✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 25/09/2018 वार - मंगळवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक हृदय दिन.*           💥 जन्म :- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी. १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री. 💥 मृत्यू :- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक. २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - १३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण केल्याने २०२ मंडळावर गुन्हा दाखल* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : भाजपाचे अरुण अडसड यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आठ जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यभरातील प्राध्यापक आजपासून बेमुदत संपावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली: फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व उपाध्यक्षपदी अजित मोहन यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अनुजा पाटीलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत चौथ्या सामन्यात सोमवारी श्रीलंका महिला संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *नो मोबाईल डे* असा ही एक दिवस साजरा करावा लागेल की काय ? अशी भीती सध्या वाटत आहे. तेंव्हा मित्रांनो हा लेख नाईलाजास्तव आपणांस मोबाईलवरच वाचावे लागेल. https://goo.gl/ygcSP3 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *बाळकृष्ण हरी कोल्हटकर* बाळकृष्ण हरी कोल्हटकर, ऊर्फ बाळ कोल्हटकर, हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते. यांनी लिहिलेल्या दुरितांचे तिमिर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसे, एखाद्याचे नशीब इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले. तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत यांनी ३०हून अधिक नाटके लिहिली. कोल्हटकरांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी प्रथमच जोहार  नावाचे नाटक लिहिले. इ.स. १९४७ सालापर्यंत त्यांनी रेल्वेत नोकरी केली. मात्र त्यानंतर पेशाच्या बाबत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले. काही प्रसंगी खायची पंचाईत अनुभवलेल्या कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम चालूच ठेवले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 =========ஜ۩۞۩ஜ========= काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बर्‍या होतात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ =========ஜ۩۞۩ஜ========= *१) आवाजलहरी निर्माण करणारं यंत्र कोणतं ?*  फोनोग्राफ *२) 'नॅशनल हेरॉल्ड' या वृत्तपत्राचं प्रकाशन स्थळ कोणतं ?* दिल्ली *३) उंचीवरुन जमिनीवर अलगद उतरवणारं साधन कोणतं ?* पॅराशूट *४) ज्या पिकापासून तेल काढतात त्यांना काय म्हणतात ?* गळिताची धान्ये *५) १९७४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित झाल्या होत्या ?* तेहरान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= ● तसनीम पटेल ● रामकृष्ण अंगरोड ● महेंद्रकुमार कुदाळे ● योगेश धनेवार ● सुयश पेटेकर ● शिवशंकर नर्तावर ● संघरत्न लोखंडे ● श्यामसुंदर मोकमोड ● सय्यद जाफर ● कमलकिशोर कांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] =========ஜ۩۞۩ஜ=========   *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  =========ஜ۩۞۩ஜ========= *चिंता* आज प्रत्येकाला चिंता आहे रूपाची पण चिंता करावी ती खरी स्वरूपाची वरवर दिसते ते नश्वर रूप असते माणसाच्या मनात खरे स्वरूप असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ=========         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 =========ஜ۩۞۩ஜ=========     *क्रमांक 24* *कबीर घोडा प्रेम का* *चेतनी चढ़ी अवसार |* *ज्ञान खडग गहि काल सीरी* *भली मचाई मार ||* अर्थ विवेकाने वागणार्‍याला सर्वांच्या हृदयी स्थान भेटतं. विवेकानं वागणारा विचाराशी बांधील असतो. तो अविचारानं वागत नाही. अंधश्रद्धा व निरर्थक रुढी परंपरामध्ये स्वतःला गुरफटून घेत नाही. त्याच्या ठायी सर्वाप्रति प्रेमळपणा व आपुलकी असते. चैतन्यशीलता व प्रसन्नता हा विवेकी माणसाचा स्थायी स्वभाव असतो. त्याच्या बळावर तो यशारूढ होतो. ज्ञानामुळे मानसाचे भ्रम नाहिसे होतात. सत्य व वास्तवाचे भान येते. अज्ञानामुळे जीवन अंधःकारमय बनते. अज्ञानी मनुष्य पशुसमान जीवन जगत असतो. साधनेच्या जोरावर माणसाला ज्ञानरूपी तलवार प्राप्त होत असते. ही अज्ञानाच्या चिंधड्या करण्यासाठीव मृत्यू बणून समोर उभी टाकते. अज्ञानावर वार करून ज्ञानाला विजय मिळवून देते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= ज्ञानाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या अनुभवास बळकटी मिळते आणि नवी दिशा मिळते तर त्याच ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात अंगीकारला तर चांगले समृद्ध जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळते. ज्ञान हे कधीही माणसाला जीवनात आलेले नैराश्य दूर करुन सुख,समृद्ध जीवन जगण्याचा पायाही मजबूत करतो.म्हणून सदैव माणसाने ज्ञानी माणसांच्या, सज्जनांच्या सहवासात राहून आपले ज्ञान वृद्धिंगत करायला हवे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 =========ஜ۩۞۩ஜ=========   *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपूर्ण - Perfect* =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *परिपूर्णता / निपूणता* एक मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो, मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ? फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे. मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना. फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे. मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन. फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात). तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर... मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ? मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते. तात्पर्य :- आपल्यावर समोरच्या किती विश्वास आहे आणि आपण त्या कामात निपूण आहोत का नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड. http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 =========ஜ۩۞۩ஜ========= आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  =========ஜ۩۞۩ஜ========= ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment