंत्री तथा लेखिका* *१९४४: भाऊ पंचभाई -- मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, लेखक (मृत्यू: २१ जानेवारी २०१६)**१९४३: मोहन जोती देशपांडे -- लेखक**१९४३: प्रल्हाद केशव वकारे -- लेखक**१९४३: प्रा. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा -- इतिहासतज्ज्ञ, संशोधक, साहित्यिक**१९४२: इंद्राणी मुखर्जी -- भारतीय चित्रपट अभिनेत्री* *१९४०: श्याम एकनाथराव दाभाडे -- लेखक**१९३९: प्रा. विलास वाघ -- मराठी लेखक, संपादक, प्रकाशक तसेच सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: २५ मार्च २०२१ )* *१९३०: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू: १४ एप्रिल २०१३ )**१९२३: शांताबाई कृष्णाजी कांबळे -- लेखिका (मृत्यू: २५ जानेवारी २०२३ )**१९२२: नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी -- दासबोधाचे निरूपणकार (मृत्यू :८ जुलै २००८)**१९२२: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५ )**१९१४: भानुदास श्रीधर परांजपे -- कवी आणि नाटककार**१९१९: मधुकर(मधू) शंकर आपटे -- अभिनेता (मृत्यू: १३ मार्च १९९३ )**१९११: जयशंकर दानवे -- नटश्रेष्ठ आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध (मृत्यू: ३ सप्टेंबर १९८६ )**१९०१: बालाजी देवराव पाटील बोरकर -- संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ३० ऑगस्ट १९८० )**१८९६: श्रीधर बळवंत टिळक -- श्रीधरपंत म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी लेखक (मृत्यू: २५ मे १९२८ )*🔵 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔵 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१७: तारक मेहता -- गुजराती विनोदी लेखक, नाटककार व सदरलेखक (जन्म: २६ डिसेंबर १९२९ )* *२०१४: प्रफुल्ला दिलीप डहाणूकर -- मराठी चित्रकार (जन्म: १ जानेवारी १९३४ )**२००३: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२ )**१९९९: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (जन्म: १३ फेब्रुवारी १९१० )**१९९४: मनमोहन देसाई -- निर्माते, दिग्दर्शक (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७ )**१९९३: मनोहर शंकर ओक -- कवी, कादंबरीकार (जन्म: २७ मे १९३३ )**१९८९: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ )**१९५५: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म: ८ डिसेंबर १८७७ )~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सहकार महर्षी वसंतदादा पाटील*महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील होते. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्य सरकारच्या 500 सेवा आता व्हॉट्सॲप वर, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मुंबईच TECH HUB असल्याचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *‘देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल’ - मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धुळे : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धुळ्याचे सीईओ विशाल नरवाडे यांचा गौरव, विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नवी दिल्ली : यंदा मार्च महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत अधिक उष्णतेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नागपूर : वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्यासाठी महावितरणने सुरू केली लकी डिजिटल ग्राहक योजना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *RTE 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 10 मार्च पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आपल्या पदाचा दिला राजीनामा, हॅरी ब्रुक्स इंग्लंडचा नवा कर्णधार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 आशा तेलंगे, मुंबई👤 साहेबराव बोने, देगलुर👤 अमोल अलगुडे, उमरगा👤 राहुल मॅडमवार👤 साहेबराव गुंजाळ👤 नरेश सुरकूटलावार👤 संजय रामराव पाटील कदम, धर्माबाद👤 संतोष चिद्रावार👤 प्रभाकर गोरे👤 सौ. मीनल भाऊसाहेब चासकर👤 रुद्र व्यंकटेश पुलकंठवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 07*हा आहे शेतक-यांचा मित्र**नागपंचमीला काढतात चित्र**पाय नसतात सरपटत जातो**तो जमीन भुसभुशीत करतो*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - प्रकाश संश्लेषण••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'छावा' या चित्रपटाचे लेखन कोणी केले ?२) महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार कोणत्या गीताला देण्यात आला ?३) रणजी करंडकाचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात सुरू आहे ?४) 'हिंमत' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगात सगळ्यात दुःखी असलेला देश कोणता ? *उत्तरे :-* १) ओंकार महाजन २) अनादी मी अनंत मी ( स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर ) ३) विदर्भ व केरळ ४) धाडस, धैर्य ५) अफगाणिस्तान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुवां येथें यावेम कीं मज तेथें न्यावें । खंती माझ्या जीवें मांडियेली ॥१॥ माझें तुजविण येथें नाहीं कोणी । विचारावें मनीं पांडुरंगा ॥२॥ नामा म्हणे वेगीं यावें करुणाघना । जातो माझा प्राण तुजलागीं ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे आपल्याला हवे असते तेच मिळविण्यासाठी आपण रात्रंदिवस धावपड करत असतो. आणि एकदा ते मिळाले की, मनाला विशेष समाधान मिळत असते.पण, ज्यांना माणसाची व त्याकडून मिळणाऱ्या मदतीची खरी गरज असते, त्यांच्याकडे मात्र आपली लक्ष जात नाही. ही आजची वास्तविकता आहे. म्हणून स्वतः साठी जगण्याआधी जरा आजूबाजूला ही थोडी लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करून बघावा. जेणेकरून आपल्या एका सहकार्याने आणि माणुसकीच्या नात्याने एखाद्याला खूप मोठी मदत मिळू शकते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आयुष्याची खरी किंमत*एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.*तात्पर्य - तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=3514819611978121&id=100003503492582&mibextid=Nif5oz/2018/02/03.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_राष्ट्रीय विज्ञान दिन_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील ५९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२: महाराष्ट्र शासनाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान सुरू* *१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.**_१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला.त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणुन साजरा करण्यात येतो_**१९२२: इजिप्तला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस.एस.कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: प्रा. डॉ. दिपक सुभाषराव सूर्यवंशी -- लेखक* *१९७५: डॉ. बलवंत जेऊरकर -- साहित्य अकॅडेमी पुरस्कारप्राप्त अनुवादक,वक्ते, लेखक**१९७५: रत्ना यशवंत मनवरे -- कवयित्री* *१९६९: अनधा नितीन दिघे -- लेखिका, अनुवादक**१९६९: निर्मला सोनी -- कवयित्री* *१९६८: वर्षा उसगांवकर -- मराठी, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री**१९६६: क्षितीज झारापकर -- अभिनेता, लेखक, दिग्दर्शक (मृत्यू: ५ मे २०२४)**१९६५: सिद्धार्थ कुलकर्णी-- कवी, लेखक* *१९६४: डॉ. अशोक गोविंदराव काळे -- प्रसिद्ध लेखक* *१९६२: अशोक सदाशिव चोपडे -- लेखक, संपादक**१९६०: प्रमोद जोशी -- कवी, लेखक* *१९५१: करसन घावरी – भारतीय क्रिकेटपटू**१९४९: पद्मा तळवलकर -- भारतीय शास्त्रीय गायिका**१९४८: विदुषी पद्मा तळवलकर – ग्वाल्हेर/किराणा/जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका**१९४७: दिग्विजय सिंग --- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री**१९४४: रविन्द्र जैन – संगीतकार व गीतकार (मृत्यू: ९ ऑक्टोबर २०१५ )**१९४४: प्रा. सुरेश द्वादशीवार -- मराठी पत्रकार आणि प्रसिद्ध कादंबरीकार**१९४२: प्रा. डॉ. कुमुद दिनकर गोसावी -- प्रसिद्ध लेखिका* *१९४२: ब्रायन जोन्स – ‘द रोलिंग स्टोन्स‘चे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक (मृत्यू: ३ जुलै १९६९ )**१९३६: कुसुम रामचंद्र अभ्यंकर -- कादंबरीकार (मृत्यू: ५ एप्रिल १९८४ )**१९३४: जेनिफर केंडल-- इंग्लिश अभिनेत्री आणि पृथ्वी थिएटरची संस्थापक(मृत्यू: ७ सप्टेंबर १९८४ )**१९२७: कृष्णकांत – भारताचे १० वे उपराष्ट्रपती (मृत्यू: २७ जुलै २००२ )**१९२४: वसंत वैकुंठ कामत --- नाटककार (मृत्यू:३ जुलै १९९४)**१९१४: त्रिंबक कृष्णराव टोपे -- चरित्रकार, लेखक (मृत्यू: २० फेब्रुवारी १९९४ )* *१९१३: पंडित नरेंद्र शर्मा -- हिंदी भाषेतील भारतीय लेखक, कवी आणि गीतकार (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९८९ )**१९०९: जयंत देसाई (जयंतीलाल झिनाभाई देसाई) -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता (मृत्यू: १९ एप्रिल १९७६ )**१९०२: त्र्यंबक विष्णू पर्वते -- चरित्रकार, कवी, पत्रकार* *१९०१: लिनस कार्ल पॉलिंग – रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते,नोबेल पारितोषिकाचे दोनदा विजेते (१९५४ - रसायनशास्त्र, १९६२ - शांतता) (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९४ )**१९००: मोरेश्वर दिनकर जोशी -- शिक्षक, संस्थापक, संपादक (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९७९ )**१८९७: डॉ. शंकर दामोदर पेंडसे – मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४ )**१८९६: केशव वामन साठे -- नाट्यसमीक्षक (मृत्यू: ८ ऑगस्ट १९७५ )* *१८७३: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या ’सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.क्लेमंट अॅटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव –’सासरमाहेर’,’भाऊबीज’,’चाळ माझ्या पायांत’ या चित्रपटांचे त्यांनी कथा,संवाद व गीतलेखन केले होते.(जन्म: १२ एप्रिल १९१४ )**१९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या (जन्म: ३० जानेवारी १९२७ )**१९६६: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार.(जन्म: ३ ऑगस्ट १८९८ )**१९६३: डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (जन्म: ३ डिसेंबर १८८४ )**१९३६: कमला नेहरू – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी (जन्म: १ ऑगस्ट १८९९ )**१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले,त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही.कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ )* *_राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रासंगिक लेख*दुर्लक्षित विज्ञान विषय*..... डॉक्टर वा इंजिनिअर व्हायचे असेल तर विज्ञान शाखा निवडावी लागते त्याशिवाय डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. तसं पाहिलं तर सर्वानाच विज्ञान या विषयाची आवड असतेच अशातला ही भाग नाही मात्र आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे या हेतूने अनेक विद्यार्थी दहावीनंतर अकरावी-बारावीसाठी विज्ञान निवड करतात. त्यातल्या त्यात या विज्ञान शाखेची शिकवण्याची भाषा ही इंग्रजी असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलांना अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे, हे ही विशेष नोंद घेण्यासारखी आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाकुंभ 2025 संपन्न, 66 कोटी भाविकांचा पवित्र स्नान, मुख्यमंत्री योगी यांची विशेष स्वच्छता मोहीम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उपमुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार, मराठवाड्यातील एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राप्त केले 95 टक्के गुण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *न्यूयॉर्क : हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा वयाच्या 39 व्या वर्षी निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग कंपनीची नागपूरमध्ये १७४० कोटींची गुंतणवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - रवींद्र नाट्य मंदिर, लघु नाट्यगृह नव्या स्वरूपात, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इंजि. साईनाथ सुरेश येवतीकर, विजय नगर, नांदेड👤 राजेश्वर भंडारे, सहशिक्षक, धर्माबाद👤 आनंद आनेमवाड, लोकमत पुरस्कार प्राप्त शिक्षक👤 मारुती पाटील👤 प्रशांत चिखलीकर, सहशिक्षक, लातूर👤 शंकर गर्दसवार👤 श्रीकांत आदमवाड, सहशिक्षक👤 निर्मला सोनी, साहित्यिक, अमरावती👤 मुरलीधर राजूरकर, सहशिक्षक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 07*ही एक क्रिया वनस्पतींची**सूर्यप्रकाश शोषून घेतात**पानांच्या साहाय्याने मग**अन्न आपले तयार करतात*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - लाजाळूचे झाड••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महत्वाकांक्षेला किल्ली द्या, म्हणजे पराक्रमाचे काटे आपोआप फिरू लागतील.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भात 'स्टेट ऑफ आर्ट सेतू' कोठे आहे ?२) श्रीक्षेत्र आंभोरा येथे कोणत्या पाच नद्यांचा संगम होतो ?३) 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'क्षीर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जन्म झालेल्या पहिल्या बाळाचे नाव काय ठेवण्यात आले ? *उत्तरे :-* १) श्रीक्षेत्र आंभोरा, ता. कुही, नागपूर २) वैनगंगा, आम, कन्हान, मुरजा, कोलार ३) २८ फेब्रुवारी ४) दूध ५) कुंभ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••👨🏼⚕ *स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना काय समजते ?* 👨🏼⚕ **************************स्टेथोस्कोप नसलेल्या डॉक्टरची कल्पनाही आपण करू शकत नाही. किंबहुना एखाद्या डॉक्टराने रुग्णाची तपासणी करताना स्टेथोस्कोप वापरला नाही तर रुग्णाच्या कपाळावर नक्कीच आठ्या पडतात व "काहीच तर तपासले नाही" असे उद्गारही तो काढतो. याचाच गंमतशीर प्रकार खेड्यात बघायला मिळतो. गुडघा दुखला तर गुडघ्यालाही स्टेथोस्कोप लावण्याची बिकट अवस्था डॉक्टरवर येऊ शकते वा क्वचित व्यवसायाच्या दृष्टीनेही तो तसे मुद्दाम करतो. या स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना नेमके काय कळते, असा प्रश्न अनेकदा तुम्हाला पडला असेल. स्टेथोस्कोपमुळे डॉक्टरांना खूप काही कळते, हे जरी खरे असले तरी सगळेच काही कळते असे नाही.स्टेथोस्कोपचा छातीला लावण्याचा भाग, नळ्या व कानात ठेवायचे प्लग्ज असे तीन भाग पाडता येतील. छातीला लावण्याच्या भागास धातूची एक उघडी चपटी डबी व त्यावर एक पातळसा पडदा बसवलेला असतो. हा पातळ पडदा आवाजाची तीव्रता अनेक पटींनी वाढतो व त्यामुळे शरीरात निर्माण होणारे आवाज डॉक्टरांना ऐकू येतात. हृदय आकुंचन प्रसरण पावत असताना येणारे हृदयाचे ठोके, श्वास घेताना व सोडताना येणाऱ्या श्वसनाचे आवाज स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ऐकता येतात. त्यांच्याच झालेल्या बदलामुळे हृदयाच्या झडपांचे आजार, फुप्फुसाचा न्युमोनिया, क्षयरोग, दमा अशा आजारांचे निदान करता येते. याखेरीज पोटाला स्टेथोस्कोप लावल्यास आतड्यांच्या आकुंचन प्रसरणामुळे येणारे आवाज ऐकता येतात. या आवाजामुळे आतडय़ांत अडथळा (obstruction) निर्माण झाला असल्यास त्याचे निदान होऊ शकते. गर्भवती स्त्रीच्या पोटावर स्टेथोस्कोप ठेवून तिच्या गर्भाशयातील बाळाच्या हृदयाचे ठोकेही मोजता येतात. मूल जिवंत आहे वा नाही, त्याला पुरेसा रक्तपुरवठा होतोय वा नाही हेही स्टेथोस्कोप ने कळू शकते. यावरून लक्षात येईल की स्टेथोस्कोपने अनेक रोगांचे निदान करता येते; पण डोके दुखण्यास डोक्याला, गुडघा दुखल्यास गुडघ्याला वा मान लचकल्यास मानेला स्टेथोस्कोप लावून काहीच उपयोग होणार नाही !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें प्रेम माझे ह्रदाय आवडी । चरण मी न सोडी पांडुरंगा ॥१॥ कशासाठीं शीण थोडक्याकारणें । काय तुज उणें होय देवा ॥२॥ चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ॥३॥ नामा म्हणे मज अनाथा सांभाळी । ह्रदयकमळीं स्थिर राहे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात नको त्या विकारांचा ओझा धरून फिरत राहल्याने नेहमीच अस्वस्थता, चिंता जाणवत असते आणि एक सेंकद सुध्दा मनमोकळ्या पणाने जगता येत नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीत व्यक्तीला समाधान मिळत नाही. म्हणून जीवन जगत असतांना कितीही दुःख, संकटे आले तरी हसतमुखाने रहावे व मनमोकळेपणाने जगणे स्वीकारावे. कारण हसत राहल्याने चेहरा खुलून दिसतो सोबतच मनावरचा ताण, तणाव कमी होतो.म्हणून म्हणतात की, हसणे सुद्धा एकप्रकारचे जीवन आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संगत*एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी ०६:५० ते ०७:०० ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- २७ फेब्रुवारी २०२५💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2021/02/marathi-bhashaa-din.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔴 *_मराठी भाषा गौरव दिवस_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_ या वर्षातील ५८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी**१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक**१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.**१९४५: सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवडे येथे साने गुरुजी वाचनालय सुरू* *१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना**१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला (हैतीपासुन) स्वातंत्र्य मिळाले.*🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: संदीप सिंग -- प्रसिद्ध हॉकी खेळाडू* *१९८०: प्रा. डॉ. महेश बापुरावजी जोगी -- लेखक* *१९६७: प्रा. शुभांगी विकास रथकंठीवार -- कवयित्री, लेखिका* *१९६४: डॉ. सुभाष हरिभाऊ कटकदौंड -- प्रसिद्ध कवी, गझलकार, लेखक* *१९६१: रुजारिओ पास्कल पिंटो -- कवी, लेखक* *१९५८: डॉ. मोहन पुजार -- लेखक, अनुवादक तथा शास्त्रज्ञ**१९५७: नारायण जाधव -- लेखक, दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी* *१९५६: शिवाजी तांबे -- लेखक, विचारवंत तथा निवृत्त शिक्षण संचालक* *१९५५: प्रा. विजय तापस -- संपादक, नाट्य व कवितेचे अभ्यासक, समीक्षक (मृत्यू: १ सप्टेंबर २०२४ )**१९५२: अरविंद राणे -- प्रसिद्ध लेखक**१९५२: प्रकाश झा -- भारतीय चित्रपट निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक**१९४६: बा. ग. केसकर -- प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक**१९४६: मारोती तुकाराम खिरटकर -- लेखक* *१९४३: बुकनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा -- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री* *१९४२: अशोक पाथरकर -- मराठी लेखक तथा अनुवादक**१९४१: डॉ. ऊषा अरविंद गडकरी -- कवयित्री, लेखिका* *१९४१: श्याम मनोहर आफळे -- मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार**१९३४: सुरेश दामोदर जोशी -- क्यूरेटर, लेखक (मृत्यू: १६ ऑक्टोबर २०१२ )**१९३४: चंद्रशेखर व-हाडपांडे-- संतकवी, लोकशिक्षक, नाट्यलेखक (मृत्यू: २०१५ )**१९३२: एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (मृत्यू: २३ मार्च २०११ )**१९२६: ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका (मृत्यू: १७ जानेवारी २०१३ )**१९२१: आचार्य पार्वती कुमार (पार्वतीकुमार) -- भारतीय नृत्य दिग्दर्शक, नृत्य गुरु (मृत्यू: २९ नोव्हेंबर २०१२ )**_१९१२: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ’कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक, कवी व नाटककार (मृत्यू: १० मार्च १९९९ )_**१८९६: मधुकर गंगाधर पेडणेकर(पी.मधुकर) -- हार्मोनिअम वादक, संगीतकार (मृत्यू: २० जुलै १९६७ )**१८९४: कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १३ जून १८२२ )**१८६०: वैजनाथ काशीनाथ राजवाडे -- वाग्वैद्य, निरुक्त अभ्यासक, व्युत्पत्तिशास्त्रज्ञ (मृत्यु: १७ डिसेंबर १९४४ )**१८०७: एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (मृत्यू: २४ मार्च १८८२ )*🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: अजय वाढावकर -- हिंदी आणि मराठी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते( जन्म: १९५५ )**१९९७: श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार (जन्म: १९२४ )**१९९१: प्रा. डॉ.रुपराव पांडुरंग पाजणकर-- लेखक, संपादक, समीक्षक (जन्म: १९ जुलै १९३० )**१९५६: गणेश वासुदेव मावळणकर -- लोकसभेचे पहिले अध्यक्ष(जन्म: १५ मे १९५२ )**१९३६: इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) (जन्म: २६ सप्टेंबर १८४९ )**१९३१: क्रांतिकारक चंदशेखर आझाद -- काकोरी कट व लाहोर कट यातील पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू (जन्म: २३ जुलै १९०६ )**१९८७: अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक* *१८९४: कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ जून १८२२ )**१७१२: बहादूरशाह जफर (पहिला) – मुघल सम्राट (जन्म: १४ ऑक्टोबर१६४३ )* 💐💐 *_ मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐_*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: ९८२२६९५३७२**ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मराठी राजभाषा गौरव दिन*त्यानिमित्ताने लेखएकंदरीत इंग्रजी आणि मातृभाषा याचा विचार केल्यास प्राथमिक शाळेतील मुलांसाठी कोणत्या भाषेतुन शिक्षण घ्यावे ? हा मोठा प्रश्न आहे. अनेक विचारवंत आणि तज्ञ मंडळी या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, मुलांना आपल्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे. कारण समजणाऱ्या भाषेत घेतलेले ज्ञान लवकर लक्षात येते आणि त्याचे आकलन ही होते. याउलट दुसऱ्या भाषेत शिक्षण घेतांना अनेक शब्द ओळखीचे नसतात त्यामुळे भाषा समजणे अवघड जाते तर संवाद करताना देखील अनंत अडचणी येतात.................................. संपूर्ण लेख व कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यासोबत बैठक होण्याचीही शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाशिवरात्री निमित्ताने 12 ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिर भाविकांनी फुलले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्यात 3 टक्केची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पाटणा : बिहारमध्ये बुधवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात भाजपाच्या ७ आमदारांनी मंत्रीपदाची घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी - अफगाणिस्तानने इंग्लंड समोर 325 धावाचे ठेवले लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 ९९६०३५८३००•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी ९४२३६२५७६९ येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 गंगाधर मुटे, वर्धा👤 श्यामल पाटील👤 साई पांचाळ👤 कु. श्रावणी भुसेवार, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर ९४२३६२५७६९ येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक ०६*वनस्पती आहे इवलीशी*हात लावताच ती लाजते*स्पर्श करताच तिला जरासा**पाने आपली मिटवून घेते*ओळखा पाहू कोण ? उत्तर - उद्याच्या पोस्ट मध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - ग्रहण••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैव हे समुद्राप्रमाणे खोल आणि विस्तीर्ण आहे, पण आपल्या कर्तबगारीची भांडीच लहान आहेत.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱 ९४०३०४६८९४••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्रातील पहिले *'गुलाबाचे गाव'* कोणते ?२) 'मराठी भाषा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) 'जगाचा पोशिंदा' असे कोणाला म्हटले जाते ?४) 'हात' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नारळाच्या झाडाच्या पानांना काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) पार, ता. महाबळेश्वर, सातारा २) २७ फेब्रुवारी ३) शेतकरी ४) कर, हस्त, पाणि, भुजा, बाहू ५) झावळ्या *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱 ९७६५९४३१४४••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 अमीबा म्हणजे काय ? 📙 साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥ तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥ मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण । तया नारायणा गति कैसी ॥३॥ नामा म्हणे कैसें केशवा सांगणें । अज्ञानी ते नेणें कवणेंपरी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण कोणाचे वाईट करत नाही किंवा त्यांच्याविषयी चुकीचे विचार करत नाही त्यावेळी आपले वाईट होईल ह्या प्रकारची भीती आपल्याला वाटत नसते. म्हणून कोणाविषयी का असेना त्यांच्याप्रती आपल्या मनात आदराचीच भावना असायला पाहिजे. भीती मुळात वाटणार नाही. जरी त्यावेळी कोणी आपला मुद्दामहून जरी अनादर करत असतील तरी तो आपला अपमान होत नाही कदाचित त्यांच्यात असलेल्या विचाराचा व वागणुकीचा अपमान होत असतो. फरक एवढेच की त्याविषयी त्यांना वेळेत, कळत नाही. म्हणून या प्रकारची वागणूक किंवा विचार आपल्यात नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उंदीर कोंबडा आणि मांजर*एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, "आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज मी अंमल बाहेर जाऊन आलो. तेथे मी जी फौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार गडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे, इतक्यात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्श शब्द केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही.' हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, "वेड्या पोरा! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.तात्पर्य : बाह्य देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका ९४२३६२५७६९ येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 ९४२३६२५७६९~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link -https://www.facebook.com/share/p/15RdQwpUDQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📘 *_ या वर्षातील ५६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📘 *_महत्त्वाच्या घटना:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: ’स्वर्गदारा’तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.**स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले.**१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.**१९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.**१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३५: ’फॉक्स मॉथ’ विमानाद्वारे मुंबई - नागपूर - जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.**१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला.दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.**१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.* 📘 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📘••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: सान्या मल्होत्रा -- भारतीय अभिनेत्री* *१९८२: नागेश सोपान हुलवळे -- कवी, लेखक* *१९८१: शाहीद कपूर -- प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता* *१९८०: श्वेता शिंदे -- भारतीय अभिनेत्री आणि निर्माती**१९७५: छाया गुलाबराव पाटील -- कवयित्री* *१९७४: दिव्या भारती – हिन्दी,तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ५ एप्रिल १९९३ )**१९५८: प्रा. डॉ. एकनाथ श्रावण पगार -- प्रसिद्ध कवी, समीक्षक, संपादक**१९५७: डॉ. प्रमदा उज्ज्वल गांवस-देसाई -- लेखिका, अनुवादिका* *१९५७: प्रा. डॉ. प्रकाश खांडगे -- लोकसाहित्य व लोककलेचे अभ्यासक**१९५४: माधुरी आशिरगडे -- कवयित्री, लेखिका**१९५१: श. ल. नाईक -- ज्येष्ठ बालसाहित्यिक**१९५०: डॉ. वर्षा सगदेव -- लेखिका* *१९४८: डॅनी डेंग्झोप्पा – प्रसिद्ध चित्रपट अभिनेते**१९४३: जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१ )**१९३८:फारुख इंजिनियर--- प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू**१९३३: डॉ. पद्माकर विष्णू वर्तक --- नामवंत वैद्यकीय तज्ञ, संशोधक, लेखक (मृत्यू: २९ मार्च २०१९ )* *१९२८: बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ -- राजकारणी राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील(मृत्यू: ६ फेब्रुवारी २००१ )**१९२६: राजाभाऊ केशव कोगजे -- गायक (मृत्यू: २६ एप्रिल १९९३ )**१९२१: नीलकंठ रघुनाथ वऱ्हाडपांडे -- पुरातत्त्वीय इतिहासतज्ज्ञ, संशोधक (मृत्यू: २१ ऑगस्ट २०१५ )**१८४०: विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्मयकार.मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ.लेखन केले (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४ )*📘 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📘 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: भवरलाल हिरालाल जैन (पद्मश्री) जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड (जेआयएसएल) चे संस्थापक उद्योजक (जन्म: १२ डिसेंबर १९३७ )**२००७: पुल्लुट्टुपदथु भास्करन उर्फ पी. भास्करन -- भारतीय मल्याळम भाषेतील कवी, मल्याळम चित्रपट गाण्यांचे गीतकार आणि चित्रपट निर्माते (जन्म:२१ एप्रिल १९२४)**२००१: सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर.१९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८ )**१९९९: ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ एप्रिल १९१२ )**१९८०: गिरजाबाई महादेव केळकर – लेखिका व नाटककार(जन्म: सप्टेंबर १८८६ )**१९७८: अप्पाजी विष्णू कुलकर्णी -- लेखक, निंबधकार (जन्म: १८६९ )**१९७८: डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (जन्म: २९ जून १८९१ )**१९६४: शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री (कुंकू,दुनिया ना माने,अमृत मंथन इ.) (जन्म: १९१६ )**१९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव ’एस.पी.कॉलेज’ असे करण्यात आले.* *१५९९: संत एकनाथ महाराज -- भारतीय संत, तत्त्वज्ञ आणि कवी(जन्म: १५३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महाशिवरात्री विशेष*माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना करतात. .......... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्रात ग्रामीण भागातील घरकुलांना आता 50 हजार रुपयांचं अतिरीक्त अनुदान मिळणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अधिवेशन काळात मराठा समाजाचा आंदोलनाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचा दीक्षांत समारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लठ्ठपणा बाबत जनजागृती साठी पंतप्रधानाकडून 10 व्यक्तींची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रधानमंत्री किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार रु. मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये न्यूझीलंडने बांगलादेश ला 5 विकेटने हरवून सेमी फायनल मध्ये केला प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ डिब्बेवाड, शिक्षक, धर्माबाद👤 नईमोद्दीन सय्यद, शिक्षक नेते, धर्माबाद👤 प्रदीप पद्मावार👤 बालाजी चिंतावार, धर्माबाद👤 दिलीप वाघमारे👤 अनुराग आठवले बारडकर👤 बालाजी आगोड👤 प्रदीप येवतीकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 05*छाया पडते कधी चंद्राची**राहू , केतू ना दैवी खेळ**अंधश्रद्धा नको डोळस व्हा**विज्ञानाशी घाला याचा मेळ*उत्तर - उद्याच्या पोस्ट मध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - तुळस••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••परिस्थिति गरीब असली तरी चालेल, पण विचार ‘भिकारी’ नसावेत…*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ( ५१ शतके ) कोणी ठोकले ?२) दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत ?३) दिल्ली येथील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?४) 'मृग' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे आयोजित होणार आहे ? *उत्तरे :-* १) विराट कोहली, भारत २) चौथ्या ३) नरेंद्र मोदी ४) हरिण, सारंग, कुरंग ५) तेलंगणा, भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 चक्रीवादळे का येतात ? 📙 उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो. समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते. धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे पायीं माझ्या मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं वेडावलीं ॥१॥ आतां विषयसुख जाणावें कवणें । जाणोनि भोगणें कवणें स्वामी ॥२॥ देह सहज स्थिति राहिले निष्काम । ह्रदयीं सदा प्रेम ओसंडत ॥३॥ नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करींज मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदाचे क्षण तर कधी चांगले वाईट प्रसंग जीवनात येत असतात. ते, खूप काही शिकवण देऊन जातात. फरक एवढाच की, त्यांना ओळखण्याची आपण संधी गमावून बसतो त्यामुळे ते सहसा कळत नाही. म्हणून आलेल्या प्रत्येक चांगले, वाईट, प्रसंगाला ओळखावे व त्यांना गुरू मानून त्यांचा सन्मान करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सल्ला* एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....* •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1435523189907784&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📝 *_जागतिक मुद्रण दिन_* 📝•••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_ या वर्षातील ५५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_महत्त्वाच्या घटना:_* 📝••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.**१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.**१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.**१९४२: ’व्हॉइस ऑफ अमेरिका’ या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.**१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.**१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.**१९१८: इस्टोनियाला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले**१८१२: पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली**१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म*📝 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📝••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९३: आकाश ठोसर -- मराठी चित्रपट अभिनेता**१९८७: धनंजय वसंत पोटे -- लेखक* *१९८१: रामकृष्ण मारखंडी रोगे -- कवी* *१९७४: डॉ. सुवर्णा सुखदेव गुंड -- कवयित्री, लेखिका* *१९७४: रवींद्र विष्णू गोळे -- पत्रकार, संपादक लेखक**१९७०: अरविंद भैय्यालाल कटरे -- लेखक* *१९६८: प्रा. विकास जनार्दन पिल्लेवान -- लेखक* *१९६६: उदयनराजे भोसले -- लोकसभेचे खासदार**१९६३: संजय लीला भन्साळी --- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक* *१९५९: ॲड. विठ्ठल काष्टे -- कवी* *१९५८: समीर अंजान -- भारतीय गीतकार**१९५६: डी. व्ही. कुलकणी -- प्रसिद्ध साहित्यिक* *१९५५: स्टीव्ह जॉब्ज – अॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)**१९४८: जे. जयललिता – माजी मुख्यमंत्री आणि दक्षिणेतील अभिनेत्री (मृत्यू: ५ डिसेंबर, २०१६ )**१९४०: सुरेश भार्गव मुळे -- लेखक* *१९३९: शशिकांत दशरथ मालपेकर -- लेखक**१९३९: जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक (मृत्यू: ९ मार्च २०१२ )**१९२४: तलत महमूद – पार्श्वगायक व अभिनेता,गझलचे बादशहा (मृत्यू: ९ मे १९९८ )**१९१४: विनायक चिंतामण देवरुखकर -- लेखक* *१९०६: प्राचार्य प्र. रा. दामले -- लेखक* *१६७०: राजाराम – मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती,शिवाजी महाराजांचे चिरंजीव (मृत्यू: २ मार्च १७०० )*📝 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📝 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: सरदूल सिकंदर -- पंजाबी भाषेतील लोक आणि पॉप संगीताशी संबंधित भारतीय गायक(जन्म: १५ जानेवारी १९६१ )* *२०१८: श्रीदेवी -- भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म: १३ऑगस्ट १९६३ )**२०११: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (जन्म: १७ सप्टेंबर १९२९ )**१९९८: ललिता पवार – अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या (जन्म: १८ एप्रिल १९१६ )**१९९०: बाळकृष्ण रामचंद्र मोडक --लेखक 'मुलांचे मासिक' कार (जन्म: २१ फेब्रुवारी १८९८ )**१९८६: रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४ )**१९७५: निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष (जन्म: ३० मार्च १८९५ )**१९३६: लक्ष्मीबाई टिळक – लेखिका, ’स्मृतिचित्रे’ हे त्यांचे आत्मचरित्र मराठी साहित्यात अजरामर झाले (जन्म: १ जून १८६८ )**१८१५: रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले.(जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ )**१८१०: हेन्री कॅव्हँडिश – हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)**१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.या घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ’वेडात मराठे वीर दौडले सात’ हे काव्य लिहिले आहे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कॉपी म्हणजे एक कलंक*कॉपी करणे म्हणजे नकला करणे असा सारासार अर्थ घेतला जातो. परीक्षेचा काळ आला की कॉपी हा शब्द कानावर पडतो. वर्षभर अभ्यास न करणारे विद्यार्थी परीक्षेच्या काळात कॉपी करण्याचा विचार करतात. नकला मारण्यासाठी ही मुले नाना प्रकारच्या क्लृप्त्या किंवा योजना तयार करतात. नकला मारणे म्हणजे एक प्रकारे चोरी करण्यासारखेच आहे........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर एकीकरण समितीने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अहिल्यानगरमध्ये महसूल कार्यालयात पहिलं QR कोड वाचनालय सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अकोल्यातील केंद्रीय विद्यालयाला मंत्रिमंडळाची मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशाच्या अर्थसंकल्पानंतर राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन ३ मार्च २०२५ पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाकुंभ- जगातील 50% पेक्षा जास्त सनातनींनी स्नान केले, आतापर्यंत 60 कोटी लोकांनी केले स्नान, 73 देशांचे राजदूत आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अहिल्यानगर-पुणे, बीड-परळी रेल्वेमार्ग प्रश्नासंदर्भात रेल्वेमंत्र्यांना लवकरच भेटू, मंत्री विखे यांची माहिती, जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्न प्रलंबित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी - भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्स ने केला पराभव, विराट कोहली बनला सर्वात जलद 14 हजार धावा बनवणारा तिसरा फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, बालरक्षक👤 साईप्रसाद वंगल👤 मन देविदास तारु👤 अहमद सुतार👤 संस्कृती मसुरे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक *दारोदारी लावतात तिला**समजली जाते खूप पवित्र**औषधी अशी सर्वगुणसंपन्न**आढळते ही भारतात सर्वत्र*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - हिमालय पर्वत••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मॅपल वृक्षांचा देश कोणता ?२) पिकांची आणेवारी ठरविण्याचे अधिकार कोणाला आहेत ?३) दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?४) 'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणत्या झाडाला 'जीवनाचे झाड' म्हणतात ? *उत्तरे :-* १) कॅनडा २) तहसीलदार ३) सुषमा स्वराज ४) रवी, भास्कर, भानू, आदित्य, दिनकर, दिनमणी, सविता, वासरमणी, मित्र, मार्तंड ५) नारळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अभिनेत्री श्रीदेवी स्मृतिदिन*१९७५ मध्ये फिल्म 'जूली'तून श्रीदेवीने डेब्यू केले. यात त्या चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात दिसली होती. सुरुवातीच्या फिल्म्स मध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. १९८३ मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला'ने श्रीदेवीला स्टार बनवले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.चित्रपट हिम्मतवालामधून श्रीदेवी यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. श्रीदेवी शेवटी 'मॉम' या फिल्ममधून झळकल्या होत्या. मॉम फिल्म ७ जुलै २०१७ ला प्रदर्शित झाली होती. त्याआधी २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जुदाई सिनेमा केला. तेव्हापासून श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. श्रीदेवीला दोन मुली असून ते म्हणजे जाह्नवी कपूर व खूशी कपूर. श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (१९७८), 'हिम्मतवाला' (१९८३), 'मवाली' (१९८३), 'तोहफा' (१९८४), 'नगीना' (१९८६), 'घर संसार' (१९८६), 'आखिरी रास्ता' (१९८६), 'कर्मा' (१९८७), 'मि. इंडिया' (१९८७) यासह अनेक सिनेमात काम केले. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. २०१३ साली, अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५४ वर्षाच्या होत्या. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझे चरणीं चित्त रंगलें अनुरागें । बुह्जन्मीं वियोगें शिणलें होतें ॥१॥ आलाळलें पोळलें तापत्रयीं पीडिलें । तृष्णें विभांडिलें नानापरी ॥२॥ काम क्रोध लोभ दंभ मद मत्सर । इहीं निरंतर जाजावलें ॥३॥ बुडतिया अवचटें लाभे पैं सांगडी । ते जीवें न सोडी तैसें जालें ॥४॥ नामा म्हणे केशवा तूं कृपेचा सागर । झणीं माझा अव्हेर करिसी देवा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विरोध करणारे व त्याला अडविणारे हजारो संख्येने जरी जागोजागी साखळी तयार करून उभे राहत असतील तरी समोर नेणारा एकतरी जण जन्माला येत असतो. म्हणून कोणाला अडविण्याचा प्रयत्न करू नये. कारण समोर नेणाऱ्याचेच गुणगान केल्या जाते व अडविणाऱ्याला एकदिवस नको त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एकतेची शक्ती*एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो. शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16AvUagYLb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९: ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८: झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: केतकी माटेगांवकर --- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८४: भावेश दत्ताराम लोंढे -- कवी**१९८३: अजिनाथ रावसाहेब सासवडे -- लेखक**१९८१: इंद्रजित गणपत घुले -- कवी, लेखक, संपादक, अनुवादक**१९७८: साईप्रसाद गुंडेवार -- भारतीय अभिनेता आणि मॉडेल (मृत्यू: १० मे २०२० )**१९७७: नामदेव भोसले -- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४: प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. सोमनाथ महादेव दडस -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५: सूरज आर. बडजात्या -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते* *१९६२: प्रा. प्रकाश जनार्दन कस्तुरे -- लेखक, वक्ते**१९६०: जयंत पवार --- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू: २९ ऑगस्ट २०२१ )**१९५६: सुभाष शांताराम जैन -- कवी, लेखक पत्रकार, छायाचित्रकार**१९५५: सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२: परशुराम खुणे -- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०: नयना आपटे -- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९: विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६: रघुनाथ कृष्ण जोशी -- सुलेखनकार, डिझायनर, कवी आणि शिक्षक (मृत्यू: २० एप्रिल २००८ )**१९३५: प्रा.चंद्रकुमार नलगे -- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू: ३१ जानेवारी २००४ )**१९२२: सुलोचना भीमराव खेडगीकर -- लेखिका (मृत्यू: १८ मार्च २००४ )* *१९२०: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू: ४ मार्च १९९५ )**१९२०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू: २ ऑगस्ट २०१० )**१९१०: रामचंद्र अनंत काळेले -- कवी, काव्य समीक्षक (मृत्यू: १२ जून १९८१ )**१९०८: न्या.राम केशव रानडे -- लेखक, विचारवंत,प्रवचनकार( मृत्यू: ३० ऑगस्ट १९८५)**१९०६: पहारी सन्याल -- भारतीय अभिनेता आणि गायक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८: कमला गोपाळ देशपांडे -- संस्थापक (मृत्यू: ८ जुलै १९६५ )**१८९०: नारायण केशव भागवत -- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक, लेखक (मृत्यू: २० एप्रिल १९६२ह)**१८५७: हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १८९४ )**१८५७: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१ )**१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्न’ भट्टाचार्य (मृत्यू: १२ एप्रिल १९०६ )**१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: लक्ष्मण देशपांडे –’वर्हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३ )**२०००: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**२०००: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३ )**१९८२: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म: ५ डिसेंबर १८९४ )**१९५८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्न (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ )**१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म: ११ एप्रिल १८६९ )**१९२५: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६ )**१८२७: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नांदेड जिल्ह्याची महती सांगणारी कविता*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत, दिल्ली मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवळकरांच्या भाषणाला मोदी-पवारांची दाद, तर मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवारांकडून मोदींचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *समास, जोड्या जुळवा ते निबंध, जालन्यातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट; महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छाया कदमची आणखी एक गगनझेप! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील 10 लाख लाभार्थ्यांना मंजूर निधीचे पहिल्या हप्त्याचे वाटप होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मोदी सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत लवकरच ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख शाहरुख👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*उंचच उंच बर्फाच्या राशी**देशाचे करतो सदैव रक्षण**वनौषधींचे आगर आहे**पर्यावरणाचे करतो संरक्षण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - नदी••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो ?२) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे ?३) दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण ?४) 'हताश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणता ? *उत्तरे :-* १) कॅसोवरी पक्षी ( Cassowary bird ) २) छत्रपती संभाजी महाराज ३) रेखा गुप्ता ४) निराश ५) डेन्मार्क*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥ श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥ ऐसें भाग्य मज देसी कवणें काळीं । होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥ वदनीं तुझें नाम वसे निरंतर । राखीन त्यांचे द्वार थोर आशा ॥४॥ येतां जातां मज करिती सावधान । वदनीं कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रकारे आपण, आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो त्याच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही. मनाची स्वच्छता अशीच निर्मळ, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे. जेथे स्वछता चांगली असते तेथे प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते व गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव आपुलकी वाटत असते. आज अशाच सकारात्मक विचाराची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☸️ *_जागतिक मातृभाषा दिन_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील ५२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला**१९५१: नेपाळ बंडखोराविरुध्द भारत व नेपाळची संयुक्त लढाई सुरू झाली**१९२५: ’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.**१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.**१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.**१८४२: जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.*☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: अमितराज सावंत -- मुंबईतील मराठी संगीतकार आणि गायक**१९७८: मुरलीधर ईश्वरदासजी खोटेले -- झाडी बोलीचे कवी, लेखक* *१९७७: स्मिता बन्सल -- चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री**१९६७: डॉ. मनोज केशवराव फडणीस -- लेखक* *१९६४: प्रा. डॉ. तनुजा नाफडे -- संगीततज्ज्ञ, लेखिका* *१९५९: हर्षा हरिष वाघमारे -- कवयित्री* *१९५१: प्रा. डॉ. शशिकांत लोखंडे -- लेखक, समीक्षक**१९५०: विजयराव दामोदर रुम --- लेखक, सामाजिक कार्यकर्ते* *१९५०: मीना वांगीकर -- मराठी-कन्नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०१५ )**१९४५: अनिरुद्ध अनंत कुलकर्णी -- लेखक* *१९४५: डॉ.मधुकर केशव वर्तक -- लेखक, संपादक* *१९४२: डॉ.भगवान रंगनाथ कोठेकर -- लेखक* *१९४२: जयश्री गडकर – प्रसिद्ध अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८ )**१९३७: सुलभा अरविंद देशपांडे --- हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री (मृत्यू: ४ जून २०१६ )**१९३३: रा. रा. जांभेकर -- लेखक**१९३१: वसंत दामोदर कुलकर्णी -- मराठी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, संपादक* *१९२१: विद्याधर भास्कर उजगरे -- लेखक* *१९११: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू: ११ जानेवारी १९९७ )**१८९९: सूर्यकांत त्रिपाठी "निराला" -- प्रसिद्ध भारतीय कवी, कादंबरीकार, निबंधकार आणि कथा-लेखक (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१ )**१८९८: बाळकृष्ण रामचंद्र मोडक -- लेखक, 'मुलांचे मासिक'कार (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९० )**१८९४: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू: १ जानेवारी १९५५ )**१८७५: जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७ )**१७९९: परशुराम बल्लाळ गोडबोले -- संस्कृत पंडित व मराठी लेखक (मृत्यू: ३ सप्टेंबर १८७४)* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: राजकुमार बडजात्या --चित्रपट निर्माते, राजश्री प्रोडक्शन चे प्रमुख( जन्म: १४ मे १९४१)**२०१९: श्रीधर माडगूळकर -- ग.दि. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक (जन्म: ६ फेब्रुवारी १९४७ )**१९९८: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म: १९ डिसेंबर १९१९ )**१९९४: त्र्यंबक कृष्णराव टोपे -- भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक शिक्षण तज्ञ मुंबई विद्यापीठाची माजी कुलगुरू (जन्म: २८ फेब्रुवारी १९१४)**१९९१: नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म: ४ जून १९३६ )**१९८४: मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव -- श्रेष्ठ रशियन लेखक, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २४ मे १९०५ )**१९७०: विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर -- मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (जन्म: १५ मे १८९२)**१९७७: रामचंद्र श्रीपाद जोग – विख्यात साहित्य समीक्षक, कवी व विचारवंत (जन्म: १५ मे १९०३ )**१९७५: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: १८ सप्टेंबर १९१२ )**१९६५: ’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म: १९ मे १९२५ )**१८२९: चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम कडून हार्दीक शुभेच्छा .........!.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या शालांत परीक्षेला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रेखा गुप्ता यांनी स्वीकारला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनास आजपासून होणार प्रारंभ, हे संमेलन 23 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात जिंकले तब्बल 7 पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, शिमलामध्ये तापमान 3 अंशांपर्यंत घसरले, दिल्लीत पाऊस, 23 राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा; मध्य प्रदेशात ढगाळ हवामान, राजस्थानच्या 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताचा विजय, मोहंमद शमी वनडेमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि शुभमन गिलचे आठवे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, धर्माबाद👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ👤 डॅनियल ग्राहम्बल, शिक्षक, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 02*स्वच्छ ठेवा हो तुम्ही मला**तहान तुमची मी भागवते**थांबत नाही कोठेच कधी**सतत मी वाहत असते*मी कोण .........?उत्तर उद्याच्या पोस्ट मध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - वृक्ष / वनस्पती / झाड••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात सुंदर देश कोणता ?२) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश कोणता ?३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत आदेश जारी करणारे पहिले राज्य कोणते ?४) 'स्त्री' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? *उत्तरे :-* १) न्युझीलंड २) सुदान ३) कर्नाटक ४) महिला, वनिता, नारी, ललना, कामिनी ५) ज्ञानेश कुमार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे (उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥ संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥ दुरोनियां देखें गरुडाचें वारिकें । गोपाळा सारिखें चतुर्भुज ॥३॥ नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरीं । ऋणि करुनि करीं घेई मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो पर्यंत माणूस जिवंत असतो तो पर्यंत एकमेकांना आनंदाने , मिठी मारणे, हाताला , हात मिळवणे, सोबत मिळून, मिसळून खाणे, पिणे होत असते.पण, एकदा का त्या माणसाचा मृत्यू झाला की, लगेच त्यापासून पाच हात दूर रहाताना दिसतात. एवढेच नाही तर...