कविता - खाणाखुणा मन आहे आकाशा समान त्यास नाही काही मर्यादा अनेक खाणाखुणा जपून राहतात मनात अनेकदा मन चोहीकडे फिरताना नित्य तव सौंदर्यास पाही मनाचे हे सौंदर्य मग कळणार नाही केव्हाही मन जेव्हा निष्ठुर होते तेव्हा नाही करत काळजी कोणाची अंतरीच्या भावनांचा कलह मग तमा बाळगत नाही कुणाची मनात साचलेले प्रेम किती मन मंदीराच्या स्थळी असे राहणार त्याच्यामध्ये गुंतून तर सोसावे सारे लागत असे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*गुरुमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी* १) आनंदाने बैलगाडीत बसून मजा करू लागले मामाच्या गावाला जायचा आनंद प्रत्यक्ष घेऊ लागलेे. २) सर्जा राजाची जोडी शोभून भारी दिसते दादा गाडी हाकतानाची मजाच भारी असते. ३) बैलगाडीचा आनंद घ्यायला खेडेगावीच जावे लागते शहरातील मुलांना हा अनुभव फार वेगळा वाटते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

*चारोळी - खाणाखुणा* अनेक आठवणीच्या तुझ्या मी जपून ठेवल्यात खाणाखुणा कस सांगू तुला मी प्रिये माझ्या प्रीतीचा हा वेडेपणा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

चारोळी - ताटवा आनंदाचा शेतात राबराबतो बळीराजा काळया मातीत पिकवितो मोती घरादारात सुखात नांदते लक्ष्मी ताटवा आनंदाचा मनी फुलती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - ताटवा आनंदाचा नभी मेघ फिरूनया सारे पाऊसधारा पडून अंगणी रूप बघेे धरतीचे सारे ताटवा आनंदाचा असे मनी सूर्य हळूच डोकावूनी पाही आकाशी अलगद उठे रवी सोनेरी किरणे तो दावी रूप धरञीचे चमकवी पानापानात पडती थेंब टपोरे फुलाफुलात फिरती भोवरे मोती नभातून गळे सारे जसे रूप धरा रचले मनोरे सरी भिजवी तनामनाला अंगी झेलूनीया तुषार ताटवा आनंदाचा फुलला हर्षआनंद मनी जाहला फार प्रीत फुलती धरतीवर असे नाते घट्ट तिचे आकाशी बि रुजती, अंकुरती पिके उगवती मातीशी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - लाजलेली फुले गडद काळोख्या अंधाऱ्या रात्रीत लाजलेली फुले उमलती पहाटे सुगंधी फुले येऊन तव वेली निशाचर मनी मग हर्षुनी दाटे लाजलेली अशी ही फुले कौमुदीत मन हे तव नाहे अंतरंगीत भावगीत खुले स्वरास्वरात ओठी मग वाहे नेत्राच्या अंतरंगात माझ्या मन माझे अंतरी जव डुले स्वप्न रंग मनीचे माझ्या मग भावचकोर होऊनी तव फुले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

चारोळी - लाजलेली फुले बागेत उमलती लाजलेली फुले फुलपाखरू मग हळूच खेळे शाळेत दिसती गोंडस मुले मैदानी आनंदाने सारीच खेळे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धा* 1) तुझी आठवण येते तेव्हा एकांतात मी उभी राहते तुझ्याच विचारात मी मग नजर माझी वाटेकडे लावते 2) एकांतात उभी राहून शांत मनमीत डोळ्यात पाहते तव स्वप्नरंग मनीचे माझ्या माझं काळीज अंतरी कापते 3) सडपातळ बांधा गोड चेहरा रंग गुलाबी शोभतोय छान शब्द तिच्या ओठी लपलेले नाही तिला कोणतेच भान 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - मले काही सांगू नको लय मोठ शिकून मी डाक्टर होणार हाय बा मले काही सांगू नग मले माह्य सपन पूर करायचं बा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - मले काही सांगू नको धनी म्या सांगते तुमास्नी पोरगी वयात आलिया यंदा तिचं लगीन आपण उरकून मात्र टाकूया मले काही सांगू नको म्या पोरीला शिकविणार उच्च शिक्षण देऊन तिला कलेक्टर म्या माञ करणार पोरीची मले बी हाय काळजी असं समजू नको तु मले धनी तुवा हाय निष्काळजी पण समजून घे तू पोरीले घरदार, शेतसार विकून म्या लेकरांना शिकून मोठ करीन आपण राहिलो अडाणी पण भविष्य त्यांचे म्या घडवीन चुकलं धनि माह्य सार इचार नव्हता केला मी शिक्षणाचं मोल हे सार समजून घेतल आता मी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - मानवसेवा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा म्हणूनच सत्कर्म करावे अपरंपार आईने दिलेली मोलाची शिकवण वर्तनी उतरवावी जीवनभर 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे*

कविता - मानवसेवा सत्कर्माची सर्वत्र पेरून बीजे एकमेका आपण सहाय्य करू मानवसेवा हा धर्म बाळगून मानवता आपण दाखवू सत्याची आपण कास धरु नाती माणुसकीची सांभाळू विसरून जाऊ द्वेषभावना प्रेमाने जगी सारे आपण राहू आई-वडिलांचा सांभाळ करू कधीच त्यांचे मन नाही दुखवू करून सेवा त्यांची आपण आशीर्वाद त्यांचा मिळवू पर्यावरणाचे संरक्षण करू वृक्षारोपण आपण सारे करू मातीशी नाती घट्ट बांधून आपुले निसर्गावर आपण प्रेम करू 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

चारोळी - थडग्याची व्यथा भुकेल्या पोटी अन्न मिळेना थडग्याची व्यथा कोणी जानेना श्रीमंतांची श्रीमंती वाढत जाते गरीब बिचारा दारिद्र्यातच जगते प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - थडग्याची व्यथा थडग्याची व्यथा नाही कोणी जाणली परस्परांबद्दल आपुलकी आता नाही राहिली जीवन गरिबीचे कसे असते? भुकेल्या पोटी अन्न मिळत नसते घाम गाळून ,अश्रू शोषून दारिद्र्याचे जीवन त्यांच्या नशिबी असते स्मशानात जाई गोवऱ्या त्यांच्या तरीही कष्टा त्यांचे कमी नसते मृत्यू आवळेल मग फासे , मृत्यू हसेल साक्षात परंतु त्यांच्यात काही फरक नसे गरीबीत जीवन जगणे हे असेच असे ध्येय जगण्याचे सार्थकी लावूया थडग्याची व्यथा जाणून घेऊया मनी ठेवूनी भावना सहकार्याची शिदोरी बांधून नेऊया सत्कर्माची 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - मनातलं मनाशी एकटेपणातच मन रमवावे एकटेपणानेच हे जीवन जगावे मनातलं मनाशी हितगुज एकट्यानेच मग मनाला सांगावे डोळ्यात आलेल्या अश्रूंना आपणच मग पुसावे,अन् हृदयातल्या वेदनेला मग एकट्यानेच समजुनी सांगावे स्वःतावर विश्वास ठामपणे ठेवून आत्मविश्वासाने जगावे,अन् आलेल्या संकटांना मग घाबरून न जाता,संघर्षाने जीवन जगावे आपले अश्रू आपण पुसले तरी दुसऱ्यांचे अश्रू मात्र पुसावे, देऊन मदतीचा हात इतरांना जीवन एकटेच जगावे व्यथा ही जीवनाची कोणतीही मनातल्या मनाशी सांगावी उजेडाने साथ सोडली तरीही अंधाराशी मात्र घट्ट मैत्री करावी कुणाच्या मदतीची ,आधाराची अपेक्षा न करावी, अन् करताच आले तर सहकार्याची भावना बाळगून माणुसकी निभवावी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - मनातलं मनाशी तडकलेच जर ह्रुदय कधी जोडतांना असंख्य होतात यातना मनातलं मनाशी सांगतांना मग असह्य होऊन जातात वेदना 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - डोळ्यात माझ्या नीर नितळसा डोह मनाचा स्पष्ट खोल दिसावा तळात डोळ्यात माझ्या थोपवुन लाटा वाहून नेतील अश्रूसंगे क्षणात प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

