✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01 जुलै 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!आठवा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7281828088500210/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *१ जुलै २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_महाराष्ट्र कृषी दिन_**_राष्ट्रीय डॉक्टर दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १८२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.**१९६४:न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.**१९६२:सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.**१९६०:रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.**१९५५:’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली.**१९४९:त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.**१९४८:बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना**१९४७:फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.**१९०९:क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.**१८८१:कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.**१८३७:जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६:बाळासाहेब साहेबराव चन्ने -- लेखक कवी**१९७९:लीना भुसारी - खैरकर-- कवयित्री* *१९७८:रवींद्र उद्धवराव भयवाळ-- लेखक,समीक्षक, संपादक* *१९७८:लीलाधर रामेश्वरजी दवंडे--कवी, लेखक**१९७५:प्रा.डॉ.अनंता सूर-- प्रसिद्ध कवी लेखक,समीक्षक, संपादक* *१९७५:दादाराव डोल्हारकर-- कवी लेखक तथा मुख्याधिकारी* *१९७४:प्रा.डॉ.शिवाजी भिकाजीराव हुसे-- कवी,लेखक,संपादक* *१९७२:काशिनाथ (का.रा.) चव्हाण -- प्रसिद्ध कवी* *१९७२:अशोक पवार -- लेखक* *१९७१:श्रीकांत बापूराव पेठकर-- लेखक कवी**१९७०:परसराम रामा आंबी-- लेखक**१९६९: सुरेश महादेवराव देशमुख -- लेखक**१९६९:ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर-- प्रसिद्ध कवी लेखक* *१९६७:विठ्ठल नागेश गावडे परवाडकर -- नाटककार,लेखक कवी* *१९६६:उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक**१९६३: रेखा अशोक ढोले-- कवयित्री* *१९६३:परमेश्वर श्रीराम व्यवहारे-- कवी, लेखक* *१९६३: अनिल मनोहर खोब्रागडे- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९६३:डॉ सतीश पावडे-- लेखक, समीक्षक, नाट्यलेखक**१९६२:जयकुमार चर्जन-- लेखक* *१९६२: गजानन श्रीराम निमकर्डे-- लेखक* *१९६१:कल्पना चावला–भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर(मृत्यू:१ फेब्रुवारी २००३)**१९६०:डॉ.किरण कृष्णराव नागतोडे-- प्रसिद्ध लेखिका* *१९६०:सुदेश भोसले-- भारतीय पार्श्वगायक**१९६०:चुडाराम हिरामण बल्हारपुरे -- लेखक**१९६०: युवराज गंगाराम-- समीक्षक,लेखक, कवी* *१९५८:रामचंद्र गोविंद कुलकर्णी- प्रसिद्ध कवी लेखक तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९५८:प्रा.डॉ.अविनाश आवलगावकर-- सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक* *१९५७: प्रा डॉ. दिलीप व्यंकटेश अलोणे -- प्रसिद्ध लेखक,निवेदक* *१९५७:प्रा.यशवंत माळी -- प्रसिद्ध लेखक कवी* *१९५४: सुधीर जाधव -- लेखक* *१९५४:प्रा.डॉ.राम बोडेवार -- लेखक* *१९५२:विठ्ठल पांडुरंग पाटील-- लेखक, कवी तथा निवृत्त शिक्षणाधिकारी* *१९५०:प्रा.डॉ.सुभाष जगन्नाथ गढीकर -- लेखक,समीक्षक* *१९५०: डॉ श्रीपाल सबनीस-- सुप्रसिद्ध साहित्यिक ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष* *१९४९:वेंकय्या नायडू – मा.उपराष्ट्रपती, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष**१९४८:अनंत प्रभाकर देशमुख--समीक्षक**१९४६: हिरामण लांजे-- प्रसिद्ध कवी, लेखक,झाडी बोली साहित्याचे गाढे अभ्यासक* *१९४५:विजय पुरूषोत्तम नाईक-- प्रसिद्ध लेखक,अनुवादक,सकाळ वृत्त समूहाचे दिल्लीस्थित सल्लागार संपादक**१९३९:दौलतभाई आयुब खा पठाण-- कवी, लेखक* *१९३८:पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण**१९३७:शामराव गोविंदराव लाघवे-- लेखक* *_१९१३:वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक हरित क्रांतीचे प्रणेते राज्यात १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. राज्याला स्थैर्य दिले. रोजगार हमी योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि आता ती देशपातळीवरही सुरू करण्यात आली  (मृत्यू:१८ऑगस्ट १९७९)_**१९०७:प्रा.पा.कृ.सावळापूरकर -- लेखक,जुन्या पिढीतील संशोधक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९९५)**१८८७:कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू: १९२०)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक* *१९८९:प्राचार्य गणेश हरी पाटील – कवी, शिक्षणतज्ञ,बालगीतकार(जन्म:१९ आगस्ट १९०६)**१९६९:मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार**१९६२:पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, (जन्म: १ ऑगस्ट १८८२)**१९३८:गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते,’वर्‍हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *एलॉन मस्क यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॅन, मेक इन इंडियाचे केले कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील 26 कोटीच्या भ्रष्टाचारात लिपिक अटकेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मायानगरीत मुसळधार, तर ठाणे पालघरमध्येही दमदार बॅटिंग, मुसळधार पावसामुळे कांदिवलीत स्लॅब घरावर कोसळला, 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताची इराणवर मात; आठव्यांदा आशियाई कबड्डी अजिंक्यपद पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रत्नागिरी जेट्स संघाची MPL मध्ये बाजी; केदार जाधवच्या कोल्हापूर संघाला पराभवाचा धक्का*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉक्टर्स डे कधी साजरा केला जातो ?*दरवर्षी 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोक, ज्यांचे आयुष्य एका किंवा दुसर्या डॉक्टरांशी जोडलेले आहे, ते डॉक्टरांचे आभार मानतात. त्याला या जगात आणण्यासाठी आणि त्याला निरोगी ठेवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याचे आभार मानले जातात.इतिहास आणि महत्व - 1882 मध्ये पटना बंगाल प्रेसीडेंट, ब्रिटिश भारतात जन्मलेल्या डॉ. बिधान चंद्र रॉय चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षण विद्ववते आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्पण आणि सेवाभाव पाहता 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, भारतात प्रथमच 1991 साली राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. यावर्षी केंद्र सरकारने प्रथमच डॉक्टर्स डे साजरा केला. डॉक्टरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. या दिवशी देशातील डॉक्टरांच्या कार्याचे आभार मानले जातात.कोण होते डॉ बिधान चंद्र रॉय?डॉ. बिधानचंद्र रॉय हे बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. ते एक वैद्य देखील होते, ज्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान होते. जाधवपूर टीबी मेडिकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा मोलाचा वाटा होता. ते भारताच्या उपखंडातील पहिले वैद्यकीय सल्लागार म्हणून प्रसिद्ध झाले. 4 फेब्रुवारी 1961 रोजी डॉ. बिधानचंद्र रॉय यांनाही भारतरत्न प्रदान करण्यात आला होता. मानवतेच्या सेवेतील अभूतपूर्व योगदानाची दखल घेण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यास सुरुवात केली.*1 जुलैलाच डॉक्टर्स डे का साजरा करतात ?*1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा करण्यामागे एक खास कारणही आहे. थोर वैद्य डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. एवढेच नाही तर 1 जुलै 1962 रोजी डॉ. बिधानचंद्र यांचे निधन झाले. या कारणास्तव त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येक डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात.➖डॉ. हेडगेवार*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पुरी ( ओरिसा ) येथे कोणाचे मंदिर आहे ?२) पुरी येथील जगन्नाथ मंदिराची उभारणी कोणी केली ?३) प्रसिद्ध नंदनकानन पार्क कोणत्या राज्यात आहे ?४) ओरिसामध्ये लिंगराज मंदिर कोठे आहे ?५) पुरी येथील बीचची ( समुद्रकिनारा ) नावे सांगा.*उत्तरे :-* १) भगवान जगन्नाथ २) कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंग देव ३) ओरिसा ४) भुवनेश्वर ५) पुरी, चंद्रभागा, बालगई, गोल्डन, स्वर्गद्वार, अस्तरांगा बीच*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 प्रमिलाताई सेनकुडे, उपक्रमशील शिक्षिका, नांदेड👤 साक्षी बळीराम वारकड👤 मारोती भुसेवार👤 व्यंकटेश बतूलवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 श्रीकांत चरलेवार, पदोन्नत मुख्याध्यापक, धर्माबाद👤 मधुसूदन पांचाळ, सहशिक्षक, नांदेड👤 हनुमंत भोपाळे, साहित्यिक, नांदेड👤 गणेश शेलेकर👤 गुंडप्पा डावरे👤 रघुनाथ नोरलावार, धर्माबाद👤 नागोराव रायकोड👤 पंढरी गड्डपवार👤 बालाजी भाऊराव डाके👤 गजानन कवळे, सहशिक्षक, उमरी👤 मारोती कांडले, मुख्याध्यापक, करखेली👤 त्रिरत्नकुमार भवरे👤 विशाल कन्हेरकर, साहित्यिक👤 निळकंठ पाटील👤 शेषेराव पाटील आवरे👤 बाबासाहेब डोले👤 शहादेव पा. सुरासे👤 विलास नंदूरकर👤 बालाजी भगनूरे, सहशिक्षक, देगलूर👤 भूमन्ना अबुलकोड, LIC प्रतिनिधी, धर्माबाद👤 चंद्रकांत कदम, साहित्यिक, नांदेड👤 लक्ष्मणराव मुपडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजय निलंगेकर, पत्रकार, नांदेड👤 पंढरीनाथ खांडरे, करखेली👤 सय्यद इलियास जुक्कलकर👤 तुकाराम मुंगरे👤 अशोक तुळशीराम कांबळे, सेवानिवृत्त, माध्यमिक शिक्षक👤 हणमंतू देसाई, संपादक, धर्माबाद👤 मोरेश्वर गायधने, सहशिक्षक, भंडारा👤 दिगंबर नागलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला। परी शेवटीं काळमूखीं निमाला॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अनेकदा आपल्या मनात नव, नवीन कल्पना येत असतात. आणि चांगल्या कल्पना सुचने चांगलेच आहे पण, कल्पना सुचल्याने काही फायदा होणार नाही. कल्पनेने कल्पनिकरण झालं पाहिजे. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. सोबत चांगले विचार असणे गरजेचे आहे. कधी काळी सांगता येत नाही आपल्याला सुचलेल्या कल्पनांमुळे कदाचित इतरांनाही फायदा होऊ शकतो. यासारखे दुसरे पुन्हा काय मोठे होऊ शकते...? म्हणून सदैव चांगल्याच गोष्टींवर विचार करावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बळी तो कान पिळी*एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकर्‍या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले.तात्पर्य - बळी तो कान पिळी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!सातवा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7279747092041643/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *३० जून २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १८१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:ब्रिटनने चीनकडुन ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.**१९८६:केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.**१९७८:अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.**१९७१:सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.**१९६६:कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९६५:भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.**१९६०:काँगोला (बेल्जियमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९४४:मुंबईच्या ’सेंट्रल’ सिनेमात ’प्रभात’चा ’रामशास्त्री’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात ललिता पवार या अभिनेत्रीवर खलनायिकेचा कायमचा शिक्‍का बसला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८६: डॉ.निलेश साबळे-- मराठी दूरदर्शन निवेदक आणि चित्रपट अभिनेते**१९७४: विठ्ठल मारोती जाधव -- कवी, कथाकार,लेखक**१९७०: भारती अनील भाईक -- लेखिका, कवयित्री* *१९६९: सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू**१९६६: डॉ.संजीवकुमार अभिमन्यू सोनवणे-- प्रसिद्ध लेखक,कवी* *१९६२:प्रफुल्ल शिलेदार-- प्रसिद्ध लेखक, कवी* *१९५७:जनाबाई कचरु गि-हे-- लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या* *१९५६:विजय सुरवाडे-- लेखक व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ संशोधक,अभ्यासक व संग्राहक**१९४३:सुधा विनायक नरवाडकर -- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९४३:सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक**१९४१:प्रा.सुधीर सहस्त्रबुद्धे-- लेखक कवी* *१९४१:श्रीधर रघुनाथ दिक्षीत -- कादंबरीकार**१९३७:दिनकर जोशी-- गुजराती भाषेचे प्रसिद्ध लेखक* *१९३२:दत्ता केशव कुलकर्णी-- मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक(मृत्यू: १८ जानेवारी २०१९)**१९२८:कल्याणजी वीरजी शाह – 'कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)**१९२३: निवृत्ती पवार -- प्रसिद्ध शाहीर (मृत्यू:१० जून २००२)**१९१२:मो.रा.वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे-- शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार(मृत्यू:२१ मार्च १९९२)* *१८९५:वासुदेव वामन फडणवीस -- समीक्षक, पत्रकार (मृत्यू:२० मे १९४६)**१४७०:चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९९:कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी(जन्म:९ आगस्ट १९२०)**१९९७:राजाभाऊ साठे – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक**१९९४:बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार,कवी,अभिनेते,निर्माते,लेखक व दिग्दर्शक (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)**१९१७:पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गेल्या सहा महिन्यात 4,434 मुली बेपत्ता, सत्ताधाऱ्यांनी बाष्कळ वक्तव्ये न करता महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं; शरद पवारांचा हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरात बकरी ईद उत्साहात साजरी, अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापुरात 4 जुलैपासून ईव्हीएम तपासणी; जिल्हा प्रशासनाकडून लोकसभेची तयारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मंत्रिमंडळ विस्तारात 'रिपाइं'ला मंत्रीपद मिळावे ; राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद दिल्यामुळे सौरव गांगुली हैराण*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पितामह दादाभाई नौरोजी*भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; - मृत्यू ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता.➖कन्फूशियस*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?२) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द नाईल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?३) हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करतांना शवाबरोबर काय पुरत असत ?४) टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ?५) राज्यात एकमेव हत्ती कॅम्प कोठे आहे ?*उत्तरे :-* १) डॉ. रवींद्र शोभणे २) इजिप्त ३) मातीची भांडी ४) इलान मस्क ५) कमलापुर, ता. अहेरी, जि. नाशिक*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 स्नेहल आयरे, सामाजिक कार्यकर्ती, मुंबई👤 विठ्ठल जाधव, साहित्यिक, बीड👤 सतिश गादेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सुरेश पांचाळ, सहशिक्षक, नांदेड👤 नागोराव तिप्पलवाड, बरबडा👤 विष्णू भाऊराव सोरते, सहशिक्षक👤 ज्ञानेश्वर पाटील कऱ्हाळे👤 नामदेव आव्हाड👤 शिवाजी नाईकवाडे👤 शिवकुमार छपरे👤 पांडुरंग सलगरे👤 विठ्ठल होंडे👤 शेख शाहरुख, पांगरी👤 आगंद तरसे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनात श्रध्दा असणं, सोबत चांगले विचार असणं, सदैव प्रयत्न असणे, प्रामाणिकपणा, नि:स्वार्थ पणाची भावना असणं, कोणाच्याही विषयी तिरस्कार नसणं व आपुलकी असणं हे सर्व आपल्यात ठेवून जर.. आपण कार्य करत राहिले किंवा इतरांना हसवत ठेवले तर...त्यातून जो समाधान आपल्याला मिळेल.. कदाचित तो जगापेक्षा वेगळा ही असू शकतो असे अनेकदा आपण ऐकले असणार. .. म्हणून असेच आपले जगणे असायला पाहिजे ज्यातून आंनद ही मिळेल आणि इतरांनाही आपल्याला जास्त नाही पण,थोडं तरी वाटता येईल कारण,वाटल्याने आपले धन कमी होत नाही तर...वाढतच जाते म्हणून आपण त्याच प्रकारची विचारसरणी व माणुसकी ठेवून जगावे ज्यातून जगण्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मित्र*विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,”हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28 जून 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!सहावा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7279105912105761/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *२८ जून २०२३* 🚥 🌺 *_दिनविशेष_* 🌺 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७९ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.**१९९४:विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.**१९७२:दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ**१८४६:अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.**१८३८:इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••• *१९७९:प्रा.डॉ.नवनाथ अंगद शिंदे -- लोकसाहित्य,आदिवासी,साहित्याचे अभ्यासक, समीक्षक,लेखक* *१९७२:मंगेश देेेेसाई-- मराठी चित्रपट कलाकार* *१९७०:डॉ.माधव शोभणे -- कवी,लेखक* *१९७०:मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक**१९६३:वासवदत्ता अग्निहोत्री -- कवयित्री* *१९६२:डॉ.चंद्रकांत वि. जोशी -- कवी,कथाकार,कादंबरीकार,समीक्षक* *१९५६:अंतोन चांगदेव त्रिभुवन -- लेखक**१९५६:डॉ.गिरीश दाबके -- सुप्रसिद्ध जेष्ठ मराठी साहित्यिक* *१९५१:डॉ.एस.एम.कानडजे-- प्रसिद्ध समीक्षक* *१९३७:डॉ.गंगाधर पानतावणे – प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक(मृत्यू:२७ मार्च, २०१८)**१९३४:रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे कसोटीपटू (मृत्यू:१८ जुलै २००१)**१९२८:बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)**१९२२: भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार,कवी (मृत्यू:२८ जून १९९०)**१९२१:नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)**१७१२:रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: चंद्रकांत कामत -- बनारस तबला घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय तबला वादक(जन्म:२६ नोव्हेंबर १९३३)* *२०००:विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग –उद्योजक(जन्म:६ एप्रिल १९२७)**१९९९:रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार* *१९९०:भालचंद्र गजानन खांडेकर -- गीतकार, कवी(जन्म:२८ जून १९२२)* *१९८७:पं.गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म:३० जानेवारी १९११)**१९७२:प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)**१८३६:जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *खान्देशसाठी जळगावला स्वतंत्र विभागीय आयुक्तालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करा, अन्यथा मुलांना शिक्षण विभागात शिकवायला पाठवू; शिक्षक संघटनांचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त धडाकेबाज IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्ती; न्यायालयाकडून 'त्या' योजनेसंबंधी सहकार्याची विचारणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत ऑरेंज अलर्ट, मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत.. ४ ते ६ जुलै दरम्यानच्या दौऱ्यात त्या कोराडी, वर्धा आणि सेवाग्रामला भेट देणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *झिम्बाब्वेनं विक्रम रचला, 400 धावांचा पल्ला केला पार, फक्त 5 धावांनी भारताचा रेकॉर्ड कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पी. व्ही. नरसिंहराव*पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. नारसिंहाराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी 28 जून 1921 रोजी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या.त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. 23 डिसेंबर 2004 रोजी त्यांचा मृत्यू झाला. *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कष्ट ही एक अशी चावी आहेजे नशीबात नसलेल्या गोष्टींचेसुध्दा दरवाजे उघडते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशाच्या सौर मोहिमेचे नाव काय आहे ?२) राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सर्व समान आहेत ?३) संयुक्त अरब अमिरातीचे ( युएई ) चलन कोणते ?४) गोरखपूरमध्ये १९२३ साली स्थापन झालेल्या 'गीता प्रेस' प्रकाशनाला २०२१ चा कोणता पुरस्कार जाहीर झाला ?५) जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोणत्या देशात आहेत ?*उत्तरे :-* १) आदित्य एल-१ २) कलम १४ ३) दिऱ्हम ४) गांधी शांतता पुरस्कार ५) भारत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्री मार्तंड भुताळे, देगलूर👤 प्रभाकर लखपत्रेवार, पत्रकार, नायगाव👤 रामदास कदम👤 रवी जयंते👤 शुभम डी. पाटील👤 अभिषेक लाकडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जिथं जाऊ, तिथं खाऊ अन् तिथेच एखाद्या व्यक्ती विषयी आपले मन तृप्त होईपर्यंत गाठोडं सोडण्याची काही लोकांना फार सवय असते. पण, ते गाठोडं सोडण्याआधी एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावे आपण कोणाविषयी कितीही तिखट, मीठ लावून सांगितले आणि गाठोडं सोडलं तरी ऐकणारा समोरचा व्यक्ती आपल्या सारखा असेलच असे नाही अनुभवी व हुशार सुद्धा असू शकते. म्हणून उगाचच कोणाचे नको ते गाठोडे सोडण्यात वेळ वाया घालवू नये. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुंगी व कोशातील किडा*एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला. कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हालवीत होता. ते पाहून मुंगी म्हणाली, ‘अरेरे, काय ही तुझी स्थिती ? मला वाटेल तिकडे फिरता येतं. पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात. तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे असं म्हटले पाहिजे.’ यावर किडा काहीच बोलला नाही. पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुनः तेथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच मात्र तेथे पडले असून तो किडा कोठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते. ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर पतंग आपल्या पंखांनी तिला वारा घालत असताना तिला दिसला. तो तिला म्हणाला, ‘अग, त्या दिवशी बंदिवान म्हणून तू माझी कीव करीत होतीस, माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस, तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे. आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बढाई मारायची असेल तर खुशाल मार. तोपर्यंत मी सहज थोडा आकाशात फिरून येतो.’ इतके बोलून त्याने एक भरारी मारली व उंच आकाशात गेला.तात्पर्य - संकटात असलेला माणूस पुनः कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बढाई मारणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27 जून 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!पाचवा भाग -------https://m.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7276558762360476/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🚥 *२७ जून २०२३* 🚥 🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९६:अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर**१९९१:युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.**१९७७:जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.**१९५४:अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.**१९५०:अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९७१:डॉ. विजयालक्ष्मी रवि वानखेडे -- कवयित्री, कथाकार,कादंबरीकार* *१९६९: अनुपमा रामेश्वर जाधव -- कवयित्री लेखिका* *१९६८:डॉ.रमाकांत विठ्ठलराव कराड-- लेखक**१९६७:बाबुराव चौरपगार -- कवी* *१९६४:अभय भंडारी --लेखक, वक्ते* *१९६३:डॉ.विजयकुमार पंढरीनाथ फड-- संत साहित्याचे अभ्यासक,लेखक तथा सनदी अधिकारी* *१९५५:डॉ.प्रमोद हरी महाजन-- आरोग्य शिक्षण विषयावर विपुल प्रमाणात लेखन* *१९५३:रवींद्र पांढरे -- कवी, कादंबरीकार कथाकार**१९५०:नितीन मुकेश माथूर-- भारतीय पार्श्वगायक* *१९३९:राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)**१९२८: राम प्रधान-- माजी केंद्रीय गृह सचिव व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव, लेखक (मृत्यू:३१ जुलै २०२०)* *१९१७:खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)**१८८०:हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)**१८७५:दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)**१८६४:शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते,वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)**१८३८:बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०१४:माधव नारायण आचार्य-- मराठी लेखक(जन्म:१९३०)* *२००८:फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)**२०००: दत्तात्रेय नरसिंह गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार(जन्म:२० सप्टेंबर १९२२)**१९९८:होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)**१९९६:अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)**१८३९:महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)**१७०८:धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: १६५०)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई: कृषी उत्पन्न बाजार समितीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्याबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *600 वाहनांचा ताफा, सोबत अख्खं मंत्रिमंडळ; तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची सोलापुरात होणार सिंघम स्टाईल एन्ट्री*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर जिल्ह्यात मँगनीज खाणीसाठीच्या वृक्षतोडीला विरोध, पर्यावरण वाद्यांचं चिपको आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अखेर कुस्तीपटूंचे आंदोलन मागे पण न्यायालयात संघर्ष सुरुच राहणार, कुस्तीपटूंचा महत्त्वपूर्ण निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डॉ. हेलन ॲडम्स केलर या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीदार होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या. हेलन केलरचा जन्म २७ जून १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधिरांसाठीचे पहिले शिक्षक होते.हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या. लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटिस) नंतर ती अंध आणि बधिर झाली. मे, इ.स. १८८८ मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. इ.स. १८९४ मध्ये त्यांनी आणि ॲन सॅलिव्हन यांनी न्यू यॉर्कमधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्‍नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याच्याजवळ धैर्य आहे व जो मेहनत करायला घाबरत नाही, अशा हिम्मतवानाची सफलता दासी असते.➖ दयानंद सरस्वती*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती भाषेतील लेखकांना दिला जातो ?२) राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत ?३) एक सजीव त्याच्यासारख्याच दुसऱ्या सजीवास जन्म देतो त्यास काय म्हणतात ?४) रिसर्च अँड अनालीसिस विंग ( रॉ ) चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?५) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोठे आहे ?*उत्तरे :-* १) २४ भाषा २) कलम १५ ३) पुनरुत्पादन / प्रजनन ४) रवी सिन्हा ५) वर्धा*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शंकर देशमुख👤 सुशील कापसे, सहशिक्षक👤 पोषट्टी चिपेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतः हसत रहाणे व सदैव हसतच जगणे हे प्रत्येकांसाठी भल्याचेच आहे कारण हसणे एक प्रकारचे जीवन आहे आपण कुठेतरी ऐकले असणार. . पण,कोणाला रडवून आपण खळखळून हसत जगणे ही माणुसकी नव्हे. तर...रडणाऱ्याचे अश्रू पुसून त्याला पुन्हा एकदा नव्याने जगायला लावणे हा खरा माणुसकी धर्म आहे आणि तोच माणुसकी धर्म एक चांगला माणूस बनून प्रत्येकांसाठी निभावून दाखवणे आजच्या घडीला अत्यंत काळाची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अरण्य व लाकूडतोड्या*एकदा एक लाकूडतोड्या रानात गेला असता इकडे तिकडे पाहात रडू लागला. तेव्हा रानातल्या झाडांनी त्याला विचारले, ‘तू का रडतोस ? तुला काय हवं आहे ?’ तो म्हणाला, ‘माझ्या कुर्‍हाडीला दांडा नाही, त्यासाठी लाकडाचा एक लहानसा तुकडा मला द्याल तर बरं होईल.’ ते ऐकून झाडांना त्याची दया आली व त्याला चिंचेच्या चिवट लाकडाचा एक तुकडा दिला. लाकूडतोड्याने तो आपल्या कुर्‍हाडीला घातला व सगळी झाडे तोडण्याचा सपाटा लावला. तेव्हा एक झाड इतर झाडांना म्हणाले, ‘मित्रहो, आपण आपल्याच हाताने आपला नाश करून घेतला आहे. तेथे दुसर्‍याला नावं ठेवायला जागा नाही.’तात्पर्य – शत्रूची कीव करून त्याला साहित्य पुरविले तर शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येते. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26 जून 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!चौथा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7274677382548614/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_सामाजिक न्याय दिवस_*•••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२०००:पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.**१९९९:पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.**१९९९:नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.**१९७४:नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ**१९७४:ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.**१९६८:पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.**१९६०:मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९६०:सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१७२३:रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८८: सुजित शिवाजी कदम -- कवी* *१९८७:प्रणव सखदेव-- मराठी लेखक, कवी, युवासाहित्यिक अनुवादक* *१९७८:डॉ० रावसाहेब मुरलीधर काळे-- वऱ्हाडी बोलीचा भाषाशास्‍त्रीय अभ्‍यासक* *१९७६:वर्षा पतके-थोटे-- लेखिका,कवयित्री* *१९७६:डॉ सतीश नारायण कामत-- प्रसिद्ध लेखक संपादक* *१९६९:धर्मेंद्र प्रधान--भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री**१९६८:संजय विठ्ठल कळमकर-- विनोदी लेखक,वक्ते आणि कथाकथनकार* *१९६५:राजेंद्र बलभीम भोसले-- कवी, कादंबरीकार, कथाकार, समीक्षक, लेखक* *१९५१:गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९४८:चंद्रशेखर गाडगीळ-- मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील भारतीय पार्श्वगायक (मृत्यू:२ ऑक्टोबर, २०१५)**१९४२:प्रा.डॉ.मदन पांडुरंग कुलकर्णी- ज्येष्ठ सुप्रसिद्ध समीक्षक,पूर्वअध्यक्ष विदर्भ संशोधन मंडळ,नागपूर**१९४१:शरद पिदडी-- कवी**१९३४:इंद्रायणी प्रभाकर सावकार --मराठी लेखिका**१९२५:शांता मधुकर रानडे-- लेखिका, अनुवादक (मृत्यू:५ डिसेंबर २०१८)* *१९२२:शंकर पांडुरंग रामाणी -- प्रसिद्ध गोमंतकीय मराठी कवी.(मृत्यू:२८ नोव्हेंबर २००३)**१९१४:शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)**१९०५:कमलाबाई विष्णू टिळक-- कथाकार(मृत्यु:१० जून १९८९)**१८९२:पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (मृत्यू: ६ मार्च १९७३)**१८८८:नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते (मृत्यू: १५ जुलै १९६७)**_१८७४:छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)_**१८७३:अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)**१८२४:लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)**१७३०:चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००५:एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म:१८ मार्च १९४८)**२००४:यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म:६ सप्टेंबर १९२९)**२००१:वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)**१९४३:कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १८६८)*   *_सामाजिक न्याय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेडमध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इजिप्तच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केळी संशोधन केंद्रासाठी 100 कोटींची तरतूद, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार : गुलाबराव पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर भारतात पावसाची जोरदार हजेरी, मान्सूनसाठी अनुकूल वातावरण; हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात यावर्षी मुबलक पाऊस; प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंमळनेर येथे होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कालच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सामाजिक न्याय दिवस*राज्य शासनाकडून २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून जाहीर झालेला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा हा जन्म दिवस. सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी त्यांचं कार्य खूप महत्त्वाचे आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हक्क. स्त्री-पुरुष समानता, समाजातील सर्वच थरातील व्यक्तींना विकासाची, शिक्षणाची संधी, ही सामाजिक न्यायाची उद्दिष्टे आहेत.सामाजिक न्याय म्हणजे काय? तर प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेप्रमाणे विकासाच्या संधी देणे, अथवा मिळवून देणे. कोणाचेही शोषण होणार नाही. किमान प्राथमिक गरजा पूर्ण होतील हे बघणे. आर्थिक सत्ता केंद्रित होणार नाही, ही दक्षता घेणे. समाजातील, आर्थिक, दुर्बल घटकांना सुरक्षितता वाटेल, असे वातावरण असणे, हीच सामाजिक न्यायाची संकल्पना आहे.छत्रपती रा. शाहू महाराजांनी समाजातील तळागाळातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ते रयतेचे राजे म्हणूनच ओळखले जातात. महाराजांनी पुनर्विवाह कायद्याला मान्यता दिली. कोणत्याही वर्गासाठी ते कोणतेही द्वेष मनात नव्हते. माणसाला माणूस समजण्यात येणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही, असे मत त्यांचे होते. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिष्यवृत्ती घेऊन परदेशात शिक्षणासाठी गेले होते, पण शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना परत यावे लागले. महाराजांना ही गोष्ट समजल्यावर ते स्वतः मुंबईत गेले आणि त्यांनी आंबेडकर यांना पुढील अभ्यास सुरू ठेवायला मदत केली. शोषित, मागासवर्गीयांना आंबेडकर यांच्या रूपात नेता मिळाल्याचे शाहू महाराजांनी जाहीर केले होते.राज्य शासनाच्या वतीने २६ जून हा त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो.➖फ्रँकलीन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई शेअर बाजार जगातला कितव्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे ?२) जगातला प्रथम क्रमांकाचा शेअर बाजार कोणत्या देशाचा आहे ?३) पहिल्यांदाच ज्युनिअर महिला हॉकी आशियाई चषक - २०२३ कोणत्या देशाने जिंकले ?४) जगात सर्वाधिक अणुबॉम्ब असणारे प्रथम तीन देश कोणते ?५) कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राजश्री शाहू पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?*उत्तरे :-* १) ५ व्या २) अमेरिका ३) भारत ४) रशिया ( ४४८९ ), अमेरिका ( ३७०८ ), चीन ( ४१० ) ५) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 रमेश इटलोड, विषय शिक्षक, धर्माबाद👤 गणेश आरटवार, फोटोग्राफर, धर्माबाद👤 नवीन कॅरमकोंडा, नांदेड👤 कृष्णा भोरे👤 बालाजी पाटील सावंत👤 पुरुषोत्तम रेड्डी चाकरोड👤 संतोष रेड्डी, धर्माबाद👤 अंकुश कामगोंडे, धर्माबाद👤 राजेश उमरेकर, नांदेड👤 नारायण ईबीतवार👤 सुरेश यादव👤 मनीष अग्रवाल👤 शेख बाशु👤 अनिल पाटील भुसारे, माहूर👤 कैलास स्वामी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी। दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥ देहेदु:ख ते सूख मानीत जावे। विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांवर चिखल फेकण्या आधी जरा स्वतः विषयी अशा सर्वच गोष्टींची शेवटपर्यंत आपण गॅरंटी द्यावी.तेव्हाच इतरांवर चिखल फेकण्याचा प्रयत्न करावे.कारण इतरांवर चिखल फेकणे तर.. फार सोपे काम असते .पण,आपल्यावर जेव्हा कोणी चिखल फेकतात त्याचे डाग काढणे मात्र तेवढेच कठीण असते. म्हणून असे कोणतेही व्यर्थ काम करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *फुशारकी*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 जून 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!तिसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7268695053146847/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७५ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००१:’आय. एन. एस. विराट’ ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.**१९९८:अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर**१९८२:कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.**१९३९:सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७९:प्रा.डॉ.वृंदा देशपांडे-जोशी-- कवयित्री, लेखिका* *१९७४:संदीप गायकवाड-- कवी, लेखक**१९६९:प्रशांत विजय दांडेकर-- लेखक* *१९६७:योगीनी राऊळ -- कवयित्री,लेखिका* *१९६५:पांडुरंग शंकरराव आडबलवाड -- कवी* *१९६४:नागनाथ विठ्ठलराव कलवले-- कवी, लेखक* *१९६२:गौतम शांतीलाल अदानी-- एक भारतीय उद्योजक,अदानी समूहाचे अध्यक्ष**१९६१:डॉ.महेंद्र मारोतराव भवरे-- कवी, समीक्षक, संशोधक**१९४९:विनय हर्डीकर -- लेखक* *१९३९:दिगंबर विठ्ठल पाध्ये-- समीक्षक(मृत्यु:१९ ऑगस्ट २०१६)* *१९३७:अनिता देसाई-- प्रख्यात लेखिका, जगातील इंग्रजी साहित्यातील एक प्रसिद्ध नाव* *१९२८:मृणाल गोरे – समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य(मृत्यू:१७ जुलै २०१२)**१९०८:गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक (मृत्यू: ९ आक्टोबर १९८७)**१८९९:नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक-- केंद्राने सर्व श्रेष्ठ नट म्हणून गौरविण्यात आले.(मृत्यू: ८ एप्रिल १९७४)**१८९७:पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)**१८९२:श्रीधर बाळकृष्ण रानडे -- मराठी कवी,रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते(मृत्यू:२१ मार्च १९८४)* *१८६९:दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)**१८६२:श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक (मृत्यू: २१ मार्च १९७४)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••• *२०१४:वसंत विठ्ठल गाडे(गाडेगरुजी)-- लेखक,विनोबा विचार केंद्राचे विचारवंत,संघटक (जन्म:२७ जानेवारी १९२७)* *२०१३:एमिलियो कोलंबो--इटलीचे ४०वे पंतप्रधान (जन्म: ११ एप्रिल १९२०)**१९९७:संजुक्ता पाणिग्रही-- भारतातील एक नृत्यांगना(जन्म:२४ ऑगस्ट १९४४)**१९७१:डॉ माधव गोपाळ देशमुख-- प्रसिद्ध समीक्षक,साहित्यशास्त्रज्ञ( जन्म:१० मार्च १९१३)* *१९१४:वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)**१९०८:ग्रोव्हर क्लीव्हलँड--अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष(जन्म: १८ मार्च १८३७)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारचा मोठा निर्णय ! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात आणि मुंबईत मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं, 25 जून नंतर पावसाची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबई महापालिकेतील 12 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT; मुंबई पोलीस आयुक्तांकडे नेतृत्त्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *'म्हाडा' मुंबई मंडळ सोडत 2023 साठी अर्ज करण्याची मुदत वाढली; थेट 10 जुलैपर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इंडो-पॅसिफिक क्षेत्रात कुणीही आक्रमकपणा दाखवू नये, नाव न घेता पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा लागू करावा - चंद्रशेखर बावनकुळे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; कसोटीतून पुजारा आऊट, तर वनडे संघात मोठे फेरबदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहुगुणी आवळा*आवळा हे असे अन्न आहे ज्यामध्ये पोषक तत्वांचा साठा आहे. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.आवळा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला आवळा खाल्ले तर तुम्ही अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव करू शकता.आवळा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कारण आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. याशिवाय त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात जे चयापचय वाढवतात. यामुळे शरीरात साठलेली चरबी जाळण्यास मदत होते.आवळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. भिजवलेला आवळा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि गोळा येणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.आवळा खाणे तुमच्या डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळतात जे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.आवळा हा क्रोमियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय, उच्च रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• "मौन आणि एकांत हे माणसाचे सर्वात चांगले मित्र आहे."*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मुंबई शेअर बाजार जगातला कितव्या क्रमांकाचा शेअर बाजार आहे ?२) जगातला प्रथम क्रमांकाचा शेअर बाजार कोणत्या देशाचा आहे ?३) पहिल्यांदाच ज्युनिअर महिला हॉकी आशियाई चषक - २०२३ कोणत्या देशाने जिंकले ?४) जगात सर्वाधिक अणुबॉम्ब असणारे प्रथम तीन देश कोणते ?५) कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राजश्री शाहू पुरस्कार' कोणाला जाहीर झाला ?*उत्तरे :-* १) ५ व्या २) अमेरिका ३) भारत ४) रशिया ( ४४८९ ), अमेरिका ( ३७०८ ), चीन ( ४१० ) ५) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 कल्पना डेव्हिड बनसोड, साहित्यिका तथा सहशिक्षिका, चंद्रपूर 👤 पांडुरंग आडबलवाड, साहित्यिक तथा माध्यमिक शिक्षक, धर्माबाद👤 लक्ष्मीकांत गोपाळराव कुलकर्णी👤 संदिप शंभरकर👤 रवी गंगाधर भोरे👤 अनिल रेड्डी, लातूर👤 सदानंद कोदळगे👤 लक्ष्मण सुरकार, सहशिक्षक, भोकर👤 सचिन रेनगुंटवार, धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बरेचदा असं होतं की,दुसऱ्यांच्या विषयी कोणताही विचार न करता एकाचे दोन अन् पायलीचे तीन करून मोठ्या आनंदाने आपण हसून सांगत असतो. तसच आपल्याही विषयी थोडं सांगण्याची हिंमत करावी. पण तसं सांगणं कोणालाही जमत नाही. कारण आपल्या घरात जरी कितीही विजेचा उजेड असेल तरी एक तरी कोपऱ्यात अंधार असतोच. म्हणून दुसऱ्यांचे सांगून नको ते, पाप करण्यापेक्षा आपल्यामागे किती अंधार आहे त्याकडे बघावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुयांचे झाड**एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे. एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला. झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन" मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.” झाडाने सफरचंदे तर दिली नाहीतच पण त्याच्यावर शेकडो सुयांचा वर्षाव केला. मोठा भाऊ वेदनेने विव्हळत होता. सूर्य अस्तास निघाला होता. लहान भावाला काळजी वाटली, तो मोठ्या भावाच्या शोधात निघाला. शेकडो सुया शरीरात घुसलेल्या तो अवस्थेत सापडला. लहान भाऊ त्याच्या मोठया भावाकडे धावत गेला, आणि दुःखद अंतःकरणाने त्याने प्रत्येक सुई काढली. सुया काढून झाल्यावर मोठ्या भावाने वाईट वर्तणुकीबद्दल बद्दल त्याची माफी मागितली. आणि इथून पुढे चांगला वागीन असे वचनही दिले. झाडाने मोठ्या भावात झालेला बदल पाहून त्यांना भरपूर सोनेरी सफरचंदे दिली. तात्पर्य : दयाळू आणि कृपाळू असणे महत्वाचे आहे कारण ते नेहमीच बक्षिसपात्र ठरते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा  वाचू या .....!दुसरा भाग -------https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/7264610470221972/?mibextid=Nif5ozकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस*••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७४ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९८:दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.**१९९६:आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्‍या महिला पंतप्रधान होत.**१९७९:इंग्लंडला ९२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.**१८९४:पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिची स्थापना झाली.**१७५७:प्लासीची लढाई : ’पलाशी’ येथे रॉबर्ट क्लाईवच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी करवून पराभव केला.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९८४:संदीप हरी नाझरे -- कवी* *१९८१:परशुराम गहिनीनाथ नागरगोजे-- लेखक* *१९७८:नेहा राजपाल -- भारतीय संगीत उद्योग,हिंदी चित्रपट आणि विशेषतः मराठी प्रादेशिक संगीत उद्योगातील एक निर्माता, गायिका आणि अँकर**१९७३:डॉ.प्रशांत गायकवाड -- कवी, समीक्षक,संपादक* *१९६५:डॉ.संगीता राजीव बर्वे-- सुप्रसिद्ध कवयित्री,लेखिका,बालसाहित्यिक,अनुवादक व अनेक चित्रपटांसाठी गीत लेखन* *१९६४:प्रा.डॉ.अल्का बाबुराव झाडे-- लेखिका* *१९६३:डॉ.मीना राजेंद्र शेंडगे - कवयित्री लेखिका* *१९६२:प्रा.बी.एन.चौधरी-- कवी,समीक्षक**१९५८:मुकेश खन्ना-- भारतीय अभिनेता आणि निर्माता**१९५२:राज बब्बर-- प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता आणि राजकारणी**१९५२:अशोक शिवदास कुळकर्णी-- कवी, लेखक* *१९१६:सर लिओनार्ड तथा ’लेन’ हटन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: ६ सप्टेंबर १९९०)**१९१२:अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (मृत्यू: ७ जुन १९५४)**१९०६:वीर विक्रम शाह ’त्रिभुवन’ – नेपाळचे राजे (मृत्यू: १३ मार्च १९५५)**१९०१:राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (मृत्यू: १७ डिसेंबर १९२७)**१८७३: बाळकृष्ण रामचंद्र कुळकर्णी-- कथालेखक, कादंबरीकार (मृत्यू:१९०७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *२००५:हेमंत विष्णू इनामदार--संतसाहित्याचे अभ्यासक(जन्म:३नोव्हेंबर १९२५)**२००४:प्रल्हाद शिंदे-- मराठी लोकसंगीत गायक, त्यांनी भीमगीते, भक्तिगीते आणि काही हिंदी कवाल्या गायल्या आहेत(जन्म १९३३)**१९९६:रे लिंडवॉल – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (जन्म: ३ आक्टोबर १९२१)**१९९४:वसंत शांतारम देसाई – नाटककार, साहित्यिक, साक्षेपी समीक्षक आणि बालगंधर्वांचे चरित्रकार(जन्म २७ डिसेंबर१९०४)* *१९९०:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते.(जन्म: २ एप्रिल १८९८)**१९८२: हरिभाऊ देशपांडे -- बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार**१९८०:व्ही. व्ही. गिरी – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री (जन्म: १० ऑगस्ट १८९४)**१९८०: इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन (जन्म: १४ डिसेंबर १९४६)**१९५३:डॉ.श्यामाप्रसाद मुकर्जी – माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९०१)**१९३९:गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (जन्म: १५ नोव्हेंबर १८८५)**१९२०:काशिनाथ रघुनाथ मित्र--मनोरंजन मासिकाचे संपादक, बंगाली-गुजराती कादंबऱ्यांचे अनुवादक.(जन्म:२ नोव्हेंबर १८७१)**१८३६:जेम्स मिल – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ६ एप्रिल १७७३)**१७६१:बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (जन्म: ८ डिसेंबर १७२१)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे दानपेटीत जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही, नाशिकमधील चांदोरी गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोविड सेंटर कथित गैरव्यवहात प्रकरणी ईडीकडून तब्बल 13 तास छापेमारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तुकोबांच्या पालखीचं इंदापूरात दुसरं अश्व रिंगण, ज्ञानोबांचं बरडमध्ये जल्लोषात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर होणार पुष्पवृष्टी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी, बांगलादेशला हरवून आशिया चषकावर कोरले नाव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *अवयव दान कोण करू शकतो ?* 📙 ************************************अवयव दान कोण करू शकतो ?*खरं तर या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी दुसराच एक प्रश्न विचारायला हवा. हे दान केव्हा करायचं आहे ? जिवंतपणी की मृत्यूनंतर ? मृत्यूनंतर करायचं असेल तर कोणीही असं दान करू शकतो. तसंच कोणताही अवयव दान करू शकतो. तो जर योग्य त्या अवस्थेत असेल आणि कोणा गरजूला त्याचा उपयोग होणार असेल तर डॉक्टर अशा दानाचा स्वीकार करू शकतात. एवढेच काय विंदा करंदीकरसारख्या ज्ञानपीठ विजेत्या कवीनं तर मरणोत्तर आपल्या देहाचं मेडिकल कॉलेजला दान केलं होतं. तेव्हा अशा प्रकारच्या दानाची कोणालाही मुभा असते. मात्र ते स्वेच्छेने केलं जायला हवं. त्यासाठी कोणाचंही किंवा कशाचंही दडपण असत कामा नये. शिवाय अशा दानाची इच्छा व्यक्तीनं जिवंतपणी धडधाकट असताना नोंदवलेली असणं आवश्यक आहे. आपल्या शरीरातले कित्येक अवयव एकांडे आहेत. आपल्याला एकच हृदय असतं, यकृत, स्वादूपिंड, प्लीहा हेही अवयव एकेकच असतात. त्यामुळे त्यांचं दान करणं कोणालाही शक्य नसतं. नाही म्हणायला यकृताचा एक तुकडा दान करता येतो. कारण त्यामुळे झालेली झीज भरून येण्याची शक्यता असते. अर्थात घेता आणि दाता दोघांनाही त्याचा फायदा होतो. तरीही या दोघांच्या शरीरातील पेशी वर असलेले, त्यांची निर्विवाद ओळख पटवणारे आणि रेणूंचे गट व्यवस्थित जुळणे आवश्यक असतं. अशी जुळणी सहसा आई वडील, मुलं, भावंडं किंवा त्यांच्यासारख्या जवळच्या नातेवाईकांमध्ये शक्य असते. इतरांच्या बाबतीत अशी जुळणी होण्याची शक्यता फार कमी असते. पण काही अवयवांच्या जोड्या शरीरात वास करून असतात. दोन मूत्रपिंड असतात, फुफ्फुसंही दोन असतात. स्त्रियांच्या शरीरात बीजकोशही दोन दोन असतात. त्यांच्यापैकी एकाचं दान केलं तरी उरलेल्या एकाच अवयवाला साऱ्या शरीराचा भार पेलणं अशक्य नसतं. अशा वेळी जिवंतपणीच जोडीपैकी एकाचं दान करणं शक्य असतं. त्यासाठीही पेशीगटांची तंतोतंत जुळणी होणं गरजेचं असतंच. तसं पाहिलं तर कान, डोळे, हात, पाय या बाह्यांगावरच्या अवयवांच्याही जोड्या असतात; पण यापैकी एकाचं दान आपण करू शकत नाही. अपघातामुळे एक डोळा गमवावा लागल्यावर एकाच डोळ्यावर व्यक्ती आपला कारभार चालवू शकते. पण काही बाबतीत तिला अडचणींचा सामना करावा लागतोच. कारण दोन डोळ्यांमुळे आपल्याला समोरच्या दृश्यातल्या खोलीची जाणीव होते. एकच डोळा असेल तर त्यात काही प्रमाणात तरी अडचण उद्भवते. तीच बाब इतर अवयवांनाही लागू पडते. शिवाय यामुळे जी विद्रुपता येते तिचा सामना करणंही सोपं नसतं.परंतु एक अवयव असा आहे की ज्याचं दान आपण निःशंक करू शकतो. तो अवयव आहे रक्त. रक्तदान आज आपण जिवंतपणी करू शकतो. एकदा नाही तर अनेकदा. अर्थात त्याचेही काही निकष आहेत; आणि त्यांचं काटेकोर पालन करणं आवश्यक असतं. म्हणूनच रक्तदानापुर्वी डॉक्टर आपली तपासणी करून, आपण ते निकष पूर्ण करू शकतो की नाही, याचा अंदाज घेतात. त्यानंतरच आपल्या रक्ताचं दान स्वीकारलं जातं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम ठाणेदार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) समुद्रात सर्वाधिक प्लास्टिक कोणता देश सोडतो ?२) 'थ्रू द ब्रोकन ग्लास' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?३) तोंडातून किंवा श्वासातून येणाऱ्या दुर्गंधीला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात ?४) जगात सर्वाधिक वेतन घेणारा नेता कोण ?५) कोणत्या रक्तगटाला 'दाता रक्तगट' असे म्हणतात ?*उत्तरे :-* १) भारत २) टी. एन. शेषन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त ३) हेलिटोसिस ४) ली सियन लूंग, सिंगापूरचे पंतप्रधान ( वार्षिक १३ कोटी ) ५) o- रक्तगट*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 संजय संभाजीराव कदम, सहशिक्षक, भोकर👤 पोषट्टी कोषकेवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 प्रभाकर माळगे👤 लक्ष्मीकांत इरमलवार👤 महेश अंदस्वार👤 विजय पाटील डांगे, भाजपा तालुकाध्यक्ष धर्माबाद👤 संदीप नजारे👤 राजेश भिसे👤 गोपाळ कौरवार, भूमी अभिलेख अधिकारी, देगलूर👤 देवेंद्र शिरूरकर👤 यश कीर्तीरत्न जाधव, बिलोली👤 गंगाधर सावळे, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वाटेत पडलेला कचरा जर.. हवेने आपोआप उडून गेला असेल किंवा जात असेल तर. ..ते, आपल्यासाठी चांगलेच आहे. पण,समोर असेच होईल या भ्रमात राहू नका.कारण त्याच वाटेवर कधी, कधी मोठे,मोठे खड्डे सुद्धा असू असतात त्यांना ओलांडून पुढचा प्रवास कशाप्रकारे करता येईल या विषयी एकदातरी विचार करण्याची गरज आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कावळा आणि कोल्हा*एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली त्यासाठी एक युक्ती सुचवली. कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे. फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.जात असताना कुर्ल्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने‌ ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली. अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक करावी.तात्पर्य : या कथेतून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळता.एक म्हणजे कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये.दुसरी म्हणजे लालच खूप वाईट सवय आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 जून 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कथा - नवऱ्याचे मी पण*कुटुंबातील नात्यात असलेला घालमेल, प्रेम, जिव्हाळा आणि तिरस्कार यावर आधारित फेसबुकवर अनेक वाचकांना पसंत पडलेली ही कथा आहे. मला आशा आहे आपणांस ही कथा नक्की आवडेल. तेव्हा चला कथा वाचू या .....!पहिला भाग -------http://nasayeotikar.blogspot.com/2023/06/story-navryache-mi-pan.htmlकथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७३ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९४:महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण**१९७८:जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.**१९७६:कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.**१९४१:नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  भेट घेतली.**१९४०:दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.**१९४०:नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ’ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.**१९०८:इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण**१८९७:पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.**१७५७:प्लासीची लढाई सुरू झाली.**१६३३:गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९९३:आदित्य दवणे-- नवोदित कवी* *१९८२: प्रा.विजय हरिभाऊ लोंढे -- कवी, लेखक* *१९७९:जयश्री दाणी-- कवयित्री,लेखिका* *१९७३:मकरंद मधुकर अनासपुरे-- मराठी चित्रपट, नाटक व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते* *१९६९: कविता राजन क्षीरसागर -- कवयित्री* *१९६९:डॉ.कमलाकरराव देविदासराव चव्हाण कवी,लेखक,संपादक* *१९६८:स्वाती किशोर पाचपांडे-- लेखिका**१९६७: प्रा.डॉ.सुनंदा बोरकर -जुमले-- कवयित्री लेखिका* *१९६४:भारती बाळ गोसावी-- मराठी नाट्य‍अभिनेत्री* *१९५८:प्रा.डॉ.अर्जुन व्हटकर -- जेष्ठ साहित्यिक**१९५५:आशाताई पैठणे-- जेष्ठ साहित्यिका, कवयित्री* *१९४६:अनुपमा अशोक आंबर्डेकर-- प्रसिद्ध कवयित्री,लेखिका* *१९३९:महादेव मोरे-- कादंबरीकार, कथाकार**१९३२:अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार (मृत्यू: १२ जानेवारी २००५)**_१९०८:डॉ.विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू:९ एप्रिल १९९८)_**१८९६:नटश्रेष्ठ बाबुराव पेंढारकर – पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.(मृत्यू:०९ नोव्हेंबर १९६७)* *१८८७:ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)**१८०५:जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर (मृत्यू: १० मार्च१८७२)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*•••••••••••••••••••••••••••••••••*२०१३:शोभना लक्ष्मण गोखले -- महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुराभिलेखतज्ज्ञा आणि नाणकशास्त्रज्ञा.(जन्म:२६ फेब्रुवारी १९२८)**१९९४:अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १७ जानेवारी १९०८)**१९९३:विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते, रंगभूमीवरील अभिनेते(जन्म:१८ सप्टेंबर १९०५)**१९५५:सदाशिव ऊर्फ ’सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज (जन्म: १८ ऑगस्ट १९२३)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित योग दिनानिमित्त अमेरिकेत विशेष कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक :- अंजनेरी ते ब्रह्मगिरी पर्वत 'रोप-वे'चीसाठी निविदा निघाली, 376 कोटींचा प्रकल्प, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष! गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरात आगमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *थरारक सामन्यात कमिन्सने विजयी चौकार लगावला, पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली आहे.. त्यांनी सुरुवातीला मिळतील त्या भूमिका केल्या. मात्र त्याही भूमिका प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिल्या. शेवटी त्यांना अभिनेता म्हणून चित्रपट मिळत गेले आणि ते प्रसिद्ध होत गेले. चित्रपट जरी चालला नाही तरी त्यांचा अभिनय मात्र नक्कीच लोकांना आवडायला लागला. आज मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेले अभिनेता मकरंद म्हणून अनासपुरेंकडे पाहिले जाते. त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह अन्य बहुरंगी भूमिका केल्या आहेत. दे धक्का नावाच्या चित्रपटाने त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.मकरंद अनासपुरे यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते नाना पाटेकर याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थे अंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करतात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनाचे नंदनवन करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे परिश्रम.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २१ जून २०२३ ला कितवा 'जागतिक योग दिवस' साजरा करण्यात आला ?२) प्रथम योगगुरू कोणाला मानले जाते ?३) 'योगाचे आधुनिक पिता' असे कोणाला संबोधले जाते ?४) 'योग' या शब्दाचा अर्थ काय आहे ?५) 'योग' या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे ?*उत्तरे :-* १) ९ वा २) शिव ३) पतंजली ऋषी ४) जोडणे, संयोग ५) 'युज्' या संस्कृत शब्दापासून *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 गंगाधर तोटलोड, माजी जि.प. सदस्य, नांदेड👤 प्रा. विनोद बोटलावार, नांदेड👤 माधव बोडके👤 साईनाथ लोसरे, तेलंगणा👤 बालाजी राजापूरकर👤 सुधीर वाघमारे मरवळीकर👤 नंदेश्वर कोरे👤 साईनाथ डिब्बेवाड👤 दिनेश भंगारे👤 अभिषेक बकवाड👤 उमाकांत मोकलीकर👤 गंगाधर बोमलवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 आशा मंकावार👤 भीमराव तायडे👤 श्याम गाढे👤 स्वप्नील पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावें ॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भांडण केल्याने किंवा गैरसमज करून वणवा पेटविल्याने आजपर्यंत कोणाचे भलं झाले का. ..? ह्या विषयी आपल्याला माहीत असताना सुद्धा उगाचच आपण त्यात वेळ वाया घालवत असतो. त्या पेक्षा एकदा त्यातून कशाप्रकारे बाहेर पडता येईल त्यावर शांतपणे विचार करून बघण्याचा प्रयत्न केले तर.. अनेक मार्ग निघू शकतात. व कुठेतरी जीवन जगायला आधार होत असतात. म्हणून नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा तिथून कशाप्रकारचे बाहेर पडता येईल त्याकडेच लक्ष देणे गरजेचे आहे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गरुड आणि घुबड*एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 जून 2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक संगीत दिन_**_आंतरराष्ट्रीय योग दिन_* •••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७२ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *२००६:नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे 'निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.**१९९९:विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.**१९९८:फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.**१९९५:पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.**१९९२:विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर**१९९१:भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.**१९६१:अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.**१९४९:राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना**१९४८:पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे**१८९८:अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.**१७८८:न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.* *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••• *१९९३: डॉ.सुजाता बेलखेडे-- लेखिका* *१९८८:शीतल शांताराम पाटील-- कवयित्री* *१९८७:मुक्ती मोहन-- भारतीय हिंदी अभिनेत्री**१९७८:अॅड. देवेंद्र घनश्याम चौधरी- मराठी हिंदी व पोवारी बोलीचे प्रसिद्ध कवी, गझलकार,लेखक* *१९७४:प्रा.सध्या महाजन-- कवयित्री,लेखिका* *१९७१: मृणाल देव-कुलकर्णी-- ख्यातनाम अभिनेत्री, दिग्दर्शक* *१९७०: संजय धनगव्हाळ-- कवी लेखक व कलावंत* *१९६८:प्रा.वर्षा गगने-- कवयित्री, लेखिका**१९६६:मृण्मयी(मधू) शिरगांवकर- कादंबरी,कथा, विनोदी लेख संग्रह लेखन* *१९६१:स्वाती चांदोरकर -- सुप्रसिद्ध लेखिका* *१९५९:रवींद्र इंगळे चावरेकर -- कवी,लेखक, संशोधक* *१९५४:वसंत मार्तंड गायकवाड-- लेखक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक* *१९५३:बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)**१९४९:सुरेश विठ्ठलराव जाधव-- लेखक* *१९३३: वामन गणपतराव इंगळे-- कवी, कथाकार**१९३३: वसंत गुलाबराव गिरटकर-- कथाकार, कवी, लेखक**१९३१: सुधा दत्तात्रेय सोमण-- कथालेखिका, ललितगद्यलेखिका**१९२३:सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)**१९१६:सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू:२१ जानेवारी १९९८)**१९११: परशुराम लक्ष्मण वैद्य-- अनुवादक, संशोधक (२७ फेब्रुवारी १९७८)**१९०५:जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)**१८९६:देविदास लक्ष्मण महाजन- भाषातज्ज्ञ, लेखक, अनुवादक(मृत्यू:३ एप्रिल १९६७)**१८५६:रामचंद्र भिकाजी जोशी-- संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक व लेखक(मृत्यू:७ सप्टेंबर १९२७)* *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*••••••••••••••••••••••••••••••••• *२०२२:कृष्णाबाई नारायण सुर्वे-- लेखिका (जन्म:१९३०)**२०१२:भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)**२००३:लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)**१९८४:मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)**१९४०:डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)**१९२८:द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.(जन्म: ३ एप्रिल १८८२)* *_ आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा_* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *चिकनगुनियावर लस मिळाली, लसीच्या तिसऱ्या चाचणीचं सकारात्मक परिणाम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर, 15 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, 24 जानेवारी नंतर सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वारकरी भक्तांसाठी आनंदवार्ता! विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयआयटी मुंबईला नंदन नीलकेणी यांच्याकडून 315 कोटींची देणगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; 18 जुलै पासून होणार परीक्षेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकन काँग्रेसच्या जॉईंट सेशनला (US Congress) म्हणजे तिथल्या संसदेच्या संयुक्त सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जून रोजी संबोधित करणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPL 2023 : केदार जाधव-अंकित बावणे यांची वादळी अर्धशतके, कोल्हापूरचा सोलापूरवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय योग दिवस*https://nasayeotikar.blogspot.com/2021/06/yoga-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली.२१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. तसेच योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना या दिवशी प्रसारित केल्या जातात.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे.➖एमर्सन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला जातो ?२) योगाची उत्पत्ती कोणत्या देशातून झाली आहे ?३) पहिला जागतिक योग दिवस केव्हा साजरा केला गेला ?