त्या मृत शरिराला स्पर्श केल्यावर विटाळ मानून आंघोळ करून घेतात. तर कोणी साधं स्पर्श सुद्धा करत नाही. भलेही माणसाचे जीवन कितीही सुंदर असले तरी ते क्षणभंगुर आहे. म्हणून अति माजू नये व गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌏 *_जागतिक सामाजिक न्याय दिवस_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: बर्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९: भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७: अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८: शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१ :पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रणाली शैलेश चव्हाटे -- कवयित्री, लेखिका* *१९७८: रचना -- लेखिका, कवयित्री* *१९७६: रोहन सुनील गावस्कर -- भारतीय क्रिकेटपटू**१९६९: विजय अर्जुन सावंत -- कवी, लेखक**१९६६: प्रदीप निवृत्तीनाथ कुलकर्णी -- लेखक**१९६३: नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२: मीना शेट्टे-संभू -- लेखिका, संपादिका* *१९५७: प्रा. बसवराज कोरे -- ज्येष्ठ लेखक**१९५६: अन्नू कपूर -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५: लखनसिंह कटरे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२: डॉ. रा. गो. चवरे -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९५१: गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१: प्रा. माधव थोरात -- कवी* *१९३७: सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८: आबाजी नारायण पेडणेकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू: ११ ऑगस्ट २००४ )**१९०४: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू: १८ डिसेंबर १९८० )**१८४४: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६ )* 🌏 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: बेला बोस - भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री (जन्म: १८ एप्रिल १९४१ )**२०१५: गोविंद पानसरे -- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते (जन्म: २४ नोव्हेंबर १९३३ )**२०१२: डॉ. रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३ )**२००७: डॉ. किशोर शांताबाई काळे --- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म: १ जून १९६८ )**२००१: इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९ )**१९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक (जन्म: १ ऑगस्ट १९२९ )**१९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४: केशव नारायण काळे --- मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(जन्म: २४ एप्रिल १९०४ )**१९५८: हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर -- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय (जन्म: १५ मार्च, १८६८ )**१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म: ६ सप्टेंबर १८८९ )**१९१०: ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म: १८४६ )**१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन च्या समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेतील 10 लाख लाभार्थी बँकेच्या खात्याशी आधार लिंक नसल्याने वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी, येत्या आठ दिवसात फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता बँकेत जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, विविध ठिकाणी रक्तदान व अन्नदान करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदतवाढ; पुण्यात 25 लाख वाहनांना बदलावी लागणार नंबर प्लेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन, ते मुंबई निवड संघाचे सदस्य ही होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावाने केला पराभव, आज भारत विरुद्ध बांगलादेशचा होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नागेश शेवाळकर, जेष्ठ साहित्यिक, पुणे👤 नागेश काळे, लातूर👤 उत्तम कानिंदे, शिक्षक तथा निवेदक, किनवट👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 विशाल खांडरे👤 व्यंकटेश रोंटे👤 साहेबराव पाटील कदम👤 संतोष कामगोंडे👤 दिलीप लिंगमपल्ले👤 शिरीष गिरी, शिक्षक, बीड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*मी आहे प्राणवायूचा साठा**अन्नधान्याची देतो रास**तोडू नका हो मला कोणी**उपयोगी पडतो मी हमखास*मी कोण ..........?संकलन व लेखन - नंदा परदेशीजि.प. शाळा बळसाणे जि. धुळेउत्तर - Whatsapp Status वर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गांडूळ श्वसन कोणत्या अवयवामार्फत करते ?२) गांडूळाला शेतकऱ्याचा काय म्हणतात ?३) गांडूळपासून तयार होणाऱ्या खताला काय म्हणतात ?४) गांडूळाला इंग्रजीत काय म्हणतात ?५) गांडूळाच्या शरीरातून स्रवणाऱ्या स्त्रवास स्वच्छ करून एकत्र साठवलेल्या पाण्याला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) त्वचा २) मित्र ३) गांडूळ खत ४) Earthworm ५) गांडूळपाणी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕷 *कोळी जाळं कसं विणतात ?* 🕷🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸कोळ्यांच्या पोटात काही ग्रंथी असतात. त्यातून एक दाट स्राव सतत पाझरत असतो. या स्रावापासून ते रेशमासारखे धागे बनवतात. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या वरच्या भागात दुसरा एक अवयव असतो. तो त्या स्त्रावाचा धागा तयार करण्याचं काम करतो. या अवयवाला अनेक छिद्रं असतात. या छिद्रांचा व्यास अतिशय लहान असल्यामुळे त्यातून जेव्हा हा स्राव बाहेर पाझरतो तेव्हा त्याचं रूपांतर अतिशय बारीक एखाद्या धाग्याच्या जाडीइतकाच प्रवाह तयार होतो. जोपर्यंत हा प्रवाह कोळ्याच्या शरीरात असतो तोपर्यंत तो द्रवरूप असतो; पण शरीराबाहेर पडून त्याला हवेचा स्पर्श होताच तो घनरूप धारण करतो. त्यामुळे शरीरातून बाहेर पडता पडता त्या स्रावाचा धागा बनतो आणि त्याची लांबी सतत वाढत जाते. हा धागा अशा रितीनं शरीरातून बाहेर पडत असतानाच कोळी वर्तुळाकार रिंगणातून फिरत राहतो, त्यामुळे तो धागाही त्याच्या पाठोपाठ त्या परिघात फिरतो व त्याचं एक वर्तुळ तयार होतं. हा धागा चिकट असल्यामुळे ज्या पृष्ठभागावर तो पडतो तिथं चिकटून बसतो. तसंच जेव्हा ती वर्तुळातली फेरी पूर्ण होते तेव्हा ती टोकं एकमेकांना चिकटून त्या धाग्यांचं रिंगण तयार होतं. त्यानंतर त्याबाहेरचं वर्तुळ विणलं जातं. ही दोन वर्तुळं मग आडव्या धाग्यांनी एक एकमेकांना जोडली जातात. हळूहळू त्याचं जाळं आकार घेऊ लागतं.कोळी तयार करत असलेले हे रेशीम धागेही तीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यातला चिकट धागा तो जाळ्यातली रिंगणं विणण्यासाठी तसंच माशी वैगेरे कीटकांना पकडण्यासाठी आणि त्यांचा चट्टामट्टा करेपर्यंत त्यांना जखडून ठेवण्यासाठी वापरतो. या रिंगणांना जोडणारे छत्रीच्या किंवा सायकलीच्या चाकांमधल्या काड्यांसारखे जे आडवे धागे असतात ते दुसऱ्या प्रकारच्या चिकट नसलेल्या धाग्यांपासून बनलेले असतात. आणखीही एका प्रकारचं रेशीम कोळी आपल्या कोषासाठी वापरतात. या जाळ्यांचेही विविध प्रकार आहेत. आपल्याला नेहमी दिसणारं षटकोनी प्रकारचं जाळं हा जास्तीत जास्त विणला जाणारा प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारचं जाळं एखाद्या नरसाळ्यासारखं असतं. त्याच्या रुंद तोंडात शिरलेली कीटक त्याच्या नळीकडून ओढला जातो आणि खाली टपून बसलेल्या कोळ्याच्या 'ताटात' अलगद पडतो. तिसऱ्या प्रकारचं जाळं पाण्याखाली राहणारे कोळी विणतात. त्याचं वरचं तोंडच तेवढं आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतं. बाकीचा भाग पाण्याखालीच असतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥ मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥ वदनीं तुझें नाम होतांचि खंडणा । शतखंडरसना होइल माझी ॥३॥ सांवळें सुंदर रूप तुझें दृष्टी । न देख्तां उन्मळती नेत्र माझे ॥४॥ तुज परतें साध्य आणिक साधन । साधक माझें मन होईल भ्रान्त ॥५॥ नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ । झणीं माझा अंत पाहसी देवा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे.चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिकवण*एका बागेच्या दारात बरीच वर्षे एक भिकारी बसत असे. वयोमानानुसार तो आता वृद्ध झाला होता. शरीराला कुष्ठरोगाने ग्रासले होते. अनेक रोग-व्याधींनी त्याचे शरीर पोखरले होते. तरीही तो तेथेच बसत होता. नित्यनियमाने भीक मागत होता. त्या गावच्या राजपुत्राने त्याला कित्येक वर्षे तिथे बसलेले पाहिलेले होते. पण, आता या अवस्थेत त्याला पाहून राजपुत्राला प्रश्न पडे की, 'हा या अवस्थेत का जगतो आहे ? जगण्याची इतकी लालसा का असावी याला ? अखेर एके दिवशी त्याने हा प्रश्न त्या वृद्ध भिकाऱ्याला विचारला. तो भिकारी म्हणाला, "अरे, हाच प्रश्न मी वारंवार परमेश्वराला करतो आहे की, का जगवतोस मला या अवस्थेत ? लवकर नेत का नाहीस ? कदाचित मला वाटतं, त्याने मला मुद्दाम या अवस्थेतही जगवलं असावं. मला पाहून इतरांना कळावं की, आज जरी ते सुखरूप, धडधाकट असले तरी, त्यांची वृद्धापकाळी अशी अवस्था होऊ शकेल. मला पाहून साऱ्यांनी बोध घ्यावा. असा कदाचित परमेश्वराचा हेतू असेल."* तात्पर्य : आयते खाल्याने मोक्षप्राप्ती नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18chfeVSDb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🫧 *_ या वर्षातील ४९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान**१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर**१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.* *१९६५: ’गांबिया’ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना* 🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अनुपमा ईश्वरन -- भारतीय अभिनेत्री**१९७०: राणी गुणाजी -- भारतीय मराठी अभिनेत्री* *१९६६: साजिद नाडियादवाला -- भारतीय चित्रपट निर्माता**१९६५: मुग्धा चिटणीस -- मराठी चित्रपट अभिनेत्री व कथाकथनकार(मृत्यू: १० एप्रिल १९९६)**१९६६: पुष्पा साळवे -- कवयित्री, लेखिका**१९६२: तुळशीराम दयाराम मापारी -- कवी**१९६०: स्वाती कर्वे -- लेखिका**१९५१: सूर्यकांत व्यंकप्पा धिवारे -- कवी**१९५०: ज्योती मोहन पुजारी --- ज्येष्ठ लेखिका**१९४९: अरुणकुमार निवृत्ती यादव -- कवी, लेखक**१९४८: डॉ. प्रतिभा जयंत काणेकर -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादिका* *१९३९: सीताराम रामचंद्र रायकर -- लेखक* *१९३८: अशोक सीताराम चिटणीस -- ज्येष्ठ साहित्यिक, संपादक* *१९३१: रामदास शांताराम कामत -- संगीत नाटकांत काम करणारे मराठी गायक नाट्यअभिनेते आणि संगीततज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी २०२२ )**१९२७: मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ ’खय्याम’ – भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: १९ ऑगस्ट २०१९ )**१९२६: नलिनी जयवंत – अभिनेत्री (मृत्यू: २० डिसेंबर २०१० )**१९२२: डॉ. शकुंतला रघुनाथ लिमये -- लेखिका* *१९१९: हरिश्चंद्र लचके -- मराठी नियतकालिकांमधून व्यंगचित्रे रेखाटणारे चित्रकार (मृत्यू: २४ जुलै २००७ )* *१९११: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (मृत्यू: २९ जून २००० )**१८९८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८ )**१८९४: रफी अहमद किडवाई -- भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९५४ )**१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९ )**१८८२: यादव माधव काळे उपाख्य अण्णासाहेब काळे --- विदर्भाचे महान इतिहासकार (मृत्यू: ११ मार्च१९४० )**१८७९: किसन फागुजी बनसोडे -- स्वातंत्र्यपूर्व भारतातील दलित चळवळीचे नेते (मृत्यू: १० ऑक्टोबर १९४६ )**१८७१: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९३३ )**१८६०: नारायण लक्ष्मण फडके -- मिल्स,व स्पेन्सर यांच्या ग्रंथाचे अनुवादक (मृत्यू: सप्टेंबर १९२० )**१८३६: रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ )**१८२३: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार,समाजसुधारक व इतिहासकार.त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १८९२ )**१७४५: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ मार्च १८२७ )**१४८६: योगी चैतन्य महाप्रभू (मृत्यू: १५ जून १५३४ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे एक भारतीय गायक (जन्म: १९ ऑगस्ट १९०८ )**२०१४: अशोक चंदनमल जैन -- मराठी पत्रकार व लेखक (जन्म: ११ एप्रिल १९४४ )**१९९४: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(जन्म: २२ ऑगस्ट १९३५ )**१९९२: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (जन्म: २१ ऑगस्ट १९१० )**१९६७: जे.रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणूबॉम्बचे जनक (जन्म: २२ एप्रिल १९०४ )**१५६४: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (जन्म: ६ मार्च १४७५ )**१४०५: तैमूरलंग – मंगोल सरदार (जन्म: ९ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला परिक्षेवर काही बोलू .....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त, रात्री उशिरा निर्णय, नव्या कायद्यानुसार सरन्यायाधीशांना वगळून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री चा 20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर होणार शपथविधी *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणूकीत वाढ करण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागाची उत्तम कामगिरी - वित्तमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचं प्रकाशन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पीएम-आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 उमाकांत ओमनवार, नांदेड👤 सुवर्णा पाटील👤 निशांत कसबे👤 लक्ष्मीकांत डेबेकर👤 गणेश पाटील👤 सोमेश्वर तांबोळी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बी रघुनाथ - भगवान रघुनाथ कुलकर्णी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'* मध्ये नोंद झालेली *जगातली सर्वात महाग गायीचे नाव* काय आहे ?२) आंध्रप्रदेशमधील ओंगोल जातीची गाय ब्राझीलमध्ये किती रुपयांना विकली गेली ?३) 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष कोण होते ?४) 'गाय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) "एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करू शकतो", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) वियातिना - १९ २) ४१ कोटी ३) केसरी पाटील ४) धेनू, गो, गोमाता ५) रविंद्रनाथ टागोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 रोपांची मुळं खालच्या दिशेनं, तर खोडं वरच्या दिशेनं का वाढतात? 📒आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर एक पिकलेलं फळ पडलं, अशी आख्यायिका आहे. डोक्याला आलेल्या झिणझिण्या थांबवता थांबवता न्यूटननं विचार करायला सुरुवात केली होती. त्यातूनच या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षणाचं बल कार्यरत असल्याची जाणीव झाली, त्या बलामुळंच मग, वर हवेत फेकलेली कोणतीही वस्तू परत जमिनीकडे ओढली जाते, हेही समजून आलं. याला अर्थात अपवाद आहेत. हलकी असलेली पाण्याची वाफ वरच्या दिशेनं उडून जाते. हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या वायूनं भरलेला फुगाही वर वर उडत जातो; पण केवळ हलक्या असलेल्या वस्तूच अशा वर वर गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत वरच्या दिशेनं उडत जाताना दिसतात, खरोखरीच त्या वस्तू त्या बलावर मात करतात, की त्यांचं हे वरच्या दिशेनं उडणंही गुरुत्वाकर्षणाच्या बलाचीच किमया आहे?पक्षी मात्र सहजगत्या आकाशात विहरताना दिसतात. त्यांना हे गुरुत्वाकर्षणाचं बल खालच्या दिशेनं ओढत नाही का? की आपले पंख फडफडवत त्या बलावर मात करण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे? जेव्हा आपण विमानं तयार करायला लागलो आणि त्याच्यात बसून आकाशात झेप घ्यायला लागलो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्याच मदतीनं आकाशात उड्डाण कसं करायचं, हेही समजून आलं. तर मग जेव्हा जमिनीत पेरलेल्या बीजाला प्रथम मुळं आणि नंतर अंकुर फुटतात तेव्हा त्यांची वाढ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी होते, याचाही विचार याच अनुषंगानं करायला हवा. मुळं जमिनीत खोलवर जाऊ पाहतात, तर अंकुर आणि त्यातून पुढं तयार होणारी खोडं मात्र वरच्या दिशेनंच वाटचाल करताना दिसतात. बीज पेरल्यानंतर त्याला पुरेसं पाणी मिळालं, त्याची वाढ होऊ लागली, की त्याला प्रथम मुळं फुटतात. त्या मुळांमध्ये असलेल्या संप्रेरकांच्या प्रभावापोटी ती गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा वेध घेऊ लागतात. या गुणधर्माला जिओट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळं मग ज्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते त्या दिशेनं मुळं वाटचाल करू लागतात.दुसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरांमध्ये वेगळी संप्रेरकं कार्यरत असतात. ती प्रकाशाला प्रतिसाद देतात. साहजिकच ती इवलीशी रोपं ज्या दिशेला प्रकाश असतो त्या दिशेकडे झेपावतात. या गुणधर्माला फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळे मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीकडे दुर्लक्ष करत वरच्या दिशेनं वाटचाल करणं त्या अंकुरांना आणि त्यांचीच वाढ होत उदयाला येणाऱ्या खोडांना शक्य होतं.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥ हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥ कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥ नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वृक्षसेवेतून समृद्धी*एका गावात एक विधवा महिला आणि तिचा जगत नावाचा मुलगा राहत होते. त्यांच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड होते. जगत आईच्या सांगण्यावरून त्या झाडाला रोज पाणी देत असे. त्याच्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवत असे. एकदा जगत आजारी पडला तरी त्याने झाडाला पाणी देण्याचे व स्वच्छतेचे काम चालूच ठेवले.आजारपणातही हा मुलगा आपली सेवा करत आहे हे पाहून पिंपळवृक्षात निवास करणा-या एका देवतेला खूप समाधान वाटले. जगत जवळ येताच देवता त्याच्याशी बोलू लागली," हे मुला मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालो आहे. तुला जो काही वर पाहिजे आहे तो मागून घे." जगत म्हणाला," हे वृक्षदेवते, मी तुमची सेवा काही मिळवायची अपेक्षा ठेवून करत नाही. तुमच्यामुळे आम्हाला स्वच्छ हवा, सावली आणि लाकूड मिळते. आमच्या जीवनाचा तूच एकमेव आधार आहेस. मला काहीही नको." यावर वृक्षदेवतेने त्याला काहीतरी मागण्याचा हट्टच धरला. तेव्हा जगतने झाडाखाली पडलेली पाने नेण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपळदेवतेने त्याला अनुमती दिली. जगतने पाने गोळा केली व घरी आणून एका कोप-यात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा तो व त्याची आई उठून पाहतात तर काय पिंपळाची सगळी पाने सोन्याच्या पानात बदलली होती. जगतने वृक्षदेवतेचे आभार मानले.तात्पर्य – निरपेक्षबुद्धीने सेवा केल्यास आपल्याला फळ निश्चितच मिळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२: नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४: दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७: ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२: राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.*🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: प्रफुल्ल अंदुरकर -- कवी* *१९७५: प्रसाद ओक -- प्रसिद्ध अभिनेता, लेखक, कवी* *१९६८: विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६५: सदानंद कदम -- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३: सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका, अनुवादक**१९६१: संजीव वसंत वेलणकर -- लेखक, सोशल मीडियावर दैनंदिन लेखन* *१९६०: डॉ. सुनील सावंत -- कवी, लेखक**१९५७: हेमंत श्रीराम देशपांडे -- लेखक**१९५७: प्रफुल्ल मनोहरभाई पटेल -- माजी केंद्रीय मंत्री**१९५४: कल्वकुंतल चंद्रशेखर राव -- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०: प्रा. जयंतकुमार गणपतराव बंड -- लेखक, संपादक* *१९५०: प्रा. उद्धव निंबा महाजन -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४६: अशोक सिंह परदेशी -- कवी**१९४३: डॉ.रूपचंद निखाडे -- लेखक**१९४२: अनुराधा कृष्णराव गुरव -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, शैक्षणिक विचारवंत (मृत्यू: ३० मे २०२० )**१९४०: गजानन जानोजी बागडे -- कवी (मृत्यू: १ सप्टेंबर २०१२ )**१९३६: फातिमा झकेरिया -- मुंबई टाईम्सच्या संपादिका (मृत्यू: ६ एप्रिल २०२१)**१९३५: रवी टंडन -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू: ११ फेब्रुवारी २०२२ )* *१९३२: सुहासिनी इर्लेकर --- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू: २८ऑगस्ट २०१० )**१९१८: कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२: सीताराम गणपतराव मनाठकर -- कवी ( मृत्यू: मे १९४९ )**१९०२: प्रभाकर वासुदेव बापट -- समीक्षक (मृत्यू: २६ जुलै १९४४ )**१८७४: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६ )**१८५४: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२ )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चंद्रकांत मांडरे --- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म: १३ ऑगस्ट १९१३ )**१९९५: प्रा. पां. कृ. सावळापूरकर -- जुन्या पिढितील संशोधक, विचारवंत (जन्म: १ जुलै १९०७ )* *१९९४: चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३ जून १९२९ )**१९९१: कृष्णाबाई हरी मोटे -- कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८८:कर्पूरी ठाकुर -- बिहारचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८६: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५ )**१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१० )**१८८३: वासुदेव बळवंत फडके -- राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ )**१८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होणार ? आजच्या बैठकीत ठरणार ! उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12 वाजता होणार शपथविधी सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्लीत NCR सह उत्तर भागात पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर; मृतांच्या कुटुंबियांना सरकार देणार 10 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा तडाखा, महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढणार, IMD ने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेत बदल होणार ? दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थींच्या हयातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार, उत्पन्नाबाबत प्राप्तीकर विभागाकडून घेणार माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबी; कोलकातामधील ईडन गार्डनवर 25 मे रोजी अंतिम सामना, 2 महिने रंगणार थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण ए. एडके👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दया पवार - दगडू मारुती पवार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी म्हणजे काय ?२) पक्ष्यांच्या शरीराचं तापमान साधारणपणे किती सेंटिग्रेड असते ?३) "पक्षी म्हणजे परिस्थितीकीचा ( Ecology ) लिटमस कागद आहेत", असे कोण म्हणाले होते ?४) जगात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ?५) नैसर्गिक विविधतेमुळे भारतात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ? *उत्तरे :-* १) पिसं असलेला द्विपाद होय. २) ३८° ते ४४° ३) रॉजर टोरी पीटरसन ४) ८,६०० जाती ५) १,२५० जाती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का ?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात. एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो. गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते. आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते. एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं. ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन. एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो. हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा विष्णुदास म्हणतात जगीं । नाहीं माझें अंगीं प्रेमभाव ॥१॥ तेणें थोर लाज वाटे पंढरिराया । ये माझ्य ह्रदया एक वेळां ॥२॥ द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायीं । अनुभव नाहीं स्वरूपाचा ॥३॥ देखावेखीं बैसें संतांचे संगतीं । नाहीं माझे चित्तीं ध्यान तुझें ॥४॥ साकारलें रूप तैं दिसे चर्मचक्षु । परी नाहीं वोळखी केवळ मनें ॥५॥ नामा म्हणे माझा उजळ करींज माथा । भेटी देउनी संतां निरवीं मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते.तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15cDHcX5yz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील ४६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सुब्रहण्यम यांनी सूत्रे हाती घेतली* *१९६०: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती.८०,००० भारतीय,ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.**१९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.**१९३२: पुण्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालय सुरू झाले**१८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर -- कवी**१९८२: सुरेश निंबाजी येरमुरे -- कवी**१९८२: सचिन आत्माराम पाटील-होळकर -- कृषितज्ज्ञ, लेखक* *१९७२: किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी -- पत्रकार, लेखक* *१९६७: रमेश परसराम बोपचे -- कवी**१९६७: संजीव शंकरराव अहिरे -- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक, कवी* *१९६४: आशुतोष गोवारीकर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता* *१९५९: मानसी मोहन जोशी -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५९: कलानंद जाधव (पुंजाराव दताराव जाधव) -- कवी, बालगीतकार, लेखक* *१९५६: हरीश भिमाणी -- भारतीय व्हॉइसओव्हर कलाकार, लेखक आणि निवेदक**१९५६: विनायक महादेव गोविलकर -- जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ, व्याख्याते, लेखक* *१९५६: डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५६: रामराव अनिरुद्ध झुंजारे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९५४: राजेंद्र गजानन साळोखे -- लेखक* *१९५४: प्रा.गणपत अंबादास उगले -- विचारवंत तथा साहित्यिक(मृत्यू: १९ जुलै २०२४)**१९५३: दत्तात्रय कडू लोहार -- कवी**१९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ – ज्येष्ठ साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४ )**१९४७: श्रीधर शंकरराव खंडापूरकर -- कवी, लेखक**१९४७: रणधीर राज कपूर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक* *१९४६: महादेवराव नथुजी घाटुर्ले -- विदर्भातील कवी, लेखक**१९२८: शांता हरी निसळ -- ज्येष्ठ संगितसमिक्षक, कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: ७ मे २०१३ )**१९१८: वसंत कृष्ण जोशी -- संस्थापक संपादक-‘दक्षता’मासिक, लोकप्रिय पोलीस तपास कथाकार(मृत्यू: २० डिसेंबर २००४ )**१९१७: गोविंद रामचंद्र आफळे -- मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार(मृत्यू: १ नोव्हेंबर १९८८ )**१८९६: रामचंद्र नारायण वेलिंगकर -- ज्ञानेश्वरी शब्दकोशाचे कर्ते**१८७५: जनार्दन सखाराम करंदीकर -- केसरी या वृत्तपत्राचे संपादक, लेखक (मृत्यू: १२ मार्च १९५९ )**१८२४: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू: २६ जुलै १८९१ )**१७१०: लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० मे १७७४ )**_१७३९: थोर मानवतावादी संत श्री.सेवालाल महाराज -- जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये सुवर्णकूप्पा येथे,आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.(मृत्यू: ४ डिसेंबर १८०६ )_**१५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी १६४२ )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: कविता चौधरी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती आणि लेखिका(जन्म : १९५६ )**२०२०: राजा मयेकर -- मराठी अभिनेते (जन्म: १९३०)**२०२०: विनायक जोशी -- मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे गायक (जन्म: ११ मे १९६१ )**२०१८: मनोहर मारोतीराव तल्हार -- प्रसिद्ध मराठी लेखक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३२ )**२०१०: श्रीराम पांडुरंग कामत -- ज्येष्ठ विश्व चरित्रकोशकार (मृत्यू: १७ मे १९३४ )**२००८: मनोरमा -- बॉलीवूडमधील भारतीय अभिनेत्री (जन्म: १६ ऑगस्ट १९२६ )**१९८८: रिचर्ड फाइनमन – क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८ )* *१९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष* *१९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म: १९०२ )**१९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४ )**१८६९: मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भूक म्हणजे .......?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथील महाकुंभात सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 50 कोटी भाविकांचे गंगेत स्नान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *RTE अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी 1 लाख 1 हजार 916 जणांची निवड, 85 हजार बालकांचे अर्ज प्रतिक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ * महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत 10 नोव्हेंबर2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल प्रसिद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना पीफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार, सिनेमा कालानुरूप बदलतो, त्यासोबत चालावे लागते, शुभा खोटे यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 54 सुवर्ण पदकासह एकूण सर्वाधिक 201 पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक नेते, बिलोली 👤 जना निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबुराव बोधनकर , सहशिक्षक, बिलोली👤 किरण गौड , धर्माबाद 👤 घनश्याम नानम, डाक घर, धर्माबाद 👤 रमेश सोनकांबळे 👤 गुलाब जाधव👤 रमेश पाटील कदम 👤 अविनाश सातपुते 👤 गोविंद टेकूलवार, करखेली👤 प्रल्हाद घोरबांड, कवी व गो सेवक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मामा वरेरकर - भार्गव विट्ठल वरेरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यासात येणारे यश हे दैवी देणगीचे किंवा चमत्कारांचे नसून कष्टाने साध्य होणारे यश असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?२) प्रदूषणावर नियंत्रण व कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने जगात क्लीन एनर्जीचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो ?३) कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?४) 'सिंह' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच भारतातील कोणत्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) लोणार २) फ्रान्स ३) इंग्लंड ४) वनराज, केसरी, मृगेंद्र ५) मणिपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙 घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.‘सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥ जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥ श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें । तीं तुज भूषणें सुखें मानूं ॥३॥ काय हानि जाली सांगा मजपाशीं । उद्धारा जगासी नामा म्हणे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात सुख, समृद्धी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नसते तसेच प्रत्येकाला दु:ख नसेलच असेही नाही. सुख आणि दु:ख हे, मानवी जीवनाशी कायम जुळून राहतात.तेव्हाच कुठेतरी कोणाचे दु:ख बघून डोळे भरून येतात.आणि सुख असते तेव्हा क्षणभर आराम सुद्धा मिळत नाही हेही सत्य आहे. म्हणून सुखात असताना कोणाचे मन दुखेल अशा कोणत्याही शब्दात बोलू नये व दु:ख असेल तर रडत बसू नये.कारण, पुढची वाटचाल स्वतःलाच करावी लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌟 *_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६: पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* 🌟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील -- कवयित्री* *१९६८: भाग्यश्री देसाई -- कवयित्री, अभिनेत्री, निर्माती**१९६५: सय्यद अल्लाउद्दीन अमिनुद्दीन -- प्रसिद्ध लेखक**१९६२: विजय कोपरकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१: डॉ. माधुरी हेमंत वाघ -- कवयित्री, लेखिका**१९६१: मोहनीश बहल -- हिंदी चित्रपटातील अभिनेता**१९६०: कल्पना दिलीप मापूसकर -- कवयित्री**१९५९: प्रा. डॉ. सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५८: संजीव खांडेकर -- मराठी लेखक, कवी**१९५३: अलका सुरेशराव कुलकर्णी -- कथा लेखिका**१९५२: सुषमा स्वराज -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ६ ऑगस्ट २०१९ )**१९५१: ज्योती प्रमोद गोडबोले -- कथा लेखिका**१९५०: कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे -- माजी सहकार राज्य मंत्री, सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट २०१८ )**१९३३: मधुकर रामदास सोनार -- कवी, कथाकार (मृत्यू: १५ सप्टेंबर २००४ )**१९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ )**१९३०: वृंदा रघुनाथ लिमये -- कवयित्री, लेखिका* *१९२६: डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५: मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १४ ऑक्टोबर२०१३ )**१९२२: प्रभाकर श्रीधर नेरूरकर -- ललित लेखक (मृत्यू: २९ जून १९९८ )**१९१८: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित (मृत्यू: १९ ऑगस्ट २०२० )**१९१६: संजीवनी मराठे – प्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २००० )**१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६ )**१४८३: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३० )* 🌟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: शमीम अहमद खान -- सतारवादक आणि संगीतकार (जन्म:१० सप्टेंबर १९३८)**१९९४: यशवंत नरसिंह केळकर -- कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७५: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर१८८१ )**१९७५: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७ )**१९७४: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म: १ जानेवारी १९०० )**१७५५: रघुजी भोसले -- नागपूर भोसले घरातील एक शूर सेनापती (जन्म: १६९५)**१४०५: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *शतदा प्रेम करावे .....!*प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसवण्याची पडताळणी केली सुरू, माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाकडे पाठविला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुलढण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केली नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कवयित्री अनिता माने यांना रंगत-संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते सन्मान; काव्यातून अभिव्यक्तीची उर्मी जपण्याचे कार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10 हजार मिळणार, आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत दुकान बंद करण्याचा ग्रामस्थांकडून कठोर आचारसंहिता लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पी. सावळाराम - निवृत्ती रावजी पाटील*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो, तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो. - सुदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाळवंटाचा जहाज'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती सभा होतात ?३) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ?४) 'संग्राम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कमळ हे फूल कशाचे प्रतीक आहे ? *उत्तरे :-* १) उंट २) बारा ३) ३ - ० ने ४) युद्ध, समर, संगर, लढाई ५) पवित्रता*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥ काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥ एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती. आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18JCv8Nyhf/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📻 *_जागतिक रेडिओ दिन_* 📻••••••••••••••••••••••••••••• 📻 *_ या वर्षातील ४४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📻 *_महत्त्वाच्या घटना:_* 📻•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार,६० जखमी**२००३: चित्रपट निर्माते,दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान**१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.**१९८२: भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण करा मिराज विमानाचा समावेश**१७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.* *१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर येथे पोहोचला.*📻 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२९८६: रश्मी (शिवानी) देसाई -- टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७६: शरद कपूर -- भारतीय अभिनेता* *१९७४: योगिनी वसंत पैठणकर -- कवयित्री**१९६४: रामदास ग. खरे -- कवी, लेखक* *१९६०: स्वाती विनय गाणू -- लेखिका**१९५९: डॉ. गिरीश प्रभाकर पिंगळे -- खगोलशास्त्रचे अभ्यासक, लेखक* *१९४९: चंद्रशेखर ठाकूर. -- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ* *१९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० ऑक्टोबर१९९० )**१९४१: प्रा. शिवाजी बाजीराव पाटील -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३८: रमेश सहस्रबुद्धे -- मराठी विज्ञानकथा लेखक ( मृत्यू: २८ डिसेंबर २०१६ )**१९३७: प्रतिभा द्वारकानाथ लेले -- ज्येष्ठ लेखिका**१९२८: श्रीकृष्ण दामोदर पानवलकर -- कथाकार (मृत्यू: १९ ऑगस्ट १९८५ )**१९२७: मृणालिनी मधुसूदन जोशी -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०२२ )* *१९२१: निर्मला भालचंद बापट -- कवयित्री* *१९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४ )**१९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९ )**१८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६ )**१८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९ )**१८७०: पार्वतीबाई महादेव आठवले -- हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: १० ऑक्टोबर १९५५ )**१८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८ )**१८३१: लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे -- मराठीतील आद्य कादंबरीकार (मृत्यू: १२ मे १९०४ )**१७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४ )* 📻 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: ललिता लाजमी -- भारतीय ज्येष्ठ चित्रकार ( जन्म: १७ मार्च १९३२ )**२०२२: नरेंद्र लांजेवार --ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: ११ मे १९६८ )**२०१४: बालनाथन बेंजामीन महेंद्र उर्फ बालु महेंद्र -- प्रसिद्ध तमिळ चित्रपट पटकथालेखक व छायादिग्दर्शक (जन्म: १ जानेवारी १९४६ )**२०१४: दिनकर त्रिंबक धारणकर -- मराठी नाट्यकर्मीं, साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक (जन्म: १९३६ )**२०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६ )**२००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: १९३१ )**२००७: वामन केशव लेले -- भाषा अभ्यासक, समीक्षक (जन्म: २९ मे १९३३ )**१९९४: यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर -- इतिहासविषयक लेखन करणारे मराठी लेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२ )**१९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ६ ऑगस्ट १९२० )* *१९५६: धुंडिराज गणेश बापट-- वैदिक वाङ्मयाचे भाषांतरकार (जन्म: १५ नोव्हेंबर १८८२ )**१९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३ )**१८८३: रिचर्ड वॅग्नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सकाळ मध्ये व्हॅलेंटाईन दिनानिमित्त मैफल या पानावर प्रकाशित कविता *" ती काय करते ? "*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत होणार तिसरं विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे कार्यकारी प्रमुख सुंदर पिचाई यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - स्वारगेट बसस्थानक, मेट्रो स्टेशनचा कायापालट होणार, शिवाजीनगर बस स्थानकाप्रमाणे आधुनिक सुविधा; आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - जल जीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा टप्पा महत्वपूर्ण, अमरावतीत 13,665 शिक्षकांना 8 मार्चपर्यंत मिळणार प्रशिक्षण; तज्ज्ञ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातारा - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती, सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत सामन्यासह मालिकाही जिंकली, उपकर्णधार शुभमन गिलचे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, हास्य कलाकार, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद👤 संगीता ठलाल, लेखिका, गडचिरोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचा, कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे. -- स्टर्न*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारत, इजिप्त व व्हिएतनाम या देशांचा राष्ट्रीय फूल कोणता ?२) कमळ या फुलाला 'भारताचे राष्ट्रीय फूल' म्हणून केव्हा घोषित करण्यात आले ?३) कमळाच्या बियांना काय म्हणतात ?४) 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'वॉटर लिली' असे कोणत्या फुलाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) कमळ २) २६ जानेवारी १९५० ३) कमळगठ्ठा/कमळ गठ्ठ्याचे मणी ४) पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी ५) कमळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India*भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥ लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥ तुझे पाय दिव्य तुझे पाय दिव्य । तुझे पाय दिव्य रे दातारा ॥३॥ नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । तुझे पाय केशवा दिव्य मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण जे, काही कार्य करत आहोत त्या कार्याविषयी आपल्याच माणसांना सहसा कळत नसेल किंवा त्याविषयी त्यांना पुरेपूर अनुभव नसेल तर त्यांच्याकडून विरोध होतच असते किंवा पाहिजे तेवढी त्यांच्याकडून आपल्याला साथ मिळत नाही. त्यावेळी आपण दु:खी होऊ नये. भलेही ते साथ देत नसतील तरी उशीरा का होईना हळूहळू सर्वकाही त्यांनाही कळायला लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃ एकाग्रता ❃* एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली.*_🌀 तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 फेब्रुवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/151jWoj4tb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील ४३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: कोयना धरणाच्या डाव्या बाजूस नवीन पाॅवर हाऊस उभारुन ८० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पात सरकारची मंजुरी**१९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७९: वसंत गोपाळ आपटे यांनी किर्लोस्करवाडी येथून "आपले जग" नावाचे साप्ताहिक सुरू केले**१९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.**१५०२ :लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: महाबली बलभीम मिसाळ -- कवी* *१९८७: परी तेलंग -- भारतीय अभिनेत्री* *१९८३:नवनाथ रणखांबे-- कवी,लेखक* *१९८३: राजीव मासरूळकर -- कवी* *१९८१: पांडुरंग महादेव जाधव -- लेखक, कवी**१९८०: भाऊसाहेब मिस्तरी (भाऊसाहेब वाल्मीक गवळे) -- कादंबरीकार, स्तंभ लेखन करणारे लेखक**१९७६: विजय ढाले -- कवी**१९७०: अंजली आशुतोष मराठे -- कवयित्री,अनुवादिका**१९६४: कमलाकर रामराव सावंत -- लेखक**१९६०: सुरेखा गावंडे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक, कवयित्री* *१९५७: डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने -- प्रसिद्ध नेत्रचिकित्सक* *१९५६: गिरीश चौक -- लेखक**१९५२: ई. झेड. खोब्रागडे -- निवृत्त सनदी अधिकारी तथा लेखक**१९५०: भास्कर चिंधूजी नंदनवार -- प्रसिद्ध लेखक**१९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज**१९४८: डॉ. सुधाकर सोमेश्वर मोगलेवार -- कवी, लेखक**१९४३: सतीश काळसेकर -- मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते (मृत्यू: २४ जुलै २०२१ )**१९३९: अजितसिंग चौधरी -- भारतीय शेतकरी नेते,राष्ट्रीय लोक दलाचे संस्थापक (मृत्यू: ६ मे २०२१ )**१९३४: प्रा. डॉ. शरद काशिनाथ कळणावत -- प्रसिद्ध लेखक, कवी, वक्ते(मृत्यू: २४ सप्टेंबर २०२४ )**१९२९: दत्तात्रेय धोंडोपंत रत्नपारखी -- लेखक* *१९२९: प्राचार्य डॉ.गोपाळ श्रीनिवास बनहट्टी -- लेखक, नाटककार* *१९२८: ललित मोहन शर्मा -- भारताचे २४ वे सरन्यायाधीश (मृत्यू:३ नोव्हेंबर २००८)**१९२०: कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३ )**१९१४:दत्तात्रय कृष्ण पेठे-- कवी* *१८८१: अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू: २३ जानेवारी १९३१ )**१८७६: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३ )**१८७१: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू: ५ एप्रिल १९४० )**१८२४: करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ )**१८०९: चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १८८२ )**१८०९: अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ एप्रिल १८६५ )**१८०४: हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५ )**१७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक (मृत्यू: १३ मार्च १८०० )*☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: राहुल बजाज -- बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन, माजी राज्यसभा सदस्य, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित (जन्म: १० जून १९३८ )**२०१६: वसंतराव राजूरकर -- ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक (जन्म: २४ एप्रिल १९३२ )**२०१२: प्रा. डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर तथा र.बा.मंचरकर -- मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३ )**२००१: भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८ )**२०००: विष्णु अण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते* *१९९८: पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३ )**१९५०: नारायण दाजीबा वाडेगावकर -- संस्कृत व्याकरण शास्त्राचे भाष्यकार ( जन्म: १० मार्च १८७१)**१८०४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४ )**१७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म: १७३० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आराम हराम है ।*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गेल्या 48 तासात पुणे शहरात तापमानात मोठे बदल झाले असून शहराचा सरासरी पारा 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील होणार विसर्जन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *CEO गौरव द्विवेदी यांनी घेतला मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमाचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडकी बहीण योजने नंतर आता लखपती दीदी योजना, महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2025 कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, कवी अमिताभ गुप्ता, नीलिमकुमार यांचा गौरव; आज नाशिकमध्ये सन्मान सोहळ्याचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक पाचोळाकार रा. रं. बोराडे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - आज भारत वि. इंग्लंड यांच्यात तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना, भारत 2-0 ने मालिका जिंकली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 भाग्यश्री देशमुख👤 नवनाथ रणखांबे, साहित्यिक👤 निलेश पाटील 👤 नागनाथ चांडे👤 रवींद्र डूबिले, छ. संभाजीनगर 👤 हणमंत गुरूपवार, बिलोली👤 विनोदकुमार भोंग👤 विजयकुमार पवारे, कुंडलवाडी 👤 अशोक शिलेवाड, पो. पा. येवती👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर👤 जलील अब्दुल👤 सौ. मनिषा जोशी, विषय शिक्षिका, कन्या शाळा धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रा. रं. बोराडे - रावसाहेब रंगनाथ बोराडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चिंता निर्माण होण्याचे मूळ कारण म्हणजे आपली दुर्बलता, हताशता. -- जाबर्ट*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली आहे ?२) २७ फेब्रुवारीला नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या कोणत्या गावाचे 'कवितांचे गाव' म्हणून उद्घाटन होणार आहे ?३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लाकडी खेळणी निर्मिती उद्योग आहे ?४) 'संशय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत ? *उत्तरे :-* १) विकी कौशल २) शिरवाड ३) सावंतवाडी ४) शंका ५) शेख मुजीबुर रेहमान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍖 *तुटलेली हाडं परत पूर्वीसारखी कशी होतात ?* 🍖 ***********************'उजव्या हाताच्या करंगळीचं फ्रॅक्चर झाल्यामुळे अनिल कुंबळेची कसोटीतून माघार' किंवा 'मनगटाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे बोरिस बेकर विम्बल्डन खेळू शकणार नाही', अश्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून वाचतो, त्यावेळी वाटतं की संपलं त्या खेळाडूंची कारकीर्द संपली. एवढंच नाही तर आता आयुष्यभर त्या तुटलेल्या अवयवानिशीच त्याला वावरावे लागणार आहे. पण नाही. दोन कसोटीनंतर अनिल कुंबळे आपल्या फिरकीची जादू घेऊन परत अवतरतो आणि बोरिस बेकर आपल्या झंझावाती सर्व्हिसेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सळो की पळो करून सोडतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की खरी जादू अनिल कुंबळेंनं नव्हे तर त्याच्या त्या मोडलेल्या हाडावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली तर केली नाही ?पण नाही जादू कोणी केलीच असेल तर ती निसर्गानं केली आहे. निसर्गानेच तुटलेली हाडं परत सांधण्याची व्यवस्था मुळातच करून ठेवली आहे. हाड टणक असते. त्यामुळे ते नखांसारखे निर्जीव आहे की काय असं वाटतं. पण तसं नाही. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. जेव्हा एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणाऱ्या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि त्या ठिकाणी फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो. तो हाडाला स्थिर करून त्यांची तुटलेली टोकं परत सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झिजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतो. त्यामुळे ती तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. त्या टोकांमध्ये तयार झालेली फट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी व उती तयार होऊ लागतात. आता आॅस्टीअोब्लास्ट या पेशी कामाला लागतात आणि त्या तिथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात. थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पक्कं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. मृत पेशीच आतल्या आत शोषल्या जातात आणि नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नव्यांनं पाझर होऊन त्या नवीन हाडाला पूर्वीचीच ताकद दिली जाते. बोरीस बेकरचे मनगट परत त्याच जोमाने चेंडू टोलवायला तयार होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥ उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥ चोर आणि शिंदळू चाळविलें गोविळें । अनंत मर्दिले दुष्टकाळ ॥३॥ नामा म्हणे केशवा सांगेन वर्म । ऐकतां न राहे संतांचें कर्म ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गाने प्रत्येकालाच तोंड नावाची अनमोल संपत्ती दिली आहे. त्या संपत्तीचा योग्य रितीने वापर केला तर ती संपत्ती अजरामर होऊन जाते. अन् चुकूनही एक शब्द जरी तिच्यातून बाहेर पडल्यावर एखाद्याचे मन तर दुखतोच पण, त्याचे परिणाम सुद्धा स्वतःला ही तेवढेच भोगावे लागतात. म्हणून म्हणतात की, तोंड सांभाळून बोलावे.कदाचित हे खरे असावे म्हणून कोणासोबत किंवा कोणाच्या बाबतीत बोलताना जरा विचार करून बोलावा.कारण चांगले बोलण्याने आपलेही वाईट होणार नाही. अन् नको त्या शब्दात बोलल्याने आपलाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सन्मान होणार नाही. कारण ऐकणारे प्रत्येक माणसं बुध्दीहीन नसतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि उंदीर* " उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-* जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ४२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.**१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.**१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका**१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.**१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.**१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.**१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.**१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.**१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: शर्लिन चोप्रा -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८५: डॉ. कैलास देवराम सलामे -- ग्रामीण कवी**१९८४: अनुष्का मनचंदा -- भारतीय गायिका, संगीतकार**१९८१: आमीन मुजफ्फर सय्यद -- कवी* *१९६९: भीमराव भगवान ठवरे -- लेखक, कवी**१९६६: प्रज्ञा दया पवार(प्रज्ञा लोखंडे) -- प्रसिद्ध,मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका**१९६५: प्रा. डॉ. विलास भवरे -- लेखक* *१९५७: टीना अंबानी -- भारतीय अभिनेत्री**१९५०: पास्कल (पास्को) लोबो -- कवी, संपादक* *१९४६: काशिनाथ सेवकराम भारंबे -- प्रसिद्ध लेखक,कवी,प्रकाशक* *१९४६: वसुधा पवार -- लेखिका* *१९४६: वसंत बंडोबा काळे -- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९४५: कृष्णकांत गणपत लोणे -- कवी, लेखक तथा निवृत्त बँक शाखा व्यवस्थापक**१९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथा लेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३ )**१९४१: श्रीनिवास दादासाहेब पाटील -- माजी राज्यपाल, माजी खासदार तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर**१९३५: ललिता नरहर बापट -- प्रसिद्ध लेखिका* *१९३१: लीला चंद्रशेखर धर्मपुरी -- लेखिका**१९२७: प्रा. दत्तात्रेय पांडुरंग आपटे -- अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक व लेखक*/*१९२६: त्यागराज बाबूराव पेंढारकर -- ज्येष्ठ छायाचित्रकार (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१८ )**१९१७: सिडनी शेल्डन -- अमेरिकन लेखक (मृत्यू: ३० जानेवारी २००७ )**१९१२: त्रिलोक कपूर -- भारतीय अभिनेता (मृत्यू :२३ सप्टेंबर १९८८)**१८५०: शंकर रामचंद्र हातवळणे -- लेखक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९०५)**१८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१ )**१८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२ )**१८००: हेन्री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७ )*⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: रवी टंडन -- चित्रपट दिग्दर्शक निर्माता कथा लेखक (जन्म:१७ फेब्रुवारी १९३५)**१९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक,पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८ )**१९८९: पंडित नरेंद्र शर्मा -- हिंदी भाषेतील भारतीय लेखक,कवी आणि गीतकार(जन्म: २८ फेब्रुवारी १९१३ )**१९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती.१९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले.२५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.(जन्म: १३ मे १९०५ )**१९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ,समाजशास्त्री,इतिहासकार, पत्रकार,राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (जन्म: २५ सप्टेंबर १९१६ )**१९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते,स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४ )**१६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समुहात add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ. 15 लाखाच्या वर विद्यार्थी देणार आज इंग्रजी विषयाचा पेपर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दहा किंवा त्यापेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास आजपासून सुरुवात होत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात लवकर जनगणना करा, सोनिया गांधीनी राज्यसभेत उठवला आवाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्राकडून महाराष्ट्राला सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसाची मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणातच रचला इतिहास, पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात दीड शतकी खेळी करणारा जगातील बनला पहिला फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधवराव हिमगिरे, उपक्रमशील शिक्षक, धर्माबाद👤 रविशंकर बोडके, पंचायत समिती, हदगाव👤 राणी पद्मावार👤 प्रभाकर भेरजे👤 कृष्णकांत लोणे👤 प्रमोद शिंदे👤 आदित्य पलीकोंडलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशबंधू - चित्तरंजन दास*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य हाच वाणीतील मध, सत्य हाच धर्मातील प्राण होय. त्यातूनच विश्वप्रेमाचा उगम होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चीन या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) महात्मा फुलेंनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण ?३) जगातली पहिली रेल्वे सेवा कोणत्या देशात सुरू करण्यात आली ?४) 'स्वेद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'कुस्तीगीरांचा जिल्हा' म्हणून ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) ब्लॉसम २) सावित्रीबाई ३) इंग्लंड ( सन १८२५ ) ४) घाम, घर्म ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला पाणी का सुटतं ? 📒आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. त्यांचे काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकत्र वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालाच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज नेणों ग महेशा । म्हणुनि आलों गर्भवासा । अंध कूपीं पडिला जैसा । रात्रिदिवसा तो नेणों ॥१॥ तुझिया नामाची सांगडी । देई ते न खंडी । पावेन मी पैलथडी । त्या सांगडी आधारें ॥२॥ कामक्रोधादि जलचरीं । कासाविस जालों भारी । व्याकुळ होय चिंतालहरी । दुःखें भारी दाटलों ॥३॥ कल्पना वेली गुंडाळली पायीं । तेणें बुडें विषडोहीं । भंवतें पाहे तंव कोण्हे नाहीं । मग तुज ध्यायीं विश्वेशा ॥४॥ मज बांधुनी कर्मदोरी । घातलें संसारा दुर्धरीं । मायानदीचां महापुरीम । वाहावलों गा दातारा ॥५॥ ऐसा खेदखिन जालों बहुवस । न देखें विश्रांतीची वास । विनवी नामा विष्णुदास । गर्भवास पुरे आतां ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीविषयी नको त्या शब्दात बोलून त्याच्या विषयी इतरांना सांगत फिरणे म्हणजे स्वतःच्या मनाचे समाधान करणे होय.पण,हे सर्व सहजपणे आपल्याला जमत असते. पण,त्याच व्यक्तीमधील चांगल्या गुणांविषयी सांगणे का बरं जमत नाही. ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून कोणाविषयी चांगले बोलणे होत नसेल तर वाईट ही बोलू नये.कारण जेवढे आपण इतरांविषयी वाईट बोलत असतो त्या क्षणापासून आपलेही नाव एका वेगळ्या यादीत समाविष्ट होत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा."कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली.* तात्पर्य : कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18Un67MG6B/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_जागतिक कडधान्य दिन_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_ या वर्षातील ४१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.* *१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.**१९४९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना* *१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला.या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.**१९२९: जे. आर. डी. टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.* 🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार -- लेखक* *१९७८: अल्पना देशमुख-नायक -- लेखिका* *१९७७: उत्पल वनिता बाबुराव -- कवी, लेखक, संपादक* *१९७६: मारूती शामराव जाधव-- लेखक, कवी**१९७६: सुरेश प्रभाकरराव फुलारी -- कवी* *१९७५: अॅड. सोमदत वसंतराव मुंजवाडकर -- कवी, गीतकार, लेखक* *१९७३: प्रमोद बबनराव खराडे -- गझलकार**१९७२: अर्चना हरबुडे-धानोरकर -- कवयित्री**१९५९: डॉ. जिवबा रामचंद्र केळुस्कर -- कवी, लेखक* *१९५२: डॉ. राधिका टिपरे -- प्रसिद्ध लेखिका**१९४९: मोहन शिवराम सोनवणे -- ज्येष्ठ कवी, लेखक* *१९४६: ओंकारलाल चैत्रराम पटले -- कवी, लेखक* *१९४५: डॉ. सोमनाथ कोमरपंत -- समीक्षक तथा साहित्यिक**१९४५: राजेश पायलट –माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २००० )**१९३४: चंद्रकांत महामिने -- ज्येष्ठ विनोदी साहित्यिक (मृत्यू: २२ ऑगस्ट २०२१)* *१९३१: नंद रामदास बैरागी (बालकवी बैरागी) -- भारतातील हिंदी कवी, चित्रपट गीतकार (मृत्यू: १३ मे २०१८ )**१९२९: प्रा. डॉ. ग. का. रावते -- प्रसिद्ध लेखक* *१९२४: श्रीकांत नारायण आगाशे -- कवी, कुमारसाहित्यकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९८६ )**१९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२ )**१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६ )**१८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४ )**१९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान,टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२ )**१९७८: वालचंद रामचंद कोठारी---संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार(जन्म: १३ सप्टेंबर १८९२ )**१९७८: पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री --राष्ट्रीय पंडित,तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८८२ )**१९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५ )**१९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म:५ एप्रिल १८२७)**१८६५: हेन्रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज जागतिक कडधान्य दिन त्यानिमित्ताने विशेष माहिती.......... ...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत आप पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आनंदवन या प्रकल्पाला 10 कोटी रु. शाश्वत निधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, सरकारने पुन्हा खरेदी सुरू करावी, किसान सभा आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - लोकमान्य फेस्टिवलमध्ये 27 लाख सूर्यनमस्कारांचा विक्रम, 375 योग साधकांचा सहभाग, 12 गटांत स्पर्धा; सांगलीच्या डॉ. पटवर्धन यांना 'सूर्यदूत' पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्णधार रोहित शर्माच्या शतकामुळे कटकमध्ये भारताने इंग्लंडचा 4 विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 म. जावेदोद्दीन, अध्यक्ष, उर्दू हायस्कुल, धर्माबाद👤 प्रशांत येमेवार, पोलीस निरीक्षक 👤 जगन्नाथ पांडुरंग दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमीन जी. चौहान, पुरस्कार प्राप्त शिक्षक यवतमाळ👤 विजय रच्चेवार, नांदेड👤 बाबुराव बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 शंकर जाधव, नांदेड👤 प्रशांत बेडसे पाटील👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार👤 डॉ. प्रकाश बोटलावार👤 अशोक श्रीमनवार, नांदेड👤 कांतराव ( राजू ) लोखंडे, उमरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्त*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसाच्या शब्दाशब्दात ज्ञान असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती असते ?२) कोणत्या राज्याने स्वतःचे 'इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी' नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले ?३) 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे ?४) 'स्वामी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय ? *उत्तरे :-* १) ३६० ग्रॅम २) गुजरात ३) अंधश्रद्धा व ज्योतिषाच्या नादी न लागणे ४) धनी, मालक ५) नरेंद्र विश्वनाथ दत्त *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वातावरणातील वायूंचे उपयोग* 📙 **************************हवेतील वायू माहिती असतातच. त्यांचे प्रमाण, टक्केवारी, गुणधर्म यांबद्दलची माहिती प्रयोगशाळेत व शैक्षणिक वर्गात नेहमीच घेतली जात असते. पण अनेकदा दैनंदिन वापरात या वायूंची माहिती आपण उपयोगात आणत आहोत, हे मात्र लक्षात येत नाही. हवा बंद बाटलीतील एरिएटेड कोल्ड्रिंक पिताना चुरचुरणारी चव व फसफसणारे पेय हवेहवेसे वाटते. आत विरघळवलेला, दाबाखाली असलेला कार्बन डाय ऑक्साइड हे काम करत असतो. हेच पेय उघडे ठेवले, तर दहा मिनिटांनी त्यातील हा वायू निघून गेल्यावरची चव चांगली असेल; पण जिभेला चुरचुरणारी, गार लागणारी गम्मत निघून गेलेली असेल. सिनेमाचे शूटिंग चालू आहे किंवा स्टेजवर डिस्को रंगात आला आहे, त्याच वेळी धुराचे लोट व धुक्याचा थर सर्वांना वेढून टाकण्याचा अभ्यास निर्माण करायचा आहे, याही वेळा कार्बन डाय ऑक्साइडच उपयोगी पडतो. कोरडा बर्फ या प्रकारातील घन कार्बन डायॉक्साईड जेव्हा वायुरूप होतो, तेव्हा हा आभास निर्माण होतो. टॉन्सिल्सचे ऑपरेशन करायचे झाले, तर याच कोरड्या बर्फाचा वापर करून क्रायोसर्जरी पद्धतीने रक्तहीन ऑपरेशन करण्याची पद्धत जपानी सर्जन वापरतात. आग विझवण्याच्या उपकरणात कार्बन डाय ऑक्साइड वापरला जातोच. त्याचा थर आगीवर पसरवून प्राणवायूचा पुरवठा तोडणे हा त्यातील मुख्य हेतू असतो. नायट्रोजनचा व्यवहारात वापर अनेक ठिकाणी केला जातो. फक्त त्याची जाणीव आपल्याला फार क्वचित होते. ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही तेले, जीवनोपयोगी औषधे, साठवणीची धान्य प्लास्टिकच्या बंद पिशव्यांत भरली जातात वा बंद डब्यात भरतात, तेव्हा मोकळी जागा नायट्रोजनने भरण्याची प्रथा आहे. एवढेच काय निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यातही नायट्रोजन भरला, तर त्यांचे आयुष्य वाढते, अशी विजेच्या दिव्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाची पद्धत होती. त्यानंतर मात्र अन्य वायूंचा वापर विविध रंग मिळवण्यासाठी सुरू झाला. प्रत्यक्ष नायट्रोजनचा वापर औद्योगिक निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ खते, रंग, स्फोटके, इतकेच काय पण भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील एक म्हणजे नायट्रस ऑक्साइड हे नायट्रोजन व प्राणवायूचेच संयुग आहे. वातावरणातील मुख्य घटक नायट्रोजन असल्याने त्याची औद्योगिक निर्मिती वा साठवणही सहज शक्य होते. प्रयोगशाळेत व औद्योगिक वापरात याचा एक महत्त्वाचा वापर म्हणजे द्रव स्वरूपातील नायट्रोजन. एखादी गोष्ट अनंत काळपर्यंत टिकवायची असेल, तर याच्या तापमानाला ठेवायची व्यवस्था केल्यास ती नक्की टिकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. उदाहरणार्थ जिवंत पेशी या तापमानाला गोठवून पुन्हा पाहिजे त्या वेळी त्यांना नेहमीच्या तापमानात आणता येईल, या दिशेने सतत प्रयोग चालू असून त्यांना यश येत आहे. प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाही. पण याच प्राणवायूचा अशुद्ध पदार्थ शुद्ध करायला गमतीदार वापर केला जातो. लोखंडापासून पोलाद बनवताना त्याची शुद्धता वाढवायला उकळत्या लोखंडाच्या रसात प्राणवायू सोडला जातो. त्याच्या सान्निध्याने अशुद्ध कण चक्क जळून नष्ट होतात, राहते ते शुद्ध लोखंड. हा सोपा उपाय अन्यही काही धातूंच्या शुद्धीकरणात वापरला जातो. शोभेची दारू व स्फोटके यांना हवेतील प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. त्यासाठी त्यातच ऑक्सिडायझर मिसळून त्यातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पुरवण्याची व्यवस्था केली जाते. आजार्याला दिला जाणारा प्राणवायू तर सर्वांना माहिती आहेच. त्याचेच सुटसुटीत भावंड पाणबुडे व गिर्यारोहक वापरतात. हायड्रोजनचा वापर तेलापासून वनस्पती तूप व मार्गारीन बनवण्यासाठी केला जातो. तूप म्हणून वापरात असलेले डालडा हे वनस्पतिज तेलावरील हायड्रोजनेशन प्रक्रियेतून तयार होत. बलुन्समध्ये हेलियमचा वापर केला जातो. जखमा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी म्हणजे हायड्रोजन पॅराॅक्साइडसाठी हायड्रोजनची गरज असतेच. हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही करता येतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज दिलें आतां यत्न करी याचा । जीवभाव वाचा काया मनें ॥१॥ भागलों दातारा शीण जाला भारी । आतां मज तारी अनाथासी ॥२॥ नेणताम सोसिली तयांची आटणी । नव्ह्तीं हीं कोणी कांहीं माझीं ॥३॥ वर्स नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रिय सुसाट सर्व पृथ्वी ॥४॥ येरझार फेरा शिणलों सायासीं । आतां ह्रषिकेशी अंगिकारीं ॥५॥ नामा म्हणे मन इंद्रियाचें सोयी । धांव यासी कायी करुं आतां ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात सुख, समृद्धी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नसते तसेच प्रत्येकाला दु:ख नसेलच असेही नाही. सुख आणि दु:ख हे, मानवी जीवनाशी कायम जुळून राहतात.तेव्हाच कुठेतरी कोणाचे दु:ख बघून डोळे भरून येतात.आणि सुख असते तेव्हा क्षणभर आराम सुद्धा मिळत नाही हेही सत्य आहे. म्हणून सुखात असताना कोणाचे मन दुखेल अशा कोणत्याही शब्दात बोलू नये व दु:ख असेल तर रडत बसू नये.कारण, पुढची वाटचाल स्वतःलाच करावी लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.**१९८४: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना**१९७१:NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.**१९६०:पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.**१९३६:१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.**१९३१:महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.**१८९९:रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडल्या* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: अॅड.संदीप सुधीर लोखंडे -- लेखक**१९९८: ऋषिकेश मठपती -- कवी* *१९८८: रुचा हसबनीस-जगदाळे -- भारतीय अभिनेत्री* *१९८८: प्रा. गणेश विठ्ठलराव मोताळे -- लेखक* *१९८८: सविता देविदास बांबर्डे -- लेखिका**१९६८: डॉ. ज्योती प्रदीप तुंडूलवार --लेखिका* *१९६४: डॉ. अर्चना जगदीश गोडबोले -- लेखिका तथा जंगल पर्यावरण अभ्यासक**१९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू**१९५८: राजीव शांताराम थत्ते -- लेखक**१९५८: प्रदीप शांताराम पटवर्धन -- भारतीय अभिनेते आणि विनोदी कलाकार (मृत्यू: ९ ऑगस्ट २०२२ )**१९५४: रेणू वामन देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९४९: ज्योती सुभाष म्हापसेकर -- मराठी साहित्यिक, स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा**१९४९: मोहन सीताराम द्रविड -- मराठी भाषेतील लेखक**१९४८: प्रा. न. मा. जोशी -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत**१९४१: जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)**१९३९: सुधीर मोघे -- मराठी कवी, गीतकार व संगीतकार (मृत्यू: १५ मार्च २०१४ )**१९३७: प्रा. यशवंत नारायण जोशी -- लेखक**१९३१: यशवंत गोविंद जोशी -- लेखक**१९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४ )**१९२१: कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे -- मराठी कीर्तनकार आणि लेखिका (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१० )**१९११: प्रा. दया पटवर्धन -- लेखिका* *१९०९: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (मृत्यू: ३ जानेवारी १९९८ )**१८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न (मृत्यू: ३ मे १९६९ )**१८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार (मृत्यू: ६ मार्च १९०५ )**१८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७ )**१८२८: ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५ )**१७००: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२ )**१६७७: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: दत्तात्रय भास्कर उर्फ काकासाहेब चितळे -- चितळे उद्योगसमुहाचे ज्येष्ठ संचालक**२०१९: विष्णू सूर्या वाघ -- गोव्यातील कवी, नाटककार (जन्म: २४ जुलै १९५४ )**१९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६ )**१९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९१३ )**१९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १९११ )**१९९४: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशाकार, इतिहास संशोधक,इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९८९: रामचंद्र शंकर वाळिंबे -- टीकाकार, समीक्षक (जन्म: ९ नोव्हेंबर १९११ )**१९७५: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६ )**१९७१: डॉ.कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, नामवंत साहित्यिक (जन्म:३० डिसेंबर १८८७)**१९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९ )**१७२५: पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्या रविवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार; ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्या पोहोचली 231 वर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात 14वी भारतीय छात्र संसद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; पुढील तीन दिवसांत चार महत्त्वपूर्ण सत्रे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले, आदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण माहिती; इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सावधान ! मुंबईत आढळला GBS चा पहिला रुग्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रवींद्र भापकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा मंगळवेढेकर- वसंत नारायण मंगळवेढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मोती बनवून सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवाचा थेंब बनून चातकाची तहान भागविणे हे उत्तम. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डोळ्याने किती टक्के ज्ञान ग्रहण करता येते ?२) आपली ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?३) 'गुगली' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?४) 'संदेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) चीनने अलीकडेच कोणते AI चॅटबॉट बाजारात आणले आहे ? *उत्तरे :-* १) ८० टक्के २) पाच - डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ३) क्रिकेट ४) निरोप ५) Deepseek ( डीपसीक )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. --------------------------------------- पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. 'माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही' जनरल मोटर्सने साहजिकच ह्यातक्रारीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. ह्यवेळीजनरल मोटर्सने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तिला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले. व्यक्तीने उत्तरदिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरु होत नाही. जनरल मोटर्सने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्तिकडे पाठवला. इंजीनिअरने गाडी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ती सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हॅनिला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरुच झाली नाही. इंजीनिअरने परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. कंपनीने इंजीनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावरकाही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हॅपरेशन होतेआणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने १९०१ साली आपल्या मर्सिडीज ३५' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगालाकिती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥ शोकमोहाचिया झळंबलों जाळीं । क्रोधाचे काजळीं पोळतसें ॥३॥ चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । प्राण होय व्याकुळा धांव देवा ॥४॥ धांवधांव करुनाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो माझा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो,प्रत्येकांची राहणीमान वेगळी असते सोबतच प्रत्येकांचा स्वभाव सुद्धा वेगळा असतो. कारण सर्वजण एक सारखे राहिले असते तर कोणी, कोणाला मान दिले नसते किंवा गोड बोलून फसवणूक केले नसते.म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसांकडून काहीतरी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि मार्गदर्शन असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ३८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.**१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी**१९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.* *१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.**१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.**१९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.**१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी**१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले.सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.**१८४८:पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना या ग्रंथालयाचे आधीचे नाव दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते. न्यायमूर्ती रानडे हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: प्राची शाह-पांडया -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९७९: सरला लोटन पाटील -- कवयित्री**१९६५: बी. एल. खान-- कवी* *१९६४: नितीन आखवे -- मराठी गीतकार (मृत्यू: ८ एप्रिल २०१२ )**१९६३: डॉ. दिलीप नारायण पांढरपट्टे -- सुप्रसिद्ध गझलकार, सनदी अधिकारी* *१९५८: सुकुमार जयकुमार कोठारी -- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये काव्य करणारे कवी* *१९५५: माधव रा.पवार -- प्रसिद्ध गीतकार, कवी* *१९५३: बाळासाहेब थोरात (विजय भाऊसाहेब)-- माजी मंत्री म.रा.**१९५३: माधव जगन्नाथ जोशी -- लेखक**१९५१: रवींद्र साठे -- मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक**१९४१: निळकंठ तुळशीराम रणदिवे -- लेखक, कवी**१९४०: विद्या मधुकर जोशी -- लेखिका**१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते**१९३५: उषा वामन भट -- लेखिका* *१९३५: अशोक पुरुषोत्तम शहाणे -- लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक,व प्रकाशक**१९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१० )**१९३२: माधव भीमराव थोरात -- लेखक* *१९२८: अनंत महादेव मेहंदळे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(मृत्यू: २४ एप्रिल १९९२ )**१९२३: प्रा. डॉ. बापूसाहेब देवेंद्र खोत -- लेखक* *१८९८: रमाबाई भीमराव आंबेडकर ( मृत्यू: २७ मे १९३५ )**१८८४: लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर -- मराठी कवयित्री, कथालेखिका, कीर्तनकार, समाज कार्यकर्त्या आणि प्रभावी वक्त्या( मृत्यू: २० सप्टेंबर १९६९)**१८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७० )* 🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: आत्माराम भेंडे-- मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक(जन्म: ७ मे १९२३)* *२०१४: डॉ. शरद कोलारकर-- विदर्भातील एक ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, लेखक, विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (जन्म: १७ ऑक्टोबर १९३७ )**१९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५ )**१९९०: वामनराव हरी देशपांडे -- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक (जन्म: २७ जुलै १९०७ )**१९४७: वासुदेव दामोदर मुंडले -- चरीत्रकार (जन्म: १८८० )**१९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८ )**१२७४:श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लिहिते व्हा .........!*कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी साहित्याचा वापर करता येतो. म्हणून त्यास खुप महत्त्व दिल्या जाते ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *निबे कंपनीचा वर्धापनदिन आणि मिसाईल कॉम्प्लेक्सचा शुभारंभ, आत्मनिर्भर भारतात संरक्षण क्षेत्रात मोठी क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशावाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नंदुरबार जिल्ह्यातील 11 लाख लोकांची होणार सिकलसेल तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी घुसखोरांना अटक !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटींच्या खर्चाला मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : क्रिकेट समीक्षक, लेखक, मुक्त पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन, शिवाजी पार्क मध्ये होणार अंतीमसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा चार विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंढरीनाथ बोकारे, अध्यक्ष, नानक-साई फाउंडेशन, नांदेड 👤 पवनकुमार गटूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 विनायक गोविंदराव पारवे👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी👤 साईनाथ येनगंटीवार👤 कवी बी. एल. खान*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जेपी - जयप्रकाश नारायण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भात भारद्वाज पक्ष्याला काय म्हणतात ?२) प्राणी व वनस्पतींना शास्त्रीय नावं देण्याची पद्धत कोणी सुरू केली ?३) प्राणी व वनस्पतींना दिलेला शास्त्रीय नाव किती शब्दांनी बनलेला असतो ?४) 'संशोधक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणतंही शास्त्रीय नाव कोणत्या शैलीत लिहिलं जातं ? *उत्तरे :-* १) नपिता ( दारू न पिता ज्यांचे डोळे लाल दिसतात तो नपिता ) २) कॅरोलस लिनियस, स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ ३) दोन ( genus कुल / गोत्र व species जात ) ४) शास्त्रज्ञ ५) तिरकस अक्षरांच्या इटालीक शैलीत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 ***********************विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्या सर्व सुविधा पुरवू शकेल. अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत. अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील. एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तान्हेलों भुकेलों । तुझेनि नामें निवालों ॥१॥ तहान नेणें भूक नेणें । अखंड पारणें नामीं तुझ्या ॥२॥ अमुतलिंग केशव हा चित्तीं । तेणें नामया तृप्ति अखंडित ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला हवे ते स्थान किंवा पाहिजे ती प्रसिद्धी आजकाल पैशाने सर्वच काही विकत घेता येऊ शकते. पण, जो पर्यंत आपले अवयव साथ देतात आणि हातात पैसे असतात तोपर्यंत विकत घेतलेल्या वस्तूंना महत्व असते.जेव्हा हेच ,आपल्या हातातून हळूहळू दूर व्हायला लागतात तेव्हा, मात्र जवळचे जिवलग मित्र सुद्धा अनोळखी होतात.म्हणून पैसे अशा ठिकाणी खर्च करावा जेथे आपण नसताना सुद्धा त्या पैशाची किंमत झाली पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंतःकरणातील दुःख*एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्यासारख्या उड्या मारणार्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'*तात्पर्य :- बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ३७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.* *१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.* *१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.**१९३२: ’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.**१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: श्रीशांत – क्रिकेटपटू,**१९८३: अंगद सिंग बेदी -- भारतीय अभिनेता* *१९८१: देवदत्त नागे -- भारतीय मराठी अभिनेता**१९८०: डॉ. वीरा राठोड (विनोद रामराव राठोड)-- प्रसिद्ध कवी,संपादक,लेखक साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार विजेते**१९७२: जयश्री रामचंद्र थोरवे-(गव्हाणे) -- कवयित्री, लेखिका**१९६६: महेंद्र भास्करराव पाटील -- कवी* *१९५५: अनिल यशवंत अभ्यंकर प्रसिद्ध नाटककार, लेखक**१९५२: डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक,क्रिकेटपटू आणि राजकारणी**१९५२: नंदू पोळ -- मराठी नाट्य-चित्र अभिनेते, लेखक (मृत्यू: २८ जुलै २०१६)**१९४९: प्रा. सुमती पवार -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री* *१९४७: श्रीधर माडगूळकर -- ज्येष्ठ लेखक, गदिमा यांचे सुपूत्र (मृत्यू: २१ फेब्रुवारी २०१९ )**१९४५: मारुती पाटील -- लेखक**१९४०: डॉ.पंडित कमलाकरराव परळीकर -- ख्यातनाम जेष्ठ कलावंत, प्रसिद्ध गायक, रचनाकार* *१९४०: भूपिंदर सिंग -- भारतीय संगीतकार,गझल गायक आणि बॉलीवूड पार्श्वगायक (मृत्यू: १८ जुलै २०२२ )**१९३१: ओंकार भास्कर धुंडिराज -- चित्रकार, लेखक व कलाप्रसार (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९९९ )**१९३०: डॉ. भास्कर वामन आठवले(भा.वा.) -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, संगीतकार (मृत्यू:१९ डिसेंबर २०२४)**१९२७: विनायक श्रीपाद राजगुरु -- लेखक (मृत्यू: १० मे १९९० )**१९२५: सुभा करंदीकर -- लेखिका (मृत्यू: ३ फेब्रुवारी २००९)**१९२५: मुरलीधर गोपाळ गुळवणी -- महाराष्ट्रातील अभ्यासू इतिहाससंशोधक, कुशल इतिहासकथनकार, वस्तुसंग्राहक (मृत्यू: १८ डिसेंबर २००० )**१९१६: प्रभाकर विष्णू पाटणकर -- प्रवासवर्णनकार तथा निवृत्त विक्रीकर उपायुक्त* *१९१५: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८ )**१९११: रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४ )**१९०६: आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये -- प्राचीन भाषा तज्ज्ञ, संशोधक(मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७५ )*🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: भारतरत्न लता मंगेशकर -- सुप्रसिद्ध भारतीय गायिका आणि संगीतकार (जन्म: २८ सप्टेंबर,१९२९ )**२००६: ईश्वर बगाजी देशमुख -- क्रीडाशिक्षक, संस्थापक श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित (जन्म: २० मार्च १९२४ )**२००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ –माजी केन्द्रीय नभोवाणी मंत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९२८ )* *१९९३: आर्थर अॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३ )**१९८६: लक्ष्मण नीळकंठ (अण्णासाहेब) छापेकर -- लेखक, कवी, संपादक (जन्म: १३ सप्टेंबर १९०७ )* *१९७६: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५ )**१९५२: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ डिसेंबर १८९५ )**१९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, विधवा विवाहाला संमती दिली.(जन्म: १० मार्च १८६३ )**१९३१: मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१ )**१८०४: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (जन्म: १३ मार्च १७३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्याध्यापकास पत्र*प्रिय मुख्याध्यापक, सर्व प्रकारच्या शाळा.बऱ्याच दिवसापासून आपल्याशी बोलावे म्हणून मनाशी ठरवलं होतं पण बोलायला वेळ मिळाला नाही किंवा बोलणे टाळलो. पण आज राहवलं नाही कारण माझे पाल्य शाळेतून येताना खूप।अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते. भरपूर काम करून एखादा व्यक्ती जेंव्हा थकून भागून घराकडे येतो, तेंव्हा त्यांची स्थिती जशी असते अगदी त्याच अवस्थेत दिसलं. त्याला पाहून माझे मलाच कसं तरी वाटलं ? घरात प्रवेश केल्याबरोबर खांद्यावर असलेलं प्रचंड जड दप्तर बाजूला सारत हाश हुश्श केलं आणि पलंगावर आडवं झालं. आज खरोखर मला माझ्या पाल्याची काळजी वाटायला लागली की ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय, 180 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, भाजपला 39 ते 44 जागा, चाणक्यचा सर्व्हे समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नागपूर शिक्षण विभागाचा घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिर्डी संस्थानच्या जेवणासाठी आता कूपन आवश्यक, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली, वाशीम अकोला रेल्वेस्थानकांची पाहणी, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेड - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा, नांदेडमध्ये भव्य आभार सभेचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर : आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना दुपारी होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सुहास सदावर्ते , दै. सकाळ, जालना👤 प्रा.पंजाबराव येडे , बीड👤 वैभव गायकवाड👤 सादिक मोहंमद👤 माधव गणेशराव नारसनवाड👤 लक्ष्मण एडके👤 चंपती सावळे👤 सचिन गिराम👤 कोंडेवार साईनाथ, भैसा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गानकोकिळा - लता मंगेशकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेचे पहिले कृष्णवर्गीय राष्ट्राध्यक्ष कोण होते ?२) नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ?३) 'गोफण क्लब' ही संस्था कोणी स्थापन केली ?४) 'सैन्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ? *उत्तरे :-* १) बराक ओबामा २) तपकिरी रंग ३) दामोदर चाफेकर ४) फौज, दल ५) सामाजिक गुलामगिरी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लता मंगेशकर*( हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.त्यांना चार भावंडे होती, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांची तृतीय पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन !*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥ तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥ तैसी परि मज जहाली जाण देवा । नामा उभा केशवा विनवितो ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणारा एखादा माणूस जर काहीच करत नसेल तर त्याला रिकामटेकडा म्हणून नाव ठेवले जाते. त्यातच एखादा माणूस काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करून व टिंगल, टवाळी करून आनंद घेणारे देखील समाजात बघायला मिळतात. ही आजची वास्तविकता आहे.जी व्यक्ती नित्य नेमाने आपले कार्य करत असते अशा व्यक्तींनी कोणाकडे लक्ष देऊ नये.आपले कार्य निरंतर चालू ठेवावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/02/nila-satyanarayan.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ३६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ’पुण्याची’ स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.**२००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.**१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.**१९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.**१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.**१९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.**१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.**१९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.**१७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट* *१६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.**१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.* ♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: अर्शदीप सिंग -- भारतीय क्रिकेटपटू**१९८३: आकाश पांडुरंग फुंडकर --कामगार मंत्री म.रा.**१९८१: प्रमोद कमलाकर माने -- ग्रामीण जीवनावर लेखन करणारे मराठी लेखक**१९८०: प्रतिक पाटील -- लेखक**१९७६: अभिषेक बच्चन – प्रसिद्ध अभिनेते**१९७५: दिनेश वासुदेवराव गावंडे -- लेखक, कवी**१९७५: डॉ.संजयकुमार परशराम निंबेकर -- लेखक**१९७३: प्रशांत शहादू वाघ -- कवी* *१९७२: प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड -- इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक, समीक्षक**१९६७: प्राचार्या डॉ. शरयू बबनराव तायवाडे -- लेखिका* *१९६६: पंडित उदय भवाळकर -- भारतीय शास्त्रीय गायक**१९६५: सुरेंद्र ऋषी मसराम -- कवी**१९६३: डॉ. केशव सखाराम देशमुख -- प्रसिद्ध लेखक आणि कवी**१९६२: वर्षा रमेश दौंड -- कवयित्री**१९५५: सुभाष मधुकरराव कुलकर्णी- तोंडोळकर -- लेखक**१९५५: बलभीम तात्याराव तरकसे -- कवी, लेखक**१९५२: अजित देशमुख -- लेखक**१९४९: प्रा. डॉ. विमल कीर्ती -- पाली भाषा व बौद्ध साहित्याचे अभ्यासक (मृत्यू: १४ डिसेंबर २०२० )**१९४९: नीला सत्यनारायण -- महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त,तथा मराठी साहित्यिक (मृत्यू: १६ जुलै २०२० )**१९४७: सदाशिव सोनु सुतार - लेखक* *१९४६: शशिकला नामदेवराव गावतुरे-- कवयित्री* *१९४३: श्याम सदाशिव किरमोरे -- लेखक* *१९३६: बाबा महाराज सातारकर – ज्येष्ठ कीर्तनकार (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०२३ )**१९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार (३१: ऑक्टोबर २०१९ )**१९२८: श्रीनिवास दिगंबर इनामदार -- कवी (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१३ )**१९२२: राजाराम मारोती हुमणे -- चरित्र लेखक, नाटककार* *१९१४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी,संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४ )**१९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते,भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक,विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२ )**१८४०: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१ )* ♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: मनोहर मुरलीधर शहाणे -- प्रसिद्ध मराठी कथाकार व कादंबरीकार (जन्म: १ मे १९३० )**२०१८: सुधा करमरकर -- नाटयलेखिका (जन्म : १८ मे १९३४ )**२०१५: डॉ.किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू,अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणारे लेखक (जन्म: ९ जानेवारी १९६० )**२०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४ )**२००८: महर्षी महेश योगी – योग गुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७ )**२००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या 'हरिजन' या मराठी अंकाचे संपादक* *१९८६: लक्ष्मणराव सरदेसाई -- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(जन्म: १८ मार्च १९०४ )**१९२७: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२ )**१९२०: विष्णू नरसिंह जोग -- आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक(जन्म: १४ सप्टेंबर १८६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयंतीनिमित्त विशेष संकलित माहिती ....*महाराष्ट्र राज्याची पहिली महिला राज्य निवडणूक आयुक्त - डॉ. निला सत्यनारायण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली, राहुल करडीले नांदेडचे नवे जिल्हाधिकारी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक, उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार लाडकी बहीण योजनेची पडताळणी; घरात 'चारचाकी' दिसली तर थेट लाभ होणार रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगराणींनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात पीकविमा योजनेत भ्रष्टाचार, सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे चौकशी करून कारवाईचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मागेल त्याला सौर कृषी पंप, शंभर दिवसांचे उद्दीष्ट 60 दिवसात पूर्ण, 52 हजार 705 पंप बसवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. इंग्लंड एकदिवसीय सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा समावेश, BCCI ची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बाळासाहेब कदम , शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल पेंडपवार , नांदेड👤 अच्युत पाटील खानसोळे 👤 निलेश गोधने, शिक्षक, नांदेड👤 श्याम राजफोडे👤 संदीप मुंगले👤 सदाशिव मोकमवार, येताळा👤 भीमराव वाघमारे👤 अक्षय शिंदे👤 बालाजी पाटील👤 सुभाष नाटकर👤 कामन्ना भेंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वरूपानंद- रामचंद्र विष्णू गोडबोले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते. - महात्मा गांधी .*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उडतांना सर्वाधिक पंखविस्तार करणारा पक्षी कोणता ?२) महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?३) १९ वर्षाखालील महिला टी - २० विश्वचषक २०२५ कोणत्या संघाने पटकावले ?४) 'सेवक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी - २० सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ? *उत्तरे :-* १) भटक्या अलबेट्रॉस २) महाबळेश्वर ( १४३८ मी. ) ३) भारत ( दक्षिण आफ्रिका - उपविजेता ) ४) दास, नोकर ५) ४ - १ ने *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तळियाचे पाळीं वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाइतो रे । ताहाना फुटे परी उद्क नेघे । मेघाची वाट पाही रे ॥१॥ तैसा येईं बा कान्हया येईं बा कान्हया । जीवींच्या जीवना केशीराजा रे ॥धृ०॥ टाळघोळ कल्लोळ नानापरीचीं वाद्यें । वाजती वोजा रे । रानींच्या मयुरा नृत्या पैं नये । तुजविण मेघराजा रे ॥२॥ जळाविण जळचर पक्षीविण पिलियासी । तैसे जालें नामयासी रे । शंखचक्र गदा पद्म पितांबरधारी । अझुनि कां न पावशी रे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला होत असलेला त्रास फक्त आपल्यालाच चांगल्याप्रकारे माहीत असते आणि त्यातून आलेला अनुभव सुद्धा आपणच, आतून जाणत असतो. म्हणून चुकूनही दुसऱ्याला त्रास देऊ नये व त्रास द्यायला लावू नये कारण, प्रत्येकातच त्या प्रकारचा त्रास सहन करण्याची ताकद नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *करावे तसे भरावे*" एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.*तात्पर्य :- करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला मिळते*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☀️ *_जागतिक कर्करोग दिन_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_ या वर्षातील ३५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.**२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.**१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान**१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे**१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.**१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.**१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.**१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले,त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.* ☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: वरुण शर्मा -- भारतीय अभिनेता* *१९८९: पवन सुरेशराव नालट -- कवी**१९८८: श्रीपाद अरुण जोशी -- कवी**१९८७: डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे -- लोकसभेचे खासदार* *१९८२: प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे -- कवी, लेखक, संपादक* *१९८२: ईश्वरदास देविदास मते -- कवी, लेखक**१९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री**१९६७: संदीप सुरेश शहा -- कवी, लेखक* *१९५७: श्रीराम दुर्गे -- जेष्ठ लेखक (मृत्यू: ३० जुलै २०२१ )**१९५०: डॉ अलीमिया दाऊद परकार -- लेखक**१९५०: हेमंत साने -- लेखक, इतिहास संशोधक* *१९४१: विठ्ठल महादेव बोते -- कवी, लेखक* *१९३९: रमण रामचंद्र माळवदे -- लघुकथा, एकांकिका लेखक* *१९३८: पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू(मृत्यू: १७ जानेवारी, २०२२ )**१९३६: डाॅ. वासंती फडके -- मराठी लेखिका,अनुवादिका**१९३५: डॉ. लीला गणेश दीक्षित -- बालसाहित्यकार (मृत्यू: १३ ऑक्टोबर २०१७ )**१९३४: आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद) -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९३३: श्रीधर चंद्रशेखर गुप्ते पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: ११ मार्च २०१५)**१९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११ )**१९०४: त्रिंबक निळकंठ आंभोरकर -- लेखक (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९२ )**१९०३: शांताबाई नाशिककर -- कथा लेखिका, कादंबरीकार, नाटककार* *१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली.वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.(मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४ )**१८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (मृत्यू: १६ डिसेंबर १९६० )*☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वाणी जयराम -- हिंदुस्तानी गायिका आणि पार्श्वगायिका (जन्म: ३० नोव्हेंबर १९४५)**२०२०: राघवेंद्र कडकोळ -- जेष्ठ अभिनेते, लेखक (जन्म:१९४३)**२००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३ )**२००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८ )**१९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४ )**१८९४: अॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४ )**१६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: १६२६ जावळी,सातारा )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य, विरोध केल्यास होणार कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ए आय चा वापर विचाराधीन - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अफजलखानाचा कोथळा काढलेली वाघनखे नागपूरला रवाना, साताऱ्यात चार लाख शिवप्रेमींनी घेतले दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हिवाळी आशियाई स्पर्धेत भारताची पहिली महिला खेळाडू, पुण्याच्या श्रुती कोतवालकडे स्पीड स्केटिंग संघाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णा तिम्मापुरे, पुण्यनगरी धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 जी. राजरेड्डी रामरेड्डी, धर्माबाद👤 संजीवकुमार गायकवाड, पत्रकार, धर्माबाद👤 शंकर कुऱ्हाडे👤 अहमद शेख👤 राजू माळगे👤 विलास थोरमोठे👤 सुमेध पावडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोहपुरुष - वल्लभभाई पटेल*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. - लो. टिळक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कान्हा राष्ट्रीय उद्यान/व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?२) कान्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?३) बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला ?४) 'सीमा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू आहे ? *उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) १ जून १९५५ ३) जागतिक बालहक्क परिषद ४) वेस, मर्यादा, शीव ५) उत्तराखंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦟 डास चावल्यानं एड्स का होत नाही?🦟डास जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा ते आपलं रक्त शोषून घेतात. त्यामुळे ज्याला मलेरिया झाला आहे अशा व्यक्तीला डासानं चावा घेतला असल्यास मलेरियास कारणीभूत असणारे रोगजंतू त्या रक्तातून डासांच्या शरीरात शिरतात. असे डास इतरांना चावले तर त्या चाव्यातून मलेरियाचे रोगजंतू त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. त्या व्यक्तीला मलेरियाची बाधा होते.आपण याचा अनुभव घेतलेला असतो. तर मग असा प्रश्न पडतो, की ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे अशा व्यक्तीला चावलेला डास इतर कोणाला चावला तर त्या चाव्यातून एड्सची लागण होणार नाही का? एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्तात एड्सला कारणीभूत असणारे एचआयव्ही जातीचे विषाणू वावरत असतात हे खरं आहे. म्हणून तर अशा व्यक्तीला इंजेक्शन देताना वापरलेली सिरिंज दुसऱ्या कोणाला तरी इंजेक्शन देण्यासाठी वापरली तर त्या व्यक्तीलाही एड्सची बाधा होऊ शकते. एवढंच काय, पण एड्स झालेल्या व्यक्तीची दाढी किंवा मुंडण करण्यासाठी वापरलेला वस्तरा निर्जंतुक न करता दुसऱ्यासाठी वापरला तरीही त्या वस्तऱ्याला चिकटलेल्या रक्ताच्या थेंबांमधून एचआयव्हीचा शिरकाव दुसऱ्याच्या शरीरात होऊ शकतो, तर मग तो डासांच्या चाव्यामधून का नाही होणार, हा प्रश्न म्हणूनच संयुक्तिक वाटतो. कोणतेही विषाणू परोपजीवी असतात. त्यांना जगण्यासाठी आणि आपल्या वाढीसाठी विशिष्ट यजमान पेशींची गरज भासते. एचआयव्हीचे विषाणू मानवी शरीरातल्या टी-लिम्फ पेशींना आपले यजमान बनवतात. त्यांच्या जिवावर आपली गुजराण करत ते रक्तात वाढत राहतात. अशा रक्ताचा घास जेव्हा एखादा डास घेतो तेव्हा त्यातले काही विषाणू डासाच्या शरीरात निश्चितच प्रवेश करतात; पण तिथं त्या विषाणूंना आपल्या यजमान पेशी सापडत नाहीत. डासाच्या शरीरातल्या पेशींवर ते विषाणू जगू शकत नाहीत. मलेरियाच्या रोगजंतूंच्या वाढीतला काही भाग डासाच्या शरीरातच होत असतो. त्यामुळे ते तगून राहतात. तशी परिस्थिती एड्सच्या रोग्याच्या रक्ताचा घास घेणाऱ्या डासाबाबतीत नसते. त्यामुळे डासाच्या शरीरात शिरलेल्या एचआयव्हीच्या विषाणूंची वाढ तर होतच नाही; पण डासाच्या पचनसंस्थेकडून त्या विषाणूंचं विघटन होऊन त्यांचा नायनाट होतो. त्यामुळे असा डास जेव्हा दुसऱ्या निरोगीव्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात टोचण्यासाठी एचआयव्ही विषाणू हजरच नसतात. अर्थात, अशा डासांच्या चाव्यामुळं त्या निरोगी व्यक्तीला एड्सची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विषयीं ठेवुनि मन सांगति ब्रह्मज्ञान । तेणें समाधान नुपजे कदा ॥७॥ हरिदासासी पुसूं भक्तीच उपाव । तंव तयापाशीं भाव नाहीं कोठें ॥८॥ वाचेंनें सांगती नामाचा बडिवार । विषयीं पडीभर सदाकाळीं ॥९॥ ऐसें विचारितां बहुत भागलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१०॥ भयभीत जालों संसार येरझारीं । शिणलों असें भारी तारीं मज ॥११॥ नामा म्हणे आतां हिंडतां कष्टलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१२॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेले कार्य पाहून बाहेरच्या लोकांकडून होणारा विरोध तेवढा भयानक नसतो. कधी शिकायला सुद्धा भाग पाडत असते पण जेव्हा त्याच कार्याला आपल्या जवळचेच माणसं आपुलकीचा ढोंग करून विरोध करतात तेव्हा मात्र त्या विरोधाचे मानसिक तणावात रूपांतर होत असते. म्हणून कोणाला साथ देता येत नसेल तर विरोधही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी *संस्कृतचे महाकवी माघ निर्धन असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत. त्यांच्याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्यास सदैव तयार असत. एकदा कवीराज माघ आपल्या घरी शिशुपाल वध या महाकाव्याचा नववा अध्याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेली दिसली. त्यांनी त्या माणसाला आदराने घरात बोलावले. त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्हणाला," कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्टीने खूप मोठी असणार आहे." महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्या माणसाला परत पाठविणे त्यांना योग्य वाटेना. घरात सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या माणसाला देण्याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्या घरात मौल्यवान असे काय शिल्लक राहणार. जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महाकवींचे लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले. पत्नीच्या हातात सोन्यांचे कंकण होते. त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब माणसाला देऊन टाकले. गरीब माणसाने महाकवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कविराजांच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरे कंकणही त्याला दिले व म्हणाली, "मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस." या दांपत्याच्या दानी वृत्तीला गरीबाने साष्टांग नमस्कार केला.तात्पर्य – आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी* *१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.**१९२८: 'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.**१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.**१९१६: बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना**१८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.**१७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: गणेश बाळासाहेब निकम -- लेखक* *१९७८: धिरज पाटील (धनराज) -- कवी**१९७५: हंसिनी अरविंद उचित -- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७५: प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड -- माजी मंत्री म.