डोळ्यात माझ्या डोळ्यात माझ्या आठवणीचे बोल आईबाबाचे पुण्य अनमोल झाले मी कृतज्ञ त्यांच्या ठायी कैसी फेडू मी त्यांची ऋणायी कष्टाचे हे मोल त्यांचे अप्रतीम होते बोल तयांचे ध्यानी मनी रुजले मज सत्य हे उमजले आज स्मरण तुझे होताच आई डोळ्यात माझ्या पाणी येई तृप्त होउन नयन माझे मग आठवणीत तुझ्याच राही आईवडिलाची पुण्यायी सार्थकी लागली जीवनी संस्काराची ही शिदोरी ठेवीली मी माझ्या अंतःकरणी पानाफुलांचा कळसात आईवडील आहे माझ्या काळजात कितीही थोरवी मी त्यांची गाईन ऋणाईत त्यांच्या राहीन ऋणाईत त्यांच्या राहीन ऋणाईत त्यांच्या राहीन 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

चारोळी - भेगाळलेले मन लोपला होता तुझा तो स्पर्श विरला तो प्रितीचा झरा भेगाळलेले मन हे माझे सोबतीला धगधगता निखारा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

चारोळी - भेगाळलेली मने लोपला होता तुझा तो स्पर्श विरला तो प्रितीचा झरा भेगाळलेली मने ही सारी सोबतीला धगधगता निखारा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - भेगाळलेली मने ऐकाच वाटेने चालत होतो भेगाळलेली मने घेऊन जेव्हा कोणत्याच गोष्टीची खंत नव्हती प्रवास आयुष्याचा संपला तेव्हा मी रुसावे तू हसावे असे नाते अपुले होते जेव्हा मन थोडे गहिवरून येईल कायम दुरावा झाला तेव्हा तुझ्या वागण्याचं गुपित अजूनही नाही कळलं मला तुला भावनाऱ्या गोष्टीचे वादळ शिरे माझ्या मनाला जी जळत होती आत मने ती पूर्वी होती शांत शांत अलविदा करित होते आयुष्य डोळे भरून येई एकांत एकांत 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

*चारोळी - हसरी मूर्ती..* *१) धवल शुभ्र चांदण्यांची* *लयलाट आकाशी दिसे* *हसरी मुर्ती पाहूनी चंद्राची* *मन माझे आकाशी वसे* *चारोळी - हसरी मूर्ती..* *२) कधी संपेल हा दुःखद काळ, कधी होईल पुर्ववत* *सारे , हसरी मुर्ती असणारे* *कधी दिसेल बालगोपाळ* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

*चित्र चारोळी - स्पर्धेसाठी* १) अंगणी आहे तुळशी वृंदावन मन माझे गेले भारावून प्रज्वलित झाल्या पणती तेजोमय सर्वत्र दिसती २) सण दीपावलीचा आला अंगणी प्रकाश पसरला दिसे शोभून तुळशीमाय स्नेहाचा सुगंध दरवळला ३) थकल्या जीवास विसावा सांजेचा तेजोमय प्रकाश पडती पणत्यांचा उगवेल दिस नव्या उमेदीचा आशीर्वाद मिळे तुळशी मायेचा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - प्रेमास रंग यावे तू अबोल असते तेव्हा माझ्या प्रेमास रंग यावे तू बोलतेस तेव्हा प्रेम माझे फुलून यावे तुझा हसरा चेहरा पाहुनी जिव माझा ओवाळून टाकावासा वाटे मनी तुला साद घालावीशी वाटे अलगद येऊन तुझ्या कानातुनी तू पाहतेस मज जेव्हा अनोळखी नजरेने क्षणात सारे संपते तेव्हा प्रीतीचे या रंग तराने माझ्या हृदयाच्या स्पंदनाला तुझ्या प्रतिसादाची वाट आहे तुझी आठवण काढत मी भाव माझे लिहित आहे 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

चारोळी - प्रेमास रंग यावे नाते आपल्या प्रीतीचे कधी जुळलेच नाही प्रेमास रंग यावा माझ्या असे तुला कधी वाटलेच नाही 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - निर्दोष कोरे पान घेऊन हातात लिहिले जीवनाचे सत्य निर्दोष मानून नशिबास जीवन जगले आनंदात 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.