*माझा शैक्षणिक व सामाजिक कार्यप्रणालीवरील लेख* नोकरी म्हणून शिक्षकाचा पेशा करणारे अनेक जण असतात. पण हा शिक्षकी पेशा सांभाळताना अनेक उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेणारे तसे कमीच असतात. अश्या कमी पण उत्साही लोकांमध्ये माझी ओळख माझ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याने निर्माण झालेली आहे.मी श्रीमती प्रमिलाताई कुंडलिक सेनकुडे उपक्रमशील शिक्षिका म्हणून माझा शिक्षण क्षेत्रात समावेश आहे . मी सध्या जिल्हा नांदेड तालुका हदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव येथे सहशिक्षिका म्हणून बदलीने नव्यानेच रुजू झाली. माझ्या सेवेला सध्या सतरा वर्ष पूर्ण होत आहे. मी सुरुवातीला भानेगाव केंद्र शाळेवर अकरा वर्ष कार्य केले. त्यानंतर मी वाटेगाव व आताच्या गोजेगाव येथील शाळेत कार्य करीत आहे. मी शैक्षणिक क्षेत्रात सतत नाविन्यपूर्ण विविध उपक्रम, राबवित आहे.हे उपक्रम माझ्या ब्लॉगला उपलब्धीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात माझे उल्लेखनीय कार्य म्हणजे नागपूर येथील शिक्षणाची वारी या शैक्षणिक प्रदर्शनात महाराष्ट्रातील शिक्षकांना उद्बोधन करण्याचे कार्य म्हणून स्टाॕल सहकारी म्हणून सक्रिय सहभाग, मातृभाषा सुलभक म्हणून विभागीय स्तरावर औरंगाबाद येथे प्रशिक्षण,व तालुका स्तरावर सुलभक म्हणून कार्य केले. विविध ठिकाणी अभ्यासदौरा, विद्यार्थ्यांची लेझीम स्पर्धा मी व शाळेतील सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आयोजित करणे व आम्ही बक्षीस मिळवलेे, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, सहली ,क्षेत्रभेटी, पल्स पोलिओ, वृक्षारोपण, तालुकास्तरीय, जिल्हा विज्ञान प्रदर्शन कला महोत्सव सहभागी होणे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत मी आयोजित कार्यशाळेत सक्रिय सहभाग नोंदविला. सहशालेय विविध उपक्रम वाचन प्रेरणा दिन, संविधान दिन, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी शाळेत साजरी करणे, तसेच खेळ व क्रीडा स्पर्धेत हिरीरीने कार्य करून विद्यार्थ्यांची प्रगती तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास साधने हेच ध्येय मी कायमस्वरूपी मनी ठेवून कार्य करीत असते.फ्रेश मॉर्निंग बुलेटीन(whatsgroup) फ्रेश शालेय परिपाठ दलित वाणी ह्या वृत्तपत्राचा माध्यमातून माझे दैनिक सदर बोधकथा हा संकलित उपक्रम असतो. तसेच माझ्या स्वलिखित रचित कविता चारोळी छोटे छोटे विचारनीय लेख , मी राबविलेले शैक्षणिक नाविण्यपूर्ण विविध उपक्रम संकलित शैक्षणिक उपयुक्त माहिती माझ्या शैक्षणिक ब्लॉगला उपलब्ध आहेत. माझी वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांना मदत असते.तसेच अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईच्या पुण्यस्मरणार्थ आर्थिक मदत करीत असते.त्याचप्रमाणे डिजिटल शाळा करण्यासाठी दरवर्षी माझा (वार्षिक उपक्रम) 10 हजार रुपये योगदान करणे हा आहे. तसेच भव्य लेझीम स्पर्धा कवाना येथे आयोजित आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ सावली मंडप जाहीर केला व त्याचे पालन कायमस्वरूपी मी करणार आहे. रोटरी क्लब हदगाव च्या सदस्या म्हणून मी त्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात सहभागी असते . तसेच मी एका विद्यार्थ्यांचा सनः 2002पासून कायमस्वरूपी शैक्षणिक खर्च उचलला आहे . याशिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक महिला आघाडी च्या शिक्षक संघटनेच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी मी कार्य करते. माझा शैक्षणिक व तंत्रज्ञानात्मक उत्कृष्ट वाटचालीमुळे मला विविध सामाजिक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. तसेच ठिकठिकाणी सत्कार झालेले आहेत. माझी ओळख शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रमात भाग घेणाऱ्या शिक्षिका म्हणून रुजली आहे आणि मी माझे हे कार्य अविरत अखंडपणे उत्साहाने असेच करीत राहील. असे आपणांस ग्वाही देते. शेवटी आपणास एकच सांगू इच्छिते *'सत्कारासाठी काम करु नये सत्कार्यासाठी कार्य करावे'* बाल चिमुकल्यांचा आशीर्वाद घेणे. त्यांना देशाचे उत्तम नागरिक व उज्वल भविष्य घडविण्याचे तनमनधनाने कार्य करणे, हेच ध्येय मनी ठेवूनी जीवनात बालकांचा आशीर्वाद घेण्याचे कार्य मला व तुम्हां सर्वांना बळ मिळो हीच सदोदित मनोकामना ठेवते. दिनांकः १२-०९-२०१८ *"अगर चाहते हो खुदा मिले* *तो वही करो जिससे दुआ मिले."* 〰〰〰〰〰〰 *माझा सर्व शुभचिंतक व हितचिंतकाचे मनःपूर्वक धन्यवाद.* 🙏 🙏🙏🙏🙏 〰〰〰〰〰〰 ©✍श्रीमती प्रमिलाताई कुंडलीक सेनकुडे (सह.शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड. फोन.नंबर- 📞9403046894. 〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment