*🌺उपक्रम - क्रमांक (२) *🌺विषय भाषा*🌺 *इयत्ता - पहिली / दुसरी**📚वाचा व वहीत लिहा.✍️*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*दिलेले शब्द ऐकून किंवा वाचून कोणते वाक्य अर्थपूर्ण होते ते पर्यायातून निवडा व त्याच्या क्रमांकाचा गोल रंगवा.**१) खेळतो चेंडू महेश**(१) महेश चेंडू खेळतो. (२) महेश चेंडू खेळते. (३) चेंडू महेश खेळतो.*उत्तर - 🔵⚪⚪*२) राजा चढतो झाडावर**(१) झाडावर चढतो राजा. (२) राजा झाडावर चढतो. (३) झाडावर चढते राजा.*उत्तर - ⚪🔵⚪*३) मोरा आहे पक्षी* *(१) पक्षी मोर आहे. (२) मोर पक्षी होता. (३) मोर पक्षी आहे.*उत्तर - ⚪⚪ 🔵*४) झोपला गवतात ससा**(१) ससा झोपला गवतात. (२) ससा गवतात झेपला. (३) गवतात झोपला ससा.*उत्तर - 🔵⚪⚪*५) ही शाळा आहे माझी**(१) आहे माझी शाळा ही (२) ही माझी शाळा आहे. (३) ही आहे शाळा माझी.*उत्तर - ⚪🔵⚪➖➖➖➖➖➖➖➖*✍️संकलन / लेखन*श्रीमती प्रमिला सेनकुडे जि.प. प्रा. शाळा गोजेगावता.हदगाव जि. नांदेड.🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

*🌷जीवन विचार*🌷 माणसाने आपल्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्यावर लुब्ध झालेले अतिउत्तम. कारण सौंदर्य हे सत्य शोधण्याच्या दृष्टीत असते. आणि ही सौंदर्यात सत्य शोधण्याची दृष्टी आपण सामान्य माणसात उपजत करू शकत नाही. म्हणून त्यांना सत्य दाखवावे; म्हणजे सौंदर्याची परिभाषा आपोआपच समजेल, दिसेल. मानवी जीवन सामर्थ्यानं आणि सौंदर्यानं पुलकित झालेलं आहे. या सामर्थ्यमय जीवनाच्या वाटेवर संकटाचे आभाळ कोसळले तर ते मोठ्या हिंमतीने सामर्थ्यशालीपणाने दूर सारावे. आणि सौंदर्याचे क्षण आले तर ते आनंदानं हर्षमय मनाने उल्हासीतपणे जगावेत, अनुभवावेत. असे म्हणतात "सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे."या जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी मानव आहे. स्त्री आणि पुरुष ही त्याची दोन भाग आहेत, रुपं आहे. माणसाने फुलासारखे आपले आनंदाने जीवन जगावे 'या जगण्यावर या जन्मावर शतदः प्रेम करावे'........*"सौंदर्य ही परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतील श्रेष्ठ सर्जन आहे."*असे मनू ह्या विचारवंताने आपल्या विचारातून स्पष्ट केले आहे.गवताच्या पात्यावर पडलेल्या मोत्यासारखं दवबिंदू हे सौंदर्याचं लेणं आहे.श्रावणातील सौंदर्य मनाला खुदकन हसवत असत. कितीही झालं तरी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 'जशी दृष्टी तशी 'सृष्टी. *तरीही आणखी पुन्हा एकदा सांगावस वाटतं...*माणसाने बाह्य सौंदर्य पाहण्यापेक्षा त्याचे आंतरिक सौंदर्य पाहणे आवश्यक आहे.➖➖➖➖➖➖➖*शब्दांकन / संकलन* श्रीमती प्रमिला सेनकुडेजि.प.प्रा.शाळा गोजेगाव.ता.हदगाव जिल्हा नांदेड.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=384361073332751&id=112133777222150&sfnsn=wiwspwa

https://m.facebook.com/story.php?story_fbid=244586531048281&id=102574415249494&sfnsn=wiwspwa

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4493626550758848&id=1708917332563131&sfnsn=wiwspwa

*🌺उपक्रम🌺* *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) सजीवांचे दोन गट कोणते?* *उत्तर - प्राणी आणि वनस्पती .* *२) सजीवांना कशाची गरज असते?* *उत्तर - अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश.* *३) पाठीचा कणा असलेल्या सजीवांना काय म्हणतात ?* *उत्तर - पृष्ठवंशीय सजीव उदा.(जलचर, पक्षीवर्ग, सरपटणारे, सस्तन प्राणी.* *४) पाठीचा कणा नसलेल्या सजीवांना काय म्हणतात?* *उत्तर - अपृष्ठवंशीय सजीव उदा.(गोगलगाय)* *५) सजीवांची लक्षणे कोणकोणती आहेत ?* *उत्तर - वाढ, श्वसन, उत्सर्जन ,प्रजनन, चेतनाक्षमता ,हालचाल, ठराविक आयुर्मान ,पेशीमय रचना.* *६) वाढ होत नाही त्यांना काय म्हणतात ?* *उत्तर - निर्जीव* *७) निर्जीवांना कशाची गरज नसते?* *उत्तर - अन्न, पाणी ,हवा यांची गरज नसते,* *८) सजीवांची वाढ होण्यासाठी कोणत्या घटकांची गरज असते?* *उत्तर - निर्जिव* *९) एकपेशीय सजीवांची दोन नावे सांगा?* *उत्तर - अमीबा , पॕरोमेशिअम* *१०) बहुपेशीय सजीवांची नावे सांगा?* *उत्तर - मानव , वडाचे झाड , कांद्याचे रोप, गाय, उंदिर, झुरळ, हत्ती इत्यादी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺 जीवन विचार🌺* ➖➖➖➖➖➖➖ http://www.pramilasenkude.blogspot.in *तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात .तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कर्मे हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.आपण आपल्या तनमनात सदैव भलेपणाची,चांगुलपणाची,मांगल्याची,निस्वार्थीवृत्तीने जीवन जगण्याची तेजोमय ज्योत तेवत ठेवली पाहिजे.* *'कर्मे ईशू भजावा'.आपण आपल्या कामालाच आपले दैवत मानले पाहिजे. व प्रामाणिकपणे, इमान इतबारे आपले काम करीत राहीले पाहिजे त्यासाठीच आपला देह झिजवला पाहिजे.आपल्या कामाची पूजा केली पाहिजे.आपल्या कार्यातच आपल्याला ईश्वर प्राप्त होतो.* *📚स्वामी विवेकानंद*🙏🏻 *माणसाचे कर्म चांगले असावे.चांगले कर्म असणाऱ्या व्यक्तीला भीती नसावी.* *पण जर का कोणी चांगले कर्म करण्याचा दिखावा करत असेल तर (मुखी राम बगल मे सुरी)* *अशा प्रकारचे देखावा करणारे लोक चांगल्या व्यक्तीच्या कामात विनाकारण अडथळा निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तीला परमेश्वर कधी माफ करत नाही.* *कारण ज्यांचे कोणी नसते त्यांचा ईश्वर असते.परमेश्वर अशा व्यक्तीला चांगला धडा शिकवतो.मग तो स्वतःचे रुप कुठं ?आणि कसे दाखविल हे*?????? 〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे*

*🌺जीवन विचार🌺* *〰〰〰〰〰〰〰* http://www.pramilasenkude.blogspot.in *"प्रयत्न तो देव जाणाव"* *"देवासकट सर्वकाही प्राप्त करून देण्याच"* *सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून* *प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ होय".* *प्रयत्न हा प्रकारच इतका प्रभावी आहे की , प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत प्रयत्न करणाऱ्याला प्रकाश दिसू लागून त्या प्रकाशातूनच त्याला प्रभूचा प्रसाद प्राप्त होतो.थोडक्यात प्रयत्न करीत रहाणे हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक असून त्रिकालबाधित निसर्गनियमांशी ते सुसंगत आहे.* *Smt.Pramila Senkude.* *कोणतेही यश प्राप्त करावयाचे असल्यास ते यश आपण करीत असलेल्या प्रयत्नाला चिकटलेले असते. "प्रयत्न करून यश मिळणे हा नियम आहे" हे सत्य माणसाने सदैव लक्षात ठेवले पाहिजे. मात्र प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी ते अभ्यासपूर्वक झाले पाहिजेत . नुसते कष्ट केल्याने किंवा प्रयत्न केल्याने यश मिळत नसते.* *थोडक्यात अभ्यासपूर्वक व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याने माणसांना जे धन व यश प्राप्त होते , ते त्यांना सुख शांती , समाधान , यश व समृद्धी प्राप्त करून तर देतेच शिवाय त्याचा इष्ट प्रभाव इतरांवरही पडत असतो.अस म्हणतात 'प्रयत्न हा परीस आहे, प्रयत्नामुळे नरकाचे नंदनवन होते.' शून्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्द माणसामध्ये असली की त्याचे कर्तृत्व दरवळायला वेळ लागत नाही.त्यासाठी हवी असते प्रामाणिकपणे अभ्यास व कष्ट करण्याची तयारी व असाध्य गोष्टीही साध्य करण्याची धडपड. ही सततची प्रामाणिक श्रमरुपी,अभ्यासपूर्व केलेली धडपड म्हणजेच यशस्वी वाटचालीसाठी केलेले प्रयत्न होय.* 〰〰〰〰〰〰〰 *🙏🏼शब्दांकन/संकलन🙏* ✍ *श्रीमती प्रमिला सेनकुडे* जि.प.प्रा.शा. गोजेगाव, ता.हदगाव, जिल्हा नांदेड. *~~~~~~~~~~~

*🌺वाचन विकास उपक्रम* *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) ढ्य - मेंढ्या , पेंढ्या, बलाढ्य, धनाढ्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) ण्य - फण्या , गोण्या, पुण्याई लावण्य, अरण्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) त्य - पणत्या , त्याला , त्याच्या ,त्यांनी , त्याच्या ,त्यांच्या , त्यामुळे ,त्यामुळं, त्यामुळेच ,त्या ,त्यांनी, त्यांच्या, आत्या , चकत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) थ्य - तथ्य, पोथ्या पायथ्याशी ,पालथ्या ,काथ्या, मेथ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com *५) द्य - गद्य , पद्य, वाद्य, विद्यार्थी, विद्या, गाद्या , फांद्या , द्या , द्यावे , द्यावा द्यायला द्यायची द्यावे, द्यायचे , द्यायचा , द्यायचं .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) ध्य - मध्य , ध्यान , ध्यास, संध्या, संध्याकाळ,ध्यानात , ध्यानी, ध्यानी , ध्यानात ,ध्येय ,ध्येये.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) न्य - न्याय , धान्य, अन्य ,अन्यथा ,वन्य, वन्यजीव, अनन्या, अन्याय, न्यायला, न्यायाधीश ,न्यायालयाने ,न्यायला ,न्या , न्यायमूर्ती, न्यायालयात ,न्यायालय ,न्यायालयाने.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) प्य - रौप्य ,सोप्या ,प्यायला ,प्यावे , प्याला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) फ्य - चाफ्याची, लिफाफ्यात, वाफ्यात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) ब्य - लोंब्या ,तांब्या ,ओंब्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमीला सेनकुडे

