✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९४८-गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना. १९६१- अमेरिकेत शांतीदलाची स्थापना १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले. १९९८-एकूण १अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला. 💥 जन्म :- १९३०-उद्योगपती राम प्रसाद गोयंका १९४२-रिचर्ड्स मायर्स,अमेरिकन सेनापती १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८९-वसंतदादा पाटील,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री १९९१-एडविन लँड, अमेरिकन संशोधक २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची आज सुटका करणार - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात १०,००१ जागा भरण्यासंदर्भात पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आल्याने मुंबईतही सर्व महत्त्वपूर्ण स्थळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *दिल्ली- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनच्या परिषदेसाठी यूएईला रवाना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आजपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ, मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 50 हजाराने कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी अधिवेशन स्थगित करत आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : मुंबईचे बिरु बिंद, प्रथमेश नाडकर, मृणाल झारेकर अंतिम फेरीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीक्षार्थीना शुभेच्छा.....!* https://b.sharechat.com/aivK3qKgGU स्तंभलेखक नासा येवतीकर •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *गौरी देशपांडे* गौरी देशपांडे यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला.  या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवाद सुद्धा प्रकाशित झाले आहेत. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे काका. गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते. दिनांक ०१ मार्च २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ?* मा.रामनाथ कोविद 2) *भारतातील एकूण राज्य किती ?* 29 राज्य 3) *भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?* राजस्थान 4) *भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?* गोवा 5) *भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?* मा.वैंकैय्या नायडू *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  अमोल अलगुडे •  साहेबराव बोणे •  राहुल मॅडमवार •  राजेश्वर बालकोंडवार •  संतोष चिद्रावार •  प्रभाकर गोरे •  आशा तेलंगे •  विक्रम अडसूळ •  नरेश बकवाड •  साहेबराव गुंजाळ •  साईप्रसाद ढेले •  सखाराम देवरे •  नरेश सुरकूटवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कानकोंडे* चांगल्याला चांगले वाईटाला वाईट भेटतात लुबाडलेली सारे आपसात वाटतात वाटून खाल्ले की दोघेही कानकोंडे होतात एकमेक पुढे शेपटी खाली घालून राहतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.* *अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     पर नारी पैनी छुरी,  मति कौई करो प्रसंग रावन के दश शीश गये, पर नारी के संग। सारांश       पर नारी तीक्ष्ण धार असणार्‍या सुरीसारखी असते. तिच्या सोबत संगती करता कामा नये. तिच्या सोबत संग करणे तर  दुरच राहिले. परनारीचा मनात निर्माण विचारही माणसाची शांती व समाधान हिरावून घेतो. आमचं लोकबोलीचं धन म्हणजे संस्काराचा ठेवाच आहे. जात्यावरच्या ओव्या मधून सुद्धा संस्काराचं दर्शन घडतं. घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा पराया नारीसाठी रहातो वळचणीला उभा ।        पोथी पुराणांमधून परनारीचा मोह बाळगणार्‍यांची काय अवस्था होते, याचे दाखले  वाचायला मिळतात. महारती लंकाधीश राजा रावनाने मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी असताना परनारीचा मोह केला. सीता पळवून नेली गेली. सीतेचा शोध घेताना क्रोधीत हनुमानाकडून लंका दहन केली जाणे, राजा रावणाचीच दाडी जाळली जाणे. यातूनही सावध न होण्यामुळे  रामायण घडले . क्षुल्लक कुंभकर्णासारखा बलशाली भाऊ, इंद्रजितासारखा कुशल मुलगा मारल्या गेला. मोहापायी राज्य बुडालं सेना मारल्या गेली. रावणाची दहाही शीरं उडवल्या गेली. परनारीच्या नादात अख्ख्पा साम्राज्याचा विनाश झाला.  तिथं सामान्य माणसाचं काय होईल ? याची कल्पनाच न केलेली बरी.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• भवाच्या भये काय भीतोस लंडी। धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरीं। नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *विस्टन चर्चिल* लहानपणी विन्स्टन एकदा विहिरीत पडला. त्याने ‘वाचवा वाचवा’ असा धावा केला. एका शेतकर्‍याने त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. एका अपघातातून आपण वाचलो म्हणून त्याने नि:श्‍वास तर टाकला, पण त्याला विहिरीतील जीव वाचवण्यासाठीची धडपड सदैव लक्षात राहिली. आयुष्यभर यशाशी संघर्ष करताना वडिलांनी शिकवलेले तत्त्व आठवायचे. त्या वेळेस विन्स्टनने मनोमन आपल्या वडिलांचे आभार मानले, कारण त्याच्या वडिलांनी त्याला एक अविरत प्रयत्न करण्याचे व कधीही माघार न घेण्याचे तत्त्व शिकवले होते. ते त्याला नेहमी आपल्या राजवाड्यासमोरील राजहंस दाखवायचे आणि म्हणायचे- ‘‘हा राजहंस पाण्यावर शांतपणे तरंगताना दिसतो. पण तेव्हाच तो पाण्याखाली तितक्याच जलद गतीने पायांची हालचाल करत असतो. लोकांना वरवर शांत दिसणारा राजहंस पाण्याखाली एखाद्या यंत्राप्रमाणे झपाटल्यासारखा काम करतो. तूही असाच झंझावात हो. जनसमुदायाला तू वरून जरी शांत दिसलास तरी त्यांच्या अपरोक्ष वादळासारखं काम करत राहा. आतून पेटून ऊठ आणि कार्याला लाग.’’  पुढे जीवनात अविरत काम करण्याचे तत्त्व बाळगल्यामुळे विन्स्टन चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान झाले. एकदा त्यांना ऑक्सफर्ड विद्यापिठात पदवीप्रदान सोहळ्यासाठी निमंत्रित केले होते. जेव्हा त्यांना व्यासपिठावर भाषणासाठी बोलावले तेव्हा ते त्या जनसमुदायासमोर ३० सेकंद नि:शब्द उभे राहिले. सभागृहात एकच शांतता पसरली. नेहमी उत्कृष्ट भाषण देणारे व्यक्तिमत्त्व बोलत का नाही, असा प्रश्‍न सर्वांना पडला. तितक्यात विन्स्टन चर्चिलच्या तोंडातून शब्द बाहेर पडले- ‘‘माघार घेऊ नका. कधीही माघार घेऊ नका.’’ त्यांनी भाषणाला सुरुवात करताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ते पुन्हा ३० सेकंदांसाठी नि:शब्द झाले आणि पुन्हा उद्गारले- ‘‘माघार घेऊ नका, कधीही माघार घेऊ नका.’’ क्षणभर त्यांनी सर्व प्रेक्षकांवर एक कटाक्ष टाकला. सर्वांशी ते नजरेने बोलले आणि धन्यवाद म्हणून त्यांनी व्यासपीठ सोडले. लोकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले आणि एका महान नेत्याचे सर्वात लहान, पण अत्यंत प्रभावी भाषण म्हणून या भाषणाचा उल्लेख केला जातो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/02/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय विज्ञान दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. 💥 जन्म :- १९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत  १९४७ - दिग्विजय सिंघ १९४७ - विजय बहुगुणा १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक १९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू 💥 मृत्यू :- १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू १९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद २००६- ओवेन चेंबेरलेन ,नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाबद्दल ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केली चिंता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तामधील तणावामुळे दोन्ही देशांच्या हवाई हद्दीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक झाली प्रभावीत* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *नवी दिल्ली - भारताचा एक पायलट पाकिस्तानच्या ताब्यात, भारताने पाकिस्तानला दिले पुलवामा हल्ल्याचे पुरावे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक : औरंगाबाद येथील पोलीस अधीक्षक आरती सिंग यांची नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अहमदनगर : गावात दारूमुळे असुरक्षिततेची भावना आहे. गावे स्वच्छ व पाणीदार होतील. पण गावे संस्कारक्षम होण्याची गरज - पोपटराव पवार यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *१९ हजार कोटी तुटीचा राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केलेसादर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात सात विकेट्स राखून मिळविला विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मतदार जागृती आवश्यक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *राष्ट्रीय विज्ञान दिवस*      नोबेल पारितोषिक हा जगातला सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सी. व्ही. रामन हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन असं होतं. १९३० मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये त्यांना लेनिन शांतता हा पुरस्कारही देण्यात आला होता. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे सात नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचं शिक्षण चेन्नईला झालं. १९१७ ते १९३३ पर्यंत त्यांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जितके निरीक्षण सुक्ष्म, तितकी समजूत अधिक, म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) भारताची राजधानी कोणती ?*       दिल्ली *2) भारताची आर्थिक राजधानी कोणती ?*       मुंबई *3) भारताचे पंतप्रधान कोण आहेत ?*        नरेंद्र मोदी *4) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?*       पं. जवाहरलाल नेहरू *5) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?*       डॉ. राजेंद्र प्रसाद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  साईनाथ सुरेश येवतीकर •  राजेश्वर भंडारे •  आनंद आनेमवाड •  मारुती पाटील •  प्रशांत चिखलीकर •  शंकर गर्दसवार •  श्रीकांत आदमवाड •  निर्मला सोनी •  मुरलीधर राजूरकर •  संदीप नागला •  अशोक होवाल •  मारोती पाटील •  सुनील कोल्हे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जशास तसे इट का जवाब पत्थर आहे जशास तसे चोख उत्तर आहे ही वेळच आहे जशास तसे उत्तर देण्याची गरज नाही कोणापुढे आता नतमस्तक होण्याची   शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन हे सुखदु:खाच्या वाटेवरूनच पुढे जात असतं. जीवन पटाचं वस्त्र सुख दु:खाच्या धाग्यांनी तयार होत असतं. ते सुंदर जरतारी व्हावं, असं वाटणं स्वभावधर्मच आहे. दु:खाचा सल जाणवल्याशिवाय सुखाचं मोल कळत नाही. तरूणपणी स्वत:च्या सौंदर्याची जाण झाल्यामुळे आपण तारूण्याच्या धुंदीत सौंदर्याचा, सुखाचा आनंद उपभोगतो.* *हे सुख शाश्वत नसतं. वय आपलं काम करतच असतं. जीवनाचं अखेरचं पर्व, वृद्धावस्था सुरू झाली की, या गोष्टीत आनंद मिळत नाही. आपल्या मायेच्या  माणसांनी प्रेमाचं, आपुलकीचं वस्त्र आपल्या अंगावर घालावं असं वाटतं. अशा त-हेने बालपण, तरूणपण व वृद्धावस्था हे जीवनपटाचं तीन अंकी वस्त्र विणलं जातं. आपल्या वाटेला येणारं सुखदु:खाचं वस्त्र जरतारी मानून जीवन व्यतीत करणं हेच आपल्या हातात असतं.*             ••●‼  *रामकृष्णहरी*  ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दूजा हैं तो बोलिये,  दूजा झगड़ा सोहि दो अंधों के नाच मे,  का पै काको मोहि। सारांश         विधाता निर्गुण  निराकार आहे. तो सर्व विश्व व्यापून उरलेला आहे. तरी त्याची विभिन्न मुर्त रूपे उभी करून एकमेकात  विनाकारणंच भांडून घेणार्‍यास उद्देशून महात्मा कबीर म्हणतात परमात्मा वेगवेगळा असता तर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं. माझाच देव श्रेष्ठ आहे व इत्तरांचा चुकीचा आहे असे माणण्यातच तर भांडणाचं मुळ दडलेलं आहे. तेच  भांडणाला कारण ठरतं. दोन अंधांच्या नाचण्यावर कोण अांधळा कोणत्या कारणाने  त्या अंधावर मुग्ध किवा  प्रसन्न होईल ?       लिळाचरित्रात आंधळ्यांचा दृष्टांत सांगितलेला आहे. एका गावात सहा आंधळे असतात. त्यागावी एक हत्ती येतो. आंधळ्यांना हत्ती पाहाता येत नाही. प्रत्येक आंधळा आपआपल्या परीने हत्तीला चाचपून घेतो. त्यांना झालेल्या स्पर्श ज्ञानावरून ते हत्तीच्या रूपाचं वर्णन करायला लागतात. ज्याच्या हाती कान लागला, तो हत्ती सुपासारखा असल्याचे सांगतो. ज्याने सोंड चाचपली, तो हत्ती मुसळासारखा आहे म्हणतो. ज्याने पाय चाचपले, तो हत्ती खांबासारखा असल्याचे सांगतो. ज्याचा स्पर्श हत्तीच्या पोटाला झाला, त्याचे म्हणणे असते हत्ती पोत्यासारखा आहे. ज्याने पाठ चाचपून घेतली, तो हत्ती भिंतीसारखा असल्याचे सांगतो. ज्याने शेपटीला स्पर्शलेले असते, त्याला हत्ती खराटा म्हणजे झाडूसारखा भासतो. शेजारीच त्यांचा संवाद ऐकणारा एक डोळस असतो. त्याने पूर्ण हत्ती पाहिलेला असतो. तो संवाद ऐकून म्हणतो, तुम्ही तर फक्त हत्तीच्या अवयवांनाच हत्ती समजत आहात . प्रत्यक्षात हत्ती तर महाकाय आहे.        तसं विधात्याचं स्वरूपही विश्वात्मक आहे.तो सर्वव्यापी आहे. त्याला जाणण्याची आत्मदृष्टी जवळ असायला हवी. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• देहेरक्षणाकारणें यत्न केला। परी शेवटीं काळ घेउन गेला॥ करीं रे मना भक्ति या राघवाची। पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥२६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *गरुड व घुबड* एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, 'मित्रा ! परंतु, माझी पिल्लं कशी आहेत ते तुला माहित आहे का ? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.' गरुड म्हणाला, 'माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसं, आवाज सगळंच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता ?' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, 'किती घाणेरडी आणि कुरूप पिल्लं आहेत ही. घुबडाची पिल्लं तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्लं नसणार. यांना मारून टाकावं. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला. नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, 'मित्रा, तूच माझी पिल्लं खाल्लीस.' गरुड म्हणाला, ' हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्लं खूप सुंदर आहेत. मला वाटलं ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक ? तात्पर्य - स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*थोरवी माय मराठीची* 📚📚📚📚📚📚 माय मराठीचा महिमा आहे अपार माय मराठी तुझ्यातच आहे जीवनाचे सारं माय मराठीचा बोलीत आहे किती गोडी शब्दाशब्दात दडली आत्मसन्मानाची गुढी माय मराठीने दिला थोरामोठ्यांना मान इथले सैनिक देतात देशासाठी हो प्राण राबराब राबून बळीराजा करतो जीवाचे रान इथेच दिला जातो आईवडिलास मान नामदेव माऊली तुकोबां जनाई यांची अभंगवाणी संभाजी शिवरायांचे पोवाडे इथेच गुंजती शूर वीरांची गाणी अनेक भिन्न रूपे तुझी चांदया पासून बांदया पर्यंत बदलती ही बोली खेड्या पासून शहरापर्यंत मातृभाषेचा घेऊनी ध्यास जागवूया मनामनात आत्मविश्वास मातृभाषेचा करूया विकास हाच एक ध्यास अन् हीच मनी असे आस कितीकिती गाऊ मी माय मराठीचे गुणगाण माय मराठीच आहे शान हाच आहे सार्थ अभिमान अनेक अलंकाराणी सजविले तुला समृध्द व्याकरणी सुंदर अलंकृत तुज सम नाही दुसरी भाषा कुणी माय मराठीचा साहित्यास नाही जगात हो तोड कितीही शोधले तरी नाही दुसरी या परी जोड अमृताहूनी गोड असे माय मराठी आमुची तुझ्याच परंपरेची, संस्कृतीची गाऊ गाणी सह्याद्रीची आकाशाचा करुनी कागद सागराची करूनही शाई माय मराठी तुझी थोरवी लिहण्यास पुरत नाही. *जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा* 💐💐📚📚💐💐 *〰〰〰〰〰〰* *✍ ©प्रमिला सेनकुडे* ता.हदगाव जिल्हा नांदेड *〰〰〰〰〰〰〰*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक मराठी राजभाषा दिन* 💥 ठळक घडामोडी :- *जागतिक नाट्य दिन* २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले. 💥 जन्म :- १९१२ - कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार. वि. वा. शिरवाडकर 💥 मृत्यू :- १८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. १९५६-भारतीय वकील व राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाकिस्तान विरोधात भारताची मोठी कारवाई, सैन्याने 1000 किलोचा बॉम्ब फेकला, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, भारतीय हवाई दलाची कामगिरी; सुत्रांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हजबूल या दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलं तब्बल 21 मिनिटे भारतीय हवाई दलाकडून बॉम्बचा वर्षाव* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *भारत हा मजबूत देश आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आझाद मैदान येथे गाजर दाखवा आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आता मतदान केल्याची खातरजमा करणे शक्य, ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशिनची सोय : निवडणूक आयोगाकडून व्यवस्थेची पाहणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कर्णबधिर विद्यार्थ्यांचा आक्रोश अखेर सरकारला ऐकू आला!, पुण्यात झालेल्या लाठीमाराच्या चौकशीचे आदेश : काही मागण्यांची केली पूर्तता, नोकरीतही प्राधान्य देणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बेंगळुरू : आज आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत मालिका बरोबरीत सोडविण्याच्या निर्धाराने उतरेल. भारतीय संघ दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक मराठी राजभाषा दिवस *मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_26.html वरील लिंक वर लेख वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       वि. वा. शिरवाडकर* विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य  कवी,  लेखक,  नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतीकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.       *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जशी रत्ने बाहेरुन चमक दाखवितात, तशी पुस्तके ही आतून अंतःकरण उजळवितात. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) महाराष्ट्राचा राज्यफुल कोणता ?*        ताम्हण *2) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?*        पुणे *3) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?*        कोल्हापूर *4) महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती ?*       6 *5) भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते ?*       मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  श्यामल पाटील •  गंगाधर मुटे •  साई पांचाळ •  साईनाथ मिरदोडे •  राजेश सब्बनवार •  उत्तम गवळे •  सोनाली सुरज मद्दलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लबाडाची मैत्री* स्वार्थासाठी लबाड लबाडांशी मैत्री करतात गरज पडेल तोवर एकमेकाचे पाय धरतात गरज संपली की एकमेकांचे पाय ओढू लागतात स्वार्थ संपताच छोट्या-मोठ्या कुरापती काढतात   शरद ठाकर सेलू जि परभणी दि.१८:०२:२०१९ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?* *आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?* *"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     आतम अनुभव जब भयो, तब नहि हर्श विशाद चितरा दीप सम ह्बै रहै, तजि करि बाद-विवाद। सारांश      जेव्हा हृदयात परमात्म्याची अनुभूती होते तेव्हा सर्व सुख-दु:ख विषयक वाद आपोआप नाहीसे होतात. सुख आणि दु:ख हे केवळ मानवी मनाचे खेळ आहेत. मानवी मनाच्या प्रवृत्तीनुसार सुख- दु:खाच्या भावना निर्माण होत असतात. माणसाचे मन शांत व स्थिर असेल तर समाधानाची भावना वाढीस लागते. मनाची बेचैनी अस्थिरता निर्माण करते. मन शांती नाहीशी होते. व त्यातून आपल्याकडे काहीतरी नसल्याची मनाला टोचणी लागते. ही अवस्था म्हणजेच दु:ख. स्थिर मनोवस्थेतला माणूस अर्धवट अवस्थेतल्या प्याल्याकडे अर्धा भरलेला आहे म्हणून सकारात्मकतेने पाहतो. त्याला त्यात समाधानाची प्राप्ती होते. उर्वरित अर्धा प्याला भरण्यासाठी तो आनंदाने सामोरा जातो. ही समाधानावस्था जगणं सुसह्य करते. याउलट असमाधानी माणूस हावरटासारखा त्या प्याल्याकडे अर्धा रिकामा असल्याची खंत मनी घेवून मनाला आणखी अस्थिर करून टाकतो. त्याचा अधाशी दृष्टीकोनच त्याच्या जगण्यातील आनंद नाहिसा करतो. जीवनाकडे उदासीनतेने पाहिले की नैराश्य पदरी पडतं. सुख आणि दु:ख जीवन मार्गातले चढ उतार आहेत. उल्हसित मनानं पुढं सरकत राहिलं की ती लिलय्या पार होतात. ही अनुभूती घेवून पुढं जाता आलं पाहिजे. स्वत:च्या ठायी असणारा ठाम आत्मविश्वासंच आपल्या जगण्याला सुंदर आकार देत असतो.       आत्मविश्वास असणार्‍या माणसाचं जीवन नंदा दीपासारखं अखंडितपणे  तेवतं असतं. विधायक वृत्ती अंगिकारली की त्याचे जीवन विषयक विचार सत्याला नाकारत नाहीत.  मनाची दोलायमान अवस्था नाहिशी होवून जाते. सत्य, शिव, व सुंदराची अनुभूती येवू लागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥ सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांही न राहे॥२५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *विश्वासाचा सुगंध* चित्तरंजन हे अतिशय हुशार परंतु कट्टर नास्तिक गृहस्थ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत. म्हणूनच सहदेव महाराजांच्या कीर्तनाला त्यांना आलेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सहदेव महाराज तर धर्माची, ईश्वराच्या अस्तित्वाची महती सांगणारे. आणि अशा धार्मिक विषयाशी संबंधित कार्यक्रमाला चित्तरंजन कसे काय आले ? हे कसे काय शक्य आहे ? म्हणून सर्वत्र मित्र काहीसे अचंबितच झाले. त्यांच्यापैकी एकाला न राहवल्याने त्याने अखेर चित्तरंजन यांना विचारलेच, '' भक्तिमार्गाची प्रवचने, कीर्तने ऐकायला जाणे आपल्याला पटते का ? आपल्या तत्त्वात ते बसते का ? नसेल तर आज येथे येण्याचे कारण काय ?'' चित्तरंजन म्हणाले, '' त्याचे असे आहे की, सहदेव महाराज आपल्या प्रवचनात जे सांगतात, त्यावर माझा मुळीच विश्वास नाही. परंतु आपण जे जे बोलतो, त्यावर महाराजांचा दृढ विश्वास आहे. आणि ज्याचा स्वतःच्या बोलण्यावर दृढ विश्वास आहे, अशा व्यक्तीचे बोलणे समजून घ्यायला मला आवडते.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विनायक दामोदर सावरकर पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- २००१- तालिबान ने बमयन (अफगाणिस्तान) येथे दोन विशाल बुद्ध प्रतिमांना विस्फोटकाद्वारे नष्ट केले. २०१०- अफगाणिस्तान येथील आतंकवादी हल्ल्यात ९ भारतीय नागरिक मारले गेले. 💥 जन्म :- १९०८-लीला मुजुमदार ,बांग्ला साहित्यकार. १९२८-एरियल शेरॉन, इसरायली प्रधानमंत्री. १९८२- ना ली ,महिला टेनिस खेळाडू. 💥 मृत्यू :- १९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि. २००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *50 वर्षांसाठी देशातील 5 मोठ्या विमानतळांचं कंत्राट अदानी समूहाला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *91 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा; रेजिना किंगला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *मुंबई - देशातील पहिले पोलीस साहित्य संमेलन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या दिमाखात पार पडले. जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी पोलिसांचे केले कौतुक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे- मूकबधिरांवरील लाठीमार प्रकरणी उद्यापर्यंत अहवाल सादर करा; मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकला बदली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची करण्यात आली निवड, भारताच्या कर्णधारपदी महाराष्ट्राच्या स्मृती मानधाचे नाव घोषित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/09.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *शंकरराव चव्हाण*           डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म शेतकरी कुटूंबात पैठण येथे झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. 1952 च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (1956), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यानी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री महणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे 1975 मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व गोविंद श्रॉफ यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?*       नागपूर *2) 'विद्येचे माहेरघर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?*       पुणे *3) महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ?*       720 Km *4) महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य किती ?*       288 *5) महाराष्ट्रात एकूण विधानपरिषद सदस्य किती ?*        78 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा, जि. गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • नारायण मुदगलवाड • घनश्याम बोऱ्हाडे • निलेश जोंधळे • विलासराज भद्रे • प्रदीप तळणीकर • योगेश दरबस्तेवार • शैलेश फडसे • शंकर पवार • कपिल मनूरकर • अरुण टिरके *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       आदर जो लोकांची कधीच कदर करत नाही त्याचा जगात कोणी आदर करत नाही दुसऱ्याचा आदर करतो त्याला आदर मिळतो दुसऱ्याविषयी आदर नाही त्याची कोण कदर करतो   शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      प्रेमभाव  एक  चाहिए , भेष  अनेक  बनाय  | चाहे  घर  में  वास  कर , चाहे  बन  को  जाए  ||   अर्थ        मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे॥२४॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *खंबीरतेने जगणे* (दोन मित्रातील संवाद) कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या समोर टाकलेले कोडे ...... मित्राला विचारचक्रात अडकवुन स्वतः मात्र पसार झाला. मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही. दुसऱ्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला “काय सापडले काय उत्तर?” मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या. मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली. मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते." खंबिरपणे उभे राहा. जग तुमचे काही बिघडवू शकत नाही. "ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच जगात किंमत आहे." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- २००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली. 💥 जन्म :- १८९४ - मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ. १९४८ - डॅनी डेंझोग्पा, हिंदी चित्रपटअभिनेता. १९७४- दिव्या भारती चित्रपट अभिनेत्री १९८१ - शाहिद कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता. 💥 मृत्यू :- १८८६- नर्मद ( नर्मदा शंकर दवे)    गुजराती कवी,विद्वान *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सर्वसामान्यांना दिलासा; बांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया जाहीर वेळापत्रकानुसार सुरु करण्यास शिक्षण विभागाला अपयश, 25 फेब्रुवारी ऐवजी 05 मार्च पासून प्रवेश प्रक्रिया होणार सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *यवतमाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन कोटी रुपये खात्यात जमा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *प्रयागराजः त्रिवेणी संगमावर स्नान करायला मिळणं आणि पूजन करायला मिळणं, हे माझं सौभाग्य - नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *16 वर्षीय सौरभ चौधरीचा नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये विक्रमासह सुवर्णपदक, टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पटकावलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-20च्या रोमहर्षक सामन्यात भारताचा तीन विकेटने पराभव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सर सलामत तो ......* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.html *स्तंभलेखक नासा येवतीकर* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *वसंतदादा पाटील*           वसंतराव बंडूजी पाटील महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपयर्ंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४0 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटीश सरकारने पकड वॉरंट काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकार्‍यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या. वसंतदादा पाटील ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७0-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७0-७१) होते. याशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईला काँग्रेस अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी २0 काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. १ मार्च १९८९ रोजी त्यांचे निधन झाले. ावसंतराव बंडूजी पाटील महाराष्ट्र राज्याचे पाचवे मुख्यमंत्री. वसंतदादांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. ते पदमाळे, जिल्हा सांगली येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई. दादांचे शिक्षण जेमतेम सातवीपयर्ंत झाले. १९३७ मध्ये वसंतदादांनी राजकारणात प्रवेश केला. १९४0 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाचा आदेश दिला. त्यात दादांनी भाग घेतला. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनातही ते सहभागी झाले. ब्रिटीश सरकारने पकड वॉरंट काढून त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. अखेर दादा पकडले गेले; दोन वर्षांची शिक्षा झाली; परंतु त्याच दिवशी ते तुरुंगातून पोलिसांच्या बंदुका घेऊन आपल्या काही सहकार्‍यांसह पळून गेले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले आणि एकूण तेरा वर्षे सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९४६ मध्ये त्यांची मुदतपूर्व मुक्तता झाली. १९५२ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. १९६७ पर्यंत ते आमदार होते. १९४८ मध्ये त्यांनी सांगलीला शेतकरी सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी सहकारी तत्त्वावर सूतगिरण्या आणि तेल गिरण्या उभारल्या. वसंतदादा पाटील ते महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (१९६५), राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंधाचे संचालक व अध्यक्ष (१९७0-७२) व साखर निर्यात मंडळाचे अध्यक्ष (१९७0-७१) होते. याशिवाय राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ आदी संस्थांचेही ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. माहाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली (१९६७). १९६९ साली काँग्रेसचे विभाजन झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईला काँग्रेस अधिवेशन झाले. त्यांनी स्वागताध्यक्ष म्हणून काम केले. मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी २0 काँग्रेस सदस्य निवडून आले. म्हणून त्यांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला. १७ एप्रिल १९७७ रोजी दादा मुख्यमंत्री झाले. मार्च १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व इंदिरा काँग्रेस यांचे संयुक्त मंत्रिमंडळ अधिकारारूढ झाले. तथापि हे संयुक्त मंत्रिमंडळ समाधानकारक कार्य करू शकत नाही, या कारणास्तव वसंतदादांना मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. १ मार्च १९८९ रोजी त्यांचे निधन झाले.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता ?*       सिंधुदुर्ग *2) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता ?*        नंदुरबार *3) महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?*        मुंबई उपनगर *4) महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?*        नंदूरबार *5) महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा कोणता ?*       नंदूरबार *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •  साई डिब्बेवाड •  अनुराग आठवले बारडकर •  प्रदीप वल्लेमवाड येवतीकर •  दिलीप वाघमारे •  बालाजी अगोड •  नईम सय्यद •  बालाजी चिंतावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *वास्तव* खरे बोललेले शब्द कोणालाही कडू लागतात खरे बोलणारे त्यांच्या नजरेत वाईट वागतात कडू असले तरी खरे पचवता आले पाहिजे खरे वास्तव ऐकून जागरूक झाले पाहिजे       शरद ठाकर सेलू जी परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀🌟☀☀☀☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लिखा लिखि की है नाहि, देखा देखी बात दुलहा दुलहिन मिलि गये, फीकी परी बरात। सारांश       विधात्याला जाणून घ्यायचं  असेल तर केवळ पोथ्या  पुराणे वाचून तो कसा काय कळणार ? वाचन व श्रवणात माणूस परमात्म्याच्या मुळ रूपापेक्षा त्याच्या कपोल कल्पित व वर्णनातून रंगवून चढवून सांगितलेल्याच रूपाभोवती घिरट्या मारीत राहातो. पुस्तकातून रंगवलेल्या कथा ह्या विधात्याच्या थोड्याच आहेत. त्या तर मानवाच्या पूर्वजांच्या.  तत्कालीन राजा महा राजांच्या युद्ध प्रसंगाच्या , सत्ता विस्ताराच्या , अधिराज्य प्रस्थापित करण्याच्या . दोन विचार प्रवाहातील संघर्षाच्या. भावबंदकीच्या कलहाच्या . महाकाव्यातल्या पात्रांनाच माणूस देवाची रूप माणू लागला. त्यांचीच उपासना करू लागला. मुळ विश्व व्यापक परमात्मा पंच महाभुतात सामावलेला. सृष्टीचालक मुळ ईश्वर बाजुलाच राहून गेला.  मंगेश पाडगावकरांच्या गीत पंक्ती किती बोलक्या आहेत.  कुढे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला राहिला हृदयातून उपाशी.. देव बोलतो बाळ मुखातून देव डोलतो उभ्या पिकातून कधी होवून देव भिकारी अन्नासाठी आर्त पुकारी अवतीभवती असून दिसेना शोधितोस आकाशी....      खरे तर परमात्मा ही पाहाण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवण्याची बाब आहे .  जेव्हा वधू वराची एकत्र गाठ मारली जाते तेव्हा वर्‍हाडी व वरातीचं आकर्षण नाहिसं होतं तसं  ईश्वराच्या मुळ स्वरुपाशी एकरूपता साधताच वरवरच्या भाकड गोष्टींचा लेप आपोआपच गळून जातो.   एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           पहिल्याच प्रयत्नात यश मिळावे असे वाटत असेल तर ते एखाद्यावेळी चुकीचे ठरु शकेल.परंतु सातत्याने पाठपुरावा केला तर त्यात यश खात्रीने मिळू शकते हे निश्चित. आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला असे वाटायला लागले आहे की,कमी वेळेत,कमी कष्टात आणि दीर्घकालीन टिकणारे यश, आर्थिक समाधान आणि प्रतिष्ठा हवी आहे.असे म्हणणे चुकीचे ठरेल.या जगात कोणत्याही जीवाला हातपाय हलवल्या शिवाय,प्रयत्न केल्याशिवाय आणि त्या प्रयत्नात सातत्य ठेवल्याशिवाय काहीही साध्य होत नाही हे निश्चित आहे.एकाच ठिकाणी बसून मनाने उंच उंच मनोरे रचून काल्पनिक सारे काही करता येतील परंतु प्रत्यक्ष जीवनात प्रयत्नाला आणि सातत्याला दुसरा पर्याय नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *कर्म सिद्धांत* डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहीला आणि खाण्याची ईच्छा जागृत झाली ,डोळेतर फळ तोडू शकत नाहीत म्हणून पाय गेले फळ तोडायला ,पण जवळ पोहोचूनही पाय आंबा तोडू शकले नाहीत ,मग हात गेले आंबा तोडायला ,हाताने आंबा तोडला पण हात पाय व डोळे तो खाऊ शकले नाहीत .आंबा खाल्ला तोंडाने पण तो तोंडात राहीला नाही ,तो गेला पोटात , आता माळ्याने ते पाहीले आणि त्याने दांड्याने मार दिला पाठीवर, पाठ म्हणाली मला का मारता?मी कुठे आंबा खाल्ला ? दांड्याने मार मिळाला पण अश्रू आले डोळ्यात कारण पहीला दोष डोळ्यांचा होता ,डोळ्यानी प्रथम आंबा पाहीला होता *हाच आहे कर्म सिद्धांत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 22/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरू २००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार. 💥 जन्म :- १९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू. 💥 मृत्यू :- १९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर. १९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी. २००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानाचे केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाने घोषित केले पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून सोलापूर जिल्ह्यातील महुद बुद्रुक ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव - राहुरी कृषी विद्यापीठाचे विभाजन करून जळगावात कृषी विद्यापीठासाठी लवकरच निर्णय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *दिल्ली- निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल जनजागृती शिबिराचं आयोजन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *आंध्र प्रदेश- नेल्लोरमध्ये माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून ऑल इंडिया रेडिओच्या स्टेशनचं उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विजया राहटकर यांची निवड, त्यांचा तीन वर्षाचा कालवधी संपल्यानंतर झाली पुन्हा अध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली - नोकरदारांना ईपीएफकडून खूशखबर, ईपीएफच्या व्याजदरात वाढ, आता ईपीएफवर 8.55 टक्क्यांऐवजी 8.65 टक्के मिळणार व्याज* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेतून कर्णधार विराट कोहली भारतीय संघात कमबॅक तर दुखापतीमुळे हार्दिक पांड्या मालिकेतून माघार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाप आणि पुण्य* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/16.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *कस्तुरबा गांधी*             कस्तुरबा गांधी (११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेव्हा गांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरिलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणिलाल, रामदास आणि देवदास. १९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या. कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४-१९१२ दरम्यान त्या दरबानशहराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या. १९१३ मधील भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत त्यांना ३ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्या महात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी निळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी जेव्हा परतले, तेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• समाजासाठी सेवाभाव बाळगून नि:स्वार्थपणे काम करणाऱ्याच्या सेवेस सारे जग मदतीला येते. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1)  *जगातील एकूण सार्वभौम देश किती ?*       231 2)  *सजीव सर्वात प्रथम कोठे निर्माण झाले ?*       पाण्यात 3)  *महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?*        पुणे 4)  *भारतातील सर्वात सुंदर वास्तू कोणती ?*       ताजमहल 5)   *भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत ?*         7 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • शाहरुख शेख • रोहन पाटील *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतलबी* मतलबी माणूस मुका अन् बहिरा असतो मुके बहिरेपणाचा प्रभाव त्याच्यावर गिहरा असतो मतलब दिसला की मुके बहिरेपणा येतो चांगला वाटणारा माणूस बुद्धीने सुनासुना होतो शरद ठाकर सेलू जि. परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन* ‼● ••• *आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर'  कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.* *कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     निरजानी सो कहिये का, कहत कबीर लजाय अंधे आगे नाचते, कला अकारथ जाये। सारांश     अज्ञानाच्या आनंदाने पखाली  वाहाण्यात धन्यता मानणार्‍यांना ज्ञान कसे समजावणार ? हे अज्ञानात इतके रमलेले असतात की त्यांना सत्य, ज्ञान ही खोटे वाटायला लागते. अशा मुढमतींना समजावताना आपणावरंच पश्चातापाची वेळ येते. हे अज्ञानी जीव अंधश्रद्धेच्या इतके आहारी गेलेले असतात की, त्यांना ज्ञानाचा प्रकाश किरण दिसणेही कठीणच. कारण त्यांच्या धारणाच इतक्या कर्मट बनलेल्या असतात. की त्यांना विवेक व विचाराचं काही एक देणं घेणंच नसतं. अशा अविवेकी विचारातूनच आत्मघातकी व दहशतवादी विचारांना खतपाणी मिळतं. अशा विचारांचे अनुयायीच तर कट्टर धार्मिक दहशतवादी बनत आहेत. अन धर्म या शब्दाचीच किव यावी अशी या लोकांनी धर्मांची अवस्था करून टाकलेली आहे.     आंधळ्यासमोर कितीही सुंदर नृत्य करून काय फायदा आहे? कारण तुमच्या नृत्यातलं कसब पाहाण्याची जाणण्याची दृष्टीच त्याच्याजवळ नाही तर त्या आंधळ्याला तुमचं नृत्य कसं कळणार ?  जसा बहिर्‍यापुढे गावून उपयोग नाही, तसा आंधळ्यापुढे नाचून उपयोग होत नाही. त्यातल्या त्यात झोपीचं सोंग घेणार्‍या ढोंग्याला कितीही जागवायचा प्रयत्न केला तरी तो प्रतिसादच देत नाही. कारण तो स्वार्थासाठीच ढोंग धारण करीत असतो. अज्ञानी माणसापुढे आत्मा, परमात्मा , अध्यात्म, धर्म सांगून तो कसा काय कळणार आहे ! उपदेशासाठी सांगितलेले शब्दही विनाकारण फुकटंच वाया जाणार आहेत. अशा लोकांना उपदेश करणेही व्यर्थ आहे.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्यावेळी आपल्या कल्पनेने काढलेल्या रेखाटनामध्ये रंग भरते सोपे असते.कारण त्यात स्वातंत्र्य आणि कलात्मक दृष्टीकोन असतो.परंतु जीवनात रंग भरणे अतिशय कठीण असते.त्यात जीवनाचे अनेक रंग असतात.ते रंग कुठे आणि कसे भरायचे यासाठी आपले एक विशिष्ट कसब वापरावे लागते तेही समोरची व्यक्ती पाहून.ते एकदा त्याला जमले तर जीवन सुसह्य होते नाही तर आयुष्यभर असह्य होते.तेव्हा मात्र आपले कसब वापरण्यासाठी समोरच्यांच्या भावनिकतेचा विचार करावा लागतो.मग हे जमण्यासाठी अधिक मानसिकतेचा व आपल्या बुद्धीचातुर्याचा विचार करावा लागतो.तेव्हाच  आपल्या नि इतरांच्या जीवनात रंग अधिक खुलून दिसतात व जीवन समृद्ध व्हायला मदत होते. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वतःची चूक समजणे.