४) जागतिक योग दिवस - २०२३ ची संकल्पना/थीम काय आहे ?५) योगसूत्रे ( योगावरील सूत्र ) हा योगाचा प्राचीन, मूलभूत ग्रंथ कोणी लिहिला ?*उत्तरे :-* १) २१ जून २) भारत ३) २१ जून २०१५ ४) मानवता ( Humanity ) ५) पतंजली*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 कृष्णा फटाले, शिक्षण विस्तार अधिकारी, नांदेड👤 वीरभद्र बसापुरे, शिक्षक नेते, धर्माबाद👤 आनंद पाटील जाधव👤 शुभम साखरे👤 राहुल पाटील👤 हणमंत जमदाडे👤 संजयकुमार मांजरमकर👤 माधव धोंडापुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचारधारा*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्यांना जसे बोलावे वाटते तसेच ते, बोलत असतात. बोलणाऱ्याला आपण रोखू शकत नाही कारण, कोणाच्याही तोडांवर झाकण नसते. म्हणून त्या प्रसंगी जरा आपणच एकदाचे शांत बसावे. एखादे वेळी शांत बसल्याने व प्रसन्न मनाने राहण्याचा फायदा सुद्धा होत असतो .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सो.संगीता संतोष ठलाल मु.कुरखेडा जि.गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *श्रीमंत व्यापारी**एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले. अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, "मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे."तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, "तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.आत्मा म्हणाली, "माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे.""तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही." एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली. तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 जून 2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_जागतिक शरणार्थी दिन _*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १७१ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९७:’महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’तर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली.**१९६०:महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना**१९२१:टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना**१८९९:केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.**१८८७:देशातील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस. टी.) सुरू झाले.**१८६३:वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे ३५ वे राज्य बनले.**१८३७:व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणीपदी**_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* •••••••••••••••••••••••••••••••••*१९८२:विनायक येवले- समकालीन कवी व समीक्षक* *१९७८:शिल्पा प्रसन्न जैन-- कवयित्री,लेखिका* *१९७२:पारस म्हांब्रे – क्रिकेटपटू**१९६९:महेश नागोराव कुडलीकर -- कवी,लेखक* *१९६८:प्रा.शंकर किसनराव येरडे -- समीक्षक, संपादक* *१९६१:वासुदेव महादेवराव खोपडे-- कवी**१९५६:डॉ दिलीप माधवराव धोंडगे-- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संपादक, लेखक**१९५५:प्रा.डॉ.शोभा भगवान नाफडे-- लेखिका* *१९५४:अ‍ॅलन लॅम्ब – इंग्लिश क्रिकेटपटू**१९५३:भालचंद्र गंभीरराव वाघ-- प्रसिद्ध लेखक,कादंबरीकार तथा पूर्व सनदी अधिकारी**१९५२:श्रीधर लक्ष्मणराव सरपे -- कवी,लेखक* *१९५१:निंबाजीराव बागुल-- कवी,लेखक* *१९३९:रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष (मृत्यू:२८ एप्रिल १९९८)**१९३६:प्रा.अमृत संभाजीराव देशमुख -- कवी, लेखक* *१९३६:सुषमा सेठ -- भारतीय रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री* *१९३०:श्रीकृष्ण शंकर(बाळासाहेब) सराफ-- लेखक, संपादक**१९२४: डॉ.प्रभाकर लक्ष्मण गावडे-- जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ (मृत्यू:२ आगस्ट २०२१)**१९२०:मनमोहन अधिकारी – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते (मृत्यू: २६ एप्रिल १९९९)**१९२०:पंडित वसंतराव चांदोरकर --आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याचे गायक(मृत्यू:८ जुलै २००१)**१९१५:टेरेन्स यंग – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९४)**१८८५:विष्णू महादेव भट-- वैद्यकीय ग्रंथाचे लेखक (मृत्यू:३० एप्रिल १९६१)**१८६९:लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (मृत्यू:२६ सप्टेंबर १९५६)**_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२००८:चंद्रकांत गोखले – अभिनेते (जन्म: ७ जानेवारी १९२१)**१९९७:वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ’जिंदादिल’ – मराठीतले पहिले शायर (जन्म:२९ डिसेंबर १९०८)**१९९७:बासू भट्टाचार्य – चित्रफट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक (जन्म: १९३४)**१९८७:डॉ.सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी(जन्म:१२ नोव्हेंबर १८९६)**१८३७:विल्यम (चौथा) – इंग्लंडचा राजा (जन्म: २१ ऑगस्ट १७६५)**१६६८:हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (जन्म:१८ डिसेंबर १६२०)**_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *यूपी-बिहारमध्ये जीवघेणी उष्णता; तीन राज्यांमध्ये आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू !*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जूनचा शेवटचा आठवडा हा धुवाँधार पावसाचा असेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितोळा दर जीएसटीसह 61 हजारांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वेळेचे नियोजन केलात का ?* प्रत्येकाच्या जीवनात वेळ अत्यंत महत्वाची आहे. वेळेवर काम करणारी माणसे थकत नाहीत म्हणूनच ते अयशस्वी होत नाहीत..........https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात.याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अन्याय आणि अनीतीने ध्येयसिद्धी होत नाही; परंतु सत्य आणि धर्माची कास धरल्याने ध्येय सिद्धी होत असते.➖रामकृष्ण परमहंस.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जांभूळमध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?२) जांभूळ खाण्याचे फायदे सांगा.३) जांभूळ या फळाला इंग्रजीत काय म्हणतात ?४) आजाराने अपारदर्शक झालेले बुबुळ पांढरे होऊन काय होते ?५) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) व्हिटॅमिन 'सी' २) रक्त शुद्धीकरण, पाचकरस, पचनक्रिया, साखरेचे प्रमाण नियंत्रित etc ३) Java Plum/ Black Berry ४) अंधत्व येते ५) सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 किरण पाटील बेंद्रे, धर्माबाद👤 लक्ष्मण तुरेराव, लोकमत प्रतिनिधी, धर्माबाद👤 शंकर पाटील कदम, धर्माबाद👤 गणेश यमेवार, धर्माबाद👤 रामचंद्र विश्वब्रम्ह,बिलोली👤 टेककम साईराम, तेलंगणा👤 रमेश मुनेश्वर, साहित्यिक, किनवट👤 विनोद गुम्मलवार, नांदेड👤 निमेश गावीत👤 राजेंद्र पाटील👤 लक्ष्मण चन्नावार, नायगाव👤 गंगाधर गटूवार, कुंडलवाडी👤 दौलतराव वारले, सहशिक्षक, धर्माबाद👤 शादूल चौधरी, बिलोली👤 साईबाबा बनसोडे, धर्माबाद👤 मन्मथ मोकलीकर, धर्माबाद👤 अजित पिंगळे👤 संभाजी आटोळकर👤 अनिल राठोड👤 शिवा बोधने👤 गणेश अंगरोड, धर्माबाद👤 मैनोद्दीन पटेल*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती ठेच पायाला लागलेली असो किंवा मनाला. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते आणि मनाची ठेच माणसं ओळखायला शिकवते.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पर्वत आणि उंदीर**एकदा एक पर्वत आणि उंदीर यांच्यात वाद सुरू होता. 'श्रेष्ठ कोण?' यावर ते भांडत होते.पर्वत म्हणाला, "तू किती छोटा प्राणी आहेस, तू माझ्याहून अजिबात श्रेष्ठ नाहीस."उंदीर पटकन म्हणाला, "मला माहित आहे की, मी तुझ्या एवढा मोठा नाही. पण तू तरी कुठे माझ्या एवढा लहान आहेस!"पर्वत म्हणाला, "मोठ्या आकाराचे अनेक फायदे असतात. मी मोठा असल्याने आकाशात वाहणाऱ्या ढगांना अडकवू शकतो."उंदीर म्हणाला, "तू त्या ढगांना अडवू शकतोस. पण तुझ्या पायथ्याशी मी मोठी बिळे करतो. तेव्हा तू मला अडवू शकतोस का?"छोट्या उंदराने आपल्या चतुराईने पर्वतावर मात केली व तो आपल्या बिळात घुसला. तात्पर्य: छोटा असो की मोठा, प्रत्येकाला स्वतःचे महत्त्व असतेच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 19 जून 2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १७० वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* •••••••••••••••••••••••••••••• *१९९९:’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.**१९८९:इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७७:ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.**१९६६:’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.**१९६१:कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.**१९१२:अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.**१८६२:अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.*••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••*१९७४:किशोरकुमार बन्सोड -- कवी* *१९७०:राहुल गांधी –भारतीय राजकारणी, खासदार**१९५९:अशोक कुबडे--कवी,लेखक,संपादक* *१९५७:प्रा.डॉ.रविकिरण वसंतराव पंडित -- लेखक* *१९५६:शेख शब्बीर-- नगर जिल्ह्यातील लेखकांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे संकलन* *१९४७:सलमान रश्दी – बहुचर्चित लेखक**१९४१:रमेश गजानन पानसे--शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत**१९४०:शंकर भीमराव ऊफ समुद्रगुप्त पाटील -- मराठवाड्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक**१९३१:मधुकर रामदास जोशी-- हस्तलिखितशास्त्र तज्ज्ञ, प्राचीन मराठी साहित्य संशोधक,संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक**१८९८:पुरुषोत्तम बाळकृष्ण साठे--कथाकार अनुवादक (मृत्यू:१७ फेब्रुवारी १९७८)**१८७७:डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ* *१६२३:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)*••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* •••••••••••••••••••••••••••••••••*२०००:माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील चित्रपट अभिनेत्री (जन्म: ऑगस्ट १९३३)**१९९८:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)**१९९६:कमलाबाई पाध्ये – समाजसेविका(जन्म:८ आक्टोबर १९२०)* *१९९३:विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)**१९५६:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)**१७४७:नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ आक्टोबर १६९८) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'शासन आपल्या दारी' अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच 'रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेईई ॲडवान्सचा निकाल जाहीर; व्हीसी रेड्डी देशात अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताला 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प', मन की बात मधून पंतप्रधानांचे देशाला संबोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सात्विक-चिराग जोडीनं बॅडमिंटन मध्ये इतिहास रचला, वर्ल्ड चॅम्पियन जोडीचा पराभव करत फडकवला तिरंगा, असा पराक्रम करणारी भारताची पहिलीच जोडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फादर्स डे निमित्ताने प्रासंगिक लेखhttps://nasayeotikar.blogspot.com/2020/06/fathers-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सिकल सेल हा आजार 'सिकल पेशी रक्तक्षय' किंवा 'ड्रेपॅनोसायटोसिस' (ग्रीकःdrepane- विळा, kytos-पेशी) या नावाने ओळखला जातो. अलिंगी गुणसूत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने पेशींची लवचिकता कमी होते. यामुळे गुंतागुंत निर्माण होते. लाल रक्तपेशीतील हीमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशीचा आकार बदलतो. असे रुग्ण अल्पायुषी असतात. 1994च्या संयुक्त संस्थानामध्ये झालेल्या पहाणीत हा आजार झालेल्या पुरुषांचे सरासरी वय 42 वर्षे आणि स्त्री रुग्णांचे वय 48 वर्षे आढळून आले. ब्रिटनमधील नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये सिकल पेशी रुग्णांचे सरासरी वय 53-60 वर्षे आढळले आहे.सिकल पेशी आजार झाल्याचे लहानपणी दिसून येते. उष्ण प्रदेशातील सहाराच्या दक्षिणेस रहाणा-या आफ्रिकेमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आहे. सिकल पेशी आजाराच्या भौगोलिक प्रसारामधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव जेथे अधिक आहे अशा ठिकाणी सिकल पेशी आजार प्रामुख्याने आढळला आहे.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे, तर औदासिन्य हे रोगाचे घर आहे.➖हेली बर्टन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सागरतळाशी होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना काय म्हणतात ?२) हडप्पा संस्कृतीमधील लोक कोणती मुख्ये पिके घेत ?३) हवेतील जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबातील रूपांतर म्हणजे काय होय ?४) संख्यारेषेवर शून्याच्या डावीकडे कोणत्या संख्या असतात ?५) वनस्पतींची वाढ कशाच्या दिशेने होते ?*उत्तरे :-* १) त्सुनामी लाटा २) गहू, सातू ( बार्ली ) ३) दवबिंदू ४) ऋण संख्या ५) प्रकाशाच्या दिशेने *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रताप भिसे, सहशिक्षक👤 शंकर बेल्लूरवाड👤 नागेश कोसकेवार👤 खुशाल बोकडे👤 नारायण शिंगारे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते. आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे, भविष्याचा विचार करत बसायचे कि, आलेला क्षण आनंदाने जगायचे हे आपण ठरवायचे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *कोल्ह्याची फजिती*एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्या बद्दल बोलत होते.कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांच्या खूप राग येतो.""मलाही येतो." मांजर म्हणाली.कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.""तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले."अनेक युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी काटेरी झुडपातून धावतो. कधीकधी जंगलातल्या दाठ झुडपात जाऊन बसतो. तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो. अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."मांजर म्हणाली,"मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे.""अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?" कोल्हाने विचारले."बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत. " असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.मांजर मनात म्हणाली,. "बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."तात्पर्य: कोणत्याही एकाच विषयात प्रवीण व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 जून 2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळविरोधी दिन_*••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६८ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *१९९१:भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर 'भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९६७:चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.**१९४४:आइसलँडने (डेन्मार्कपासुन) स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.**१९४०:दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८१:शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू**१९७९:अरविंद सगर-- मराठी गझलकार, कवी,गीतकार**१९७५: द.ल.वारे--- कवी, कथाकार**१९७३:लिअँडर पेस – भारतीय टेनिसपटू**१९७१: हरिश्चंद्र बबन खेंदाड-- कवी,लेखक**१९६१:प्रा.डॉ. विनायक त्रिपत्तीवार -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९५९: स्वाती देशपांडे -- कवयित्री,लेखिका**१९५६: किसन अमृत वराडे-- प्रसिद्ध कवी लेखक* *१९५३:प्रा.डॉ.जगदीश माधवराव कदम-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक* *१९५१:विनय आपटे-- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता(मृत्यू:७ डिसेंबर २०१३)**१९४५:प्रा.शारदा तुंगार -- मराठी, हिन्दी मासिकाच्या संपादिका**१९४२:भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र व गोवा राज्याचे माजी राज्यपाल, माजी मुख्यमंत्री उत्तरांचल**१९४१:अरूण मार्तण्डराव साधू -- लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक,ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष (मृत्यू:२५ सप्टेंबर २०१७)**१९४०:डाॅ.विनय वाईकर -- भूलतज्ज्ञ,लेखक,प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी (मृत्यू:२ जानेवारी २०१३)**१९०३:बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक (मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४:इंदुमती पारीख -- व्यवसायाने डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्या(जन्म:८मार्च १९१८)**१९९६:मधुकर दत्तात्रय तथा ’बाळासाहेब’ देवरस – रा. स्व. संघाचे तिसरे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)**१९९१: प्रभाकर बलवंत माचवे-- हिंदी भाषकांना मराठी भाषेतील पुस्तकांचा परिचय अनुवादकातून करून देणारे भाषांतरकार (जन्म:२६ डिसेंबर १९१७)**१९८३:शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व वितरक* *१९६५:मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०)**१९२८:पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक (जन्म: ९ आक्टोबर १८७७)**१८९५:गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक, प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (जन्म: १४ जुलै १८५६)**१६७४:राजमाता जिजाबाई-- मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते(जन्म:१२ जानेवारी १५९८)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण, माजी शिक्षणाधिकारी नागपूर*मोबाईल : 9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळेने एकाच दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार असल्याचे पत्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *5 स्टार हॉटेलप्रमाणे दिसणारा देशातील पहिलं खाजगी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेशात बनवण्यात आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोन्याच्या जेजुरीत माऊलींची पालखी दाखल, यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत, चंद्रकांत पाटलांनी घेतली कुटुंबियांची भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणी साठा; जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने आशिया चषकावर नाव कोरत इतिहास रचला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी20, टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ये तो बस ट्रेलर है*https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*1839 :  लॉर्ड विल्यम बेंटिकचे निधन*लॉर्ड विल्यम बेंटिक यांची भारतातील कारकीर्द 1828 - 1835 अशी होती. त्याने भारतात अनेक पुरोगामी आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. बेंटिक यांने 1829 चा सती प्रतिबंधक कायदा राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने पास केला. प्रारंभी हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यात आला. बेंटिकने लॉर्ड मेकॉलेचा शिक्षणाचा 1835 चा शिक्षणाचा झिरपता सिद्धांत संमत केला. निर्दोष आणि दुर्बल लोकांना लुटणाऱ्या डाकूंचा व हत्यारांचा समूह 'ठगांचा' बंदोबस्त केला. म्हैसूरचा कारभार हाती घेऊन कुर्ग राज्य खालसा केले. बालहत्त्या आणि नरबळीवर बंदी आणली. लॉर्ड विल्यम बेंटिक ची कारकीर्द म्हणून ओळखली जाते. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा कायदा पास केला. 1835 मध्ये बेंटिक ने 'कलकत्ता मेडिकल कॉलेजची' स्थापना केली.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन. कारण पुस्तके जिथे असतील तिथे स्वर्ग निर्माण होतो. 📚 लोकमान्य टिळक*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विलायती चिंच अजून कोणत्या नावाने ओळखली जाते ?२) महात्मा फुले यांनी अवतारवादाची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली ? ३) तांबे व पितळ या भांड्यांना कलई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ? ४) मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?५) जगातील सर्वात खोल दरी कोणती ?*उत्तरे :-* १) इंग्रजी चिंच, फिरंगी चिंच, गोरटी इमली, चीचबिलाई २) गुलामगिरी ३) कथिल ४) वर्षा गायकवाड ५) मरियाना गर्ता, प्रशांत महासागर *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 आकाश रेड्डी, युवा नेता, धर्माबाद👤 धनंजय गुडसुरकर, साहित्यिक तथा शिक्षक, उदगीर👤 गणेश गुंडेवार👤 प्रवीण जावळे👤 भास्कर भेदेकर चिटमोगरेकर👤 लालू शंकरोड, धर्माबाद👤 जयराम मोरे, साहित्यिक जळगाव👤 दिग्विजय पाटील चव्हाण, चिरली👤 राजा यलकटवार👤 गजानन पाटील, माध्यमिक शिक्षक, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा ।। सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*सत्य को कहने के लिए,**किसी शपथ की जरूरत नहीं होती।**नदियों को बहने के लिए,**किसी पथ की जरूरत नहीं होती।**जो बढ़ते हैं जमाने में, अपने मजबूत इरादों पर,**उन्हें अपनी मंजिल पाने के लिए,**किसी रथ की जरूरत नहीं होती।*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घोड्याला चांगलीच अद्दल घडली**एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते. वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, "मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे. मला ते फारच जड होत आहे."घोडा म्हणाला, "जड होवो की हलके. मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस."घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्या मुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले. चालता चालता घोडा मनात म्हणाला, "मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल. तात्पर्य: इतरांना सहाय्य करा.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16 जून 2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *_ या वर्षातील १६७ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *१९९०:मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्‍चांक गाठला गेला.**१९६३:व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.**१९४७:नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.**१९१४:सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका**१९११:एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.**१९०३:फोर्ड मोटर कंपनीची स्थापना*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४:आर्या आंबेकर – गायिका**१९६७: प्रा.अंजली बर्वे-- लेखिका**१९६३:डॉ.गीता श्रीकांत लाटकर-- कवयित्री, लेखिका**१९५७: सुरेश गोपाळ काळे-- कवी* *१९५२:प्रा.नागोराव कुंभार--लेखक,संपादक**१९५१: संजीवनी बोकील-- कवयित्री**१९५०:मिथुन चक्रवर्ती-- भारतीय चित्रपट अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता , उद्योजक* *१९४८:डॉ.तुषार श्रीधरराव झाडे: कथाकार, कवी**१९४५:रजनी परुळेकर-- मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवयित्री(मृत्यू:५ मे २०२२)* *१९४५:मधुकर यादवराव अंबरकर-- कवी लेखक (मृत्यू:२३ नोव्हेंबर २०१५)**१९३७:प्रकाश नारायण संत-- मराठीतील नामवंत कथाकार(मृत्यू:१५ जुलै २००३)* *१९३६:उषा माधव देशमुख-- प्राचीन व अर्वाचीन वाड्:मय आणि संतसाहित्याच्या अभ्यासक**१९३६:अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)**१९३५:पंडित यशवंत महाले -- आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक**१९३४: सुरेश दत्तात्रय नाडकर्णी-- वैधकविश्वावर लेखन करणारे लेखक (मृत्यू:२८ सप्टेंबर २००३)**१९२०:हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)**१८९८:दिनकर वासुदेव दिवेकर-- ललित लेखक (मृत्यू:२३ जुलै २९५७)**१८९५: देविदास लक्ष्मण महाजन-- कवी अनुवादक (मृत्यू:३ एप्रिल १९६७)*•••••••••••••••••••••••••••••••••••••• *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००२:जयंत भानुदास परांजपे--समीक्षक, संशोधक, कादंबरीकार, कवी(जन्म:३१ मे १९४५)**१९७७:श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (जन्म: ३ जुलै १९१२)**१९४४:आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)**१९२५:देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले.(जन्म:५ नोव्हेंबर १८७०)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर*मोबाईल:9822695372 ईमेल: chavhansk65@gmail.com~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *MPSC परीक्षेमध्ये प्रमोद बाळासाहेब चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांक, सोनाली अर्जुनराव म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक तसेच विशाल महादेव यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *'आरे'चे अतिरिक्त कर्मचारी एफडीएकडे वर्ग करणार - राधाकृष्ण विखे पाटील*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच 'ज्युनिअर आणि सीनियर केजी'चे वर्ग; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील 4000 कोटींचा तोटा आला 10 कोटींवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार, NDRFची 33 पथकं तैनात, बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम, समुद्र खवळला; पर्यटकांना दूर राहण्याचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटनासाठी बंद राहणार; 15 ऑक्टोबरपासून पुन्हा पर्यटनासाठी खुले होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPL 2023 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन, मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या नृत्य अदावर प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालक नव्हे ; मित्र बना*https://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती*.बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या मिथून चक्रवर्ती यांचा आज जन्मदिवस आहे. बॉलिवूडच्या 'दादां'चा जन्म 16 जून 1952 साली झाला होता. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे चढउतार पाहणाऱ्या दादांचा आजवरचा प्रवास खडतर होता.