*सेनकुडे यांना विद्यार्थी गुणवत्ता विकास मंचाचा उपक्रमशील उत्कृष्ट सम्राज्ञी पुरस्कार प्रदान* https://rajmudralive.com/18677/24/19/15/ *ताज्या घडामोडी, महत्वपूर्ण लेख, दिग्गज मान्यवरांच्या प्रतिक्रिया, मुलाखती सर्वात आधी वाचण्यासाठी, पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे सर्वात लोकप्रिय ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा.* https://play.google.com/store/apps/details?id=com.rajmudranews.news.live

*🌺जीवन विचार* 🌺 〰〰〰〰〰〰〰 http://www.pramilasenkude.blogspot.in परमपूज्य महात्मा गांधी यांनी म्हटलेले आहे ' सत्याच्या खाणीत तुम्ही जितके अधिक खोल शिराल तितकी अधिक मौल्यवान रत्ने तुमच्या हाती येतील.' आणि हे मौल्यवान रत्ने आपल्याला मिळवायचे असेल तर सत्य ह्या सौंदर्य रुपाची कास धरावी लागेल. ही सत्यस्वरूप सौंदर्याची कास धरत असताना सत्यापासून वेगळे सौंदर्य असू शकत नाही, हि जाणीव ठेवूनच सत्यनिष्ठता अंगी रुजवणे बाळगणे आवश्यक असते, आणि अशा सत्यनिष्ठेसाठी निर्भयतेची गरज असते आणि निर्भयतेसाठी स्वावलंबनाची गरज असते.नम्रता म्हणजे 'मी' पणाचा आत्यंतिक क्षय. निर्भयतेने प्रगती करून घेता येते व नम्रतेने बचाव होतो.आपण स्वतःस वाचवु शकतो. नम्रतेच्या कोंदनातच अभय खुलून दिसते.आणि उदार वृत्ती वाढीस लागते."नम्रता म्हणजे लवचिकपणा. यामध्ये जिंकण्याची कला आहे आणि शौर्याची पराकाष्ठा आहे ". smt.pramila senkude *नम्रतेच्या उंचीला मोजमाप नाही*. 🙏 महात्मा गांधी नी म्हटलं आहे " सत्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याने धुळीच्या कणापेक्षाही नम्र झाले पाहिजे. नम्रता ही अहिंसेची तेजस्वी मूर्ती आहे ". नम्र माणूस दुसऱ्याचा विचार करतो. पाणी ज्याप्रमाणे रस्त्यातला खड्डा भरून काढल्याशिवाय पुढे सरत नाही , त्याचप्रमाणे दुसऱ्याचे जीवन संपन्न केल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणूनच कन्फ्यूशियसने म्हणले आहे 'फळांनी लहडलेल्या वृक्षांच्या शाखा ज्याप्रमाणे खाली वाकतात, त्याप्रमाणे महान लोक त्यांच्या महानतेने लीन बनतात.' ================== 🙏🏼शब्दांकन/संकलन🙏🏼 *✍श्रीमती प्रमिला सेनकुडे ता.हदगाव जि.नांदेड.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=365218588580333&id=112133777222150&sfnsn=wiwspwa

*🌺 वाचन विकास उपक्रम🌺* *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) क्क - रक्कम, भक्कम, चक्कर, चिक्की ,चक्का ,अक्का, टक्कर ,पक्का.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) व्व - निव्वळ, नव्वद , सव्वा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) द्व - विद्वान, द्वारका, द्वार, द्वारपाल, विद्वत्ता , द्वादशी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) प्प - टप्पे ,टप्प्यात ,टप्प्यावर ,टप्पा ,गप्पा ,कप्पा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) त्त - हत्ती, बत्तासा , बत्तीस , खलबत्ता मालमत्ता अडकित्ता , हत्यारे ,हत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com *६) म्म - निम्मे , झिम्मा , हम्मा, निम्मा.* ️〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) च्च - गच्च , कच्चा, कच्च्या ,कच्ची ,कच्चे ,उच्चाटन, उच्चार.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) ड्ड - खड्ड्यात ,खड्डे ,खड्डा , उड्डाण .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) त्व - जीवनसत्व, महत्व, महत्वाचे, महत्त्वाचा ,महत्त्वाची , त्वरित, त्वचा, त्वचाचे , त्वचाला, त्वचेवर, त्वचेच्या ,त्वचेची ,त्वचेचे ,त्वचेचा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) न्म - जन्म, जन्मदिवस ,जन्माला ,जन्मलेल्या ,जन्मले ,जन्मभर, जन्मात ,जन्मापासून ,जन्मसिद्ध, जन्मजात, जन्मतःच ,जन्मस्थान, जन्मला, सन्मान, सन्मानित , सन्मानपूर्वक.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*वाचन लेखन उपक्रम* *विषय - मराठी* *इयत्ता - पहिली /दुसरी* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - समजून घेऊन वाचूया, लिहूया. (नमुना- परिच्छेद क्रमांक -१)* *पाऊस म्हणाला, " मी आधी होतो पाणी. नदी समुद्रात खेळत होतो. उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले. मला चटके बसले. मी हलका झालो. वाफ होऊन आपोआप वरवर जाऊ लागलो! अगदी धुरासारखा ! "* *प्रश्न - १) नदी- समुद्रात कोण खेळत होते?* *उत्तर - नदी - समुद्रात पाणी खेळत होते.* *प्रश्न २) कडक ऊन केव्हा पडले?* *उत्तर - कडक ऊन उन्हाळा आला तेव्हा पडले.* *प्रश्न ३) वाफ कशासारखी दिसते?* *उत्तर - वाफ धुरासारखी दिसते.* ☘☘☘☘☘☘☘ http://www.pramilasenkude.blogspot.com *(परिच्छेद क्रमांक - २ वाचून प्रश्नांची उत्तरे लिहूया.)* *आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते. बागेत तुळस, दुर्वा ,सब्जा ,* *गवतीचहा, आले, अडुळसा होते, तर दारात बेलाचे मोठे झाड होते. फुलझाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती.* *प्रश्न १) आबा कोठे काम करत होते?* *उत्तर-----------------------* *प्रश्न २)बागेत काय होते?* *उत्तर ----------------------* *प्रश्न ३) बेलाचे झाड कोठे होते?* *उत्तर ---------------------* ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिला सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺वाचन लेखन उपक्रम🌺* *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) झाडे आपले मित्र आहेत.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) अंजली जेवताना ताटात काही शिल्लक ठेवत नाही.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) आईने प्रेमाने गऱ्यांचा द्रोण विनूच्या हाती दिला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) पशु - पक्षी झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन संतुष्ट होतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️*६) इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे सर्वांचे संकट टळले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) रानात वाऱ्याने रंगीबेरंगी रानफुले डोलत होती.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) पावसाळ्यात नद्या, नाले भरून वाहतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) झाडे हवा स्वच्छ ठेवतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) आपण परसात, डब्यात ,कुंडीत वनस्पती लावू शकतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *११) फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलावर उडत होती.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१२) महेश म्हणाला, ' पोस्टमन काका पत्ता बघून पत्र घरी पोचवतात ! '.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* *श्रीमती प्रमिला सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺वाचन विकास भाषिक उपक्रम.🌺* *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.शब्दटोपली क्रमांक (२०)* http://www.pramilasenkude.blogspot.com *ढ्य - मेंढ्या , पेंढ्या, बलाढ्य, धनाढ्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *ण्य - फण्या , गोण्या, पुण्याई लावण्य, अरण्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *त्य - पणत्या , त्याला , त्याच्या ,त्यांनी , त्याच्या ,त्यांच्या , त्यामुळे ,त्यामुळं, त्यामुळेच ,त्या ,त्यांनी, त्यांच्या, आत्या , चकत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *थ्य - तथ्य, पोथ्या पायथ्याशी ,पालथ्या ,काथ्या, मेथ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *द्य - गद्य , पद्य, वाद्य, विद्यार्थी, विद्या, गाद्या , फांद्या , द्या , द्यावे , द्यावा द्यायला द्यायची द्यावे, द्यायचे , द्यायचा , द्यायचं .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *ध्य - मध्य , ध्यान , ध्यास, संध्या, संध्याकाळ,ध्यानात , ध्यानी, ध्यानी , ध्यानात ,ध्येय ,ध्येये.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *न्य - न्याय , धान्य, अन्य ,अन्यथा ,वन्य, वन्यजीव, अनन्या, अन्याय, न्यायला, न्यायाधीश ,न्यायालयाने ,न्यायला ,न्या , न्यायमूर्ती, न्यायालयात ,न्यायालय ,न्यायालयाने.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्य - रौप्य ,सोप्या ,प्यायला ,प्यावे , प्याला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *फ्य - चाफ्याची, लिफाफ्यात, वाफ्यात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *ब्य - लोंब्या ,तांब्या ,ओंब्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺वाचन विकास भाषिक उपक्रम🌺* *शब्दटोपली क्रमांक (१९)* *✍ 'जोडक्षरयुक्त शब्द' वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *क्य - वाक्य,वाक्यात, शक्य,शक्यता , शक्यतो , मोजक्यात, मोजक्या, मोडक्या ,पडक्या.* *ख्य - नवख्या , चरख्यात , सख्या, राख्या.* *ग्य - भाग्य, योग्य , योग्यच , ,योग्यता , अयोग्य , भाग्योदय, भाग्य , भाग्यवान , वैराग्य.* *घ्य - घ्यावे, घ्या, घ्यावी , घ्यावा , घ्यायची , घ्यावेत , घ्यायचा , घ्याव्यात , घ्यायचं , घ्यावयास , घ्यावयाची , घ्यावयाचे , घ्याव्यात , घ्याव्या , घ्यावं ,घ्यायला , घ्यायचा.* *च्य - तुमच्या , त्यांच्या, पुढच्या,राज्याच्या , तुमच्यावर, तुमच्याशी , तुमच्यासाठी, तुमच्याकडे , तुमच्याकडून , दाराच्या , घराच्या ,सर्वाच्या , खोलीच्या, वरच्या, आमच्या यांच्या. *ज्य - राज्य ,राज्यात , राज्यात, राज्यातील, राज्याची , राज्याला, राज्यकारभार , स्वराज्य , पूज्य , ताज्या , भाज्या.* *झ्य - माझ्या, तुझ्याशी , तुझ्यावर , तुझ्यासाठी , तुझ्याकडे तुझ्यावर , तुझ्या,माझ्याशी ,माझ्यावर , माझ्याजवळ , माझ्यासाठी , माझ्यासारख्या, माझ्यापेक्षा , माझ्याबरोबर* *ट्य - सोंगट्या, पेट्या, गोट्या , रोट्या, वाट्या, वाट्याला , काट्यात, करवंट्या.* *ठ्य - अंगठ्या , काठ्या, मोठ्या,लाठ्या.* *ड्य - कुंड्या,धोंड्या, मांड्या , गुंड्या ,साड्या , बांगड्या, खोड्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

*📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *शब्द वाचूया, शब्द लिहूया.*✍ *🌺शब्दटोपली क्र. (१७)*🌺 *' त्र ' असणारे शब्द* *चित्र ,छञी,मित्र ,मात्र ,पत्र ,पाञ, यात्रा ,कुत्रा ,जञा, रात्र ,चिञा,चैत्र ,तंत्र ,तंत्रे ,खात्री ,चरित्र ,पत्रा , सत्र ,गोत्र ,सूत्र ,संञी, नेत्र ,विचित्र ,सन्मित्र ,शस्त्र ,पित्र ,पुत्र ,स्तोत्र ,गोमूत्र ,पवित्र ,पात्र ,छत्र ,क्षेत्र ,शास्त्र , माञा, पाञ, सत्र, सञात,पवित्र ,पवित्रा , धरिञी, सन्मिञ,सुमिञा, सचिञ, मैत्री ,मैत्रीण,मंत्री ,मंञ,ञुटी,मांञीक, ञयस्थ,चित्रे ,नेञा, भिञा,पञास ,पञातील,पञावर, पञपेटी,चिञांचा,चिञातील,चिञावरुन,चिञकार,पञकार,वृत्तपत्र,वृत्तपत्रे,वृत्तपत्रांनी ,सूञधार, सर्पमिञ,कवयिञी,ञिवार,ञिवेणी,मंञीमंडळ,ञिकालबाधीत, घोषणापञ, तांत्रिक , तंत्रज्ञान,तंत्रस्नेही,तंत्रज्ञानात्मक,लिळाचरिञ.* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.*

*वाचन विकास भाषिक उ🔉पक्रम* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१६)*🌺 http://www.pramilasenkude.blogspot.com *पिवळ्या, मोठ्या,पाकळ्या, चकल्या,चिमण्या, आत्या, अभ्यास, टेकड्या, सौख्य ,लाह्या, कल्याण, इवल्याशा, शिष्य, माझ्या, व्यवहार, जोड्या,पोळ्या, कळ्या, चिमुकल्या, गोजिर्‍या, सावळ्या, पहिल्या ,पाट्या,संख्या ,मुख्य ,नवख्या, वाक्य,वाक्यात, अशक्य, बोक्याला, इतक्यात ,एखाद्या ,चांगल्या, अरण्य, पणत्या, चकत्या,लावण्या ,गोण्या, साड्या , विद्या ,ध्यास, अभ्यासिका, सावल्या, बादल्या, व्यापारी, टोपल्या, बैलांच्या, सानुल्या, गावाजवळच्या,हिरव्यागार, उभ्या ,डब्यात,मोजक्या,पुढच्या ,शक्य ,भाज्या, राज्य ,तुमच्या,वाद्य, ओढ्याला, गळ्यातील, मोठ्या, आपापल्या, अवतीभोवतीच्या, रानभाज्या, सूर्योदयाबरोबर.* http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन /लेखन* *प्रमिला सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव* *ता.हदगाव जि.नांदेड.*

*वाचन विकास भाषिक उपक्रम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१५)🌺* *अंत,आंबा ,आंतर ,आंबट ,आंघोळ ,आंतरिक ,आंदोलन ,आंनद ,इंच ,इंडिया ,इंग्रजी ,उंच ,उंची ,उंदीर, उंचीची ,उंट ,उंचवटा, उंचीवर, उंचीचा,अंश,अंदाज अंतीम, कंपनी,कंटाळा,कुंपण,कुंकू ,कोंबडा ,कोंडा ,कोंब, कोंडून ,कोंडमारा ,खंड ,खंत ,खंडात ,खंडातील, संत, रिंग, सोंड, अंगण,अंतर,अनंत,पतंग, नंदी, सांग, लांब,वंदन, कुंडी, थंडी, भेंडी,रिंग ,पिंपळ ,पिंगट, वसंत, जंगल, मुंगी, लांडगा, तंबोरा, संतूर,थांबला ,चांदणे, सुंदर, चांगला, रंग, संकट ,पसंत ,मुंगी, संत्री ,आंबे, अंधार, अंजीर, अंगठी, अंक, चांदणी, गंगा,भिंत ,वंदन, मंदिर ,संदेश, पितांबर, तांबडा ,तोंडली, थंडी ,चिंट्या ,संक्रांत ,मंत्र चंद्र ,स्वतंत्र ,सोंगट्या, बांगड्या ,संध्याकाळ ,संतुष्ट, केंद्र ,वृंदावन ,हेमंत , संत्री ,पांढरा, मकरंद ,चंदन , अंगरखा,अभिनंदन, रघुनंदन,नंदादिप, सफरचंद.* ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*वाचन विकास उपक्रम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१२)🌺* *बाॕल, काॕल , साॕल, माॕल, डाॕग, डाॕन, जाॕन,जाॕनी, काॕट, हाॕकी, फाॕर्म, लाॕर्ड, बाॕक्स, साॕक्स, नाॕट, डॉल ,टाॕल,शाॕक, शाॕर्ट,साॕस, साॕरी,हाॕर्न,हाॕट, गाॕट ,लाॕन,चाॕक,थाॕट,साॕफ्ट, डाॕट,लाँग,आॕफ,आॕन,फाॕल,टाॕप,लाॕजीक,टॉवर, डॉक्टर ,रॉकेट,लाॕकेट, टॉवेल, सॉकेट, पॉकेट,माॕडेल, शाॕवर,आॕफर, काॕर्नर,काॕलम,काॕपर,टाॕपर, काॕलनी,काॕसली,पाॕवर,पाॕलीश,पाॕईंट,जाॕईंट,माॕर्निंग, लाॕकर,नाॕमिनी,नाॕलेज,काॕलेज,वाॕकर, वाॕटर, वाॕशर,हाॕटेल,बाॕटल,लाॕगीन, काॕटन,पाॕलीस्टर,बाॕलपेन,हाॕटस्पाॕट,चाॕकलेट,लाॕगआऊट,पाॕवरपाॕईंट.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*कविता - तिरीप* तेजोमय सूर्य देतसे ऊब,उजेड आम्हांस अंधार पावुनी जाई तव सृष्टी पडे मग दृष्टीस उजाडती दाही दिशा तव आसमंत दैदिप्यमान होई पक्षीही करती किलबील सुस्वर मंजूळ गाणी गायी पाऊस पडे थोडा मोठा धरिञी भिजून जाई सोनसकाळी पडे तिरीप रवीकिरणाची असे घाई भिजलेल्या मातीत उगवेल बिजांकुराणातुन इवलेसे रोपटे पडेल सूर्यकिणांची तिरीप झाड होईल त्याचे मोठेचमोठे ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड* *मराठीचे शिलेदार समूह*

*चारोळी - तिरीप* मायेचा प्रेमाची एक तिरीप दूर करी वेदनामय दुःखी मनाला नैराश्याचा अंधारमय जीवनात सांत्वन मिळे मग जगण्याला ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*वाचन विकास भाषिक उपक्रम.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (११)🌺* *ओळ ,ओळी ,ओठ, ओठात,ओढून,सोयरा, सोयीचे ,सोडत, पोलीस, पोषक ,पोशाख ,पोटात, पोरगा, पोटाला ,पोटाशी, फोडणी ,फोडून, बोलत, बोलणे ,बोलता ,बोलला ,बोलून, भोजन ,भोवती ,भोसले ,मोकळे, मोजून, मोजता ,मोजणी ,मोजली ,योजना, योगाने ,लोकर ,शोषण ,शोधून ,शोषून, शोधत ,शोधात ,सोडून ,सोडला ,सोडत, होकार ,होणार, होणारे, होणारी ,होणारा, होऊन, टोपली, टोपले, भुगोल, ओळख ,ओळखू ,ओळखले, ओळखला, ओळखून , सोमवार, टोमॅटो, ओरडला, लोठेबाबा, गोगलगाय, राहतो, ठेवतो, चालतो,तोरण,थोरला ,थोरले, थोरली, ओजस, मनोज, रोहन, समोर, मोती, कोपरगाव, किलो,किलोमीटर, फोनवर,फोनवरून,पोराला, पोचला, वाघोबा,ससोबा,वाडगो,धावतो, भोपळा ,भोपळी ,पोचणार ,बोलताना ,बोलावून ,बोलायला, बोलावले, भोवताली ,मोठमोठी, मोठमोठे, योगायोग ,योगासने ,रोगराई ,रोजगार, लोकशाही ,शोधायला,सोयीसाठी,सोयरीक,सोडायला, सोडिअम, होमरुलु ,होकारात, वाजवतो,जागोजाग,करटोली, डोलावली ,ढोलकी,मोसमात,सोसायटी , कोकणात, कोकणातील.* ----------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*वाचन विकास भाषिक उपक्रम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१०)🌺* *ओढा,घोडा,थोडा,झोका, कोण, कोडी,थोडी ,थोडे, तोडा,सोडा, पोट ,कोणी ,कोटी ,खो-खो,खोल ,खोली ,खोटं ,खोटे ,खोटी,खोड ,खोटा ,गोड ,गोल, गोळा, गोरा,घोडे ,घोर ,घोष ,चोच,चोर, छोटा ,छोटी ,छोटे,जोर ,जोड ,जोडा ,जोडी,झोका,टोक ,टोके, टोळी ,टोपी ,डोळे ,डोळा ,डोके, डोकं,ढोर,ढोस,तोच ,तोही, दोन ,तोल ,थोर ,दोन ,दोघे, दोर ,दोरी, दोर,धोका धोके धो -धो,नोट ,पोर ,फोटो, फोन,बोर,बोटे ,बोट,मोठा ,मोठी ,मोठे, मोर, मोरे ,मोरू ,मोक्ष,योग, योगी, रोग, रोज, रोजी ,रोख ,लोक ,लोटा ,शोध ,शोधू , शोभा ,सोय ,सोपे ,सोळा ,सोडा ,होता, होते ,होती ,होतो ,होत,कोकण, कोकणी ,कोकरु ,कोपर,कोपरा,खोबरे, खोलीत ,खोकला ,गोखले, घोषणा, घोटाळा ,घोषित ,चोवीस, चोरून ,चोरीस, चोरीचा, छोटासा ,छोटीशी, जोरात ,जोडून ,जोडीला ,टोकाला, ठोकून ,डोळस ,ढोबळ ,ढोकळा ,तोवर, थोडाच, थोडासा ,दोलक ,दोनदा ,दोनच, धोतर ,धोरण, धोरणे ,नोबेल ,नोकर, नोकरी ,नोटीस, पोपट.* -------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.