* एकदा एका गावात ठिकाणी चोर्‍या खूप वाढल्या, म्हणून व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ बादशहाला भेटायला गेले, आणि रात्रीच्या वेळी शिपायांची गस्त वाढवावी, अशी विनंती त्यांनी बादशहाला केली. त्यावर बादशहा म्हणाला, ''शिपायांनीच का म्हणून गस्त घालावी? उद्यापासून तुम्ही गस्त घाला आणि आमचे शिपाई तुमच्या दुकानात बसण्याचे काम करतील.'' बादशहाचा हा विचित्र हुकूम ऐकून व्यापार्‍यांनी गुपचूपपणे बिरबलाची भेट घेऊन त्याला बादशहाच्या विचित्र हुकुमाबद्दल सांगितले. या जबाबदारीतून सुटका होण्याची एक युक्ती बिरबलाने त्यांना सांगितली. बिरबलाने सांगितल्याप्रमाणे व्यापार्‍यांनी डोक्याचे पागोटे पायात घातले आणि पायातले जोडे डोक्यावर घेतले आणि 'अंगावर पडलेच आहे, तर केलेच पाहिजे,' असे म्हणत रस्त्यारस्त्यावर गस्त घालणे सुरू केले. ''आ‍पण सांगितले, तसे व्यापारी रात्री गस्त घालतात की नाही?'' हे पाहण्यासाठी बादशहा रस्त्याने फिरू लागला, तर त्याला तेथे अजबच दृश्य दिसला. त्याने काही व्यापार्‍यांना याबद्दल विचारले, ''काय हो, हे पायांतले जोडे डोक्यावर घेण्याचा आणि डोक्यावरील पगडी पायात घालण्याचा काही उपयोग आहे?'' यावर ते व्यापारी उत्तरले, '' खाविंद, ज्यांना स्वत:चे रक्षणही स्वत: करता येत नाही, त्यांच्यावर शहर-रक्षणाची जबाबदारी टाकण्याचा उपयोग काय? आणि ज्यांना व्यापार कसा करावा, याची अंधुकशीही जाणीव नाही, त्यांना दुकानात बसवून उपयोग काय? तरीही पडलंच आहे अंगावर, तर गस्त घातलीच पाहिजे, म्हणून आम्ही कसं तरी ती पार पाडीत आहोत.'' व्यापार्‍यांचे हे उत्तर ऐकून बादशहाला आपली चूक समजली व त्याने ती त्वरित दुरुस्तही केली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/02/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८८५ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन. १९९५ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार. 💥 जन्म :- १८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे. 💥 मृत्यू :- १९०१ - जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड, आयरिश गणितज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - भारत आणि सौदी अरेबियासोबत पाच महत्त्वपूर्ण करार, दहशतवादाविरोधात पूर्ण सहकार्य करण्याचे सौदी अरेबियाचे आश्वासन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *हेग - कुलभूषण जाधवप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानच्या पाचही याचिका फेटाळल्या* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *चेन्नई - तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके आघाडीची घोषणा, काँग्रेस तामिळनाडूमध्ये 9 आणि पाँडेचेरीमधील एका जागेवर लढणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नांदेड - शहिदांना श्रद्धांजली वाहून महाआघाडीच्या सभेला सुरुवात, शरद पवार, जोगेंद्र कवाडे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते होते उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : आजपासून राज्यात बारावीच्या परीक्षेला होणार सुरूवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पालघरमध्ये जाणवले भूकंपाचे तीन धक्के; धक्क्यांची तीव्रता 3 रिश्टर स्केल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नाशिक- सार्वजनिक वाचनालयाचा प्रतिष्ठेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *हम सब एक है* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/15.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *नुतन* नूतन या हिंदी सिनेमातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. त्यांच्या नितळ सौंदर्याला मिस इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नूतन यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी एका उच्च शिक्षित कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव शोभना सर्मथ आणि वडिलांचे नाव कुमारसेन सर्मथ होते. आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीची सुरुवात त्यांनी १९५0 मध्ये केली जेव्हा त्या शाळेत शिकत होत्या. त्यांचा विवाह लेफ्टनंट कमाण्डर रजनीश बहल यांच्याशी १९५९ मध्ये झाला. त्यांचा पुत्र मोहनीश बहल हादेखील सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून कार्यरत आहे. नूतन यांची बहीण तनुजा आणि भाची काजोलही सिनेक्षेत्रात अभिनेत्री म्हणून नावाजल्या आहेत. नूतन यांना अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यांना सहा वेळा फिल्मफेअर मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराची बरोबरी त्यांची भाची काजोल हिने केलीय हे विशेष. नूतन यांना सिनेसृष्टीतील योगदानासाठी १९७४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे; जी पापाचं रुपांतर पुण्यामध्ये करु शकेल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत ?*       शक्तीकांत दास *2) जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर कोणते ?*       कांचनगंगा *3) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?*       भारतरत्न *4) राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो ?*        29 ऑगस्ट *5) मानवी मेंदूचे वजन किती असते ?*       1350 ग्रॅम (1300 ते 1400  ग्रॅम) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • विशाल चव्हाण • संजय कासलोड • पियुष मुजळगे • सचिन मानधनी • एकनाथ पांचाळ • डॅनिहल ग्रॅम्हबल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *दुनिया* ही दुनिया मतलबी आहे वर वर छान छबी आहे छान छबी मतलबा पूरती सर्व भार साहते धरती शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.* *सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      लकड़ी कहे लुहार की , तू मति जारे मोहि | एक दिन ऐसा होयगा , मई जरौंगी तोही || अर्थ : लोहाराचा धंदा म्हटला की भट्टी आणि भाता आलाच. कठीण वाटणार्‍या लोखंडाला आकार देण्यासाठी लोहार त्याला भट्टीत टाकतो. भट्टीत इतका गरम करतो की ते लालबुंद होवून जातं अन् त्याच्या घनाच्या/ हातोड्याच्या दणक्या सरशी पाहिजे तसा आकार घेवू लागतं. मात्र त्याच्यामागं खरं समर्पण असतं लोहाराकडच्या लाकडांचं ! जसजसा लोखंडाला ताव चढू लागतो तसं तसा लोहार चेव चढतो. भट्टीत लाकडे टाकून भात्याने वार्‍याला फुस देत लाकडांना लाल इंगळ करीत संपवून टाकतो. त्याचा जोस लाकडांचा कर्दनकाळ असतो. ते पाहून लाकूड म्हणतं की आज मी तुझा अंकित आहे. माझा तुला हवा तसा वापर करून घे. एक दिवस माझाही असेल. त्यावेळी तू निचेष्ट पडलेला असशील. त्यावेळी मी तुला असेच बेमुर्वतपणे भस्मसात करीन. त्यावेळी तुझ्या अस्तिवाच्या खुणाही मागे असणार नाहीत. तात्पर्य: कार्य कर्तृत्त्वासाठी प्रत्येकाला काळ संधी देत असतो. बलशाली माणसे कमकुवतांवर हुकूमत गाजवतात. त्या हुकूमतीला कळवळ्याचा आधार असेल तर ती हुकूमत हवीहवीशी वाटू लागते. परतु ती अतिरेकी मनमानी करणारी असेल तर एक दिवस सहज पत्त्यांचा डाव कोसळावा तशी ती कोलमडते अन अन तिच्या अस्तित्वाच्या खुणाही शेष राहात नाहीत. मगधच्या धनानंद व आॅस्ट्रियाचा राजा सोळावा लुई ही उदाहरणं पाहता सर्वकाही कळून जाते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही करत असलेल्या एखाद्या चुकीमुळे एखाद्याचे आयुष्य खराब होऊ शकते.त्यापेक्षा एखादा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन चांगला किंवा बरोबर असलेला विचार समोर ठेवला तर एखाद्याचे त्याला त्याच्या जीवनात एक चूक सुधारण्याची संधी मिळवता येईल व आयुष्य ही सुंदर बनवून जगताही येईल.त्याच्या जीवनात जे काही चैतन्य निर्माण झालेले असेल ते केवळ तुमच्या एका चांगल्या विचारामुळेच. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..9421839590/8087917063. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   नक्कल नाही ;अनुकरण करावे. वर्ग सातवीतला मनिष हा नकला चांगल्या करायचा .मित्रांच्या बोलण्याच्या लकबी,शिक्षकांच्या बोलण्याच्या लकबी तो सहज करत असे.शिक्षकांना त्याच्यातील हा गुण माहिती होता ,त्यामुळे त्याला शिक्षकांनी सांगितले होते की, तू नकला चांगल्या करतोस हे ठीक आहे ; पण नक्कल करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करावे .नक्कल ह्याचा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे हुबेहूब वर्तन ,त्याचे हावभाव जसेच्या तसे व्यक्त करणे होय,पण अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीतील चांगले गुण स्वत: रुजवून आपला विकास करणे होय . मनिषने शिक्षकांचे हे म्हणणे काही ऐकले नाही .नक्कल करणेच त्याला योग्य वाटले .एकदा शिक्षक दिनादिवशी सगळी मूल वेगवेगळ्या वर्गात शिक्षकांचे काम करणार होते .थोडक्यात त्यांना वर्गावर शिक्षकांच्या ऐवजी शिकविण्यासाठी जायचे होते.मनिषही पाचवीच्या वर्गावर शिकवण्यासाठी गेला.त्याला वाटले आपण एखाद्या शिक्षकांची नक्कल करून तास संपवू या . फारसे अवघड काही नाही. असा विश्वास ठेवून तो वर्गावर गेला .विषयांशी निगडित असलेल्या शिक्षकांची त्याने अचूक नक्कल केली .पण शिकवतानात्याला एका विद्यार्थ्याने पाठासंबंधी प्रश्न विचारला .मनिषला केवळ नक्कलच माहित होती. विचारलेल्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ,याचा विचारच त्याने केला नव्हता .सगळी मुले हसायला लागली त्याची थट्टा करू लागली. त्यावेळी मनिषच्या मनात एक गोष्ट पक्की रुजली की सरांनी सांगितल्याप्रमाणे नक्कल करण्यापेक्षा अनुकरण करणे अधिक फायदेशीर ठरू शकते .कारण त्यामुळेच आपल्या व्यक्तिमत्वाचा बुद्धीचा विकास होऊ शकतो .अन्यथा आपण केवळ एखाद्या व्यक्तीची नक्कल करू शकतो .पण त्या व्यक्तीसारखे श्रेष्ठ बनू शकणार नाही. तेव्हापासून मनिष चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्यावर भर देऊ लागला . *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*✍जीवन मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात हैl पर मृत्यू के बाद भी लोंगो के दिलों में जीवित रहना ये कर्मों की बात हैl* 📚📚📚📚📚📚📚

शिवबाराजे माँसाहेब जिजाऊ शाहूंचा पूञ होता शिवा,धैर्य,शील, चारित्र्याचा समाज क्रांतीचा तोची होता छावा जातीभेद सारे तोडूनी बंधने सारे मोडूनी स्त्री सन्मानाचा करी आदर रयतेचा तो पालनहार प्रजेचा रक्षणासाठी राजे स्थापन केले स्वराज्य तुम्ही असंख्य गुणांचे धनी तुम्ही रयतेचा मनात शिवराय तुम्ही झाडे लावा झाडे वाचवा पाणी आडवा पाणी जिरवा हाच दृष्टिकोन ठेवलात रयतेचा रक्षणासाठी सदा जागृत तुम्ही राहीलात बळीराजाचे पालनकर्ते स्त्री रक्षणाचे स्तंभ तुम्ही सार्वभौमत्वाचा प्रतीचे शककर्ते तुम्ही असा राजा शिवबा आपुला किती गाऊ गुणांची गाथा चरणी ठेवूनी मस्तक आता करूया नमन जिजाऊमाता 〰〰〰〰〰〰〰 🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 ✍ प्रमिला सेनकुडे

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *जागतिक सामाजिक न्याय दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९१३- ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना. १९८७-मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांना स्वतंत्र  राज्याचा दर्जा देण्यात आला. 💥 जन्म :- १९५१- इंग्लंडचे प्रधानमंत्री गार्डन ब्राऊन 💥 मृत्यू :- १९५०- नेताजी बोस यांचे वडील बंधू बॅ शरदचंद्र बोस १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज. २००१- माजी केंद्रीय गृहमंत्री  इंद्रजित गुप्ता *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दहशतवादाच्या मार्गावर असणाऱ्या सर्व मुलांना परत बोलवा, काश्मीरमधील पालकांना लष्कराचं आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान नवी दिल्लीत; स्वागतासाठी पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला पुन्हा मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुलवामासारखा हल्ला भविष्यात होऊ नये याची काळजी घेऊ- संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *द हेग - आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (डीए) तीन टक्क्यांनी वाढविण्याचा मंत्रिमंडळाने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ * आयपीएलच्या 12 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर, गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणिरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होईल सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *अति क्रोध करू नये* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/14.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनंत लक्ष्मण कान्हेरे*        अनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्‍नागिरी जिल्हा, इ.स. १८९१; मृत्यू : ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकरयांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली. जॅक्सनची मुंबई येथे वरच्या पदावर बदली करण्यात आली. त्याला नाशिक येथेच मारणे जास्त सोपे होते. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये 'शारदा' या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी ठरला होता. जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने या प्रयोगास येणार होताच. नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली, सर्वजण आपापल्या जागेवर स्थानापन्न होत असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. ठाण्याच्या तुरुंगात अनंत कान्हेरे यांचे स्मारक आहे. नाशिकमध्ये 'अनंत कान्हेरे' नावाचे क्रिकेटचे मैदान आहे. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) 'फुगडी' हे कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे ?*      गोवा *2) भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?*       ज्ञानपीठ पुरस्कार *3) हिमा दास ही कोण आहे ?*      धावपटू *4) मेरी कोम कोणत्या टोपणनावाने ओळखली जाते ?*       मॅग्नीफिसेन्ट मेरी *5) जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे ?*       भारत *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • उत्तम कानिंदे • शिरीष गिरी • नागेश पांडे शेवाळकर • दिलीप लिंगमपल्ले • व्यंकटेश रोंटे • शिवाजी पाटील • साहेबराव कदम • संतोष कामगोंडे • विठ्ठल डोनगिरे • बालाजी उगले • नागेश काळे • विशाल खांडरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राजे* राजे तुम्ही स्वराज्य निर्माते आहात तुम्ही सकलांचे भाग्यविधाते आहात तुमचा अभिमान मनामनात आहे प्रत्येक भारतीय तुमच्या ऋणात आहे   शरद ठाकर सेलू जि परभणी •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शयण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीर पगरा दूर है, आये पहुचै सांझ जन जन को मन राखती, वेश्या रहि गयी बांझ। कबीरा दूरच मुक्ती होत आलिया सांज सर्वांच्या राखित मना वेश्या राहिली वांझ महात्मा कबीर म्हणतात की मुक्तिपासून मी आणखी कोसो राहिलोय. जीवनात अज्ञानामुळे अंधःकार भरलेला आहे. हा अंधःकार षडविकारांनी युक्त आहे. हे विकार वारंवार मनाला भुरलळ घालीत असतात. त्यांना भुलून अज्ञानाचा मोहमयी पडदा बाजुला सरतंच नाही. त्यासाठी कर्मठपणाही अंगिकारला. त्यातल्या रूढी परंपरांनी असं काही जखडून टाकलं की विकारांपासून दूर जाण्याऐवजी विकाराभोवती भरकटून जीवन अखेरच्या टप्प्यावर येवून थांबू पाहातं आहे. तरीही जीवनातल्या माया जाळातून अजूनही मुक्तता झालेली नाही. मानवी मनाचे खेळही मोठे विचित्र असतात. मन विषय उपभोगात रमत मात्र ते कधीही भरत नाही अतृप्तच राहातं. जसे वेश्या सर्वांचे मन जपते . इत्तरांना समाधान देते. मात्र इत्तरांना जपण्यात तिला स्वतःचं अस्तित्व कुठं जपता येतं. ती स्वतः वांझपणाच्या यातनेतंच संपते. सर्व इंद्रियांना तृप्त करताना मन मात्र अतृप्तंच राहातं.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात. तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी  आपली मानसिकता असावी  लागते. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सर्वथा सत्य सांडूं नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥१९॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *विश्वासघात* जंगलात एक हरिणीचे पाडस चरत होते. अचानक तेथे एक चित्ता आला. पाडस जीव वाचविण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही त्या जाळीत घुसला. पाडस छोटे होते ते सहजच जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकून बसला. त्याच वेळी एक शेतकरी तेथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला त्याला जाळीतून काढण्याची विनंती केली. परंतु शेतकरी म्हणाला," तू जंगली प्राणी ! तुझा काय भरवसा ! तुला सोडल्यावर तू मलाच खावून टाकशील." चित्त्याने तसे करणार नाही असे आश्वासन दिले. शेतकर्याने त्याला मुक्त केले. तेंव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरु केली. शेतकरी म्हणाला मी तुला मुक्त केले हाच का सहकार्याचा मोबदला का?. चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तेथे एक लांडगा आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, " हा एवढा मोठा चित्ता! वाऱ्याच्या वेगाने पळणारा! आणि हा एवढ्याश्या जाळीत कसा अडकून पडेल. तू खोटे बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवला हे खोटे आहे, हा संकटात फसू शकत नाही. तो जाळीत कसा काय अडकला हे मला दाखव मग तू खरा का चित्ता ? हे पाहू." हे ऐकून चित्ताही घमेंडीत गेला तो परत जाळीत गेला व पुन्हा जाळीत अडकला. त्याच क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, " अरे मित्रा आता तरी पळ! नाहीतर हा पुन्हा तुला फसवेल ! *तात्पर्य - जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यावर कधीच विश्वास ठेवणे चांगले नाही. ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४४- भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली. १९९८- ज्येष्ठ गांधीवादी नेते,माजी मंत्री व महाराष्ट्राचे  माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी  सन्मान जाहीर. 💥 जन्म :- १८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक १८८३-क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा 💥 मृत्यू :- १९६७- अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणुबॉम्बचे जनक जे.रॉबर्ट ओपेनहायमर १९९२-चित्रकार नारायण श्रीधर बेंद्रे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होते उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुलवामा हल्ला- राजौरीतील शहीद जवान नसीर अहमद यांच्या कुटुंबाला राज्यपालांकडून 20 लाखांची मदत जाहीर* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शिव समर्थ स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते अनावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *शिवसेना-भाजपाचं जमलं! उद्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, गेल्या काही दिवसांपासून युतीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थान- चालू वर्षात स्वाईन फ्ल्यूमुळे आतापर्यंत 127 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सरकारी नोकऱ्यांची कल्पना डोक्यातून काढून टाका- महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत एफसीटी जिमची डॉ. मंजिरी भावसार ठरली विजेती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *आपले नशीब आपल्या हाती* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/12.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी*         गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (१८ फेब्रुवारी १८२३ ते ९ ऑक्टोबर १८९२) हे इ.स.च्या १९व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने त्यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुर्टे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका 'शतपत्रांचा इत्यर्थ' मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस म्हणून काम करीत होते. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले. 'सदर अदालती'ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवेनवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटत होते. लोकहितवादींनी १८४२ मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'हिंदुस्थानचा इतिहास' हे पुस्तक लिहिले. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणार्‍या प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. १८४८ ते १८५0 या काळात त्यांनी १0८ छोटे छोटे निबंध लिहिले. हेच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. त्यांनी विविधविषयांवर लहानमोठे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. १८५६ साली गोपाळराव 'असिस्टंट इनाम कमिशन' या पदावर नेमले गेले. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉज कोर्टात जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी गुजरातमध्ये गुजराती वक्तृत्वसभा स्थापन केली. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीकत्व यासारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला चढविला. १८७७ साली दिल्ली दरबारप्रसंगी ब्रिटीश शासनाने रावबहादूर ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते    *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्तव्याची जाणीव करून देते ती खरी संस्कृती ! *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?*       सरपंच *2) गावात कायदा व सुव्यवस्था कोण पाहतो ?*       पोलीस पाटील *3) महाराष्ट्रातील 'जंगलाचा जिल्हा' कोणता ?*        गडचिरोली *4) महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?*        अहमदनगर *5) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?*        मुंबई शहर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया      📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ सोमेश्वर तांबोळी ◆ संजय राचावाड ◆ गणेश पाटील ◆ लक्ष्मीकांत डेबेकर *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *सारखेच* शिकलेले अन् न शिकलेले सारखे आहेत शिकून ख-या विचाराला पारखे आहेत शिकले तरी जुन्या परंपरा सोडत नाहीत विचारा सोबत घेतलेल शिक्षण जोडत नाहीत    शरद ठाकर सेलू जि.परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.* *म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुख पीव ब्रह्म लौ ध़ाये आतम अनुभव सेज सुख, तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुख जलद ब्रम्हानंद दायी आत्मानुभव प्राप्तीची सर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समद‌ृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आईवडिलांना विसरू नका एकदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता. तेथे एक कावळा आला. मुलाला बापाने विचारले, ते काय आहे? मुलगा म्हणाला कावळा. पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे? मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.  तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे? मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा. मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते? मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का? कावळा...... कावळा... कावळा.  पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते? मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले, का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून, तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?  मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली. त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.  परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता. त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता, आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.  त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता, उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते. तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.  फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट, त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता. उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले. लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात? *आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/02/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९२३ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली. १९४५-दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळविले. १९९८- चायना एरलाईन्स  फ्लाइट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान कोसळले. 💥 जन्म :- १२२२ - निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक. १९४१-किम जोंग इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष. 💥 मृत्यू :-  १३९१ - जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट. १८९९ - फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९४४- दादासाहेब फाळके, महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपट निर्माते १९५५-मेघनाथ साहा, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला असून राज्यभर सर्वांनी हल्ल्याचा निषेध करत श्रद्धांजली सभा घेतल्या.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना ५0 लाख रुपयांची मदत व कुटुंबियांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौर्‍यावर त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होणार आहे तसेच ते दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यात ४0 जवान शहीद झाल्यानंतर, व्यापारासंदर्भात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईसह राज्यभरातील वातावरणात बदल नोंदविण्यात येत असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात स्वाइन फ्लूचे दीड महिन्यात १७ बळी; आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣*ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय  संघाची घोषणा करण्यात आली, कॅप्टन विराट कोहलीचे पुनरागमन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *मध्यान्ह भोजन : एक संजीवनी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_13.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *दादासाहेब फाळके*          दादासाहेब फाळक्यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावरच्या त्र्यंबकेश्‍वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृतज्ञ होते. १८८५साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. १८९0साली जे.जे.तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४0 जादूगारांपैकी एकाशी, र्जमन कार्ल हट्र्?झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेसाठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला र्जमनीची वारी केली. लाईफ ऑफ ख्रिस्त हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्‍चंद्र हा पहिला मूकपट काढला जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून (१९७०) चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात येतो.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून, वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1) महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती ?*           36 *2) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?*           मराठी *3) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?*         हरियल *4) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?*         शेकरू *5) महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?*        गोदावरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा जि. गोंदिया   📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● कु. सानिका कुणाल पवारे ● प्रदीप वाघमारे ●  बाप्पा महाजन ●  सतीश चव्हाण ●  प्रमोद हिवराळे ●  मारोती गंगाधर जाधव ●  राजू इटलावार ●  शंकर छपरे ●  महंमद सादिक खान ●  शंकर मसूनवार ●  बालाजी पाटील जाधव *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *वाटण्या* वाटण्या वरून इथे रोजच भांडणं आहे माझा वाटा मोठा हेच मत मांडणं आहे ताटावर वढायच्या नादात कोण कस रास्त देणार वाटाघाटी करायच्या तर नक्की कमी जास्त होणार    शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शरण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     ज्यों गूंगा के सैन को,  गूंगा ही पहिचान त्यों ज्ञानी के सुख को,  ज्ञानी हबै सो जान। सारांश         मुक्याची भाषा मुक्याला बरोबर समजते कारण दोघेही समान संवेदनेचे असतात. त्यांना बोलता येत नसले तरी त्यांची (देहबोली) खुणवाखुणवी इशार्‍याची भाषा असते. त्या खुणवण्यातून त्याला काय सांगायचंय  ते समोरचा बहीरा बरोबर ओळखतो. मात्र हे इशारे व सुचित करावयाचा भाव विद्वानालाही कळू शकत नाही. त्यासाठी त्याच्याच पातळीवर यावं लागतं. जसं  लहाण बाळाचं रडणं अन त्याचे चेहर्‍यावरचे हावभाव त्याच्या आईला वाचता येतात. म्हणून त्यांच्यात डोळ्याची भाषा विकसित झालेली असते. लेकराचं अर्ध अधिक पालन-पोषण तर आई  डोळ्याच्या ईशार्‍यावरंच पूर्ण करते.      विशिष्ट वयामध्ये वेगवेगळ्या सांकेतिक भाषा विकसित होतात. किशोरावस्थेपासून अशा सांकेतिक भिषा विकसित होतात. प्रत्येक शब्दात विशिष्ट अक्षर क्रमात एखादे अक्षर टाकून त,व,म,प....ची भाषा बोलता येणे. बोलणार्‍या दोघांनाच कळायचं बाकीचे उगा तोंडाकडं पाहात राहाणार . कुमारावस्थेनंतर अशा भाषांचं आकर्षण ओसरून जातं. जनावरांच्या बाजारात हेड्यांची दलालांची भाषा तरी कुठे कळते दलालांशिवाय दुसर्‍यांना !           कित्येक जणांच्या समुहात वावरणार्‍या दोन प्रेमींनी आपली एक भाषा विकसित केलेली असते. कितीही चौक्या पहारे असले तरी ती त्या दोघांना बरोबर कळते. चौक्या पहार्‍यांना भेदून ती एकमेकांची भेट घडवून आणतेच. त्याप्रमाणे  आत्मरूपाच्या आनंदात एकरूप झालेल्या आत्म ज्ञान्याला दुसरा आत्मज्ञानी बरोबर  ओळखू शकतो.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥१६॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           *समर्पण* एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.'' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/02/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत सेवालाल महाराज जयंती* 💥 ठळक घडामोडी :-  १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी. १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक. १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला. १९९५ : ब्रेल लिपीतील पहिलं वृत्तपत्र 'केसरी' या संस्थेने प्रकाशित केलं.  २0१४ : दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.  २0१८ : नीरव मोदी याच्या १७ मालमत्तांवर ईडीचे छापे. नीरव मोदी फरार. ईडीकडून त्याच्या ५१00 कोटींची संपत्ती  💥 जन्म :- १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक. 💥 मृत्यू :-  १८६९ - प्रसिद्ध उर्दू कवी आणि शायर मिर्झा गालिब २0१३ : लढवय्या कामगार नेता, कट्टर शिवसैनिक, माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *जम्मू काश्मीर: पुलवामात सीआरपीएफच्या दोन बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; 40 जवान शहीद, उरी नंतरचा सर्वात मोठा रक्तपात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप करत सकल मराठा क्रांती महामोर्चाने २२ फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषणाची दिली हाक* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *एमपीएससी परीक्षेत सोलापूरचा झेंडा, बार्शीचा आशिष बारकुल व पंढरपूरचा महेश जमदाडे अव्वल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बुलढाणा : मातृतीर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई - शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - 24 फेब्रुवारी रोजी रासपतर्फे मुंबईत धनगर मेळाव्याचे आयोजन, शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• व्हॅलेंटाईन स्पेशल आर्टिकल *विद्यार्थी हेच माझे दैवत* https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/my-students-my-valentine.html *स्तंभलेखक नासा येवतीकर* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                   *मिर्झा गालिब* मिर्झा असदुल्लाखान गालिब हे प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिबने त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,000 च्यावर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १000-१२00 शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. गालिब यांनी कधी कोणताही उद्योगधंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार. शायरी आह को चाहिए इक उम्र असर होते तक कौन जीता है तिरी ज़ुल्फ़ के सर होते तक *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *1)  'तलावाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?*        गोंदिया *2)  आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा कोणती ?*         कचारगड ( गोंदिया ) *3) संसद सदस्याला काय म्हणतात ?*        खासदार *4) राज्यविधिमंडळाच्या सदस्याला काय म्हणतात ?*        आमदार 5)   *महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली ?*        1 मे 1960 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा गोंदिया 📱 9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अशोक गायकवाड ●  दत्ता एम. भोसले ●  जनाबाई निलपत्रेवार ●  बाबूराव बोधनकर ●  किरण गौड ●  घनश्याम नानम ●  गोविंद टेकूलवार ●  भारत लाखे ●  गुलाब जाधव ●  रमेश पाटील कदम ●  अविनाश सातपुते ●  रमेश सोनकांबळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनातून उतरले* कोणाच्या नजरेतून कोणाचे मन उतरले आहे मन उतरले म्हणाले की लोक म्हणतात हे बिथरले आहे वाईट कामं केली की कोणीही मनातून उतरू शकतो वाईट कामं पाहून कोणीही कोणावर बिथरू शकतो     शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• •••●‼ *विचार धन* ‼●••• *मुन्शी प्रेमचंद यांनी तारूण्याविषयी फार छान विचार मांडले. ते म्हणतात, 'तारूण्य जोश आहे, बल आहे, साहस आहे, दया आहे, आत्मविश्वास आहे. गौरव आणि सर्वकाही आहे. तारूण्य व्यक्तीच्या जीवनाला उज्ज्वल आणि परिपूर्ण बनविते. परंतु एकदा का ते भरकटले तर सर्व सद्गुणांचा नाश होऊन जीवन सैरभैर होते.' तारूण्याला  विश्वात्मकतेचे परिमाण द्यायचे असेल, तर तेवढे साहस आणि उदार असणे आवश्यक आहे. उदारता आणि साहस यांच्या संयोगामुळेच डाॅ. कोटणीस मानवतेच्या भावनेतून चीनमध्ये स्थिरावतात. भारत-चीन या देशांमध्ये मानवतेचा सांस्कृतिक बंध निर्माण करतात. तारूण्याचा खरा अर्थ कळलेली 'डाॅ. कोटणीस की अमर कहाणी' संपूर्ण जगाला आकर्षणाचा आणि आत्मसंवेदनाचा विषय वाटते.* *जनावरे राखता राखता अभ्यास करीत बौद्धिक कर्तृत्वावर आणि तारूण्यातील सकारात्मक ऊर्जेमुळे तात्याराव लहाणे यांच्यासारखा तरूण नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारुपाला येतो. अलिशान हाॅस्पिटल उभारून खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्याच्या नादी न लागता सरकारी दवाखान्यात नोकरी करून सामान्यांची सेवा करण्यात धन्यता मानतो. तेही तारूण्याचा अर्थ समजल्यानेच. युवावर्गाने आपल्या तारूण्यावस्थेतील महत्वाचा काळ शक्ती, कार्यक्षमता, बुद्धिचातुर्य यांचा योग्य वापर केला तर कुटुंब, देश पर्यायाने मानवसमाज  प्रगतीपथावर जाऊ शकतो.*   ••●‼ *रामकृष्णहरी*‼●••   🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर  सतगुर  ना  मिल्या , रही  अधूरी  सीश  | स्वांग जाति का पहरी कर , घरी  घरी  मांगे  भीष  || अर्थ :       महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे.  गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान  आत्मघातकी ठरतं.  ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला.       अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात.  प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्याजवळ जे आहे ते इतराजवळ नाही किंवा इतरांजवळ जे आहे ते तुमच्याजवळ नाही. असे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेलही आपल्या जीवनात असं का बरं होतं आणि त्याबाबतीत नसल्याचीही मनाला खंत वाटते. खंत वाटून घ्यायचेही कारण नाही. पहिल्यांदा तुम्ही थोडा विचार करा असे जर सगळ्यांना सारखेच मिळाले असते तर आपण काहीच प्रयत्नही केले नसते. इतरांच्यासोबतही आपण तुलना करु नये. ज्याच्या त्याच्या कर्माचा आणि ज्याला आपण कधी कधी नशिब म्हणतो कदाचित नशिबाचाही भाग असू शकते. पण एक लक्षात असू द्यावे पहिल्यांदा आपण इतरांची बरोबरी करु नये आणि जर करायचीच असेल तर आपण आपल्या कामात आणि प्रयत्नात कसूर करायची नाही. इतर जर पुढे जात असतील तर आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि आपणही आपल्या प्रयत्नाने कसल्याही प्रकारचे मन खचून जाऊ न देता समोरच्या परिस्थितीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याचा संकल्प करायचा. अशा कृतीमुळे आपलेही जीवन इतरांपेक्षा सुखी व समाधानी होऊ शकेल. इतरांबरोबर स्पर्धा करायची काही गरज नाही किंवा इतरांसोबत तुलनाही करायची गरज नाही. आपल्यालाही आपल्या कर्माने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यामुळे आपणही आपल्या जीवनात खूप पुढे जाऊ शकतो हे निश्चित. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *निर्मळ मन* ‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी उपदेश करा.’’ साधू महाराज म्हणाले, ‘‘माई, आज नाही, पण मी तुला उद्या उपदेश करीन.’’ महाराजांचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना अतिशय राग आला व त्या फणकार्याने म्हणाला, ‘‘मग तुम्हाला मी भिक्षाही उद्याच घालीन.’’ दुसर्या दिवशी साधू महाराज भिक्षा मागण्यासाठी पुन्हा त्या घराकडे निघाले. येताना त्यांनी आपल्या भिक्षापात्रात थोडी माती घेतली. साधू महाराज आज येऊन उपदेश करणार म्हणून मंगलाबाई सुद्धा चांगले दान घेऊन त्यांची वाट पहात होत्या. साधूमहाराजांनी घरासमोर येऊन ‘‘भिक्षां देही’’ अशी आळी दिली. मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घालणार तितक्यात त्यांच्या लक्षात आले की भिक्षा पात्रात माती आहे. त्या पटकन साधूमहाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, भिक्षापात्रात माती आणि कचरा आहे तर मी भिक्षा कशात घालू ?’ महाराज म्हणाले, ‘‘ मला चालेल. तुम्ही भिक्षा घाला.’’ त्यावर मंगलाबाई म्हणाल्या, ‘‘भिक्षापात्रात माती असताना त्यावर मी अन्न घालणार नाही.’’ हे ऐकून महाराज म्हणाले, ‘‘भिक्षापात्र स्वच्छ केल्यावरच तुम्ही भिक्षा घालणार ना. मग तोच तुम्हाला उपदेश आहे. काल तुम्ही दुःख आणि चितेनी ग्रासलेल्या होतात, तुमचे मन अस्वस्थ होते; मग मी तुम्हाला कसा उपदेश केला असता ?’’ गुरुचा उपदेश घेताना मन अगदी निर्मळ असायला हवे. तात्पर्य – मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

*जी व्यक्ती प्रतीकुल वातावरणात तटस्थ असते,प्रतिकुल लोकमताला न घाबरता संघर्ष करते.स्वतःच्या विचारावर ठाम असते.चांगले आणि वाईट यातील भेद ओळखून स्वतः निर्णय घेते.परिस्थिती कोणतीही असो त्यातुन मार्ग काढते.* *दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी ठेवतात, अशी व्यक्ती स्वाभिमानी असते,स्वतःचे आचार विचार दुसऱ्यावर न लादता सतत कार्यमग्न राहते.अशी व्यक्तीच स्वतंत्र असते.* 〰〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिला

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/02/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी. 💥 जन्म :- १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री. १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता १० टक्के आरक्षण देण्याबाबतचा शासकीय आदेश जारी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचार्‍यांना राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *जानेवारीमध्ये महागाई दरात घट, गेल्या १९ महिन्यातील हा सर्वात नीचांक स्तर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राज्याच्या दुर्गम, डोंगराळ तसेच आदिवासी भागामधील पशुपालकांकडील पशुरुग्णांसाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सूरू करण्यासह योजनेच्या पहिल्या टप्प्यात ८0 तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात ११ सप्टेंबर २0१८ ला केलेली वाढ तत्काळ द्यावी आणि कर्मचार्‍यांच्या एकरकमी लाभांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करावी; या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून राज्यभर जेलभरो आंदोलनाला केली सुरुवात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वायुप्रदूषणामुळे देशात दरवर्षी 24 लाख बळी, त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक तर मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय महिला संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांनी आयसीसी टी-२0 क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत घेतली भरारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *सरोजिनी नायडू* सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर. अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कर्ज, शत्रू आणि रोग यांची थोडीसुध्दा बाकी ठेवू नये. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'मथला पेंटिंग' कुठल्या राज्यातील प्रसिद्ध कला आहे?*  बिहार *२) 'मोनालिसा' नामक जगप्रसिद्ध चित्राची रचना कोणी केली?* लिओनार्दो द विंसी  *३) न्यूटनचा गतीचा पहिला नियम कोणता?*  जडत्वाचा नियम *४) प्रथम कोणत्या अवयवाचं प्रत्यारोपण करण्यात आलं?* हृदय *५) लोखंड आणि गंधक हे कोणत्या प्रकारचं मिश्रण आहे?*              असमांग मिश्रण *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● अशोक पाटील ● देवीसिंग ठाकूर ● नागनाथ भद्रे ● पंडीत डोरले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घात* कोणाला बोट दिले की तो हात धरतो आपलेपणाने जवळ केल की घात करतो माणूस ओळखूनच द्यायचा मदतीचा हात जागरूक राहिल्यास होणार नाही घात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महत्वाकांक्षा आणि अतिमहत्वाकांक्षा यातील फरक जाणून घेण्याची गरज आहे. उत्तुंगतेचा ध्यास जरूर घ्यायला हवा; परंतु त्यामागे उदात्त विचार असायला हवेत. आपले आणि समाजाचे जीवन समृद्ध करण्याची कळकळ असावी. त्याऐवजी केवळ स्वार्थाचा आणि मूठभरांच्याच हिताचा विचार असेल, तर त्यामागची महत्वाकांक्षा हिंसक बनते. अतिमहत्वाकांक्षा नकारात्मक असून, आपल्या अधोगतीला कारणीभूत ठरते. इतिहासात अशी असंख्य उदाहरणे आहेत. शेक्सपियरच्या नाटकातील नायक मॅकबेथही अतिमहत्वाकांक्षेचा शिकार आहे. स्काॅटलंडचा राजा डंकनच्या दरबारातील तो पराक्रमी उमराव. राजा होण्याची महत्वाकांक्षा त्याला असतेच; परंतु लेडी मॅकबेथ याबाबतच्या अतिमहत्वाकांक्षेने पछाडलेली असते. आपला नवरा राजा व्हावा म्हणून प्रसंगी ही दुष्ट बाई विद्यमान राजाचा खून करायलाही तयार होते.* *एका लढाईत विजय मिळविल्याबद्दल सन्मान करण्यासाठी राजा मॅकबेथच्या घरी येतो. पती-पत्नी त्यांचे आदरातिथ्य करतात. दिलेल्या शयनगृहात राजा झोपी जातो. मॅकबेथ महत्वाकांक्षी होता; पण त्यासाठी तो कोणाचा खून करायला तयार नव्हता. मात्र उद्याच्या राजवैभवासाठी तसे करणे आवश्यक असल्याचे सांगून लेडी मॅकबेथ राजाचा खून करायला भाग पाडते. मॅकबेथला राजपद मिळते; परंतु त्यानंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला, युद्धाला सामोरे जावे लागते. लेडी मॅकबेथ भ्रमिष्ट होऊन मरते आणि मॅकबेथलाही प्राणास मुकावे लागते. अतिमहत्वाकांक्षा विघातक असून -हासाला कारणीभूत ठरते.