रा. तथा खासदार* *१९७३: प्रा. डॉ. गिरीश खारकर -- प्रसिद्ध मराठी गजलकार, प्रतिभावंत लेखक, प्रकाशक(मृत्यू: १७ ऑक्टोबर २०१९ )**१९६९: महेश रघुनाथ पानसे -- कवी**१९६७: गजानन निमकर्डे -- कवी* *१९६३: गंगाधर त्र्यंबक अहिरे -- कवी, लेखक, संपादक* *१९६३: अंजली चितळे -- कवयित्री* *१९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ**१९६२: प्रा. भाऊ काशिनाथ(भाऊसाहेब) गोसावी -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६२: डॉ. जयराम काळे -- कवी, लेखक* *१९५७: दीप्ती नवल -- अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका* *१९५२: नारायण गणपतराव निखाते -- लेखक* *१९५०: प्रा. डॉ. सुदाम जाधव -- आदिवासी साहित्याचे अभ्यासक तथा लेखक* *१९४५: प्रा. डॉ. रामचंद्र कामाजी क्षीरसागर -- लेखक* *१९४२: अरुण कृष्णराव हेबळेकर -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार**१९३८: वहिदा रहमान -- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३५: नारायण बाळकृष्ण ठेंगडी -- पत्रकार, कवी आणि कथाकार (मृत्यू: २५ मार्च १९८८ )**१९३१: प्रा. चंद्रकांत भालेराव -- प्रसिद्ध कथाकार* *१९२९: मोहना -- भारतीय, गायिका,दूरदर्शन निर्माता आणि नृत्यांगना(मृत्यू :११ सप्टेंबर १९९०)**१९२७: अच्युत महादेव बर्वे -- कथाकार, कादंबरीकार(मृत्यू: १६ एप्रिल १९८२ )**१९२७: वसंत शंकर सरवटे -- ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक(मृत्यू: २३ डिसेंबर २०१६ )**१९०६: अवधूत महादेव जोशी -- कथाकार, चरित्रलेखक, टीकाकार**१९००: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५ )**१८२१: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१० )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: माधवरव खाडिलकर -- ज्येष्ठ नाटककार लेखक* *२००७: मधुसूदन शंकर कानेटकर -- संगीत तज्ञ (जन्म: २६ जुलै १९१६)**२००७: हरी अनंत फडके -- संशोधक, अभ्यासक (जन्म: १३ ऑक्टोबर १९३२ )**१९९१: प्रा. कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री, संपादिका (जन्म: १६ डिसेंबर १९२१ )**१९७९: मोरेश्वर दिनकर जोशी-- संस्थापक, व्यवस्थापक, संपादक(जन्म: २८ फेब्रुवारी १९०० )**१९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ )**१९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २८ डिसेंबर १८५६ )**१८३२: उमाजी नाईक --पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.(जन्म: ७ सप्टेंबर १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन - शालेय परिपाठ.... समुहात add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील श्रीकृष्ण देवउखलाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहन संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यभरातील शासकीय ठेकेदार येत्या 14 फेब्रुवारीपासून जाणार संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अर्थसंकल्प 2025 मधील ठळक बाब - 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणारे नोकरदार वर्ग होणार करमुक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे मेट्रोला अर्थसंकल्पात 837 कोटी रुपयांची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावानी पराभव, अभिषेक शर्माची धुवांधार फलंदाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U-19 महिला विश्वकपावर भारताने कोरले नाव, दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतानं सलग दुसऱ्यांदा कोरलं महिला अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड 👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबाराव - गणेश दामोदर सावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहानुभूती गोड शब्द, ममतेची दृष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही. - महात्मा गांधी .*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सर्वात उंच पक्षी कोणता ?२) 'जागतिक पाणथळ दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) गावाचा ग्रामनिधी कोण सांभाळतो ?४) 'सुंदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १५० वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) सारस २) २ फेब्रुवारी ३) ग्रामसेवक ४) सुरेख, छान, देखणे ५) शतकोत्तर सुवर्ण महोत्सव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭐ *ताऱ्यांचं अंतर कसं मोजतात ?* ⭐ **************************तारे आपल्यापासून कितीतरी दूर असतात. आपल्याला सर्वात जवळचा असलेला तारा म्हणजे आपला सूर्य. तोच मुळी पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे. इतर तारे तर त्याच्या कितीतरी पटींनी दूर आहेत. तेव्हा त्यांच्या पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी तशीच काहीतरी खास युक्ती योजायला हवी. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा आपले दोन डोळे जरा वेगवेगळ्या कोनांमधुन त्या वस्तूकडे पाहतात. त्यामुळे तिच्या दोन प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये उमटतात आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असतं. समजा आपण आपला एक डोळा मिटला आणि समोरच्या दाराच्या चौकटीच्या बरोबर समोर येईल अशा तर्हेनं एक बोट समोर धरलं. आता तो डोळा उघडून दुसरा मिटला आणि परत पाहिलं तर ते बोट हल्ल्याचं दिसून येईल. कारण त्या दोन डोळ्यांतल्या प्रतिमांमध्ये अंतर असतं. यालाच पॅरॅलॅक्स असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. जितकं त्या बोटाचं आपल्या डोळ्यांपासूनचं अंतर कमी तितका पॅरलॅक्स जास्त. उलटपक्षी जितकं बोटाचं अंतर जास्त तितका पॅरलॅक्स कमी. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर आणि तिच्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स यांचं एक नातं असतं. जर पॅरॅलॅक्स मोजला तर गणित करून ते अंतर शोधता येतं. जमिनीचा सर्व्हे करणारे तज्ज्ञ याचाच उपयोग करतात. पण आपल्या दोन डोळ्यांमधलं अंतरच इतकं कमी आहे की दूरवरच्या तार्याचा पॅरॅलॅक्स शून्यवतच असतो. दोन डोळ्यांमधलं अंतर तर वाढवता येत नाही. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर पाहिलं तर त्या दोन प्रतिमांमध्ये काही पॅरॅलॅक्स तयार होतो. तरीही दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी पृथ्वीवरची दोन टोकंही जरी गाठली तरी ते अंतर अपुरंच पडतं. यासाठी मग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या अलीकडून आणि पलीकडून जर आपण पाहू शकलो तर त्या कक्षेच्या व्यासाइतकं अंतर दोन 'डोळ्यांमध्ये' आपण पाडू शकतो. त्यासाठी मग वर्षातल्या दोन वेगवेगळ्या वेळी एकाच ताऱ्याच्या घेतलेल्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स मोजून त्या ताऱ्याचं आपल्यापासून असलेलं अंतर मोजता येतं. अर्थात अशा दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी तसेच तेजस्वी 'डोळे' ही असणे गरजेचं असतं. ही गरज अतिशय शक्तिशाली दुर्बिण वापरून पूर्ण केली जाते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तत्त्व पुसावया गेलों वेदज्ञासी । तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ॥१॥ तया समाधान नुपजे कदा काळीं । अहंकार बळि जाला तेथेम ॥२॥ म्हणोनि तुझें नाम धरिलें शुद्धभावें । उचित करावें पांडुरंगा ॥३॥ स्वरूप पुसावया गेलों शास्त्रज्ञासी । तंव भरले तयापाशीं भेदाभेदा ॥४॥ एकएकाचिया न मिळती मतासी । भ्रांत गर्वराशि भुलले सदा ॥५॥ पुराणिकासी पुसूं स्वरूपाची स्थिति । तंव त्यासी विश्रांति नाहीं कोठें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य : ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_17.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील ३२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: मक्का येथे चालू असलेल्या हज यात्रेत चेंगराचेंगरी होऊन २५१ यात्रेकरू ठार तर २४४ लोक जखमी झाले.**१९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अॅंडरसन याला फरारी घोषित केले.**१९८१: ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यूझीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाऊ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म बॉल टाकण्यास सांगितले. ट्रेव्हरने चॅपलने तसा चेंडू टाकला व ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला परंतु यानंतर अंडरआर्म गोलंदाजी बेकायदा ठरवण्यात आली.**१९७९: १५ वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.**१९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९४६: नऊ शतकांची राजसत्ता बरखास्त करुन प्रजासत्ताक बनण्यास हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली.**१९४१: डॉ.के.बी.लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.**१८९३: थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली.**१८८४: ’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.**१८३५: मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत* 🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: विकी पांडुरंग कांबळे -- कवी**१९९२: वैदेही वैभव परशुरामी -- मराठी चित्रपट अभिनेत्री**१९८१: प्रमोद अंबडकर -- कवी, गीतकार**१९७९: विभावरी देशपांडे -- भारतीय अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक**१९७५: डॉ. प्रिया प्रवीण मदनकर (धांडे)-- कवयित्री* *१९७४: इंदिरा गोविंदराव चापले-भोयर -- कवयित्री**१९७२: यशवंत गोविंदा निकवाडे -- कवी, लेखक* *१९७२: भगवान मार्तंड पाटील -- कवी**१९७१: मनोज कुमार तिवारी -- भारतीय राजकारणी, गायक आणि अभिनेता**१९७१: अजय जडेजा – प्रसिद्ध क्रिकेटपटू, अभिनेते**१९६३: डॉ. मोहन कुमार दरेकर -- ज्येष्ठ गायक**१९६०: सुरेश प्रल्हाद साबळे -- प्रसिद्ध लेखक, समीक्षक, व्याख्याते, कवी**१९६०: जॅकी श्रॉफ – प्रसिद्ध अभिनेता**१९५९: रामदास लक्ष्मण राजेगावकर -- बालकवी, लेखक, समीक्षक* *१९५५: प्रमोद रानडे -- मराठी उद्योगातील भारतीय पार्श्वगायक, व्हायोलिन वादक आणि संगीत संयोजक**१९४६: सुखलाल नत्थु चौधरी-- लेखक, कवी**१९४५: मधुकर रामदास गजभिये -- कवी**१९४५: प्राचार्य रमेश भारदे -- लेखक* *१९४४: अरुण चिंतामण टिकेकर -- लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक, लेखक अनुवादक (मृत्यू: १९ जानेवारी २०१६ )**१९४३: मधुकर पांडुरंग खरे -- लेखक**१९३१: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (मृत्यू: २३ एप्रिल २००७)**१९३१: पांडुरंग पिलाजी धरत -- लेखक* *१९३१: शशिकांत दत्तात्रय कोनकर -- लेखक**१९२९: जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३ )**१९२७: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ )**१९२७: प्रा. बन्सीलाल लुकडू सोनार -- लेखक* *१९१७: ए. के. हंगल – चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२ )**१९१२: राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, गायक, कवी आणि गीतकार (मृत्यू: ७ एप्रिल १९७७ )**१९०४: बाबुराव रामचंद्र घोलप -- शिक्षणतज्ज्ञ (मृत्यु: २६ मे १९८२ )**१९०१: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६० )**१८८४: सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (मृत्यू: ६ जानेवारी १९८४ )**१८६४: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ (मृत्यू: ५ जानेवारी १९४३ )* 🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: अनिल मोहिले – संगीतकार व संगीत संयोजक* *२००३: कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (जन्म: १ जुलै १९६१ )**१९९५: मोतीराम गजानन तथा मो.ग. रांगणेकर – नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार (मृत्यू: १० एप्रिल १९०७ )**१९९२: मोहन छोटी -- भारतीय अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९३५ )**१९७६: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १९०१ )**१९६४: नारायण पैकाजी पंडित(बाबाजी महाराज)-- प्रवचनकार,ग्रंथकार(जन्म: १२ जानेवारी १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मार्कंडेय जयंती विशेष लेख*महर्षी मार्कंडेय : पद्मशाली समाजाचे कुलदैवत*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. भगवान शंकराचे परमभक्त असलेले मृकंडला एकही पुत्र नव्हते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी शंकर भगवानची कठोर तपस्या केली ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत सुरू होणार बिबट्या सफारी, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सुरू होणार प्रकल्प, पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हवाई क्षेत्रात भारताची मोठी उड्डाण, 2047 पर्यंत 200 विमानतळ, 2026 मध्ये हवाई टॅक्सी सेवा सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ऐन निवडणुकीच्या काळात आम आदमी पार्टीच्या सात आमदारांनी दिले राजीनामे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेपासून सुरू होणार, पण २०२९ पर्यंत बंद राहणार मुंबईचं T1 टर्मिनल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना BCCI कडून सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर, मुंबईत आज मंडळाच्या वार्षिक समारंभात प्रदान करण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुणे येथे खेळलेल्या भारत वि. इंग्लंड चौथ्या T20 सामन्यात भारताचा 15 धावानी विजय, पाच सामन्याची मालिका 3-1 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख एम. बी. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अण्णाभाऊ साठे - तुकाराम भाऊराव साठे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दृष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले. त्यांच्याबरोबर मैत्री न ठेवलेलीच बरी. - संत तुलसीदास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात वेगवान मासा कोणता ?२) १२५ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?३) ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख कोण असतो ?४) 'भारताचे शांती पुरूष' असे कोणत्या पंतप्रधानाला ओळखले जाते ?५) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ? *उत्तरे :-* १) सेलफिश ( ताशी ११० किमी ) २) शतकोत्तर रौप्यमहोत्सव ३) ग्रामसेवक ४) लालबहादूर शास्त्री ५) मुरलीधर देवीदास आमटे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥ आवडीचेनि सुखें वोसंडतु प्रेमें । गातों मनोधर्में हरिचे गुण ॥२॥ सांडोनि अभिमान नाचे धरोनि कान । अंतरीं ध्यान विठोवाचें ॥३॥ श्रीहरिची उत्तम जन्मकर्मनामें । घेतलीं त्या प्रेमें सुखरूपें ॥४॥ संतांची विश्रांति ज्ञानियांचें गुज । जें कां मुक्तिबीज मोक्षदानी ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी काहीही म्हणो, आपण आपले कार्य नित्यनेमाने करत रहायचे. पण, हे सर्व करताना आपण एवढे प्रामाणिक रहायचे की त्यावेळी कोणी आपला जाणून, बुजून अपमान केले तरी तो झालेला अपमान आपल्याला सन्मान झाल्यासारखे वाटले पाहिजे. कारण झालेला अपमान हसत, हसत सहन करताना बघून पुढचा व्यक्ती सुद्धा गहिवरून गेला पाहिजे. एवढी सहनशीलता व सर्वां प्रती आदर असायला पाहिजे तेव्हाच केलेल्या कार्याला अर्थ लागत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्याच्या कुटीत पाण्याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्याच्याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्याला विचारले,’’तुमच्याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्हणाला,’’ राजा, आपण आपल्या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्हणाला,’’ माझ्याकडे असलेल्या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्याला आपण अमूल्य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्यामुळे मी स्वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्वराने दिल्याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्हणून मी रात्री स्वतलाच सांगत असतो नव्हे माझ्या आत्म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्थान दिले.*तात्पर्य :- मोह, लोभ, मद, मत्सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2024/01/ashok-saraf.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟤 *_ या वर्षातील ३१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟤 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟤•••••••••••••••••••••••••••••••••*१९६३: मोर पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता* *१९५०:राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.**१९५०:अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.**१९४९:बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.**१९४५:युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.* *१९२९:सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.**१९२०:डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकाची सुरूवात**१९११:स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली.तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.* 🟤 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟤 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९७: ऋतुराज दशरथ गायकवाड -- भारतीय क्रिकेट खेळाडू**१९९३: गौतमी देशपांडे -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आणि गायिका* *१९८३: सतीश जनाराव अहिरे -- कवी, गझलकार* *१९८१: अमृता अरोरा -- सिने-अभिनेत्री व मॉडेल**१९७५: प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका**१९७३: अंकुश चौधरी -- मराठी अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक**१९६५: प्रा. डॉ. संजय निळकंठ पाटील -- लेखक**१९५९: रमेश गिरीधर महाले -- बालकवी, लेखक**१९५८: प्रा. डॉ. शंकर चव्हाण -- लेखक, संपादक* *१९५२: डॉ. रमेश नारायण वरखेडे -- जेष्ठ समीक्षक, संशोधक, संपादक* *१९५२: डॉ.सतीश शास्त्री -- लेखक (मृत्यू: २६ जानेवारी २०२३ )**१९५०: लीना मेहेंदळे --भारतीय प्रशासन सेवेतील पूर्व सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध लेखिका**१९४९: सदानंद सिनगारे -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९४९: राजेश विवेक उपाध्याय -- भारतीय अभिनेता (मृत्यू :१४ जानेवारी २०१६)**१९४८: राजा सखाराम जाधव -- समीक्षक, दलित साहित्याचे अभ्यासक(मृत्यू: १९ डिसेंबर २००८ )**१९३१: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू: २३ डिसेंबर २००८ )**१९२१: प्रा. डॉ. गंगाधर विठ्ठल कुलकर्णी -- कवी, लेखक**१९१९: श्रीराम हरी अत्तरदे --- लेखक**१९१५: हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई -- चरित्र लेखक* *१९०४: मुहम्मद मंसूरुद्दीन -- बंगाली लेखक, निबंधकार, कोशकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९८७)**१८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८),त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१ )* 🟤 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟤••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: इलाही जमादार -- प्रसिद्ध गझलकार आणि महाकवी (जन्म: १ मार्च १९४६ )**२००४: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२ )**२००४: सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९ )**२०००: वसंत कानेटकर – नाटककार (जन्म: २० मार्च १९२० )**२०००: कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८ )**१९९५: सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष,पद्मभूषण(जन्म: २२ ऑगस्ट १९३४)**१९९४: वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक(जन्म: २५ सप्टेंबर १९१४ )**१९९०: प्रा.श्रीनिवास रघुनाथ कावळे -- मराठी लेखक (जन्म: १३ सप्टेंबर,१९३० )**१९८६: विश्वनथ मोरे – संगीतकार (जन्म: १५ जुलै १९३७ )**१९७२: महेन्द्र – नेपाळचे राजे(जन्म:११ जून १९२०)**१९६९: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक, मौनव्रती संत (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ )**१९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरील हावभावाने विनोद निर्माण करणारा अभिनेता - अशोक सराफ*अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि दमदार अभिनेता म्हणून अवघ्या हिंदुस्थानाला परिचीत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. अशोक सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशोक सराफ यांना 2023 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार व नुकतेच भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केले आहे ............... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *16 हजार 300 कोटी रुपयाच्या राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज अभियानाला मंत्रिमंडळाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई - म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *साहित्य निर्मितीचे मूळ समाजातील अस्वस्थतेत, कादंबरीकार शेषराव खाडे यांचे अमरावतीच्या 'लेखक आपल्या भेटीला' कार्यक्रमात मार्गदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रविवारी 2 फेब्रुवारी ला MPSC ची गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या 10 फेब्रुवारीला माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत भारतीय छात्र संसदेचे आयोजन, केंद्रीय क्रीडामंत्री मांडवीय यांच्या उपस्थितीत 8 फेब्रुवारीला उद्घाटन; 250 आमदार होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आज पुण्यात रंगणार भारत वि. इंग्लंड यांच्यात चौथी T20 सामना, भारतीय संघात होणार काही बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विनायक सुहास हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 राजेश्वर रामपुरे, धर्माबाद👤 जयेश पुलकंठवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी इंगळे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्वोत्तम प्रयत्न केले की, यशाचा मार्ग मोकळा होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२४ वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?२) वेगवान गोलंदाज म्हणून वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावणारा जसप्रीत बुमराह हा कितवा भारतीय ठरला ? ३) २०२४ वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू कोण ठरली ?४) 'सुगम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट संविधानात नमूद करणारा जगातील पहिला देश कोणता ? *उत्तरे :-* १) जसप्रीत बुमराह, भारत २) पहिला ३) अमेलिया केर, न्यूझीलंड ४) सुलभ, सोपा, सुकर ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥ मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥ सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥ भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥ मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥ दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥ म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या विचाराने माणसं जुळतात तर आपल्या विचारानेच माणसं दूर जातात पण, माणसं तेव्हा जास्त तुटतात जेव्हा आपले विचार परखड, ज्वलंत तसेच सत्य असतात. त्याक्षणी आपण दु:खी होऊ नये.कारण गोड बोलून स्वतः चा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा आपला वापर केला जातो तीच आपली खरी फसवणूक असते. पण, आपल्या परखड, ज्वलंत आणि सत्य विचाराने एखाद्या माणसात जेव्हा परिवर्तन होते तेव्हा खऱ्या अर्थाने तेच परिवर्तन इतरांना दिशा सुद्धा दाखवत असतात आणि त्यातूनच विकास होत असतो.म्हणून समाजात विचारांची पेरणी करताना समाजाचे भले झाले पाहिजे असेच विचार पेरण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :- प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2022/09/mahatma-gandhi.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟠 *_हुतात्मा दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_कुष्ठरोग निवारण दिन_* 🟠•••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_ या वर्षातील ३० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟠 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••• *१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्न’**१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.**१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.**१९३३: अॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.**१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🟠 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟠 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: प्रेरणा योगेश देशमुख -- लेखिका, कवयित्री**१९७५: अनुप सोनी -- भारतीय अभिनेता**१९६९: प्रदीप मनोहर पाटील -- लेखक, कवी**१९६६: सुहास किर्लोस्कर -- चित्रपट संगीताचे विविधांगी विश्लेषण करणारे लेखक**१९५९: निर्मिती सावंत -- मराठी अभिनेत्री* *१९५३: सुधीर कोर्टीकर -- नाणे संग्रहाक, छायाचित्रकार, कवी, लेखक**१९५१: जयंत गुणे -- लेखक, अनुवादक**१९४९: डॉ. सतीश आळेकर – प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते**१९४८: स्मिता राजवाडे -- कादंबरी, कथा, ललित, काव्यसंग्रह, अनुवादित कवितासंग्रह, बालसाहित्य, नाटक अशी त्यांची १७ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.(मृत्यू: १८ जानेवारी २०२२ )**१९४५: सदानंद हरी डबीर -- कवी, गीतकार, गझलकार**१९४३: भगवान माधवराव परसवाळे -- कवी**१९३६: पं. दिनकर पणशीकर जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक(मृत्यू: ३ नोव्हेंबर २०२० )**१९३३: शांताराम राजेश्वर पोटदुखे -- पत्रकार, माजी खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा लेखक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१८ )**१९३०: सुनिता भास्कर देवधर -- लेखिका* *१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक(मृत्यू: २ फेब्रुवारी, २०२२ )**१९२७: प्राचार्य मोतीचंद्र गुलाबचंद शहा -- लेखक**१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६ )**१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७ )**१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७ )**१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २००० )**१८९५: शंकरराव दत्तात्रय देव -- विचारवंत, लेखक (मृत्यू: ३० डिसेंबर १९७५ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक (मृत्यू: ६ मार्च १९८१ )**१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५ )**१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे -- मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू:२ मे १९२९)* 🟠 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟠••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: नंदू घाणेकर -- ज्येष्ठ संगीतकार व फिल्म मेकर (जन्म: ४ नोव्हेंबर १९५८ )**२०२०: विद्या बाळ -- मराठी स्त्रीवादी लेखिका/संपादिका (जन्म: १२ जानेवारी १९३७ )**२००४: रमेश अणावकर -- मराठी संगीतातील प्रसिद्ध गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३२)**२००१: वसंत शंकर कानेटकर --- लोकप्रिय मराठी नाटककार,लेखक,कादंबरीकार आणि विचारवंत.(जन्म: २० मार्च १९२२ )**२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते* *१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक**१९८८: बॅ.शेषराव कृष्णराव वानखेडे -- क्रिकेट प्रशासक आणि माजी अर्थमंत्री (जन्म:२४ सप्टेंबर १९१४)**१९४८: काशीबाई कानिटकर -- मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या.मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणार्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला (जन्म: २० जानेवारी १८६१ )**_१९४८: मोहनदास करमचंद गांधी- ’महात्मा’गांधी - राष्ट्रपिता (जन्म: २ ऑक्टोबर १८६९ )_**१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता - महात्मा गांधी*महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांनी देशहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील ते असे नेते होते ज्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबून ब्रिटीश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेशातील संगम तीरावर चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू, 60 जण जखमी, मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली असल्याची माहिती डीआयजी वैभव कृष्णा यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्घटनेबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी दुःख व्यक्त केलं, मृताच्या कुटुंबियांना 25 लाख रु. मदत जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात लोककला व लोकवाद्य शिकणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावती येथे 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उदघाटन, हे प्रदर्शन 2 फेब्रुवारी पर्यंत खुले राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सरकारी शाळांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता घसरलेलीच; तिसरी ते पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना वाचताही येईना, असरच्या सर्वेक्षणातून राज्यातील शिक्षण क्षेत्राचे विदारक चित्र समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेला 15 फेब्रुवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. बालाजी कोंपलवार, अध्यक्ष बाभळी बंधारा कृती समिती, धर्माबाद👤 शंकर माने👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, शिक्षक, मुखेड👤 सारिका सब्बनवार, शिक्षिका व लेखिका, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, शिक्षक धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक, देगलूर👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतिश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 सतीश गणलोड👤 रंजना भिसे, शिक्षिका, पालघर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महात्मा गांधी - मोहनदास करमचंद गांधी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दृष्ट लोकांबरोबर शत्रुत्वच चांगले. त्यांच्याबरोबर मैत्री न ठेवलेलीच बरी. - संत तुलसीदास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'आद्य शेतकरी / अभियंता'* असे कोणत्या कीटकाला म्हटले जाते ?२) भारत सरकारने समाजकल्याण खाते केव्हा स्थापन केले ? ३) जगात यू-ट्यूबचे सर्वाधिक यूझर्स कोणत्या देशात आहेत ?४) 'साथ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १९७२ मध्ये कोणत्या संघटनेने महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिले ?*उत्तरे :-* १) वाळवी, उधई ( Termite ) २) १४ जून १९६४ ३) भारत ४) सोबत , संगत ५) युनेस्को *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✨ *तारे का लुकलुकतात ?* ✨ """"""""""""""""""""""""""""""""""""""""'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' यासारख्या बालगीतांमधून आपल्याला लहानपणापासूनच तारे लुकलुकतात, हे मनावर बिंबवलं जातं. 'टिमटिम करते तारे' सारख्या गीतांमधून हा समाज बळावतोच. तरीही तारे का लुकलुकतात, या सवालाचं मोहोळ घोंगावतच राहतं. तारे स्वयंप्रकाशित असतात. म्हणजे त्यांच्या अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुभट्ट्यांमधून जी ऊर्जा बाहेर पडते ती प्रकाशलहरींच्या रूपात उत्सर्जित केली जाते. या प्रकाशाचे किरण अनंत अवकाशातून प्रवास करताना बहुतांश निर्वात पोकळीतून जात असतात. ते जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना आपल्या या धरतीच्या सभोवती असलेल्या वातावरणातून प्रवास करावा लागतो. वातावरण ज्यांचं बनलेलं आहे त्या वायूंच्या ढगांमधून त्यांना पार पडावं लागतं. हे वायूचे ढग स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. आकाशात जेव्हा आपण ढग पाहतो तेव्हा ते एका जागी स्थिर तर नसतातच; पण त्यांचे आकारही सतत बदलत असताना आपल्याला दिसतात. याचाच अर्थ वायु स्थिर नसतात. ते सतत हलत असतात. हवाही अशीच सतत हलत असते. त्यांच्यामधून जेव्हा ते किरण पार होतात तेव्हा मग ते किरणच स्थिर नसून सतत हलत असल्यासारखं वाटत राहतं. त्यामुळे तारे लुकलुकत असल्यासारखं वाटतं. वास्तविक हलत असते ती हवा.असं जर आहे तर मग मंगळ, शुक्र, गुरू यांसारख्या ग्रहांवरून परावर्तीत होणारा प्रकाशही त्याच वातावरणातून प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. त्यापायी मग ते ग्रहही लुकलुकत असलेले दिसावयास हवे; पण तसं होत नाही. एवढंच कशाला पण जो आपल्याला प्रकाश देतो आणि जो आपला जीवनदाता आहे तो सूर्यही एक ताराच आहे; पण त्याचा प्रकाश तर स्थिर असतो. तो लुकलुकताना दिसत नाही. तेव्हा मग तारेच लुकलुकतात आणि ते हलत्या हवेपायी होतं हे कितपत खरं आहे ? वास्तविक कोणताही ग्रह काय किंवा तारा काय हा बिंदूमात्र नसतो. त्याला विशिष्ट आकारमान असतं. व्याप्ती असते. त्यामुळं आपल्या नजरेत ते बिंबासारखे किंवा चकतीसारखे असतात. त्यांच्यापासून निघणारा प्रकाश झोतासारखा असतो, एकमेव किरणासारखा नसतो. त्यामुळे त्याने झोताचे सर्वच किरण हलत्या हवेतून जातांनाही एकसाथ हालत नाहीत. त्यामुळे तो झोत लुकलूकल्यासारखा वाटत नाही. सूर्यापासून निघणारा प्रकाशही असाच झोतस्वरूप असतो. त्यामुळे तो विशाल पसरतो, लुकलुकत नाही; पण तारे आपल्यापासून लक्षावधी, कोट्यवधी प्रकाशवर्ष अंतरावर असतात, त्यामुळे इतक्या दूरवरून य त्यांचं बिंब एखाद्या बिंदूसारखंच दिसतं. त्यांच्यापासून प्रत्यक्षात जरी प्रकाशझोत निघत नसेल असला तरी तो एखाद्या एकमेव किरणासारखाच वाटतो. क्षीणही झालेला असतो. त्यामुळे मग हलत्या हवेतून येताना तोही हलल्यासारखा होतो. तो तारा लुकलुकतो.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥ लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥ नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोळ्यांना काजळ न लावता देखील ते डोळे सुंदर दिसत असतात.फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. कानाची किंमत तेव्हा असते जेव्हा वाईट ऐकणे टाळणे व चांगले ऐकून इतरांना सांगणे, मुखाचे गुणगान तेव्हा केले जाते ज्यांचे विचार सकारात्मक असतात व त्यातून निघणारे प्रत्येक शब्द मोलाचे असतात.शरीरात जेवढे काही अवयव असतात त्या सर्व अवयवांची काळजी नीट घेतल्याने ते अवयव आपले शेवटपर्यंत आधार होत असतात. म्हणून परिस्थिती कशीही आली तरी चालेल पण आपले विचार व आपला योग्य मार्ग कधीही सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1AEYibVoKA/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔴 *_भारतीय वर्तमानपत्र दिवस_*🔴 🔴 *_ या वर्षातील २९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔴 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔴•••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.**१९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.**१९५५: भारतीय कामगार किसान पक्षाची स्थापना**१९५३: संगीत नाटक अकादमी ची स्थापना**१८८६: कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.**१८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.**१८५३: नासिक येथे नाशिक सार्वजनिक वाचनालयाची स्थापना**१७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.* 🔴 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: डॉ. मिलिंद लक्ष्मणराव इंदूरकर -- कवी, लेखक व संगीततज्ञ* *१९७०: राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज पूर्व केंद्रिय क्रीडा राज्यमंत्री**१९६२: गौरी लंकेश -- बंगळूरच्या पत्रकार व कार्यकर्त्या,(मृत्यू: ५ सप्टेंबर २०१७ )**१९६१: संजीव गोयंका -- भारतीय अब्जाधीश उद्योगपती**१९६०: प्रमोद देशपांडे --- कवी, अनुवादक**१९५९: अनिल कुलकर्णी -- प्रकाशक अनुबंध प्रकाशन संस्था**१९५९: डॉ. रेषा अकोटकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका* *१९५२: दिलीप हरिहरराव देशपांडे -- लेखक* *१९५१: सुलक्षणा महाजन -- मराठी लेखिका आणि अनुवादिका* *१९५१: अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज**१९५१: इकबाल मुकादम -- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९४८: भास्कर देशमुख -- मराठी लेखक* *१९३४: प्राचार्य रामदास तुकाराम भगत -- लेखक**१९३२: अंबिका रमेशचंद्र सरकार -- कथालेखिका,अनुवादक**१९२९:भगवान राघवेंद्र नाईक -- लेखक* *१९२६: डॉ.मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ )**१९२२: प्रो. राजेंद्रसिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (मृत्यू: १४ जुलै २००३ )**१८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे (कवी चंद्रशेखर) -- मराठी कवी (मृत्यू: १७ मार्च १९३७ )**१८६६: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४ )**१८६०: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (मृत्यू: १५ जुलै १९०४ )**१८५३: मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली,त्यांपैकी एका कुटुंबात जन्म. (मृत्यू: १९१२ )**१८४३: विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१ )**१७३७: थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू:८ जून १८०९ )* 🔴 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔴••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१:अरविंद जोशी -- अभिनेता, नाटककार आणि दिग्दर्शक(जन्म: १९३६ )**२०१९: जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस -- भारतीय कामगार संघटना, राजकारणी,आणि पत्रकार (जन्म: ३ जून १९३०)**२०१४: मनोहर बाळकृष्ण कुलकर्णी --प्राध्यापक, लेखक, संशोधक (जन्म: १० सप्टेंबर १९३०)**२०११: श्रीकांत वसंत देशपांडे -- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील गायक (जन्म:१२ जून १९४८)**२००३: पंढरी बाई -- भारतीय अभिनेत्री(जन्म: १९३० )**२००१: प्रा.राम मेघे – महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री* *२०२०: पंडित देवेन्द्र मुर्देश्वर -- ज्येष्ठ बासरी वादक (जन्म: १९ सप्टेंबर १९२३)**१९९५: रुपेश कुमार –रुपेरी पडद्यावरील खलनायक,निर्माते व दिग्दर्शक* *१९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ* *१९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक.अहिल्या आणि इतर कथा,संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश,सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत.(जन्म १९ नोव्हेंबर १८९७ )* *१९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४ )**१९३४: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ )**१८२०: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८ )**१५९७: महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोबाईल क्रांती आणि जीवन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *31 जानेवारी पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला होणार सुरुवात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *माजी शिक्षणमंत्र्यांनी घेतलेले निर्णय रद्द, पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण, एक राज्य एक गणवेशातही सुसूत्रता नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात महाविद्यालयात निवडणुका होणार सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात AI विद्यापीठाची होणार स्थापना, विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जसप्रीत बुमराह ठरला ICC Men’s Cricketer of the Year पुरस्काराचा मानकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *तिसऱ्या T20सामन्यात भारताचा 26 धावानी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शशिकांत संगम, शिक्षक, नांदेड👤 सुनील वानखेडे, शिक्षक, किनवट👤 नरेंद्र जोशी, शिक्षक, नांदेड👤 राजेश्वर सुरकूटवार, धर्माबाद👤 वीरभद्र करे👤 कोंडीराम केशवे, शिक्षक, लातूर👤 कु. वेदश्री दर्शन येवतीकर ( दुसरा वाढदिवस )*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सार्वजनिक काका - गणेश वासुदेव जोशी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रसन्नता हे आत्म्याचे आरोग्य आहे व उदासीनता हे आत्म्याचे विष आहे. - स्टेनिसलास*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'मधमाशांचे कर्दनकाळ'* असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) भारतामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा केव्हा लागू झाला ?३) वादळाची दिशा आणि गती कोणत्या एककामध्ये मोजली जाते ?४) थरचे वाळवंट भारतातील किती राज्यात पसरले आहे ?५) लपविलेला बॉम्ब शोधण्यासाठी कोणत्या प्राण्याला प्रशिक्षण दिले जाते ? *उत्तरे :-* १) वेडा राघू ( Green bee eater ) २) सन १९७२ ३) नेफोमीटर ४) राजस्थान, गुजरात, हरियाणा ५) कुत्रा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकर* 📙**************** थंडीची चाहूल लागली की लोकरीची आठवण होतेच. उबदार वस्तू, कपडे, पांघरुणे, मोजे, टोप्या या लोकरीच्या बनवल्या जातात. लोकरीचे कपडे महाग असतात; पण नीट वापरले, तर टिकाऊ असतात. हल्ली पर्यायी प्रकार म्हणून कृत्रिम लोकर बाजारात आहे. आॅरलाॅन या कुत्रिम धाग्यांचा वापर त्यात असतो. पण खरी लोकर व तिची उब ही वेगळीच. लोकर ही मुख्यतः मेंढ्यांपासून मिळवली जाते. काही अन्य प्राण्यांची लोकरही जगात वापरतात, पण ते प्राणी व त्यांची लोकर केवळ त्याच भागात वापरली जाते. लामा, याक ही त्यांची काही उदाहरणे. लोकर म्हणजे एक प्रकारचा केसासारखाच धागा असतो. पण हा धागा मुळापासून काढल्यानंतरही म्हणजे मृत झाल्यावरही स्थितिस्थापकत्व राखू शकतो. हवेतील आर्द्रता, पाणी, शरीरातील घाम यांना शोषून घेणे व गरजेप्रमाणे पुन्हा आपोआप कोरडे होणे हा लोकरीचा प्रमुख गुण. त्यामुळेच पावसाची भुरभुर असताना लोकरीचा स्वेटर अंगात असेल, तर वेळ निभावून जाते व स्वेटर आपोआप वाळत जातो. दुसरा लोकरीचा प्रमुख गुण म्हणजे मूळ आकार पुन्हा मिळवणे. त्यामुळे ताणली, दाबली, चुरगाळली, तरी लवकर शक्यतो मूळ आकार घेते. घाण, धूळ, माती, तेलकटपणा यांपासूनही लोकरीचे कपडे झटकन सोप्या रीतीने स्वच्छ होऊ शकतात. या सर्व गुणांमुळेच लोकर आजही स्वतःची मागणी टिकवून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील मरीनो जातीच्या मेंढ्या आणि दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना येथील मेंढ्या ही जगातल्या लोकर पैदाशीची प्रमुख साधने. पश्मीना जातीच्या मेंढ्या ही याला उपयुक्त असतात. त्यांचा धागा खूप लांब, चिवट व पाहिजे त्या जाडीचा काढता येतो. मेंढीची लोकर यांत्रिक कात्रीने कापून पाण्यात भिजवून मग वाळवतात. एका मेंढीची लोकर शक्यतो सलग एकाच गठ्ठ्याप्रमाणे काढली जाते. हिवाळ्यानंतर हा प्रकार करतात म्हणजे पुढच्या हिवाळ्यापर्यंत मेंढी पुन्हा स्वतःचे संरक्षण करू शकते. कापलेली लोक कार्डिंग मशिनवर कातून तिचे जाड दोर वळले जातात. त्यांना रंग देऊन व त्यांच्यावर प्रक्रिया करून मग योग्य तो ताण देत, पीळ देत त्यापासून लोकरीचे गुंडे बनवले जातात. कापड विणायचे असले, तर लोकरीबरोबर थोडाफार सुताचा वापरही केला जातो. लोकरीला दिलेला रंग पक्का असतो व त्यामुळे तिला चकाकी येते.लोकरीचा कपडा अंगावर घातला की, तिच्यातील धाग्यांमध्ये अडकून राहिलेली हवा हीच मुळी मुख्यत: आपल्या शरीरावरील ऊब व बाह्य गारवा यांमध्ये इन्सुलेशनप्रमाणे काम करते. त्यामुळे निर्माण झालेली ऊब टिकून राहते. चहाच्या किटलीवर टिकोझी (Tea-Cozy) यासाठीच घालतात. लोकरीच्या कपड्यांना ते टोचू नयेत म्हणून आतून मऊ अस्तर लावण्याची ही पद्धत आहे. लोकरीचे कपडे वापरण्याचा काळ हा वर्षांतील थंडीचा काळ एवढाच असतो. अन्य वेळी ते ठेवून दिले जातात. लोकर खाणारे एक प्रकारचे किडे हे कपडे कुरतडतात. त्यामुळे हे कपडे ठेवताना नेहमीच कीटकनाशक औषधांचा वापर आवश्यक ठरतो. अन्यथा हवाबंद कपाटात कपडे ठेवावे लागतात. या प्रकारच्या किड्यांना कसर जातीचे किडे म्हणतात. चकचकीत, लहान, झपाट्याने हालचाल करणारे हे किडे खास करून लोकरीवरच वाढतात. लोकरीचे स्वेटर, शाली हाताने विणणे हे काम जगभराच्या स्त्रिया कलाकुसरीने व आवडीने करत आल्या आहेत. या क्षेत्रात आता यांत्रिक पद्धतीने जरी काम होत असले, तरीही आवडीच्या व्यक्तीने विणलेला स्वेटर जास्त आवडीने वापरला जातो, याला यानंतरही बाधा येईलसे वाटत नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्ममरणाचें भय मज दाविसी । तें म्यां ह्रषिकेशी अंगिकारलें ॥१॥ आतां माझी चिंता तुज कां पंढरिनाथा । असो दे भलभलता भलतेंच ठायीं ॥२॥ सुखदुःख भोगणें माझें मी जाणें । तुज तंव भोगणें नलगे कांहीं ॥३॥ नामा म्हणे माझे हेचि मनोरथ । होईन शरणागत जन्मूजन्मीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण किती खरे बोलत आहोत हे जरी इतरांना जास्त माहीत नसले तरी आपल्यालाच माहीत असते. पण खोटे बोलून स्वतः चे समाधान कोणत्या रितीने आपण करत आहो हेही आपल्याच जास्त माहीत असते आणि त्याही पलीकडे जो कोणी सभोवताली पसरलेला असतो त्याला तर सर्व काही माहीत असते.म्हणून माणसाने एवढेही खोटे बोलू नये.व इतरांची दिशाभूल करू नये. त्यापेक्षा खरे बोलताना जरी कोणी ऐकले नाही तरी चालेल पण एक दिवस खरेपणाच आपला आधार होत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नाव मोठे .......* एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'तात्पर्यः- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्याच असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात join होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💮 *_ या वर्षातील २८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 💮 *_महत्त्वाच्या घटना:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: १९७५ मधे बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबूर रहमान यांची हत्या करणाऱ्या ५ जणांना फाशी देण्यात आले.**१९७७: मिर्झा हमीदुल्ला बेग यांनी भारताचे १५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९८६: चॅलेंजर या अवकाशयानाचा उड्डाणानंतर ७४ सेकंदांनी स्फोट झाला.**१९६१: ’एच. एम. टी. वॉच फॅक्टरी’ हा भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना बंगलोर येथे सुरू झाला**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी शांघाय शहराचा ताबा घेतला.**१६४६: मराठी राज्याची राजमुद्रा वापरुन लिहीलेले शिवाजीराजांचे पहिले पत्र उपलब्ध* 💮 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*💮 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: श्रुती हासन -- तमिळ-भारतीय चित्रपट अभिनेत्री, गायिका, संगीतकार**१९६८: मिलन अर्जुन लुथरिया -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक**१९६१: उदय नागोराव बरडे -- कवी* *१९६१: कमलाकर बापू राऊत -- कवी, लेखक, संपादक**१९५८: दिनेश भैय्यालाल नखाते -- लेखक**१९५३: सुधीर शांताराम थत्ते -- मराठी लेखक**१९५३: रेवती रमेश गोळे -- कथा लेखिका**१९५३: मीना अनिल टाकळकर -- अनुवादक (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००९ )**१९५०: डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी -- महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, वक्ते, संपादक**१९४८: डॉ अरुणा कौलगुड -- लेखिका**१९४८: प्रा. बी. ए. खरात -- लेखक, संपादक* *१९४८: अरुण तुळजापूरकर -- कवी तथा निवृत्त बँक अधिकारी**१९४२: विजयराव यशवंतराव देशमुख (श्री सद्गुरुदास महाराज) -- प्रसिध्द शिवकथाकार, प्रेरक नि प्रभावी वक्तृत्व, विविध ग्रंथाचे लेखन**१९३९: प्रतापसिंह राणे -- गोव्याचे माजी मुख्यमंत्री* *१९३७: सुमन शंकर हेमाडी तथा सुमन कल्याणपूर – चित्रपट व भावगीत गायिका. त्यांनी हिन्दी, मराठी, गुजराथी, बंगाली, पंजाबी,इ.अनेक भाषांत गाणी गायिली आहेत.**१९३५: दिगंबर कृष्ण गाडगीळ -- निसर्गप्रेमी, पक्षीमित्र, लेखक* *१९३३: मनमोहन -- भारतीय अभिनेते(मृत्यू:२६ ऑगस्ट १९७९ )**१९३०: पं. जसराज – मेवाती घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: १७ ऑगस्ट २०२० )**१९२९: गुलशन नंदा -- भारतीय कादंबरीकार आणि पटकथा लेखक (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९८५)**१९२५: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (मृत्यू: २३ सप्टेंबर २००४ )**१९१४: रूप के. शौरी -- भारतीय निर्देशक, निर्माता,अभिनेता(मृत्यू: ३ जानेवारी १९७३ )**१९१३: राजेंद्र केशवलाल शाह -- गुजराती भावकवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते (मृत्यू: २ जानेवारी २०१० )**१८९९: फील्डमार्शल के.एम.करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख (मृत्यू: १५ मे १९९३ )**१८९४: आनंदीबाई जयवंत -- कथालेखिका, कादंबरीकार (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८४ )* *१८६७: जनार्दन विनायक ओक -- कोशकार (मृत्यू:२२ एप्रिल १९१८)**१८६५: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९२८ )**१४५७: हेन्री (सातवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ एप्रिल १५०९ )*💮 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 💮••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: शंकर सारडा -- साहित्यिक आणि समीक्षक (जन्म: ४ सप्टेंबर १९३७ )**२००७: ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (जन्म: १६ जानेवारी १९२६ )**१९९७: डॉ. पांडुरंग वासुदेव तथा पां.वा. सुखात्मे – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ,पद्मभूषण (१९७१) (जन्म: २७ जुलै १९११ )**१९९६: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार,लेखक,शिक्षणतज्ञ (जन्म: २५ डिसेंबर १९११ )**१९८९: हसमुख धीरजलाल सांकलिया -- भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे एक पुरातत्त्ववेत्ते (जन्म: १० डिसेंबर १९०८ )**१९८४: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले.(जन्म: २ नोव्हेंबर १८९७ )**१८५१: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचे कानपूरजवळ ब्रम्हावर्त येथे निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १७७५ )**१६१६: संत दासोपंत समाधिस्थ (जन्म: २४ सप्टेंबर १५५१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकून सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र देशात अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत मिळणार पैसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा जनस्थान पुरस्काराची घोषणा, नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांना जाहीर; 10 मार्च रोजी होणार वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मत्स्य व्यवसाय विभागाच्या 100 दिवसाच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला सविस्तर आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर अखेर कॉंग्रेसच्या कविता उईके तर उपाध्यक्षपदावर अजित पवार गटाचे एकनाथ फेंडर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी, सर्व पुरावे केले सुपूर्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमरावती श्रमिक पत्रकार संघाकडून ज्येष्ठ पत्रकार प्रकाशदादा चौधरी यांना जीवनगौरव, 50 वर्षांच्या पत्रकारितेत सत्य हाच राहिला कर्मयोग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिजने 34 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर मिळविला पहिला कसोटी विजय, मालिका 1-1 ने बरोबरीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 सोपानराव डोंगरे👤 श्रीनिवास सितावार👤 राम पाटील ढगे👤 सलीम शेख, करखेली👤 राजेश अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चाचा नेहरू - पंडीत जवाहरलाल नेहरू*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दयाशील अंत:करण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग होय. -- स्वामी विवेकानंद*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ड्रोनच्या सहाय्याने टोळधाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता ?२) भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात किती किती खेड्यांचे विद्युतीकरण झाले होते ?३) अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने गौरविले ?४) 'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ग्रामपंचायतीच्या वार्डाची संख्या कोण ठरवतो ? *उत्तरे :-* १) भारत २) ३ हजार ३) पद्मश्री पुरस्कार ४) नाश, विनाश, सर्वनाश, विध्वंस ५) तहसिलदार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 *विजेचा धक्का का बसतो ?* 📒 साधा दिवा लावायला जावं किंवा गरम पाण्यासाठी गिझर चालू करायला जावं आणि विजेचा धक्का बसावा, असा अनुभव कित्येक वेळा आलेला असतो. वास्तविक ही उपकरणे चालू करण्यासाठी असलेली बटनं इन्शुलेटेड केलेली असतात. म्हणजेच त्यांच्या बाह्यांगामधून विजेचा प्रवाह खेळणार नाही, अशी व्यवस्था केलेली असते. पण कधी कधी या व्यवस्थेला कुठेतरी तडा जातो आणि केवळ अंतरंगातूनच खेळणारी वीज या बाह्यांगातही प्रवेश करते. तिच्याशी आपला संपर्क आला की मग आपल्याला विजेचा धक्का बसतो. हे असं का होतं ? असा सवाल त्या धक्क्यानं गांगरुन गेल्यावरही आपल्या डोक्यात धुमाकूळ चालत राहतो.विद्युतबल हे विश्वाच्या जन्मापासून अस्तित्वात असलेलं मूलभूत बल आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू राहण्यात ते महत्त्वाची भूमिका वठवत असतं. विद्युतबलामध्ये ऋण आणि धन असे दोन विद्युतभार असतात. सामान विद्युतभार एकमेकांना दूर लोटतात, तर विषम विद्युतभार एकमेकांकडे आकर्षित होतात; पण अशा एकमेकांकडे ओढ असणाऱ्या एक धन आणि दुसरा ऋण अशा विद्युतभारांना आपण एकमेकांपासून काही अंतरावर ठेऊ शकतो. त्यापोटी मग त्या दोन भारांमध्ये स्थितीजन्य ऊर्जा निर्माण होते. यालाच आपण विद्युत पोटेन्शियल म्हणतो. जर ते दोन टोकांवरचे भार एकत्र आले तर ही ऊर्जा व्होल्टेजच्या रूपात मोकळी होते. दूरवर राहूनही त्यांना एकत्र आणण्याचं काम ज्यांच्यामधून विद्युतभार सहजगत्या वाहू शकतो असे विद्युतवाहक करतात. तांब्याची तार किंवा साधं पाणी सुद्धा चांगले विद्युतवाहक आहेत. अशा तारेनं जर ते विद्युत भार जोडले गेले तर त्या वाहकातून म्हणजेच तारेतून विद्युतप्रवाह वाहू लागतो. याउलट लाकूड किंवा पोर्सेलीन यांच्यामधून विद्युतप्रवाह सहजगत्या वाहू शकत नाही. हे पदार्थ त्या प्रवाहाला विरोध करतात. त्यामुळे ते विद्युतरोधक बनतात. प्रवाहापासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी अशा विद्युतरोधकांचा वापर केला जातो.आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपले शरीरही चांगलं विद्युतवाहक असतं. त्यामुळे एका टोकाच्या विद्युतभाराशी आपल्या शरीराचा संपर्क आला तर शरीरातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यापोटी उद्भवणाऱ्या व्होल्टेजपोटी अनेक शरीरक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात. होल्टेजचं प्रमाण जास्त असेल तर या अडथळ्यांची मात्राही जास्त असते. जोरदार धक्का बसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.विद्युतप्रवाह नेहमी धन विद्युतभाराकडून ऋण विद्युतभाराकडे वाहत असतो. आपला संपर्क धन विद्युतभार असलेल्या टोकाशी झाला की विद्युतप्रवाह दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋण विद्युतभाराकडे वाहू लागतो. अर्थात दुसऱ्या टोकाला असा ऋण विद्युतभार असण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण जमिनीवर उभे असतो तेव्हा तसा तो असतो; पण आपण लाकडावर जर उभे राहिलो तर दुसऱ्या टोकाला असा विद्युतरोधक असल्यामुळे विद्युतप्रवाह वाहू शकत नाही. त्यामुळे धक्का बसण्यापासून आपली सुटका होते.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥ त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥ वासनेच्या संगें शिणलें माझें चित्त । विषयाचे आघात पडती वरी ॥३॥ नाहीं तुझी सेवा केली मनोधर्में । संसार संभ्रमें भ्रांत सदा ॥