मिथून दादांना अनेक प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले आहेत. यामध्ये अनेक नॅशनल अवॉर्ड्स देखील सामील आहेत. मिथून चक्रवर्तींना दोन चित्रपटांसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत. त्यापैकी एक 1992 मधील बंगाली फिल्म Tahader Katha साठी मिळाला होता.तर दुसरा अवॉर्ड त्यांना 1998 मध्ये आलेला चित्रपट 'स्वामी विवेकानंद'साठी मिळाला होता. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतात्यांच्या करियरमधील फक्त एवढ्याच बाबी उल्लेखनिय नाहीयेत. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र, मिथून दादांनी आपल्या संपूर्ण करियरमध्ये तब्बल आठ भाषांमध्ये काम केलं आहे.    त्यांनी पंजाबी, बंगाली, हिंदी, उडिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यानंतर देखील त्यांच्या अनेक अशा बाबी शिल्लक राहतात, ज्या उल्लेखनिय आहेत. मिथून दादांचा अभिनय इतका सुपरफास्ट आहे की, त्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झालं आहे.  दादांना उगाच दादा म्हटलं जात नाही. मिथून खऱ्या अर्थाने बॉलिवूडचे दादा ठरतात ते या रेकॉर्डमुळेच. एका वर्षामध्ये लीड ऍक्टर म्हणून तब्बल 19 चित्रपटांमध्ये काम करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मिथून चक्रवर्ती यांनी केला होता. हे वर्ष होतं 1989 चं... याच वर्षी मिथून दादांचे एकामागोमाग एक असे तब्बल 19 चित्रपट रिलीज झाले होते. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड अद्यापही कुणी तोडू शकलेलं नाहीये.  मिथून दादा आता फार मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करतात. ते सध्या हॉटेल देखील चालवतात. खासकरुन उटीमध्ये त्यांचे अनेक हॉटेल्स आहेत.  *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके म्हणजे समयरुपी सागरात उभे केलेले दीपस्तंभ होत.➖ इ.पी. विपिल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महात्मा गांधीजी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली ? २) भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ?३) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?४) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?५) सर्वात मोठा दिवस कोणता ?उत्तरे :- १) सुभाषचंद्र बोस २) कल्पना चावला ३) आळंदी ४) अमरावती ५) २१ जून*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी पापनवार , सहशिक्षक, नांदेड👤 सोहेल शेख👤 गोविंद नल्लावाड, सहशिक्षक👤 माधव गैनवार👤 दत्ता रेड्डी सुरकूटवार👤 डॉ. मंगेशकुमार अंबिलवादे, औरंगाबाद👤 अनिल हिस्सल, सहशिक्षक, जळगाव👤 शानिल पाटील👤 तेजिंदर कौर सभेरवाल👤 अब्दुल नासिर शेख👤 हन्मंलू गड्डपवार👤 अशोक चेपटे👤 नामदेव दळवे👤 दीपक ढगे👤 ज्ञानेश्वर चिखले👤 विजयकुमार भोळे👤 कार्तिक स्वामी👤 ज्योती पाटील👤 ऋषिकेश भंडारे👤 बालाजी शिंदे उंद्रीकर👤 सुदर्शन दरगू👤 गजानन गडपवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें। जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात, चेहराच खरा आरसा असतो तो जो ओळखू शकतो तोच मस्त जीवन जगू शकतो…!*संकलन :- मंगेश कोळी••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वाईट संगतीचे परिणाम*एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात कावळ्यांचा एक मोठा थवा रोज यायचा. ते कावळे शेतातील पिकांची नासाडी करायचे. त्यामुळे शेतकऱ्याला खूप त्रास व्हायचा. शेतकऱ्यांने एकदा त्यांना धडा शिकवायचे ठरवले.एक दिवशी शेतकर्‍याने शेतात जाळे पसरून ठेवले. त्यावर थोडे धान्य टाकले. कावळ्यांनी धान्य पाहिले व ते धान्य खाण्यासाठी शेतात उतरले अन् जाळ्यात अडकले. सगळे कावळे जाण्यात अडकलेले पाहून शेतकरी खुश झाला. तो म्हणाला, "अरे चोरांनो, आता तुम्हाला चांगली शिक्षा मिळेल." एवढ्यात त्याला एक केविलवाणा आवाज ऐकू आला. त्याला आश्चर्य वाटले.त्याने काळजीपूर्वक पाहिले तर त्या जळ्यामध्ये कावळ्या बरोबर एक कबूतर अडकलेले त्याला दिसले. शेतकरी कबुतराला म्हणाला, "तु कसा काय या टोळीत सामील झालास? पण आता काहीही झाले तरी मी तुला सोडणार नाही. तू वाईट संगत धरलीस त्याचा परिणाम तुला भोगावाच लागेल." असे म्हणून शेतकऱ्यांने आपल्या शिकारी कुत्र्यांना बोलावले. धावत आलेल्या कुत्र्यांनी एकामागून एक सगळ्या पक्षांना ठार मारले. *तात्पर्य: वाईट संगतीत राहू नये.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 जून 2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेख - *शाळेला चाललो आम्ही*आज शाळेचा पहिला दिवस त्यानिमित्ताने .........https://nasayeotikar.blogspot.com/2016/06/school-chale-hum.htmlवरील लिंकवर क्लीक करून लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🚥🌐 .  *दिनविशेष .*  🌐🚥••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_जागतिक हवा दिन_* ••••••••••••••••••••••••••••••••••• *_ या वर्षातील १६६ वा दिवस आहे_* •••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_महत्त्वाच्या घटना:_* ••••••••••••••••••••••••••••••• *२००८:’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.**२००१:ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.**१९९४:इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.**१९९३:संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त**१९७०:बा.पां.आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.**१९१९:कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.**१८६९:महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.**१८४४:चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८८:बापू सोपान भोंग-- कथा, कादंबरी लेखन करणारे लेखक* *१९८०:अनिल दादासाहेब साबळे-- कवी, लेखक* *१९७८: संतोष दिगंबर आळंजकर -- कवी* *१९७५: प्रा.डॉ.सुशिलप्रकाश यादवराव चिमोरे-- कवी,समीक्षक,संपादक* *१९७४:डॉ.सोपान माणिकराव सुरवसे-- लेखक,समीक्षक* *१९७४:डॉ.विनोद पांडुरंग सिनकर-- कवी* *१९७४: कादर राजूमिया शेख-- कवी(पंकज) शिक्षणाधिकारी (गोंदिया)**१९७२:चेतन हंसराज -- भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता**१९७१:सतीश माणिकराव जामोदकर-- कवी,लेखक,संपादक* *१९७०: डॉ.प्रकाश राठोड -- लेखक**१९६६: मनोहर आंधळे-- कवी* *१९६४:मीलन सुरेश येवले- कवयित्री, लेखिका**१९५९:डॉ.सुहास भास्कर जोशी- प्रसिद्ध लेखक**१९५६:हेमंत जगन्नाथ रत्नपारखी-- कवी, लेखक* *१९५५:आनंद वामन उगले-- कथाकार, निवृत्त गटशिक्षणाधिकारी**१९४८:प्रकाश एदलाबादकर- प्रसिद्ध स्तंभलेखक**१९४७:प्रेमानंद गज्वी – मराठी साहित्यिक व जेष्ठ नाटककार**१९४५:अर्जुन उमाजी डांगळे-- कवी, कथाकार**१९४२:प्रा.भाऊ लोखंडे-- आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक,साहित्यिक (मृत्यू:२२ सप्टेंबर २०२०)**१९३७:रामचंद्र बाळकृष्ण कोलारकर -- संशोधक, संपादक, अनुवादक, कथासमीक्षक, कथासंकलक**१९३७:किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक**१९३३:सरोजिनी शंकर वैद्य –ललितलेखिका, चरित्रकार, समीक्षक (मृत्यू:३ऑगस्ट २००७)**१९२९:सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)**१९२८:शंकर विनायक वैद्य –कवी, समीक्षक वक्ते कथाकार (मृत्यू:२३ सप्टेंबर २०१४)**१९२३:केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – कथाकार, कादंबरीकार,१९८९ साली अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (मृत्यू:१७ ऑक्टोबर २०१८)**१९१७:सज्जाद हुसेन – संगीतकार (मृत्यू: २१ जुलै १९९५)**१९०७:ना.ग.गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू: १ मे १९९३)**१९०६:गंगाधर भाऊराव निरंतर-कादंबरीकार, ललित लेखक(मृत्यू:१३ मार्च १९५९)**१८९८:गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)* •••••••••••••••••••••••••••••••••••••• 💥 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३:श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल१९१०)**१९७९:सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)**१९३१:अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, ’संदेश’कार (जन्म: १८७९)* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ *_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *✍ संकलन :- श्रीराम चव्हाण नागपूर*📱 9822695372 chavhansk65@gmail.com••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2023-24 वर्षातील शाळांना आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रतिष्ठेचा शाहू पुरस्कार यंदा डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पत्रकार परिषदेत माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला तर देशात सातव्या क्रमांकावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ST कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार महागाई भत्ता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणाची आंबेडकर इंटरनॅशनल मिशन संस्थेकडून दखल, कायदेशीर मदत देण्याची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा इंग्लंड दौरा जाहीर, या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसाच्या शब्दा शब्दात ज्ञान असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड**प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?२) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत ?३) चंद्रगुप्त मौर्यचा गुरू चाणक्य यांना अजून कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) 'ग्राम गणराज्य'ची संकल्पना कोणाची होती ?५) स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो ?*उत्तरे :-* १) केरळ, सिंगभुम ( झारखंड ) २) अँथनी अल्बानिज ३) कौटिल्य, विष्णुगुप्त ४) महात्मा गांधी ५) कॉर्बन मोनोऑक्साईड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि.प.व.प्राथ.शाळा भोसा, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संजय नोमुलवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 हनमंलू शंकरोड, येवती👤 चंद्रकांत जोशी, धर्माबाद👤 गणेश पाटील जगदंबे👤 चंद्रकांत दुडकावार, सहशिक्षक, देगलूर👤 दत्तात्रय राऊतवाड👤 काशिनाथ राऊत👤 साईनाथ शिलेवाड👤 असद बेग👤 जयदीप गावंडे👤 नागेश रासनगीर👤 ज्ञानेश्वर शिरगिरे👤 संतोष गंगूलवार कासराळी👤 आनंद यशवंतराव पाटील, सहशिक्षक, धर्माबाद👤 अनिल कांबळे, सहशिक्षक, नांदेड👤 संजय गैनवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 मारोती पाटील👤 दिगंबर मरकंटे, सहशिक्षक, बिलोली👤 शंकर गोसकेवार👤 अनिल बापकर👤 गणपतराव कात्रे, धर्माबाद👤 सत्यनारायण पांचाळ जुनीकर👤 साईनाथ शिलेवाड, येवती👤 संगीता संगेवार-दरबस्तेवार👤 शिलवंत डुमणे👤 गिरीधर जाधव👤 माधव उरेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 सचिन पाटील शिंदे👤 सय्यद अक्रम सय्यद जाकीर👤 बालाजी पाटील कदम👤 शेषराव पाटील हिवराळे👤 गंगाधर मावले, शिक्षक नेते, नायगाव👤 नरसिंग गुर्रम, नांदेड👤 धनाजी देशमुख👤 गिरीश जाधव👤 राम मोरे👤 राम लगड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕊🌎 ‼ *विचार धन*‼🕊🌎••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणसाचा स्वभाव*"पिण्डे-पिण्डे मतिर्भिन्न: कुण्डे-कुण्डे नवं पयःजातो जातो नवाचारा: नवा वाणी मुखे-मुखे।" या नियमाप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, तितकेच भिन्न-भिन्न स्वभाव, वेगवेगळ्या आवडी-निवडी, चित्र-विचित्र सवयी या असणारच. अगदी सख्खे चार भाऊ असले तरी प्रत्येकाच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात.स्वभाव वैशिष्ट्यांमुळे माणसांचे सज्जन-दुर्जन, सुष्ट-दुष्ट, रागीट-शांत, दयाळू-क्रूर, उदारकंजूष, स्वार्थी-निस्वार्थी, कष्टाळू-आळशी, धाडसी-भित्रे व नम्र-उद्धट असे अनेक प्रकार पडतात.एखाद्या माणसामध्ये एखाद्या गुणाचा अथवा दोषाचा अतिरेक झाला तर त्याची गणना विक्षिप्त अथवा लहरी माणसात केली जाते. एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या योग्यतेपेक्षा जास्त मानाचे, उच्च स्थान प्राप्त झाले तर त्याला त्या सत्तेचा उन्माद चढतो. समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो मनुष्य तुच्छ समजू लागतो. समोरच्या माणसाचे ज्ञान, बुद्धी, वय, त्याचे विचार, समाजातील स्थान याचा विचार न करता पदोपदी त्यांचा अपमान केला जातो. वादासाठी वाद घालण्यात आणि शेवटी आपलेच म्हणणे खरे करण्यात त्यांना धन्यता वाटते. उच्चासनावर बसणे म्हणजे इतरांच्यावर हुकूमत गाजविणे, जमेल तेवढा त्रास देणे, मुद्दाम गैरसोय करणे व स्वत:च्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यास आकांड-तांडव करणे. त्यांच्या मते, सौजन्य आणि विनम्रता या गोष्टी वरिष्ठांसाठी नसतातच. समाजात असे मदांध सत्ताधारी काही कमी नसतात.याउलट काही काही अतिशय उदारमतवादी, विद्वान व तरीही विनम्र असतात.नेटवरून संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गर्विष्ठ मोर*एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा!! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्यासारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं ? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो. "एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला. *तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~