*वाचन विकास भाषिक उपक्रम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (९)🌺* *बैल ,कैरी, पैसा थैली,दैव ,वैरी,पैसे ,पैकी ,पैलू ,चैत्र ,चैन,कैदी ,कैद ,गैर,जैन,तैल,दैवी ,बैस ,मैल,मैदा,मैना,मैत्री,वैरी,शैव,शैली,सैल, कैवारी,कैलास,जैविक,तैनात, दैवत, दैनिक,नैतिक,नैवेद्य ,पैशाची,पैशाचा,पैठण,पैठणी,पैदास,फैलाव, बैठक,बैरागी,भैरव,भैरवी, मैफील,मैथीली,मैदान,मैदानी, मैत्रीण,मैत्रीचे,वैरण,वैराण,वैशाख,वैशाली,वैदेही,वैदिक,वैभव,शैलेश ,शैशव,शैवाल,सैनिक,सैनिकी,सैदव,हैराण,हैबती,हैदर,हैदोस, वैजनाथ,वैज्ञानिक,कैदखाना,ऐटदार,बैलगाडी,पैलतीरी,पैलतीर,गैरसमज,गैरहजर,वैजापूर,मैफिलीत, मैलावर ,मैदानात ,मैदानावर,शैक्षणिक ,नैनीताल, भैरवदादा, भैरवनाथ, कैलासनाथ.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*वाचन विकास भाषिक उपक्रम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (७)🌺* *शेत, रेषा, पेढा,भेळ,मेघ, नवे, वेड, फळे,पाने, फुले देश,पिके , वेळ,असे , कसे, दिसे, नसे,रेघ,पेटी, चिञे,आहे, बेडूक, शेवटी,घेऊन, रेडकू,शेपटी, रूपेरी,रुपये, माणसे, करणे,पहाटे,दिलेले,दिलेली,दिलेला, असते, नसते, नसेल, साजरे,वेगाने , पिवळे,माकडे ,भेटला ,भेटले ,भेटून ,विशेष,केवळ ,खेकडा,घेतले,चेहरा ,जेवण ,टेबल ,ठेवला ,ठेवले ,ठेवणे,तेथील ,तेथून ,देणार,नेहमी ,पेपर,लेखक ,लेखन ,लेखात ,बेरीज ,वेगळे ,वेगाने ,वेगळा ,शेजारी ,शेअर ,शेतात ,शेतावर , शेतातील,दिसणारे, भातशेती, पलीकडे , अलीकडे, मदतीने, शेतकरी,बसलेले,तेलकट , सगळीकडे, विरघळलेले , विरघळणारे, चिकटलेले, आतबाहेर,देखभाल,देखरेख, नातेवाईक,ज्ञानदेव.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*वाचन विकास भाषिक उपक्रम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚 विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (६)🌺* *कुणी,गुण ,गुरू ,चुल,जुना, सुई, रुई, जुडी,तुर, पुल,बुध,मुग,युती,रूप ,रूढ,शुभ ,सुरू , पुरी, दुपारी , फुगा, युग,हुशार ,हुशारी ,गुलाम,जुनाट ,जुळणी ,कोकरू, चुकल, बाहुली, फुल, सुटला, मुलगा, तुला, दुसरी, सुरई , बुटका, दुपार, हुरडा, दुकान, झुरळ, गुलाब, खुशाल, घुबड, रुपया, भुवई, भुवन, उजवा, डुलकी, तुळस, सुकी, खुराडा, कुत्रा, खाऊन, येऊन, घेऊन जाऊन, धुऊन,खुलासा,घुमत ,घुसला ,चुकीची,जुलमी ,तुमची ,दुसरा ,नुसता,पुढील, फुकट ,भुकटी,मुलगा,मुळीच,मुलाला,शुगर, टुणुक टुणुक , सुगावा,भुरभुर,सुरूवात,हुकुमशाही ,सुगरण, मुसळधार, खुदकन, नुकसान, कुरकुरीत, चुरचुरीत, खुळखुळा,टुणटुणीत, बुधवार, गुरुवार, सुरळीत, युवराज.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (१)🌺* *वसंत ,पिंपळ ,पिंगट, चांगला, रंग, संकट ,पसंत ,मुंगी ,चंदन, चांदणी, गंगा, चंदन ,भिंत ,वंदन, मंदिर ,संदेश, पितांबर, तांबडा ,तोंडली, कोंबडा, उंची, थंडी ,चिंट्या ,संक्रांत ,मंत्र चंद्र ,स्वतंत्र ,सोंगट्या, बांगड्या ,संध्याकाळ ,संतुष्ट, केंद्र ,वृंदावन ,हेमंत ,अंगण, संत्री ,पांढरा, मकरंद ,चंदन ,अभिनंदन, रघुनंदन, सुंदर, पंचमी, नंदादीप.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*📚वाचन विकास भाषिक उपक्रम📚* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚 विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (५)🌺* *छत्री , मुली, मीना, सीता, सीमा, भाजी ,भाजीपाला ,घरी ,गरीब ,खरीप,जरी, मयुरी, दरी,नशीब ,परीक्षा ,बरीच ,भरीव ,रवी, जमीन, गवळी, कवी, जीवन, वीस,वीज ,वीर ,वीण, भीती,पुरी, आमटी,हरीण,हीच ,सीमा ,शीत,शीळ , बसली, परी, हसली,खीर, पापडी, बारीक, मीठ, भाकरी, वाटली वारली, करामती, सकाळी, सजली, चिमणी, किती, माहिती, बारीक, वाडगिनी , घरी, पाणी, झरीपाडा, शेतकरी, भातशेती, घरातील, छोटी, गाणी, नदी.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.

चारोळी - लळा ,जिव्हाळा असतो जेव्हा लळा,जिव्हाळा समजे तेव्हा नात्यातील ओलावा भावना एकमेकांची समजून घेऊ जपुया माणुसकीचा हा लळा ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*कविता - लळा ,जिव्हाळा* शब्द मज ओठांवर येऊन नयनी ओघळी अश्रूंचा धारा संवेदन भाव कोमेजून जाती का? देतोस वेदनेस थारा मी सारं मज जीवनाचे माझ्या शोधीले शब्दांतुनी तुझीया भाव मज सुकोमल जाहले लावलास तु लळा जिव्हाळा वाट पाहूनीया चांदण्याचा साज शृंगार तो गंधाळला अन् गंधाळलेल्या आसमंतात नयनमनोहर आसवांचा जाहला नेञास करारी लागे मग नजरेसमोर नजरेचा का आहेत आडवाटा ?? अन् ओसरलेल्या अश्रूतही संवेदना आहेत तुझ्या..... ➖➖➖➖➖➖➖ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*गुरूमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी* ➖➖➖➖➖➖➖ १) वाचन पुस्तकांचे करूया यशाची शिडी चढूया ग्रंथ हेच गुरु आपुले भविष्य आपुले घडवूया ➖➖➖➖➖➖➖ २) अपयश आले किती जरी हार ना मी कधी मानणार पुस्तकांच्या सहायाने मी यशाची शिडी मी गाठणार ➖➖➖➖➖➖➖ ३) पुस्तक हेच यशाचे गमक अभ्यासाचा ध्यास मी घेणार चढुनी यशाची शिडी मी जीवन माझे सफल करणार ➖➖➖➖➖➖➖ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

*📚वाचन विकास उपक्रम📚* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *विषय - मराठी* *शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (४)🌺* *निळा, विळा , ढिला, रिक्षा ,महिला , पिवळा, पिवळसर, हिरवा , विनायक, किराणा, किसन, किनारा, खिमा, चित्रपट,चिकट, जितका, टिळक, टिम , टिकाऊ,ठिकाण,ठिपका,डिझाईन,तिला ,तिचा,तिनं, विचार, हिमालय, ठिकाणा, किडा, हिरा, खिळा, ढिगारा, लिटर, सिताफळ, शिकार, शिरा, रिकामा, हिरवळ, तिसरा, निवाडा, खिरापत, चित्र, सचित्र, सचिन, मिठाई, वाढदिवस, लिहूया, परिसर, किरण, निघाला, गणित, शनिवार, निळे, बिरबल, दिसला, पाहिले, दिसत, पाहिजे, भिरभिर, विजय, बालवाटिका, विशाल, चिवडा, विनया, गिरजा, क्षितिज.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.

किनार बांधिलकीची किनार बांधिलकीची असावी नसावा द्वेष मत्सर कुणाचा सदैव असावा प्रेम,जिव्हाळा आपुलकीचा, नाती गुंफण्याचा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*चारोळी - साहित्यभूमी* मराठी आमुची आहे ज्ञानवर्धनी करूया तिचा सन्मान आपण साहित्यभूमी च्या अभिव्यक्तीतून सदैव करू आपण तिचे संवर्धन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*कविता - साहित्यभूमी* मायबोली माझी असे मराठी साऱ्या जगात मान आहे असे अभिमान आम्हा मराठीचा मराठी भाषा आमची शान आहे साहित्य लेखनाची, वाचनाची असावी नित्य सर्वांस ओढ साहित्यभूमी च्या या समृद्धतेतुन मातृभाषा आहे किती गोड शब्दास शब्द जोडून लेखणीने मनातील संवेदना उतरती भाव काव्यातून प्रकटुनी लयबद्ध रचना तयार होती मायबोली भाषा आहे छान वैचारिक आदान - प्रदानाची मातृभाषा आहे एक वाण खाण आहे ती संस्काराची मायबोली आमुची आहे ज्ञानवर्धनी करूया तिचा सन्मान सारे आपण साहित्यभूमी च्या अभिव्यक्तीतून सदैव करू आपण तिचे संवर्धन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*विषय - मराठी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com ---------------------------------- *📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍* *🌺शब्दटोपली क्र. (३)🌺* *पान, फळा, ससा, ताक, चाक, नाव,पळा,दादा, बाबा, काका,मामा,ताई,राम,शाम,चला, वाच, नाग, काम,ढाल,छान,पाट, मका,भात,तास,आठ,खाता, कसा,मासा,पारा, काय, मला, आला, वाट,आता, वारा, मजा,राजा,बाळा, शाळा, दार, वाघ, ससा, तारा,फार , माझा,कान, नाक,मान,पाय,टाका, टापा,सात,बारा,दात, कार,पाच,घाम,घार,वाद,झाड,दान,वात,वाडा,ज्ञान ,आज्ञा, कासव,भारत, सकाळ, नाचत,बछडा,पारवा, कावळा, खाताना,धरला, आणला, एकदा,अकरा, बाजार, आकाश, वापर,लहान, आपला,पाचवा,ढगाळ,चालला,सामान,वादळ ,आवाज,दारात,खारट,सावध,हातात,गारवा,धावत,चालत,जहाज, भाकर,शासन.* ---------------------------------- 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *✍संकलन / लेखन प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि.नांदेड.

*चारोळी - लक्तरे* वृक्षतोड करून मानवाने केले उध्वस्त पर्यावरण लक्तरे काढून निसर्गाची केले नाही त्याने संवर्धन *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*कविता - लक्तरे* जन्मदाती माझी प्रिय आई बघताना तिच्याकडे मी येई जगण्यास स्फूर्ती माझ्या ममतेची मूर्ती माझी आई किती दुःख झेलले जीवनात लक्तरे अंगाची काढून ती जगली सतत काबाडकष्टात मुलाबाळास भरविते घास ती दिसे लेकरात सुख तिजला मायेचा पदर पांघरून आम्हा भासे झोपडीत पंढरी तिजला प्रेम साऱ्यांना देई आम्हा माझी आई आहे ज्ञानज्योती देती आम्हा मूल्यशिक्षणाचे धडे शिकवण संस्काराची मिळती पदोपदी वाट चांगली दावे गडे माझी आई आहे देवाचीये रूप पदर तिचा शितपंख्याहून थंड माझ्या आईरूपीची प्रेमज्योत सदा नित्य चालते अखंड 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*चारोळी - हा रूसवा सोड ना* हा रूसवा सोड ना बाळा खेळायला नेईन मी तुला छमछम घालीन पायी वाळा देईन गोडगोड खाऊ तुला 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*कविता - हा रूसवा सोड ना* असा रुसला का रे माझ्या बाळा काय पाहिजे सांगना तू मला पायी वाजे छमछम वाळा ढगांची गादी दाखवू का तुला हा रुसवा सोड ना बाळा किती विनवणी करू तुला किती लाविला तुला लळा दुर का लोटतोस असा मला दूर तुला कस लोटू आई असं गप्प मला राहवत नाही तू माझी आहेस प्रेमळ आई तुझ्याशिवाय मला करमत नाही आतुर झालो बोलण्यास तुला माझा जीव तुझ्यात आहे आई माय लेकराच्या ह्या नात्याला अपार जिव्हाळा आहे आई 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी १) महाराष्ट्राचे भाग्य बदलवणारा सुवर्ण दिवस आज उगवला छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा आज हर्षआनंदात जाहला २) बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर आरुढ जाहले राजे शिवछत्रपती, मराठी जनांच्या मनावर अधिराज्य करणारे होऊन गेले फक्त शिवछत्रपती ३) संपन्न जाहला महाराज्यभिषेक सोहळा मिळाला आशीर्वाद भवानीमातेचा पूर्ण जाहले स्वप्न माता जिजाऊचे छत्रपतीने तोरण बांधले स्वराज्याचे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - मृगसरी पाऊस येता मृगसरीचा घालवी उकाडा उन्हाचा थंडावा वाटे मनाला छान पडता पाऊस मृगाचा झाडे,वेली,पशु,पाखरे सर्वत्र हर्षाने प्रफुल्लित होती बळीराजाची चाले लगबग गडबड पेरणीची चालती मृगसरीचा पाऊस पडता तहानलेली व्याकूळ धरती तृप्त होऊन थंडगार होती सौंदर्य निसर्गाचे खुलती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

चारोळी - मृगसरी नभातून बरसल्या मृगसरी हिरव्या शालुत नटली धरती दिसे वसुंधरा सुंदर नववधुपरी हिरवा चुडा घालून सजली धरती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

चारोळी - निसर्ग आणि मी झाला आहे पावसाळा सुरू रंगीबेरंगी रानफुले सारे डोलती शेत-शिवार झाले सारे हिरवेगार निसर्ग आणि मी खास सोबती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

*कविता - निसर्ग आणि मी* निसर्ग आहे आपला सखा तोच देतो शुद्ध ताजी हवा निसर्गाचे जतन सर्वांनी राखा निसर्ग आपला अनमोल ठेवा निसर्ग आणि मी आहे असे अतूट नाते आमचे जिव्हाळ्याचे निसर्गासारखा दुजा नाही सखा रक्षण करू सारे त्यास जपण्याचे निसर्गात लता वेली हसे गाली रूप निथळले हिरवेगार राणी झुळझुळ वाहे झरा नदी नाली निसर्गच गातो मंजुळ गाणी साऱ्या सृष्टीचा सुंदर साज पाने,फुले ,फळे,झाडे,हवा आहे सजीवांचा श्वास आज प्रत्येकाने एकतरी झाडे लावा निसर्गाचा मोह प्रत्येकास हवा तेच खरे आहे आपले सोबती चला मिळुनी लावूया झाडे आपण सारेजण या भूमीवरती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

चारोळी - घुमजाव रहावे लागते आता सर्वत्र दक्ष नाहीतर करतात लोक घुमजाव यशाचे शिखर चढता क्षणीच लोकांची नजर असते कटाक्ष *✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

कविता - घुमजाव क्षण ते येती मोहाचे किती लालसा नको तू बाळगु प्रति अरे माणसा शुद्ध ठेव तू मती नाहीतर होईल जीवनाची माती इतिहासाचे किती दाखले आहेत सत्कर्मी किती होऊन गेले आहेत माणसा पुण्याची काम तू कर इतरांना घुमजाव नको आता कर घुमजाव केले किती जरी तुला वाट वाकडी कधी नको पाडू नेकी नीतीने वाग तु चांगला फसवेगिरीला बळी नको पडू रहावे लागेल तुला आता दक्ष नाहीतर लोक करतील घुमजाव यशाचे शिखर चढता क्षणीच लोकांचा नजरा घालेल घाव *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*विषयः झुकझुक गाडी* 🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃 आली आली बघा बघा झुकझुक गाडी (दोन वेळा) सरळ रेषेत चालणारी धावधाव धावणारी आली आली बघा बघा झुकझुक गाडी (दोन वेळा) झुक झुक गाडीत बसले कोण? आजी आजोबा आणखी कोण!👩‍🏫👨‍🏫 (दोन वेळा) आली आली बघा बघा झुक झुक गाडी.......(दोन वेळा) झुक झुक गाडीत बसले कोण? मामामामी आणखी कोण! (दोन वेळा)🙎‍♂👩‍🦰 आली आली बघा बघा झुक झुक गाडी.......(दोनवेळा) झुका झुक गाडीत बसले कोण? दादा वहिनी आणखी कोण (दोन वेळा)🙎‍♂🙎 आली आली बघा बघा झुक झुक गाडी झुक झुक गाडीत बसले कोण? काकाकाकु आणखी कोण 👳👩🏻 आली आली बघा बघा झुक झुक गाडी.....(दोनवेळा) ➖➖➖➖➖➖ *✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*चारोळी-झुकझुक गाडी* मामाचं गाव आहे मोठ छान झुकझुक गाडीत बसुया मज्जाच मज्जा मिळून सारे आनंदाने नाचू आणि गाऊया *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

*चारोळी - कर्मबंधन* दुसर्‍याचे दुःख पाहून आपणही त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे कर्मबंधन आपले असे असावे माणुसकीचे नाते सारे जपावे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - कर्मबंधन समाजप्रबोधनकार संत गाडगेबाबा देवदूतच होऊनी गेले भूतलावरी स्वच्छतेचा मंत्र देऊनी सर्वास ऐसे संत अवतरले होते ते पृथ्वीवरी गावोगावी जाऊन केली त्यांनी स्वच्छतेची कामे अपार,करुनी कीर्तने त्यांनी मने ही केली साफ, उचलून फेकले त्यांनी अंधश्रद्धेचे निखारं शिक्षणाचा पथ सारे स्वीकारा, जोपासूनीया संस्कृतीला,जागविले त्यांनी साऱ्यांचे आत्मभान, म्हणूनच झाले ते संत महान कर्मबंधन ऐसे करूनी गेले गाडगेबाबा,सत्कार्याने झाला त्यांच्या, सुगंधीत आसमंत सारा, वंदनीय त्यांचे हे कार्य, आपण सारेच स्वीकारा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

कविता - खाणाखुणा मन आहे आकाशा समान त्यास नाही काही मर्यादा अनेक खाणाखुणा जपून राहतात मनात अनेकदा मन चोहीकडे फिरताना नित्य तव सौंदर्यास पाही मनाचे हे सौंदर्य मग कळणार नाही केव्हाही मन जेव्हा निष्ठुर होते तेव्हा नाही करत काळजी कोणाची अंतरीच्या भावनांचा कलह मग तमा बाळगत नाही कुणाची मनात साचलेले प्रेम किती मन मंदीराच्या स्थळी असे राहणार त्याच्यामध्ये गुंतून तर सोसावे सारे लागत असे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*गुरुमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी* १) आनंदाने बैलगाडीत बसून मजा करू लागले मामाच्या गावाला जायचा आनंद प्रत्यक्ष घेऊ लागलेे. २) सर्जा राजाची जोडी शोभून भारी दिसते दादा गाडी हाकतानाची मजाच भारी असते. ३) बैलगाडीचा आनंद घ्यायला खेडेगावीच जावे लागते शहरातील मुलांना हा अनुभव फार वेगळा वाटते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

*चारोळी - खाणाखुणा* अनेक आठवणीच्या तुझ्या मी जपून ठेवल्यात खाणाखुणा कस सांगू तुला मी प्रिये माझ्या प्रीतीचा हा वेडेपणा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

चारोळी - ताटवा आनंदाचा शेतात राबराबतो बळीराजा काळया मातीत पिकवितो मोती घरादारात सुखात नांदते लक्ष्मी ताटवा आनंदाचा मनी फुलती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - ताटवा आनंदाचा नभी मेघ फिरूनया सारे पाऊसधारा पडून अंगणी रूप बघेे धरतीचे सारे ताटवा आनंदाचा असे मनी सूर्य हळूच डोकावूनी पाही आकाशी अलगद उठे रवी सोनेरी किरणे तो दावी रूप धरञीचे चमकवी पानापानात पडती थेंब टपोरे फुलाफुलात फिरती भोवरे मोती नभातून गळे सारे जसे रूप धरा रचले मनोरे सरी भिजवी तनामनाला अंगी झेलूनीया तुषार ताटवा आनंदाचा फुलला हर्षआनंद मनी जाहला फार प्रीत फुलती धरतीवर असे नाते घट्ट तिचे आकाशी बि रुजती, अंकुरती पिके उगवती मातीशी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - लाजलेली फुले गडद काळोख्या अंधाऱ्या रात्रीत लाजलेली फुले उमलती पहाटे सुगंधी फुले येऊन तव वेली निशाचर मनी मग हर्षुनी दाटे लाजलेली अशी ही फुले कौमुदीत मन हे तव नाहे अंतरंगीत भावगीत खुले स्वरास्वरात ओठी मग वाहे नेत्राच्या अंतरंगात माझ्या मन माझे अंतरी जव डुले स्वप्न रंग मनीचे माझ्या मग भावचकोर होऊनी तव फुले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

चारोळी - लाजलेली फुले बागेत उमलती लाजलेली फुले फुलपाखरू मग हळूच खेळे शाळेत दिसती गोंडस मुले मैदानी आनंदाने सारीच खेळे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धा* 1) तुझी आठवण येते तेव्हा एकांतात मी उभी राहते तुझ्याच विचारात मी मग नजर माझी वाटेकडे लावते 2) एकांतात उभी राहून शांत मनमीत डोळ्यात पाहते तव स्वप्नरंग मनीचे माझ्या माझं काळीज अंतरी कापते 3) सडपातळ बांधा गोड चेहरा रंग गुलाबी शोभतोय छान शब्द तिच्या ओठी लपलेले नाही तिला कोणतेच भान 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - मले काही सांगू नको लय मोठ शिकून मी डाक्टर होणार हाय बा मले काही सांगू नग मले माह्य सपन पूर करायचं बा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - मले काही सांगू नको धनी म्या सांगते तुमास्नी पोरगी वयात आलिया यंदा तिचं लगीन आपण उरकून मात्र टाकूया मले काही सांगू नको म्या पोरीला शिकविणार उच्च शिक्षण देऊन तिला कलेक्टर म्या माञ करणार पोरीची मले बी हाय काळजी असं समजू नको तु मले धनी तुवा हाय निष्काळजी पण समजून घे तू पोरीले घरदार, शेतसार विकून म्या लेकरांना शिकून मोठ करीन आपण राहिलो अडाणी पण भविष्य त्यांचे म्या घडवीन चुकलं धनि माह्य सार इचार नव्हता केला मी शिक्षणाचं मोल हे सार समजून घेतल आता मी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - मानवसेवा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा म्हणूनच सत्कर्म करावे अपरंपार आईने दिलेली मोलाची शिकवण वर्तनी उतरवावी जीवनभर 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे*

कविता - मानवसेवा सत्कर्माची सर्वत्र पेरून बीजे एकमेका आपण सहाय्य करू मानवसेवा हा धर्म बाळगून मानवता आपण दाखवू सत्याची आपण कास धरु नाती माणुसकीची सांभाळू विसरून जाऊ द्वेषभावना प्रेमाने जगी सारे आपण राहू आई-वडिलांचा सांभाळ करू कधीच त्यांचे मन नाही दुखवू करून सेवा त्यांची आपण आशीर्वाद त्यांचा मिळवू पर्यावरणाचे संरक्षण करू वृक्षारोपण आपण सारे करू मातीशी नाती घट्ट बांधून आपुले निसर्गावर आपण प्रेम करू 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

