✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●●  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● 📅 दि. 01/10/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जेष्ठ नागरिक दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १८६९ - ऑस्ट्रियामध्ये  पहिल्यांदा  पोस्टकार्डचा  वापर १९५८ - नासाची स्थापना. 💥 जन्म :- १९१९ - गीतरामायणकार ग.दि. माडगूळकर, मराठी कवी व साहित्यिक 💥 मृत्यू :- १४०४ - पोप बॉनिफेस नववा १९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांवर आणि सैन्यातील जवानांवर गर्व आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बातमधून जनतेशी संवाद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *इंडोनेशियातील त्सुनामीत 832 नागरिकांचा मृत्यू, हजारो जण जखमी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *फिजीला 6.6 रिश्टरस्केल तीव्रतेच्या भुकंपाचा धक्का.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेड : संविधान बचाओ, देश बचाओ या मोहिमे अंतर्गत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनचे नांदेडला दहन करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जेट एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड, 96 प्रवाशांसहित इंदूर विमातळावर इमरजन्सी लँडिंग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागपूर : 270 दिव्यांग व्यक्तींना अत्याधुनिक प्रकारच्या कृत्रिम हाताचे नागपुरात नि:शुल्क वाटप करण्यात आले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा, धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला डच्चू तर पृथ्वी शॉ ला मिळाली संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधार झाले पुन्हा निराधार* http://dainikyashwant.com/epaper/edition/323/october/page/4 आधारकार्ड ने बऱ्याच गोष्टी सुरळीत केल्या आहेत. त्याची चर्चा या लेखात केली आहे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्येष्ठ नागरिक* आई-वडिलांना टाकणाऱ्यांना दट्टा जी मुलं वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांची रवानगी वृद्धश्रमात करतात, अशा मुलांना 'डिफॉल्टर' ठरवून त्यांची नावं ठळकपणे प्रसिद्ध करण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ज्येष्ठ नागरिक धोरणाला मंजुरी देण्यात आली. या धोरणात ही बाब अधोरेखीत करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एक कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिक असून १ ऑक्टोबर रोजी असलेल्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदरी अनोखी भेट पडली आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाला अपेक्षेप्रमाणे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ६५ वर्ष वा त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक या धोरणातील सुविधांसाठी पात्र धरले जाणार आहेत. जात, वंश, पंथ, लिंग, शैक्षणिक किंवा आर्थिक दर्जा यापासून हे धोरण स्वतंत्र असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. वृध्दापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठीच हे धोरण बनवण्यात आले आहे. झोपविले तुम्हास कोरड्या जागी ।. आईच्या त्या प्रेमळ नेत्रांमध्ये , चुकुनही अश्रु आणु नका ।. जिने फुले आच्छादिली होती , क्षणोक्षणी तुमच्या मार्गात ।. त्या मार्गदर्शकाच्या मार्गातील काटे कधी बनु नका! पैसे तर चिकार मिळेल, पण आई-वडील नाही मिळणार ... *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते व कार्यक्षमता वाढते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) हरीतक्रांती कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?* १९६५ मध्ये *२) काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो ?* रौलेट ऍक्ट *३) मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?* ग्रीनीच *४) भारतात पहिली वन संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली ?* देहरादून *५) परम महासंगणकाची निर्मिती कोणी केली ?* विजय भटकर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● डॉ. कु. सारीका रमेश शिंदे ( प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या ) ● अर्जुन वाकोरे, नांदेड ● विशाल मस्के, साहित्यिक, बीड ● निलेश पंतमवार, नांदेड ● व्यंकट रेड्डी मुडेले ● गोविंदराव इपकलवार, नांदेड ● आनंद पेंडकर, ग्रामसेवक, येवती ● व्यंकटेश काटकर, साहित्यिक, नांदेड ● गजानन काळे, नांदेड ● सुभाष टेकाळे, माहूर ● श्रीकांत भोसके ● माधव शिंदे, सहशिक्षक ● साईनाथ पलीकोंडावार, येवती ● राहुल कुंटोजी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काकस्पर्श* प्रयत्न करून हल्ली काकस्पर्श होत नाही तेच ते खाऊन त्यांना थोडाही हर्ष होत नाही त्यांनाही वाटतं जरा भेटावं काही नवे नवे जीवंतपणीच पितरांवर नीट लक्ष द्यायला हवे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 29*      *संत न बंधे गाठ्दी* *पेट समाता तेई |* *साईं सू सन्मुख रही* *जहा मांगे तह देई ||* अर्थ संत सज्जनांचं एक महत्वाचं लक्षण महात्मा कबीर सांंगतात. सामान्य माणूस हावरटपणा करीत असतो. धन संपती भौतिक बाबींच्या संचयाच्या मागे लागतो. सत्ता आणि पदं ज्यांच्या हाती आहेत. ती बहुतांश मंडळी सत्तेचा दुरूपयोगंच करते.त्यांच्याशी संबंधितांचं विविध प्रकारे शोषण करते. कोणतीही सत्ता स्वतःच्या स्थान बळकटीकरणा इतका प्रजेच्या बळकटी करणाचा विचार करीत नाही. कोणी विरोध केला तर त्यावर डुख धरून वेळोवेळी त्याला अडचणीत आणलं जातं. परिणामस्वरूप प्रजा देशोधडीला लागते. राजा व सेवक मात्र गब्बर होतात. संत सज्जन कधीच संचय करीत नाहीत. मग तो धन संपतीचा असो की कुणाप्रति वाटणार्‍या चिडीचा असो. त्यांच्या ओटात एक अन पोटात एक नसतेच कधी. सदैव सदाचार अन सद्वर्तनाचाच मार्ग ते चालत असतात. कधीही अविचार करून विवेकाला ते दूर सारत नाहीत. त्यांना भविष्याची चिंता करण्याची गरजंच काय? विवेकातून निरामयतेची भावना वाढीस लागते. सब्ब भवतु कल्याणम ही वृत्तीच जगाचं कल्याण करू शकते. सर्वेत्र् सुखीनः सन्तु निरामय । ही भावना सज्जन, कलावंत व विचारवंताठायीच असते. म्हणूनच त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावसं वाटतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जे स्वप्न तुम्ही पाहिले आहे ते पूर्ण करु शकत असाल तर मग थांबता कशाला ? ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.काही व्यत्यय आला तरी थांबू नका. जर तुम्ही थांबलात तर तुम्ही पाहिलेले सर्वप्रथम कधी पूर्ण कराल. जिद्द, चिकाटी, मेहनत,सातत्य ह्यामध्ये कधीच माघार घ्यायची नाही.ती तेवढ्याच जोमाने पुढे चालू ठेवावी की, तुम्ही सुरवातीला स्वप्न पाहताना केली होती. मग थांबता कशाला ?लागा तुमच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने....उठा,जागे व्हा आणि स्वप्नपूर्तीच्या मार्गाला लागा. आता माघार घ्यायची नाही असंच ठरवा. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 💐🍃💐🍃💐🍃💐🍃💐🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *मेहनत - Hard work* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दृष्टिकोन* एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले. ’पाणी चवीला कसे लागले ?‘ गुरूंनी विचारले.'खारट', ‘कडु’ असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले. गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले, ‘आता या तळयातील पाणी पिऊन पहा.‘ त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं, आता यापाण्याची चव कशी आहे ?‘ ‘ताजी आणि मधुर !‘ शिष्याने सांगितले. ‘आता तुला मिठाची चव लागतेय ?‘ ‘नाही‘. गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात आतात घेतला. ते म्हणाले, ‘आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा खारटपणा, कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आापण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.‘ तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन  ठेवावा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●● *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ●●●●●●●●●●★●●●●●●●●●●●

*💐भाषिक उपक्रम💐* *उपक्रमाचे नाव - शब्दफुले,शब्दहार(वाक्य)* 🌸🌹🌸🌹🌸🌹🌸 *इयत्ता*-- *पहिली,दुसरी* 🌹चला चला अक्षरे वेचूया शब्दफुले तयार करुया 🌹छान छान हार बनवूया 🌹शब्दांचा हार बनवुया(वाक्ये) 🌹सर्वात जास्त वाक्य तयारा करु या. *🥗साहीत्य*🥗 - शब्द टोपली,अक्षर कार्ड,शब्दकार्ड कृतीः प्रथम शब्द टोपलीतील अक्षरांचे,शब्दांचे कार्ड सर्व विद्यार्थी घेतील.व नंतर त्यांच्या जवळील शब्दात स्वतःला माहीत असणारे शब्द टाकुन वाक्य तयार करून लिहतील. अक्षरांचे शब्द तयार करून लिहितील, सांगतील. *🌸शब्दफुले,शब्दहार🌸* *उपक्रमाचे फायदे* 🌸 शब्दसंग्रह वाढतो. 🌸जोडशब्द वाचण्याचा सराव होतो. 🌸जोडशब्द लिहण्याचा सराव होतो. 🌸 वाचनाची गती वाढते. 🌸जोडशब्दासारखा किल्ष्ट घटक हसत खेळत शिकतात. 🌸आकलन युक्त वाचनाची सवय लागते. शब्द टोपलीत विविध शब्द तसेच , स्वर,व्यंजन ,बाराखडीतील कोणतेही अक्षर आपण घेऊ शकतो. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷〰〰〰〰〰〰दिनांक २९/०९/२०१८ ✍ प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 29/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्जीकल स्ट्राइक डे* 💥 ठळक घडामोडी :- २०१० - आधारकार्ड वाटपासाठी प्रारंभ, महाराष्ट्रातून सुरुवात 💥 जन्म :- १९३० - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- सर्व वयोगटातील महिलांना आता केरळ मधल्या सबरीमाला मंदिरात करता येणार प्रवेश - सर्वोच्च न्यायालय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *परभणी : केंद्र सरकारच्या एफडीआय व ऑनलाइन खरेदी-विक्री धोरणाविरुद्ध अनेक शहरातील बाजारपेठ बंद* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *इंडोनेशियाला 7.5 तीव्रतेचा भूकंप, सुनात्मीचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांनी लोकसभेतल्या खासदारकीसह पक्षाचा ही दिला राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आधारशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था कोलमडणार; कंपन्यांनी नवा कायदा करण्याची केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आशिया चषकच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने बांगलादेशवर तीन विकेट्स राखून मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *आधारकार्डचा इतिहास* http://epaper.ejanshakti.com/m5/1834777/Pune-Janshakti/29-09-2018#page/6/1 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बनगरवाडी* व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी माणदेशच्या परिसरातील धनगरवस्तीच्या पार्श्वभूमीवर घडते. या कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून बनगरवाडीत दाखल होतो. नोकरीवर पहिल्यांदाच रुजू होण्यासाठी आलेल्या राजारामाला बालट्यांच्या धमकीशी सामना करावा लागतो. त्यामुळे आपण बरे आणि आपले काम बरे असा हेतू ठेवून तो गावात राहायला लागतो. जेमतेम पन्नासेक घरांची वस्ती असलेल्या या गावात त्याला शाळा सुरु करण्यासाठी कारभार्‍याची समर्थ साथ मिळते. शाळा नियमित सुरु होते आणि स्वत:च्या नकळत राजाराम गावातल्या लोकांमध्ये आरामात मिसळून जातो. गावात विविध समस्यांच्या सोडवणूकीत त्याला कारभार्‍याबरोबर मान मिळायला लागतो. संसाराच्या प्रश्नांबरोबरच गावातले इतरही तंटे तो कारभार्‍याबरोबर सोडवायला लागतो. दर आठवड्‍याला गावाकडे जाताना लोकांची कामेही तो करायला लागतो. लोकांची लिहून दिलेली पत्रे पोस्टात टाकणे, मनिऑर्डरी करणे अशा प्रकारची तो कामे करतो. मास्तरला काहीच अशक्य नाही असा भोळाभाबडा विश्वासही या गावाकर्‍यांमध्ये असतो. यामुळेच शेकूसारखा माणूस पेरणीसाठी गावातून कोणाकडून तरी बैल घेउन दे अशीही विनवणी करतो. पण ती मागणी तो पूर्ण करू शकत नाही. शेकूची गरज आपण भागवू न शकल्यामुळे त्याची बायको नांगराला दुसर्‍या बैलाच्या जागी जुपूंन घेते हे ऐकल्याने मास्तर हताश होतो. ही येडीबागडी धनगरं आपल्यावर किती विश्वास टाकतात याने तो अस्वस्थ होतो. गावात रहायचे तर गावकर्‍यांना होईल तेवढी मदत करायला हवी. याच हेतूने रामा धनगराचे राणीच्या पैशाची तालुक्याला जाऊन मोड आणण्याच्या परोपकारात त्याला पैसे चोरीला गेल्याने मनस्तापही भोगावा लागलेला आहे. अशी मदत करत असतानाच कारभार्‍याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. ’मास्तर आपलेच आहेत’ त्यांना काम सांगितले तर बिघडले कोठे ?या भुमिकेतून अंजी काम सांगते. मास्तरही गावातल्यांच्या उपयोगी पडायचे या भुमिकेतून तिचे काम करतात. बालट्याला हे माहित होते आणि कारभार्‍याकडे तो मास्तराची कागाळी करतो. कारभारी मास्तराशी अबोला धरतो. अखेर आठवड्याभराने काराभारी आपल्या मनातील शंका बोलून दाखवतो. आपल्या आतापर्यंतच्या वागणुकीतून कारभार्‍याला आपल्याबद्दल विश्वास वाटत नाही हे समजल्यावर मास्तराला सात्विक संताप येतो. आपण चांगल्या भावनेने लोकांच्या उपयोगी पडतोय हाच आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटते. आपण बदलीच करून घ्यावी असे त्याला वाटते. पण कारभार्‍याचे समाधान होते आणि दोघांमधील अबोला दूर होतो. एकीकडे शाळा सुरळीत चालत असतानाच गावात एखादी कायम स्वरूपी वास्तू असावी असा विचार करून मास्तर गावकर्‍याच्या मदतीने तालीम बांधून घेतो. पंत सरकारांच्या हस्ते तालीमचे उद्‍घाटन होते. मास्तरमुळेच आपल्या गावात राजा आला आपल्या आयुष्याचे सार्थक झाले याचे कारभार्‍याला समाधान वाटते. काही दिवसानंतरच कारभा-याचे निधन होते. कारभार्‍याच्या निधनानंतर गावाचे रूपच पालटते. गावात दुष्काळ पडतो. सारी वस्ती गावातून बाहेर पडते. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन मास्तरची गावातून बदली होते. तो रिकाम्या गावातून बाहेर पडतो. माडगुळकरांनी कादंबरीत या मुख्य कथानकाबरोबर इतर उपकथानकेही रंगवली आहेत. सताचे लांडगा मारणे, जगन्याचे प्रेमप्रकरण, शेकू-अंजीचे प्रेमप्रकरण, आयुब, आनंदा रामोशी यांचे मास्तरांचे प्रेम, तालीम बांधत असतानाच बाळा धनगराचा आडमुठेपणा, बालट्याला झालेली मारहाण अशा अनेक प्रसंगांनी धनगरांच्या विविध स्वभावाचे चित्रण केले आहे. याचबरोबर धनगरांचे खडतर जिवनही यात येते. सुगीच्या काळातले त्यांचे जगणे आणि दुष्काळ पडल्यानंतरची त्यांची झालेली वाताहत कादंबरीत अनुभवायला मिळते त्यामुळे शिक्षक आणि गावकर्‍यांमधील जिव्हाळा हा अशाच बनगरवाडीसारख्या कादंबर्‍यांमधून पहायला मिळणार. बनगरवाडीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या कादंबरीचा १२ भांषांमध्ये अनुवाद झालेला आहे. मध्यंतरी अमोल पालेकरांनी बनगरवाडीवर चित्रपट देखिल काढला होता          *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गोबीचं वाळवंट किती क्षेत्रफळावर पसरलं आहे ?* १,२९५,000 चौ.कि.मी. *२) बहिष्कृत हितकारिणी सभेचं स्थापना वर्ष कोणतं ?* १९२४ *३) चौथ्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कोणी तयार केला होता ?* डॉ. धनंजयराव गाडगीळ *४) 'ओआयएल'चे विस्तारित रूप काय ?* ऑईल इंडिया लिमिटेड *५) 'हरारे' हे कोणत्या देशातील एक प्रमुख शहर आहे ?* झिम्बाब्वे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ●  प्रथमेश नागोराव येवतीकर ●  सतीश चव्हाण ● मनीष साबळे ● शिवाजी मुपडे ● महेश गायकवाड ● नीलम येसमोड ● राजेश सामला ● संदेश जाधव ● महेश राखेवार, नांदेड ● गणेश पेटेकर, धर्माबाद ● मारोती वाघमारे ● अजय मिसाळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अनर्थ* उसवलं की लगेच शिवता आलं पाहिजे पांगत चाललेलं दो-यात ओवता आलं पाहिजे थोडं फाटल की लगेच पटकन टाका घालावा भविष्यातला अनर्थ सहजा सहज टाळावा शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 28* *गुरु सामान दाता नहीं* *याचक सीश सामान |* *तीन लोक की सम्पदा* *सो गुरु दीन्ही दान ||* अर्थ गुरूसारखा दानशूर त्रीखंडात कोणीही नाही. सर्व दात्यांचे काहीतरी उद्देश असू शकतात. मात्र ज्ञानदान करताना सर्व विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा पवित्र उद्देश गुरूच्या ठायी असतो. म्हणूनच दातृत्त्वाची श्रीमंती त्यांच्याइतकी कुणाजवळही नसते. शिष्यासारखा (विद्यार्थी) याचकही जगात कोणीच असू शकत नाही. गुरूने कितीही ज्ञानदान दिले तरी खर्‍या विद्यार्थ्याची ज्ञानतृप्ती होणे अशक्य असते. एक लोक प्रत्यक्ष जगता येतो व दोन लोक काल्पनिक असले तरी त्यांच्यातला विहार असो की तिथली जीवनकल्पना , पुरान, कुरान , वेदाचे तत्वज्ञानावरची चिकित्सा असो. रूढी, परंपरा ,श्रद्धा, ज्ञान विज्ञानाकडे विवेकाने पाहाण्याची दिव्य दृष्टी गुरूच देत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= चित्रातले रंग आपल्या कल्पकतेने भरुन चित्र चांगले काढता येते, पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे, कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही. जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रम लागतात, त्याचबरोबर कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचाही प्रसंगानुरूप विचार करावा लागतो. कधीकधी घाई केली तर रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमी जास्त झाले तर रंग बेरंगही होऊन जातात. सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढता आले पाहिजे. नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाते. जीवन सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान ज्यांना अवगत आहे आणि ते ज्यांना साध्य करता येते तोच आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनू शकतो, हे मात्र खरे आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अविश्वास - Unbelief* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *कर्म म्हणजे काय ?