४॥ नाहीं तुझें नाम गाईलें आवडी । वाळली कुर्वंडी त्रिविधतापें ॥५॥ नामा म्हणे आई धांवें लवलाही । बुडतों चिंताडोहीं तारी मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते. असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सामर्थ्य*एका मध्यरात्री सहदेव झोपेतून उठला आणि अशेजारच्या जंगलातील झोपडीत राहणाऱ्या पांडुरंग नावाच्या आपल्या मित्राकडे गेला. त्याच्या दारावर थाप मारून मारून सहदेवने त्याला उठविले. पांडुरंग झोपेतून उठला. दार उघडून पाहतो तर, बाहेर हातात कंदील घेऊन सहदेव उभा. पांडुरंग म्हणाला, "काय रे सहदेव ! इतक्या रात्री तुला काय हवंय? का माझी झोपमोड केलीस?" सहदेव म्हणाला, "अरे पांडबा ! मला झोपच येईना. जरा विडी ओढवी म्हणून काडेपेटी शोधली तर सापडेना. तेव्हा मला जरा विडी शिलगावण्यासाठी काडेपेटी कशाला हवी? कंदीलावर का नाही विडी पेटवलीस?" ते ऐकून सहदेव खजील झाला. आपल्या हाती दिवा आहे, हे त्याच्या लक्षातच आले नव्हते.* तात्पर्य : स्वतःकडे असणाऱ्या सामर्थ्याची आपणाला ओळख पटायला हवी.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Avhr7Lmcy/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ राष्ट्रीय भौगोलिक दिवस _*•••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_ या वर्षातील २७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟡 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟡•••••••••••••••••••••••••••••••••*२००७: बाबुराव रामचंद्र बागुल यांना जन्मस्थान पुरस्कार जाहीर* *१९७३: पॅरिसमध्ये झालेल्या एका करारान्वये ३१ वर्षे चालू असलेले ’व्हिएतनाम युद्ध’ संपुष्टात आले. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला व्हिएतनामसमोर माघार घ्यावी लागली.**१९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. सद्ध्या ही संस्था ’बालभारती’ या नावाने ओळखली जाते.**१९४५: दुसरे महायुद्ध – रशियाच्या _’रेड आर्मी’_ने पोलंडमधील _’ऑस्विच’_ येथील छळछावणीतील बंदिवानांची मुक्तता केली.**१९४४: दुसरे महायुद्ध – ८७२ दिवस लेनिनग्राडला घातलेला वेढा जर्मन फौजांनी उठवला.**१८८८: वॉशिंग्टन डी. सी. येथे _'द नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटी'_ची स्थापना* 🟡 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🟡 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: अरविंद उन्हाळे -- गझलकार* *१९७९: जितेंद्र जोशी भारतीय अभिनेता**१९७६: श्रेयस तळपदे -- हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता**१९७४: चामिंडा वास -- श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू**१९६९: विक्रम भट्ट -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार**१९६७: बॉबी देओल – हिन्दी चित्रपट कलाकार**१९६३: डॉ. उत्तम भगवान अंभोरे -- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी, लेखक**१९६३: आरती अंकलीकर टिकेकर -- भारतीय शास्त्रीय गायिका* *१९५७: अरुणा सुभाष गर्जे -- कवयित्री**१९५५: शशिकांत वसंत तिरोडकर -- कवी**१९५१: आनंद दिघे -- धर्मवीर नावाने प्रसिद्ध शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (मृत्यू: २६ ऑगस्ट २००१ )**१९४५: चंद्रकला नंदकिशोर भार्गव -- लेखिका**१९३४: मुकुंद विष्णू टेकाडे -- बालसाहित्यिक, लेखक* *१९२७: वसंत विठ्ठल गाडे (गाडे गुरुजी)-- संघटक, संस्थापक, [विनोबा विचार केंद्र नागपूर] (मृत्यु: २४ जुलै २०१४ )**१९२६: जनरल अरुणकुमार वैद्य – भारताचे १३ वे लष्करप्रमुख (मृत्यू: १० ऑगस्ट १९८६ )**१९२४: साबू दस्तगीर -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २ डिसेंबर १९६३)**१९२२: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेते (मृत्यू: २२ ऑक्टोबर१९९८ )**१९२०: स्नेहलता यशवंत किनरे -- कवयित्री* *१९०९: डॉ. सविता भीमराव आंबेडकर (माईसाहेब) -- सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: २९ मे २००३ )* *१९०९: श्याम नीळकंठ ओक -- चित्रपट समीक्षक, लेखक(मृत्यू: १० मार्च १९८२ )**१९०५: राजाराम प्रल्हाद कानिटकर -- लेखक संपादक* *१९०१: लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते,विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी _’तर्कतीर्थ’_ ही पदवी संपादन केली. (मृत्यू: २७ मे १९९४ )**१८५०: एडवर्ड जे. स्मिथ – आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा कप्तान (मृत्यू: १५ एप्रिल १९१२ )* 🟡 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟡••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: अनिल अवचट -- सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध लेखक (जन्म: २६ ऑगस्ट १९४४ )**२०१६: दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी -- आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललित निबंधकार (जन्म: २५ जुलै १९३४ )**२०१३: ठाकूरदास बंग -- थोर गांधीवादी विचारवंत (जन्म:१९१७)**२००९: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ४ डिसेंबर १९१० )**२००८: डॉ. सुरेश महादेव डोळके -- धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, महानुभाव साहित्याचे संशोधक व ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ )* *२००८: सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ८ जून १९२१ )**२००७: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (जन्म: ६ डिसेंबर १९३२ )**२०००: पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे --- मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकाचे संपादक (जन्म: ११ जून १९३१)**१९९७: झिया सरहदी -- पटकथा लेखक आणि भारतीय उद्योग उद्योग क्षेत्रांचे दिग्दर्शक (जन्म:१९१४)**१९८९: वामन भार्गव पाठक -- मराठीतील सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि साहित्यिक(जन्म: १९ ऑगस्ट १९०५)**१९८६: निखिल बॅनर्जी – मैहर घराण्याचे सतारवादक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३१)**१९६८: सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ’कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक (जन्म: २६ मे १९०२ )**१९४७: पॉल हॅरिस – रोटरी क्लबचे संस्थापक (जन्म: १९ एप्रिल १८६८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मुलगी सासरी जाताना एका पित्याने व्यक्त केलेल्या भावनाहृदयस्पर्शी कविता *दिल्या घरी सुखी राहा ....*..... पूर्ण कविता पाहण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *देशभरात 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ध्वजारोहण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण तर 11 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आता नरिमन पॉईंट वांद्रे अंतर केवळ १५ मिनिटांत, प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना मोठी भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील उत्कृष्ट कलाकार नम्रता संभेराव यांचा 'सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री' पुरस्काराने सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *धाराशिव जिल्ह्यात आगामी पाच वर्षात गाव तेथे एस टी बस सुरू करण्याचा प्रयत्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरची अमृता पुजारी पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट विश्वचषक मध्ये बांगलादेशला पराभूत करून भारत उपांत्य फेरीत दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 माधव बोमले, बिलोली👤 दत्तराम बोमले👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत बापट - विश्वनाथ वामन बापट*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्याचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहेत ?२) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?३) महात्मा फुलेचे ब्रीदवाक्य काय होते ?४) 'समय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) FTII चे फुल फॉर्म काय आहे ? *उत्तरे :-* १) लायकराम भेंडारकर २) साल्हेर ( १५६७ मी. ) ३) सत्यमेव जयते ४) वेळ ५) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 केस कुरळे का होतात ? 📒आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं रंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसऱ्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते. या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो आम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसऱ्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगात्रजीवना अगा नारायणा । कां नये करुणा दासाची हे ॥१॥ अच्युता केशवा ये गा दीनानाथा । सर्वज्ञ समर्था कृपामूर्ति ॥२॥ चिद्घना चिद्रूपा विरंचीच्या बापा । करावी जी कृपा सर्वांभूतीं ॥३॥ तुझें म्हणविलें उपेक्षिसी जरी । नामा म्हणे हरी ब्रीद काय ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि त्या व्यक्तीला न कळताच नि:स्वार्थ भावनेने मदत केल्याने जो, समाधान आपल्याला मिळत असते तो, समाधान जगावेगळा असतो. आणि याच विषयी जेव्हा त्या व्यक्तीकडून सकारात्मक विचार इतरांकडून ऐकायला मिळत असतात त्यावेळी मात्र आपल्याला सर्वच काही मिळाल्यासारखे वाटते. या प्रकारची भूमिका पार पाडताना तेवढे काळीज मोठे असावे लागते. असे काळीज प्रत्येकांकडे असणे आवश्यक आहे. कारण या जीवनात सर्वच काही कमावता येतो पण, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावून जाणे हाच खरा माणुसकी धर्म आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बदलण्याची संधी*सरधोगा जिल्ह्यातील खुशाबनगर येथे दिवाण मदनगोपाल राहत असत. अनेक राजवाड्यांचे मालक असलेल्या मदनगोपाल यांना दारूचा मोठा शौक होता. विलायती दारूच्या अनेक पेट्या त्यांच्या घरी त्यांनी साठवून ठेवलेल्या होत्या. मदनगोपाल एकदा सुगंधित थंड खोलीत विश्रांती घेत पहुडले होते. रखरखत्या उन्हात एका तेजस्वी साधूने त्यांच्या खोलीत प्रवेश केला. दिवाणसाहेबांनी हात जोडून त्या साधूला स्थान ग्रहण करण्यास सांगितले. साधू महाराज म्हणाले, "दिवाणसाहेब, मी इथे आलो आहे ते तुमच्याकडून एक वचन घेण्यासाठी, बोला मला वचन देताल काय" दिवाणजी म्हणाले, "तुम्ही जे मागताल ते जर माझ्याकडे उपलब्ध असेल तर निश्चित वचन देण्यास मी बांधिल असेन. साधू म्हणाले," तुमची सर्वात प्रिय वस्तू म्हणजे दारू तुम्ही सोडून द्याल एवढेच वचन मला द्या." मदनगोपाल पहिल्यांदा कचरले पण वचन पूर्ण करण्यासाठी ते तयार झाले. त्यांनी नोकरांना बोलावले व दारूच्या सगळ्या बाटल्या फोडून टाकायचा आदेश दिला. नोकरांनी साधूच्यादेखतच सर्व बाटल्या फोडून टाकल्या. साधूला आनंद वाटला, त्यांनी परत जाताना दिवाणसाहेबांकडून पुन्हा कधीही दारू पिणार नाही असे वचन घेतले व निघून गेले. साधू गेल्यावर एक नोकर दिवाणजीकडे आला व म्हणाला, "महाराज आजच्या रात्रीपुरती दारू मी एकेठिकाणी लपवून ठेवली आहे, आणू का" दिवाणजींनी त्याला ती बाटली आणावयास सांगून नोकराने ती बाटली आणताच त्यांनी ती बाटलीही स्वतःच्या हाताने फोडली व आयुष्यात पुन्हा कधीच दारूला स्पर्श केला नाही. पुढे वृंदावनला जाऊन त्यांनी दीक्षा घेतली. मदनगोपाल यांच्या आयुष्याची दिशाच त्या एका प्रसंगामुळे बदलून गेली. पुढे श्रीकृष्णप्रेमात बुडालेल्या मदनगोपाल यांनी "निमाईचंद" हे उत्कृष्ट उर्दू पुस्तक लिहीले.तात्पर्य - स्वतःला बदलण्याची संधी मिळाल्यावर प्रत्येकाने त्याचा लाभ घेतला पाहिजे. कदाचित त्या संधीतूनच आपल्या आयुष्याला कलाटणी मिळून आयुष्याचे सोने घडू शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CtV1LU1JW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_राष्ट्रीय पर्यटन दिन_*🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_राष्ट्रीय मतदार दिन_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_ या वर्षातील २५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्न’**१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्न’**१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्न’**१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.*🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: मयूर बाळकृष्ण बागुल -- लेखक**१९८४: स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे -- कवयित्री* *१९७५: एकता अशोक मेनकुदळे --- लेखिका**१९७१: डॉ. मिलिंद चोपकर -- लेखक, संपादक* *१९५९: बाळ कांदळकर -- कवी**१९५८: कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५५: मोहन कल्लाप्पा हवालदार -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५४: मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार, बालकथाकार**१९५२: प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी, लेखक (मृत्यू: १९ एप्रिल २०२१ )**१९५१: हेमलता प्रदीप गीते -- प्रसिद्ध कवयित्री**१९५१: अर्चना पंडित -- कवयित्री**१९३८: सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, संवादक, मुलाखतकार, आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३: दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१: डॉ. रामचंद्र विश्वनाथ मंत्री -- लेखक**१९१७: श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६: बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक, लेखक (मृत्यू: २६ डिसेंबर २००१ )**१९१४: जगन्नाथ शामराव देशपांडे -- प्राचीन मराठी संशोधक, संपादक* *१८८६: पांडुरंग नरसिंह पटवर्धन -- इतिहास संशोधक (मृत्यू: ६ जुलै १९२१ )**१८८३: आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५० )* *१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१ )**१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५ )**१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४ )**१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३ )**१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१ )* 🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🔰 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ )**१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: १८९० )**१९६४: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म: ११ जुलै १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *“जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नारा आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे” - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मध्यप्रदेश च्या सरकारने राज्यातील 17 धार्मिक शहरात दारूबंदी डॉ. मोहन यादव यांचा ऐतिहासिक निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी च्या तिकिटात 14.97 टक्के वाढ, रिक्षा व टॅक्सीमध्ये ही 3 रुपयांची वाढ, सर्वसामान्य नागरिकांना झटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बालसाहित्य बोलीभाषेत असावे, मुलांच्या भावविश्वाला समजेल अशी पुस्तके हवीत, बालकुमार साहित्य संमेलनात मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम मध्ये आज भारत वि. इंग्लंडचा दुसरा T20 सामना रंगणार, पाच T20 च्या मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती कल्पना दत्तात्रय हेलसकर, उपक्रमशील शिक्षिका, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, लेखिका, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 रामदास भोकरे, नांदेड👤 गंगाधर ईबीतवार👤 नरेश दंडवते, नांदेड👤 मुजीब फारुखी, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤 मुजीब पठाण👤 राहुल आवळे, शिक्षक, पुणे👤 अंबादास कदम, नांदेड👤 राजीव सेवेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्वर्गीय नर्तक* हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?२) स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला हिंदीमध्ये काय म्हणतात ?३) राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जन गण मन' या गीताला 'राष्ट्रगीत' म्हणून केव्हा मान्यता मिळाली ?*उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) दूधराज ३) २५ जानेवारी ( २०११ पासून ) ४) सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी ५) २४ जानेवारी १९५०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण करत असतो.कारण हवं ते मिळविल्या शिवाय पाहिजे तसे समाधान मिळत नाही. पण,जरा आपल्या आजुबाजूलाही थोडी दृष्टी टाकून बघावे. कारण काहींना तर दोन घास खायला अन्न सुध्दा मिळत नाही आणि नेसायला वस्त्र सुद्धा नसते. त्यांचे जीवनही माणसाचेच आहे. मात्र माणूसच, माणसाला ओळखत नसल्याने माणुसकी संपत चालली आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत.एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1CtV1LU1JW/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔰 *_राष्ट्रीय पर्यटन दिन_*🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_राष्ट्रीय मतदार दिन_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_ या वर्षातील २५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔰 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔰•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्न’**१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती!**१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्न’**१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्न’**१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.**१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.**१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.**१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.**१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.*🔰 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔰••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: मयूर बाळकृष्ण बागुल -- लेखक**१९८४: स्वाती बाळासाहेब ठुबे-खोडदे -- कवयित्री* *१९७५: एकता अशोक मेनकुदळे --- लेखिका**१९७१: डॉ. मिलिंद चोपकर -- लेखक, संपादक* *१९५९: बाळ कांदळकर -- कवी**१९५८: कविता कृष्णमूर्ती – प्रसिद्ध पार्श्वगायिका**१९५५: मोहन कल्लाप्पा हवालदार -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक**१९५४: मदन रामसिंह हजेरी -- कादंबरीकार, बालकथाकार**१९५२: प्रकाश नथुभाऊ खरात -- कवी, लेखक (मृत्यू: १९ एप्रिल २०२१ )**१९५१: हेमलता प्रदीप गीते -- प्रसिद्ध कवयित्री**१९५१: अर्चना पंडित -- कवयित्री**१९३८: सुरेश विनायक खरे – मराठी नट, लेखक, दिग्दर्शक, जाहिरातपटकार, चित्रपट पटकथालेखक, नाट्यावलोकनकार, संवादक, मुलाखतकार, आणि मराठी नाटककार व समीक्षक**१९३३: दिनेश वामन वाळिंबे -- कवी**१९३१: डॉ. रामचंद्र विश्वनाथ मंत्री -- लेखक**१९१७: श्रीपाद दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक**१९१६: बापूसाहेब गोविंदराव लाखनीकर-- संस्थापक, लेखक (मृत्यू: २६ डिसेंबर २००१ )**१९१४: जगन्नाथ शामराव देशपांडे -- प्राचीन मराठी संशोधक, संपादक* *१८८६: पांडुरंग नरसिंह पटवर्धन -- इतिहास संशोधक (मृत्यू: ६ जुलै १९२१ )**१८८३: आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे -- मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५० )* *१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१ )**१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५ )**१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: १९२४ )**१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३ )**१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१ )* 🔰 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*🔰 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म.द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ )**१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते* *१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: १८९० )**१९६४: शंकरराव रामचंद्र कानिटकर-- शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक(जन्म: ११ जुलै १८८७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वाना हार्दीक शुभेच्छा*26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *“जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान हा नवा नारा आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय आहे” - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मध्यप्रदेश च्या सरकारने राज्यातील 17 धार्मिक शहरात दारूबंदी डॉ. मोहन यादव यांचा ऐतिहासिक निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एस टी च्या तिकिटात 14.97 टक्के वाढ, रिक्षा व टॅक्सीमध्ये ही 3 रुपयांची वाढ, सर्वसामान्य नागरिकांना झटका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष'*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बालसाहित्य बोलीभाषेत असावे, मुलांच्या भावविश्वाला समजेल अशी पुस्तके हवीत, बालकुमार साहित्य संमेलनात मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियम मध्ये आज भारत वि. इंग्लंडचा दुसरा T20 सामना रंगणार, पाच T20 च्या मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 श्रीमती कल्पना दत्तात्रय हेलसकर, उपक्रमशील शिक्षिका, जालना👤 प्रा. वैशाली देशमुख, लेखिका, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 रामदास भोकरे, नांदेड👤 गंगाधर ईबीतवार👤 नरेश दंडवते, नांदेड👤 मुजीब फारुखी, उर्दू हायस्कुल धर्माबाद👤 मुजीब पठाण👤 राहुल आवळे, शिक्षक, पुणे👤 अंबादास कदम, नांदेड👤 राजीव सेवेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विंदा करंदीकर - गोविंद विनायक करंदीकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *स्वर्गीय नर्तक* हा कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे ?२) स्वर्गीय नर्तक या पक्ष्याला हिंदीमध्ये काय म्हणतात ?३) राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा केला जातो ?४) 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'जन गण मन' या गीताला 'राष्ट्रगीत' म्हणून केव्हा मान्यता मिळाली ?*उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) दूधराज ३) २५ जानेवारी ( २०११ पासून ) ४) सागर, सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी, जलनिधी ५) २४ जानेवारी १९५०*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🐝 *मधमाशी चावल्यावर काय होतं ?* 🐝डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्तीपासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते. तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुईसारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात, तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्याबरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो. असं करत ते सुईला कातडी पार करून आपल्या मांसल स्नायूपर्यंत पोचवतात. त्यावेळीच ते विष शरीरात सोडलं जातं. हे सारं सव्यापसव्य करताना त्या काटेरी दातांसकट ती सुई मांसल भागात चांगलीच रुतून बसते. त्यामुळे ती परत बाहेर काढली जाऊ शकत नाही. पण माशी तसा प्रयत्न करते तेव्हा ती सुई तुटते. ती सुई माशीच्या पोटाला जोडलेली असल्यामुळे त्या ओढाताणीत तो पोटाचा भागही तुटून पडतो. ते सहन न होऊन माशी मरून पडते. विषाबरोबरच माशी एक गंधयुक्त रसायन, याला फेरोमोन म्हणतात, तिथं आणि हवेत पसरवते. त्याच्या अोढीनं इतर माशाही तिथं आकर्षित होतात. अशा वेळी मग एकाऐवजी अनेक माशांचा डंख पचवावा लागतो. सहसा या विषाचा फारसा परिणाम होत नाही. मात्र जळजळ आणि खाज येऊ लागते. काही जणांना या विषाची अॅलर्जी असते. त्यांना मात्र सावधगिरी बाळगावी लागते. तातडीने उपचार करून घेणं योग्य ठरतं. अन्यथा या अॅलर्जीची प्रतिक्रिया तीव्र होऊन ती घातकही ठरू शकते. या विषात मेलिटिनबरोबरच हिस्टमिनही असल्यामुळे सहसा हिस्टीमिनला नाकाम करणारी उपाययोजना केली जाते.उतारवयातल्या व्यक्तीला किंवा लहान मुलांना जर अनेक मधमाशांचा डंख झाला तर मात्र काही वेळा स्नायूंना इजा होऊ शकते. तसंच मूत्रपिंडांच्या कामातही बाधा आणली जाऊ शकते. तोंडात किंवा गळ्याजवळ डंख झाला तर त्यापायी श्वासनलिकेचं नियंत्रण करणारे स्नायू बाधित होतात व श्वासोच्छ्वासाला अडथळा होऊ शकतो. परंतु अशी परिस्थिती क्वचितच उद्भवते.*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण करत असतो.कारण हवं ते मिळविल्या शिवाय पाहिजे तसे समाधान मिळत नाही. पण,जरा आपल्या आजुबाजूलाही थोडी दृष्टी टाकून बघावे. कारण काहींना तर दोन घास खायला अन्न सुध्दा मिळत नाही आणि नेसायला वस्त्र सुद्धा नसते. त्यांचे जीवनही माणसाचेच आहे. मात्र माणूसच, माणसाला ओळखत नसल्याने माणुसकी संपत चालली आहे. यावर विचार करण्याची गरज आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत.एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जानेवारी 2025💠 वार - ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1H1WJwJBJv/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚛️ *_आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_राष्ट्रीय बालिका दिवस_* ⚛️••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_ या वर्षातील २४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⚛️ *_महत्त्वाच्या घटना:_* ⚛️•••••••••••••••••••••••••••••••••*१९८४:अॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.**१९७६:’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.**१९७२:गुआममध्ये इ. स.१९४४ पासून लपलेला जपानी सैनिक,शोइची योकोइ सापडला.त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.**१९६६:भारताच्या तिसर्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.**१९६६:एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ.होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.**१९४३:पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार**१९४२:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.**१९१६:नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.**१८६२:बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.**१८५७:दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.**१८४८:कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.* ⚛️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: सरोजकुमार सदाशिव मिठारी -- लेखक, पत्रकार**१९८०: अतुल माधवराव राऊत -- कवी**१९७४: जयंत देवाजी लेंझे -- कवी* *१९७३: संदीप प्रभाकर मणेरिकर -- लेखक तथा दैनिक नवप्रभातचे उपसंपादक**१९७१: संतोष चंद्रकांत गायकवाड -- लेखक**१९७१: प्रा. डॉ. गणेश नत्थुजी चव्हाण -- प्रसिद्ध भरकाडीकार, लेखक, वक्ते, संपादक* *१९५६: रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर -- कवी, लेखक, संपादक**१९५६: प्रा. अशोक दगाजी शिंदे -- कवी, लेखक, संपादक* *१९५३: भगवान ठग -- प्रसिद्ध कवी आणि अनुवादक (मृत्यू: २२ जानेवारी२००९ )**१९५२: विजया दयानंद चिंचुरे -- लेखिका, कवयित्री**१९४७: जयप्रकाश बाळकृष्ण म्हात्रे -- विज्ञान चळवळीचे कार्यकर्ते, वक्ते, लेखक* *१९४४: रामदास पाध्ये -- बोलक्या बाहुलीचे निर्माते आणि त्यांचे प्रयोग करणारे कलाकार* *१९४४: अशोक शेवडे -- चित्रपट आणि नाटक विषयांवरील ज्येष्ठ पत्रकार (मृत्यू: १८ मार्च २०२१ )**१९४३: सुभाष घई – प्रसिद्ध हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक**१९३९: नामदेव वासुदेव लोटणकर -- कवी* *१९३६: लक्ष्मण बाकू रायमाने -- मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि समीक्षक**१९२६: जय ओम प्रकाश -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक(मृत्यू: ७ ऑगस्ट २०१९ )**१९२४: कर्पूरी ठाकुर -- भारतीय स्वतंत्र सेनानी बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री (मृत्यू : १७ फेब्रुवारी १९८८)* *१९२४: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० )**१९२३: रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१ )**१९१८: वामन बाळकृष्ण भागवत -- लेखक, संस्कृत भाषातज्ज्ञ (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००४ )* ⚛️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⚛️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: आनंद विनायक जातेगावकर --मराठी कथालेखक व कादंबरीकार(जन्म: ६ जून १९४५ )**२०११: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२ )**२००५: अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्याव सामाजिक कार्यकर्त्या**२०००: केशव पांडुरंग जोग -- राष्ट्रीय संस्कृत व्याख्याता, संशोधक (जन्म: २६ मार्च १९२५ )**१९९६: वसंत देव -- भारतीय लेखक, गीतकार आणि पटकथा लेखक (जन्म: २९ सप्टेंबर १९२९)**१९८९: रत्नमाला -- भारतीय चित्रपट सृष्टीतील महिला अभिनेत्री(जन्म: २२ जून १९२४)**१९६६: एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ.होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९ )**१९६५: विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक,वृत्तपत्रकार,थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त*मतदार राजा जागा हो .....!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील अपार्टमेंटचा अनोखा पॅटर्न, सौर ऊर्जेमुळे दरमहा ३५ हजारांची बचत; राज्यातील पहिले १००% सौर ऊर्जेवर चालणारे अपार्टमेंट*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पाणी व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी, बारामतीच्या काऱ्हाटीसह सहा गावांच्या 'वॉटर वारियर्स'ना प्रजासत्ताक दिनी दिल्लीत विशेष सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दावोसमधून 15 लाख 70 कोटींची गुंतवणूक आणली:विदर्भ, एमएमआर, मराठवाड्यासह नाशिकसाठी करार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी बस अपघात रोखण्यासाठी कठोर पावलं, बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, परिवहनमंत्री मिसाळ यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे : मराठी गझलेचा नवा अध्याय:राजन लाखे यांच्या 'गझलायन' संग्रहाचे प्रकाशन, मराठी गझल जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हरित हायड्रोजन उत्पादनाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी मोठी कामगिरी, भारती विद्यापीठाच्या विज्ञानम संघाला स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये संयुक्त विजेतेपद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट विश्वकप - भारताने श्रीलंकेचा 60 धावाने हरवून सलग तिसरा सामना जिंकला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मोरोपंत - मोरेश्वर रामचंद्र पराडकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या गावाला *'सैनिकाचे गाव'* म्हणून ओळखले जाते ?२) जागतिक स्तरावरील पहिली मानव - रोबोट मॅरेथॉन स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे ?३) भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?४) 'मातीखालची माती' हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे ?५) ग्रामसेवकावर नजिकचे नियंत्रण कोणाचे असते ? *उत्तरे :-* १) कातूर्ली, ता. आमगाव २) चीन ( बीजिंग ) ३) कलम ५२ ४) आनंद यादव ५) गटविकास अधिकारी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वयाने लहान असलेल्यांकडून जेव्हा छोटीशी चूक होते तेव्हा सर्वजण त्याला नको त्या शब्दात बोलत असतात.पण,तीच चूक जेव्हा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून होते त्यावेळी वयाने लहान असणारा समजावून सांगतो अशावेळी त्याला शहाणपणा शिकवू नको म्हणून हाकलून लावतात.बरेचदा वयाने मोठा असलेला माणूस समजदार असतोच असे नाही तर वयाने लहान असणारा सुद्धा अनुभवी असू शकतो म्हणून एखाद्याला कमी लेखून त्याचा अपमान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रामाणिक पहारेकरी*एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.' आता काय करायचं ?' असाप्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता.गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड.""तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं.पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले," आम्ही महाराज आहोत."पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे, उघड की दरवाजा.""तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाया सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या मुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढं कळंना व्हय. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते." महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला. पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. तोशांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15zLvZsySQ/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••✍️ *_जागतिक हस्ताक्षर दिन_* ✍️••••••••••••••••••••••••••••••••• ✍️ *_ या वर्षातील २३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ✍️ *_महत्त्वाच्या घटना:_* ✍️•••••••••••••••••••••••••••••••••*२००२:वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण**१९९७:मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.**१९७३:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.**१९६८:शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू.एस.एस.प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.**१९४३:दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.**१९३२:’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.**१८४९:डॉ.एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.**१७०८:छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.* ✍️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ✍️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: कीर्ति नागपुरे -- भारतीय अभिनेत्री**१९९०: देविदास महादेव सौदागर -- प्रसिद्ध लेखक, कवी(साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त)**१९७१: मेघना जोशी -- कवयित्री* *१९६९: अनिल मनोहर कपाटे (अनिल शेवाळकर) -- कवी, कथाकार, कादंबरीकार* *१९६६: भागवत घेवारे -- कवी* *१९६६: डॉ. विजयकुमार देशमुख -- प्रसिद्ध कवी**१९६२: मेधा इनामदार -- लेखिका* *१९५५: भगवान कृष्णा हिरे -- प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, लेखक,तज्ञ परीक्षक* *१९५३: डॉ. विलास चिंतामण देशपांडे -- प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, संपादक* *१९५२: अशोक बाबुराव लोणकर -- कवी, लेखक, संपादक**१९५०: आसावरी काकडे -- प्रसिद्ध मराठी-हिंदी कवयित्री आणि गद्यलेखिका**१९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष**१९४७: रमेश सिप्पी -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक व निर्माता**१९४७: डॉ. प्रमिला जरग -- लेखिका**१९४६: विजय पांडुरंग शेट्ये -- कवी, लेखक**१९४६: डॉ. सुभाष सावरकर -- साहित्यिक, समीक्षक, संपादक (मृत्यू: २३ सप्टेंबर २०१३ )**१९३९: अॅड.जयंत काकडे -- प्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार* *१९३५: विलास शंकरराव साळोखे -- लेखक**१९३५: प्रमोद सच्चिनानंद नवलकर --- जेष्ठ साहित्यिक, माजी मंत्री (मृत्यू: २० नोव्हेंबर २००७ )**१९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४ )**१९२६: बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे -- महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक,राजकारणी,संपादक, व्यंगचित्रकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२ )**१९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी --- कोल्हापूर येथील मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक (मृत्यू: २४ सप्टेंबर २००२ )* *१९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव,बजाज आटो,बजाज इलेक्ट्रिकल्स,उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२ )**१८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक,पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६ )**१८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस -- भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ )**१८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३ )*✍️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ✍️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: प्रा. डॉ. अनिल नितनवरे -- मराठीचे गाढे अभ्यासक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक (जन्म: १९६५ )**२०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ ऑक्टोबर १९२७ )**२००८: राजाभाऊ देव -- हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील थोर गायक, गुरू(जन्म: १३ सप्टेंबर १९१७ )**१९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर– भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढेअभ्यासक (जन्म: १५ मे १९०४ )**१९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. (जन्म: ११ मे १९०४ )**१९८२: मुद्दू बाबू शेट्टी -- हिंदी चित्रपटातील स्टंटमन,अॅक्शन कोरिओग्राफर आणि अभिनेता (जन्म: १ जानेवारी १९३८ )**१९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित**१९३१: अॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१ )**१९१९: राम गणेश गडकरी – प्रसिद्ध नाटककार, कवी व विनोदी लेखक(जन्म:२६ मे १८८५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त*सुंदर अक्षर : एक दागिना*कुणाचे सुंदर हस्ताक्षर पाहिले की आपण सहज म्हणून जातो, अरे व्वा ! काय सुंदर मोत्यासारखे अक्षर आहे. त्याच्या लेखनाची खूप तारीफ करतो. सुंदर अक्षर काढण्यासाठी तशी मेहनत आणि सराव करावा लागतो. ते ही एक तपश्चर्या आहे, नाही का ? ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजनेला दहा वर्षे पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पाच वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातल्या सर्व बसस्थानकावर वर्षभर स्वछता मोहीम, मोहिमेला आजपासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रिलायन्स सोबत 3 लाख कोटींचा करार, 3 लाख रोजगार होतील उपलब्ध - मुख्यमंत्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द, सरकारच्या तिरोजीचा भुर्दंड वाचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोलकता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 विकेटनी मिळविला विजय, अभिषेक शर्माची जोरदार फटकेबाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मुखीत अहमद, शिक्षक, नांदेड👤 एम. बी. ढगे👤 नम्रता उबाळे, तिवसा, आष्टी👤 शंकर नरवाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*माधव जूलियन- माधव त्र्यंबक पटवर्धन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आदर दिला तरच आपली मूल्ये आणि संस्कार टिकून राहतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI ) बाबत धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?२) महाराष्ट्रामध्ये कोणत्या परिसराला 'आल्लापल्ली अरण्य' असे म्हणतात ?३) भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम कोणी केला आहे ?४) 'साप या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) मुंबईतील वानखेडे स्टेडियमला १९ जानेवारी २०२५ ला किती वर्षे पूर्ण झाली ? *उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा पूर्व भाग ३) स्मृती मानधना ४) सर्प, भुजंग, अही ५) ५० वर्षे *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा वादळवारा येत असते.आणि नुकसान करून जाते. पण, जे काही नुकसान झाले असते त्याला व्यवस्थितपणे करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण, अचानक जेव्हा जीवनात वादळ,वारे न सांगता येतात तेव्हा मात्र तेच वादळ,वारे जगणेच नकोसे करून टाकत असते अशा प्रसंगी एका चांगल्या व्यक्तीची गरज असते. कारण ती व्यक्ती त्या वादळातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असते म्हणून अशा भयानक प्रसंगी चुकीचे पाऊल उचलू नये तर चांगल्या विचारी माणसाच्या सहवासात रहावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळयांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/126o5UjRjsG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील २२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: ’आय.एन.एस.मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.**१९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६३: अंधांसाठी देहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना**१९५८: इजिप्त व सीरिया यांचा संयुक्त राष्ट्र स्थापनेबद्दलचा कौल जाहीर झाला त्यानुसार पहिले अध्यक्ष म्हणून गमाल अब्दुल नासार यांची निवड झाली**१९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर**१९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.**१९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.* ☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७६: प्रतिक पुरी-- मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतून लेखन करणारे लेखक आणि मुक्त पत्रकार**१९७५: रितू शिवपुरी -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९७२: नम्रता शिरोडकर -- भारतीय सिने अभिनेत्री व मॉडेल**१९६८: प्रा. डॉ. शैलेश विश्वनाथ त्रिभुवन -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९६६: सुनील गंगाधरराव वेदपाठक -- लेखक तथा जिल्हा सत्र न्यायाधीश**१९६३: प्रा. दीपक देशपांडे --महाराष्ट्राचे हास्य सम्राट, कॉमेडियन**१९६०: प्रा. डॉ. कृष्णा वसंतराव साकुळकर -- लेखक* *१९५२: विजय कुवळेकर -- माजी माहिती आयुक्त,लेखक,वक्ते**१९४५: प्रा. डॉ. वि. स. जोग -- प्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक, विचारवंत**१९४१: गंगाराम महादेव गवाणकर -- लेखक* *१९३७: विश्वनाथ शंकर चौघुले -- लेखक* *१९३६: माधुरी मधुकर किडे -- ज्येष्ठ लेखिका* *१९३५: उषा भास्करराव हस्तक -- लेखिका* *१९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४ )**१९३२: वसंत वामनराव मून -- संपादक, संशोधक (मृत्यू: १ एप्रिल २००२ )**१९२२: प्रा. शांता बुध्दीसागर -- लेखिका**१९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ८ जुलै २००३ )**१९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक(मृत्यू: ९ जून १९९३ )**१९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४ )**१९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४ )**१८८९: भास्कर पांडुरंग हिवाळे -- लेखक,संस्थापक ( मृत्यू: ७ सप्टेंबर १९६१ )**१५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६ )* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: किर्ती शिलेदार -- मराठी गायिका अभिनेत्री व लेखिका (जन्म:१६ ऑगस्ट १९५२)**२०२१: नरेंद्र चंचल -- प्रतिष्ठित भजन आणि हिंदी चित्रपट गीतांचे ते गायक(जन्म: १६ ऑक्टोबर १९४० )**२०१४: अक्किनेनी नागेश्वरा राव -- भारतीय अभिनेता आणि निर्माता (जन्म: २० सप्टेंबर १९२४ )**२००४: अलका इनामदार -- ज्येष्ठ अभिनेत्री**१९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४ )**१९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४ )**१९७३: लिंडन बी.जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८ )**१९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३ )**१९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि'गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४ )**१९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी,हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले.(जन्म: २४ मे १८१९ )**१७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक**१६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: १६०८ )**१६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आयुष्यातील चढ-उतार*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संभाजीनगरातील मर्मबंधा गव्हाणे यांची भरारी, आंतरराष्ट्रीय अतिथी नेतृत्व कार्यक्रमासाठी निवड, देशातील 5 महिला पटकथा लेखिकांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुणे - 'मी गीता बोलतीय' पुस्तकाचे प्रकाशन, भगवद्गीतेतून मिळतो आदर्श जीवनाचा मार्ग, लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणे होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हाट्सअप्पवर, आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दावोसमध्ये गडचिरोलीसाठी पहिला करार, 5 हजार 200 कोटींची गुंतवणूक, 4 हजार रोजगार निर्मिती होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सीमेवर आणीबाणी ते पॅरिस करारातून माघार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *संत साहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध कीर्तनकार हभप डॉ. किसन साखरे महाराज यांचे पुण्यात निधन, आळंदीत अंत्यसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U19 Womens T20 World Cup 2024 : टीम इंडियाच्या महिला संघाने यजमान मलेशिया संघावर तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवला असून त्यांनी विजयासाठी दिलेलं टार्गेट अवघ्या 17 बॉलमध्ये केलं पूर्ण केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संगीता संजय जाधव, मुख्याध्यापिका, KGBV, धर्माबाद👤 हरीश बलकेवाड👤 स्वप्नील ईबीतवार, धर्माबाद👤 श्याम पोरडवाड👤 महेश मुदलोड👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोविंदाग्रज - राम गणेश गडकरी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंद हे अमृत आहे ; परंतु हे अमृत प्राप्त करून घेण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे. दुःखाचे मंथन केल्याने आनंदरुपी अमृत प्राप्त होते. - पराशर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला पुरूष खो-खो विश्वकप कोणी पटकावला ?२) पुरूष खो-खो विश्वकपचा उपविजेता संघ कोणता ?३) भारतीय महिलांनी कोणत्या संघाविरुध्द खो-खो सामन्यात १७५ गुण मिळवत विश्वविक्रम रचला ?४) 'समाधान' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारत सरकारने कोणत्या आयोगाच्या जागी निती आयोगाची स्थापना केली आहे ? *उत्तरे :-* १) भारत २) नेपाळ ३) दक्षिण कोरिया ४) आनंद, संतोष ५) नियोजन आयोग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आपल्याला पाच बोटे का असतात ?* 📙खरं तर हा प्रश्न, आपल्याला पाचच बोटं का असतात, असा विचारायला जायला हवा. आपल्या हातांना तसंच पायांना पाच पाच बोटंच असतात. क्वचित काही जणांना एका किंवा दोन्ही हातांना वा पायांना सहावं बोट असतं. सहापेक्षा अधिक बोटं सहसा आढळत नाहीत; पण सहा बोटं असणंही अपवादात्मकच आहे. ती काही सामान्य स्थिती नाही. बरं, फक्त मनुष्यप्राण्याच्या बाबतीतच ही स्थिती आहे असं नाही. कोंबड्या, उंदीर, मांजर, कुत्रा, वाघ, सिंह, वानर अनेक प्राण्यांच्या पायांना पाच बोटं असतात. खुरं असणाऱ्या जनावरांना पाचापेक्षा कमी बोटं असतात. म्हणजेच त्यांची एकापेक्षा अधिक बोटं जोडली जाऊन त्यांचं एकच एक जाडजूड बोट तयार होतं. त्यामुळे त्यांच्या बोटांची संख्या पाचापेक्षा अधिक होत नाही. हे असं का होतं ? बोटांवर ही पाचाची मर्यादा का पडली ? असे प्रश्न मनात उमटायला लागतात. याला जसं उत्क्रांतीच्या प्रवाहाचं कारण आहे तसंच सर्व प्राणीमात्रांच्या वाढीला कारणीभूत असणाऱ्या जनुकांची प्रणालीही जबाबदार आहे. उत्क्रांतीच्या प्रवाहात ज्या एखाद्या गुणधर्मामुळे जीवनकलह सुसह्य़ व्हायला त्या विशिष्ट पर्यावरणात तगून राहायला मदत होते, त्या गुणधर्माचा जतन होतं. झाडाच्या फांदीवरची पकड घट्ट होण्यासाठी किंवा हातात पकडलेल्या वस्तूवरची पकड घट्ट होण्यासाठी पाच बोटांची मदत होते, हे स्पष्ट झाल्यावर त्या गुणधर्माच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जनुकांचं संवर्धन झालं. उत्क्रांतीच्या ओघात प्राण्यांच्या नवनवीन प्रजाती उदयाला येताना या गुणधर्मात बदल होण्याचं टळलं.प्रत्येक प्राण्याची सुरुवात एकमेव फलित पेशीपासून होत असते. प्रथम त्या पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी जन्माला येतात. याच प्रकारे केवळ विभाजन होऊन पेशींच्या संख्येत वाढ होते. या सर्व पेशी हुबेहुब एकसारख्या असतात. त्यानंतर विशिष्ट काळी या पेशींपासून वेगवेगळ्या अवयवांच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रचली जाते. ती होण्यासाठी त्याला कारक असणारी जनुकं कार्यान्वित होतात. त्यांना 'होमिओबॉक्स जीन्स' असं म्हणतात. त्याच्या प्रभावापोटी गर्भामधील अवयवांकुराचं पाच भागांमध्ये विभाजन होतं. त्यातील काही भाग शरीराच्या पुढच्या भागातील अवयवांच्या निर्मितीच्या कामाला लागतात, तर इतर पाठीमागील अवयवांच्या निर्मितीचं काम करायला लागतात. या अवयवांकुराचे असे पाचच भाग होत असल्यामुळं मग हातापायांना फुटणाऱ्या बोटांच्या संख्येवरही मर्यादा येते. शिवाय अशी पाच बोटं त्यांच्यावर सोपवल्या जाणार्या पकडीच्या कामासाठी पर्याप्त असल्यामुळं त्यांच्या संकेत काही बदल करण्याचं प्रयोजनच पडलं नाही. जेव्हा कधी या जनुकांमध्ये होणाऱ्या उत्परिवर्तनापायी पाचाहून अधिक बोटं तयार होतात त्या वेळीही ते अतिरिक्त बोट पाचांपैकी कोणत्या तरी एका बोटाला जोडलेलंच राहतं. हृतिक रोशनच्या डावीकडील हाताच्या अंगठ्याकडे पाहा म्हणजे याची खात्री पटेल.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गुण दोष माझे पाहों नको आतां । तारिसी अनंता मज आतां ॥१॥ अगाध महिमा काय वानूं हरी । गोकुळाभीतरीं गाई राखी ॥२॥ अंबऋषीसाठीं जन्म सोशियले । महत्त्वाचे केले हूड स्वयें ॥३॥ नामा म्हणे तुझे नामाचेनि बळ । प्रसादें केवळ लाधलों मी ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते. तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले. तात्पर्य – दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2019/10/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌐 *_ या वर्षातील २१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌐 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌐•••••••••••••••••••••••••••••••••*२०००: ’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.**१९७२: मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला.**१९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट**१८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.**१७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.**१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.* 🌐 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: लोकनाथ काळमेघ-पाटील -- पत्रकार, स्तंभलेखक**१९८६: सुशांत सिंग राजपूत -- भारतीय प्रसिद्ध सिने-अभिनेता ( मृत्यू: १४ जून २०२०)**१९८३: संतोष वसंत साळवे -- कवी**१९७४: कीर्ती गायकवाड केळकर -- अभिनेत्री**१९६५: गणेश परशराम उदावंत -- कवी, लेखक, दै. सामना वृत्तपत्राचे उपसंपादक* *१९५८: भूपेंद्र गणवीर -- वरिष्ठ संपादक , लेखक**१९५६: जयश्री जोशी -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादक* *१९४९: रमेश रामकृष्ण बेलगे -- प्रसिद्ध कवी* *१९४८: सरोज सुधीर टोळे -- कवयित्री, लेखिका, संपादिका**१९४८: युसुफ हुसेन -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेता (मृत्यू: ३० ऑक्टोबर २०२१ )**१९४७: डाॅ. अश्विनी रमेश धोंगडे -- प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका* *१९४५: ललिता देसाई ऊर्फ आशू -- मराठी नाट्य-चित्रपटअभिनेत्री**१९४४: वसंत दत्तात्रेय गुर्जर -- मराठीतील प्रसिद्ध कवी* *१९३५: गजानन विठ्ठल साळवी -- लेखक**१९३३: रंगनाथ रामदयाल तिवारी -- मराठी व हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक**१९३३: हनुमंत अनंत ऊर्फ ह.अ.भावे -- दुर्मिळ साहित्य प्रकाशित करून मराठी वाङ्मयामध्ये मोलाची भर घालणारे ‘वरदा’ प्रकाशनचे संचालक (मृत्यू: १८ जून २०१३ )**१९३२: राजदत्त -- ज्येष्ठ दिग्दर्शक**१९२४: अ. ज. राजुरकर-- “चंद्रपूरचा इतिहास” या पुस्तकाचे लेखक (मृत्यू: सप्टेंबर १९९२ )**१९२४: प्रा. मधू दंडवते – रेल्वे मंत्री,अर्थतज्ञ (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५ )**१९२१: शरच्चंद्र मुक्तिबोध -- कवी, समीक्षक, कादंबरीकार (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९८४ )**१९१०: शांताराम आठवले – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार.’ भाग्यरेखा’, ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ वगैरे अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.(मृत्यू: २ मे १९७५ )**१८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ – कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९ )**१८८५: वासुदेव कृष्ण भावे --- चरित्रकार (मृत्यू: १९ नोव्हेंबर १९६३ )**१८८२: वामन मल्हार जोशी – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक (मृत्यू: २० जुलै १९४३ )**१८७४: बाळकृष्ण अनंत भिडे -- मराठी इतिहासकार, कवी व समीक्षक (मृत्यू: २ मे १९२९ )**१८५७: गंगाधर रामचंद्र मोगरे -- मराठीतील कवी, मराठीतील उपहासकाव्याचे जनक.(मृत्यू: ११ जानेवारी १९१५ )* 🌐 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌐••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: मृणालिनी साराभाई -- भारतीय नृत्यांगना (जन्म: ११ मे १९१८)**१९९८: सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (जन्म: २१ जून १९१६ )**१९८०: माधव भास्कर आचवल -- समीक्षक, ललित लेखक (जन्म: ३ नोव्हेंबर १९२६ )**१९७८: भवानीशंकर श्रीधर पंडित -- कवी, समीक्षक ( जन्म: २८ एप्रिल १९०६ )**१९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ ’गीता बाली’ – अभिनेत्री (जन्म: १९३० )**१९५९: सेसिल डी मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता,निर्माता व दिग्दर्शक (जन्म: १२ ऑगस्ट १८८१ )**१९५०: एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (जन्म: २५ जून १९०३ )**१९४५: रास बिहारी घोष – क्रांतिकारक (जन्म: २५ मे १८८६ )**१९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.(जन्म: २३ मार्च १९२३ )**१९२४: ब्लादिमिर लेनिन – रशियन क्रांतिकारक (जन्म: २२ एप्रिल १८७० )**१७९३: लुई (सोळावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २३ ऑगस्ट १७५४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - बहिणीची शपथ*..... पूर्ण कथा वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्पने घेतली शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पीएम सूर्यघर योजनेत मोठी संधी:छतावरील सौरऊर्जा प्रकल्पातून दरमहा 360 युनिट मोफत वीज, अनुदानासह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारी पासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचे दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारच्या माध्यमातून भजनी कलाकारांना मानधन दिले जाईल – मंत्री नितेश राणे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्ली : इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषकात पुरुष आणि महिला संघाने मिळविले पहिले विश्वचषक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुलदीप सूर्यवंशी, पत्रकार, बिलोली👤 संतोष हेंबाडे, शिक्षक, धर्माबाद👤 विजय माने👤 पिराजी कटकमवार👤 अनिल मुपडे👤 ऋषिकेश एस. पवार👤 साईनाथ जगदमवार👤 विष्णू रावणगावकर👤 कृष्णराज महानुभाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनिल - आत्माराम रावजी देशपांडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यात असणारी अपूर्णता पाहून कधीही निराश होऊ नका , कारण आपल्या दोषांचे भान होण्यानेच आपले दोष कमी होत असतात. -- फॕनेलाॕन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिला महिला खो-खो विश्वकप कोणी पटकावला ?