*     ••●💥‼ *रामकृष्णहरी* ‼💥●•• संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई | सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात जर तुम्हाला काही करुन दाखवायचे असेल तर खालील गोष्टींना कधीच प्राधान्य देऊ नका. आळस,अज्ञान, खोटेपणा आणि स्वार्थीपणा. आळसाने कोणतेही काम पूर्ण होत नाही,अज्ञानाने काय खरे आणि काय खोटे हे कळत नाही,खोटे बोलण्याने आपली प्रतिष्ठा जनमानसात चांगली निर्माण होत नाही तर स्वार्थामुळे आपण एकाकीपणे पडतो त्यामुळे आपली किंमतही कोणी करत नाही. म्हणून यांना केव्हाही तुमच्या जीवनामध्ये कसलेही स्थान देऊ नका.जर तुमच्या जीवनात स्थान दिलात किंवा प्रवेश करु दिलात तर तुमचे चांगले जीवन खराब करण्यास प्रवृत्त करतात.सदैव जागृत राहणेच सर्वात महत्वाचे आहे. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी ॥१३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *ईश्वरी अनुसंधानात सततचा आनंद* एकदा गरिबीने ग्रासलेल्या एका माणसाला आपल्या जीवनात फार दु:ख आहे, असे जाणवले. हे दु:ख दूर कसे करायचे, या चिंतेत तो होता. संत कबीर हे एक थोर संत असून त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांची दु:खे नाहीशी झाली असल्याचे त्याच्या कानी पडले. आपले दु:ख त्यांच्याजवळ सांगण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला. कबिरांचे घर आणि त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. हे पाहून क्षणभर तो माणूस आश्चर्यचकित झाला. आपल्या समोर आलेल्या कबीर यांना वंदन करून तो नम्रपणे म्हणाला, ”मी अत्यंत दीन आणि दु:खी आहे. तरी यावर काही उपाय असल्यास कृपा करून मला मार्गदर्शन करावे.” काहीही न बोलता कबीर त्या माणसाला घेऊन गावात फिरायला गेले. आपण इथे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो असताना कबीर आपल्याला फिरायला का घेऊन चालले आहेत, हे त्या माणसाला समजेना. फिरता फिरता ते एका विहिरीजवळ थांबले. त्या काळी पाण्याचे नळ नव्हते. लोकांना विहीर किंवा नदीवरून पाणी आणावे लागत असे. मार्गसुद्धा नीट नव्हते. ओबडधोबड, खाचखळग्यांचे किंवा दगडगोट्यांचे होते. एका विहिरीवर काही बायका कपडे धूवत होत्या, तर काही जणी घरी नेण्यासाठी छोट्या-छोट्या घागरींमध्ये पाणी भरत होत्या. पाणी भरून झाल्यावर त्यातील काही बायकांनी आपल्या डोक्यावर एकावर एक अशा पाण्याने भरलेल्या तीन घागरी ठेवल्या आणि आपापसांत गप्पा मारत चालू लागल्या. कबिरांनी त्या माणसाला हे दृश्य दाखवले आणि म्हणाले, ”डोक्यावर पाण्याने भरलेल्या तीन घागरी असतांनाही कशा गप्पा मारत चालल्या आहेत. त्यांना त्या घागरी खाली पडून फुटतील याची भीती वाटत नाही. आपण त्यांना याचे कारण विचारून पाहूया.” आपल्या डोक्यावर पाण्याने भरलेल्या घागरी घेऊन जात असलेल्या काही महिलांच्या जवळ जाऊन कबिरांनी विचारले, ”बायांनो, डोक्यावर घागरी ठेवून तुम्ही अशा तऱ्हेने गप्पा मारत आहात. त्यावर त्यापैकी एका बाईने उत्तर दिले आम्ही गप्पा मारत असलो तरीही आमच सर्व लक्ष त्या घागरीकडे असते.यावर त्या माणसाला कळले संत कबिराला आपणास काय म्हणायचे आहे.बाह्यरंगात कितीही व्याप असला तरी अंतरगात माञ ईश्वरी अनुसंधान असावे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण. १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 💥 जन्म :- १८०९: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन  १९४९: शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ  💥 मृत्यू :-  १९९८: कवयित्री पद्मा गोळे २०००: सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील  २००१: अभिनेत्री भक्ती बर्वे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राजधानी दिल्लीत केले एका दिवसाचे उपोषण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्यांक आयोगाला तीन महिन्यात देशातील अल्पसंख्यांकाची व्याख्या निश्‍चित करण्याचे दिले आदेश * •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *शेतामध्ये काम करत असताना अपघात घडल्यास जखमी शेतमजुरास किंवा मृत शेतमजुराच्या वारसास यापुढे शेतमालकाला नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान किंवा मृताच्या वारसाला द्यावी लागणार नोकरी.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : महाराष्ट्रात आप लढविणार १० जागा, आम आदमी पक्षाने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *इपीएफओ आपल्या सहा कोटीहून अधिक अंशधारकांसाठी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निधीवरील ८.५५ टक्के व्याज दर कायम ठेवण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरू करुन हे काम एक महिन्यात पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागांना स्पष्ट सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *एफसेंट ल्युसिया : वेस्ट विंडीज आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटीत इंग्लंड संघ मजबूत स्थितीत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाऊलवाट भाग 10 आराम हराम है ।* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/10.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *अभिनेता प्राण* प्राण किशन सिकंदर ऊर्फ प्राण हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते होते. प्राण यांचे वडील कंत्राटदार असल्यामुळे गावोगावी फिरत असत. प्राण हे रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या रामपूर येथून मॅट्रिक पास झाले. पुढे न शिकता त्यांनी दिल्लीत कॅनॉट प्लेसजवळील दास फोटोग्राफी स्टुडिओ या दुकानात नोकरी धरली. दाससाहेबांनी दुकानाची लाहोरला शाखा काढली आणि प्राणला तेथे नेमले. दुकानातले काम संपले की एका ठरावीक उपाहारगृहात प्राण आणि त्यांच्या मित्रांची मैफिल रंगायची. एके दिवशी एक मुमताज शांती या त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे पती, आणि दलसुख पंचोली या चित्रपट निर्मात्याचे पटकथा लेखक वली हे प्राणच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी त्याला चित्रपटात काम देण्याची पक्की ऑफर दिली. दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायला सांगितले. मात्र प्राणसाहेबांनी या बोलावण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना चित्रपटात काम करण्याची मुळीच हौस नव्हती. नोकरीत मिळणारे २00 रुपये त्यांना पुरेसे वाटत होते. आठ दिवसांनी परत वली प्राणला भेटले, त्याला खूप बोलले आणि स्टुडिओत का आला नाहीस म्हणून जाब विचारला. प्राणसाहेब म्हणाले, मला काय माहीत की ही ऑफर खरी आहे? मात्र त्यांनी दुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायचे कबूल केले. पंचालींसमोर उभे राहिल्याबरोबर त्यांनी प्राणला 'जट यमला'या पंजाबी सिनेमासाठी करारबद्ध केले आणि हातावर आगाऊ म्हणून ५0 रुपये ठेवले. त्यांनी भारतीय चित्रपटसुष्टीत ७0हून अधिक वर्षे घालवून ४00हून अधिक चित्रपटांत अभिनय केला आहे. खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात इ.स. १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. दिलीप कुमार, राज कपूर, अशोक कुमार, बलराज सहानी यांच्याबरोबर काम करताना आपले शिक्षण आणि वाचन कमी असल्याचे प्राण यांना जाणवले. आपल्याला रंगमंचावर काम करण्याचा अनुभव नाही, त्यामुळे असल्या नायकांबरोबर टिकून राहायचे असेल तर खूप मेहनत केली पाहिजे, आणि आपल्या भूमिकेत वेगळेपणा आणला पाहिजे याची त्यांनी खूणगाठ बांधली. मग ते पटकथा लेखकांशी आणि दिग्दर्शकांशी चर्चा करून भूमिका समजावून घेऊ लागले आणि आपल्या परीने त्यांत लकबींचा वापर करू लागले. 'जिस देश में गंगा बहती है'मध्ये राकाच्या मनातली फाशीची भीती दाखवणारी गळ्यावरून बोट फिरवायची त्यांची लकब राज कपूरला खूप आवडली. अशाच वेगवेगळ्या लकबी त्यांच्यातील खलनायकाने चित्रपटांमधून वापरल्या. प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटांतील खलनायकाला 'स्टार' बनवले. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) 'आनंदभुवन' हे पर्यटनस्थळ कोणत्या शहरात आहे?*  प्रयागराज *२) वाचन प्रेरणा दिन कधी साजरा करतात?*  १५ ऑक्टोबर  *३) मे २०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला?* बाबासाहेब पुरंदरे *४) किरगीज लोकांचे मुख्य पेय कोणते?* क्युमीस *५) सशक्त सैन्याच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?*              तिसरा *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनील कवडे ● रविंद्र दुबिले ● विनोदकुमार भोंग ● अशोक शिलेवाड ● विजयकुमार पवारे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दिशा* विचारा वरून कळते की दिशा काय आहे लक्षात येते लगेच की भविष्यात दशा काय आहे चांगले काम करणाराला कशाची आशा रहात नसते योग्य दिशा असली की कधीच दशा होत नसते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर सतगुर ना मिल्या , रही अधूरी सीश | स्वांग जाति का पहरी कर , घरी घरी मांगे भीष || अर्थ : महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे. गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान आत्मघातकी ठरतं. ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला. अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात. प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्यातील अहंकाराने आपल्या  रागावर नियंत्रण कधीच ठेवता येत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनात अनेक कटू प्रसंग ओढवले जातात.त्या काळात काय होत आहे याचेही भान राहत नाही.जेव्हा आपल्यातील राग संपून जातो तरी अहंकारमात्र तसाच चिटकून राहतो. पुन्हा पुन्हा आपल्यातील अहंकार जागा होऊन तीच ती कृती करण्यासाठी प्रेरणा देतो.त्यामुळे आपल्या जीवनात खूप काही नुकसान सोसावे लागते.म्हणून आपला राग आणि अहंकार नष्ट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्यातील अहंकाराला तिलांजली द्यायला हवी नंतर आपोआपच आपल्यातील राग नष्ट होईल आणि हे दोन्ही आपल्या जीवनातून गेले की, जीवन सुखावह होईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *इच्छाशक्तीचा बळावरच यश मिळविणे.* केवळ सव्वा वर्षांची असताना मेंदुज्वरामुळे दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमावलेली एक मुलगी आज जगविख्यात लेखिका म्हणून नावारूपाला आली आहे. तुम्हाला हा चमत्कार वाटत असेल तर, त्याची जनकही हीच मुलगी आहे. हेलेन केलर असे या मुलीचे नाव.  आपल्या केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तिने आपल्या कठीण मानल्या जाणार्‍या आजारालाही नियंत्रित केले. ज्या वयात तिचे खेळायचे-बागडायचे दिवस होते, त्या वयात तिच्या पुढ्यात केवळ अंधार होता.  आजारामुळे तिला सुरुवातीला नैराश्य आले होते. तिच्या पालकांनी मग तिची जबाबदारी एनी सुलियन यांच्याकडे सोपवली. अगदी ब्लॅक चित्रपटात अमिताभ ज्या पद्धतीने राणी मुखर्जीला स्पर्शाची भाषा शिकवतो. अगदी त्याच पद्धतीने एनीने हेलेनला स्पर्शाची भाषा शिकवली.  यानंतर एनीने तिला भाषा शिकवण्यासाठी जिवाचे रान केले. तिला प्रथम हाताने भाषा शिकवत शब्दांचे अर्थ तिला समजावले. यानंतर हेलरच्या मनात नवीन उमेद जागी झाली. हेलरने यानंतर कधीही मागे वळून पाहायचेच नाही हे ठाम केले.  तिच्यात एक अशी ऊर्जा निर्माण झाली, की या ऊर्जेने तिला नवीन दृष्टी दिली, आणि ही ऊर्जा होती तिच्या इच्छा शक्तीची. या बळाच्या आधारेच तिने रेडक्लिफ महाविद्यालयातून आपली पदवी मिळवली. या दरम्यान हेलेनचे पहिले पुस्तक 'द स्टोरी ऑफ लाईफ' प्रकाशित झाले. यानंतर याचे जवळपास 50 भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर करण्यात आले.  इथे हेलन यांच्या केवळ इच्छाशक्तीचाच विजय झाला. त्यांनी बालपणातच जर हार मानली असती तर जगाला इतकी प्रतिभाशाली लेखिका मिळालीच नसती. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या बळावरच आपण विजय मिळवू शकतो हे विसरता कामा नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर. 💥 जन्म :- १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. 💥 मृत्यू :- १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्राने रेशीम शेती उद्योग क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्राला उदयोन्मुख राज्याचा पुरस्कार केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *किसान सन्मान योजना मोदींसाठी डोकेदुखी; केंद्र सरकारची लोकसभा निवडणुकीपूर्वी घाई* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *राजस्थानमध्ये आरक्षणासाठी गुर्जर समाजाचं आंदोलन सुरूच* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्र सरकार राज्यांकडून हिशेब मागत असल्यानं राज्य सरकार टेन्शनमध्ये आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कडाक्याच्या थंडीने महाबळेश्वर गोठलं, परभणीमध्ये 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हॅमिल्टन : स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *हॅमिल्टन : यजमान न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करताना विजय मिळवला. न्यूझीलंडने तिसरा सामना 4 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रिय वाचक सप्रेम नमस्कार विनंती विशेष https://drive.google.com/file/d/14-L8iLJCkuh-hmQVdFop15I9B-cn-B-n/view?usp=drivesdk *आज सोनियाचा दिन* हे वाचण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करावे. माझ्या आगामी येत असलेल्या ई बुकबद्दल विचारधनचे लेखक श्री संजय नलावडे, मुंबई यांचा शुभेच्छा संदेश खालील लिंक वर वाचन करता येईल. https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_47.html आपण ही शुभेच्छा संदेश माझ्या क्रमांकावर पाठवावे. ही विनंती. - नासा येवतीकर, स्तंभलेखक 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *पंडित दीनदयाळ उपाध्याय*        दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक व विचारक होते. ते संघटनकार्य करणारे होते. ते उत्तम लेखक होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान गावात झाला. त्यांनी पिलानी, आग्रा व प्रयाग येथे शिक्षण पूर्ण केले.