चारोळी - थडग्याची व्यथा भुकेल्या पोटी अन्न मिळेना थडग्याची व्यथा कोणी जानेना श्रीमंतांची श्रीमंती वाढत जाते गरीब बिचारा दारिद्र्यातच जगते प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - थडग्याची व्यथा थडग्याची व्यथा नाही कोणी जाणली परस्परांबद्दल आपुलकी आता नाही राहिली जीवन गरिबीचे कसे असते? भुकेल्या पोटी अन्न मिळत नसते घाम गाळून ,अश्रू शोषून दारिद्र्याचे जीवन त्यांच्या नशिबी असते स्मशानात जाई गोवऱ्या त्यांच्या तरीही कष्टा त्यांचे कमी नसते मृत्यू आवळेल मग फासे , मृत्यू हसेल साक्षात परंतु त्यांच्यात काही फरक नसे गरीबीत जीवन जगणे हे असेच असे ध्येय जगण्याचे सार्थकी लावूया थडग्याची व्यथा जाणून घेऊया मनी ठेवूनी भावना सहकार्याची शिदोरी बांधून नेऊया सत्कर्माची 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - मनातलं मनाशी एकटेपणातच मन रमवावे एकटेपणानेच हे जीवन जगावे मनातलं मनाशी हितगुज एकट्यानेच मग मनाला सांगावे डोळ्यात आलेल्या अश्रूंना आपणच मग पुसावे,अन् हृदयातल्या वेदनेला मग एकट्यानेच समजुनी सांगावे स्वःतावर विश्वास ठामपणे ठेवून आत्मविश्वासाने जगावे,अन् आलेल्या संकटांना मग घाबरून न जाता,संघर्षाने जीवन जगावे आपले अश्रू आपण पुसले तरी दुसऱ्यांचे अश्रू मात्र पुसावे, देऊन मदतीचा हात इतरांना जीवन एकटेच जगावे व्यथा ही जीवनाची कोणतीही मनातल्या मनाशी सांगावी उजेडाने साथ सोडली तरीही अंधाराशी मात्र घट्ट मैत्री करावी कुणाच्या मदतीची ,आधाराची अपेक्षा न करावी, अन् करताच आले तर सहकार्याची भावना बाळगून माणुसकी निभवावी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - मनातलं मनाशी तडकलेच जर ह्रुदय कधी जोडतांना असंख्य होतात यातना मनातलं मनाशी सांगतांना मग असह्य होऊन जातात वेदना 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - डोळ्यात माझ्या नीर नितळसा डोह मनाचा स्पष्ट खोल दिसावा तळात डोळ्यात माझ्या थोपवुन लाटा वाहून नेतील अश्रूसंगे क्षणात प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

डोळ्यात माझ्या डोळ्यात माझ्या आठवणीचे बोल आईबाबाचे पुण्य अनमोल झाले मी कृतज्ञ त्यांच्या ठायी कैसी फेडू मी त्यांची ऋणायी कष्टाचे हे मोल त्यांचे अप्रतीम होते बोल तयांचे ध्यानी मनी रुजले मज सत्य हे उमजले आज स्मरण तुझे होताच आई डोळ्यात माझ्या पाणी येई तृप्त होउन नयन माझे मग आठवणीत तुझ्याच राही आईवडिलाची पुण्यायी सार्थकी लागली जीवनी संस्काराची ही शिदोरी ठेवीली मी माझ्या अंतःकरणी पानाफुलांचा कळसात आईवडील आहे माझ्या काळजात कितीही थोरवी मी त्यांची गाईन ऋणाईत त्यांच्या राहीन ऋणाईत त्यांच्या राहीन ऋणाईत त्यांच्या राहीन 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

चारोळी - भेगाळलेले मन लोपला होता तुझा तो स्पर्श विरला तो प्रितीचा झरा भेगाळलेले मन हे माझे सोबतीला धगधगता निखारा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

चारोळी - भेगाळलेली मने लोपला होता तुझा तो स्पर्श विरला तो प्रितीचा झरा भेगाळलेली मने ही सारी सोबतीला धगधगता निखारा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

कविता - भेगाळलेली मने ऐकाच वाटेने चालत होतो भेगाळलेली मने घेऊन जेव्हा कोणत्याच गोष्टीची खंत नव्हती प्रवास आयुष्याचा संपला तेव्हा मी रुसावे तू हसावे असे नाते अपुले होते जेव्हा मन थोडे गहिवरून येईल कायम दुरावा झाला तेव्हा तुझ्या वागण्याचं गुपित अजूनही नाही कळलं मला तुला भावनाऱ्या गोष्टीचे वादळ शिरे माझ्या मनाला जी जळत होती आत मने ती पूर्वी होती शांत शांत अलविदा करित होते आयुष्य डोळे भरून येई एकांत एकांत 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

*चारोळी - हसरी मूर्ती..* *१) धवल शुभ्र चांदण्यांची* *लयलाट आकाशी दिसे* *हसरी मुर्ती पाहूनी चंद्राची* *मन माझे आकाशी वसे* *चारोळी - हसरी मूर्ती..* *२) कधी संपेल हा दुःखद काळ, कधी होईल पुर्ववत* *सारे , हसरी मुर्ती असणारे* *कधी दिसेल बालगोपाळ* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

*चित्र चारोळी - स्पर्धेसाठी* १) अंगणी आहे तुळशी वृंदावन मन माझे गेले भारावून प्रज्वलित झाल्या पणती तेजोमय सर्वत्र दिसती २) सण दीपावलीचा आला अंगणी प्रकाश पसरला दिसे शोभून तुळशीमाय स्नेहाचा सुगंध दरवळला ३) थकल्या जीवास विसावा सांजेचा तेजोमय प्रकाश पडती पणत्यांचा उगवेल दिस नव्या उमेदीचा आशीर्वाद मिळे तुळशी मायेचा 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

कविता - प्रेमास रंग यावे तू अबोल असते तेव्हा माझ्या प्रेमास रंग यावे तू बोलतेस तेव्हा प्रेम माझे फुलून यावे तुझा हसरा चेहरा पाहुनी जिव माझा ओवाळून टाकावासा वाटे मनी तुला साद घालावीशी वाटे अलगद येऊन तुझ्या कानातुनी तू पाहतेस मज जेव्हा अनोळखी नजरेने क्षणात सारे संपते तेव्हा प्रीतीचे या रंग तराने माझ्या हृदयाच्या स्पंदनाला तुझ्या प्रतिसादाची वाट आहे तुझी आठवण काढत मी भाव माझे लिहित आहे 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*

चारोळी - प्रेमास रंग यावे नाते आपल्या प्रीतीचे कधी जुळलेच नाही प्रेमास रंग यावा माझ्या असे तुला कधी वाटलेच नाही 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*

चारोळी - निर्दोष कोरे पान घेऊन हातात लिहिले जीवनाचे सत्य निर्दोष मानून नशिबास जीवन जगले आनंदात 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.१९- ०३- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) स्म - स्मरण, स्मारक, स्मरणिका, भस्म, भस्मासुर, स्मृती, स्मृतिगंध, स्मृतिप्रीत्यर्थ.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) द्म - पद्मश्री, पद्मावती , पद्म, पद्मा , पद्मासन, पद्मभूषण.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) ह्र् - हृदय, हृदयाला, ह्दयाच्या .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) ग्न - लग्न, लग्नाला , लग्नात, मग्न, अग्नि, अग्निशामक अग्निमांद्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) ष्प - पुष्प, पुष्पा , पुष्पावती , पुष्पमित्र , पुष्पक, बाष्प ,बाष्पीभवन.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) द्ध - शुद्ध, युद्ध ,सिद्धांत, प्रसिद्ध, प्रसिद्धी ,युद्धात.* ️〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) ल्क - शुल्क ,निशुल्क, उल्का, उल्कापात, अल्का.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) ग्ध - स्निग्ध, मंत्रमुग्ध , दुग्धालय, दुग्धशर्करा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) स्थ - स्थिती ,स्थिर , स्थिरता, अवस्था, स्थानिक ,स्थान ,स्थापन ,स्थापना ,स्थाने ,स्थानी, स्थायू ,स्थायी ,स्थायीक ,स्थळ, व्यवस्था ,व्यवस्थापन ,व्यवस्थित ,व्यवस्थापक .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) क्व - पक्वान्न, पक्व, परिपक्व.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.१७- ०३- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) क्क - रक्कम, भक्कम, चक्कर, चिक्की ,चक्का ,अक्का, टक्कर ,पक्का.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) व्व - निव्वळ, नव्वद , सव्वा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) द्व - विद्वान, द्वारका, द्वार, द्वारपाल, विद्वत्ता , द्वादशी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) प्प - टप्पे ,टप्प्यात ,टप्प्यावर ,टप्पा ,गप्पा ,कप्पा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) त्त - हत्ती, बत्तासा , बत्तीस , खलबत्ता मालमत्ता अडकित्ता , हत्यारे , हत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) म्म - निम्मे , झिम्मा , हम्मा, निम्मा.* ️〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) च्च - गच्च , कच्चा, कच्च्या ,कच्ची ,कच्चे ,उच्चाटन, उच्चार.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) ड्ड - खड्ड्यात ,खड्डे ,खड्डा , उड्डाण .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) त्व - जीवनसत्व, महत्व, महत्वाचे, महत्त्वाचा ,महत्त्वाची , त्वरित, त्वचा, त्वचाचे , त्वचाला, त्वचेवर, त्वचेच्या ,त्वचेची ,त्वचेचे ,त्वचेचा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) न्म - जन्म, जन्मदिवस ,जन्माला ,जन्मलेल्या ,जन्मले ,जन्मभर, जन्मात ,जन्मापासून ,जन्मसिद्ध, जन्मजात, जन्मतःच ,जन्मस्थान, जन्मला, सन्मान, सन्मानित , सन्मानपूर्वक.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०५- ०३- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) ळ्य - टाळ्या , टाळ्यांचा , पोळ्या,सगळ्या , मोळ्या ,गोळ्या ,कळ्या , जाळ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) क्ष्य - भक्ष्य , लक्ष्य , पक्ष्यांना.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) म्ह - म्हातारा ,म्हातारी , म्हणतात , म्हणाले ,म्हटले ,म्हटलं , म्हटला ,म्हटल्यावर ,म्हटले , म्हणाली ,म्हणूनच ,म्हणत , म्हणतो ,म्हणतोस , म्हणतोय ,म्हैस ,आम्ही, तुम्ही ,म्हणून ,म्हणाला, म्हणजे, म्हणालीस , म्हणतेस.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) न्ह - उन्हाळा, उन्हाळ्यात , उन्हाळ्याच्या , उन्हात , उन्हाळी , पुन्हा , पन्हाळा , चिन्ह , कान्हा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) ऱ्ह - वऱ्हाड, कुऱ्हाड , चर्‍हाट , कऱ्हा नदी , ऱ्हस्व.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com *६) ज्ज - मज्जा , सज्जन , सज्ज.* ️〰️〰️ *७) ल्ल - किल्ला , हल्ला ,सल्ला , गल्ला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) द्द - बद्दल ,मुद्दल ,अद्दल ,रद्द ,मुद्दाम , जिद्द , रद्दी,सरहद्द.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) स्स - भुस्सा , रस्सा , रस्सीखेच.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) न्न - अन्न , प्रसन्न , प्रसन्नता , उन्नती, भिन्न ,भिन्नभिन्न , भिन्नता , खिन्न .* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०४- ०३- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) भ्य - अभ्यास, अभ्यासक्रम ,अभ्यासात ,अभ्यासाला ,अभ्यासाने ,अभ्यासासाठी ,अभ्यासाची,अभ्यासिका , अभ्यासाचा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) म्य - रम्य , म्यूकर, म्याऊम्याऊ , सुदाम्याचे, नयनरम्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) य्य - ठिय्या , अय्या , रमय्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) ऱ्य - कोऱ्या , डुबऱ्या, भराऱ्या , कडीकपाऱ्या ,पायऱ्या , कैऱ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) ल्य - वात्सल्य, सानुल्या, टोपल्या ,सावल्या, ओल्या ,चकल्या, बादल्या ,चिमुकल्या , घेतल्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) व्य - व्याज , व्यापारी ,काव्य, वायव्य ,व्यवहारे ,व्यवस्थित, व्यवसाय ,व्यवहार, व्याख्या, व्यवस्था , व्यक्ती , व्यक्तीच्या, व्यक्तीला , व्यवस्थापन,व्यायाम , व्यवस्थापनाच्या ,.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) श्य - आवश्यक ,नैराश्य, आवश्यकता, अवश्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) ष्य - भविष्यकाळात ,भविष्यात ,भविष्य , शिष्य भविष्यवाणी,.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) स्य - रहस्य ,अमावस्या , तपस्या , समस्या, समस्यांचा , समस्यांचे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) ह्य - वह्या , लाह्या , सह्या ,बाह्यरेषा ,बाह्यरेषेवर , बाह्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०२- ०३- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) ढ्य - मेंढ्या , पेंढ्या, बलाढ्य, धनाढ्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) ण्य - फण्या , गोण्या, पुण्याई लावण्य, अरण्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) त्य - पणत्या , त्याला , त्याच्या ,त्यांनी , त्याच्या ,त्यांच्या , त्यामुळे ,त्यामुळं, त्यामुळेच ,त्या ,त्यांनी, त्यांच्या, आत्या , चकत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) थ्य - तथ्य, पोथ्या पायथ्याशी ,पालथ्या ,काथ्या, मेथ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) द्य - गद्य , पद्य, वाद्य, विद्यार्थी, विद्या, गाद्या , फांद्या , द्या , द्यावे , द्यावा द्यायला द्यायची द्यावे, द्यायचे , द्यायचा , द्यायचं .* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) ध्य - मध्य , ध्यान , ध्यास, संध्या, संध्याकाळ,ध्यानात , ध्यानी, ध्यानी , ध्यानात ,ध्येय ,ध्येये.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) न्य - न्याय , धान्य, अन्य ,अन्यथा ,वन्य, वन्यजीव, अनन्या, अन्याय, न्यायला, न्यायाधीश ,न्यायालयाने ,न्यायला ,न्या , न्यायमूर्ती, न्यायालयात ,न्यायालय ,न्यायालयाने.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) प्य - रौप्य ,सोप्या ,प्यायला ,प्यावे , प्याला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) फ्य - चाफ्याची, लिफाफ्यात, वाफ्यात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) ब्य - लोंब्या ,तांब्या ,ओंब्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.२८- ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) क्य - वाक्य,वाक्यात, शक्य,शक्यता , शक्यतो , मोजक्यात, मोजक्या, मोडक्या ,पडक्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) ख्य - नवख्या , चरख्यात , सख्या, राख्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) ग्य - भाग्य, योग्य , योग्यच , ,योग्यता , अयोग्य , भाग्योदय, भाग्य , भाग्यवान , वैराग्य.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) घ्य - घ्यावे, घ्या, घ्यावी , घ्यावा , घ्यायची , घ्यावेत , घ्यायचा , घ्याव्यात , घ्यायचं , घ्यावयास , घ्यावयाची , घ्यावयाचे , घ्याव्यात , घ्याव्या , घ्यावं ,घ्यायला , घ्यायचा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) च्य - तुमच्या , त्यांच्या, पुढच्या,राज्याच्या , तुमच्यावर, तुमच्याशी , तुमच्यासाठी, तुमच्याकडे , तुमच्याकडून , दाराच्या , घराच्या ,सर्वाच्या , खोलीच्या, वरच्या, आमच्या यांच्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) ज्य - राज्य ,राज्यात , राज्यात, राज्यातील, राज्याची , राज्याला, राज्यकारभार , स्वराज्य , पूज्य , ताज्या , भाज्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) झ्य - माझ्या, तुझ्याशी , तुझ्यावर , तुझ्यासाठी , तुझ्याकडे तुझ्यावर , तुझ्या,माझ्याशी ,माझ्यावर , माझ्याजवळ , माझ्यासाठी , माझ्यासारख्या, माझ्यापेक्षा , माझ्याबरोबर* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) ट्य - सोंगट्या, पेट्या, गोट्या , रोट्या, वाट्या, वाट्याला , काट्यात, करवंट्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) ठ्य - अंगठ्या , काठ्या, मोठ्या,लाठ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) ड्य - कुंड्या,धोंड्या, मांड्या , गुंड्या ,साड्या , बांगड्या, खोड्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.१२ - ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) दुसऱ्या दिवशी शाळेत येताना गुरुजींनी पप्पूला देण्यासाठी दोन रोपे आणली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) आता मुलांच्या सर्व लक्षात आले. एका रोपट्याच्या बदल्यात दोन रोपटी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) पप्पूच्या मनात विचार सुरु झाले. माझ्यावर राज्य आलं, की मी चिडतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) पवनचक्की वीज निर्माण करते आणि आणि ती पंपासाठी वापरतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) निर्झराचे गोड गीत ऐकत वाऱ्यावर खेळू सोनेरी उन्हात, हिरव्याश्या त्या तृणावर.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) इंद्रधनुष्यात सात रंग असतात.* 〰️〰️〰️〰️〰️ *७) शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. शिकल्यामुळे माणूस विचार करू लागतो आणि स्वतःची परिस्थिती बदलवू शकतो*. 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८)'शिक्षणामुळे माणसाचे पशुत्व नाहीसे होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होते', असे सावित्रीबाईंचे मत होते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणकार्यात व समाजकार्यात सावित्रीबाईंनी त्यांच्या बरोबरीने काम केले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०)संत एकनाथ महाराजांनी कावडीतील पाणी त्या तडफडणाऱ्या मुक्या प्राण्याला मोठ्या मायेने पाजले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.१० - ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) काबाडकष्ट करणारे असंख्य लोक असतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) संध्याकाळच्या कलत्या उन्हात मुले खेळायला बाहेर पडली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) एका डबीत वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या, त्या काढल्या. कागदाची शिडं करून ती काड्यांना टाचणीनं टोचली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली ती बाहुली पऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) नखे व केस वाढल्यावर कापावे, तसेच त्वचा, नाक व डोळ्यांची स्वच्छता राखावी.* 〰️〰️〰️〰️〰️ *७) बंडू म्हणाला, मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांचा होड्या करून देतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) सायंकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना घेऊन घराकडे आले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) सदाफुलीने छान गाणे म्हटले. झेंडूने गोष्ट सांगितली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) प्रत्येकाने आपल्या आहारात धान्ये कडधान्ये ,भाज्या आणि फळे यांचा वापर करावा .* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०४- ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) उत्तम आरोग्य राखूया ,परिसर स्वच्छ ठेवूया.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) चपळ खारुताई बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) बंडून स्वतः सार्‍या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) शेतकरी शेतात कष्ट करतात. कामगार कारखान्यात काम करतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) परी गंमत पाहण्यासाठी एका झाडाच्या मागे लपून बसली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) चिचू म्हणाला, " मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे" .* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०३- ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) सोनू मैत्रिणींसोबत क्रिकेटसुद्धा खेळते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना सोनूला दादा दिसला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) गोष्टीचे पुस्तक वाचत सोनू झोपी गेली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून वाटते. धन्यवाद!.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) फुलांच्या संमेलनात जाई ,जुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कन्हेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) चिचू उंदीरला कधी कधी पक्ष्यांसारख उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याश्या वाटायच्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) आईला पिसारा दाखवण्यासाठी चिचु पळत पळत घरी निघाला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०१- ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) मंजू नियमीत अभ्यास करते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) माझ्या देशावर माझे प्रेम आहे.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) संजीव प्रत्येक उपक्रमात भाग घेतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) अंगणातील चिमण्यांना हुश हुश करायचे नसते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) जंगलातील झाडांवर घरट्यात छोटे मोठे पक्षी आनंदाने राहतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) रवी आईने डब्यात दिलेले दळण घेऊन* *गिरणीत गेला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) बक्कू गाईला चारा देते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) हिशेबातील चूक सापडेपर्यंत एकनाथ झोपले नाहीत.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) झरा मोठा असल्यास त्याला ओढा म्हणतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) अनेक दुखण्यांवर वनस्पतींची औषधे उपयोगी असतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *११) आई-बाबांना शिवशंकराबद्दल खूप अभिमान वाटला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१२) टोपीवाल्याने युक्ती केली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.२९- ०१- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) झाडे आपले मित्र आहेत.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) अंजली जेवताना ताटात काही शिल्लक ठेवत नाही.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) उन्हाळा आला आणि कडक ऊन पडले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) आईने प्रेमाने गऱ्यांचा द्रोण विनूच्या हाती दिला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) पशु - पक्षी झऱ्याचे थंडगार पाणी पिऊन संतुष्ट होतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे सर्वांचे संकट टळले.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) रानात वाऱ्याने रंगीबेरंगी रानफुले डोलत होती.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) पावसाळ्यात नद्या, नाले भरून वाहतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) झाडे हवा स्वच्छ ठेवतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) आपणा परसात, डब्यात ,कुंडीत वनस्पती लावू शकतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *११) फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलावर उडत होती.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१२) महेश म्हणाला, ' पोस्टमन काका पत्ता बघून पत्र घरी पोचवतात ! '.* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* *श्रीमती प्रमिला सेनकुडे.*

*🌺उपक्रम🌺* (दि.२२- ०१- २०२१) *✍ ' जोडशब्द '.* http://www.pramilasenkude.blogspot.com *औरसचौरस* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *अष्टोप्रहर* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *आगतस्वागत* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *किडूकमिडूक* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *गुळखोबरे* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *पाहुणारावळा* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *मीठभाकरी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *टंगळमंगळ* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *चेष्टामस्करी* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *मेवामिठाई* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *अक्राळविक्राळ* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *टक्केटोणपे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे. ता.हदगाव जि.नांदेड.

*फुलोरा कलेचे माहेर घर* २१/०१/२१ आजचा उपक्रम-- चित्र काव्य *पळस* लहान पणा पासून ओळखीचा सगळ्यांच्या शेतातून पाने आणून रोज पत्रावळी बनवायच्या जेवण रोज शुद्ध सात्विक सगळ्यांच पत्रावळीवर व्हायचं आयुर्वेदिक गुणधर्म यामध्ये उदर भरणाला मिळायचं पळस फुलांचा गर्द रंग शिमग्याला उडवायचा पोळा दसरा सकाळी दारापुढे मेढी मांडायचा अनेक औषधी गुणामध्ये पळसाचा उपयोग होतो डोंगर दरी रानी वनी हा बाराही महिने मिळतो नित्य जीवनात उपयोगी पळस हा मानवाचा मित्र शोधण्यास त्रास नाही तो सहज मिळतो कुठेही सर्वत्र 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिला सेनकुडे नांदेड.