* एकदा एक राजा हत्तीवर बसुन आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता. फिरत फिरत तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलाऊन म्हणाला, कां कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहीले नाही, त्याला ओळखतपण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावे वाटते आहे. प्रधान बुचकळ्यात पडला तो कांही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून पुढे निघाला. प्रधान विचारात पडला. त्यान तेे दुकान पाहून ठेवले व तो राजामागे निघाला. दुस-या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला. दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच नव्हते. आजुबाजुला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले. तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते. मात्र कोणी खरेदीदार नसल्याने मालक वैतागला होता. चौकशी करता कळले की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला ब-याचवेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्य संस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल. माल विकला जाईल. चार पैसे तरी मिळतील. प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापा-याला फाशी कां द्यावे वाटले याचा उलगडा झाला. व्यापा-याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंगलहरीनी दुषीत वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते. त्याने त्या दुकानदाराकडे थोडी चंदन खरेदी केली. दुकानदाराला ब-याच दिवसांनी गि-हाईक मिळाल्याने आनंद झाला. प्रधान निघाला आणि राज दरबारात राजापुढे ते चंदन ठेवले. राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला. त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन ? प्रधानाने त्या व्यापा-याचे नांव सांगितले. राजा म्हणाला, अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावे वाटले ! त्या व्यापा-याला कांही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला. राजा अध्ये मध्ये इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करु लागला. राजाच्या खरेदीने आनंदित व्यापा-याच्या मनात आता राजा मरावा हे येईनासे झाले. चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला. आपल्या मनात इतरां विषयी चांगले विचार, दयाळुपणा आणला तर इतरांच्या मनातुनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यन्त येतील व आपला उत्कर्ष होईल. मग कर्म म्हणजे काय ? अनेकजण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना...पण खरे हेच आहे की, आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय !!! सुडाची भावना, राग आणि अहंकार युक्त भावना त्यागून क्षमाशील राहण्यात जीवनाचे खरे मर्म आहे.. अन्यथा ते न संपनारे दुष्टचक्र आहे. खूप प्रश्न सोडून दिल्याने सुटून जातात।। तेव्हा सहकार्याची भावना आणि करुणामय मन ठेवा.. आनंदी जीवन जगा...। *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 28/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडचीराजधानी वॉर्सॉ काबीज केली. 💥 जन्म :- १९२९ - भारताची गानकोकिळा लता मंगेशकर 💥 मृत्यू :- १९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली- अयोध्या प्रकरणावर 29 ऑक्टोबरपासून सुनावणी घेण्याच्या निर्णयाचं आरएसएसनं केलं स्वागत* --------------------------------------------------- 2⃣ *राज्यातही सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा करण्याचे आदेश. शिवसेनेच्या विरोधानंतरही सरकारचा निर्णय. २९ सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा करणार.* ---------------------------------------------------  3⃣ *नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही, फ्रिजसह 19 ऐशोरामाच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात केली वाढ, यामुळे परदेशातून भारतात आयात होणाऱ्या वस्तू होणार आणखी महाग* --------------------------------------------------- 4⃣ *स्वच्छ भारत अभियान 2018 च्या स्पर्धेत सातारा देशातील सर्वात स्वच्छ जिल्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार गौरव* --------------------------------------------------- 5⃣ *यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक विनय गव्हाळे एसीबीच्या जाळ्यात.* --------------------------------------------------- 6⃣ *ख्यातनाम सुप्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन* --------------------------------------------------- 7⃣ *आज होणाऱ्या आशिया चषकातील अंतिम क्रिकेट सामन्यात बांगलादेशपेक्षा भारताचेच पारडे जड* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= दैनिक देशदूत या प्रसिद्ध दैनिकात प्रकाशितलेख *" रांगाच रांगा "* https://www.deshdoot.com/special-blog-on-discipline-of-line-nagorao-yevatikar-nanded-latest-update/ वरील लेख वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *कविता महाजन* कविता महाजन यांचा जन्म नांदेड मध्ये 05 सप्टेंबर 1967 रोजी झाला. त्या मराठी लेखिका, कवयित्री होत्या. कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या. त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार ● सन 2008 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार ● कवयित्री बहिणाई पुरस्कार ● साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला) ● मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी. अशा या महान साहित्यिक लेखिकेचे आज पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.          *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण झाले नाही. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?* अनंत *०२) भारतातील सर्वात मोठे थरचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान *०३) जगामध्ये एकूण किती खंड आहेत ?* सात *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● अरुण जांभळे ● सचिन बावणे ● साईनाथ कानगुलवार ● दिनेश घाटोळ ● सोमनाथ एकांडे ● प्रवीण चव्हाण ● ब्रम्हशंकर म्हात्रे ● अमोल घाटेकर ● विजय मुंडे ● विनोद नागटिळक *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *स्वच्छता* नको तिथे काही कचरा करतात केलेला कचरा काही आनंदाने भरतात कचरा करणाराला नसते काही लाज लज्जा शरम अस्वच्छता झाली म्हणून इतरांवर होतात गरम शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 27* *कुमति कीच चेला भरा* *गुरु ज्ञान जल होय |* *जनम जनम का मोर्चा* *पल में दारे धोय ||* अर्थ महात्मा कबीर मनुष्य जीवनात गुरूचे महत्त्व पटवून देतात. गुरूशिवाय शिष्य अविचाराने भरलेला जणु चिखलाने माखलेला कुंभ आहे. गुरूकडून मिळणारा उपदेश म्हणजे पाण्याचा वाहता झराच ! गुरूकडून मिळणार्‍या ज्ञानामुळे वर्षानुवर्षाचा जड मतीवर चढलेला मळ खळखळत्या ज्ञानरूपी पाण्यात क्षणार्धात धुवून निघत असतो. वाल्या व अंगुलीमाल पोटाच्या आगीसाठी म्हणजे कुटूंबाच्या निर्वहनासाठी लोकांना लुटण्याचा व्यवसाय करायचे. वाल्याच्या जीवनात मुनी नारदांचा उपदेश म्हणजे त्याच्या डोळ्यात घातलेलं अंजनंच ! सखोल चिंतनातून जगावर गारूड करणारं महाकाव्यंच देवून वाल्याचा वाल्मिकी होतो. दुसरीकडे लोकांना हिंसेच्या जोरावर लुटून पोट भरणारा , सगळीकडे स्वतःच्या नावाच्या दहशतीचा दरारा निर्माण करणारा अंगुलीमाल कारूण्यमयी तथागतांच्या सान्निध्यात येतो. त्यांच्या नेत्रातून वाहणारं कारूण्य व जीवनाच्या अलौकिक चिंतनाचं तेज , जग कसंही वागत असलं तरी स्वतःच्या तटस्थ व निर्विकार वृत्तीच्या तेजात अंगुलीमालाचं अज्ञान गडप होवून आजन्म अहिंसेचा अनुयायी होणं. ही गुरूंच्या कृपाशीर्वादाची अलौकिक उदाहरणे आहेत. एवढ्या महान विचारांची आमची परंपरा असताना आजही पूर्वाश्रमीच्या असंख्य वाल्या व अंगुलीमालाच्पा प्रवृत्ती विविध क्षेत्रात दडून वावरत आहेत. त्यांची लुट केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी होती. हल्ली यांची मात्र साठवणूक पुढच्या पिढ्यांच्या बेगमी करता धडपड आहे. सगळ्या सुखसोयी असणारेच सुशिक्षित नेते , नोकरशहा आदि लुट व भ्रष्टाचारात माखले जात आहेत . त्यांना नारद व तथागतासारखे सद्गुरू भेटू नयेत. हे आपल्या देशाचं दुर्भाग्यंच ! सद्गुरूंच्या वेषात वावरून समाजाला दिशा देण्याचं काम करण्याऐवजी अबलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत आश्रमांना वासनापूर्तीच्या कुंटनखान्याचं रूप देवून गुरू परंपरेला डागाळणारे अनेक भामटे गुरू आज गजाआड आहेत. पूर्वी गुरू म्हणजे परीस असायचे. अशा परिसाला ओळखूनच आपण त्यांच्या सान्निध्यात जायला पाहिजे हे शिष्यानं विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्यातील असलेल्या दोषाला खतपाणी घालून पुन्हा पुन्हा त्याचे समर्थन करीत असतो त्यात सुधारणा करत नाही आणि तो आपल्या आयुष्यात कधीही सुधारत नाही अशा व्यक्तीला मुर्खच म्हणावे लागेल.कारण ती व्यक्ती दुस-याच्या जीवनात चांगल्या गोष्टी ऐवजी वाईटच गोष्टी शोधत असतो.चांगल्या गोष्टीही वाईटच दिसायला लागतात.अशा व्यक्ती चांगल्या समाजातील चांगले असलेले वातावरण बिघडून टाकण्यास कारणीभूत ठरु शकतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌳💐🌳💐🌳💐🌳💐🌳💐 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *विसर - Forgot* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *दुसऱ्यांनी केलेल्या उपकाराचा विसर पडू नये* एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्‍याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले.  त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.  शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही.  बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला.  यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा *कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

काळोख अज्ञानाचा काळोख दूर करुया मिळूनी मानवी जीवन फुलूया सारे मिळूनी 〰〰〰〰〰 ✍© प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

*पारख* जीवनातील जगणे अवघड झाले येथे अंतसमय येता मरण बेकार झाले येथे मावळत्या सूर्याला नाही नमस्कार येथे अन् डुबत्या नौकेस नाही आधार येथे जीवनातील जगणे...... गोरगरिबाचे, दिन हिनाचे स्वप्न साकार होईना येथे अन् साहसही हळवा होतो सत्याचे चालेना काही येथे जीवनातील जगणे...... भ्रष्टाचार्यांच्या सुकाळात सज्जनांचे साथीदार थोडे येथे सत्य असत्य ह्यातील फरक म्हणूनच जाणतात पारखे येथे जीवनातील जगणे..... सत्य हे कडू लागे लबाडीचे काम करतात येथे खरे बोलण्यार्यांना तोंड दाबून बुक्कयांचा मार देतात येथे जीवनातील जगणे अवघड झाले अंतसमय येता मरणही बेकार झाले येथे 〰〰〰〰〰〰 ✍© प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 26/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड. 💥 जन्म :- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक. १९३१ - विजय मांजरेकर, माजी भारतीय क्रिकेट खेळाडू. *१९३२ - मनमोहन सिंग, भारतीय माजी पंतप्रधान* 💥 मृत्यू :- १९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती. १९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक. १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक. १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार. २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार व गायक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डागाळलेल्या नेत्यांबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, कायदा बनवण्याचे सुप्रीम कोर्टाचे संसदेला निर्देश.* --------------------------------------------------- 2⃣ *भोपाळ- महात्मा गांधी, राममनोहर लोहिया आणि दीनदयाल उपाध्याय यांना कधीही विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ---------------------------------------------------  3⃣ *नवी दिल्ली: आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टात निर्णय.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेटचा दर्जा देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* --------------------------------------------------- 5⃣ *दसरा मेळाव्यात भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार, पंकजा मुंडेंची ट्विटरवरुन माहिती* --------------------------------------------------- 6⃣ *आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंची 18 पदकांची कमाई* --------------------------------------------------- 7⃣ *शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *रांगेत जा ............!* लेख वाचल्यावर एक मिनीट जरूर विचार नक्की कराल https://goo.gl/PuAkYC आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========     *लक्ष्मणराव किर्लोस्कर* लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी इ.स. १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापली. किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= कोणीही चोरू शकणार नाही अशी संपत्ती कमवायचा प्रयत्न करा… ते म्हणजे नाव आणि इज्जत *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'वन लाइफ' चे लेखक कोण ?* ख्रिस्टीन बर्नाड *२)'विधवा विवाहोत्तेजक मंडळा'चे स्थापना वर्ष कोणते ?* १८९३ *३) रशियाच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?* एरोफ्लोट *४) जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?* सहारा, उ.आफ्रिका *५) 'एफबीआय' चे विस्तारित रूप कोणते ?* फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेिस्टगेशन *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● सुनील आलूरकर ● विश्वनाथ होले ● सोनाजी बनकर  ● प्रवीण खाटके ● विक्रम रिक्कल ● श्री दासरवार ● अजय मिसाळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* कुठे धो धो पाऊस कुठे थेंब पडत नाही सर्वोशाम पाऊस झाला असे कधी घडत नाही हल्ली पाऊस खुपच लहरी झाला आहे कमी जास्त पडून कहर केला आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 25* *कबीर हरी सब को भजे* *हरी को भजै न कोई |* *जब लग आस सरीर की* *तब लग दास न होई ||* अर्थ विधात्याची सर्व प्राणी मात्रांवर समदृष्टी असते. सर्व चराचर सृष्टीला कुठल्याही अपेक्षेशिवाय हवा, पाणी,अन्न विधाता निसर्गरूपाने पुरवित असतो. निसर्गच चराचराची सेवा करीत असतो. ही सर्व मोफत सुविधा देवूनही माणूस मात्र निसर्गाला ओरबाडणे , पर्यावरणाची नासधूस करणे, यासारखी स्वतःच्याच विनाशाची करणी तो करतो आहे. तो निसर्गपूजक होतंच नाही. विकासाच्या नावे अमर्याद झाडांची कत्तल होते. त्या बदल्यात तो विकासक झाडे लावीत नाही. वृक्षारोपन फोटोपुरतंच होतं. प्रसिद्भी केली की नीधीची लुट करायला मोकळे . मग वृक्ष संवर्धन व देखरेखीचं काम वागलंच म्हणून समजा ! जिथं माणूस मनाचा गुलाम असतो तिथं बुद्धीचं काय चालणार ! तो षडविकारात गुंतलेला असणार. आंतरिक सौंदर्यापेक्षा शारीरिक बाह्य सौंदर्य जपण्यावरंच माणसाचा भर असतो. असा माणूस विधात्याशी, निसर्गाशी कसा एकरूप होणार ? त्याच्या कडून विवेक व निरामयतेची अपेक्षा कशी करावी ? ही माणसं ईश्वराशी तादात्म्य पावू शकत नाहीत. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्ञानाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या अनुभवास बळकटी मिळते आणि नवी दिशा मिळते तर त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात अंगीकारला तर चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ज्ञान हे कधीही माणसाला जीवनात आलेले नैराश्य दूर करुन सुख,समृद्ध जीवन जगण्याचा पायाही मजबूत करतो.म्हणून सदैव माणसाने ज्ञानी माणसांच्या, सज्जनांच्या सहवासात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिरेक - Redundancy* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *अतिरेक* एकदा एक राजहंस एका बगळ्यास म्हणाला, 'काय रे तू आधाशी ! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागेपुढे पहात नाहीस. बरं-वाईट, नासकं हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझं पहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतु तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणं बरं नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खावं अन् सुखी राहावं. खाण्याचा पदार्थ दिसला की तो खावा हेच शहाणपणाचं. असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे दुसर्‍या कमळे असलेल्या तळ्यात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते, त्यात तो सापडला. तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*अर्धांगिनी* संसाराचा वेलीला दोन्ही बाजु असते अर्धांगिनीचा असण्याला संसार खुलुन दिसते एक बाजू विस्कटली तर होत नाही संसार लेकराबाळांना माया मिळत नाही अपार सुखासुखीचा जीवनात सर्व काही मिळते अर्धांगनीचे प्रेम म्हातारपणी कळते. 〰〰〰〰〰〰 ©✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

*अर्धांगिनी* पहाटेचा गारव्यात झुंजुमुंजु सोनसकाळी कुजबुजली गाणी पक्ष्यांची मंजुळवाणी दूर मंदिराच्या दारी घुमे नाद निर्मल्याचा हे पावित्र्याचे सूर मन मंदिरी देई उभारी लगबगीनं निघाली अर्धांगिनीची सवारी धन्यासंग कष्ट करी धरणीचा उदरी हे आभाळं निळसंर कस झाल पिवळंसर हा पिवळ्याचा गोळा आला डोंगर माथ्याला येता सांजवातीला चिमणं बिलगती अंगाला घेऊन कवेत लेकराला समाधानं लाभी तिला. 〰〰〰〰〰〰 ©✍ प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

*अर्धांगिनी* जीवनाचा वेलीला अर्धांगनीचा वाटा सुखदुःखाचा संसार घेऊन चालतील पायवाटा 〰〰〰〰〰〰 ✍© प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक हृदय दिन.*           💥 जन्म :- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी. १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक. २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण केल्याने २०२ मंडळावर गुन्हा दाखल* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : भाजपाचे अरुण अडसड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आठ जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरातील प्राध्यापक आजपासून बेमुदत संपावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली: फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व उपाध्यक्षपदी अजित मोहन यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या सामन्यात सोमवारी श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नो मोबाईल डे* असा ही एक दिवस साजरा करावा लागेल की काय ? अशी भीती सध्या वाटत आहे. तेंव्हा मित्रांनो हा लेख नाईलाजास्तव आपणांस मोबाईलवरच वाचावे लागेल. https://goo.gl/ygcSP3 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाळकृष्ण हरी कोल्हटकर* बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली. कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार  नावाचे नाटक लिहिले. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्‍या होतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) आवाजलहरी निर्माण करणारं यंत्र कोणतं ?*  फोनोग्राफ *२) 'नॅशनल हेरॉल्ड' या वृत्तपत्राचं प्रकाशन स्थळ कोणतं ?* दिल्ली *३) उंचीवरुन जमिनीवर अलगद उतरवणारं साधन कोणतं ?* पॅराशूट *४) ज्या पिकापासून तेल काढतात त्यांना काय म्हणतात ?* गळिताची धान्ये *५) १९७४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित झाल्या होत्या ?* तेहरान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● तसनीम पटेल ● रामकृष्ण अंगरोड ● महेंद्रकुमार कुदाळे ● योगेश धनेवार ● सुयश पेटेकर ● शिवशंकर नर्तावर ● संघरत्न लोखंडे ● श्यामसुंदर मोकमोड ● सय्यद जाफर ● कमलकिशोर कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *चिंता* आज प्रत्येकाला चिंता आहे रूपाची पण चिंता करावी ती खरी स्वरूपाची वरवर दिसते ते नश्वर रूप असते माणसाच्या मनात खरे स्वरूप असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 24* *कबीर घोडा प्रेम का* *चेतनी चढ़ी अवसार |* *ज्ञान खडग गहि काल सीरी* *भली मचाई मार ||* अर्थ विवेकाने वागणार्‍याला सर्वांच्या हृदयी स्थान भेटतं. विवेकानं वागणारा विचाराशी बांधील असतो. तो अविचारानं वागत नाही. अंधश्रद्धा व निरर्थक रुढी परंपरामध्ये स्वतःला गुरफटून घेत नाही. त्याच्या ठायी सर्वाप्रति प्रेमळपणा व आपुलकी असते. चैतन्यशीलता व प्रसन्नता हा विवेकी माणसाचा स्थायी स्वभाव असतो. त्याच्या बळावर तो यशारूढ होतो. ज्ञानामुळे मानसाचे भ्रम नाहिसे होतात. सत्य व वास्तवाचे भान येते. अज्ञानामुळे जीवन अंधःकारमय बनते. अज्ञानी मनुष्य पशुसमान जीवन जगत असतो. साधनेच्या जोरावर माणसाला ज्ञानरूपी तलवार प्राप्त होत असते. ही अज्ञानाच्या चिंधड्या करण्यासाठीव मृत्यू बणून समोर उभी टाकते. अज्ञानावर वार करून ज्ञानाला विजय मिळवून देते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्ञानाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या अनुभवास बळकटी मिळते आणि नवी दिशा मिळते तर त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात अंगीकारला तर चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ज्ञान हे कधीही माणसाला जीवनात आलेले नैराश्य दूर करुन सुख,समृद्ध जीवन जगण्याचा पायाही मजबूत करतो.म्हणून सदैव माणसाने ज्ञानी माणसांच्या, सज्जनांच्या सहवासात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपूर्ण - Perfect* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपूर्णता / निपूणता* एक मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो, मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ? फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे. मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना. फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे. मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन. फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात). तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर... मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ? मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते. तात्पर्य :- आपल्यावर समोरच्या किती विश्वास आहे आणि आपण त्या कामात निपूण आहोत का नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*🌹चारोळी*🌹 *संशयाचं भूत* *संशयाच भूत* *आणू नका मनात* *नाहीतर होईल* *घात जीवनात.* 〰〰〰〰〰 ✍प्रमिलाताई सेनकुडे ता.हदगाव जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

संशयाच भूत संशयाच भूत मानगुटीवर बसतं अन् काय सांगू तुम्हाले भल्याभल्यांचा ते जाळ्यात फसतं असा संशय लेकाचा जीव घेतो दुसऱ्याचा अन् ह्याले तुम्ही जागा नाही द्यायची अन् संशयाचा भूताची जागा मनामंदी नाही ठेवायची म्हणून मनतो तुमाले करु नका कोणावर संशय जिवावर होऊन उठतील अन् जीवनभर पेटतील संशयाच भूत मानगुटीवर बसवतील अशा भूतास जागा नाही द्यायची अन् संशयाची भीती मनामंदी नाही ठेवायची कुढत बसणं आणि रूसत बसणं ह्याले जागा नाही द्यायची उद्याचा दिसाची काळजी नाही करायची अन् संशयाचा भूताला जागा नाही द्यायची अन् संशयाची भीती मनामंदी नाही ठेवायची 〰〰〰〰〰〰〰 ✍ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे(हदगाव) जिल्हा नांदेड. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 24/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर. 💥 जन्म :- १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक. 💥 मृत्यू :- १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक. २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, शब्दकोशकार, अनुवादक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत राज्यभरात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप, भाविकांचा उत्साह शिगेला* --------------------------------------------------- 2⃣ *जळगाव : पहूर ता.जामनेर येथे कापूस खरेदीस शुभारंभ, सहा हजार एकावन्न रुपयांचा मिळाला भाव* ---------------------------------------------------  3⃣ *झारखंड: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं लोकार्पण* --------------------------------------------------- 4⃣ *गोव्यात नेतृत्त्वबदलाच्या विषयाला पूर्णविराम ; मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच, अमित शहा यांचा निर्णय* --------------------------------------------------- 5⃣ *दिल्ली: राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी - अखिलेश यादव* --------------------------------------------------- 6⃣ *चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन.* --------------------------------------------------- 7⃣ *आशिया चषकमध्ये भारताने पाकिस्तानला नऊ गडी राखून नमविले, शिखर धवन सामनावीर* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शाळेचा कणा : मुख्याध्यापक* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_87.html वरील निळ्या अक्षरावर क्लिक करून लेख पूर्ण वाचावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *शिवाजी सावंत* शिवाजी गोविंदराव सावंत हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात. शिवाजी सावंत यांचा  जन्म  सामान्य  शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GCD) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते. पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'एससी'चे विस्तारित रूप काय ?* सिक्युरिटी कौन्सिल *२) 'भिल्लसेवा मंडळ' या संस्थेची स्थापना कधी झाली ?* १९२२ *३) भारतातील पहिल्या पेट्रोलियम तेलविहिरीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं ?* दिग्बोई *४) श्रीलंकेची राजधानी कोणती ?* कोलंबो *५) उत्तर ध्रुवासभोवतालच्या भू-भागाला काय म्हणतात ?* आर्टिक प्रदेश *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● डॉ. तोफिख खान पठाण ● सारंग दलाल ● राजू यादव ● विरेश भंडारे ● सतीश आरेवाड ● रोहित शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पाऊस* ढगा आडून पाऊस पहातो आपली दशा पशू पक्षांच्या भावना त्याला कळत नाहीत कशा पशू पक्षी प्राण्यांसाठी जरा मनमोकळा पड कष्टकरी कष्ट करून चार घास खातील धड शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 23*     *जिस मरने यह जग डरे* *सो मेरे आनंद |* *कब महिहू कब देखिहू* *पूरण परमानन्द ||* अर्थ जन्माला आल्यानंतर मृत्यू हा ठरलेलाच. प्रत्येक प्राण्याला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. हे जरी शाश्वत सत्य असलं तरी मृत्यूबद्दल सर्व प्राण्यांच्या ठायी भीती दडलेली. जीवन अनेक , विकारांनी , व्याधींनी, अवहेलनेने भरलेले जरी वाट्याला आले . जीवनभर संसारात इत्तरांना गांजून लुटून अमाप संपत्तीचा संग्रह केलेला. त्या संपत्तीला सांभाळताना जीवनाच्या खर्‍या आनंदाला मात्र पारखा झालेला. भरपूर अन्न व पैसा असूनही हवे ते खाण्यावर मर्यादा पडलेल्या. जीवनभर कमवून, राबूनही मुलांनी आधाराची काठी व्हावं तिथंच एकाकी टाकून दिलेलं ! तरी सामान्य मानसाची जगण्याची आसक्ती संपत नाही. या मायावी चक्रव्युहातून बाहेर निघावेसे वाटत नाही. खरे तर मरणाने जीवनाचे वर्तुळ पूर्ण होते. थोर साहित्यिक जी.ए, कुलकर्णी मृत्यूला सर्वात जवळचा मित्र माणायला सांगतात. कारण मृत्यूच सर्व व्याधी व दुःखातून आपणास मुक्त करतो. ज्यावेळी सर्वांना आपणनकोसे वाटायला लागतो. तेव्हा आपले दोन्ही बाहू समोर करून आपली कडकडून गळाभेट घेणारा व चिरशांती देणारा एकमेव मित्र म्हणजे मृत्यू ! ज्यांनी आपल्या वाट्याला आलेलं जगणं भरभरून जगून घेतलं. इतरांसाठी ते जगणं म्हणजे एक मार्गदर्शक पायवाट झालेली असते. जीवनाला एक विशिष्ट उंची प्राप्त झालेली असते. अशी उंची असामान्य माणसंच साध्य करू शकतात. ती आभाळ उंची माणसाला मरणानंतरही कायम जीवंत ठेवते. तुकोबाच्या जीवन विषयक चिंतन मननापुढं आपलं थातूरमातूर लोकांना फसवणारं तत्त्वज्ञान टिकाव धरीना म्हणून धर्माच्या (अधर्मी) ठेकेदारांनी डोही बुडवून तुकोबा सदेह वैकुंठाला गेल्याची लबाडी केली. तुकोबा देहिक मारले गेले परंतु लौकिकानं मात्र तुकोबा आभाळाएवढे ठरले. संत, सज्जन, कलावंतांना मरणाचं भय कसलं ? त्यांनी कृतीतून स्वतःचा अमीट ठसा उमटवलेला असतो. त्यांच्या मरणातही जग जगते हे माहित असतं. ते मृत्यूला कवेत घ्यायला सदैव तयार असतात. त्यांच्या मृत्यूचाही उत्सव होत असतो. त्या परमानंदाचं स्वागत करायला संत सदा तयारंच असतात. एकनाथ डुमणे, मुखेड =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्या व्यक्तीचे मन प्रसन्न,उदार अंतःकरण, जगाकडे प्रेमाने आणि आपुलकीने पाहण्याचा दृष्टिकोन, प्रसन्न आणि हसरा चेहरा,मनात दुसऱ्या विषयी कोणतीही वाईट भावना नसलेली आणि इतरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्यात समरस होणारी इ.गुण वैशिष्ट्ये आहेत आणि अशी गुणवैशिष्ट्ये असलेली व्यक्ती ही जनमाणसात अधिक लोकप्रिय असते.अशांच्या सहवासात राहणे किंवा अशांचा सहवास लाभने म्हणजे एक आपल्या आयुष्यातली सुसंधीच म्हणावी लागेल.क्वचितच अशी माणसे आपल्या जीवनात येतात. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃🌳🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सहवास - Coitus* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= परिस पदयात्रा करीत असताना मनोहर पंतांना एका जंगलात एक व्यक्ती भेटली. तिच्या सर्व अंगावर लोखंडी साखळ दंड होते. रस्त्याने चालत जाताना ती व्यक्ती रस्त्यातील प्रत्येक दगड उचलून हातात घेत होती आणि तो दगड अंगावरील साखळदंडाला लावून पाहात होती. त्या व्यक्तीचा हा उद्योग बराच काळपर्यंत सरू होता.मनोहरपंत है सगळं टक लावुन पाहात होते त्यांना त्याच्या या कृतिचा अर्थ त्यांना लागेना. शेवटी न राहून मनोहरपंतांनी त्यांना विचारले, ‘आपण हे काय करीत आहात? काही शोधत आहात का?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘हा दगड लोखंडाला लावून बघण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे, मी गेले बारा-पंधरा वर्षे परीस शोधतो आहे; पण अजून काही मला सापडला नाही. ” हे ऐकून त्या व्यक्तीच्या बुद्धीची किव करत .तो मूर्ख आहे असं समजून मनोहरपत चालू लागले. मधल्या काळात बरीच वर्षे गेली. पुन्हा एकदा त्याच रस्त्यावर मनोहरपंतांना ती व्यक्ती भेटली आणि .त्यांना धक्काच बसला. त्या व्यक्तीच्या अंगावरील साखळदंड सोन्याचे होते; पण तरीही त्यांच्या सर्व क्रिया मागील प्रमाणेच सुरू होत्या. मनोहरपंतांनी त्याला विचारले, ‘ ‘अंगावरील साखळदंड तर सोन्याचे झाले आहे. याचा अर्थ तुम्हाला परीस सापडला आहे. मग आता शोध कशासाठी सुरू?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘ ‘जमिनीवरचा दगड उचलणे, साखळीला लावुन पाहणे आणि टाकून देणे ही क्रिया सतत घडत राहिल्यामुळे परीस हातात आला कधी, तो साखळ्याना लागून त्याचं सोनं झालं कधी आणि नेहमीप्रमाणे मी तो दगड टाकून दिला कधी? हे मला कळलं सुद्धा नाही. आता टाकून दिलेला परीस मी पुन्हा शोधतो आहे. ” *तात्पर्य : परीसासारखी आलेली संधी सोडून दिली तर पुन्हा संधी मिळत नाही.* * *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

https://youtu.be/D3V2p8duz0Q

गुरुमहिमा चिखल मातीचा गोळ्यास आकार तु देतोस ज्ञानदिपाची ज्योत पेटवूनी अंधकार दूर सारतोस शतशः नमन मी करीते गुरूवंदन करूनी आशीर्वाद मी घेते आयुष्यभर रूणी राहूनी वंदन मी नित्यनेमाने करीते. गुरूवर्य आहेत ज्ञानाचा भांडार अज्ञानाचा नाश करुनी होतील संहार घडवतील मनुष्यजीवना अर्पूनी जीवन आपुले. कर्तव्याचे बिजांकुरण करुनी पेटतील समाजमनाचा उदरी ज्ञानर्जनाची शिदोरी वाटूनी वसतील शिष्यांचा मनमंदीरी 〰〰〰〰〰〰 ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 21/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६४ - माल्टाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९६५ - सिंगापूरला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. १९७२ - फिलिपाईन्समध्ये लश्करी कायदा लागू. १९८१ - बेलिझला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनॉरची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक. १९९१ - आर्मेनियाला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य. 💥 जन्म :- १९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार. १९६३ - कर्टली ऍम्ब्रोस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू १९७९ - क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १७४३ - सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा. १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *सोलापूर : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तुळशीच्या माळेची सजावट* --------------------------------------------------- 2⃣ *मध्य प्रदेशमध्ये गणपती विसर्जनावेळी पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू* ---------------------------------------------------  3⃣ *अकोला - महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे मध्यप्रदेश शासनाद्वारे सन्मानीत* --------------------------------------------------- 4⃣ *केंद्र सरकार छोट्या बचत खात्यांवरचा व्याजदर वाढवणार ; 01 ऑक्टोबरपासून वाढ लागू* --------------------------------------------------- 5⃣ *लखनौ - मायावती यांचा बहुजन समाज पक्ष विधानसभेसाठी जनता काँग्रेसोबत करणार युती, छत्तीसगडमध्ये 35 जागा लढवणार* --------------------------------------------------- 6⃣ *आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मोठा धक्का, भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार, त्याच्या जागी दीपक चहलला मिळाली संधी* --------------------------------------------------- 7⃣ *भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व केला फेरीत प्रवेश.* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= पाच मिनिटं लागतील वाचायला पण वेळ काढून जरूर वाचावे *नोकरी श्रेष्ठ की शेती* https://goo.gl/WJvP4C आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रांजणगाव - महागणपती* महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे. हे महागणपतीचे स्थान इसवी सनाच्या १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे          *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) २00२ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे मानकरी कोण होते ?* संदीप पांडे *२) 'आयएनएस म्हैसूर' ही युद्धनौका देशाला अर्पण केली गेली तो दिवस कोणता ?* २ जून १९९९ *३) आरआरव्हीवायचे विस्तारित रूप काय ?* राष्ट्रीय रेल विकास योजना *४) शृंग घराण्याचा शेवटचा शासक कोण ?* देवभूती *५) इंडियन मुस्लीम लीगचे सा संस्थापक कोण ?* आगाखान, नबाब सलीमुल्ला *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● जिग्नेश क्रांती बुद्धेवार, धर्माबाद ● विष्णू गंभीरे, धर्माबाद ● निशांत जिंदमवार, धर्माबाद ● स्मिता मिरजकर वडजे, नांदेड ● आशिष कोलपवार ● सचिन तोटावाड, धानोरा खु. ● गोविंद पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *सरळ मार्ग* सरळ मार्गाने होत असल्यास वाकड्यात कशाला जायचं पुढचा चांगला असुनही पाण्यात कशाला पाहायचं सरळ मार्गाने गेलं की कामं सरळच होतात गरज नसतांना उगीच माणसं वाकड्यात जातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========      *क्रमांक 21*      परनारी रता फिरे , चोरी बिधिता खाही | दिवस चारी सरसा रही , अति समूला जाहि || अर्थ : 'अती तिथं माती ।' हा नियम सर्वत्र लागू होतो. ही बाब सांगताना महात्मा कबीर म्हणतात, परनारीचा मोह बरा नसतो. परनारीच्या आसक्तीनं विषय वासनेत बुडालेला माणूस कामांध होतो. त्या आंधळेपणापुढं त्याला हितचिंतकांनी केलेला उपदेशही तुच्छ वाटू लागतो. घरी त्याची स्वतःची अस्तुरीसमान बायको जी त्याची मनोभावे सेवा करीत असते. तिची अवहेलना करीत दुसर्‍याच्या उकिरड्यात लोळण्याची त्याची घाणेरडी सवय जात नाही. हा उष्टा घरच्या पतिव्रतेला उपाशी ठेवतो अन शिंदळीसाठी मात्र पदरमोड करू करू स्वतः कवडीमोल होवून रस्त्यावर येतो. ती याला हाकलून बाहेर काढते. याची गत मोकाट कुत्र्यासारखी होते. ना घर ना घाट ! रात्रीला चोरानं चोरी करावी अन काही दिवस त्या चोरीचे द्रव्य संपेतो आस्वाद घेतल्या सारखा वरील प्रकार आहे. चार दिवस सहजतेने विषयानंदात काढलेले. परंतु त्या उपभोगाला व जगण्याला नैतिकतेची कुठंच जोड नसलेली. तोंडावर नसला तरी माघारी कुचेष्ठेचा धनी होण्याचं जगणं वाट्याला आलेलं. हा असला अतिरेक काय कामाचा बरं ! जो माणसाला मुळातूनंच पार उद्ध्वस्त करीत असतो . म्हणून माणसानं विवेक अन विचाराची कास धरलीच पाहिजे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= एखादा आयुष्यातला चांगला क्षण तुम्ही थोडे दुर्लक्ष केल्यामुळे निसटून गेलाही असेल म्हणून पुन्हा आयुष्यात संधी येणार नाही असे नाही.संधी खूप येतात नि जातात त्या येणा-या संधीचे सोने करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी ठेवावी लागेल,पाण्यातील मासा पकडण्यासाठी बगळा जसा पाण्यात एका पायावर उभा राहून प्रतीक्षा करतो तशी एकाग्रता आपल्या मनाची ठेवायला हवी,येणा-या संधीला प्राप्त करून घेण्यासाठी आपले हातही तितकेच महत्वाचे आहेत.तुमच्या हातांनाही चांगले करण्यासाठी प्रोत्साहित करा.मग पहा कधीही कोणतीही संधी जात नाही.आणि एखादी संधी गेली म्हणून येणा-या संधीला दूर करायचेही नाही. एक लक्षात असू द्या,हातात मुठीत घेतलेली वाळू पूर्णच्या पूर्ण मुठीत राहते का ? नाही ना .मग जी काही राहते ती आपली आयुष्यात असणारी संधी म्हणूनच.मग तिला सोडूच नका. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रोत्साहन - Promotion* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *बिट्टी बेडकुळी* सुंदर माझे घर. बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळ्या तळ्यात टिप..टिप..आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजूक, नाजूक काड्यांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हटले माझे घर पाहिले का केवढे मोठे आहे ते? आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. ती कौतुकाने तळ्याकडे पाहत म्हणाली. शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल! मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, कोण आहे? पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. अगंबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते? बिट्टीने विचारले. तर काय! हेच माझे घर! पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. बायांनो! तुम्ही इतक्याजणी छोट्याशा घरात कशा गं राहता? बिट्टीने विचारले. छोटेसे आहे का ते? आत कशा षटकोनी खोल्याच खोल्या आहेत. अगदी आरामात राहता येते सर्वांना. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वार्‍याने ती इकडून तिकडे लत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढय़ा वार्‍यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते. बिट्टीने या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली. शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. हो! हे बाकी खरेच! बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणार्‍या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळ्यात सुंदर सुंदर माझेच घर!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 18/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९८१ - फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.१९९० - लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. १९९७ - टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.१९९८ - आयकानची स्थापना. 💥 जन्म :- १९५८ - विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९५८ - डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७० - डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता 💥 मृत्यू :- १९९९ - अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक. २००२ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक. २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय - राजीव कुमार* --------------------------------------------------- 2⃣ *जालना : मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देणार - राज्यपाल सी. विद्यासागर राव* ---------------------------------------------------  3⃣ *कर्नाटकमध्ये पेट्रोल व डिझेल दोन रुपयांची स्वस्त, कर्नाटक सरकारचा दिलासादायक निर्णय* --------------------------------------------------- 4⃣ *नवी दिल्ली - लालप्रसाद यादव आणि राबडी देवी यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, रेल्वे कॅटरींग घोटाळ्याप्रकरणी बजावली नोटीस.* --------------------------------------------------- 5⃣ *पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी* --------------------------------------------------- 6⃣ *दिल्ली क्रिकेट संघटनेचा वीरेंद्र सेहवागने दिला राजीनामा* --------------------------------------------------- 7⃣ *Asia Cup 2018: रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनी बजावतोय प्रशिक्षकाची भूमिका* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *भीक मागणे एक दुष्कृत्य* https://goo.gl/C34hWu पूर्ण लेख वाचण्यासाठीवरील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *थेऊर - चिंतामणी* थेऊर हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे.येथे अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे.थेऊरचा गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जातो. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.          *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुसऱ्याच्या दु:खाची जाणीव ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू अँक्शन' ही साहित्यसंपदा कोणाची ?* डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम *२) मुंबईतील 'हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड' हा तेल शुद्धीकरण कारखाना कधी सुरू झाला ?* जुलै १९५४ *३) कॅमेरूनची राजधानी कोणती ?* योन्डे *४) आयएमएफचे विस्तारित रूप काय ?* इंटरनॅशनल मॉनेटरी फंड *५) आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्ष सोडवण्याचे काम कोणाचे ?* आंतरराष्ट्रीय न्यायालय *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● किरण इंदू केंद्रे ● सुदर्शन वाघमारे ● सचिन महाजन ● रामकृष्ण काकाणी ● देवेंद्र गडमोड ● योगेश शंकरोड ● सुनील पाटील बोमले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *जोश* त्याच त्या गाण्यांचा देवाला डोस आहे नव्या कार्यकर्त्याचा नवा नवा जोश आहे नको ते गाणे ऐकून गणपतीही वैतागतो थोडी शांतता ठेवण्याची भक्ताला मागण मागतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 19* *पतिबरता मैली भली* *गले कांच को पोत |* *सब सखियाँ में यो दिपै* *ज्यो रवि ससी को ज्योत ||* अर्थ मानसाचं व्यक्तिमत्व त्याच्या वर्तनावरून समजतं. चारित्र्यामध्ये शील जपणं अत्यंत महत्वपूर्ण माणलं गेलंय. ज्याला चारित्र्याची जोपासना करता आली त्याचं व्यक्तिमत्व आपोआपच खुलून दिसतं. रग्गड श्रीमंतीत जगणारी, सर्व सुख सोयीं उपभोगणारी , उंची वस्त्रे, अलंकार मिरवणारी, रूप गर्विता असेल. ती शिलाचं पावित्र्य जपत नसेल तर ती क्षण भंगूरतेला भुलून भौतिक सुखाच्या आहारी आत्मसन्मान गमावलेली व्याभिचारिणीच होय. तिच्यात आणि कळवातनीत काय फरक आहे ? द्रव्य लालसेपोटी आपलं सर्वस्व कुणापाशीही त्या गहान टाकित असतात. त्या देहाच्या व भ्रष्ट वासनेच्या पूजकंच मानल्या पाहिजेत. अशा शेकडो रुपगर्विता लावण्यवतीं पेक्षा फुटक्या मण्याचीही अपेक्षा न ठेवणारी. पतिव्रतेचा पातिव्रत्य धर्म जपणारी स्त्री दिसायला कुरूप असो की रंगाने काळी. भलेही तिच्या अंगावर दागदागिने नसू देत . तिला नेसायला उंची वस्त्र नसली तरी तिच्या पातिव्रत्यामुळे ती इत्तर स्त्रीयांधूनही आपसुकच उठून दिसते. भौतिक दारिद्र्य असलं तरी तिच्याकडं मनाची श्रीमंती असते . भलेही चारचौघीत मिरवण्या इतपत सौंदर्य तिच्याठायी नसलं तरी तिच्या पातिव्रत्यापुढे व तपश्चर्येसमोर त्या रूपगर्विता व लावण्यवती पार फिक्या पडतात. चंद्र सूर्याला तेज पुरवण्याचं सामर्थ्य पतिव्रतेच्या तपोबलात असतं . एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या माणसाची परोपकारी वृत्ती नाही, दुस-याला काही देण्याची इच्छा नाही, दुस-याच्या भल्याचा कधीच विचार करत नाही, दुस-यांनी आपल्यासाठी कितिही मदत केली तरी चालेल पण आपण कुणाच्या मदतीला धावून जायचे नाही अशी असणारी माणसे फक्त स्वार्थी आणि आपमतलबी असतात हे खरे आहे. अशी माणसे इतरांच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही त्यांच्या जीवनात पूरेपूर स्वार्थीवृत्ती भरलेली असते अशा लोकांचा सहवास कुणालाही नको असतो. ते तेव्हाच इतरांच्या मनातून निघून गेलेले असतात. * व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सहवास - Coitus*💐 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रसन्न मन* एकदा देवळात भागवत कथेची सांगता झाली.तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवरा-आवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी भेटेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढय़ात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, “थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला !’’ वृद्धेला आनंद झाला. बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, “पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं ! परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी ! मन प्रसन्न असेल ना; तर मनाने नाही कणानेही समाधान लाभते हे त्या वृद्धेच्या संवादातून उलगडले. हव्यास आणि हट्ट सोडणे महत्त्वाचे परमार्थ वेगळे काय शिकवतो? *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझा शैक्षणिक व सामाजिक कार्यप्रणालीवरील लेख* नोकरी म्हणून शिक्षकाचा पेशा करणारे अनेक जण असतात. पण हा शिक्षकी पेशा सांभाळताना अनेक उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेणारे तसे कमीच असतात. अश्या कमी पण उत्साही लोकांमध्ये माझी ओळख माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याने निर्माण झालेली आहे.मी श्रीमती प्रमिलाताई कुंडलिक सेनकुडे उपक्रमशील शिक्षिका म्हणून माझा शिक्षण क्षेत्रात समावेश आहे . मी सध्या जिल्हा नांदेड तालुका हदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव येथे सहशिक्षिका म्हणून बदलीने नव्यानेच रुजू झाली. माझ्या सेवेला सध्या सतरा वर्ष पूर्ण होत आहे. मी सुरुवातीला भानेगाव केंद्र शाळेवर अकरा वर्ष कार्य केले. त्यानंतर मी वाटेगाव व आताच्या गोजेगाव येथील शाळेत कार्य करीत आहे. मी शैक्षणिक क्षेत्रात सतत नाविन्यपूर्ण विविध उपक्रम, राबवित आहे.हे उपक्रम माझ्या ब्लॉगला उपलब्धीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात माझे उल्लेखनीय कार्य म्हणजे नागपूर येथील शिक्षणाची वारी या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील शिक्षकांना उद्बोधन करण्याचे कार्य म्हणून स्टाॕल सहकारी म्हणून सक्रिय सहभाग, मातृभाषा सुलभक म्हणून विभागीय स्तरावर औरंगाबाद येथे प्रशिक्षण,व तालुका स्तरावर सुलभक म्हणून कार्य केले. विविध ठिकाणी अभ्यासदौरा, विद्यार्थ्यांची लेझीम स्पर्धा मी व शाळेतील सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित करणे व आम्ही बक्षीस मिळवलेे, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, सहली ,क्षेत्रभेटी, पल्स पोलिओ, वृक्षारोपण, तालुकास्तरीय, जिल्हा विज्ञान प्रदर्शन कला महोत्सव सहभागी होणे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत मी आयोजित कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला. सहशालेय विविध उपक्रम वाचन प्रेरणा दिन, संविधान दिन, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी शाळेत साजरी करणे, तसेच खेळ व क्रीडा स्पर्धेत हिरीरीने कार्य करून विद्यार्थ्यांची प्रगती तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास साधने हेच ध्येय मी कायमस्वरूपी मनी ठेवून कार्य करीत असते.फ्रेश मॉर्निंग बुलेटीन(whatsgroup) फ्रेश शालेय परिपाठ दलित वाणी ह्या वृत्तपत्राचा माध्यमातून माझे दैनिक सदर बोधकथा हा संकलित उपक्रम असतो. तसेच माझ्या स्वलिखित रचित कविता चारोळी छोटे छोटे विचारनीय लेख , मी राबविलेले शैक्षणिक नाविण्यपूर्ण विविध उपक्रम संकलित शैक्षणिक उपयुक्त माहिती माझ्या शैक्षणिक ब्लॉगला उपलब्ध आहेत. माझी वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना मदत असते.तसेच अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईच्या पुण्यस्मरणार्थ आर्थिक मदत करीत असते.त्याचप्रमाणे डिजिटल शाळा करण्यासाठी दरवर्षी माझा (वार्षिक उपक्रम) 10 हजार रुपये योगदान करणे हा आहे. तसेच भव्य लेझीम स्पर्धा कवाना येथे आयोजित आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ सावली मंडप जाहीर केला व त्याचे पालन कायमस्वरूपी मी करणार आहे. रोटरी क्लब हदगाव च्या सदस्या म्हणून मी त्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात सहभागी असते . तसेच मी एका विद्यार्थ्यांचा सनः 2002पासून कायमस्वरूपी शैक्षणिक खर्च उचलला आहे . याशिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक महिला आघाडी च्या शिक्षक संघटनेच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी मी कार्य करते. माझा शैक्षणिक व तंत्रज्ञानात्मक उत्कृष्ट वाटचालीमुळे मला विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. तसेच ठिकठिकाणी सत्कार झालेले आहेत. माझी ओळख शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमात भाग घेणाऱ्या शिक्षिका म्हणून रुजली आहे आणि मी माझे हे कार्य अविरत अखंडपणे उत्साहाने असेच करीत राहील. असे आपणांस ग्वाही देते. शेवटी आपणास एकच सांगू इच्छिते *'सत्कारासाठी काम करु नये सत्कार्यासाठी कार्य करावे'* बाल चिमुकल्यांचा आशीर्वाद घेणे. त्यांना देशाचे उत्तम नागरिक व उज्वल भविष्य घडविण्याचे तनमनधनाने कार्य करणे, हेच ध्येय मनी ठेवूनी जीवनात बालकांचा आशीर्वाद घेण्याचे कार्य मला व तुम्हां सर्वांना बळ मिळो हीच सदोदित मनोकामना ठेवते. दिनांकः १२-०९-२०१८ *"अगर चाहते हो खुदा मिले* *तो वही करो जिससे दुआ मिले."* 〰〰〰〰〰〰 *माझा सर्व शुभचिंतक व हितचिंतकाचे मनःपूर्वक धन्यवाद.* 🙏 🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 ©✍श्रीमती प्रमिलाताई कुंडलीक सेनकुडे (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. फोन.नंबर- 📞9403046894. 〰〰〰〰〰〰

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 15/09/2018 वार - शनिवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *राष्ट्रीय अभियंता दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९६८ - सोवियेत संघाच्या झाँड ५ या अंतराळयानाचे प्रक्षेपण १९३५ - भारतातील दून स्कूलची स्थापना १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सर्वप्रथम महिला, न्यायाधीश झाली. १९८१ - व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले. १९९८ - एम.सी.आय. कम्युनिकेशन्स आणि वर्ल्डकॉम या कंपनीचे एकत्रीकरण. एकविसावे शतक संपादन करा २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले. २०१३ - नीना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली 💥 जन्म :- १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता. १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक. 💥 मृत्यू :- ६६८ - कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट. १८५९ - इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता. १९७३ - गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडनचा राजा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची तब्येत खालावली, गोव्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग* --------------------------------------------------- 2⃣ *जगाच्या तुलनेत भारतात महागाई कमी; अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा* ---------------------------------------------------  3⃣ *मुंबई - प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदी विजयी झालो याचा आनंद आहे, आता जबाबदारी आणखी वाढली - सत्यजीत तांबे* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई : नवी मुंबईत विनापरवानगी लाऊडस्पीकर लावण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना हायकोर्टाची 'कारणे दाखवा' नोटीस* --------------------------------------------------- 5⃣ *मुंबई: गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी नाहीच - हायकोर्ट* --------------------------------------------------- 6⃣ *सोलापूर : राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापूर ते पुणे रेल्वेने प्रवास, प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.* --------------------------------------------------- 7⃣ *जपानमध्ये सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रीकांत किदम्बीला पत्करावा लागला पराभव* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *वाचाल तर वाचाल* http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *मोरगावचा मोरेश्वर* मोरेश्वर (मोरगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= " आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात " *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'थिऑसॉफकल सोसायटी' या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेचं मुख्यालय कोठे आहे ?* चेन्नई *२) बल्लारपूर हे शहर कशासाठी ओळखलं जातं ?* कागदाचा कारखाना *३) लोकांनी निवडून दलेल्या शासनव्यवस्थेला काय म्हणतात ?* लोकशाही *४) बिहार राज्याची राजधानी कोणती ?* पाटणा *५) सुपरसॉनिक आवाजाचे एकक कोणते ? मॅश *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● श्रीनाथ येवतीकर ● डॉ. हंसराज वैद्य ● मनोज साळवे ● अभिमन्यू चव्हाण ● शीतल वाघमारे ● विजय धडेकर ● एकनाथ जिंकले ● माधव पांगरीकर ● राजेंद्र होले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *काम क्रोध मोह* काम क्रोध मोह हे  विनाशाचे द्वार आहेत  जेवढे वाढतील तेवढे  डोक्यावर भार आहेत  काम क्रोध लोभाने  डोक्यावर भार होतो  अती झाले म्हणजे  केवढाही गार होतो     शरद ठाकर   सेलू जि परभणी   8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 17* *सुखिया सब संसार है* *खावै और सोवे |* *दुखिया दास कबीर है* *जागे अरु रावे |* अर्थ महात्मा कबीर मानवाच्या विचित्र वागण्यावर टिप्पणी करताना म्हणतात की, ' प्राणी सुलभ स्वभावानुसार मणुष्य प्राणीही खाणे, पिणे आणि झोपणे यातच धन्यता मानत असेल. माणसाला इत्तर प्राण्यांपेक्षा बोली आणि बुद्धीचं जे आगळंवेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. त्याचा पुढच्या पिढीला फायदा करून देणार की नाही ? मानवाने बुद्धी चातुर्याच्या बळावर आपल्या पुढील पिढ्यांना संस्कार म्हणून अनुभवाची शिदोरी द्यायला हवी. सामान्य माणूस स्वतःतच गुंग असतो. मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं.हा मानव रूपी अनमोल जन्म विश्व कल्याणासाठी आपणास प्राप्त झाला आहे. या संपूर्ण जगाची चिंता वाहण्याचं काम संत सज्जनंच करीत असतात. अज्ञानात आनंद मानणार्‍या सकल जणांना जागृत करण्याचं व माया मोहातून उद्भवणार्‍या दुःखाप्रति सर्वांना सजग करण्याचं महान कार्य संत करीत असतात. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= आपण जर पाहिले असेल तर मुंगी आणि कासव या दोघांची चालण्याची आणि धावण्याची गती ही सारखीच असते. त्यांच्यामध्ये कधीच हावरेपणा नसतो. त्यामुळेच ते त्यांच्या जीवनात यशस्वीच होतात. ते कुणाचीही बरोबरी करता नाही किंवा जो कोणी एखादा पुढे जात असेल तर त्यांची बरोबरीही करीत नाही. फक्त ते एवढेच करतात की, आपल्या जीवनाचे ध्येय हे एखादे काम फत्ते करायचे असेल तर मनाची पूर्ण तयारी आणि आपल्या कृतीत सातत्य असले की, आपण चालत असलेल्या मार्गावरुन कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे जीवन जगण्याची यशस्वीता त्यांना निश्चितपणे साधता येऊ शकते. ते कधीच अति मोहाला बळी पडत नाही किंवा इतरांची ही बरोबरी करता नाहीत. अशा संयमीवृत्तीचे या पृथ्वीतलावर हे दोनच जीव पहायला मिळतात. यांचे गुण जर आपण घेतले तर आपणही आपल्या जीवनात खरी प्रगती करु शकतो. आपणही कुणाबद्दल आपल्या मनात वाईट चिंतू नये. आपण जे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच ध्येयाने आपण चाललो तर आपलीही यशस्वीता आपल्या जीवनात सहजपणे आपल्याकडे आणता येते तेही आपल्या शांत, संयमी आणि निगर्वीपणामुळे. एखादी वरकरणी पुढे जात असेल तर जाण्यासाठी आठवायचे नाही. फक्त एक करायचे त्यांना यश कशामुळे मिळाले हा विचार करायचा आणि आपणही त्यांच्या पध्दतीने पुढे कसे जाता येईल आणि जीवन सुखी व समाधानी कसे होता येईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पुढे जाणारी व्यक्ती मागच्याला नक्कीच प्रेरणा देऊन जातो. त्यांची प्रेरणा ही आपल्या यशस्वीतेकडे घेऊन जाणारी योग्य दिशा ठरू शकेल. * व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सातत्य - Continuity* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *सर्वस्वाचा त्याग* देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवावर उदार होऊन प्राणपणाने लढणाऱ्या देशभक्त क्रांतिकारकांची भूमिका ‘की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने अशी असते. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध झालेल्या क्रांतिकारकांना स्वातंत्र्याच्या पुढे अन्य कशाचेही मोल नसते. तळहातावर शिर घेऊन प्राणपणाने झुंजणाऱ्या, दोन क्रांतिकारक भावांना जुलमी सत्तेने फाशीची शिक्षा सुनावली. प्रत्यक्ष फाशीच्या वेळेला दोघेही क्रांतिकारक बंधू निश्चल होते. त्यांनी माफीपत्र लिहून दिल्यास त्यांची शिक्षा सौम्य करण्यात येईल, पुढे कधीही उठाव न करण्याच्या बोलीवर सारी शिक्षाही माफ केली जाईल, असे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. ते सारे त्यांनी झिडकारले. आणि ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही फासावर जात आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. ‘ असे त्यांनी गौरवाने सांगितले. धाकट्या भावाला अगोदर वधस्तंभाकडे नेण्यात आले. निघून त्याने पाहिले तर मोठ्या भावाच्या डोळ्यात असू दाटलेले त्याला दिसले. त्याचा निरोप घेत तो म्हणाला, ‘दादा वाईट .कशाचे वाटून घेतोस? अखेरची घडी आली म्हणून?’ त्यावर ताठ मानेने तो मोठा भाऊ म्हणाला, ‘अरे, नाही रे बंधुराजा डोळ्यात आलेले असू हे प्राण जाणार म्हणून आलेले नसून ते आनंदाश्रू आहेत. हुताम्य पत्करण्याची संधी तू धाकटा असूनह्री तुला प्रथम मिळते आहे, ह्याचा मला आनंद वाटला. *तात्पर्य : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना आपल्या प्राणाची आहुती देण्यातच धन्यता असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*माझी शाळा माझे उपक्रम* *👭👬बालसभा👬👭* 〰〰〰〰〰〰〰 आज दिनांक १२-०९-२०१८ रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथील इयत्ताःपहिली व दुसरी ची बालसभा घेण्यात आली. 👉 बालसभेचा विषयः मुलींचे शिक्षण📚✍📚 👭👭👭👭👭👭 🌻अध्यक्षः वर्ग (१ली) तील आनंद वाघमारे 🌻उपाध्यक्षः साई कदम 🌻प्रमुख पाहुणेः वर्ग (२री) आरती कदम, सुशांत भालेराव, सुरज वाघमारे 💐💐💐💐💐💐 आजच्या बालसभेत *(बालनाट्यः सखु शाळेला आली.)* 👉सहभागी विद्यार्थी पाञ आजीः स्नेहल,बाईःप्रतिक्षा,सखुः संस्कृती,आईः आदिती, वर्गमैञीणीः सोजलः नेहा,आरुषीः अस्मीता, आनंद, युवराज, आदर्श............. सादरीकरण करण्यात आले.व मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. 〰〰🐽〰〰〰〰〰〰〰 *✍शब्दांकन/ वर्गशिक्षिका.* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (स.शि.) जि.प.प्रा.शा.गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. ➖➖➖➖➖➖➖ क्षणचिञे /video 👇👇👇👇 ➖➖➖➖➖➖

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 12/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १६६६: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले. १९३०: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला. १९४८: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते. १९५९: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले. १९९८: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. २००२: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण. २००५: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले. २०११: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले. 💥 जन्म :- १८८०: सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट १८९४: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय १८९७: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी १९१२: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी 💥 मृत्यू :- १९२६: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे १९५२: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व १९७१: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी १९८०: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग १९९२: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर १९९६: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर १९९६: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *राजस्थान सरकारनं सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात केली दोन टक्क्यांची वाढ, आता महागाई भत्ता 7 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर* --------------------------------------------------- 2⃣ *जम्मू-काश्मीरमधला उधमपूर जिल्हा हागणदारीमुक्त, 75 हजार शौचालय केले तयार* ---------------------------------------------------  3⃣ *मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात मागासवर्ग आयोगाचा प्रगती अहवाल सादर. 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणार, मागासवर्ग समितीची हायकोर्टात ग्वाही.* --------------------------------------------------- 4⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अंगणवाडी सेवकांशी संवाद साधत, त्यांच्या मानधनात केली वाढ* --------------------------------------------------- 5⃣ *नांदेड : महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी भाजपाच्या गुरप्रीतकौर सोढी यांची नियुक्ती.* --------------------------------------------------- 6⃣ *भारत वि. श्रीलंका महिला क्रिकेट सामन्यात स्मृती मानधनाची फटकेबाजी, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर मोठा विजय* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत ठरला भारताचा पहिला यष्टीरक्षक* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आजच्या दैनिक रामप्रहर मध्ये प्रकाशित लेख " पोशाख : व्यक्तीची ओळख " http://ramprahar.com/wp-content/uploads/2018/09/Ram-Prahar-12-September-2018-Page-4.jpg पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *समर्थ रामदास* त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर (२४ मार्च १६०८, येथे झाला. हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.पर्यावरणावर एवढे प्रबोधन आणि लिखाण करणारे ते महान संत होते. दिनांक १३ जानेवारी १६८१ सज्जनगड येथे मृत्यू झाला. त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे साहित्य प्रसिद्ध आहे तर जय जय रघुवीर समर्थ हे वचनप्रसिद्ध आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करावं, जग अपोआप सुंदर बनतं *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *०१) ' हिरण्य 'कोणत्या धातुचे वैदिक नाव आहे ?* सोने *०२) स्वामी विवेकानंद यांचे जन्मनाव काय होते ?* नरेंद्र *०३) जिम कार्बेट पार्क कुठे आहे ?* उत्तराखंड *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● शिवकन्या शशी ● श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी ● स्वप्नील पुलकंठवार, देगलूर ● विकास पाटील  ● साईनाथ बोदुलवार ● श्याम कांबळे ● पुंडलिक बिरगले ● शिवा शिवशेट्टे ● केतन जोशी ● साहिल सुगुरवाड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *योग्य वापर* हल्ली चोरही रोज सोन्याच्या ताटात खातात पैशावाले नुसतेच रिकामा भार वहातात असलेल्या साधन संपत्तीचा योग्य वापर केला पाहिजे आहे त्या गोष्टीचा सहज उपभोग घेता आला पाहिजे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 15*      *यह तन विष की बेलरी* *गुरु अमृत की खान |* *सीस दिए जो गुरु मिले* *तो भी सस्ता जान ||* अर्थ गुरूचे जीवनातील महत्त्व सांगताना महात्मा कबीर सांगतात की हे शरीर विषवल्ली समान आहे. माणूस देहिक सुखाच्या मागे लागतो. शरीर शृंगार, देह सजावट व शरीराच्या ठेवणीकडे ध्यान पुरवण्यातच जीवनाचा सारा वेळ निघून जातो. खरं तर शरीर नाशीवंत आहे. शरीरविषक आवश्यक बाबी पुरवायला हव्यात. शारीरिक सौंदर्य/श्रीमंती काल मर्यादित आहे. हृदयाची श्रीमंती मात्र अक्षय असते. मनाची सफाई केली तर हे जीवन आनंद व समाधानानं भरून जातं. त्याला जन कळवळ्याची चाड असते. मनाच्या जडणघडणीसाठी स्वतःपाशी जगाकडे पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज असते. ही दिव्य दृष्टी मानवाठायी उत्पन्न होते ती गुरूमुळं. अज्ञानात खितपत लोकांना गांजणारा अंगुलीमाल तथागतांच्या सान्निध्यात येतो. बुद्धांची प्रेमळ दृष्टी त्याच्यावर पडते. त्यांच्या उपदेशाने त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन आरपार बदलून जातो. अंगुलीमालाचं हृदय परिवर्तन होतं. पूर्वाश्रमीच्या कोणत्याही रानटीपणाच्या खुणा त्याच्या ठायी दिसत नाहीत. तो मानवतावादाचा पुरस्कर्ता बनतो. जग त्याच्याशी कसेही वागले तरी तो अहिंसेचा पुजारी होतो. हे सार गुरूपदेशातलं रहस्य होतं. गुरू अमृतरूपी कुंभ आहेत. ज्याला खरा गुरू मिळाला तो तो अमर झाला आहे. याला इतिहास साक्ष आहे. सांदिपनी-कृष्ण, द्रोण-अर्जून अशा असंख्य गुरू शिष्याच्या जोड्या सिंहावलोकन करता नजरेपुढे सहज फेर धरतील. गुरू शिष्याला कर्तव्याची जाणीव करून देतात. निकोप मनाची घडवणूक करून देण्याची किमया गुरूंचीच ! गुरूंच्या चरणी मस्तक झुकवणंंच काय प्रसंगी प्राणार्पणही कमीच आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *दिव्यदृष्टी - Divine vision* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *नदीपार* ब्रह्मदेशाचा (सध्याचा म्यानमार) राजा बोडायाया हा विशेष प्रसिद्ध होता. तो कुशल प्रशासक तर होताच, पण त्याचे सैन्यही बलाढ्य होते. त्याचे राज्य सर्वात बलिष्ठ समजले जाई. या शूर राजाचे अंतःकरण दयाळू होते. त्याने अनेक पॅगोडे बांधले आणि देशभरातील धर्मगुरूंची बडदास्त राखली. बालपणाच्या मित्रांचीदेखील त्याने चांगली दखल घेतली. यु पॉ हा त्याचा मित्र. त्याच्याबरोबर एकाच धर्मगुरूकडे तो सहाध्यायी होता. बालपणापासून त्यांचे संबंध मैत्रीचे राहिले होते. एक दिवस राजेसाहेब आपल्या लवाजम्यासह इरावद्दी नदीवर सहलीसाठी गेले. ब्रह्मदेशातील या सर्वांत मोठ्या नदीला ब्रह्मी लोक ‘इतरावत्ती माता’ म्हणतात. ते जिथे गेले होते, तिथे नदीचे पात्र विस्तीर्ण, नजरेच्या टप्प्यात न भरणारे होते. दिवस मावळला. राजाला कंटाळा आला. त्याला यु पॉ ची थट्टा करायची लहर आली. यु पॉ आता दरबारी खूशमस्कर्‍या होता. त्याला मंत्र्याचा दर्जा होता. ‘यु पॉ ही नदी ओलांडून जाशील का ?’ ‘होय महाराज !’ त्याने तत्काळ उत्तर दिले. ‘तू मला खूश करण्यासाठी हे म्हणतोयस, हे मला ठाऊक आहे; पण ही थट्टा नाही.’ ‘महाराज, खरंच मी नदी पार करून दाखवतो.’ ‘मग आताच्या आता नदी ओलांड पाहू ।’ हे ऐकल्यावर यु पॉने आपला सॅरॉग वर उचलला आणि तो किनार्‍यावर येरझारा घालू लागला. बर्‍याच वेळाने राजाने विचारले, ‘ अरे, तू थांबलास का ?’ ‘महाराज, मी बोटीची वाट पाहतोय.” ‘बोटीने तर कोणीही सामान्य माणूस जाईल, मग तूच कशाला हवा ?’! युपॉने राजापुढे गुडघे टेकले. जमिनीवर डोके टेकवून तो म्हणाला, ‘महाराज, त्या सामान्यांतला मी एक सामान्य माणूस आहे.’ राजेसाहेब त्यावर खळखळून हसले, झालं! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 10/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली. 💥 जन्म :- १८७२ - रणजितसिंह, विख्यात क्रिकेटपटू. १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर नेते. १८९५ - कविसम्राट विश्वनाथ सत्यनारायण, तेलुगू लेखक. १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. १९८९ - संजया मलाकार, अमेरिकन आयडॉलमधील कलाकार. 💥 मृत्यू :- १९८३ - जॉन वॉर्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान. २००६ - टॉफाहाऊ टुपोऊ, टोंगाचा राजा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *मुंबई - भारत बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आज दुपारनंतर गणपती उत्सवाच्या जादा बसेस सुटणार, परिवहन मंत्री, दिवाकर रावते यांनी दिली माहिती* --------------------------------------------------- 2⃣ *चेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यासाठी तामिळनाडू सरकार करणार शिफारस* ---------------------------------------------------  3⃣ *जळगाव - रुपयाची घसरण आणि इंधनाच्या वाढत्या दरांचा सोन्यावर परिणाम, सोन्याच्या भावांमध्ये 1200 रुपयांनी वाढ* --------------------------------------------------- 4⃣ *येत्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी* --------------------------------------------------- 5⃣ *हिमाचल प्रदेश - हिमाचल रस्ते परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून 2 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी* --------------------------------------------------- 6⃣ *जपानची नाओमी ओसाका ठरली अमेरिकन ओपनची विजेती, ओसाका ग्रँड स्लॅमचं विजेतेपद पटकावणारी जपानची पहिली टेनिसपटू* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा डाव २९२ धावांवर आटोपला, इंग्लंडकडे ४० धावांची आघाडी* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे* http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.html वरील लेख वाचण्यासाठीनिळ्या अक्षरावर क्लिक करावे आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीआहार* रोगप्रतिकारक क्षमता किंवा इम्युन सिस्टीम कमजोर झाल्यास विषाणू आणि जीवाणू यांचा शरीरावर हल्ला होता त्यामुळे आपण सतत आजारी पडतो. शरीराला धोकादायक असणारे विषाणू आणि जीवाणू यांच्याशी दोन हात करण्याचे काम शरीराची प्रतिकारशक्ती करत असते. त्यामुळे शरीराची ही संरक्षण व्यवस्था उत्तम ठेवण्यासाठी काही घटकांचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते.  लसूण : यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकार क्षमता मजबूत होते. लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक असतो जो शरीराला जीवाणू आणि संसगाश्री लढण्याची शक्ती देतो.  पालक : पालकाच्या भाजीत मुबलक प्रमाणात फोलेट नावाचा घटक असतो. त्याचबरोबर लोह, तंतुमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट घटक तसेच ह्यसी जीवनसत्त्व असते त्यामुळे शरीरासाठी या भाजीचे सेवन फायदेशीर ठरते.  मशरूम : त्यात सेलेनियम, बी जीवनसत्त्व, रिबोफ्लेविन आणि नायसिन नावाचा घटक असतो. मशरूममध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिट्यूमर घटक असतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करतात. ब्रोकोली : त्यात ए, सी आणि के जीवनसत्त्व असतेच शिवाय त्यात अँटिऑक्सिड.ंटही असते. प्रतिकार शक्ती मजबूत कर्णाया या भाजीत प्रथिने आणि कॅल्शिअम असते. हेही लक्षात ठेवा की आपली दिनचर्या सृदृढ राहील याची काळजी घ्यावी. पुरेशी झोप घ्यावी. योग आणि ध्यान करावे.तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन बंद करावे. हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन करावे. प्रोबायोटिक आहाराचे सेवन अवश्य करावे.दिवसातून काही वेळ सूर्यप्रकाशात जरूर घालवावा.सर्दी, डोकेदुखी आणि त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यावर योग्य उपचार करावेत. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= हल्ला करणार्‍या शत्रूला भिऊ नकोस. पण स्तुती करणार्‍या मित्रापासून सावध रहा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) कोणती बँक सेवेत रोबो आणणार आहे ?* एचडीएफसी बँक *२) जागतिक क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?* २९ ऑगस्ट *३) सर्वांत श्रीमंत देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ?* सातवा *४) जीएसटी मंजूर करणारे सहावे राज्य कोणते ?* गुजरात *५) यंदाची जागतिक कबड्डी स्पर्धा कुठे होणार आहे ?* अहमदाबाद *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● ईश्वर येमुल, नांदेड ● विश्वांभर पापुलवाड, धर्माबाद ● प्रवीण भिसे पाटील ● गणेश कोकुलवार, नांदेड ● ज्ञानेश्वर इरलोड ● राजेश्वर बाबुराव चिटकूलवार ● संतोष पांडागळे, नांदेड ● योगेश पोकलवार ● आकाशगाडे ● गंगा पूट्टेवाड ● संभाजी साळुंखे ● अनिरुद्ध वंगरवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *पोळा* पोळा म्हणजे बैलांच्या कृतज्ञतेचा सण आहे पशुंचीही पुजा करतो बळीराजाचे मोठे मन आहे पशुंच्याही कृतज्ञतेचा इथे सोहळा होतो पोळ्याच्या सणाला सारा गाव गोळा होतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 13* *न गुरु मिल्या ना सिष भय* *लालच खेल्या डाव |* *दुनयू बड़े धार में* *छधी पाथर की नाव ||* अर्थ महात्मा कबीर गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते व त्यांच्याकडील अपेक्षित क्षमतांवर दृष्टीक्षेप टाकतात. गुरू आणि शिष्य लालची असतील तर साधनेतून कोणतेही साध्य साध्य होणार नाही. गुरूचा स्वतःचाच प्रापंचिक मोह सुटलेला नसेल तर तो शिष्याला या मोहमयी दुनियेच्या बंधनातून कसा मुक्त करील? पांडित्य करताना पंडिताचा ताठा , मी एक महा विद्वान आहे. माझ्याशिवाय इथलं पानही हलू शकत हा त्या पंडिताचा अहंकारी स्वभाव त्याला गुरू पदापर्यंत जायला खरा अडसर ठरतो. शिष्याची साधकाची आर्थिक स्थिती पाहून मिळकतीचा विचार करून केवळ दक्षिण्यावर व मिळकतीवर लक्ष केंद्रित करित पूजापाठ व पौरोहित्त्य केलं जाणार असेल तर केलेल्या सेवेला आत्मिक आनंदाची व समाधानाची सर कुठून येणार आहे ? शिष्याने / साधकाने जर स्वार्थी हेतु ठेवून आराधना केली. त्याला जन कळवळ्याची झालर नसेल तर त्याच्या साधनेला अर्थच उरत नाही. असे गूरू आणि शिष्य केवळ भ्रमीत असतात. अशा माणसांचा किवा त्यांच्या कडून इत्तरांचा उद्धार होणे कधीही संभव नाही. कारण ते दोघेही दगडी नावेतले प्रवासी आहेत. दिसायला ती मजबूत दिसत असली तरी पाण्यावरून जाण्यास ती असमर्थ आहे. ती पाण्यावर नेली तर बुडणारच ! गुरू शिष्याचं लालचीपणही हा भवसागर तरायला मदत न करता अर्ध्यातच दोलायमान होवून गटांगळ्या खाऊ लागतं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎯 विचारवेध............✍🏻 --------------------- नेहमी माणूस म्हणतो की,मी स्वतंत्र आहे मला कुणाचीही गरज नाही,माझे कुणावाचून अडत नाही.हे कितपत सत्य आहे ? परंतु एक सत्य आहे माणूस कितीही आणि कसाही वागला तरी एक लक्षात असू द्यावे की,माणसाची खरी मदार तर मुक्या प्राण्यावरच आहे .हेच पहा ना..दूग्धजन्य पदार्थ बनतात ते दूध देणाऱ्या गाई म्हशी,शेळी आणि इतर प्राण्यांपासून, शेतामध्ये काम करण्यासाठी बैल आवश्यक आहे,ओझे वाहून नेण्यासाठी बैल,गाढव,उंट,हत्ती,पिकावर अळी,कीड पडली तर पाखरे,घर,शेत सांभाळण्यासाठी कुत्रे,घरातल्या उंदरापासून संरक्षण हवे असेल तर मांजर अशा कितीतरी प्राणीजीवनाचा आपण उपयोग करुन आपले जीवन जगत असतो.त्यांच्याबद्दलची कृतज्ञता नेहमीच आपल्या मनात असायला हवी.ते जर नसते तर आपण आपले जीवन सुखावह जगलो असतो का ?आपण यांच्याशिवाय जगू शकलो असतो का ? नाही ना ?मग आपण स्वतंत्र नसून त्यांच्या जीवावर जगत असतो.म्हणून आपल्या जीवनाइतकेच त्यांनाही आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान द्यायलाच हवे.ते देखील तितकेच प्रेम आपल्यावर करत असतात.त्यांच्याही भावना आपल्यासारख्याच असतात.म्हणून भूतदया आपणही करायला शिकली पाहिजे.त्यांनाही आपल्या परिवारातील सदस्य समजून घेऊन प्रेम करायला हवे.जर का असे नाही केले तर आपले जीवन अधुरेच आहे असे समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🐂🐄🐎🐏🐑🐐🐫🐘🐀🐇🕊🕊 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *संरक्षण - Protection* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *🌺परोपकाराची भावना*🌺 एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मश्गुल मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेत मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला. कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच ..... पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं.* अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते. *-----------------------------------* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣    (फ्रेश शालेय परिपाठ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 07/09/2018 वार - शुक्रवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- 💥 ठळक घडामोडी :- ● १८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला. ● १८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. ● १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे. ● १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली. ● १९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. ● १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश. ● २००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका 💥 जन्म :- ◆ १७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक ◆ १८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड 💥 मृत्यू :- ◆ १६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर ◆ १८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके ◆ १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी ◆ १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले ◆ १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी ◆ १९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग ◆ १९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *साैरऊर्जा प्रकल्प सुरु करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ठरले देशातील पहिले विद्यापीठ* --------------------------------------------------- 2⃣ *हैदराबाद - तेलंगणामध्ये मुदतपूर्व विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार, विधानसभा बरखास्तीच्या प्रस्ताव मंजूर* ---------------------------------------------------  3⃣ *नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात इंटरपोलनं मिहिर रश्मी बन्साली यांना बजावली रेड कॉर्नर नोटीस* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : अविनाश पवार आणि श्रीकांत पांगारकर यांची सत्र न्यायालयाने केली १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी* --------------------------------------------------- 5⃣ *दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरण, हायकोर्टानं तपास यंत्रणांना खडसावलं. सतत माध्यमांसमोर न जाण्याचा सल्ला.* --------------------------------------------------- 6⃣ *कोहली आणि रुट सध्याचे सर्वोत्तम फलंदाज ; ब्रायन लाराची स्तुतीसुमने* --------------------------------------------------- 7⃣ *us open tennis: नोव्हाक जोकोव्हिच उपांत्य फेरीत* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= आंतरराष्ट्रीयसाक्षरता दिन त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख *साक्षर भारत ; समर्थ भारत* https://goo.gl/31q7e5 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत तुकाराम महाराज* संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत…!!! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचं नाव काय ?* तेहरिक-ए-इन्साफ *२) मदुमलाई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?* तामिळनाडू *३) यंदाची विम्बल्डन महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं ?* अँजेलिक किर्बर *४) 'जागतिक हेपेटायटिस दिवस' कधी साजरा केला जातो ?* २८ जुलै *५) बंगालचे पहिले गव्हर्नर कोण होते ?* वॉरन हेस्टींग्ज *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● गजानन जाधव ● सुमित पेटेकर ● पवन धांडू ● दशरथ याटलवार ● प्रवीण कुमार ● गोविंद पटेल ● प्र. श्री जाधव ● हणमंत गायकवाड ● भारत पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= @@ गुगली @@ *झुला* प्रत्येकाच्या मनात एक आठवणींचा झुला असतो मनमोकळ झुलायला ज्याचा त्याला खुला असतो आठवणींच्या झुल्यावर प्रत्येकाला झुलता येत कटू आठवणी टाळून आनंदाने फुलता येत शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 12*      *लकड़ी कहे लुहार की* *तू मति जारे मोहि |* *एक दिन ऐसा होयगा* *मई जरौंगी तोही ||* अर्थ : लोहाराचा धंदा म्हटला की भट्टी आणि भाता आलाच. कठीण वाटणार्‍या लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्याला भट्टीत टाकतो. भट्टीत इतका गरम करतो की ते लालबुंद होवून जातं अन् त्याच्या घनाच्या/ हातोड्याच्या दणक्या सरशी पाहिजे तसा आकार घेवू लागतं. मात्र त्याच्यामागं खरं समर्पण असतं लोहाराकडच्या लाकडांचं ! जसजसा लोखंडाला ताव चढू लागतो तसं तसा लोहार चेव चढतो. भट्टीत लाकडे टाकून भात्याने वार्‍याला फुस देत लाकडांना लाल इंगळ करीत संपवून टाकतो. त्याचा जोस लाकडांचा कर्दनकाळ असतो. ते पाहून लाकूड म्हणतं की आज मी तुझा अंकित आहे. माझा तुला हवा तसा वापर करून घे. एक दिवस माझाही असेल. त्यावेळी तू निचेष्ट पडलेला असशील. त्यावेळी मी तुला असेच बेमुर्वतपणे भस्मसात करीन. त्यावेळी तुझ्या अस्तिवाच्या खुणाही मागे असणार नाहीत. तात्पर्य: कार्य कर्तृत्त्वासाठी प्रत्येकाला काळ संधी देत असतो. बलशाली माणसे कमकुवतांवर हुकूमत गाजवतात. त्या हुकूमतीला कळवळ्याचा आधार असेल तर ती हुकूमत हवीहवीशी वाटू लागते. परतु ती अतिरेकी मनमानी करणारी असेल तर एक दिवस सहज पत्त्यांचा डाव कोसळावा तशी ती कोलमडते अन अन तिच्या अस्तित्वाच्या खुणाही शेष राहात नाहीत. मगधच्या धनानंद व आॅस्ट्रियाचा राजा सोळावा लुई ही उदाहरणं पाहता सर्वकाही कळून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= निद्रानाशाची अनेक कारणे जरी असली निद्रा लागण्याचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही जे काही काम केले आहे ते तन आणि मन स्थिर ठेवून व मनात कोणताही वाईट विचार न आणल्यामुळे ते शक्य झाले. त्यात तुम्ही केलेल्या कामात कसलीही कुचराई केली नाही तसेच तुम्ही कामाच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळेल याचीही अपेक्षा न केल्यामुळे ते शक्य झाले. नाही तर एखाद्यावेळी तुमच्या मनात एक आणि कृतीमध्ये एक असेल तर तेच कारण तुमच्या निद्रानाशाचे होऊ शकते. असे करण्यापेक्षा दैनंदिन जीवनात आपण ठरवूनच टाकायचे जे काही करणार ते प्रामाणिकपणे करणार त्यात कसलीही बनावट कृती करणार नाही मग तुम्हाला हवी तेवढी निद्रा शांतपणे लागेल. ठराविक वेळेत तुम्ही तुमची निद्रा घेऊन पुढील कामासाठी तेवढ्याच जोमाने कामाला लागाल आणि शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी तत्पर राहाल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃🌾🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *कुचराई - Scouring* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *निसर्गाने नटवूया सृष्टी सारी* गोपीचंद नावाचे एक व्यापारी होते. त्यांचं आधी छोटंसं दुकान होतं. नंतर हळूहळू मोठं दुकान झालं. तिजोरी भरली. मग त्यांनी राहण्यासाठी मोठी जागा घ्यायचं ठरवलं. मग एक जागा बघून तिथे त्यांनी मोठी हवेली बांधली; पण अवतीभोवती दलदल व तुंबलेल्या गटारांमुळे येणार्‍या दुर्गंधीने ते कंटाळले. लाखो रुपये खर्च करून हवेली बांधली खरी; पण घराभोवतीच्या दुर्गंधीमुळे ती सोडावी लागणार याचं त्यांना दुःख झालं. त्यांचा रमणचंद नावाचा एक घनिष्ट मित्र होता. तो कल्पक होता. त्याने गोपीचंदांस सांगितले, ‘या दुर्गंधीच्या त्रासाने हवेली सोडण्यापेक्षा एक वर्षभर ती माझ्या ताब्यात दे. मी तुला चमत्कार करून दाखवतो.’ त्याप्रमाणे हवेली रमणचंदकडे व पेढीचा कारभार मुनिमाकडे सोपवून गोपीचंद एक वर्षभर तीर्थयात्रेला गेले. इकडे रमणचंदने तो संपूर्ण दलदलीचा परिसर स्वच्छ करून तिथे माती आणून टाकली व निरनिराळ्या प्रकारच्या सुगंधी फुलांची झाडे लावली. बांधावर मोठी झाडं लावली. एक वर्षाच्या आत चमेली, मोगरा, गुलाब, तुळस या सर्वांनी बाग फुलून गेली. आता दूरवरून दुर्गंध आला तरी झाडे तो थोपवू लागली आणि वार्‍याच्या झोताबरोबर येणार्‍या सुगंधाने हवेली भरून गेली. गोपीचंद यात्रेहून परतले तेव्हा मध्यरात्र होती. त्यावेळी त्यांना काहीच दिसलं नव्हतं; पण पहाटे जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते सुगंधाने मोहून गेले. अरुणोदयाला त्यांना बागेचं मोहक दृश्य दिसलं. गोपीचंदने कमाल केली होती. आता हवेलीत उदबत्या लावण्याची गरज नव्हती; कारण गोपीचंदने फुलझाडांच्या कितीतरी उदबल्या लावल्या होत्या. *तात्पर्य: कृत्रिम उपायांपेक्षा नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करावा.निसर्गालाच आपले दैवत मानून निसर्गातील झाडांची जोपासना व लागवड करावी.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 06/09/2018 वार - गुरूवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम. १९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले १९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला. १९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड. १९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली. 💥 जन्म :- १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस १८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन १९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले १९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड  १९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर १९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर १९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी 💥 मृत्यू :- १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ १९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर द्यावा, त्यांच्याकडील शिक्षणबाह्य काम कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन* --------------------------------------------------- 2⃣ *मुंबई- अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा केलं लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, छातीच्या संसर्गामुळे तातडीने रुग्णालयात हलवलं* ---------------------------------------------------  3⃣ *विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता, पूर्व-विदर्भात 6, 7 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढणार* --------------------------------------------------- 4⃣ *मुंबई - प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर* --------------------------------------------------- 5⃣ *धुळे : बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने चिंचखेडे येथील शिक्षक भास्कर अमृतसागर यांचे धुळे जि.प. समोर कंदील लावून बिऱ्हाड आंदोलन सुरू* --------------------------------------------------- 6⃣ *मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन* --------------------------------------------------- 7⃣ *देशभरात पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= खास शिक्षक दिनानिमित्त मनाला भावलेलं *" हाताची जादू ओळखणारा शिक्षक "* लेखक - नागोराव येवतीकर निवेदन - सतीश पाटील https://youtu.be/-R9ZpCSvOok You tube वर एकदा जरूर ऐका. एका मित्राकडून शिक्षक दिनानिमित्त दिलेली खास भेट आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत एकनाथ* संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त,  योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून  अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे  चाळीसगावचे  रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी एका मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) मानवी तस्करी विरोधी दिन कधी असतो ?* ३० जुलै *२) 'द प्रेस' या गाजलेल्या साहित्यकृतीचे लेखक कोण ?* एम. चलपतराव *३) पृथ्वीचे दोन समान भाग करणार्‍या आणि पूर्व-पश्‍चिम दिशेने जाणार्‍या काल्पिनक वृत्ताला काय म्हणतात ?* विषुववृत्त *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • महेश वडजे • संतोष इनामदार • विठ्ठल तुकडेकर • रितेश पोकलवार • प्रशिक कैवारे • विकास डुमणे • सुनील ठाणेकर • अनिल सोनकांबळे • आनंद गायकवाड • सचिन पाटील • *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *बनवा बनवी* करणारे बरोबर बनवा बनवी करतात बनवा बनवी करून तेच चांगले ठरतात कितीही सफाईने बनवा बनवेगिरी उघडी पडते कुठे तोंड लपवावे बनवणाराला पंचाईत पडते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 11* *साईं आगे सांच है,* *साईं सांच सुहाय |* *चाहे बोले केस रख* *चाहे घौत मुंडाय ||* अर्थ : महात्मा कबीर निर्गुणाचे उपासक आहेत. ते मुर्तीपूजक नाहीत. ते कर्मकांड, कर्मठपणा व पाखंडी भक्तीचं समर्थन करीत नाहीत. ईश्वराचं वास्तव्य ते सत्यात पाहतात. सत्याच्या ठिकाणी ईश्वर वसत असतो. ईश्वराला सत्यच आवडत असते. अलिकडे सत्यापेक्षा ढोंग जास्त वाढलंय. कबीर त्याच्यावर फटकार ओढतात. भक्तिचं अवडंबर माजवून आंतरिक शुद्धी न करता बाह्य देखावे कितीही केले तरी ईश्वर कसा काय भुलेल व प्रसन्न होईल ? काही जण भक्तीच्या नावाखाली भले लांब केस वाढवतात. डोक्यातल्या केसांच्या जटा होवून जातात. दाढीमिशाही लांंबच लांब वाढवतात. कुठे तरी जंगलात जावून गुहेत झाडाखाली वास्तव्य करतात. काही जण मिशा काढून दाढी वाढवतात. कुणी दाढी मिशा काढून टाकतात. तर कुणी मुंडण करतात. काही भक्त मूर्तीपूजा करतात , काही नमाज अदा करतात, काही उपासातापासाच्या नादी लागून शारीरिक क्लेश वाढवून घेतात. ही सर्व मंडळी खरे पाहता खर्‍या ईश्वराला ओळखतच नाहीत. तो प्रत्येकाच्या आत दडलेला असतो. निसर्गानं आपणास दाढी मिशी केस हे शरीर रक्षणासाठी दिलेले आहेत. आवश्यक तेवढे ठेवणे व अनावश्यक काढले पाहिजेत. जशी शारीरिक स्वच्छता करता तशी मनाचीही स्वच्छता करता आली पाहिजे. मनाने निसर्गतः माणूस म्हणून जन्माला आलात तर माणूस म्हणून माणसाला मुक्तपणे जगता आलं पाहिजे. जाती धर्माचा हा देखावा कृत्रीम आहे. पशु पशुत्व सोडत नाहीत. आपआपसात भेदभाव करत नाहीत. पक्षीही भेदभाव न करता सारे कसे एकत्र राहतात? माणसानेही वरवरच्या देखाव्याला भुलून मानवता धर्मातला आनंद गमावता कामा नये. बनावटी व दिखाऊ धर्मातून सत्य व समाधान मिळत नाही . मिळाल्यासारखं वाटलं तरी ते चिरकाल आनंद देवूच शकत नाही. तेव्हा सत्य जाणून. प्रत्येकात दडलेल्या ईश्वराला नैसर्गिकपणे जपायला ह्रवे. हाच खरा कल्याणकारी मानवता धर्म आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= या चराचर सृष्टीतील प्रत्येक जीवाला जीवन जगण्यासाठी एकमेव पाण्याची जशी आवश्यकता आहे, त्याप्रमाणे मनुष्याला आपले जीवन सुखी व समृद्ध वैविध्यपूर्ण मानसन्मानाने जगण्यासाठी, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी, स्वावलंबी होऊन जीवन जगण्यासाठी ख-या ज्ञानाची आवश्यकता आह े.ज्यांच्याजवळ कोणतेच ज्ञान नाही त्यांचे जीवन अर्थहीन आहे.जसे की जीवांना पाण्याविना जगणे अशक्य आहे तसे माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्ञान नसेल तर ते मनुष्यरुपी जीवन म्हणून जगणे अर्थहीन आहे. जीवनातल्या प्रत्येक संकटातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर ज्ञानाची कास धरावीच लागेल.त्याच्याशिवाय कोणतीही प्रगती करणे अशक्य आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 📖🎨📖🎨📖🎨📖🎨📖🎨 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *प्रेरणा - Inspiration* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *न्याय सर्वांसाठी* एका राजाने आपल्या महालाबाहेर एक मोठी घंटा बांधून त्याची दोरी खाली सोडली होती. कोणीही सामान्य माणसाने यावे व ती घंटा वाजवून राजाकडे न्याय मागावा अशी त्या न्यायी राजाची व्यवस्था होती. एकदा एक अत्यंत हडकुळा, अशक्त बैल रस्त्याने जाता-जाता महालाबाहेरील हिरव्या वेलीची पाने खाऊ लागला. वेलीच्या बाजूलाच लोंबकळत असलेली त्या न्यायाच्या घंटेची दोरी त्याच्या तोंडात आली व त्याने मान फिरवताच घंटा वाजू लागली. अचानक घंटा वाजलेली पाहून राजाने घंटा वाजवणाऱ्याला दरबारात आणण्याचा फर्मान काढले. पाहातात तर तेथे कोणीच व्यक्ती नव्हती पण तेथे तो बैल होता. त्या बैलालाच शिपाई घेऊन आले. पण बैल तो, तो काय बोलणार? फिर्यादच करू शकला नाही तर त्याला काय न्याय देणार? म्हणून त्याला सोडून देणार तोच मुख्य प्रधान पुढे सरसावला व म्हणाला, “महाराज, या बैलाने घंटा वाजवली म्हणजे नक्कीच त्याची काहीतरी फिर्याद असणार. पहा, तो म्हातारा आहे. म्हणजे मालकाने त्याच्याकडून भरपूर काम करून घेतले व म्हातारपणी त्याला चाराही न देता सोडून दिले. भुकेपोटी हिंडत तो येथे आला व वेल खाऊ लागला. याचा अर्थ त्याच्या मालकाने त्याच्यावर अन्याय केला आहे. महाराज तो आपण दूर करावा.” प्रधानाचे म्हणणे न्यायी राजाला पटले. त्याने तात्काळ बैलाच्या मालकाला बोलावून त्याला दंड केला व बैलाला नीट सांभाळण्यास सांगितले. *तात्पर्य : मुक्या प्राण्यालाही न्याय मिळाला पाहिजे.* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🌞🙏 *सुमने होऊनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी ।* *देह झिजावा अखंडित हा ज्ञानदान साधनेशी..........॥* 🌹🌹🌹🌹🌹 *ही एकच तळमळ मनात ठेवून नवभारताचे आधारस्तंभ असणारी विद्यार्थीशिल्पे घडविण्यासाठी अविरत प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या सर्व गुरूजणांना शतशः नमन👏👏 व शिक्षक दिनाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा..!* 💐💐 🙏🙏🙏 शुभेच्छूकः श्रीमती सेनकुडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 05/09/2018 वार - बुधवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= _*शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना हार्दीक शुभेच्छा*_ 💥 ठळक घडामोडी :- १९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू. १९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले. १९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण. २०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा)  १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई १८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन १८९५: भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर १९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक १९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया १९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत १९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी १९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा 💥 मृत्यू :- १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा  १९७८: कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार रॉय किणीकर १९९१: हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी १९९२: उद्योगपती अतूर संगतानी १९९५: हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी १९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा २०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *नवी दिल्ली - कोलकाता येथील पूल दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा, संपूर्ण मदतीचे दिले आश्वासन* --------------------------------------------------- 2⃣ *पुणे - डॉ नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी आरोपी शरद कळसकरला १० सप्टेंबरपर्यंत सत्र न्यायालायाने पोलीस कोठडी सुनावली* ---------------------------------------------------  3⃣ *केरळमध्ये 1 ऑगस्टपासून 372 जणांना लेप्टोस्पायरोसिसची लागण झाल्याची माहिती.* --------------------------------------------------- 4⃣ *ब्राझीलमधील राष्ट्रीय संग्रहालयाला भीषण आग, 2 कोटींहून अधिक ऐतिहासिक वास्तू भस्मसात* --------------------------------------------------- 5⃣ *नाशिक - शहरातील 71 बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती, 2009 नंतरची ही धार्मिक स्थळे असून बहुतांश मंदिरे खुल्या जागेत आहेत.* --------------------------------------------------- 6⃣ *देवस्थानांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण द्या : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचे प्रतिपादन* --------------------------------------------------- 7⃣ *भारताच्या ओम प्रकाश मिथर्वालने जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत 50 मीटर पिस्तुल प्रकाराचे सुवर्णपदक जिंकले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक दिनानिमित्त खास कथा वाचा प्रतिलिपिवर *" हाताची जादू ओळखणारा शिक्षक "* https://goo.gl/ZNKytm अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *संत नामदेव महाराज* संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबीव व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्यागुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठीतील'पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= मौन म्हणजे परिस आहे, ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होऊन जाते. - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१)'यंग इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?* महात्मा गांधी *२) पुण्यातील हिंगणो येथे विधवा अनाथ महिला आश्रमाची स्थापना कोणी केली ?*   महर्षी धोंडो केशव कर्वे  *३) 'सीएनएस' चे विस्तारित रूप काय ?* चीफ ऑफ नेव्हल स्टाफ *४) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून श्री. मेहरचंद महाजन यांचा कार्यकाल कोणता ?* ४ जाने.१९५४ ते २२ डिसें.१९५४  *५) विधानसभेतील सभासदांची संख्या किती ?* कमीत कमी साठ, जास्तीत जास्त पाचशे *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • सौरभ सावंत, नांदेड • एस. व्ही. माडेवार, धर्माबाद • नितीन शिंदे • रत्नाकर चिखले • राजकुमार काळे, बिलोली • रत्नजित शिवाजी पटारे • धोंडोपंत मानवतकर • नरेश रेड्डी • पांडुरंग बोमले • गंगाधर मरकंटवाड • बालाजी आरेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *गुरू* जगावे कसे वागावे कसे शिकवतो तो गुरू ज्ञान ग्रहणाचा प्रयत्न अखंड असतो सुरू माणूस घडवतो तो खरा शिक्षक असतो संस्कृती संस्काराचा तो म्हणजे रक्षक असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 10* *कबीरा ते नर अन्ध है,* *गुरु को कहते और ।* *हरि रूठे गुरु ठौर है,* *गुरु रुठै नहीं ठौर ॥* अर्थ: महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस गुरुचे जीवनातील महत्व जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे. कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ? मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्‍या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला देणारा नरेंद्राचा विवेकानंंद परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे म्हणावी लागतील. गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक हे ज्ञानरुपी सागरातले ज्ञानहंस आहेत ते सदैव ज्ञानसागरात स्वच्छंदपणे विहार करत असतात. ज्ञानरुपी सागरात समृद्ध जीवन जगण्यासाठी मन, बुद्धी आणि विश्वास विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवून सन्मार्गाला लावणारी एकमेव विश्वासपात्र व्यक्ती म्हणजे शिक्षक. जो आजही समाज मानसन्मान आणि आदरणीय उच्च स्थानी बसवून त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा आदरणीय आणि वंदनीय पूज्य स्थानी फक्त आणि फक्त शिक्षकच आहेत.ज्यांच्याकडून संस्काराचे, चारित्र्यसंपन्न जीवन घडवण्याचे, विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन आणि आदर्श ध्येय समोर ठेवून राष्ट्राच्या उभारणीसाठी पायाभरणीचे कार्य शिक्षकांकडूनच केले जाते. अशा शिक्षकवृंदाना शतशः नमन करून त्यांचा ज्ञानरुपी वारसा सर्वांनी अखंड चालू ठेवायला पाहिजे. ते आपल्या ज्ञानरुपी मंदिरातील देवता आहेत. आजही त्यांचे स्थान शुक्रता-यासारखे अढळ आहे. अशा शिक्षकांना आपल्या जीवनात कधीही अंतर देऊ नये. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚🌸📚🌸📚🌸📚🌸📚🌸 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *अंतर - difference* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *मन निर्मळ तर प्रत्येक गोष्ट निर्मळ* ‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे. तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते. *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 04/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- १८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो. १८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले. १९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला. १९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. १९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला. १९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली. २००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली. २०१३: रघुराम राजन यांनी रिझर्व्हबँक ऑफ इंडियाचे २३वे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला 💥 जन्म :- १२२१: महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी १८२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी १९२३: भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला १९३७: साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा १९४१: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  १९५२: अभिनेता ऋषी कपूर १९६२: यष्टीरक्षक किरण मोरे १९६४: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव १९७१: दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लूसनर 💥 मृत्यू :- धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक डॉ. धर्मवीर भारती २०००: खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुक्री २०१२: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज २०१२: भारतीय गायक-गीतकार हांक सूफी २०१५: भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी डिसोझा *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये भाविकांची व्हॅन 100 मीटर खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये 9 भाविकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गंगोत्री हायवेवर घडली.* --------------------------------------------------- 2⃣ *भारत आणि सायप्रस यांच्यात दोन सामंजस्य करार* ---------------------------------------------------  3⃣ *पाकिस्तान समोरील कर्जाची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान परदेशी अर्थतज्ज्ञांची घेणार मदत* --------------------------------------------------- 4⃣ *सोलापूर : गोकुळाष्टमी निमित्त पंढरपूर येथील पांडुरंगाला पारंपारिक अलंकाराची वेशभूषा, डोक्याला ११० फुटाचे आकर्षक पागोटे, हातात चांदीची काठी* --------------------------------------------------- 5⃣ *जम्मू-काश्मीर- पुलवामातील अनेक गावांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू; दहशतवादी घुसल्याची शक्यता* --------------------------------------------------- 6⃣ *भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करता आली नाही म्हणून इंग्लंडचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने घेतला निवृत्तीचा निर्णय* --------------------------------------------------- 7⃣ *भारत वि. इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव; इंग्लंडचा मालिका विजय; भारतीय खेळाडू १८४ धावांत तंबूत परतले* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= शिक्षक दिनानिमित्त प्रासंगिक लेख *बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका* वरील लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लिक करावे. https://goo.gl/T2FMmb आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन* भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला .  त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1988 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूताणी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.  मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.  1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.  1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.  1957 च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.  13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) 'जंतरमंतर' हे सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ कोठे आहे ?* दिल्ली *२) उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये आढळणारी पाणकोंबडीसारखी कोंबडी कोणती ?* पेलिकल *३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?* गुरू *४) निरनिराळ्या खनिजांनी बनलेल्या टणक, घनस्वरुपातील भूपृष्ठाच्या वरील आणि आतील भागास काय म्हणतात ?* खडक *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= • सुनील अस्वले • मुकेश धर्मले • जयेंद्र कुणे • श्रीपाद वसंत जोशी • संगमेश्वर नळगिरे • सायारेड्डी सामोड • मुकेश पटेल • अस्लम शहा • संतोष पेंडकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *अहंकार* पायातला काटा निघाला की चालायला मजा येते जगायला तेंव्हा मजा जेंव्हा मनातून अहंकार वजा होते अहंकार वजा झाला की जगण्यात मजा आहे अहंकारा सोबत जगलात तर जगणं सजा आहे शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 09*      *साहेब तेरी साहिबी,* *सब घट रही समाय |* *ज्यो मेहंदी के पात में* *लाली राखी न जाय ||* अर्थ : निसर्ग शक्ती अगाध आहे. माणूस कितीही प्रगत झाला तरी निसर्गाविष्कारापुढे थिटा पडतो. पंच महाभुतांना रोखण्याचं सामर्थ्य अद्यापही मानवाला प्राप्त झालेलं नाही. माणूस पक्षागत अंतराळी उडत असला तरी आभाळ दाटल्यावर त्यातून वाट काढणं विमानांना कठीण होतं. धुकं फाकण्याची वाट बघावी लागते. निसर्ग निष्णात जादुगर आहे. इवल्या इवल्पा पंंखावर मखमल पेरून किती नजाकतदार रंगांच्या रांगोळी उमटवतो बरं पंखांवर फुलपाखरांच्या ! या अद्मूत निसर्ग चालक शक्तिलाच तर ईश्वर म्हटलं जातं. जगभर हा ईश्वर विभिन्न नावारूपानं मानल्या जातो. महात्मा कबीर याच शक्तीला साहेब म्हणतात. साहीबी म्हणजे या निसर्ग शक्तीनं सर्व घट म्हणजे सजीवांवर केलेली कारागीरी. त्यांना दिलेले सारखे आकार रंग रूप त्यात भरलेलं चैतन्य. हे सारं अनाकलनीयंच ! या सर्वाठायी तो भरून उरलाय. मेंदीच्या पानाला दिलेला हिरवा रंग. लावण्यापूर्वी दिसणारा तिचा शेवाळारंग हातावर लावला की खुलताना त्यात भरणारी लाली कुठून येते बरं ? ही सारी निसर्ग शक्तीचीच जादुगीरी ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्याप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे एक ध्येय निश्चित केलेले असते. ते ध्येय म्हणजे " जिंकू किंवा मरु..." समोर असलेल्या शत्रूला तोंड दिले तर आपण विजयी होऊ नाहीतर ठरवलेल्या ध्येयापासून थोडेजरी मन डळमळीत झाले तर निश्चित केलेले ध्येय पूर्ण करु शकत नाही. याचा अर्थ असा होतो की,आपण आपल्या ध्येयापासून दूर जात आहोत म्हणजे आपला पराभव निश्चित तर आहेच त्याचबरोबर आपला जीवही गमवावा लागत आहे. आपण आपल्या जीवनात अयशस्वी होत आहोत. त्यामुळे कोणताही जवान ध्येयापासून परावृत होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात जर चांगले ध्येय निश्चित केले तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागा तरच ते ध्येय पूर्ण करु शकाल. नाही तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून दूर राहाल.नाहीतर आपणच आपले गुन्हेगार ठरु शकू. त्यामुळे आपल्या जीवनात नैराश्य तर येईलच आणि आपल्या जीवनात जगण्याला काही अर्थ राहणार नाही असे वाटायला लागेल. आपणच आपले अपराधी आहोत असे वाटायला लागेल. त्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने पुढे आगेकूच करायला लागा.तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.मनाची सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे चालायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच यशस्वी होऊ शकाल यात वादच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *नैराश्य - Depression* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *क्षमा करून सामंजस्यपणाने चूक सुधारणे* काशीला एक विद्वान पंडित रहात असत. त्यांचा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास होता त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे जुन्या-नव्या ग्रंथांचा खूप मोठा संग्रह होता. त्यात एक अत्यंत प्राचीन असा तत्त्वज्ञानावरील दुर्मीळ ग्रंथ होता. पंडितांच्याकडे कधी सल्लामसलतीसाठी तर कधी धार्मिक किवा तात्त्विक चर्चेसाठी अनेक विद्वान पंडित, धर्मगुरु येत असत. एकदा एका धर्मगुरूंनी तो दुर्मीळ ग्रंथ वाचायला म्हणून घेतला आणि जाताना बरोबर नेला. ग्रंथाची चोरी लगेच लक्षात आली. ग्रंथ कोणी नेला हे पंडितांच्या लक्षात आले होते पण त्याबद्दल ते फारसे कोणाशी बोलले नाहीत. तिकडे त्या धर्मगुरूंनी तो ग्रंथ विकायला काढला. तो दुर्मीळ ग्रंथ त्यांनी एका श्रीमंत शेठजींना विकायच्या उद्देशाने दाखविला. पण ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे माहिती करून घेण्यासाठी शेठजी तो ग्रंथ घेऊन त्या पंडितांकडे आले. पंडितांनी तो ग्रंथ पाहिला, ओळखला सुद्धा ! आणि म्हणाले,‘‘ग्रंथ अनमोल आहे.’’ हे ऐकताच शेठजींनी धर्मगुरूंना आपला होकार कळवला. धर्मगुरूंनी शेठजींना विचारले,‘‘तुम्ही हा ग्रंथ कुणाला दाखविलात ?’’ शेठजींनी उत्तर दिले, ‘‘अर्थातच पंडितांना !’’ त्यांचं हे उत्तर ऐकताच धर्मगुरू पंडितांकडे गेले, त्यांचा तो ग्रंथ त्यांना परत करत म्हणाले,‘‘पंडितजी मला क्षमा करा ! मी ग्रंथ चोरला आहे हे माहीत असूनही तुम्ही काहीच बोलला नाहीत. त्यावर पंडितजी हसून म्हणाले,‘‘पश्चातापाची जेव्हा भावना होते त्यावेळेस कोणीच ती चूक पुन्हा करीत नाही. कारण पश्चातापामुळे तो त्या चुकीतून बाहेर पडायला धडपडत असतो. *तात्पर्य – शिक्षेनी नाही तर क्षमा केल्याने चूक सुधारत असते.* *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव. ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

समिक्षा स्वतःच्या आचार विचाराची करावी समिक्षा हीच आहे आपली खरीखुरी परीक्षा 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड (हदगाव)

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/09/2018 वार - सोमवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 💥 ठळक घडामोडी :- ठळक घडामोडी - ३०१: जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले. १७५२: अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला. १९१६: श्रीमती अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगची स्थापना केली. १९३५: सर मॅल्कम कॅम्पबेल ताशी ३०० मैल पेक्षा जास्त जोरात ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ति झाले. १९७१: कतारला स्वातंत्र्य मिळाले 💥 जन्म :- १९२३: प्रख्यात तबलावादक किशन महाराज १९२३: टाको बेल चे संस्थापक ग्लेन बेल १९२३: महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे १९२७: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते अरुण कुमार चटर्जी तथा उत्तम कुमार १९३१: नाटककार श्याम फडके १९३८: नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ रायोजी नोयोरी १९४०: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा १९५६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक जिझु दासगुप्ता १९६५: अमेरिकन अभिनेता चार्ली शीन १९७१: भारतीय-अमेरिकन लेखक किरण देसाई १९७४: भारतीय क्रिकेटपटू राहुल संघवी १९७६: चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय 💥 मृत्यू :- १९५३: तबला, घुमट व सारंगीवादक लक्ष्मण तथा खाप्रुमामा पर्वतकर १९५८: निसर्गकवी माधव केशव काटदरे १९६७: वार्ताहर, संपादक अनंत हरी गद्रे तथा समतानंद २०००: स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर २०१४: भारतीय राजकारणी ए. पी. वेंकटेश्वरन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *वॉशिंग्टनः पाकिस्तानला देण्यात येणारी 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत अमेरिकेने रोखली.* --------------------------------------------------- 2⃣ *सातारा : कोयना धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला असून पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी कोयनेतील विसर्ग वाढणार, सध्या धरणातून ११४८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे* ---------------------------------------------------  3⃣ *उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस, 24 तासांत 16 जणांचा मृत्यू.* --------------------------------------------------- 4⃣ *नवी मुंबई : श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन, केरळमधील पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात* --------------------------------------------------- 5⃣ *भाजपचे कुरुक्षेत्रचे बंडखोर खासदार राजकुमार सैनी यांनी लोकतंत्र सुरक्षा पार्टीची केली घोषणा* --------------------------------------------------- 6⃣ *ठाणे मॅरेथॉन : 21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या रणजीत पटेल पहिला तर कोल्हापूरचा दीपक कुंभार दुसरा तर वेस्टर्न रेल्वेचा संतोष पटेल तिसऱ्या क्रमांकावर* --------------------------------------------------- 7⃣ *Asian Games 2018: 18 व्या आशियाई स्पर्धेचे सूप वाजले, 2022 मध्ये चीनमध्ये भरणार कुंभमेळा* --------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *शिक्षकांचा सन्मानाचा दिवस* https://goo.gl/QyLSzf आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *श्री चक्रधर स्वामी* चक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधी माहिती लीळाचरित्राच्या एकांक या भागात मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला.पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. हरपाळदेवांच्या शरीरात प्रविष्ट होणारा आत्मा स्वतंत्र ईश्वरी आत्मा होता.[२]ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली. या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकर्‍यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकर्‍यांचे पैसे परत केले.[३] या घटनेमुळे हरपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला. गृहत्याग करण्यासाठी हरपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव व भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले व त्यांच्या वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार व सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असतांना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असतांना हरपाळदेव रिद्धपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभु दिसले. गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) गोपाळ हरी देशमुखांनी कोणतं साप्ताहिक सुरू केलं ?* प्रभाकर *२) मेघालय, त्रिपुरा, मणिपूर या नवीन राज्यांची स्थापना कधी झाली ?* २१ जानेवारी १९७२ *३) चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकार्‍यांची हत्या केली ?* रँड आणि आयस्र्ट *४) इंडियन नॅशनल युनियनचे संस्थापक कोण ?* अँलन ह्युम *५) इंडिया गेटची उंची किती ?* ४२ मीटर *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 किरण गायकर 👤 राज कुमारे 👤 प्रदीप पंदिलवाड 👤 भीमराव सोनटक्के 👤 आशिष हातोडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *त्यांना अन् यांना* कष्टक-याच्या घामाला अत्तराचा वास येतो कष्ट करतील तेंव्हा त्यांच्या पोटात घास जातो कष्ट करून खाल्लं तरच त्यांना गोड लागतो घास कुदडुस्तोर खाऊन यांना बसल्या जागी उपवास शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 08* *संगती सो सुख उपजे* *कुसंगति सो दुःख होय |* *कह कबीर तह जाइए* *साधू संग जहा होय ||* अर्थ : मराठीमध्ये एक म्हण आहे.' ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाही तरी गुण लागला.' तद्वत संगतीचे परिणाम दिसत असतात. महात्मा कबीर संगतीचे महत्त्व सांगताना म्हणतात . माणसाने सुसंगती धरली तर जीवन सुकर व आनंदी होते. जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित होवून जगणं उत्साही होतं. जीवनात आनंदाची निर्मिती झाली की समाधानाची आपोआप प्राप्ती होते. हाच तर जीवनाचा खरा उद्देश असतो. कुसंगतीमुळे माणूस वाईट बर्‍या वाईटाचा विचार करणं सोडून देतो. विविध विकारांनी मन दुषित होऊ लागतं. एकदा मन विखारी झालं की वर्तन दुराचारी व्हायला कितीसा अवकाश लागणार बरं ! म्हणतात ना 'मन चिंती ते वैरी न चिंती.' मनंच स्वत:शी प्रतारणा करू लागलं की माणूस स्वत:च्याच नजरेत कमी पडू लागतो. स्वत:च्याच नजरेतून उतरण्याची वेदना सलू लागते. यातून दु:खाची निर्मिती व्हायला लागते. एकदा का माणूस दु:खाच्या आहारी गेला की त्याचा खेळंच खल्लास ! पुन्हा तो उभारी घेणं महत्प्रयासाचंच. महाज्ञानी असूनही कर्ण दुर्योधनाच्या संगतीमुळे अधर्माची बाजू घेवून कायम अवहेलनेचा धनी बणून राहिला तर अर्जुन कृष्ण संगतीत राहून कर्मनिष्ठ होवून धर्मयोद्धा (न्याय धर्म) म्हणून अजरामर झाला. म्हणून माणसानं खर्‍या साधूची पारख करून सत्संगी व्हावं. सुसंगतीत स्वत:ला रमवावं. स्वत:च स्वत:च्या जीवनाला चांगलं घडवावं. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जी व्यक्ती आपल्या जीवनात स्वत:च्या जीवनाकडे सातत्याने नकारात्मक दृष्टीने पाहते ती व्यक्ती कोणतीही प्रगती करु शकत नाही. तो दुस-याकडे त्याचदृष्टीने पाहत असल्यामुळे दुस-यांची होणारी प्रगतीही तो चांगल्या दृष्टीने पाहू शकत नाही. अशी माणसे आपल्या सभोवती असणेही आपल्याला आणि आपल्या जीवनात होणा-या प्रगतीला अडसरच आहे. अशा माणसासमोर चांगले सांगणेही वाईटच असते. अशापासून थोडे सावध असायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *सावध - Cautious* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *ज्याचं काम त्यानीच करावं* एकदा एक राजा आपल्या प्रधानाला बरोबर घेऊन शिकारीला जातो. मधेच थोडेसे ढग गोळा होऊन अंधारल्यासारखे वाटते. राजाबरोबर बराच लवाजमा असतो. पाऊस आला तर सुरक्षित जागा शोधायला हवी म्हणून राजा प्रधानाला विचारतो, ‘‘पाऊस पडेल असे तुम्हाला वाटते का ?’’ प्रधान त्यावर ‘‘काही सांगता येत नाही’’ असे उत्तर देतो. तेवढ्यात समोरून एक गुराखी येत असतो. राजा त्यालाही हा प्रश्न विचारतो. त्यावर गुराखी म्हणतो, ‘‘हो, थोडाच वेळाने पाऊस पडेल.’’ आणि थोडावेळाने खरोखर पाऊस पडतो. ते पाहून राजास प्रधानाचा राग येतो आणि इतके साधे उत्तर देता आले नाही म्हणून त्याचे पद काढून त्या जागी गुराख्याची नेमणूक करतो. काही दिवसांनी शत्रूचे राज्यावर आक्रमण होणार आहे अशी बातमी राजाला हेरांकडून समजते. तो नवीन प्रधानाला म्हणजे गुराख्याला युद्धाची तयारी करा अशी आज्ञा करतो. पण मुळात गुराखी असलेला प्रधान घाबरून ‘‘मला युद्धातले काही कळत नाही. मी काय करणार ?’’ असे राजाला सांगतो. तेव्हा राजाला आपली चूक लक्षात येते आणि तो आपल्या प्रधानाला पुन्हा बोलावून घेतो. :: तात्पर्य – ज्याचं काम त्यानीच करावं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