२) महिला खो-खो विश्वकपचा अंतिम सामना कोणत्या दोन संघात झाला ?३) पहिला खो-खो विश्वकप कोठे आयोजित करण्यात आला होता ?४) 'ड्रीम रन' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?५) खो-खो या खेळाची सुरूवात कोणत्या देशात झाली ? *उत्तरे :-* १) भारत २) भारत व नेपाळ ३) भारत ४) खो-खो ५) भारत *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌺 *फुलं रंगीबेरंगी का असतात ?* 🌺➖➖➖➖➖➖➖➖➖अनेक झाडांची फुलं तर्हेतर्हेचे मनोहारी रंग धारण करतात. ते रंग बघायलाही आपल्याला आवडतं. अशा रंगेबिरंगी फुलांनी नटलेली आपली बाग सुंदर दिसते. कित्येक फुलांना अतिशय चांगला सुगंधही असतो. तोही आपला आनंद द्विगुणित करतो. तरीही आपल्या आनंदासाठी फुलांना रंग आणि सुगंध असतो, असं आपल्याला म्हणता येईल का ? कारण जिथं मानववस्ती नाही अशा ठिकाणच्या झाडांनाही रंगेबेरंगी व सुगंधी फुलं असतात. रानावनात वाढणाऱ्या झाडांची शोभाही अशा फुलांनी बहरून येते. याचा अर्थ निसर्गानं दुसऱ्याच कोणत्या तरी कारणांसाठी रंग आणि गंध बहाल केला असणार.ती कारणं समजून घेण्यासाठी फुलांचं मुख्य निसर्गदत्त काम काय असतं, याचा विचार करायला हवा. प्रत्येक सजीवाच्या अंगी आपलं पुनरुत्पादन करण्याची यंत्रणा असते. पुनरुत्पादनाशिवाय तो सजीव तगून राहू शकत नाही. एवढेच काय पण पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेशिवाय नवनव्या प्रजातींचा उगमही अशक्य झाला असता. त्यामुळे प्रत्येक सजीव पुनरुत्पादनाला अतिशय महत्त्व देतो. वनस्पतींच्या पुनरुत्पादनात फुलं कळीची भूमिका बजावतात.फुलांच्या अंतर्गत रचनेकडे लक्ष दिल्यास त्यातील दोन अवयव आपलं लक्ष वेधून घेतात. स्टॅमेन किंवा पुबीजांडातून पुंकेसर बाहेर पडतात. ते पिस्टिल किंवा स्त्रीबीजांडातील स्त्रीकेसरांवर पडले की त्यांच्या समागमातून पुढील पिढीची नांदी म्हटली जाते. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचं मिलन होणं त्या वनस्पतीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असतं. कित्येक फुलांमध्ये हे मीलन स्वयंपूर्णरित्या होत असलं, तरी बहुतांश वनस्पतींच्या फुलांमध्ये या प्रक्रियेसाठी दुसर्या कोणीतरी मध्यस्थाच्या मदतीची आवश्यकता भासते. वारा ही कामगिरी पार पाडत असला तरी तो पूर्णांशाने हे काम करू शकत नाही. त्यासाठी मग पक्षी किंवा मधमाश्यांसारख्या कीटकांची गरज भासते. ते काम करावं म्हणून मग पक्षी आणि मधमाशा यांना उद्युक्त करणं जरुरीचं असतं. त्यांना काहीतरी मधाचं बोट लावल्याशिवाय ते तरी या कामगिरीसाठी का तयार व्हावेत ? मधमाशांना तर अक्षरश: मधाचं बोट लावलं जातं. फुलांमध्ये असलेला मधुरस शोषून घेऊन मधमाशा त्याचं मधात रूपांतर करतात. तरीही आपल्याकडे अशा मधुरसाचे कोण आहेत, हे मधमाश्यांना कळावं कसं ? त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मग ही फुलं रंगीबेरंगी परिवेष धारण करतात. त्यातही मध्यस्थ कोण आहे यावर फुलांचा रंग निर्धारित केला जातो. मधमाशांना निळा रंग आवडतो, तर हमिंगबर्डसारख्या पक्ष्यांना लाल, गुलाबी किंवा जांभळ्या रंगांचं आकर्षण असतं. फुलपाखरं पिवळ्या, नारिंगी रंगांकडे ओढली जातात. काही फुलं दिवसाउजेडी फुलत असली तरी काही सूर्यास्तानंतरच फुलतात. त्या वेळी मग त्यांचा रंग पक्षांना वा कीटकांना दिसावा कसा ? त्यासाठी मग रंगांशिवाय या फुलांना सुगंधही दिला जातो. त्याच्या दरवळापायी मग हे फलनाला मदत करणारे मध्यस्थ त्याच्याकडे खेचून आणले जातात. त्यांना मधुरस मिळता मिळता त्यांच्याकडून पुंकेसराचा शिडकावा स्त्रीकेसरांवर होतो. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेला चालना मिळते.*बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••माणसं बरेच मोठे असतात. जसे की,वयाने,अनुभवाने, धनसंपत्तीने तर विचारसरणीने. काहीजण मनाने मोठे असतात. पण,जी व्यक्ती शुन्यातून विश्व निर्माण करत असते ती व्यक्ती नि:स्वार्थ भावनेने मदत करत असते. तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने मोठी असते.अशाच व्यक्तीला निसर्ग सुद्धा वंदन करत असतो.म्हणून स्वतः मोठेपणाची बाजी मारण्यापेक्षा लहान व्यक्तीला नेहमीच मोठ्या मनाने समजून घ्यावे. मोठे होण्यासाठी कुठेही धावाधाव करावी लागणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दुस-याबाबतचा दृष्टीकोन*स्टार्मवेल नावाचे एक इंग्रज पत्रकार होते. ते एखाद्याची मुलाखत घेणार असतील तर त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टी ते उघडपणे बोलून दाखवत असत. एकदा स्टार्मवेल यांना श्रीकृष्ण मेनन यांची मुलाखत घ्यावयाची होती. स्टार्मवेल यांनी आक्रमकपणे पहिलाच प्रश्न मेनन यांना विचारला," मिस्टर मेनन, तुम्ही अत्यंत गरीबीतून वर आलेला आहात. तुम्ही शाळेत वॉच स्काऊट म्हणून काम करत होता. एका इंग्रज महिलेने तुम्हाला आधार दिला व त्यांनीच तुम्हाला लंडनला पाठविले. तेथे कायदा आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन तुम्ही भारतात परत आला. येथे पुन्हा तुम्हाला संघर्ष करावा लागला. त्याचवेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे तुमच्याकडे लक्ष गेले. त्यांनी तुम्हाला योग्य संधी दिली. आज तुम्ही त्यांच्या जवळचे आहात. नेहरूंच्या मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागणार आहे असे बोलले जात आहे. म्हणजेच तुम्ही तळातून उठून आकाशात जाऊन ठेपणार आहात. पण मिस्टर मेनन तुम्ही मला खरेच सांगा की, तुम्ही कम्युनिस्ट आहात हे खरे आहे का." मेनन यांनी शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाले," तुम्ही माझे जे कौतुक केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मलाही तुमचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे तुम्ही रस्तोरस्ती पेपर विकून तुमचे पोट भरत होता. तेथूनच तुम्ही मोठे झालात, आता तुम्हाला चांगला पगार मिळतो आहे. पण मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की, खरेच सांगा की तुम्ही एक अनौरस संतान आहात काय." मेनन यांच्या सडेतोडपणामुळे स्टार्मवेल यांची बोबडी वळाली आणि त्यांनी तो विषय टाळून दुस-या प्रश्नाकडे वळाले.तात्पर्य - दुस-याच्या खाजगी आयुष्यात डोकावताना त्याला दुःख देणा-या गोष्टींबाबत चर्चा न केलेली बरी असते. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही गोष्टी या अतिखासगी या प्रकारात मोडतात त्यामुळे दुस-याच्या आयुष्यात ढवळाढवळ न केलेलीच चांगली.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/19uQgnauEU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील २०वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००९:अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.**१९९९:गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर**१९९८:संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर**१९६३:चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.**१९४४:दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.**१९३७:फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.**१८४१:ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.**१७८८:इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:डॉ. कोंडबा भगवान हाटकर-- लेखक**१९८०:दिनेशकुमार रामदास अंबादे-- कवी* *१९७७:अॅड.नीता प्रफुल्ल कचवे-- कवयित्री,कादंबरी,कथालेखिका* *१९७२:भुपेश पांड्या --चित्रपट अभिनेते (मृत्यू:२३ सप्टेंबर २०२०)**१९७०:डॉ.मंजुषा सुनील सावरकर -- कथा लेखिका,संपादिका* *१९६८:प्रा.अन्नपूर्णा अजाबराव चौधरी-- कवयित्री,लेखिका**१९६४:साहेबराव आनंदराव नंदन-- समाज प्रबोधन,लेखक**१९६३:अमोल मारुती रेडीज -- लेखक,कवी* *१९६०:स्टीफन एम.परेरा-- कथाकार* *१९६०:आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक**१९५४:विजय शं.माळी- प्रसिद्ध कवी,लेखक* *१९५१:वसंत सीताराम पाटणकर-- मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी,समीक्षक**१९५०:प्राचार्य डॉ.रमेश अंधारे-- कादंबरीकार,संपादक**१९४७:फुलचंद पत्रुजी खोब्रागडे -- कवी, लेखक* *१९४७:लीला प्रभाकर गाजरे-- कवयित्री**१९४६:डॉ.शोभा अभ्यंकर-- भारतीय संगीतशास्त्रज्ञ आणि मेवाती घराण्याच्या शिक्षिका(मृत्यू:१७ ऑक्टोंबर २०१४)**१९४५:डॉ.माणिक तुकाराम वैद्य-- कवी* *१९३७:प्राचार्य डॉ.दाऊद दळवी-- इतिहासाचे अभ्यासक(मृत्यू:३१ ऑगस्ट २०१६)**१९२४:मनोहर नामदेव वानखडे-- व्यासंगी साहित्यसमीक्षक आणि दलितांच्या वाङ्मयीन-सांस्कृतिक चळवळींचे नेते(मृत्यू:१ मे १९७८)**१९२०:विष्णुपंत पुरुषोत्तम भागवत-- लेखक, संपादक (मृत्यू:२३ डिसेंबर १९७५)**१८९८:कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार (मृत्यू:२० आक्टोबर १९७४)**१८७१:सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू:५ सप्टेंबर १९१८)**१८६१:काशीबाई गोविंदराव कानिटकर --आधुनिक मराठी साहित्यातील आद्यलेखिका(मृत्यू:३० जानेवारी १९४८)**१७७५:आंद्रे अॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू:१० जून १८३६)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९:भगवान ठग -- कवी आणि अनुवादक(जन्म:२४ जानेवारी १९५३)**२००२:रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते.(जन्म:१० मे १९१८)**२००९:बाळ गंगाधर सामंत--मराठी लेखक, विनोदकार व चरित्रकार (जन्म:२७ मे १९२४)**१९९३:ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी,’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म:४ मे १९२९)**१९८८:खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तानमधील एक महान राजकारणी,ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला (जन्म:३ जून १८९०)**१९८०:कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण(जन्म:१९ डिसेंबर १८९४)**१९५१:अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म:२९ नोव्हेंबर १८६९)**१९३६:जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म:३ जून १८६५)**१८९१:डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म:१६ नोव्हेंबर १८३६)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जगात भारतीय कुटुंब संस्कृती श्रेष्ठ*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबई - स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पटसंख्या कमी झाल्याने रायगडमधील २६ प्राथमिक शाळांना ठोकले टाळे !*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना, अनेक तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी; आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद जास्त, स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू, अशोक चव्हाण यांनी मांडली भूमिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर केलेला जातीचा उल्लेख रद्द करण्यात आला असून नवीन हॉल तिकीट लवकरच उपलब्ध होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रत्नागिरी : दवाखाने आणि रुग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक, अन्यथा परवाना होणार रद्द, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण ! सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे भव्य कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्ग रुसल्याने नंदनवन ओस काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. काश्मीर मधील निसर्गाची संपूर्ण जगाला भुरळ पडली आहे विशेषतः हिवाळ्यात काश्मीर मध्ये जाऊन काश्मीरमधील निसर्ग जीवनात एकदातरी अनुभवावा ही प्रत्येकाची इच्छा असते. निसर्गाने काश्मीरला जे दान दिले आहे तसे दान इतर कोणत्याही प्रदेशाला दिले नाही म्हणूनच काही जण काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग असेही म्हणतात. झेलम, चिनाब, निडर आदी नद्यांचे खळखळते पाणी, हिरवीगार जंगलसंपदा आणि बर्फाच्छादित पर्वत, धुक्याने पांघरलेली चादर त्यामुळे काश्मीर हे पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण आहे मात्र याच काश्मीरला गेल्या काही वर्षापासून कोणाची तरी नजर लागली. काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पोसला सतत होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे पृथ्वीवरील या नंदनवनात पर्यटक जीव मुठीत धरूनच येत असे मात्र केंद्र सरकारने काश्मीरला लागू असलेले ३७० वे कलम हटवल्याने तेथील दहशतवादी कारवाया कमी झाल्या त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटक पुन्हा परततील अशी आशा वाटू लागली. झालेही तसेच मागील वर्षी जानेवारीच्या मध्यापर्यंत जवळपास १ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती त्यात परदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय होती. काश्मीरमध्ये पर्यटक परतू लागल्याने स्थानिक काश्मिरी लोकांनाही रोजगार मिळू लागला. काश्मीरचे गेलेले वैभव परत येऊ लागले असे वाटत होते. गेल्या वर्षी पर्यटकांनी काश्मीरला पसंती दिल्याने यावर्षी मागील वर्षापेक्षा अधिक पर्यटक काश्मीरला भेट देतील असे वाटू लागले होते. पर्यटकांनी नंदनवन पुन्हा बहरू लागेल असे वाटत असतानाच काश्मीरला पुन्हा कोणाची तरी नजर लागली. यावर्षी काश्मीरमधील निसर्गाने खप्पा मर्जी केली. निसर्ग रुसल्याने यावर्षी म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. गुलमर्ग हे काश्मीरमधील सर्वांचे आवडते थंड हवेचे ठिकाण. काश्मीरला जाणारा पर्यटक आवर्जून गुलमर्गचा निसर्ग अनुभवायला गुलमर्ग ला भेट देतोच मात्र यावर्षी गुलमर्ग बर्फाविना कोरडे पडले आहे. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात च म्हणावी तशी बर्फवृष्टी झाली नाही. अगदी तुरळक बर्फवृष्टी झाल्याने पर्यटकांना बर्फातील स्कियिंग आणि अन्य खेळ खेळता येत नाहीत त्यामुळेच अनेक पर्यटकांनी काश्मीर चे केलेले बुकिंग रद्द केले आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५० टक्के पर्यटकही आले नाहीत. पर्यटक नसल्याने हिवाळ्यातील सर्व व्यवसाय थंड पडले आहेत. स्थानिक लोकांचा रोजगार बुडाला. काही चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रीकरणही रद्द केले आहे. पर्यटक येत नसल्याचा परिणाम काश्मीरच्या अर्थ्यवस्थेवरही झाला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांनी बहरलेले हे नंदनवन आज पर्यटकांविना ओस पडले आहे. गेल्या अनेक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती असे तेथील जाणकार सांगतात. इतका कमी बर्फवृष्टी यापूर्वी कधी अनुभवली नव्हती असेही तेथील काही लोक सांगतात. यावर्षी निसर्गाने काश्मीरवर अवकृपा केल्याने काश्मीरच नाही तर देश चिंतेत आहे. यावर्षी जरी निसर्गाने अवकृपा केली असली तरी पुढील वर्षी तरी निसर्ग काश्मीरवर कृपा करेल पृथ्वीवरील हे नंदनवन पर्यटकांनी पुन्हा बहरेल अशी अपेक्षा स्थानिक नागरिकच नव्हे संपूर्ण देशातील नागरिक व्यक्त करत आहेत. श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून , वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. -- थॉमस फुलर*संकलन :- श्रीमती प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री* म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य अव्वलस्थानी आहे ?३) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला ?४) 'सज्जन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे ? *उत्तरे :-* १) बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री २) केरळ ३) अहमदाबाद ४) संत ५) दक्षिण सुदान *संकलन :- जैपाल ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद👤 शंकर बेल्लूरकर👤 अहमद लड्डा सय्यद, पत्रकार👤 संतोष शेटकार👤 शरयू देसाई 👤 माऊली जाजेवार👤 विशु पाटील वानखेडे👤 नागनाथ दिग्रसकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*विनोबा - विनायक नरहर भावे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास । वियोग पहावया जाले आतां ॥१॥ आतां एक करीं धावणिया धांवा । बुडतों केशवा काढीं मज ॥२॥ लाभ नव्हे हानि जाली भागाभाग । तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥ नामा म्हणे ऐसें सर्वस्व रक्षिलें । पाषाण तारिले जळामाजीं ॥४॥।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकालाच एकटे यावे लागते आणि एकटेच जावे लागते हा निसर्गाचा नियम आहे. पण, या जगात जगत असताना आजुबाजूचाही आपण विचार करावा. कोणी आपुलकीने मदत करतात तर कोणाचे सांगता येत नाही. म्हणून कोणी आपुलकीच्या नात्याने मदत केली असेल त्यांना कधीही विसरू नये. व जे, कोणी तिरस्कार करतात त्यांचा राग धरू नये. कारण चांगले करणारेच अजरामर होऊन जातात व जे काहीच करत नाही त्यांचे जीवन व्यर्थ होऊन जाते भलेही सोबत कोणी काहीच घेऊन जात नसले तरी इतरांना केलेली मदत ही माणुसकीची साथ असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्हा आणि नगारा*एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १८वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००५:एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.**१९९९:नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.**१९९८:मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९७:नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.**१९७४:इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.**१९५६:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार**१९११:युजीन बी.इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.**१७७८:कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५:मोनिका बेदी-- भारतीय अभिनेत्री आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता**१९७३:प्रा.डॉ.रंजन दामोदर गर्गे-- विज्ञान लेखक,विविध पुरस्काराने सन्मानित* *१९७२:विनोद कांबळी –भारतीय क्रिकेटपटू**१९७१:महेंद्र भाऊरावजी सुके-- पत्रकार, लेखक**१९६६:अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू**१९५८:भूपेंद्र दामोदर संखे-- कवी,लेखक**१९५८:तुका उत्तमराव मोहतुरे-- लेखक,कवी**१९४७:प्रकाश गोपाळ सावरकर-- लेखक* *१९४५:डॉ.विजया वाड --प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिक,मराठी विश्वकोश मंडळाच्या पूर्व अध्यक्षा**१९४५:माधवी करमळकर -- लेखिका* *१९३७:अरविंद रघुनाथ मयेकर --ख्यातमान सतारवादक आणि संगीतकार(मृत्यू:३० मार्च २०१९)**१९३३:जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू:२२ एप्रिल २०१३)**१९२५:मनोहरराय लक्ष्मणराव सरदेसाय-- कोकणी कवी,निबंधकार व अनुवादक (मृत्यू:२२ जून २००६)**१९२५:गजानन जोहरी-- लेखक* *१९०९:द.ग.देशपांडे (बाबुराव जाफराबादकर)-- लेखक,संगीत,नाटय क्षेत्रात योगदान* *१८९५:वि.द.घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे-- मराठी कवी,लेखक(मृत्यू:३ मे १९७८)**१८८९:शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू:१ आक्टोबर १९३१)**१८८९:देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी.– कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू:७ आक्टोबर १९७५)**१८४२:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू:१६ जानेवारी १९०९)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६:आशा पाटील --मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाट्यक्षेत्रातील अभिनेत्री (जन्म:१९३६)**२०१५:शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ –वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली.(जन्म:१७ नोव्हेंबर १९३२)**२०११:पुरुषोत्तम दास जलोटा-- भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक(जन्म :९ सप्टेंबर १९२५)**२००३:हरिवंशराय बच्चन – हिन्दी कवी (जन्म:२७ नोव्हेंबर १९०७)**१९९६:एन.टी.रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक,निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म:२८ मे १९२३)**१९८३:आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत,’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म:१२ मे १९०५)**१९४७:कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म:११ एप्रिल १९०४)**१९३६:रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म:३० डिसेंबर १८६५)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *एका शेतकऱ्याची आत्मकथा*नमस्कार ....!मी एक शेतकरी आपल्याशी संवाद करीत आहे. या भारतातील जवळपास ७५ टक्के जनता खेड्यांत राहते आणि येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती म्हणूनच भारत देश कृषिप्रधान आहे असे म्हटले जाते. भारतातील संपूर्ण व्यवहार हा शेतीवरच अवलंबून आहे. शेतातून निघणा-या उत्पादनावरच भारताचा विकास अवलंबून आहे. इतरांना जगवणारा, उत्पादक असा मी शेतकरी मात्र फारच बिकट अवस्थेत दिसून येतो. कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळीनुसार मी उभ्या जगाचा पोशिंदा आहे. मात्र ..................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्याचे मिशन दावोस, 20 ते 24 जानेवारी मध्ये दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नारायणगावाजवळ भीषण अपघात, 9 ठार व 8 जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे वाटप*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बांगलादेश ने लादलेल्या 10 टक्के आयात शुल्कामुळे लासलगावी लाल कांदा घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *NTA च्या नियमात बदल, नीटच्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची धावपळ, नाव बदल करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *उत्तर भारतात धुक्याची चादर, जनजीवन विस्कळीत, दिल्लीत 117 विमानांना उशीर तर 27 रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *खो-खो विश्वचषकामध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *रेणू* 📙 *************मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. अणूची रचना काहीशी सूर्यमालेसारखी असते. अणूचे बहुतेक सर्व वस्तुमान अणूकेंद्रात असते. धनविद्युतभारित प्रोटॉन आणि तेवढ्याच वस्तुमानाचे पण विद्युतभार नसलेले न्यूट्रॉन यांनी अणुकेंद्र बनते. त्याच्याभोवती विविध कक्षांत इलेक्ट्रॉन घिरट्या घालीत असतात. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान म्हणून अणू मात्र विद्युतभाराच्या दृष्टीने किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. चांदी, सोने इत्यादी अशा प्रकारची धातूरूप मुलद्रव्ये वगळता सृष्टीतील बाकी सर्व पदार्थ हे रेणूंनी बनलेले असतात. रेणू म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र गुंफून झालेली रचना. ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन ही मुलद्रव्ये त्यांच्या रेणूंची बनलेली असतात. त्यांच्या प्रत्येक रेणूत दोन अणू असतात. पाणी हे संयुग. ऑक्सिजनचा एक अणू आणि हायड्रोजनचे दोन अणू एकत्र आले की, पाण्याचा एक रेणू बनतो. नित्याच्या आढळतील बहुसंख्य पदार्थ संयुग स्वरूपातच असतात. शिवाय अनेक मुलद्रव्येही त्यांच्या रेणूंचीच बनलेली असल्यामुळे आपल्या पर्यावरणातील सारे विश्व रेणूंचे बनले आहे असे म्हणता येईल. रेणूंचे काही गुणधर्म विलक्षण आहेत. ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र येऊन बनणाऱ्या पाण्याचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्माहून किती वेगळे ! साखर तर हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन यांनी बनते. परीक्षानळीत साखर तापवली की खाली काळा साका आणि नळीच्या तोंडाशी पाण्याचे बारीक थेंब मिळतात. कितीतरी प्रकारचे अणू एकत्र येऊन प्रचंड रेणू बनू शकतात. अमिनो आम्ले, प्रथिने, डीएनए हे सर्व गुंतागुंतीच्या रचनांचे रेणूच आहेत. मात्र तरीही रेणू खूप लहान असतो, हे विसरायचे नाही. घोटभर पाण्यात सहावर तेवीस शून्य इतके रेणू असतात ! असे असंख्य रेणू एकत्र येऊन पदार्थ बनतो. हे रेणू एकमेकांशी कसे गुंफलेले आहेत, यावर पदार्थाचे भौतिक गुणधर्म ठरतात. गुंफण घट्ट असेल, तर पदार्थ घन असतो. अगदी शिथिल असेल, तर द्रवरूप आणि प्रत्येक रेणू सुटा असेल तर पदार्थ वायुरूप असतो. रेणूची हालचाल तापमानावर अवलंबून असल्याने उष्णता देऊन पदार्थ वितळता येतो आणि द्रवाचे वायूत रूपांतर करता येते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*👆*संकलन :- श्याम ठाणेदार , पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.*संकलन :- प्रमिला सेनकुडे **ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला *'इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क'* म्हणून मान्यता देण्यात आली ?२) महाराष्ट्रात 'पहिला राज्य क्रीडा दिवस' केव्हा साजरा करण्यात आला ?३) वैनगंगा नदी कोणत्या नदीला मिळते ?४) भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?५) 'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) पेंच व्याघ्र प्रकल्प २) १५ जानेवारी २०२४ ३) वर्धा / गोदावरी ४) रघुराम अय्यर ५) १४ जानेवारी*संकलन :- जैपाल ठाकूर *जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 Vijaya Wad, प्रसिद्ध बालसाहित्यिक👤 Prabhakar Rajeshwar Kamtalwar, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धर्माबाद👤 रामनाथ खांडरे, करखेली👤 त्र्यंबक आडे, नांदेड👤 Mahesh Govindwar , सहशिक्षक, माहूर👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••करी वृत्ती जो संत तो संत जाणा। दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते। परी सज्जना केविं बाधु शके ते॥१६८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आलेल्या दु:खाला कंटाळून जाणे म्हणजे जीवन जगणे नव्हे. दु:ख हे दोन दिवसाचे पाहुणे असतात सदैव लक्षात असू द्यावे. भलेही सुख खूप काही देत असेल तरी जे आपल्याला पाहिजे ते कधीच देत नाही म्हणून सुखाच्या मोहात पडू नये आणि दु:खाला कंटाळू नये . खऱ्या अर्थाने दु:खच जीवन जगण्यासाठी मार्ग दाखवत असतो.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राक्षस, चोर आणि ब्राह्मण*एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या. दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला. द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं. चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?' अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू? राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली. त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला. तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 9️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 9️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील १६वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२००८:टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण**१९९८:ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना 'ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर**१९९६:पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड**१९९५:आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण झाले.**१९७९:शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.**१९५५:पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण**१९२०:अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.**१९१९:अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.**_१६८१:छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला._**१६६०:रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९६२:प्रा.विनय अमृतराव पाटील -- कवी**१९६०:साहेबराव विश्वनाथ कांगुणे-- लेखक, वक्ते**१९५८:श्रीकांत सदाशिव मोरे-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९५६:नारायण भगवानराव पांडव-- कवी* *१९५१:डॉ.जयप्रकाश रामचंद्र कुलकर्णी -- लेखक**१९५०:मधुकर सदाशिव वाघमारे -- कवी, लेखक* *१९४७: सिद्धार्थ यशवंत वाकणकर-- हस्तलिखितशास्त्र व भाषाशास्त्रज्ञ,संशोधक**१९४६:कबीर बेदी – चित्रपट अभिनेते**१९४३:नलिनी भीमराव खडेकर -- कवयित्री, लेखिका**१९४२:कृष्णा चौधरी --कवी,लेखक**१९२८:बाळासाहेब पित्रे--ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक(मृत्यू:१२ जानेवारी २०१८)**१९२८:रामचंद्र दत्तात्रेय लेले--वैद्यकशास्त्रज्ञ**१९२७:कामिनी कौशल-- भारतीय अभिनेत्री**१९२६:ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर – संगीतकार (मृत्यू:२८ जानेवारी २००७)**१९२०:नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू:११ डिसेंबर २००२)**१९१९:मधुसूदन ऊर्फ लालजी रघुनाथराव गोखले-- ज्येष्ठ तबलासम्राट(मृत्यू:१६ नोव्हेंबर २००२)**१९०९:विनायक रघुनाथ चितळे -- लेखक**१८५३:आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू:४ एप्रिल १९३१)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२:अरुण जाखडे-- मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक(जन्म:७ जानेवारी १९५५)**२०१७:प्रा.पुरुषोत्तम पाटील-- मराठी कवी आणि केवळ मराठी कवितांना वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक होते (जन्म:३ मार्च १९२७)**२०११:प्रभाकर कृष्णराव काळे-- कवी, संपादक (जन्म:१९३८)* *२००५:श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे* *२००३:रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक* *१९९७:कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म:१९३३)**१९८८:डॉ.लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ,मुत्सद्दी,कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर,जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म:२२ नोव्हेंबर १९१३)**१९६७:रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म:२० डिसेंबर १९०१)**१९६६:साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म:२५ नोव्हेंबर १८७९)**१९५४:बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक,चित्रकार,शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म:३ जून १८९०)**१९३८:शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक,त्यांच्या ‘पथेर दाबी' या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा.कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म:१५ सप्टेंबर १८७६)**१९०९:न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक,धर्मसुधारक,अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म:१८ जानेवारी १८४२)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन ✍* * Chavhan Shriram माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या दौऱ्यात नौदलाच्या तीन नौकाचे केले राष्ट्रार्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अखिल मराठा फेडरेशन कडून खासदार नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द ग्रेट मराठा पुरस्कार जाहीर, अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शिर्डी विमानतळ परिसरात लेझर प्रकाश वापरण्यास बंदी, वैमानिकांच्या सुरक्षितता संबंधी आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई, पुण्यासह राज्यभरात सुरू होणार बाईक टॅक्सी सेवा, सरकारने बनविला कायदा, पुढील दोन महिन्यात लागू होण्याची शक्यता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कंधारच्या उरूस निमित्ताने उद्या नांदेड जिल्ह्यात कलेक्टर डिक्लेअर सुट्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे विद्यापीठात राज्य क्रीडा दिन उत्साहात, खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाचा आयर्लंडवर विक्रमी विजय, एकदिवसीय मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - Kunal Paware 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग ५ (५/६) - मानवी वाटचालगोरिला आणि चिंपांझी या माकडांच्या शरीरातील रक्तातील प्रथिने, हिमोग्लोबिन आणि डी.एन.ए. यांचे माणसाच्या शरीरातील याच घटकांची मोठ्या प्रमाणावर साम्य आहे. यावरूनच गोरिला, चिंपांझी आणि माणूस या तीन्ही शाखा सुमारे चाळीस ते पन्नास लाख वर्षांपूर्वी एकाच पूर्वजापासून जन्मल्या असाव्यात, असा अंदाज केला जातो. उत्खननात सापडणाऱ्या जीवाश्मांच्या मदतीने मानवाच्या उत्क्रांतीतील वाटचालीचा खुणा धुंडाळाव्या लागतात.सर्वात प्राचीन जीवाश्म आहे रामपिथेकसचा. भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळून आलेल्या अवशेषांवरून आजच्या माणसाशी साम्य सांगणाऱ्या शारीरिक खुणा रामपिथेकसमध्ये होत्या हे लक्षात येते. त्याचा काळ होता सुमारे एक कोटी वीस लाख वर्षांपूर्वीचा.त्यानंतर भेटतो सुमारे पस्तीस लाख वर्षांपूर्वी वावरणारा ऑस्ट्रेलोपिथेकस अफरेनिस. मागच्या दोन पायांवर उभे राहून ताठ चालणे हे मानवी प्राण्याचे वैशिष्ट्य या पूर्वजात पुर्ण रुजलेले आढळते. मात्र मेंदूचा आकार अद्याप लहानच होता. तर जबडा आणि दातांचा आकार मोठा होता. ऑस्ट्रेलोपिथेकस - आफ्रिकॅन्स ऑस्ट्रेलोपिथेकस - रोबोस्ट्स असे बदल होत सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी 'होमो' या जातीचा जन्म झाला.होमो इरेक्ट्स ही ऑस्ट्रेलोपिथेकस आणि आजच्या मानवाच्या मधली पायरी होती.आजचा मानव म्हणजे होमो सेपियन्स. जीवाश्म स्वरूपात हा होमो सेपियन्स भेटतो साधारण पाच लाख वर्षांपूर्वीच्या काळात.मेंदूच्या आकारात वाढ होत गेली होती.सुरुवातीला होमो सेपियन्स निअँडरथालच्या कवटीची हाडे जाड होती, कपाळ अरुंद होते.हे सगळे शारीरिक बदल होत आजच्या स्वरूपातील माणूस सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये भेटतो.सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे कोडे विचारवंतांना अनेक वर्षे पडलेले आहे. 'देवाने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याची एकेक जोडी बनवली,' या बायबलमधील मताशी सहमत होणे अनेकांना जड जात होते. अनेकांनी या कोड्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.उपलब्ध पुरावे, सूक्ष्म निरीक्षण आणि साऱ्यांची सांगड घालून मांडलेली तर्कशुद्ध शास्त्रीय उपपत्ती अशा स्वरूपात उत्क्रांतीवाद मांडणारा पहिला शास्त्रज्ञ ‘चार्ल्स डार्विन'क्रमश :- ‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- श्रीमती प्रमिला सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात मोठे धार्मिक सम्मेलन कोठे भरते ?२) प्रयागराज येथील महाकुंभ मेळावा कोणत्या तीन नद्यांचा संगमावर भरतो ?३) प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ किती दिवस चालणार आहे ?४) कुंभाचे तीन प्रकार कोणते ?५) महाकुंभ किती वर्षानंतर भरतो ? *उत्तरे :-* १) प्रयागराज, उत्तरप्रदेश २) गंगा, यमुना व सरस्वती ३) ४५ दिवस ४) अर्ध कुंभ, पुर्ण कुंभ व महाकुंभ ५) १२ पुर्ण कुंभ पुर्ण झाल्यावर ( १४४ वर्ष )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, शिक्षक, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥ मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥ सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥ भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥ मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥ दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥ म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥।। संत नामदेव महाराज ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पहावं वाकून या प्रकारची समाजात एक प्रचलित असलेली म्हण नेहमीच ऐकायला, वाचायला मिळत असते. म्हणजेच असे होत असावे म्हणून कदाचित ही म्हण प्रचलित झाली असावी. पण, त्यात एक गोष्ट अवश्य लक्षात असू द्यावे जेव्हा आपण स्वतः चा समाधान करण्यासाठी काळजीपूर्वक दुसऱ्याकडे वाकून बघत असतो त्यावेळी आपल्याकडेही दहा पटीने लोक वाकून बघत असतात. जर बघायचं असेल तर एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू बघावे,कोणाच्या व्यथा जाणावे ,कोणाचे दु:ख बघून त्या दु:खात माणुसकीच्या नात्याने सहभागी व्हावे पापात जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक- स्तंभलेखक ना. सा. येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌼 *_भारतीय लष्कर दिन_* 🌼•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_ या वर्षातील १५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌼 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌼••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.**१९९९: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.**१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.**१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.**१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.**१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.**१८८९: पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.**१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.**१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.**१५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.* 🌼 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: नील नितीन मुकेश चंद माथूर -- भारतीय अभिनेता, निर्माता आणि लेखक**१९८१: रामकृष्ण माधवराव चनकापुरे -- कवी**१९७९: डॉ. आरतीशामल जोशी -- लेखिका**१९७६: प्रा. नेमिचंद चव्हाण -- लेखक**१९७५ नयना निगळ्ये -- कवयित्री तथा अभियंता संचालक न्यूयॉर्क**१९७२: सुरेखा अशोक बो-हाडे -- कवयित्री, ललित लेखिका* *१९७२: गजानन कमल जानराव सोनोने -- कवी, लेखक* *१९६७: भानुप्रिया -- भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना**१९६६: शैलेश हिंदळेकर -- कवी**१९६५: श्रीकांत परशुराम नाकाडे -- लेखक**१९५९: प्रा.डाॅ. भारती निरगुडकर -- लेखिका, कवयित्री**१९५९: प्रभाकर गंभीर -- कवी**१९५७: वंदना पंडित -- मराठी अभिनेत्री**१९५७: सुब्रह्मण्यम जयशंकर(एस. जयशंकर) -- केंद्रीय विदेश मंत्री**१९५६: जीवन बळवंत आनंदगावकर -- प्रसिद्ध कवी, लेखक तथा निवृत्त न्यायाधीश**१९५६: मायावती ( मायावती प्रभुदास) -- उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री* *१९५४: प्रभाकर धनाजी शेळके -- प्रसिद्ध कवी**१९५२: संजीव गोविंद लाभे -- लेखक**१९५१: प्रीतिश नंदी -- भारतीय, चित्रकार, पत्रकार, कवी, लेखक, राजकारणी, प्राणी आणि क्षेत्र, टेलिव्हिजन आणि स्ट्रीमिंग सामग्रीचे निर्माते (मृत्यू: ८ जानेवारी २०२५ )**१९५०: नेताजी राजगडकर -- माजी आमदार तथा आकाशवाणीचे वृत्त निवेदक (मृत्यू: १८ जुलै २०१४ )**१९४३: जयराम पोतदार -- हार्मोनियम आणि आॅर्गन वादक व लेखक**१९३९: निलकांत ढोले -- ज्येष्ठ गझलकार, कवी व लेखक (मृत्यू: १७ सप्टेंबर २०२२ )**१९३१: वासुदेव बेंबळकर -- लेखक* *१९३१: शरच्चंद्र वासुदेव चिरमुले -- कथाकार (मृत्यू: २७ मार्च १९९२ )**१९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८ )**१९२८: राज कमल -- प्रसिद्ध भारतीय संगीतकार (मृत्यू :१ सप्टेंबर २००५ )**१९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४ )**१९२३: चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर -- मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ ] (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७ )**१९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८ )**१९१२: गजानन काशिनाथ रायकर -- लेखक, संपादक (मृत्यू: १६ मे २००२ )**१९०५: यशवंत कृष्ण खाडिलकर -- कादंबरीकार, संपादक (मृत्यू: ११ मार्च १९७९ )* *१७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: १८३८ )* 🌼 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌼 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९ )**२०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५ )**२०१०: मंदाकिनी कमलाकर गोगटे -- मराठी लेखिका (जन्म: १६ मे १९३६ )**२००२: विठाबाई भाऊ नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: १९३५ )**१९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८ )**१९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६ )**१९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६ )**१९१९: लक्ष्मण श्रीधर वाकणकर -- लिपिकार, संशोधक(जन्म: १७ सप्टेंबर १९१२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सैनिक परिवारांसाठी 58 कोटींचे वाटप, माजी सैनिकांसाठी रोजगार, कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू; लष्करप्रमुख द्विवेदींची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/17Lvzvmj3X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*तरुण भारत देश घडवू या*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत माहिती दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईत एक दिवसीय दौरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार 25 खाटांचे रुग्णालय, 5 लाखांपर्यंत शस्त्रक्रियांचा खर्चही राज्यशासनाकडे, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे पर्यटन महोत्सवात 60 हून अधिक टूर कंपन्यांचा सहभाग, 17 ते 19 जानेवारीला होटेल सेंट्रल पार्कमध्ये विनामूल्य प्रवेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडणारा देशव्यापी उपक्रम, एमआयटी पुण्यात 16 जानेवारीला 'उद्योमोत्सव 2025'चे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 चिं. नीरज रामानंद रामदिनवार, नांदेड👤 साईनाथ अन्नमवार, युवा उद्योजक, नांदेड👤 दत्ता बेलूरवाड👤 एकनाथ पावडे👤 व्ही. एम. पाटील👤 सलीम शेख, बिलोली👤 कोमल रोटे👤 सतिश बोरखडे, शिक्षक👤 शिवशंकर वाघमारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकरंद - बा.सी.मर्ढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो दुसऱ्याचे नुकसान कसे करावे हे जाणत नाही , त्यालाच परोपकारी म्हणून ओळखावे. -- मुरारी बापू*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पहिल्या खोखो वर्ल्ड कपमध्ये भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?२) शिक्षणासाठी प्रख्यात विद्यापीठे सर्वाधिक कोणत्या देशात आहेत ?३) हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा देण्यात आला ?४) 'शीघ्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १८ व्या 'प्रवासी भारतीय संमेलना'चे आयोजन कोठे करण्यात आले ? *उत्तरे :-* १) प्रियंका इंगळे, बीड २) अमेरिका, १२९ विद्यापीठे ( भारत - १ विद्यापीठ ) ३) १४ सप्टेंबर १९४९ ४) जलद ५) भुवनेश्वर, ओडिशा *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *शिजवणे* 📙 अग्नीचा शोध लागला आणि खाण्याच्या बाबतीत माणसाचे चोचले सुरू झाले. नैसर्गिक पदार्थ खाण्यातला आनंद माणूस खूपसा विसरलेलाच आहे. भारतातील खाण्याच्या सवयींचा विचार केला, तर पदार्थ शिजवणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया झाल्याशिवाय आपले अन्न तयार होत नाही. भात शिजणे, भाजी शिजणे, आमटीसाठी डाळ शिजणे, उसळीला कडधान्य शिजणे वा कोंबडी या प्रत्येक बाबतीत 'शिजणे' हा एक टप्पाच असतो.अन्न शिजणे म्हणजे नेमके काय होते ? प्रत्येक वनस्पतीज पदार्थ हा पेशींनी बनलेला असतो. या पेशींना एक घट्टसर अशी सेल्युलोजची भिंत वा आवरण असते. या पेशींच्या आतमध्ये केंद्रक व पेशीचा अन्नसाठाही असतो. अन्न शिजताना प्रथम नष्ट होते, ते सेल्युलोजचे आवरण. मग अन्नसाठ्याचे घट्ट पदार्थांत रूपांतर होते. केंद्रक तर नष्टच पावते. पेशीमधील द्रवपदार्थ एकमेकांत मिसळून जातात. सूक्ष्मदर्शक यंत्राखाली एखाद्या धान्याचे, भाजीचे, कोंबडीचे निरीक्षण केले, तर शिजवण्यापूर्वी सुस्पष्टपणे आढळणाऱ्या या सर्व गोष्टी शिजवल्यानंतर नाहीशा झालेल्या दिसतात. यामुळेच शिजवण्यापूर्वीची पालेभाजी शिजवल्यावर अगदी मऊ लागते. घट्टसर बटाटा मेणासारखा होतो. तांदळाचे कवच जाऊन त्याची पेस्ट बनू शकते. हे बदल झाल्यानंतर अन्न पुन्हा मूळ स्थितीत येऊ शकत नाही. पण या बदलांमुळे अन्नाच्या पचनासाठी मात्र मदत होऊ शकते. प्रत्येक बाबतीत 'सेलवॉल' नष्ट झाल्याने शरीरातील पाचकरसांची क्रिया सुलभ होते. प्राणिज पदार्थांमधील प्रथिने मानवी जठरातील पाचकरसांनी सहज पचत नाहीत. शिजवण्यामुळे ही क्रिया लवकर शक्य होते.अन्न शिजवणे ही क्रिया साधारणपणे थोडेसे पाणी घालून करण्याची पद्धत आहे. पाण्यामुळे उष्णता सर्वत्र पसरते व शिजणाऱ्या पदार्थातील विविध चवींचे रसही पदार्थात आतपर्यंत पोहोचण्यास मदत होते. अन्न शिजताना निरनिराळे पदार्थ, मसाले, मीठ, तिखट, गोड व साखर घालण्याची पद्धत आहे. यामुळे सर्व पदार्थांची एकजीव एकच चव येते. भाजी खाताना ती नीट शिजली नसेल, तर नुसती कच्चीच लागते, एवढेच नव्हे, तर तिच्या फोडींमध्ये आत्तापर्यंत तिखट मीठही नीट पोहोचलेले नसते. शिजणे या प्रकारामध्ये आणखीही एक खुबी अंतर्भुत आहे. शिजण्यातील नेमकेपणा व त्या पदार्थांची मुळची चव 'खुलुन' येणे हे जेव्हा साधते, तेव्हाच त्या पदार्थांच्या शिजवण्याबद्दल कौतुक होते. एखादा पदार्थ कच्चा राहतो, तसाच जेव्हा जास्त शिजतो, तेव्हाही त्याची चव गेलेली असते. यामुळे शिजण्यातील नेमकेपणा हाही महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी प्रत्येक पदार्थाची अंगभूत चव व ती स्पष्ट होईपर्यंतच शिजवणे अपेक्षित असते. यासाठी मदत म्हणून प्रत्येक देशात काही पदार्थांची मदतही घेतली जाते. चिनी पद्धतीत अजिनोमोटो, इटालियन पद्धतीत मिरे, भारतीय पद्धतीत आले व हळद, युरोपमध्ये कच्च्या पपईचे तुकडे, अरबी देशांत लवंग यांचा अगदी अल्प प्रमाणात वापर करण्याची पद्धत आहे. पदार्थ शिजताना त्याचे तापमान शंभर डिग्री सेंटिग्रेडच्या वर जात नाही. मंद शिजवल्यावर खुपशी जीवनसत्त्वेही राखली जातात. आपण म्हणतोच ना, शितावरून भाताची परीक्षा होते म्हणून ? अगदी तसेच आहे. पदार्थ चांगला शिजल्यास त्याचे प्रत्येक शीतनशीत छान शिजलेले असते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••छंदिस्त हें मन माझें पंढरिनाथा । न सोडीं सर्वथा पाय तुझे ॥१॥ यासि काय करूं सांगा जी विठ्ठला । स्नेह कां लाविला पूर्वीहूनि ॥२॥ कांसवीचीं पिलीं सोडोनि निराळीं । दृष्टि पान्हाइलिं अमृतमय ॥३॥ तैस मी जवळुनि असेन पैं दुरी । दृष्टि मजवरी असों द्यांवी ॥४॥ तान्हें वछ घरीं धेनु चरे वनीं । हंबरे क्षनक्षनां परतोनि ॥५॥ नामा म्हणे देवा सलगी करीं निकट । झणें मज विकुंठ्ह पद देसी ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी चांगले सांगताना एकाकी कोणी नावं ठेवत नाही. पण,तेथेच दुसऱ्यांच्या विषयी नको ते, सांगताना मात्र ऐकणारे कान लावून ऐकत असतात.जी व्यक्ती, दुसऱ्या व्यक्तीविषयी एवढे काही सांगू शकते तर स्वतः किती चांगली असेल यावर ऐकणारे विचार करत असतात.त्यावेळी ती व्यक्ती मनातून उतरुन जाते पण, सांगणाऱ्या व्यक्तीच्या मात्र लक्षात येत नाही. एका अर्थाने माणसात असलेली ही सर्वात मोठी वाईट सवय असते. या सवयीमुळे अनेकांचे जीवन उद्धस्त होते म्हणून याप्रकारची सवय लावून स्वतःचेही नुकसान करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••• *मनःशांतीचे रहस्य*एका गावात एक महात्मा राहत होते. ते अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचे म्हणून ओळखले जात. त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच राग येत नसे. कुणी त्यांच्याशी कधी उद्धटपणे बोलला किंवा गैर वागला तरी त्यांच्या कपाळावर कधीच आठी उमटत नसे. ते सदैव हसतमुख व आनंदी राहत असत. ज्या लोकांना त्यांचे हे वागणे आवडत नसे ते लोक त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असत. परंतु महात्म्याच्या तोंडून कधीही एखादा वेडावाकडा उदगार देखील बाहेर पडत नसे कि चेह-यावरही कधी त्रासिक भाव उमटत असे. अनेक लोकांनी जंग जंग पछाडले तरी महात्म्याला राग काही आलेला कुणीच पाहिला नव्हता शेवटी त्यांच्या या संयमशीलतेचे रहस्य काय असावे हे विचारण्यासाठी काही लोक महात्म्याकडे गेले. त्यांच्यातील एकाने विचारले, "महाराज, तुम्ही कधीच रागवत नाही, चिडत नाही, शांत कसे काय राहू शकता. तुमच्यात इतकी सहनशक्ती कोठून आली आहे." महात्म्यांनी उत्तर दिले, "मित्रांनो, ज्यांचे उद्दिष्ट अत्यंत उच्च पातळीवर जायचे असते त्यांना खालच्या पातळीवर जायची कधीच गरज पडत नाही. मी खालच्या पातळीवर कधीच उतरायला तयार नसतो. मला असे वाटते की, माझ्याबद्दल लोकांना काय वाटायचे ते वाटू दे पण आपले मन विरोधी विचारांनी कलुषित करून घ्यायचे नाही. मी जेव्हा जमिनीकडे नजर टाकतो तेव्हा क्षमाशीलतेचे मोठे प्रतिक दिसून येते. लोकांनी किती त्रास दिला जमिन क्षमा करते. आपल्या गरजा किती मर्यादित आहेत हे भान जर प्रत्येकाने ठेवले तर प्रत्येकजण माझ्याइतका शांत होऊ शकतो. ज्यांच्या मनात करूणा आणि सगळ्यांना सारखे लेखण्याची भावना असते तो निर्विकार वृत्तीनेच राहतो."•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15Sg3PNj9X/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌏 *_भूगोल दिन_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील १४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••*२०००:ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.**१९९८:दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान जाहीर.**१९९४:मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.**१९४८:’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.**१९३४:विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर स्थापना दिवस**१९२३:विदर्भ साहित्य संघाची स्थापना कवीभूषण अण्णासाहेब खापर्डे यांनी केली**१७६१:मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: प्रफुल्ल राजेंद्र शेजव -- लेखक**१९८३: सुरेश किसनराव भिवगडे -- कवी**१९७९: प्रा. डॉ .पृथ्वीराज भास्करराव तौर -- कवी, अनुवादक, समीक्षक, संपादक, कथाकार, भाषांतरकार आणि संशोधक**१९७७: कुमार राम नारायण कार्तिकेयन-- भारतीय रेसिंग ड्रायव्हर**१९७१: महेंद्र दाजीसाहेब देशमुख -- कवी**१९६६: श्रीनिवास वारुंजीकर -- कवी, पत्रकार,अनुवादक**१९६६: पुष्पराज गावंडे -- प्रसिद्ध कवी, कादंबरीकार* *१९६५:सीमा बिस्वास -- भारतीय अभिनेत्री* *१९६१: निर्मला रामदास पाटील -- कवयित्री* *१९५७: डॉ. शैलेजा शंकर कोरडे -- लेखिका, कवयित्री* *१९५३: प्रा.डॉ.प्रदीप विटाळकर -- लेखक**१९४२: योगेश कुमार सभरवाल -- भारताचे ३६ वे सरन्यायाधीश (मृत्यू: ३ जुलै २०१५ )**१९३९: प्रा. सुरेश श्रीकृष्ण पांढरीपांडे -- लेखक**१९३८: रघुवीरसिंग यादवसिंग राजपूत -- प्रसिद्ध लेखक* *१९३८: राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी -- कथाकार, कादंबरीकार, नाटककार**१९३५: श्रीकांत शंकरराव सदावर्ते -- कवी, लेखक* *१९३२: डॉ. विठ्ठल बाबू तथा वि.बा. प्रभुदेसाई -- साहित्य संशोधक, मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख (मृत्यू: ३ मे २०१८ )**१९३२: प्रभा पार्डीकर -- प्रसिद्ध साहित्यिक* *१९३१:सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू:२५ ऑगस्ट २००८)**१९३१: प्राचार्य डॉ. नारायण यशवंत डोळे -- उत्तम लेखक, प्रभावी वक्ते (मृत्यू: ३० ऑक्टोबर २००१ )**१९३०: पंढरीनाथ केशवराव कांबळे -- लेखक**१९२८: अॅड. माधव गणेश सराफ -- लेखक**१९२६: विठ्ठल शंकर पारगावकर -- प्रसिद्ध लेखक**१९२६; महाश्वेता देवी – प्रसिध्द बंगाली लेखिका (मृत्यू: २८ जुलै २०१६ )**१९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००९ )**१९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२ )**१९१२:द्वारकानाथ भगवंत कर्णिक -- महाराष्ट्र टाइम्सचे पहिले संपादक व लेखक (मृत्यू: १४ ऑक्टोबर २००५ )**१९०५: डॉ. ग. शि. पाटणकर -- लेखक* *१९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री.’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.(मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१ )**१८९६: सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी.देशमुख-- ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२ )**१८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा.दिनकर बळवंत तथा दि.ब.देवधर –भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३ )**१८८३: कृष्णाजी केशव कोल्हटकर -- ग्रंथकार, योग व वेदान्त अभ्यासक (मृत्यु: २६ एप्रिल १९७५ )**१८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७० )**१८८२: रघुनाथ धोंडो तथा र.धों.कर्वे –महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठपुत्र (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९५३ )*🌏 *मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: शिवाजीराव बापूसाहेब देशमुख -- महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सभापती (जन्म: १ सप्टेंबर १९३५ )**२००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते* *१९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७ )**१९८६: मालती माधव दांडेकर -- कथाकार, कादंबरीकार (जन्म: १३ एप्रिल १९१५ )**१९४६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर-- लेखक (जन्म: २ जानेवारी १८८६ )* *१७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३० )**१७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२ )**१७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ,भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत*तिळगुळ घ्या - गोड गोड बोला*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह शिंदे, पवारांची हजेरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, विभागाच्या वतीने 100 दिवसांचा आराखडा सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात विजेची विक्रमी मागणी, शनिवारी 25,808 मेगावॅट वीज पुरवठा; कृषीपंपांमुळे मागणीत वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रयागराज - जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा कुंभमेळ्याला प्रारंभ, देश-विदेशातून भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बीडमधील केजच्या कन्येकडं भारताच्या खो-खो संघाची धुरा, वर्ल्ड कपमध्ये प्रियंका इंगळेकडं नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 स्वप्नील पाटील👤 दीपक उशलवार👤 शिवहार चपळे👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कदम👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवन कुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे👤 मोनाली सोमवंशी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संत तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फुलाच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलाचे सौंदर्य कधीच आस्वादता येत नाही. -- रवींद्रनाथ टागोर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील प्रथम मुस्लीम महिला शिक्षिका कोण ?२) लोणार सरोवराची उत्पत्ती कशामुळे झाली असे मानले जाते ?३) बॉर्डर - गावस्कर कसोटी मालिकेत 'मालिकावीर' पुरस्कार कोणी जिंकला ?४) 'शेज' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत ? *उत्तरे :-* १) फातिमा शेख २) उल्कापात ३) जसप्रीत बुमराह, भारत ४) बिछाना, अंथरूण, शय्या ५) राम शिंदे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सिद्धेश्वर यात्रा म्हणजेच " गड्डा " यात्रा*सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंधीध्व्ज उभारले जातात.चार दिवस चालणार्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आद्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पाढरे वस्र्त परीधन केलेले असतात,यास बाराबंदी असे म्हटले जाते.१२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिगाना तेलाभिशेक केला जातो.१३ जानेवारीला अक्षता सोहळा पार पडला जातो आणि नंतर पुन्हा ६८ लीगाना प्रदक्षिणा घातले जाते.१४ जानेवारी रोजी रात्री होम मैदानवरील होमकट्टा येते होमविधी सोहळा सपन्न केला जातो.१५ जानेवारी रोजी किंक्रांत असून या दिवशी रात्री शोभेच्या दारूकामाची आतषबाजी होते.१६ जानेवारी रोजी रात्री मालीकार्जुन मंदिरात निदीध्वजाच्या वस्त्रावीसर्जनाने (कप्पडकाळी) यात्रेतील धार्मिक कार्यक्रमाची सांगता होते.सिध्दरामेश्वर हे १२व्या शतकातले एक युग पुरुष होते.एके दिवशी कुंभार कन्येने सिध्दरामेश्वर यांना तिचा मानस सांगीतला कि ती सिध्दरामेश्वर याबरोबर विवाह करू इच्छिते,सिद्धरामेश्वर यांनी तिला सागितले कि मी ब्रम्हचारी आहे , माझे विवाह महादेवाशी झाले आहे.तरीही ती कुंभार कन्या ऐकली नाही ,त्यावर सिद्धरामेश्वर तिला बोले की तू या माझ्या योगदांडा सोबत विवाह कर पण तुला विवाहाच्या दुसऱ्या दिवशी तुझा देह त्याग करावा लागेल.१३ जानेवारीला विवाह झाला आणि १४ जानेवारीला कुंभार कन्याने तिचा देह त्याग केला.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥ तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥ वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥ नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणावरही का असेना विश्वास करताना थोडा विचार करावा म्हणतात. पण, एकदा अवश्य विश्वास करून बघावा. बरेचदा असं होतं की, एकाद्या व्यक्तीवर अविश्वास केल्याने नुकसान आपलेच होते कारण काही चांगल्या गोष्टी किंवा मदत प्रत्येकांकडूनच मिळतात असेही नाही म्हणून विश्वास करताना थोडे माणसं वाचूनही विश्वास करावा. बरेचदा त्यातून अनुभव ही येत असतो सोबतच शिकायला सुद्धा मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जीवनाचे सार*एक विलासी बादशहा होता. तो सर्व प्रकारची व्यसने करीत असे आणि आपल्याबरोबरच तो प्रधानालाही म्हणायचा," मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे आता जो जन्म मिळाला आहे त्याचा उपयोग करा आणि सर्व प्रकारचे उपभोग करून घ्या." प्रधान हा सन्मार्गी माणूस होता. त्याला बादशहाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचे दुःख व्हायचे पण वारंवार समजावूनही बादशहाचे वागणे काही बदलत नव्हते. बादशहा आपल्या मौजमजेच्या इतका आहारी गेला होता की त्याला आपल्या प्रजेची आठवण नसायची. प्रजेमध्ये बादशहाबाबत असंतोष होता मात्र बादशहा फारच कठोर व निर्दयी असल्याने कोणीही काही करू शकत नव्हते. एकेदिवशी प्रधानाने केलेल्या काही कामामुळे बादशहा फारच खुश झाला. त्याने दरबारामध्ये प्रधानाचा सत्कार केला व त्याला एक अत्यंत भरजरी व मौल्यवान अशी शाल भेट म्हणून दिली. पण प्रधानाने दरबाराच्या बाहेर येताच त्या भरजरी शालीला आपले नाक पुसले ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकाने राजाला जाऊन सांगितली. बादशहाला राग आला, त्याने प्रधानाला बोलावून एवढ्या मौल्यवान वस्तूचा अनादर करण्याचे कारण विचारले असता प्रधान म्हणाला," बादशहा, मी तेच करत आहे जे तुम्ही मला शिकवत आला आहात." बादशहा विचारात पडला की आपण असे काय शिकवले. प्रधान परत बोलू लागला, "महाराज, देवाने आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असे शरीर दिले आहे पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसने, भोग यामुळे या शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करत आला आहात. तो जेव्हा आपणाकडे पाहत असेल तेव्हा परमेश्वराला किती वाईट वाटत असेल की इतक्या मौल्यवान शरीराला आपण कशाप्रकारे वापरून त्याची घाण करत आहात. परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गाने वापरत आहात." प्रधानाचे हे बोलणे ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्याने प्रधानाची क्षमा मागितली व पुन्हा कधीही त्याने गैरवर्तन केले नाही.तात्पर्य – ईश्वराने दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मागनि वापर केला पाहिजे. मानवाला बुद्धी, विवेक आणि ज्ञान याचे वरदान ईश्वराकडून मिळाले आहे. त्याचा योग्य उपयोग करून तो आपले जीवन सार्थकी लावू शकतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/188MvYzWzb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील १३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••• *२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९९६: 'पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.**१९८१: मुंबईतील चुनाभट्टी येथील 'भारतीय कला मनरम" या संस्थेच्या भव्य वास्तूचे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले**१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री.चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.**१९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्घाटन झाले.**१९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी**१८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: वैभव भिवरकर -- प्रतिभावंत कवी, लेखक, वक्ते**१९८७: डॉ. कुणाल मुरलीधर पवार -- कवी* *१९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार**१९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू**१९७८: प्रा. कीरण नामदेवराव पेठे -- कवयित्री**१९७६: जीवन तळेगावकर -- कवी, लेखक**१९७१: संतोष दत्तात्रय जगताप -- कवी, लेखक**१९७०: स्वाती प्रभाकरराव कान्हेगावकर-- लेखिका* *१९७०: सत्यवान सीताराम देवलाटकर -- लेखक**१९६९: चंद्रशेखर बावनकुळे -- महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष* *१९६७: डॉ. गीतांजली शर्मा (कसमळकर)-- कवयित्री तथा नेत्रतज्ज्ञ* *१९६३: मोरेश्वर रामजी मेश्राम -- कवी* *१९५५: सरिता रमेश आवाड -- लेखिका**१९४९: राकेश शर्मा – अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय, आणि जगाचे १३८ वे अंतराळवीर**१९४८: आत्माराम कनिराम राठोड (तांडाकार) -- प्रसिद्ध लेखक, कवी (मृत्यू: २३ मे २००५ )**१९४७: प्रा. वसंत मारुतीराव जाधव -- कवी, संपादक* *१९४२: जावेद सिद्दीकी -- भारतातील हिंदी आणि उर्दू पटकथा लेखक,संवाद लेखक आणि नाटककार* *१९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार(मृत्यू: १० मे २०२२ )**१९३२: सुलभा ब्रह्मे -- प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, मार्क्सवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या ( मृत्यू: १ डिसेंबर २०१६ )**१९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९ )**१९२६:दिनकर बाळू पाटील -- भारतीय वकील, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते(मृत्यू: २४ जून २०१३ )**१९१९: एम. चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, माजी राज्यपाल(मृत्यू: २ डिसेंबर १९९६ )**१९१८: प्रा. अच्युत केशवराव भागवत -- लेखक संपादक, अनुवादक* *१९१५: प्रा. दत्तात्रय सखाराम दरेकर -- लेखक, चरित्रकार* *१९०८: रावसाहेब म्हाळसाकांत वाघमारे -- कवी, लेखक (मृत्यू: ७ मार्च१९८९ )**१८९६: मनोरमा श्रीधर रानडे -- मराठी कवयित्री,रविकिरण मंडळाच्या सदस्या (मृत्यू: १९२६ )**१८९१: गोपाळ रामचंद्र परांजपे -- विज्ञान लेखक व संपादक ( मृत्यू: ६ मार्च १९८१ )* ☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: प्रभा अत्रे -- किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका व लेखिका (जन्म: १३ सप्टेंबर १९३२ )**२०१४: अंजली देवी -- भारतीय अभिनेत्री,चित्रपट निर्माती (जन्म: २४ ऑगस्ट १९२७ )**२०१४: पंडित पुरुषोत्तम वालावलकर -- हार्मोनियम वादक (जन्म:११ जून २०२३)**२०११: प्रभाकर विष्णू पणशीकर –मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते (जन्म: १४ मार्च १९३१ )**२००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक.कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे 'शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत.* *१९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक* *१९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२ )**१९८९: श्रीकृष्ण जनार्दन जोशी -- लेखक (जन्म: १ ऑगस्ट १९१५ )**१९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: १९१५ )**१९७६:अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: १८९२)**१९६७: हरी दामोदर वेलणकर -- संस्कृत पंडित व ग्रंथकार (जन्म: १८ऑक्टोबर १८९३ )**१८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बंधुभावाचा संदेश देणारा सण - मकरसंक्रांत*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सार्वत्रिक निवडणुकात महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथे आजपासून महाकुंभमेळा प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरणला मिळाला मोठा सन्मान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत 100 हून अधिक कामगारांना विषबाधा, प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात उपचार सुरू, अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावतीतील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोलकास येथील तीन हत्तीणी 15 दिवसांच्या विशेष रजेवर, या काळात पर्यटकांसाठी हत्ती सफारी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी क्रिकेटपटू देवजित सैकिया यांची BCCI च्या सचिवपदी निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी-20 मालिकेला 22 जानेवारीपासून होणार सुरू, म. शम्मीचे पुनरागमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 व्यंकटेश भांगे, शिक्षक, देगलूर👤 माधव सोनटक्के, शिक्षक, धर्माबाद👤 बालाजी देशमाने👤 विजयकुमार चिकलोड👤 सौदागर जाधव👤 जितेंद्र कुमार👤 संतोष माधवराव पाटील कदम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आनंद - वि.ल.बर्वे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव अशी गोष्ट आहे की , जी माणसाला पशु बनवते , विकृत करते. ---- जाॕन वेबस्टर*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेतील प्रख्यात 'ट्रॅक अँड फील्ड न्यूज' ने *२०२४ मधील जगातील सर्वोत्कृष्ट भालाफेकपटू* म्हणून कोणाची निवड केली ?२) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?३) राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?४) देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?५) महानगरपालिकेचा प्रथम नागरिक कोण असतो ? *उत्तरे :-* १) नीरज चोप्रा, भारत २) सरपंच ३) राज्यपाल ४) राष्ट्रपती ५) महापौर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚆 *संदेशवहन व्यवस्था आगगाडीची* 🚆 जगातील आगगाड्या विविध वेगाने धावतात. काही ठिकाणी ती पाचशे किलोमीटर ताशी वेग घेते. काही ठिकाणी दर मिनिटाला एक अशी एकामागे एक आगगाडी सुटत असते. कोणतीही आगगाडी पूर्ण वेगात धावत असताना थांबण्यासाठी किमान एक किलोमीटरचे अंतर घेते; तर थोडाही वेग घेतला असला तरीही तिचे ब्रेक कार्यान्वित होऊन ती थांबायला किमान वीस फूट अंतर जावेच लागते.अनेक ठिकाणी आगगाडीच्या रुळांची एकच जोडी उलटसुलट वापरासाठी वापरली जाते. यालाच सिंगल ट्रॅक म्हणतात. काही ठिकाणी फोर वा सिक्स ट्रॅक्स वापरात असतात. पण हे सर्व एकमेकांत बदलता येऊन, सांधे बदलून एका ट्रॅकवरची गाडी दुसरीकडे जाऊ शकते. या ट्रॅकवर एकाच वेळी उलटसुलट, कमी जास्त वेगाने रूळ बदलत गाड्या धावताना पाहून मन थक्क होते. हे सारे शक्य झाले आहे, ते सतत बदलत गेलेल्या अत्याधुनिक संदेशवहन व्यवस्थेमुळेच.रेल्वे सिग्नलिंग हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. पण हा विषय एका पद्धतीने हाताळून सुटसुटीत केला जातो. संपूर्ण रेल्वेमार्गाचे अनेक सेक्शन पाडले जातात. प्रत्येक सेक्शनवर एका वेळी फक्त एकच रेल्वेगाडी धावेल हा मूलभूत नियम पाळला जातो. समजा एखाद्या वेळी एका सेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक गाड्या रुळावर असल्या तर एकच गाडी पळत राहते. अन्य फक्त उभ्या केल्या जातात व त्याही साइडिंगला असलेल्या रुळांवर.अर्थात हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. पण एकदा मूळ तत्त्व ठरले की ते काटेकोरपणे अंमलात आणले जाते. पूर्वी यासाठी मदत घेतली जायची ती खालीवर होणाऱ्या दांडीच्या सिग्नलची. रात्रीच्या वेळी लाल व हिरवे दिवे असत. आता बव्हंशी त्यांची जागा घेतली आहे ती दिव्यांनीच. दिवे मात्र आता फक्त दोनच प्रकारचे नसून अनेक प्रकारचे असतात. वेगाने जा, हळू वेगाने जा, मंद गतीने सरकत जा, पूर्णपणे जागीच थांबा, असे संदेश आता या दिव्यांतर्फे दिले जातात.समजा एखाद्या आगगाडीच्या ड्रायव्हरने हे संदेश पाळलेच नाहीत, तो ते बघायलाच विसरला, त्याला कळले नाही, तर त्याची आगगाडी तशीच पुढे जाते. पण या वेळी पुढच्या सिग्नलपाशी त्याची गाडी अडवण्याची व्यवस्था केली जाते. मार्गावर जर वीजपुरवठ्यावर इंजिन चालू असेल, तर तेही बंद करण्याची व्यवस्था केली जाते. आपोआपच तो मार्ग बंद होतो. अत्यंत गर्दीच्या सर्व मार्गांवर ही व्यवस्था केली गेली आहे.संदेशव्यवस्था कशी चालू आहे, कुठे कोणती आगगाडी किती वेगाने पळते आहे हे सतत दाखवण्याची व्यवस्था केंद्रीय नियंत्रण स्थानकात सतत कार्यरत असते. उदाहरणार्थ, मुंबई ते सोलापूर या मार्गावरील सर्व गाडय़ा मुंबईतील नियंत्रण केंद्रातील अधिकाऱयाच्या नजरेखाली असतात. त्यामुळे तातडीचे काही बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली तर तो तेथूनच सूचना पुरवू शकतो.इतके सर्व असूनही कधीतरी अपघात घडतात. ते भीषणच असतात. याला कारण यंत्रात अचानक उद्भवणारे दोष व धडधडीत मानवी चुका. दोन्ही एकत्रितपणे जर घडून आले तर अपघाताचे स्वरूप वाईट असते. यंत्रात अचानक उद्भवणारे दोष वा यंत्रणेचे अपयश (systems failures) यावर आता मात करण्यात शास्त्रज्ञांना खूपसे यश मिळालेले आहे. मानवी चुकांवर मात्र पूर्ण नियंत्रण मिळालेले नाही.स्वयंचलित 'ड्रायव्हरलेस' ट्रेनही काही ठिकाणी परदेशात वापरण्यास सुरुवात झाली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून दिल्या जाणाऱ्या संदेशांवर ती 'ड्रायव्हरलेस' ट्रेन काम करते.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••घालूनि आसन साधिला पवन । घेतलें जीवन अंतरिक्षीं ॥१॥ पराहस्तें तृप्ति नव्हे जी दातारा । कृपा करुणा करुणा करा केशिराजा ॥२॥ जीवाचें जीवन तूं सर्वांचें कारण । धांव मजालागुन केशिराजा ॥३॥ अनाथाचा नाथ हेंज ब्रीद साचार । झणें माझा अव्हेर करिसी देवा ॥४॥ विष्णुदास नामा अंकियेला तुझा । विनवी केशिराजा प्रेमसुखें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते.त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान,आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एक हाताची टाळी*वनातील आश्रमात एक संत राहत होता. त्यांच्यासोबत एक अनाथ मुलगाही राहत होता. संतांना पाहून त्या मुलालाही ध्यानसाधना शिकण्याची इच्छा झाली. तो संतांजवळ जाऊन म्हणाला, "गुरुजी मला ध्यानसाधना शिकायची आहे." संतांनी त्याला समजावले की तुझे वय हे ध्यानसाधना करायचे नाही. आता तू भक्ती शिक. पण मुलगा आपल्या जिद्दीवर अडून राहिला. त्याचा हट्ट पाहून संतांनी दोन्ही हातांनी मिळून एक जोरात टाळी वाजवली आणि मुलाला म्हणाले," हा दोन हातांच्या टाळीचा आवाज आहे. आता तू बाहेर जा आणि एका हाताच्या टाळीचा शोध घे." मुलाने विचार केला की, एका हाताची टाळी म्हणजेच ध्यानसाधना असेल तेव्हा तो आवाज अत्यंत मधूर व अद्भूत असेल. मुलगा रात्रंदिवस एका हाताच्या टाळीचा आवाज शोधू लागला. एके दिवशी मुलगा जंगलात एकेठिकाणी बसला होता, तेथे मंद हवेमध्ये झाडांची पाने हलताना एकमेकांवर घासत होती. मुलाला वाटले की पानांच्या ह्या आवाजात दिव्य प्रकारची शांती आहे. हाच एका हाताच्या टाळीचा आवाज आहे. तो मुलगा पळतच संतांकडे गेला आणि संतांना या आवाजाची माहिती दिली. संत म्हणाले," हा तर पानांचा आवाज आहे. एका टाळीचा आवाज नाही. आणखी शोध घे." मुलाचा शोध सुरुच राहिला. प्रत्येक वेळी मुलगा संतांना काहीतरी सांगायचा व प्रत्येक वेळी संत नकार देत गेले आणि मुलाला आणखी शोध घे असे सांगितले. मुलगा आता अठरा वर्षाचा झाला होता. एक दिवस तो गुरुजींकडे जाऊन बसला आणि डोळे बंद करून गहि-या मौनामध्ये डुंबला. जणूकाही त्याची समाधीच लागली होती. गुरुजी काहीच बोलले नाहीत. गुरुजींनी मंदस्मित केले आणि शांत राहिले कारण त्यांच्या शिष्याला आता कुठे एका हाताच्या टाळीचा आवाज ऐकू येऊ लागला होता.तात्पर्य – ध्यान मनाच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे आणि मनाची एकाग्रता, योग्य गुरुचे मार्गदर्शन यामुळे आपण आतूनबाहेरून पूर्णपणे बदलून जातो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18YUKZZAa9/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील ११ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**२०००: छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना**१९९९: ’कमाल जमीनधारणा कायदा’ रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी**१९९६: नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला**१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.**१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.**१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.**१९४२: दुसरे महायुद्ध - जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले**१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.**१७८७: विल्यम हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला.*🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: डॉ. मयूर बंडू लहाणे -- लेखक* *१९७९: डॉ. रेणुका शरद बोकारे -- लेखिका, संपादिका* *१९७५: दत्तप्रसाद द्वारकादास झंवर -- कवी, लेखक**१९७४: प्रा. डॉ. संभाजी व्यंकटराव पाटील-- लेखक* *१९७३: राहुल द्रविड- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक,उत्कृष्ट फलंदाज**१९६७: प्रा.नरेश हरिश्चंद्र खोडे -- लेखक**१९६७: मधुकर गणपतराव कोटनाके -- कवी**१९६६: लक्ष्मण शंकर हेंबाडे -- कवी* *१९६५: धनंजय लक्ष्मीकांतराव चिंचोलीकर-- स्तंभलेखक, कथा,कादंबरी, नाटक या वाड:मय प्रकारात लेखन* *१९६१: राधिका मिलिंद राजंदेकर -- कवयित्री* *१९५५: आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका**१९५४: चद्रकांत भोंजाळ -- प्रसिद्ध मराठी लेखक आणि ज्येष्ठअनुवादक**१९५०: अरुण गुलाबराव डावखरे -- लेखक, अनुवादक* *१९४४: शिबू सोरेन – झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री**१९४४: सुभाष विनायक पारखी -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९४२: प्रा. डॉ. यशवंत देशपांडे -- विज्ञान कथा लेखक**१९३६: डॉ. नरसिंह महादेव जोशी -- प्रसिद्ध मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक**१९२८: पं. अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर -- बासरीवादक, लेखक (मृत्यू: ३० मे २०१० )**१९२५: श्री. के. केळकर -- लेखक (मृत्यू: १० जानेवारी १९९६ )**१९२४: नासिर खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: ३ मे १९७४ )**१८९८: विष्णू सखाराम खांडेकर -- सुप्रसिद्ध मराठी कादंबरीकार, ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित (ययाति १९७४ )(मृत्यू: २ सप्टेंबर, १९७६ )**१८५९: लॉर्ड कर्झन – ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय (मृत्यू: २० मार्च १९२५ )**१८५८: श्रीधर पाठक – हिन्दी कवी,लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिन्दी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६ )**१८१५: जॉन ए.मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: ६ जून १८९१ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: पंडित भालचंद्र दामोदर देव -- ज्येष्ठ व्हायोलीन वादक (जन्म: १९३६)**२०२१: डाॅ. जुल्फी शेख -- संत साहित्याच्या अभ्यासिका,संवेदनशील कवयित्री डी.लिट.पदवीने संन्मानीत (नागपूर विद्यापीठ)(जन्म: ७ मे १९५४ )**२००८: य. दि. फडके – लेखक व इतिहास संशोधक (जन्म: ३ जानेवारी १९३१ )**२००८: सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक (जन्म: २० जुलै १९१९ )**१९९७: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (जन्म: २१ फेब्रुवारी १९११ )**१९६६: स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.(जन्म: २ ऑक्टोबर१९०४ )**१९६४: शांताराम गोपाळ गुप्ते -- कादंबरीकार, नाटककार (जन्म: १९०७ )**१९५४: सर जॉन सायमन – स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या 'सायमन कमिशन’ या आयोगाचे अध्यक्ष.जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३ )**१९२८: थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी (जन्म: २ जून १८४० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••12 जानेवारी - या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्ताने*राजमाता जिजाऊ भोसले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी खास सोय, पुणे-दिल्ली दरम्यान विशेष रेल्वे; 20 डब्यांसह स्लीपर क्लास आणि पँट्री कोच उपलब्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने वस्त्रोद्योग विषयक अभ्यासक्रम - उपक्रम सुरू करावेत - राज्यपाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व साहित्य संमेलन 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार, बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनतेशी थेट संवाद, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष बैठक; शेती महामंडळाच्या जमिनींसाठी जिओ टॅगिंगचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी कर्मचारी भरतीचे 15 वर्षांचे ऑडिट करावे, हिंदू महासंघाची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अपघात रोखणे आपल्या हातात:सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’ - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शेख निजाम गावंडगावकर👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 शुभम पाटील कदम👤 गणेश हिवराळे पाटील👤 हणमंत पांडे👤 राहुल ढगे👤 साई यादव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अमरशेख - मेहबूब पठाण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्यच निर्भयपणे राहू शकतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील कोणत्या ठिकाणी पहिला काचेचा पुल उभारण्यात आला आहे ?२) जिल्हा नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?३) सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते ?४) 'शत्रू' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुले यांनी वयाच्या कितव्या वर्षी विवाह केला ? *उत्तरे :-* १) कन्याकुमारी २) पालकमंत्री ३) केरळ ४) अरी, रिपू , वैरी ५) १३ व्या*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 #उत्क्रांती म्हणजे काय ? 📙 भाग - १ (१/६)ही कहाणी सुरू होते खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ साडेचार अब्ज वर्षांपूर्वी.त्याच काळात केव्हातरी आपल्या पृथ्वीचा जन्म झाला. त्यावेळची पृथ्वी म्हणजे तप्त द्रवरूप धातू, धूळ आणि वायू यांचा गोळा होता. अनेक लक्ष वर्षे गेली आणि गोळ्याचा पृष्ठभाग हळूहळू थंड होत त्याचे रूपांतर कठीण कवचात होत गेले. हे कवच म्हणजेच खडकांनी बनलेला पृथ्वीचा पृष्ठभाग. सुरुवातीच्या काळात हा पृष्ठभाग बनत होता. आतल्या तप्त द्रवाच्या धडकांनी पुन्हा फुटत होता, पुन्हा घडत होता, जागा बदलत होता. पृथ्वीवर सापडलेल्या सर्वात पुरातन खडकाचे वय सुमारे चार अब्ज तीस लाख वर्षे आहे.पृथ्वीचा हा पृष्ठभाग बनत होता, त्याबरोबर त्या पृष्ठभागावर पाणी जमा होत होते आणि भोवती वातावरणाचा थरही बनत होता. मात्र हे वातावरण बनले होते मुख्यतः कार्बन डायऑक्साइड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन या वायुंनी. पृथ्वीभोवतीच्या वातावरणात ऑक्सिजन जवळजवळ नव्हताच. वेगवेगळ्या भौतिक व रासायनिक प्रक्रियांमधून हळूहळू अॉक्सिजनचे प्रमाण वाढत गेले. जीवसृष्टीच्या उदयाला हा बदल अत्यंत उपयुक्त ठरला. या सगळ्यांचे मिळून बनलेले हे रसायन पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेले होते आणि त्यावर सतत आदळत होते सूर्याचे अतिनील किरण. त्या रसायनात घडत होता विजांचा चमचमाट. या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांमधूनच केव्हातरी पहिल्या सजीव पेशीच्या जन्माला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा मुख्यतः प्रथिने बनवणाऱ्या अमिनो अॅसिडचा उद्भव झाला.पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या काळाचे शास्रज्ञांनी वेगवेगळे भाग पाडले आहेत.अगदी सुरुवातीचा सुमारे दोन अब्ज वर्षांचा काळ आर्चिअन इऑन (आर्चिअन कल्प) या नावाने ओळखला जातो. या काळात पृथ्वीवर सजीव पेशी जन्माला आली नव्हती.आर्चिअन कल्पानंतरचा सुमारे एक अब्ज नव्वद कोटी वर्षांचा काळ प्रोटेरोझोइक इऑन (प्रोटोरोझोइक कल्प) या नावाने ओळखला जातो.या दोन्ही कालखंडांना मिळून प्रिकेंब्रिअन इरा (प्रक्रेंब्रिअन युग) असेही नाव दिले आहे. पृथ्वीच्या आजवरच्या इतिहासापैकी जवळजवळ ८० टक्के काळ हा प्रिकेंब्रिअन युगानेच व्यापलेला आहे.क्रमश : सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातुन**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्यासोबत धोका तेव्हा होतो जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास करत असतो. ऐन त्याच वेळी जी कोणी व्यक्ती जे काही सत्य सांगत असते. त्यावेळी त्या व्यक्तीला सबूत मागितले जाते. अशा वेळी मात्र सांगणाऱ्या व्यक्तीला गप्प बसावे लागते.म्हणून आपल्या समोर जे काही दिसत असेल त्यावर डोळे झाकून विश्वास करू नये. किंवा आपले कान बंद करू नये. सत्य काय ते समजून घेतले पाहिजे.बरेचदा आपल्या एका चुकीमुळे आपली मेहनत,आपला स्वाभिमान, आपल्यात असलेली सत्यता यावर पडदा पडायला जास्त वेळ लागत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *इंद्रियांवर ताबा*एक महात्मा रस्त्यातून घरी चालले होते. वाटेत त्यांना एक लिंबू विक्रेता दिसला. लिंबे रसाळ आणि ताजी होती.महात्म्याच्या तोंडाला पाणी सुटले. लिंबे खरेदी केली पाहिजेत असे त्यांना वाटले. त्यांनी लिंबाना निरखून पाहिले, ती स्वादिष्ट आहेत काय याचीही चौकशी केली पण जिभेच्या या चोचल्याचा मनाने धिक्कार केला. लिंबू पाहून तोंडाला पाणी सुटणे हा एक प्रकारचा लोभ आहे आणि तो साधनेच्या कार्यात अडथळा निर्माण करतो. महात्मा पुढे गेले परंतु त्यांचा जिभेचा शौक हार मानत नव्हता. त्यांची जीभ लिंबांचा स्वाद घेण्यासाठी आसुसली होती. ते परत लिंबूवाल्याकडे आले. त्याच्याकडील लिंबे निरखून पाहू लागले. परत एकदा मनाने धिक्कार केला आणि हातातील लिंबू खाली टाकून महात्मा परतले. चार पावले पुढे गेल्यावर परत एकदा त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि ते परत लिंबूवाल्याकडे आले. लिंबूवाला त्यांचे हेलपाटे पाहून आश्चर्यचकित झाला. त्याला हे कळेना की हे महात्मा सारखे का हेलपाटे मारत आहेत. यांना खरेच लिंबू खरेदी करायचे आहे की नुसतेच पाहत आहेत. शेवटी न राहवून त्याने विचारले, "महाराज, तुम्हाला जर लिंबे खरेदी करायची असतील तर अवश्य करा ना पण नुसतेच हेलपाटे का मारत आहात." शेवटी महात्म्यांनी दोन लिंबे खरेदी केली आणि घरी आले. घरी येताच त्यांनी पत्नीला चाकू मागितला. लिंबांचे दोन तुकडे केले. जसा पहिला लिंबाचा तुकडा तोंडाजवळ आणला तसा मनाने टोमणा मारला, "वा रे वा महात्माजी, तू तर या जिभेचा गुलाम झाला. जीभ जशी नाचवेल तसा तू नाचायला लागला. ती जे खायला मागेल तसा तू तिला खायला द्यायला लागला. आता तुझी साधना ही विषयांकडे चालली आहे." तितक्यात त्यांची पत्नी तिथे आली व तिने पतीचा तोंडाजवळ थबकलेला हात पाहून विचारले, "अहो, लिंबाचा स्वाद घेता घेता का थांबलात." महात्म्यांनी ते कापलेले लिंबू आणि उरलेले अर्धे लिंबू दोन्हीही पत्नीच्या हातात देऊन तिला सांगितले," मी आता हे खाणार नाही कारण आता मी जीभेवर विजय मिळवला आहे. आता मला विश्वास पटला आहे की मी इंद्रियावर ताबा ठेवू शकतो."*तात्पर्य - इंद्रियांवर ताबा ठेवता येणे ही फार मोठी साधना आहे.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/01/world-hindi-day.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭕ *_विश्व हिंदी दिवस_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील १० वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••*२००८: शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांना जीवन गौरव पुरस्कार* *१९७५: हिंदी ची महती भारताबाहेर पोचविण्यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा तर्फे विश्व हिंदी संमेलन* *१९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.**१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.**१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.**१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.**१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.**१८७०: बॉम्बे,बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B.B.C.I.Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.**१८६३ :चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.**१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.**१७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.**१६६६: सुरत वरून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: सुयश टिळक -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९८२: कालिदास अंकुश शिंदे -- लेखक* *१९८१: दीप्ती श्रेयस तळपदे -- निर्माती, दिग्दर्शिका, मानसशास्त्रज्ञ**१९७५: राजेश गंगाराम जाधव -- कवी* *१९७४: प्रा. विजय काकडे -- कथाकार, लेखक, वक्ते* *१९७४: हृतिक रोशन – प्रसिद्ध सिनेकलाकार**१९७३: रेशम टिपणीस -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री**१९६९: प्रा. डॉ. विठ्ठल लक्ष्मणराव चौथाले -- लेखक* *१९६८: रमेश सूर्यभान डोंगरे -- प्रसिद्ध लेखक**१९६७: माला आनंद मेश्राम -- कवयित्री**१९६५: प्रा. डॉ. विलास विश्वनाथ तायडे -- लेखक, समीक्षक, संपादक* *१९६४: डॉ. समीरण वाळवेकर -- निवेदक, पत्रकारिता, वृत्त टेलिव्हिजन, शैक्षणिक टेलिव्हिजन, मनोरंजन टेलिव्हिजन, मालिका, चित्रपट,सहायक दिग्दर्शन, कादंबरी लेखन , निवेदन,या सर्व क्षेत्रात भरीव काम**१९५९: डॉ. सुरेखा विनोद -- कवयित्री तथा स्त्रीरोगतज्ञ**१९५६: अरुण भालचंद्र धाडीगावकर -- लेखक, संपादक,नाट्य परीक्षक, कलाकार**१९५५: नारायण सुमंत -- कवी**१९५५: डॉ. दिलीप गरुड -- प्रसिद्ध लेखक* *१९५२: सलीम घौस --भारतीय अभिनेते ( मृत्यू: २८ एप्रिल २०२२ )**१९५०: नजूबाई गावित-- आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील कार्यकर्त्या**१९४७: प्राचार्य डॉ. पंडितराव एस. पवार-- लेखक, संशोधक, संपादक* *१९४६: निरंजन घाटे -- विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक* *१९४२: डॉ. अशोक प्रभाकर कामत -- हिंदी-मराठी साहित्यिक आणि संतवाङ्मयाचे चिकित्सक अभ्यासक**१९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार**१९३७: मुरली देवरा,-- उद्योजक, समाजसेवक आणि भारतीय काँग्रेस या राजकीय पक्षाचे नेते (मृत्यू: २४ नोव्हेंबर २०१४ )**१९३५: कमलाकर नाडकर्णी -- ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक**१९१९:प्रा.श्रीपाद रघुनाथ भिडे -- लेखक* *१९०३: शामाचार्य नरसिंहाचार्य खुपेरकर (कालगावकर, अण्णाबुवा) -- समर्थ संप्रदाय, संस्कृत पंडित, संपादक (मृत्यु: ३ ऑक्टोबर १९९९ )**१९०१: डॉ. गणेश हरी खरे -- इतिहास संशोधक (मृत्यू: ५ जुन १९८५ )**१९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३ )**१८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६ )**१८९६: दिनकर गंगाधर केळकर -- कवी, संपादक, संग्रहालयकार (मृत्यु: १७ एप्रिल १९९० )**१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ )* ⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: प्रभाकर भावे-- ज्येष्ठ रंगभूषाकार**२०१४: दाजीकाका गाडगीळ ऊर्फ अनंत गणेश गाडगीळ -- पुण्यातील पी.एन. गाडगीळ अँड सन्सचे मालक**२००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक,गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४ )**१९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत* *१७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ,वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले.(जन्म: २३ मे १७०७ )**१७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: १७२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज विश्व हिंदी दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*हिंदी आमची राष्ट्रभाषा*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिनोम इंडिया उपक्रम देशाच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणार गाव, विदर्भातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज बनले हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वसमत - निपुण हिंगोली उपक्रमात उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा सत्कार, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन, शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड - 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनावाल यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - संविधान सन्मान दौड 2025 ची नावनोंदणी सुरू, 25 जानेवारी रोजी होणार स्पर्धा, 6 ते 7 हजार स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 प्रा. नामदेव राठोड👤 राजेंद्र सोनवणे, साहित्यिक, पंढरपूर👤 शुभम हिवराळे👤 आनंदराव कदम👤 अनिल यादव👤 बालाजी ईबीतवार👤 साईनाथ सोनटक्के👤 शिनू रेड्डी, धर्माबाद👤 विनोद गोरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वसंत सबनीस - रघुनाथ दामोदर सबनीस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) दिल्ली विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ?३) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?४) 'शर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'टाईम्स ऑफ इंडिया' हे कोणत्या देशातील प्रमुख वृत्तपत्र आहे ? *उत्तरे :-* १) व्ही. नारायणन, अवकाश शास्त्रज्ञ २) ७० सदस्य ३) राजीवकुमार ४) बाण, तीर, सायक ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💉 *रक्त* 💉 **************शरीरात रक्ताचे काम काय असते ? शरीरभर पसरलेल्या सर्व पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा करणे, अन्नाचा म्हणजेच ग्लुकोजच्या स्वरूपात ऊर्जेचा पुरवठा करणे व पेशींनी बाहेर टाकलेली दूषित द्रव्ये वाहून नेणे हे काम रक्त करते. रक्तपेशींची निर्मिती हाडांमधल्या पोकळ्यां (Bone Marrow) मध्ये होते. रक्ताच्या कामाचे स्वरूप कळले म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या शरीरातील रक्ताची गरज लक्षात येते. अगदी सूक्ष्म व छोट्या घडणीचे जीव सोडले, तर इतर प्रत्येकाच्या शरीरात रक्त या ना त्या स्वरूपात असतेच. मग काहींचे रक्त गरम असेल, तर काहींचे गार. हे रक्त शरीरात सतत खेळत राहण्याची व्यवस्था म्हणजेच रक्ताभिसरणसंस्था. रक्तातील घटकद्रव्ये रक्तरसात (प्लाझ्मा) तरंगत असतात. लाल पेशी, पांढऱ्या पेशी व रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) या तीन प्रकारच्या पेशींकडे वेगवेगळी कामे सोपवलेली असून या तीन्ही पेशी रक्तरसात तरंगत असतात. रक्ताचा लाल रंग हा लाल पेशींमध्ये असलेल्या हिमोग्लोबिन या द्रव्यामुळे येतो. लाल पेशींची संख्या प्रचंड असते, त्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशींचे अस्तित्व दृश्य स्वरूपात जाणवत नाही. रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये सुमारे पन्नास लाख लाल पेशी, पाच हजार पांढऱ्या पेशी तर दोन लाखांच्या आसपास रक्तबिंबिका असतात. स्त्री, पुरुष, लहान मुले, वयस्कर माणूस, आजारी व आजाराचे स्वरूप याप्रमाणे रक्तातील पेशींचे प्रमाण बदलत जाते. सुरुवातीला सांगितलेल्या कामांखेरीज रक्ताचे एक प्रमुख काम म्हणजे शरीरातील जखमा तात्काळ भरून काढणे. अंतर्गत जखम असो, बाह्य कातडी फाटुन रक्त वाहत असो वा एखाद्या आजारात एखादा अवयव निकामी होत चाललेला असो, तेथील दुरुस्तीचे काम सर्वस्वी रक्तातील रक्तबिंबिका व लाल पेशींकडे सोपवले जाते. जखमेवर धरलेली खपली म्हणजे याच दुरुस्तीची एक पायरी असते. शरीरात फुप्फुसात श्वासोच्छ्वास क्रियेत खेळवलेला प्राणवायू रक्तातील लाल पेशी शोषून घेतात. यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो. ते लालभडक असते. या प्राणवायूचा पुरवठा शरीरातील सर्व पेशींना रोहिणीद्वारे केला जातो. प्रत्येक पेशीची चयापचयाची क्रिया या प्राणवायुवरच अवलंबून असते. या क्रियेत निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड रक्तातील लाल पेशी पुन्हा शोषून घेतात. हे रक्त म्हणजेच अशुद्ध रक्त मग धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे पाठवले जाते. ही क्रिया अव्याहत ह्रदयामार्फत चालूच असते. मोठ्या माणसाच्या शरीरात एकूण पाच लिटर रक्त असते. दर मिनिटाला हे रक्त संपूर्ण शरीरात खेळवण्याचे वा फिरवण्याचे काम हृदय करत असते. या एकूण रक्तापैकी दहा टक्के रक्त आपण रक्तदान करतो, तेव्हा घेता येते. खरे म्हणजे त्यापेक्षा कमी म्हणजे तीनशे ते साडेतीनशे मिलिलिटर रक्त काढले जाते. ते रक्त शरीर लगेच भरून काढते. ही क्रिया पाच सहा दिवसांत पूर्ण होते. म्हणूनच रक्तदान अजिबात धोकादायक नाही. जगाच्या पाठीवर रक्त हा प्रकार अजून कृत्रिमरीत्या बनवता आलेला नाही. म्हणूनच जेव्हा शरीरातील वीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्त वाहून जाते वा शस्त्रकर्म किंवा अपघातात नष्ट होते; तेव्हा पुन्हा कोणाचे तरी रक्त देऊनच ते भरून काढावे लागते. रक्ताचे प्रमुख गट (A,B,AB,O) पाडलेले असून त्या गटातील रक्तच त्या माणसाला चालू शकते. रक्तातील पांढऱ्या पेशीकडे शरीराचे संरक्षण करण्याची कामगिरी सोपवलेली आहे. यालाच आपण शरीराची प्रतिकारयंत्रणा म्हणतो. रक्ताच्या कॅन्सरमध्ये शरीरातील या रक्तपेशींची निर्मिती बिघडते, आकार व संख्या यात बदल घडतात, त्यामुळे नेहमीच्या कामात अडथळा येतो. रक्त कमी झाल्यास व लाल पेशींची संख्या कमी झाल्यास अॅनिमिया वा पंडुरोग झाला आहे, असे म्हणतात.रक्ताचा सततचा पुरवठा प्रत्येक अवयवाला आवश्यक असतो. सर्वात जास्त रक्त मेंदूतील पेशींना लागते. सर्वात कमी रक्त चरबीच्या पेशींचा लागते. हृदय रक्तानेच भरलेले असते, पण त्याच्या स्नायूंनाही रक्ताचा वेगळा पुरवठा लागतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गरुडावरी हरि बैसोनियां यावें । आम्हांसि रक्षावें दीनबंधू ॥१॥ अच्युता केशवा मुकुंदा मुरारी । येई लवकरी नारायणा ॥२॥ ऐकोनियां धांवा धांवला अनंत । उभा गरुडासहित मागें पुढें ॥३॥ वैजयंती माळा किरीट कुंडलें । नामयानें केलें लिंबलोण ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उंची, उंची मध्ये सुध्दा खूप फरक असतो.जी व्यक्ती आपल्या प्रयत्नातून उंचीवर पोहोचत असते पण, त्याला जेव्हा व्यर्थ गोष्टींचा वारा लागतो तेव्हा तीच उंची हळूहळू कमी व्हायला लागते. पण, ज्याने प्रत्येक परिस्थितीचा सामना करुन आपले विचार तसेच स्वतः वरचा विश्वास आणि आपले कार्य नि:स्वार्थ भावनेने चालू ठेवते त्याची उंची भलेही प्रत्येकांना दिसत नसले तरी ती उंची शेवटपर्यंत कायम राहते. अशा उंचीवर पोहोचलेल्या व्यक्तीकडून समाजातील अनेक लोक प्रेरणा घेत असतात. म्हणून ज्यांनी त्या ठिकाणा पर्यत पोहोचविले असतील त्यांना कधीच विसरू नये. कारण उंची जरी प्राप्त झाली असेल तरी त्यात अनेकांचे सहकार्य मोलाचे योगदान असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुसंवाद*एका शहरात एक दांपत्य राहत होते. पतीचा मोठा व्यवसाय होता. गावात पतीला चांगली प्रतिष्ठा होती. कामाच्या व्यापात तो दिवसभर व्यग्र राहत असे.आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे तो पत्नीला वेळ देऊ शकत नसे यामुळे पत्नी एकाकी पडत चालली होती. एकाकीपणाने ती कायमच अस्वस्थ राहायची, आपल्या मनातील गोष्टी ती कोणाला सांगूही शकत नव्हती. पतीला काही सांगायला जावे, तर तो उद्या ऐकू, परवा ऐकू असे सांगून तिच्यासमोरून निघून जायचा. एकेदिवशी दोघांत मोठे भांडण झाले. पती चिडून म्हणाला, " तू तर माझ्या व्यवसायात मला काडीचीही मदत करत नाहीस, त्यामुळे मी माझ्या मुलाला वकीलच बनविणार आहे. तो निदान मला कोर्टाच्या कामात तरी मदत करेल." त्याचे हे बोलणे ऐकताच बायको भडकली आणि म्हणाली," तुम्हाला तर स्वतःचेच पडले आहे, माझ्याकडे लक्ष द्यायला कुठे तुम्हाला वेळ आहे. मी माझ्या मुलाला डॉक्टरच बनविणार आहे. जेणेकरून मी आजारी पडल्यावर तरी तो माझी काळजी घेईल." दोघेही आपल्या मुलाला काय बनवायचे यावरून जोरजोरात भांडू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले, भांडणाचा शेवट अगदी हातापायीपर्यत येऊन पोहोचल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले व त्यांच्यातील एका सज्जन माणसाने मध्यस्थ म्हणून तेथे प्रवेश केला व म्हणाला," अहो तुमचे दोघांचेही ठीक आहे, पण मुलाचा कोणत्या शाखेकडे कल आहे ते तरी बघा. त्याला काय व्हायचे ते त्याला ठरवू द्या ना. तुम्ही काय उगीच ठरवून त्याच्यावर तुमची मते लादत आहात." हे बोलणे ऐकताच नवराबायको एकदम गप्पच झाले. कारण त्यांना अजून मुलबाळ काहीच नव्हते आणि भविष्यात होणा-या मुलाच्या भवितव्याविषयी ते भांडत बसले होते. लोकांना ही गोष्ट कळताच त्यांनी त्या दोघांना अक्षरश वेड्यात काढले व आपला वेळ फुकट गेला म्हणून निघून गेले.तात्पर्य - व्यर्थ गोष्टींवर वाद घालून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://kathamaala.blogspot.com/2020/06/blog-post_70.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *प्रवासी भारतीय दिवस* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••• *२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.**२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.**१९९२: पहिले मराठी कामगार साहित्य संमेलन नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न**१९१५: महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन**१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा**१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५ वे राज्य बनले.* 🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८२: अनुषा दांडेकर -- भारतीय मॉडेल चित्रपट अभिनेत्री**१९७४: पंडित रामाजी लोंढे -- कवी* *१९७४: फरहान अख्तर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता, लेखक, संवाद लेखक, गायक**१९६८: नंदिनी सोनवणे -- लेखिका, संपादिका**१९६८: शोभा चित्रे -- लेखिका**१९६७: विजय बाबुराव येलमेलवार -- लेखक**१९६५: फराह खान -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखिका, चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री, नृत्यांगना आणि कोरिओग्राफर**१९६३: डॉ. लीना पांढरे -- लेखिका, अनुवादक(मृत्यू: २६ सप्टेंबर २०२१)**१९६३: सुरेश कृष्णाजी पाटोळे -- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक**१९६०: डॉ. किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू, लेखक तसेच अनेक वृत्तपत्रांतून लेखन (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१५ )**१९५८: डॉ. सायन्ना पिराजी मठमवार -- लेखक**१९५१: प्रा.अजित मधुकर दळवी -- प्रसिद्ध नाटककार**१९५१: पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य**१९४६: सुभाषकुमार अनंतराव बागी -- कवी, लेखक* *१९३८: चक्रवर्ती रामानुजम – गणितज्ज्ञ (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४ )**१९३४: महेंद्र कपूर –पार्श्वगायक (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ )**१९२७: राजाराम भालचंद्र पाटणकर -- मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मे २००४ )**१९२६: कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ )**१९२२: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११ )**१९१८: प्रभाकर वामन ऊर्ध्वरेषे -- पत्रकार, समीक्षक, मार्क्सवादी विचारवंत(मृत्यु: १० जुलै १९८९ )**१९१३: रिचर्ड निक्सन – अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ एप्रिल १९९४ )**१८७७: केशवराव रघुनाथ देशमुख -- ज्ञानेश्वरी प्रवचनकार व संतकव्याचे अनुवादक (मृत्यू: २७ एप्रिल १९४२ )**१८५४: रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर -- मराठी कवी व भाषांतरकार (मृत्यू: ४ जून १९१८ )**१८३१: फातिमा शेख -- भारतीय शिक्षणतज्ज्ञ, पहिल्या मुस्लिम शिक्षिका, समाजसुधारक,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९०० )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: उस्ताद राशिद खान -- भारतीय शास्त्रीय संगीतकार (जन्म: १ जुलै १९६८ )**२०२३: विश्वास मेहेंदळे -- मराठी लेखक, वृत्तनिवेदक, चरित्रकार आणि अभिनेते (जन्म: १० जुलै १९३९ )**२०१३: जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ (जन्म: ३ ऑक्टोबर १९१९ )**२००४: शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक (जन्म: १९११ )**२००३: कमर जलालाबादी – गीतकार व कवी (जन्म: १९१९ )**१९४५: गोविंद रामचंद्र मोघे -- कवी, ग्रंथकार (जन्म: १८६० )**१९२३: सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी(ICS)(जन्म: १ जून १८४२ )**१८४८: कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले (जन्म: १६ मार्च १७५० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - मायेची ओढ*..... पूर्ण वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पाचे उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशात कुठेही अपघात झाली तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला चंद्रावर घेऊन जाणाऱ्या रॉकेटची निर्मीती करणारे वैज्ञानिक ; डॉ. व्ही नारायणन होणार ISRO चे अध्यक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दिल्ली विधानसभेसाठी तृणमूलचा आप ला पाठींबा, अरविंद केजरीवालने मानले दीदीचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कलिंगा फाउंडेशनला वसुंधरा मित्र पुरस्कार, किंग कोब्राच्या संवर्धनासाठी गांभीर्याने प्रयत्न आवश्यक, डॉ. पी. गौरी शंकर यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना 113 धावांनी जिंकला, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी; तीक्षणाची हॅट्ट्रिक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शिवकुमार पंतुलवार👤 विष्णुकांत इंगळे👤 हमीद साब शेख👤 सुप्रिया ठाकूर👤 अजित राठोड👤 माधव नरवाडे👤 सुहास अनिल देशमुख👤 आमिर अली शेख👤 राजेश रामगिरवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबा कदम - वीरसेन आनंद कदम*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) १२०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ?२) भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या नावाने कोणत्या देशात 'ए. आर. रेहमान स्ट्रीट' असे रस्त्याचे नामकरण करण्यात आले ?३) महात्मा फुलेंनी 'तृतीय रत्न' ही नाटक कोणत्या साली लिहिली ?४) 'शक्ती' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'मित्रप्रेम' ही कादंबरी कोणी लिहिली ? *उत्तरे :-* १) पुष्पा २ - द रूल २) कॅनडा ( मरखम शहर ) ३) सन १८५५ ४) बळ, जोर, ताकद, सामर्थ्य, ऊर्जा ५) हुतात्मा अनंत कान्हेरे*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙 मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता.या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी.कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्या कोण्या तज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते.याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे.याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल.साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥ मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥ गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य नेम सर्व माझा ॥३॥ नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोणी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे असतेच असेही नाही. कारण काहीजण आपली परीक्षा घेण्यासाठी नको ते,प्रश्न सुध्दा विचारू शकतात. म्हणून काही प्रश्नांची उत्तरे देण्याआधी विचार करावा व आपले कार्य निरंतर सुरु ठेवावे. सत्कार्य हेच आपले उत्तर ठरत असते. त्यातूनच आपली ओळख सुद्धा होत असते.म्हणून नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. आपले कार्य सतत चालू ठेवावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्यंग*चेष्टा कसलीही करावी. पण, ती केवळ गंमत किंवा मस्करी म्हणूनच. एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे अथवा त्या व्यंगाचा उल्लेख करून चारचौघांत त्याचा अपमान करणे हे गैरच. ते सभ्यतेचे लक्षण नव्हे, पण एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते, याचे भान ठेवावे. आपला पांडुरंग एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता, तेवढ्यात समोरून किरण येताना दिसली. ती थोडीशी तिरळी होती. पांडुरंगचा स्वभाव मुळातच खवचट, त्यात तिरळे बघणारी किरण समोरून आलेली. पांडुरंग म्हणाला, "काय किरण ! कसं काय ठीक आहे ना? कुठं चाललीस? आणि तुला म्हणे एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. खरं का?" किरणच्या लक्षात आले की, हा आपली चेष्टा करतोय, आपणाला हिणवतोय. म्हणून ती म्हणाली, "खरं आहे हे ! आता हेच बघ ना, तुला दोन पाय आहेत ना? पण मला तुला चार पाय असल्याचं दिसत आहे !"*तात्पर्य : दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये. त्याचा उपहास करू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 जानेवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/12CDWtH6u3E/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_ पंचशील ध्वज दिवस _* 🪩 🪩 *_ या वर्षातील ८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩•••••••••••••••••••••••••••••••••*२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.**२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड**१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट,वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.**१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.**१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.**१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.**१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.**१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय.**१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.* 🪩 *_जन्मदिवस /वाढदिवस/जयंती:_* 🪩 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१: विनोद शिंदे -- लेखक**१९८०: प्रशांत दत्तात्रय कोतकर -- कवी**१९७४: प्रतिभा रामचंद्र पाटील -- कवयित्री**१९७३: बालाजी पेटेकर खतगावकर -- कवी**१९७३: गणेश सहदेव सांगोळकर - कवी* *१९७१: संध्या विलासराव बोकारे -- कवयित्री, लेखिका* *१९७१: व्यंकटेश कुलकर्णी -- कवी, गझलकार* *१९६२: चंद्रशेखर गोखले -- मराठी लेखक व कवी**१९५९: प्रा.डॉ. कुमार जानराव बोबडे -- लेखक**१९५७: प्रा. दिनकर विष्णू पाटील -- लेखक**१९५६: पंकज बेरी -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९५६: प्रा.डॉ. निलांबर प्रभाकर देवता -- प्रसिद्ध लेखक**१९५५: दिलीप दत्तात्रेय कुलकर्णी -- लेखक* *१९५३: विठ्ठल अर्जुनराव साठे -- कादंबरीकार* *१९४५: डॉ. प्रभा गणोरकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री, समीक्षक आणि संशोधिका**१९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक(मृत्यू: १४ मार्च २०१८)**१९४१: नंदा -- भारतीय सिने-अभिनेत्री (मृत्यू: २५ मार्च २०१४ )**१९३९: कुमुद कृष्ण परांजपे -- लेखिका**१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५ )**१९३५: पंढरीनाथ धोंडू सावंत -- लेखक संपादक* *१९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’(मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७ )**१९३३: सुप्रिया देवी -- बंगाली अभिनेत्री (मृत्यू: २६ जानेवारी २०१८ )**१९२९: सईद जाफरी – अभिनेता ( मृत्यू: १५ नोव्हेंबर २०१५ )**१९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४ )**१९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३ )**१९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या,लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २००० )**१८८७: कमलाबाई किबे-- कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका* *१८५१: बाळकृष्ण आत्माराम गुप्ते -- लेखक (मृत्यू: १९२५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: पंडित मोहनराव कर्वे -- हिंदुस्तानी कला संगीत मधील ज्येष्ठ गायक ( जन्म:१६ सप्टेंबर १९२५ )**१९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ ऑक्टोबर १९१६ )**१९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक,पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२ )**१९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८ )**१९७३: नारायण भिकाजी तथा 'नानासाहेब' परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक,प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह,स्वच्छ समाजदृष्टी,उक्ती व कृती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.(जन्म: २० सप्टेंबर १८९८ )**१९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ,संस्कृत पंडित.अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.(जन्म: १० डिसेंबर १८८० )**१९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९ )**१९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७ )**१८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८ )**१८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५ )**१६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••खरे बोलण्याची सवय आपणाला अनेक संकटातून वाचवू शकते. तर एक खोटं लपविण्यासाठी शंभर वेळा खोटं बोलावे लागते. *नेहमी खरे बोलावे*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीचं कार्यक्रम जाहीर, 5 फेब्रुवारीला मतदान, 8 तारखेला निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाराष्ट्रातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल २०२५ पासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रकृतीच्या कारणामुळे आसाराम बापूला अंतरिम जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राजधानी एक्स्प्रेस ठरली देशातील सर्वाधिक श्रीमंत ट्रेन !