*🌷जीवन विचार*🌷 *〰〰〰〰〰〰〰️* http://www.pramilasenkude.blogspot.com *जीवनाचा खरा अर्थ समजण्यासाठी जीवनाची परिभाषा समजणे आवश्यक आहे. कारण जीवन म्हणजे संग्राम आहे , यज्ञ आहे , पयोधी आहे.जखमांशिवाय संग्राम असत नाही.ज्वाळांशिवाय यज्ञ होत नाही . लाटांशिवाय जलधी असत नाही. हे सर्वकाही हास्यमुखानेच स्वीकारायला हवे.कारण जीवन हा हास्य* *आणि अश्रू यांचा सुरेख संगम आहे.* *जीवनात अनेक संकटे येतात, अनंत आव्हाने निर्माण होतात. अनंत आव्हानांना, संकटांना प्रदीर्घपणे सामोर जाऊन संघर्ष करणे व साहसाने त्याच्या कसोटीत उतरणे म्हणजेच जीवन होय.* *जीवन म्हणजे श्रम आहे, सत्कर्म आहे,प्रेम आहे.* *म्हणूनच माणसाच्या जीवनाचं सारं दोनच शब्दात सांगता येईल.* *' आला आणि गेला .' काही माणसं मरत - मरत जगत असतात तर काही माणसं जगत - जगत मरत असतात.जन्मकाळाप्रमाणे मरणकाळ हा देखील एक आनंदसोहळा आहे. कारण शरीर पिंजऱ्यातून आत्म्याचा पक्षी मुक्त होऊन अनंतात विलीन होतो.* *हे सार जग नियतीच्या अंगा - खांद्यावर खेळत असतं. नियती कधी हसते , कधी रडते. माणसाचं जीवन म्हणजे नियतीचं हास्य होय.माणसाचं मरण म्हणजे नियतीचं रुदन होय. ' जीवन सरे मरण उरे ' हे सूत्र जगताना ध्यानात ठेवावं लागतं.* 〰〰〰〰〰〰〰〰 🌺🌸🌺🌸🌺🌸🌺 *✍शब्दांकन /संकलन* *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)* जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.१३ - ०१- २०२१) *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे .* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) हिना सिद्धु कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* *उत्तर - नेमबाजी* *२) ' लिहीत आहे ' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?* *उत्तर - संयुक्त क्रियापद* *३) भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण?* *उत्तर - डॉक्टर विक्रम साराभाई* *४) भिलाई हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे?* *उत्तर - छत्तीसगड* *५) १ ते १०० अंक लिहितांना ७ हा अंक कितीवेळा लिहावा लागतो?* *उत्तर - १९ वेळा लिहावा लागतो* *६) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा?* *'शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण व्यायाम करतो '* *उत्तर - केवल वाक्य* *७) बेडकाचे शास्त्रीय नाव...........आहे?* *उत्तर - राणा टायग्रीना* *८) हिरा आणि ग्रॅफाइट ही कार्बनची ......... रूपे होय?* *उत्तर - स्फटिक* *९) मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता?* *उत्तर - प्रमस्तिष्क* *१०) विसाव्या शतकात पहिले 'महिला विद्यापीठ'कोणाच्या प्रयत्नातून स्थापन झाले?* *उत्तर - महर्षी धोंडो केशव कर्वे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.१२ - ०१- २०२१) *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे .* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म कधी ? व कुठे झाला?* *उत्तर - राजमाता जिजामाता यांचा जन्म दि. १२ जानेवारी इ.सन.१५९८ रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला.* *२) राजमाता जिजामाता यांच्या आई वडील यांचे नाव काय आहे?* *उत्तर - त्यांच्या आईचे नाव म्हाळसाराणी व वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव.* *३) स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?* *उत्तर - १२जानेवारी १८६३* *४) स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय आहे?* *उत्तर - नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त* *५) स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव काय आहे?* *उत्तर - भुवनेश्वरी देवी* *६) स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय आहे?* *उत्तर - रामकृष्ण परमहंस* *७) डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो?* *उत्तर - काचबिंदू* *८) अध्ययनाचे नियम ही .......... या मानसशास्त्रज्ञाची निर्मिती आहे?* *उत्तर - जे.बी. वैटसन* *९) हवा वातावरणातील ....... कायम राखते?* *उत्तर - तापमान* *१०) संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात?* *उत्तर - बाईटस्* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिला सेनकुडे.

*🌺उपक्रम🌺* (दि.१०- ०१- २०२१) *✍ समानार्थी शब्द.* http://www.pramilasenkude.blogspot.com *चंद्र - शशी, इंदू , विधू , निशानाथ , सुधाकर , रजनीवल्लभ , सोम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *अरण्य - रान , वन , कानन , विपिन* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *पक्षी - खग, विहंग , विहंगम् , अंडज* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *भुंगा - भ्रमर , अली , भृंग , मिलिंद , मधुकर* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *मुलगी - तनया , दुहिता , कन्या , तनुजा , सुता , लेक , पुत्री* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *वारा - वायू , वात , अनिल, समीर , मरुत , पवन* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *विज- चपला , चंचला , तडीता, बिजली , सौदामिनी , विद्युत , विद्युलता* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *सोने - कनक , सुवर्ण , कांचन , हिरण्य , हेम* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *सिंह - वनराज , केसरी , मृगेंद्र* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०७ - ०१- २०२१) *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे .* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन?* *उत्तर - वि .स. खांडेकर.* *२) महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा?* *उत्तर - रेगूर मृदा.* *३) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?* *उत्तर - गोंदिया* *४) कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या ठिकाणी वसले आहे?* *उत्तर - पंचगंगा* *५) 'महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी' असे..... या नदीस म्हटले जाते?* *उत्तर - कोयना* *६) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो?* *उत्तर - नैऋत्य मोसमी वारे* *७) रंगीत लाकडी खेळण्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?* *उत्तर - सावंतवाडी* *८) पुण्याजवळ......... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'आहे?* *उत्तर - खडकवासला* *९) अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे?* *उत्तर - कलिंगड* *१०) राज्यातील........ या शहरास आपण 'विद्येचे माहेरघर' म्हणून गौरवितो?* *उत्तर - पुणे* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.

*🌺उपक्रम🌺* (दि.०६- ०१- २०२१) *✍ अनेक शब्दांबद्दल एक शब्द.* http://www.pramilasenkude.blogspot.com *गेलेला काळ - गतकाळ* *घराची ओसरी - सोपा* *चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुद्ध पक्ष* *जस्त व तांबे यांचा मिश्र धातु - कास्य* *ज्याच्या हातात चक्र आहे असा - चक्रपाणि* *ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे - नियतकालिक* *ढगांनी आच्छादलेले - ढगाळलेले* *थोडा वेळ टिकणारे - क्षणभंगुर* *माशासारखे डोळे असलेली - मीनाक्षी* *पटकन पेट घेणारा - ज्वालाग्राही* *मजकुराची मांडणी व निवड करणारा - संपादक* *दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक* *देवळाच्या आतील भाग - गाभारा* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०५- ०१- २०२१) *✍ अनेक शब्दांबद्दल एक शब्द.* http://www.pramilasenkude.blogspot.com *नदीवर बांधलेला बंधारा - धरण* *संरक्षणासाठी किल्ल्याभोवती बांधलेली भिंत - तटबंदी* *रानातील विविध फळे - रानमेवा* *प्राणी किंवा पक्ष्यांसाठी राखून ठेवलेला जंगलाचा भाग - अभयारण्य* *छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश - कवडसा* *सहा तोंडाची - षण्मुख* *हिंडून करायाचा पहारा - गस्त* *बांबूपासून तयार केलेली लेखणी - बोरू* *हरणासारखे डोळे असणारी - मृगनयना , हरिणाक्षी* *संगीतातील राग गाण्यासाठी केलेले काव्य - चीज* *सपाट जमिनीवर बांधलेला किल्ला - भुईकोट* *आकाश जिथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ते - क्षितिज* *कड्यावरील दगडी बांधकाम - बुरुज* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०४ - ०१- २०२१) *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे .* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) २५ वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव असतो?* *उत्तर - रौप्य महोत्सव.* *२) ६० वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव असतो?* *उत्तर - हिरक महोत्सव.* *३) ९० वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव असतो?* *उत्तर - नवती महोत्सव* *४) कवी केशवकुमार यांचे पूर्ण नाव काय आहे?* *उत्तर - प्रल्हाद केशव अत्रे* *५) 'पंचतंत्र'या ग्रंथाचे ग्रंथकार कोण?* *उत्तर - विष्णु शर्मा* *६) 'दासबोध' या ग्रंथाचे ग्रंथकार कोण?* *उत्तर - संत रामदास* *७) 'राष्ट्रीय क्रीडा दिन ' कधी असतो?* *उत्तर - 29 ऑगस्ट* *८) वजनमापक यंत्र , ऑटोमिडिन गुणकारी औषध चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?* *उत्तर - डॉक्टर शंकर आबाजी भिसे.* *९)गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?* *उत्तर - छापखाना* *१०) खालील वाक्यात किती विशेषणे आली आहेत?* *'मृदुल , कोवळी ,श्यामल, हिरवळ पसरे पायांतळी'* *उत्तर - तीन* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.

*सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन* 💐💐💐💐💐🙏👏 *🌺उपक्रम🌺* (दि.०३ - ०१- २०२१) *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे .* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?* *उत्तर - ३ जानेवारी १८३१.* *२) सावित्रीबाई यांचा जन्म कुठे झाला?* *उत्तर - सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी सावित्रीबाईचा जन्म झाला.* *२)सावित्रीबाई यांच्या आईवडील यांचे नाव काय आहे?* *उत्तर - खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव - लक्ष्मीबाई* *४)मुलींची पहिली शाळा कधी सुरू झाली?* *उत्तर - 1 जानेवारी 1848* *५) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नामकरण कधी करण्यात आले?* *उत्तर - 2014 मध्ये* *६) सावित्रीबाई यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह कोणत्या वर्षी प्रकाशित झाला?* *उत्तर - 1854* *७) सावित्रीबाई यांनी प्रशिक्षित शिक्षिका म्हणून अध्यापनास कधी आरंभ केला?* *उत्तर - 1848* *८) सावित्रीबाईंचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह कधी झाला?* *उत्तर - 1840* *९) बावनकशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कधी झाले?* *उत्तर - 1892* *१) सावित्रीबाई यांची दिव्य ज्योत कधी निमाली?* *उत्तर -10 मार्च 1897* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.

*🌺उपक्रम🌺* (दि.०२ - ०१- २०२१) *✍ सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नोत्तरे .* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) फळे पिकविण्यासाठी वापरला जाणारा वायू कोणता?* *उत्तर - इथिलीन.* *२) वनस्पतींना अंतर्गत श्वसनास उपयुक्त घटक कोणता?* *उत्तर - तंतूकणिका.* *३) दालचिनी म्हणजे....... झाडाची साल होय?* *उत्तर - सिनॕमन* *४) कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे?* *उत्तर - सोयाबीन* *५) गुलाबाचे पान कोणत्या प्रकारचे असते?* *उत्तर - संयुक्त* *६) शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती?* *उत्तर - न्यूराॕन* *७) लाल रक्तपेशींचा जीवनकाळ किती दिवसाचा असतो?* *उत्तर - १२०* *८) दूध नासणे किंवा दही बनणे ही कोणती क्रिया आहे?* *उत्तर - जीवरासायनिक* *९) कंठस्थ ग्रंथीचा आकार ...... या इंग्रजी अक्षरा सारखा असतो?* *उत्तर - H* *१०) कोणत्या वायूच्या वाफा श्वसनसंस्थेचे घातक असतात?* *उत्तर -सल्फरडायऑक्साईड* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि.प.प्रा. शाळा गोजेगाव. ता.हदगाव जि.नांदेड.