*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वाधार योजनेची ऑनलाईन अर्ज 15 जानेवारीपर्यंत भरता येणार, तांत्रिक अडचणी येत असल्याने समाज कल्याण विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC कसोटी क्रमवारीत भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण, 2016 नंतर दुसऱ्यांदा टॉप-2 मधून बाहेर; 10 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका गमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी पेटेकर खतगावकर, कवी, चित्रकार तथा कथाकार👤 मारोती गोडगे👤 आकाश गाडे, येवती👤 आसिफ शेख, धर्माबाद👤 आनंदा कुमारे👤 करण भंडारी👤 पोतन्ना मुदलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गिरीश - शंकर केशव कानेटकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणत्या तेलबियाला *'गरीब माणसाचे बदाम'* असे म्हणतात ?२) अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?३) नुकतीच झालेली ५ कसोटी सामन्यांची 'बॉर्डर - गावस्कर चषक' ऑस्ट्रेलियाने किती फरकाने जिंकली ?४) 'व्याकूळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली ? *उत्तरे :-* १) शेंगदाणे २) प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम ३) ३ - १ ने ४) दुःखी, कासावीस ५) सन १८६३*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *माणूस कोणकोणते अवयव दुसऱ्याला दान करू शकतो ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""दानाचे महात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानापेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना ? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.डोळ्यात फुल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. त्यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मुत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात. अपघातांमध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णांचे हृदय नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैयक्तिक विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. "मरावे परि कीर्तीरुपी उरावे" या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कोण होईल आत्मज्ञानी । जो बा राहे त्याच्या ध्यानीं ॥१॥ मज तो चरणांची आवडी । जन्मोजन्मीं मी न सोडी ॥२॥ होईल सिद्धीचा साधक । त्यासी देई स्वर्गसुखा ॥३॥ कोण होईल देहातीत । त्यासी करी संगरहित ॥४॥ नामा म्हणे जीवें साठीं । तुज मज जन्में पडिली गांठी ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• कोणत्याही परिस्थितीत स्वतः हसत राहणे तसेच इतरांना हसवत ठेवणे ही एक प्रकारची उत्तम कला आहे सोबतच हे महान कार्य सुध्दा आहे. पण, त्यातच स्वतः च्या आनंदात हसत राहणे व दुसऱ्यांची टिंगल, टवाळी करून त्यांना दु:खी करणे याला माणुसकी म्हणत नाही. निदान माणुसकीच्या नात्याने तरी या प्रकारचे वागणे आपल्यात नसायला पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा- यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 जानेवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Gun1NBkub/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🟣 *_ या वर्षातील सातवा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: एम.व्ही.चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.**१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.**१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.**१९३५:ज्ञकोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी’चे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.**१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.**१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.**१७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.**१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९२: तुकाराम परसराम डोके -- कवी**१९८४: राजेश्वर वसंतराव जुबरे -- लेखक अनुवादक, संपादक**१९८३: प्रा. रत्नाकर प्रभाकर चटप -- लेखक, कवी* *१९८०: श्रीकांत रामभाऊ साबळे -- प्रसिद्ध लेखक, संपादक**१९७९: बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल**१९७२: अजय बारकू दानवे -- कवी, लेखक* *१९७१: सरला भिरुड -- कवयित्री,लेखिका* *१९६८: अनिल राव -- लेखक, कवी* *१९६७: प्रा.डॉ. संगिता अरुण खुरद -- लेखिका* *१९६७: इरफान खान -- भारतीय अभिनेता (मृत्यू: २९ एप्रिल २०२० )**१९६६: डॉ. सुधीर अणासाहेब कुंभार -- लेखक* *१९६५: अभिराम भडकमकर -- प्रसिद्ध मराठी-हिंदी नाटककार, पटकथालेखक, अभिनेते आणि चित्र-नाट्य दिग्दर्शक* *१९६२: वंदना बोकील कुलकर्णी -- लेखिका, संपादिका* *१९६२: प्रा.डॉ.रजनी नकुल लुंगसे -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका, संशोधिका* *१९६१: सुप्रिया पाठक – अभिनेत्री**१९६०: श्रीनिवास गडकरी -- प्रसिद्ध कवी, लेखक, पत्रकार* *१९५७: तुकाराम ज्योतीराम पाटील (टी.जे)- कवी तथा निवृत्त उपविभागीय अभियंता**१९५७: रीना रॉय -- प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री**१९५६: डॉ. किशोर सानप -- ललित आणि वैचारिक समीक्षा क्षेत्रात लेखन करणारे मराठी साहित्यातील सिद्धहस्त लेखक (मृत्यू: २१ मे २०२३ )**१९५६: हरी मल्हारराव धारकर -- कवी* *१९५६: टी.एस.चव्हाण -- कादंबरीकार, वेदनाकार**१९५५: अरुण जाखडे -- पद्मगंधा प्रकाशनाचे ज्येष्ठ प्रकाशक, प्रसिद्ध लेखक, संपादक (मृत्यू: १६ जानेवारी २०२२ )**१९५३: रमेश कृष्णराव भोयर -- कवी**१९५२: आनंद विंगकर (शंकर नारायण ढोणे)-- प्रसिद्ध लेखक, कवी**१९५०: विलास मानेकर - सरचिटणीस विदर्भ साहित्य संघ**१९४८: शोभा डे – विदुषी व लेखिका**१९४६: कुमार केतकर -- पत्रकार, लेखक आणि व्याख्याते, अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली.( दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत )**१९४३: डॉ. गो. तु. पाटील -- प्रसिद्ध लेखक संपादक, 'ओल अंतरीची' आत्मचरित्रास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (मृत्यू: १८ ऑगस्ट २०२४ )**१९४२: श्याम प्रभाकर तारे -- प्रसिद्ध लेखक कवी अनुवादक तथा स्तंभलेखक पुण्यनगरी* *१९४२: सुधाकर माधवराव दोखणे -- लेखक**१९२३: गंगाप्रसाद बालाराम अग्रवाल-- संपादक, लेखक (मृत्यू: ११ ऑक्टोबर २०१८ )**१९२१: चंद्रकांत गोखले – अभिनेते (मृत्यू: २० जून २००८ )**१९२०: सरोजिनी बाबर – प्रसिद्ध लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी (मृत्यू: १९ एप्रिल २००८ )**१९१७: रामभाऊ विजापुरे -- हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील भारतीय हार्मोनियम वादक (मृत्यू: १९ नोव्हेंबर २०१० )**१८९४: वासुदेव विनायक जोशी -- कादंबरीकार, नाटककार, निबंधकार(मृत्य: १९ मे १९६५ )**१८९३: जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना,पद्म विभूषण पुरस्कारांनी सन्मानित. (मृत्यू: २१ मे १९७९ )**१८८५: माधव नारायण जोशी -- मराठीतील एक विनोदी नाटककार (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९४८ )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:चिंतामणी सदाशिव ऊर्फ अण्णासाहेब लाटकर -- ज्येष्ठ ग्रंथ मुद्रक आणि कल्पना मुद्रणालयाचे संस्थापक**२०००: डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले,विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ८ जानेवारी १९१९ )**१९९१: नरहरि भानुदास काळे (नरहरिप्रभू, काळे महाराज )-- दत्तसंप्रदाय, प्रवचनकार (जन्म: २२ मे १९१० )**१९८९: मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट (जन्म: २९ एप्रिल १९०१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वछता आणि आरोग्य*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणा, ओरिसा आणि जम्मू-काश्मीरमधील विविध रेल्वे पायाभूत सुविधांचे ऑनलाईन उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *HMPV ने चिंता वाढवली, कर्नाटकात सापडले भारतातले पहिले 2 रुग्ण; महाराष्ट्र सरकारनेही जारी केल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महिलांना सक्षम बनवणे ही आपल्या देशाची खरी ताकद - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात HMPV रोखण्यासाठी खबरदारी, हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली, आरोग्य विभाग अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे - आनंदाश्रम संस्थेतर्फे दुर्मिळ संस्कृत हस्तलिखितांचे प्रदर्शन, 10 ते 12 जानेवारी दरम्यान रसिकांसाठी खुला होणार खजिना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आचार्य बाळशास्त्री जांभेकर अध्यासन मुंबई विद्यापीठात सुरू करावे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महिला क्रिकेट :- आयर्लंड विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यासाठी स्मृतीकडे नेतृत्व, 10 जानेवारीपासून होणार प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, शिक्षक, देगलूर👤 संजय पवार, मा. नगरसेवक, धर्माबाद👤 आबासाहेब निर्मले, शिक्षक तथा साहित्यिक👤 धनराज बनसुडे, उपक्रमशील शिक्षक, उस्मानाबाद👤 रमेश माने👤 शिवाजी गुजेवार👤 फारुख शेख👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 परविंदर कौर महाजन, कोल्हापूर👤 धनाजी माडेवार, नायगाव👤 पद्माकर रामराव मुळे👤 रामानंद रामदिनवार, नांदेड👤 पंढरी यंगलोड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ग्रेस - माणिक शंकर गोडघाटे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तव्यकर्म अंत:करणपूर्वक , परिश्रमाने व श्रद्धेने करीत राहणे यातच जीवनाचे सार्थक आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र सम्मेलन* कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो ?३) कोणते वर्ष हे भारताचे हवामानाच्या इतिहासात १९०१ नंतरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे ?४) 'व्रण' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणता धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे ? *उत्तरे :-* १) शेवगाव, जि. अहिल्यानगर ( अहमदनगर ) २) ५ जानेवारी ३) सन २०२४ ४) खूण, क्षत ५) कॉपर ( तांबे )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *यकृत* 📙 ***************आपल्या शरीरातील फार मोठी रसायनशाळा असे यकृताबद्दल सहज म्हणता येते. यकृताच्या कामात अगदी किरकोळ अडथळा आला किंवा विकृती निर्माण झाली, तर साऱ्याच शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. श्वासपटलाच्या खाली उजव्या बाजूला बरगडीच्या आत यकृत सुरक्षित असते. यकृतदाह झाल्यास यकृताचा आकार वाढतो. तो पोटावरुन हाताला खालची कड लागून समजू शकतो. यकृतात मुख्यतः पित्ताची निर्मिती होत असते. ते पित्ताशयात साठवले जाते. अन्नपचनक्रियेत गरजेनुसार ते पाझरून आतड्यातील अन्नपदार्थात मिसळते. आहारातील स्निग्ध पदार्थांवर त्याची प्रक्रिया होऊन त्याचे दुधासारखे मिश्रण तयार होते. स्निग्ध पदार्थांच्या शोषणालाही पित्त हातभार लावते. अन्नमार्गातून शर्करा शोषून घेतल्यावर शिलकीतील साठा ग्लायकोजेन या रूपाने यकृतात साठवला जातो. जेव्हा शरीराला गरज असेल, तेव्हा ग्लायकोजेनचे पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते. याशिवाय यकृतामध्ये शरीरातील लाल पेशी तयार करणे व नष्ट करणे हाही उद्योग सतत चालू असतो. रक्त गोठवण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजेन द्रव्याची निर्मिती यकृतातच होते. जीवनसत्त्वांचा साठा येथेच केला जातो. रक्तातील विषारी द्रव्ये नष्ट करणे, प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिया व युरिक आम्लाची निर्मिती व स्निग्ध पदार्थांचा शरीरव्यापारासाठी उपयोग ही कामे येथेच घडतात. एखाद्या माणसाचे यकृत काम करेनासे झाले, आक्रसले, तर त्याला लिव्हर सिरॉसिसचा आजार आहेत झाला आहे, असे म्हणतात. हळूहळू पण निश्चितपणे मृत्यूकडे वाटचाल करणारा हा आजार ठरतो. याची लक्षणे म्हणजे उदरपोकळीत पाणी भरणे, त्याला जलोदर असे नाव आहे. यकृतारोपणाची शस्त्रक्रिया हा एकमेव इलाज यावर गेल्या दशकात उपलब्ध आहे. पण तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा व भारतातही अगदी मोजक्या रुग्णालयांत उपलब्ध आहे. रक्ताच्या विविध चाचण्यांतून, अल्ट्रासोनोग्राफीतून किंवा आवश्यक असेल तर यकृताचा छोटा तुकडा बाहेर बारीक सुईवाटे तपासायला काढून (लिव्हर बायोप्सी) यकृताच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. अतिमद्यपान, वरचेवर झालेली कावीळ, पित्ताशयात खडे साचून त्याचा झालेला परिणाम यांमुळे यकृतात गंभीर विकृती निर्माण होतात. या विकृतींचा इलाज आजही आधुनिक वैद्यकाला सापडलेला नाही, तर आयुर्वेददीय इलाजांचे प्रमाणीकरण झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कैसा पांडुरंगा करावा विचार । सांग बा विर्धार साक्षरूपा ॥१॥ काय आलें देवा कैचें थोरपण । आकारासि कोणी आणियलें ॥२॥ आणियलें आतां आपणासारिखें । गोपिकांसी रूपें दावी नाना ॥३॥ काय जीवेंभावें सकाळां संमता । सगुण अनंत म्हणे नामा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला अनेक पर्यटन स्थळे बघायला आवडतात आणि त्यातून आनंद मिळत असतो. चांगल्या व्यक्तींची भेट घ्यायला आवडते. कारण त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचे असते. पण ह्या दोघांकडून बरेच काही मिळत असले तरी जे, आपल्याला पाहिजे ते मात्र मिळत नाही. कारण आईची माया आणि बापाचा तो कणकर हात पाठीवर मिळत नसतो म्हणून जगात कितीही चांगले शोधण्याचा प्रयत्न करावा पण, घरच्या असलेल्या जिवंत देविदेवतांना क्षणभरासाठी सुद्धा विसरू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्वहरण*नदीच्या काठावर एक नारळाचे झाड होते. या झाडावर लागलेल्या नारळांना एक प्रकारचा गर्व चढला होता. तो नेहमी येणा-या जाणा-या वस्तूंना चिडवायचा पण त्याचा स्वभाव सगळेजण ओळखून होते. त्यामुळे त्यालाच कोणीच प्रत्युतर देत नसत. नदीमध्ये पडलेल्या दगडांचा तर नारळ खूप अपमान करीत असे. एकदिवशी तो नदीतल्या दगडाला म्हणाला," तुझी किती केविलवाणी परिस्थिती आहे, पहा! इथेच पडल्या पडल्या झिजून झिजून जाशील पण नदीचे पाय काही तू सोडणार नाहीस. ही नदी तुला देते तरी काय रे, अपमानालाही काही परिसीमा असते की नाही, मला पहा कशा प्रकारे उंच जागेवर आणि उच्च पदावर बसविले आहे." दगडाने त्याची बडबड ऐकून घेतली पण तो काही बोलला नाही. दोघेही आपापल्या स्थानी निघून गेले नारळ आता पूजेच्या थाळीत गेला होता. मंदिरात गेल्यावर नारळाने पाहिले की नदीतला दगड आता पूजास्थानी पोहोचला होता व शाळीग्राम म्हणून लोक त्याला पूजत होते. नारळाचा खूप संताप झाला की एका यः कश्चित दगडाच्या पूजेसाठी आपल्याला आणले गेले आहे पण तो काहीच करू शकत नव्हता. दगडाने त्याची मनस्थिती ओळखली व म्हणाला," नारळा, पहा झिजल्याचा कोणता परिणाम होतो. तेव्हा कधीच गर्व बाळगू नकोस."तात्पर्य : वेळ सारखी राहत नसते. गर्वाने वागणा-यांवरही कधी ना कधी मान खाली घालण्याची परिस्थिती येऊ शकते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 जानेवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15VnyfPhkK/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📝 *_पत्रकार दिन_* 📝••••••••••••••••••••••••••• 📝 *_ या वर्षातील सहावा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📝 *_महत्त्वाच्या घटना:_* 📝•••••••••••••••••••••••••••••••••*१९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.**१९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन**१९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता**१९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.**१९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली.त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.**१८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले**१६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.**१६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.* 📝 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*📝 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: गोविंद तुकाराम भांड-मानोलिकर -- कवी**१९८४: दिलजीत सिंह दोसांझ -- पंजाबी व हिंदी चित्रपटाचे गायक**१९८१: मुरहारी कराड -- कवी, लेखक संपादक* *१९७३: किरण दत्तात्रय दशमुखे -- लेखक, संपादक* *१९७१: श्रीकांत अनंत उमरीकर-- कवी, संपादक* *१९६९: शिवा कांबळे -- लेखक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९६६: स्वाती संदीप दाढे -- कवयित्री, अनुवादक**१९६६: सदाशिव नारायण जोशी -- प्रसिद्ध लेखक, कवी**१९६६: ए. आर. रहमान – संगीतकार**१९६४: विनोद जनार्दन शिंदे -- कवी, लेखक**१९६३: प्रशांत प्रकाशचंद्र पनवेलकर -- प्रसिद्ध कवी**१९६२: बिंदिया गोस्वामी -- भारतीय माजी अभिनेत्री* *१९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार समालोचक व प्रशिक्षक**१९५८: डॉ. प्रज्ञा प्रकाश पुसदकर -- लेखिका**१९५८: तल्लुरी रामेश्वरी(रामेश्वरी) -- भारतीय अभिनेत्री* *१९५५: रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक**१९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ,’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष**१९२८: विजय धोंडोपंत तेंडुलकर -- प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक,पटकथालेखक,तथा राजकीय विश्लेषक(मृत्यू: १९ मे २००८ )**१९२७: राम तेलंग-- कवी, लेखक**१९२६: डॉ. पद्मिनी भांडारकर -- लेखिका (मृत्यू: ४ मार्च २०१३ )* *१९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८ )**१८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१ )**१८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’,’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२ )**१८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह,१८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला.’दिग्दर्शन’हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६ )* 📝 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*📝••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१८: तुलसीदास हरिश्चंद्र बेहेरे -- लोकसाहित्याचे अभ्यासक,नाटककार, दिग्दर्शक आणि दशावतार या लोकनाट्याचे अभ्यासक आणि संशोधक.(जन्म: १५ मे १९५२ )**२०१७: ओम प्रकाश पुरी -- भारतीय अभिनेते(जन्म: १८ ऑक्टोबर १९५०)* *२०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३ )**१९८७: जयदेव(जयदेव वर्मा) -- हिंदी चित्रपटांतील संगीतकार (जन्म:३ ऑगस्ट १९१८)**१९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय,वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४ )**१९८१: ए. जे.क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६ )**१९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी.सी.सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३ )**१९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८ )**१९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५ )**१८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,१८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.(जन्म: ९ सप्टेंबर १८५० )**१८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२ )**१८५२: लुई ब्रेल–अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९ )**१८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७ )**१७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती,मुत्सद्दी*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मराठी वृत्तपत्राचे जनक -----*दर्पणकार : बाळशास्त्री जांभेकर*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात धडकणार, येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एक ही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बिजनेस जत्रेच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बालसाहित्य संमेलनाचे उद्घाटन, नवीन ज्ञान दृष्टी देणाऱ्या बालसाहित्याची गरज - ज्येष्ठ लेखिका मंगला वरखेडे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अक्कलकोट - गेल्या 15 दिवसांत 15 लाख भाविकांनी अन्नछत्रचा लाभ घेतल्याची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सिडनी कसोटी सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पॅट कमिन्सने रचला इतिहास ! WTC मध्ये 200 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. शीला पठारे👤 मोहन घोसले👤 रितेश जोंधळे👤 सुदर्शन कोंपलवार👤 अभिषेक अडकटलवार, नांदेड👤 इंजि. सुरेश दासरवार, नांदेड👤 अरुण गादगे, नांदेड👤 बजरंग माने👤 भगवान चव्हाण👤 शिवकुमार गंगुलवार👤 विजयकुमार भंडारे, शिक्षक, धर्माबाद👤 बाबुराव आगलावे👤 अंकुश आरेकर👤 शुद्धोधन कैवारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संजीवनी - संजीवनी रामचंद्र मराठे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन म्हणजे एक अनंत आव्हान , प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरोखर कसोटीच असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान कोणता ?२) क्रीडा मंत्रालयाने यंदा 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्कारासाठी किती खेळाडूंच्या नावाची घोषणा केली ?३) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे ?४) 'वेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) अर्जून पुरस्काराचे स्वरूप काय आहे ? *उत्तरे :-* १) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार २) चार - मनू भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार ३) पदक, प्रमाणपत्र व २५ लाख रु. ४) पोशाख ५) अर्जुनाची मूर्ती, प्रमाणपत्र व १५ लाख रु.*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम. 'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय. असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.‘सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥ संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥ जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥ नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या विषयी कोणी एकाकी खोटे सांगत नाही. कारण त्या विषयी त्याला चांगल्याप्रकारे अनुभव आलेला असतो. म्हणून ते, दुसऱ्यांदा चुकीचे घडू नये यासाठी सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला कोणाच्या सांगण्यावरून नको त्या शब्दात बोलून त्याचा अवमान करू नये. बरेचदा सत्य न ऐकून घेतल्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट सवयींचा त्याग*एक व्यापारी होता. तो जितका व्यवहारी, विनम्र आणि मनमिळाऊ होता तितकाच त्याचा मुलगा उद्धट आणि गर्विष्ठ होता. त्याला सुधारण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले. एकदा ही गोष्ट त्याने एका मित्राला सांगितली. मित्र म्हणाला, त्याला माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवून दे. मी तुझ्या मुलाला ठिकाणावर आणून दाखवेन. त्या व्यापा-याचा मुलगा मित्राच्या घरी राहण्यास गेला. त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला अतिशय चांगली वागणूकदिली. एकदा ते त्याला बागेत फिरावयास घेऊन गेला असता, एक फूट उंचीचे रोप त्याला उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोप सहजच उपटले, त्यानंतर त्याने मुलाला सहा फूट उंचीचे रोप उपटण्यास सांगितले, मुलाला ते उपटण्यास खूप ताकद लावावी लागली. शेवटी ते एका उंच वृक्षाजवळ आले व मित्रांनी मुलाला तो वृक्ष उपटून टाकण्यास सांगितला. मुलाने ते शक्य नसल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी मुलाला उपदेश केला तो म्हणजे असा की,' आपण एखादे वाईट कामाला सुरुवात करत असतो तेव्हा त्यापासून दूर जाणे शक्य असते पण मात्र त्या कामात जर आपण खोलवर गुंतून गेलो की आपल्याला त्यापासून सुटका करणे अशक्य असते. वाईट सवयी किंवा वाईट वर्तनाचे सुद्धा असेच आहे, जोपर्यंत सहज शक्य आहे तोपर्यंत वाईट वर्तन किंवा सवय सोडलेली चांगली असते." मुलाला त्याच्या मित्रकाकांचा उपदेश सहजपणे लक्षात आला व त्याने चांगले वागण्याचे ठरवले.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जानेवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔵 *_जागतिक ब्रेल दिवस_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_ या वर्षातील चौथा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔵 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔵•••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.**१९५९: लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.**१९५८:१९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.**१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.**१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.**१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा**१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.**१८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.**१६४१: कर भरायला नकार देणार्या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला.या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली.त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.* 🔵 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔵••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७१: प्रा. डॉ. विजय मेरसिंग जाधव -- लेखक, संपादक**१९७१: सुनील राम गोसावी -- लेखक, कवी**१९६७: जयश्री अनिल पाटील -- कवयित्री* *१९६७: श्रीमंत माने -- ज्येष्ठ पत्रकार, लोकमत नागपूरचे संपादक तथा लेखक* *१९६५: प्रा. गोविंद जाधव -- कवी**१९६४: प्रसाद कुलकर्णी - लोकप्रिय कवी, उत्तम व्याख्याते* *१९६४: मिलिंद शांताराम गांधी -- कवी, गीतकार* *१९६३: प्राचार्य डॉ. जगन्नाथ शामराव पाटील -- प्रसिद्ध लेखक**१९५९: सुनंदा सुहास भावसार -- कवयित्री, लेखिका**१९५९: मोतीराम रुपसिंग राठोड - लेखक**१९५७:गुरदास मान -- भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेता* *१९५५: प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके -- विदर्भातील प्रसिद्ध लेखक व वक्ते**१९५०: पुरुषोत्तम खेडेकर -- मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक* *१९५०: वासंती प्रभाकर मार्कन्डेयवार -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९४५: शैलजा राणे-घोरपडे -- कवयित्री, लेखिका**१९४१: कल्पनाथ राय – माजी केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ )**१९४०: श्रीकांत वसंत सिनकर -- प्रसिद्ध कथालेखक**१९३३: प्रा.मनोहर सप्रे-- प्रसिद्ध व्यंगचित्रकार, लेखक (मृत्यू: १३ डिसेंबर २०२४ )**१९३१: दिगंबर कुलकर्णी -- कथाकार कादंबरीकार* *१९३१: निरूपा रॉय -- भारतीय सिने-अभिनेत्री, पडद्यावर प्रामुख्याने नायकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या निरूपा रॉयने सुमारे ४७५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या ( मृत्यू: १३ ऑक्टोबर २००४ )**१९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१ )**१९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६ )**१९२२: भालचंद्र शंकर भणगे-- लेखक, शिक्षणतज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: २९ मार्च१९८० )**१९१४: इंदिरा संत –साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २००० )**१९०९: प्रभाकर आत्माराम पाध्ये -- संपादक, प्रसिद्ध साहित्यिक, सौंदर्यमीमांसक, समीक्षकज्ञ (मृत्यू: २२ मार्च १९८४ )**१९०५: कृष्णाजी बाबुराव मराठे -- चरित्रकार(मृत्यू: १९ नोव्हेंबर १९८७ )* *१८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७ )**१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२ )* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: सिंधूताई सपकाळ -- सामाजिक कार्यकर्त्या, अनाथाची माय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: १४ नोव्हेंबर १९४८ )**२०१७: अब्दुल हलीम जाफर खान -- भारतीय सितार वादक (जन्म: १८ फेब्रुवारी १९२७ )**१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९ )**१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८ )**१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७ )**१९१७: सखाराम कृष्ण देवधर(बापूसाहेब देवधर) -- गायत्री मंत्राचे उपासक,ज्ञानेश्वरीचे अभ्यासक**१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, संपादक (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ )**१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, 'सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ )**१७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.................... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *भुवनेश्वर येथे 7 जानेवारीपासून प्रवासी भारतीय दिवस परिषद, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 10 समारंभाला उपस्थित राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीतल्या विविध विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी व उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नर्सी नामदेव येथील विकास कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना, विकास कामांच्या दुसऱ्या टप्प्यातील आराखडा शासनाला सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सरकार्यवाहपदाची जबाबदारी स्वीकारली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मानवी अधिकाराच्या मूल्याची स्थापना फुले दाम्पत्यांनी केली, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपदान; पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दुचाकी घेताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पाचव्या कसोटी सामन्यात भारताची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी भारत सर्व बाद 185 धावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 बालाजी डिघोळे , सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्राभिम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रघुनाथ पंडित - रघुनाथ चंदावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वकर्तव्यदक्ष राहिल्याने मनुष्य नेहमी सर्वोच्च आणि पूर्णावस्थेत पोचतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता ?२) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा विजेता संघ कोणता ?३) प्रो कबड्डी लीग ( सीजन ११ ) चा उपविजेता संघ कोणता ?४) PKL सीजन ११ चा बेस्ट रेडर कोण ठरला ?५) PKL सीजन ११ चा बेस्ट डिफेंडर कोण ठरला ? *उत्तरे :-* १) कबड्डी / हुतूतू २) हरियाणा स्टीलर्स ३) पटना पायरेट्स ४) देवांक दलाल, पटना पायरेट्स ( ३०१ रेड पॉइंट ) ५) नितेश कुमार, तमील थलायवाज ( ७७ टॅकल )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *बोटं मोडताना आवाज का येतो ?*📙एखाद्यावर राग काढायचा असला, की त्याच्या नावानं बोटं मोडली जातात. त्या प्रत्येक वेळी आवाज का येत नाही हे नाही सांगता यायचं; पण बोटांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी तो मोकळा करण्यासाठी आपण बोटात ताणतो त्यावेळी मात्र हमखास कडकड असा आवाज येतो. कोणाच्या बाबतीत मोठ्यानं येतो, कोणाच्या बाबतीत ऐकू येईल न येईल असा येतो; पण येतो खरा. वास्तविक असा आवाज केवळ बोटांच्या बाबतीतच येतो असं नाही. कोणत्याही हाडांच्या सांध्याच्या बाबतीतही तो येत असतो. सांध्याच्या ठिकाणी दोन हाडं एकमेकांशी जोडलेली असतात; पण या सांध्यांची हालचाल होते तेव्हा ही हाडं निरनिराळ्या कोनांमधून फिरतात. ते सहजसाध्य व्हावं म्हणून जिथं ही हाडं जोडलेली असतात तिथे एक स्नायूंचा जाडसर थर असतो, अस्तरासारखा. तो नसला तर ती हाडं एकमेकांवर घासून त्यांची झीज होईल. शिवाय त्यांची मोडतोडही होण्याची शक्यता असते. तरीही ते थर एकमेकांवर घासतात ते घर्षणापायी उष्णता निर्माण होतेच. आपले तळवे आपण एकमेकांवर घासले तर ते गरम होतात. त्याचं कारणही हेच.या उष्णतेचा त्या थरांवर अनिष्ट परिणाम होतोच. त्यांची हालचालही मोकळी होत नाही. तशी ती व्हावी म्हणून तिथं एक प्रकारचं वंगण असतं. एक तेलासारखा पातळ स्निग्ध पदार्थ असतो. त्या वंगणात ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन यांसारखे वायू विरघळलेल्या स्थितीत असतात.बराच वेळ वापर झाला की ते सांधे थकल्यासारखे होतात. त्यांची मोकळी हालचाल होत नाही. कारण त्या हालचालीला मदत करणारे स्नायू जखडल्यासारखे होतात. त्या स्थितीत ते जरा ताणले तर सैलावतात. त्यांची परत मोकळी हालचाल होऊ शकते. पण तसे ते ताणले की त्या वंगणाच्या पिशव्याही फुगल्यासारख्या होतात. त्यांच्यामध्ये विरघळलेल्या स्थितीत असलेले वायू मोकळे होऊन त्यांचे बुडबुडे तयार होतात. ते फुटतात आणि त्यांचाच तो आवाज होतो. किती वेगानं हे बुडबुडे तयार होऊन फुटतात तसंच किती बुडबुडे तयार होतात, त्यावर किती मोठा आवाज होणार हे अवलंबून असतं. कोणत्याही सांध्याच्या वंगणाच्या बाबतीत हीच परिस्थिती असते; पण बोटांच्या सांध्यामध्ये बुडबुडे लवकर तयार होतात आणि पटकन फुटतातही. त्यामुळे त्यांचा आवाजही सहजगत्या होतो. शिवाय बोटांना तीन पेरं असतात. त्या तिन्ही पेरांची स्वतंत्र हालचाल होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक बोटाला एकूण तीन सांधे असतात. ते जवळजवळही असतात. आपण जेव्हा बोटं ताणतो तेव्हा ते सगळेच सांधे ताणले जातात. सर्व ठिकाणच्या वंगणातल्या वायुंचे बुडबुडे तयार होऊन ते फुटतात. त्यामुळे बोटं ताणल्यानं नेहमीच कडकड असा आवाज होतो.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपा करोनि त्वां मज प्रसना व्हावें । आणि म्यां मागावें बुद्धिज्ञान ॥१॥ ऐसी भुली मज न घालीं पांडुरंगा । बिघड संत्संगा न करीं मज ॥२॥ मोक्षासी साधन एका ते उपाधी । दाखवुनि बुद्धिभ्रंश केलें ॥३॥ एका पुत्र कलत्र राज्यचा संभ्रर्म । दावोनी दुर्गम भ्रम केला ॥४॥ नामा म्हणे तुझ्या प्रेमालागीं भक्ति । घेतली म्यां सुतीं जन्ममरणें ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांचे विचार सकारात्मक असतात अशी माणसे त्याच सकारात्मक विचारांना आत्मसात करून नित्यनेमाने कार्य करत असतात. कारण त्यांना वेळेचे भान असते सोबतच आपण इतरांसाठी काय केले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशा विचारी माणसांना कशाचीही अपेक्षा नसते किंवा कोण काय म्हणतील याकडे लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नसतो. तीच माणसे अभिमानाचे दुसरे नाव असतात.म्हणून जे कोणी चांगले कार्य करत असतील त्यांचे गुणगान करता येत नसेल तर त्यांना नाव ठेवून स्वतः च्या नावाची प्रसिद्धी करू नये. माणसाचे जीवन एकदाच मिळते त्या मानवी जीवनाचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अतिरेक नको*एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसऱ्या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला.तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जानेवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🟢 *_बालिका दिन, महिला मुक्तिदिन_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_ या वर्षातील तिसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟢 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟢•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.**१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.**१९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.**१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.**१९२५: बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.**१४९६: लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.*🟢 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: मधुकर बाळासाहेब जाधव -- लेखक, कवी**१९७९: गुल पनाग (जन्म (गुलकीरत कौर पनाग) -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल* *१९७५: प्रा. डॉ. विजय फकिरा राठोड -- कवी लेखक, व्याख्याते* *१९७१: सरिता सुवास परसोडकर -- कवयित्री**१९७१: अशोक गणपतराव पाठक -- कवी**१९६५: धनंजय माधवराव मुळे -- लेखक,कवी**१९६२: डॉ. मेघा उज्जैनकर -- लेखिका**१९६१: राजेंद्र खेर - सुप्रसिद्ध कादंबरीकार**१९६०: डॉ. वृषाली किन्हाळकर -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका तथा प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर* *१९५८: दिगंबर पवार -- कवी**१९५६: शिरीष श्रीकृष्ण गंधे -- कवी, लेखक, चित्रकार, व्याख्याते, अभिनेते**१९५४: सुभा आत्माराम लोंढे -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री**१९५२: श्रीराम वसंतराव ढवळीकर -- लेखक, पत्रकार**१९५१: अशोक निळकंठ सोनवणे -- प्रसिद्ध कवी लेखक तथा विविध पुरस्काराने सन्मानित**१९५०: प्रभाकर निलेगावकर -- मराठीतले एकपात्री कार्यक्रम करणारे एक कलावंत* *१९४९: प्रसाद तुकाराम सावंत -- लेखक**१९४७: मनोहर गणपत भारंबे -- लेखक**१९४६: प्रा. डॉ. दीनानाथ सिद्धराम फुलवाडकर -- कवी, कथाकार, संपादक* *१९४३: श्रीकांत दत्तात्रेय निंबवीकर -- प्रसिद्ध कथाकार**१९४१: संजय खान (शाह अब्बास अली खान) -- भारतीय अभिनेता, निर्माता* *१९४१: अमिताभ ( वामन नगराळे)-- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३७: सिंधू सदाशिव डांगे -- संस्कृत संशोधक, लेखिका,संपादक**१९३१: डॉ. य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८ )**१९२६: हरिश्चंद्र भास्कर उजगरे -- लेखक, संपादक**१९२१: चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७ )**१८८३: क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९६७ )**१८५३: कृष्णाजी नारायण आठल्ये -- संपादक,चित्रकार, टीकाकार, निबंधकार, कवी (मृत्यु: २९ नोव्हेंबर १९२६ )**_१८३१: सावित्रीबाई फुले – भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.(मृत्यू: १० मार्च १८९७ )_*🟢 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟢••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: डॉ.चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी -- भारतीय न्यायाधीश, लेखक (जन्म: २० नोव्हेंबर १९२७ )**२०१५: सरिता मंगेश पदकी -- कवयित्री, कथालेखिका, बालसाहित्यकार, नाटककार आणि अनुवादिका (जन्म: १३ डिसेंबर १९२८ )**२००२: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२० )**२०००: डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४ )**१९९८: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९ )**१९९४: अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २५ जून १९१९ )**१९८७: अरविंद देशपांडे -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट, थिएटर आणि टेलिव्हिजन अभिनेता आणि थिएटर दिग्दर्शक (जन्म: ३१ मे १९३२ )**१९७५: ललितनारायण मिश्रा--बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन.(जन्म: २ फेब्रुवारी १९२३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मी सावित्री बोलतेय....!*....!*नमस्कार .....मी सावित्रीबाई फुले माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी पाठविण्याचे ठरविले. मात्र मी होते अक्षरशत्रू, मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही. पण ............. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्र्यांच्या दौऱ्यात आता पुष्पगुच्छ व मानवंदना बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेत नागरिक व भाविकांची गर्दी, प्राण्यांचे बाजारही फुलले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *23 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी कालावधीत होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर पैठणचे उद्यान 5 वर्षांनी होणार सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कडक सुचना, 26 तारखेपासून पर्यटकांसाठी होणार खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यामध्ये 2 महिला अधिकारीचा समावेश, सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेतील अर्जाची होणार पुन्हा पडताळणी, सरकारी नोकरीसह दुचाकीसह अन्य वाहने नावावर असणारे महिला ठरतील अपात्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केंद्राच्या खेलरत्न पुरस्काराची घोषणा, मनू भाकर, डी. गुकेश सह अन्य दोघांना खेलरत्न पुरस्कार, 34 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर 5 प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. वृषाली किन्हाळकर, साहित्यिक, नांदेड👤 ज्ञानेश्वर विजागत , शिक्षक👤 वर्षा भोळे , नांदेड👤 शुभांगी परळकर , नांदेड👤 संदीप जाधव👤 माधव पवार👤 योगेश पाटील👤 उत्तम जोंधळे👤 राजेश पिकले👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अनंत फंदी - शाहीर अनंत घोलप*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अपयशाच्या दगडाला लागलेली ठेच म्हणजे उद्याच्या यशाची ग्वाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कोणाच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला बालिका दिवस* साजरा केला जातो ?२) महाराष्ट्रातील प्रथम महिला मुख्याध्यापिका कोण ?३) भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण ?४) भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या कोण ?५) पुणे विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २) सावित्रीबाई फुले ३) सावित्रीबाई फुले ४) सावित्रीबाई फुले ५) सावित्रीबाई फुले *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *समुद्रकिनाऱ्यावरचे प्राणिजीवन* 📙 समुद्र अनेकांनी नक्कीच पाहिला असेल. कदाचित अनेकांचा जन्मच समुद्राकाठी गेला असेल. विविध वेळी समुद्राची विविध रूपे न्याहाळत असताना, लाटांकडे बघत असताना त्याच्या पोटातील समुद्र प्राणीजीवनाची मात्र अजिबात जाणीव होत नाही. अगदी क्वचित एखादा मासा लांबवर सुळकांडी मारताना लाटेबरोबर दिसतो किंवा त्याला टिपण्यासाठी गलपक्ष्यांची झेप नजरेत भरते, एवढेच. जी गोष्ट समुद्राची तीच समुद्रकिनाऱ्याची. शिंपले, रंगीबेरंगी शंख, चमकते अभ्रकाचे पापुद्रे गोळा करण्यात किंवा समुद्रावर वाळूचे किल्ले बांधण्यात अनेकांनी ओहोटीच्या वेळी तासंतास घालवलेले असतील. पण याच किनाऱ्यावर विविध प्राण्यांचे वास्तव्य असते, हे फारसे कधी जाणवणार नाही. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते.किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्याचा भाग हा अत्यंत विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांनी खच्चून भरलेला असतो, असे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरू नये. जिथे खडकाळ किनारा असेल, तेथे तर हे प्रमाण कितीतरी जास्त असते, कारण मऊ माती व रेतीपेक्षा खडकाळ किनाऱ्याचा आधार घेऊन अल्गी, प्रवाळ, शिंपल्यातील प्राणी वाढतात. स्वतःची घरे करतात. त्याचा सलग असा सुंदर पृष्ठभाग खडकांवर तयार होत जातो. रेतीच्या किनार्यातही प्राणी असतातच; पण ते सर्व मऊशार शरीराचे असतात.किनाऱ्याचे ढोबळमानाने चार भाग केले जातात. लाटा फुटून विरतात, तो एक भाग. नंतरचा सर्वात उंच लाट ते तेथपासून भरतीच्या वेळच्या सर्वात कमी उंचीच्या लाटेपर्यंतचा दुसरा टप्पा. तिसरा भाग म्हणजे ओहोटीची सर्वात मोठी लाट व भरतीची सर्वात लहान लाट यांमधला. शेवटचा टप्पा ओहोटीच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान लाटेदरम्यानचा. या प्रत्येक टप्प्यातील पाण्याच्या मार्यानुसार, गरजेनुसार विविध प्राणी वास्तव्य करतात. वरवर पाहता फारसा पत्ता न लागणाऱ्या किनाऱयावर पूर्ण ओहोटी असताना सावकाशपणे हिंडत निरीक्षण केले, तर यांतील काही मंडळी दृष्टीला पडतात. निळसर गोलाकार डॉलरच्या आकाराचे गोल बिळात शिरताना दिसतात, तर दोहोबाजूंना असंख्य पाय असलेले आयसोपॉड्स हिंडताना व खाद्याच्या शोधात दिसतात. खिडक्यांची बिळेही दिसतात, तर ओहोटीच्या पाण्यात स्टारफिशही वळवळताना सापडतात. शिंपल्यांचे विविध प्रकार याच वेळी दिसतात, तर पाठीवर शंखांचे ओझे घेऊन चालणारे कोळसपण या वेळी हलताना दिसतात.या विविध प्राण्यांच्या गरजांप्रमाणे त्यांनी किनाऱ्याचे मघाशी सांगितलेले चार टप्पे आपलेसे केले आहेत. प्रत्येकजण वास्तव्यासाठी आपापला टप्पा पकडूनच राहतो, हे किनाऱ्याचे वैशिष्टय़ म्हणता येईल.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥ जेथें जेथें मन जाईल हें माझें । तेथें तेथें तुझें रूप भासे ॥३॥ नामा म्हणे मी सर्वांपरी अज्ञान । विनवी आस करून पांडुरंगा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रोध हा माणसाचा शत्रू आहे म्हणतात. या क्रोधामुळे आपण कधी, कधी उलट, सुलट बोलल्याने समोरील व्यक्तीचे मन दुखावत असते. अशा व्यक्तीशी संवाद ठेवण्यात अनेक इच्छुक नसतात. म्हणून बोलताना पुढच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेवून संयमाने बोलण्याचा प्रयत्न करावा.विणाकारण किंवा लहान, सहान गोष्टीवरून कोणाचे मन दुखावेल अशा शब्दात बोलू नये.क्रोध हा क्षणासाठी असतो मात्र ज्यावेळी आपल्याच माणसाला बोलून दु:खी केले जाते दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीच्या मनात तो स्थान असेलच असे नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दृष्टीकोन बदला*एक झाड सुंदर फळाफुलांनी बहरून गेले होते. सुंदरता आणि संपन्नतेमुळे पक्षी अधिक प्रमाणात त्या झाडावर राहत होते. झाडही आनंदाने आश्रय आणि भोजन देत होते. तसेच वाटसरूंना सावली देण्याचे कार्यही झाड प्रामाणिकपणे करत होते त्यामुळे वाटसरूंचे आशीर्वाद झाडाला मिळत असत. त्यामुळे झाडाजवळ सदैव प्रसन्नता असायची मात्र कालांतराने झाडाला या गोष्टीचा गर्व झाला आणि माझ्यासारखे दुसरे झाडच नाही, सगळ्या झाडात मीच श्रेष्ठ आहे असा भ्रम त्याला झाला. काही काळाने झाडाला फळे फुले येण्याचे बंद झाले, पानांची गळती सुरु झाली. सावली नसल्याने वाटसरू येईनात, फळे नसल्याने पक्षी राहिनात अशी अवस्था झाली. झाडाला वाईट वाटले त्याने तेथून जाणा-या एका सिद्धपुरुषाला विचारले की माझ्या आयुष्यभर मी सर्वांची सेवा केली पण माझ्या या वृद्धापकाळी माझी कोणी साधी विचारपूस सुद्धा का करीत नाहीत. काही लोक तर मला तोडण्याची भाषा करत आहेत. सिद्धपुरुष म्हणाले, अरे वृक्षराजा, तू विचार करण्याची पद्धत बदल, जीवनभर लोकांच्या कल्याणसाठी राबणारा हा तुझा डोलारा आता तुझ्या मृत्युनंतरही उपयोगी पडणार आहे. तुझ्या लाकडाचे अनेक उपयोग माणसाच्या कल्याणासाठी होणार आहेत. मरूनही तू चिरंतन माणसाच्या स्मरणात राहणार आहेस. तेव्हा तू तुझ्या मरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल. हे ऐकून वृक्षाला आनंद वाटला व त्याने दुःख न मानण्याचे ठरवले.तात्पर्य : कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातील चांगल्या बाबी लक्षात येतात. मात्र नकारात्मक विचारसरणीने नुकसान होण्याचीही शक्यता असते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जानेवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EDAFxa7UU/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🏵️ *_ या वर्षातील दुसरा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••• *२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.**२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.**१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी.लिट.पदवी प्रदान**१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या**१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.**१९४५: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.**१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.**१९३६:मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना**१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.**१८८५: पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.**१८८१: लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.**१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: शाल्मली खोलगडे -- भारतीय पार्श्वगायिका**१९८४: माणिक प्रल्हादबुवा गिरी -- लेखक* *१९८४: डॉ. चंदू हरी पवार -- कवी* *१९८०: गजानन नत्थुजी कावडे -- कवी* *१९७८: डॉ. शुभांगी गणेश गादेगावकर -- कवयित्री, लेखिका**१९७५: डॉ.देवेंद्र शेषराव तातोडे -- कवी लेखक* *१९६७: महेश गोविंद आफळे -- कवी, लेखक**१९६४: नंदू सामंत -- कवी* *१९६४: प्रा. राम कदम -- कथाकार**१९६३: अविनाश शरदचंद्र चिंचवडकर -- लेखक, कवी**१९६२: प्रा. मधुकर बळीरामजी वडोदे -- लेखक, कवी* *१९६०: रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू:२३ फेब्रुवारी १९९८ )**१९५९: किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि माजी खासदार**१९५७: उर्मिला देशपांडे -- कथा, कादंबरी, नाट्य लेखन* *१९५६: प्रा. डॉ. दीपक गोपाळराव कासराळीकर -- समीक्षक* *१९५५: जनार्दन नारायण ठाकूर-शिंदे -- कवी, लेखक**१९५२: श्रीनिवास गेडाम -- कवी, गझलकार, लेखक**१९५०: प्रा. श्याम विद्याधरराव पाठक -- कवी, लेखक* *१९४९: निरंजन कचरुजी पाटील -- लेखक, कवी, संपादक* *१९४५: प्रा. आनंद जामवंतराव कदम -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९३२: हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५ )**१९३१: दिगंबर तुकारामजी होले -- लेखक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक**१९२०: आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल १९९२ )**१९०१: महादेव मल्हार जोशी -- संस्कृत भाषेचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक (मृत्यू: १९७८ )**१८९२: गणेश पांडुरंग परांजपे -- वैद्यकशास्त्र विषयक ग्रंथाचे कर्ते (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९७३ )**१८८६: बाळकृष्ण वामन सावर्डेकर -- लेखक (मृत्यू: १४ जानेवारी १९४६ )**१८७६: भा. वा. भट -- इतिहास अभ्यासक (मृत्यु: २७ डिसेंबर १९५२ )* 🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२१: प्रा. डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे -- प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ, संस्थापक संचालक इतिहास संशोधन केंद्र नागपूर, विदर्भ संशोधन महर्षी, जीवन साधना, विदर्भ भूषण पुरस्कारांनी सन्मानित (जन्म: ७ सप्टेंबर १९३५ )**२०१६: अर्धेन्दु भूषण वर्धन -- भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वतंत्र सेनानी (जन्म: २४ सप्टेंबर १९२४ )**२०१५: वसंत रणछोड गोवारीकर -- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ (जन्म: २५ मार्च १९३३ )**२०१३: डाॅ. विनय वाईकर -- गझल या विषयावर अनेक पुस्तके लिहिणारे लेखक ,भूलतज्ज्ञ (जन्म: १९४१ )**२००२: अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: १९४७ )**१९९९: विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या* *१९८९: सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक,कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४ )**१९८७: हरे कृष्ण महाताब -- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते,ओडिशाचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २१ नोव्हेंबर १८९९ )**१९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३ )**१९३५: मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक,टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते,वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बावनकशी : सावित्रीबाई फुले*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत चालू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गडचिरोलीला "स्टील सिटी ऑफ इंडिया" करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मोगरे शंकर👤 शहाजी पालवे👤 कविता जोशी, नांदेड👤 म. विखार👤 साईनाथ ईबीतवार👤 संदीप ढाकणे, शिक्षक, छ. संभाजीनगर👤 श्रीकांत काटलेवार👤 संजय फडसे👤 नरसिंग पेंटम*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आरती प्रभु - चिंतामण त्र्यंबक खानोलकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधीच मिळत नाही.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद - २०२४ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?२) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवैतच्या कोणत्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले ?३) PKL इतिहासात १८०० रेड पॉइंट बनवणारा एकमेव खेळाडू कोण ?४) 'व्यथा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कुवैतचा सर्वोच्च सन्मान कोणता ? *उत्तरे :-* १) कोनेरू हम्पी, भारत २) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर ३) परदीप नरवाल ४) दुःख ५) द ऑर्डर ऑफ मुबारक अल - कबीर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *आजारानंतर केस का गळतात ?* 📙 """""""""""""""""""""""""""""""""""""""""""केस निरोगी, चमकदार, दाट असण्यासाठी त्यांचे पोषण होणे आवश्यक असते. हे पोषण आहारातील स्निग्धांश, प्रथिने याद्वारे होत असते. प्रथिनांचा उपयोग केसातील केरॅटिन, मेलानिन या प्रथिनांची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो. जीवनसत्त्व अ, ई, प्रथिने, स्निग्धांश यामुळे तेथील त्वचेचे पोषण होऊन मुळे मजबूत राहण्यास मदत होते.तसे दररोजच आपले केस थोड्या प्रमाणात गळत असतात. ते नैसर्गिक असते ; परंतु समतोल आहार न घेतल्यास, त्वचेचे काही आजार झाल्यास, केसात कोंडा झाल्यास, विंचरताना ओढाताण झाल्यास केस गळतात. वर सांगितल्याप्रमाणे आजारानंतर केस गळण्याचे कारण पोषण न होणे हे असते. आजारात आहार योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यासोबतच आजाराच्या प्रतिकारासाठी शरीरातील पोषक घटक वापरले जाऊन त्याची कमतरता निर्माण होऊन केसांचे पोषणही खालावते व त्यांची मुळे सैल होऊन ते गळावयास लागतात. लहान मुलांमध्ये प्रथिनांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या क्वाशिअोरकाॅर या आजारात केस भुरकट होतात आणि थोडे वाढले तरी पटकन उपटले जातात.*डॉ. जगन्नाथ दीक्षित**डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥ भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥ नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••साहित्य कोणत्याही प्रकारचे असोत वरवर वाचून काढल्याने त्याचा खरा अर्थ कळत नाही. तसंच एखाद्याच्या जीवनातील व्यथा, वेदना, दु:ख,अडचणी आपुलकीने जाणून घेतल्याशिवाय तेही पूर्णपणे कळत नाही म्हणून कोणाला उगाचच नाव ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेणे आवश्यक आहे. या प्रकारे समजून घेतल्याने त्यांच्या व्यथा, वेदना,अडचणी आपल्या होऊन जातात. आणि हेच एकदा आपले झाले की, त्यातून अनेक मार्ग निघत असतात. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरं सत्य*एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्याची चौकशी केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15 दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला," साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे." साधू म्हणाला, "महाराज तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते." *तात्पर्य :- ज्ञान सचोटीने प्राप्त होते, धमकावून नव्हे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)