नंतर मात्र ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. ते संघाचे प्रचारक होते.१९५१ मध्ये अखिल भारतीय जनसंघाचे मंत्री बनले. पुढे १९५३ मध्ये त्यांना जनसंघाचे महामंत्री बनवण्यात आले. त्यांनी तब्बल पंधरा वर्षे हे पद सांभाळले. कालीकतच्या अधिवेशनात ते जनस्ंघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १८६७ च्या सुमारास जनसंघाचे प्रमुख बनले. १९६८ मध्ये प्रखर राष्ट्रवादी नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा मृत्यू.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) विद्युत प्रवाह मोजणारं उपकरण कोणतं?*           अँमीटर *२) जगातील पहिली भुयारी रेल्वे कोठे सुरू झाली?*           लंडन *३) बर्म्युडा ट्रँगल हे भौगोलिक ठिकाण कोठे आहे?*             उत्तर अटलांटिक महासागर *४) वादग्रस्त तेलंगणाप्रकरणी केंद्र सरकारने कोणती समिती नेमली होती?*             बी.एन.श्रीकृष्ण समिती *५) डायलिसिसचा उपयोग कधी होतो?*            मूत्रपिंडाच्या विकारात              *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ प्रमोद शिंदे ◆ दत्तात्रय दळवी ◆ म. जावेद ◆ रविशंकर बोडके ◆ माधव हिमगिरे ◆ ज्ञानेश्वर पलिकोंडलवार ◆ राणी पद्मावार ◆ प्रभाकर बेरजे ◆ कृष्णकांत लोणे ◆ शिवराज हलीखेडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *नाटकं* दिखाव्या करता ते शुद्ध नाटकं करतात काही क्षण लोकांच्या मनात हिरो ठरतात दिखावा ताबडतोब ओळखला जाऊ शकतो खोटं कितीही रंगवा प्रेक्षक काही काळच पाहू शकतो    शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••,     *आधीं फळासी कोठें पावो शके ।*      *वासनेची भिकेवरी चाली ।।*      *तुका म्हणे राजहंस ढोरा नाव ।*      *काय तया घ्यावे अळंकाराचें  ।।* *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर?  ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना  माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• जो रोऊ तो बल घटी , हंसो तो राम रिसाई | मनही माहि बिसूरना , ज्यूँ घुन काठी खाई || अर्थ : सांसारिक जीवन षड्विकारांनी भरलेलं आहे. मोह , माया, मद, मत्सर, भय, मैथुन हे ते षड्विकार. यांनी जीवनातला परमानंद हिरावून घेतला आहे. ठायी ठायी करावी लागणारी तडजोड वारंवार मानवतेच्या विवेकशील सत्य मार्गापासून भरकटवून टाकते. त्यामुळे होणार्‍या यातना असह्य होतात. त्यामुळे रडकुंडीला येतो. रडायचं ठरवलं तर जगाच्या नजरेत भित्रा ठरण्याची भय. चालतोय तोच मार्ग योग्य आहे असे समजून हसायला लागलो तर ती वाट सत्याशी व अंतरात्म्याशी गद्दारी करणारी. अशा द्वंद्वात अडकून आगतिकपणे जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्नही अधिकच बेचैन करतोय. मनाला शांती मिळत नाही. सतत अस्वस्थ वाटायला लागतं. एखाद्या मजबूत व भक्कम लाकडाला वाळवी लागावी आणि तिने त्या लाकडाला आतून कुरतडून काढावे. अशी गत झाली आहे संसारी. अशी घुसमट करून घेण्यापेक्षा ताठ मानेने जगायचे तर सत्याचा अंगीकार करून विवेकपूर्ण जगायला हवे. त्यायोगे आपलं नाणं खणखणीत राहील. सारवासारवी व बणवाबनवी असा कधी प्रसंगच येणार नाही . अंतरात्म्याकडूनही प्रताडणा होणार नाही. आंतरिक समाधान आपोआपंच चेहर्‍यावर विलसायला लागेल.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील. पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते का ? नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे.आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जनीं सर्वसूखी असा कोण आहे। विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥ मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *आयुष्याची खरी किंमत* एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी  किंमत काय असते हो? " आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली . तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ  अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत  तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "  मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार." त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा. इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका.  तात्पर्य  :- मनुष्य या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत. तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/02/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. 💥 जन्म :- १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- १९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे. २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. २००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची शक्यता, जीव देईन पण तडजोड करणार नाही - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *केंद्राप्रमाणे राज्यातही अराखीव प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) सदस्यांनाही किमान ३००० रुपयांचे निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कांदा अनुदानास ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ ग्राहय़ धरणार - सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अण्णा हजारे उपोषणावर ठाम; केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरेंसोबतची चर्चा अर्ध्यावरच सोडली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठी अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन, ते 70 वर्षाचे होते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने ४-१ ने जिंकली, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांनी केले संघातील आपले स्थान पक्के* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *कथा - बदल्याचा बळी* वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_2.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *विष्णुबुवा जोग* विष्णु नरसिंह जोग (जन्म : पुणे, १४ सप्टेंबर १८६७ - ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्‍न करणारे सत्पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ असून लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चाहते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत. विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना तीन मोठे भाऊ होते. त्यांतील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबांबरोबर आळंदीला जाऊन जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी कुठल्याही फडाचा आश्रय न घेता, आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून तीच आपल्या गळ्यात घातली व आपण वारकरी झाल्याचे घोषित केले. जोग महाराजांची ही क्रांती त्यांच्याच पाच-दहा शिष्यांपुरती (ज्यांच्यात प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडकेही होते) मर्यादित राहिली असती, किंवा कदाचित त्यांचाच एक स्वतंत्र फड निर्माण झाला असता; पण आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थास्थापन केली व वारकरी संप्रदायाच्या वाढीची क्षमता अमर्याद केली.     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) झाकिर हुसेन या कलाकाराचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे?* तबला *२) एस्किमोंचं घर कशापासून बनलेलं असतं?* बर्फ *३) श्रीलंकेत सर्वाधिक प्रमाणात वास्तव्यास असणारा समाज कोणता?* सिंहली *४) भारताची समुद्रसीमा किती किलोमीटर लांबीची आहे?* ७५०० कि.मी. *५) घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?*              राजस्थान *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सौ. रंजना जोशी ● सदाशिव मोकमवार ● निलेश गोधने ● भीमराव वाघमारे ● संदीप मुंगले ● श्याम राजफोडे ● विठ्ठल पेंडपवार ● बालासाहेब कदम ● अच्युत पाटील खानसोळे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाहिरात* जाहिरातीत खोटं ते खरं असे ठसवले जाते  खोट्याला खरं म्हणून  डोक्यात बसवले जाते  विश्वसनिय वाटणारीही  जाहिरात फसवी असते  जाहिरात म्हणजे फक्त  खिसे उसवा उसवी असते      शरद ठाकर    सेलू जि परभणी    8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.*  *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.*  *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*          ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     कबीरा ते नर अन्ध है, गुरु को कहते और । हरि रूठे गुरु ठौर है, गुरु रुठै नहीं ठौर ॥ अर्थ: महात्मा कबीर गुरूंची महत्ती सांगताना म्हणतात की जो माणूस गुरुचे जीवनातील महत्व जाणत नाही , जो गुरूचा अनादर करतो. तो डोळे असूनही आंधळाच समजला पाहिजे. कठीण समयी आपणास देव व दैवाची साथ मिळत नसली तरी आपणास त्या कठीण व नाजूक अशा विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी गुरूच मदत करीत असतात. जर का गुरूनेच साथ सोडली तर मात्र भूतलावर कोणीही साथ देत नाही. कारण ईश्वराकडे जाण्याचा मार्गच गुरूपासून सुरू होतो, तर गुरूकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत घ्यायची गरज असतेच कुठे ? मात्र ईश्वर जाणायचा असेल तर गुरूचे महत्व अनन्य साधारण आहे. दाखलेच पाहायचे झाले तर इथल्या व्यवस्थेनं ज्याचं शिक्षण नाकारलं, त्या महाभारतातील एकलव्याचं उदाहरण पहा. गुरूचा पुतळा करून त्याच्यासमोर स्वयं अध्ययनाचे धडे गिरवून सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून लौकिकास पात्र होतो. रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र दत्त ही गुरू शिष्याची जोडी पाहता विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणार्‍या नरेंद्राला अध्यात्माचा बोध देवून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारे विवेकवादी भारतीय तत्त्वज्ञान जगाला देणारा नरेंद्राचा विवेकानंंद परमहंसानी घडवला. हे गुरूचं अदृश्य सामर्थ्य असतं. आदर्श विद्यार्थी एकलव्याचं शिक्षण नाकारणं, इथल्या खेकडा प्रवृत्तीच्या धर्माच्या ठेकेदारांनी विवेकानंदांच्या भाषणाला विरोध करणं ही इथल्या व्यवस्थेच्या तोकडेपणाचीच उदाहरणे म्हणावी लागतील. गुरू मात्र आपल्या शिष्याला मजबुतीनं उभं करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. हे विसरून कसं जमेल.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *लोभी माणूस* एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.'' तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ? *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 04/02/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक ब्रेल दिन* *जागतिक कर्करोग दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९४४-श्रीलंका या देशाला स्वातंत्र्य मिळाले. २००४-मार्क झुकरबर्ग ने फेसबुकची स्थापना केली. 💥 जन्म :- १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. १९७४-अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 💥 मृत्यू :- १९७४-भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : सरकारने अण्णा हजारें यांच्या जीवाशी खेळू नये; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली: महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारल्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस देशभरात अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात निदर्शने करणार* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *उल्हासनगर : मेमसाहेब इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *येत्या आठ तारखेपर्यंत जर केंद्र सरकारने मागण्या मान्य केल्या नाही, तर पद्मभूषण सन्मान परत करण्याचा अण्णा हजारो यांचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तामिळनाडू - के. एस.अलगिरी यांची तामिळनाडू काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई : आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय भोयरने बाजी मारली. त्याचबरोबर मिस आशिया या स्पर्धेतही भारताच्या मंगला सेनने सुवर्णपदकाला गवसणी घातली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड :  पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *पालकांचे मुख्याध्यापकास पत्र* http://prajawani.in/news_page.php?nid=1342 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *लुई ब्रेल* जागतिक ब्रेल दिन ४ जानेवारीला लुई ब्रेल यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. बालपणाच्या अपघातानंतर त्यांना अंधत्व आले आणि त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ब्रेल भाषेचा शोध लावला. याच भाषेमुळे जगभरात आंधळ्या लोकांना लिहिता आणि वाचता येते. ब्रेल हा एक कोड किंवा लिपी आहे ज्यात अक्षरे दर्शविण्यासाठी पृष्ठभागावर अडथळे आणि खाचा यांचे मिश्रण करून वापरले जाते. हा कोड स्पर्श करून समजाला जातो. ब्रेलने कोडचा शोध लावण्या आधी, दृष्टिहीन लोक हाऊ प्रणालीचा वापर करून वाचन आणि लिखाण करत असे. जाड पेपर किंवा लेदरवर लॅटिन अक्षरे उभारऊन होऊ कोड तयार केला जात असे. ही खूप कठीण प्रणाली होती जिथे पुष्कळ प्रशिक्षण आवश्यक होते आणि सामान्य लोकांना केवळ वाचणे शक्य होते. यामुळे निराश होऊन लुई ब्रेल यांनी वयाच्या १५ व्या वर्षी ब्रेल कोडचा शोध लावला. ब्रेल कोड लहान आयताकृती ६ टिपक्यांमध्ये बनवण्यात येतो. ३ गुणीले २ च्या नमुन्यात असलेले ठिपके सेल म्हणून संबोधले जातात. प्रत्येक सेलमध्ये एक अक्षर, संख्या किंवा विरामचिन्हे दर्शविले असते. ब्रेल हा जगभरात ओळखणारा कोड असल्यामुळे, सर्व भाषा, गणित, संगीत आणि संगणक प्रोग्रामिंग असे जवळ जवळ सगळेच विषय ब्रेलमध्ये वाचता आणि लिहीता येतात.  *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आळशी माणुस शुभ दिवसाची वाट बघत असतो आणि जो कष्ट करतो त्याच्या साठी प्रत्येक दिवस शुभ असतो *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) अंटाक्र्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं?* माऊंट विन्स्टन *२) कॅशलेस व्यवहारांसाठी 'डिजिटल डाकिया' ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?* मध्य प्रदेश *३) ऑलिंपिक ज्योत समारंभपूर्वक स्टेडिअमच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यास कधी सुरुवात झाली?* १९२८ *४) 'अँन अनसुटेबल बॉय'चे लेखक कोण?* करण जोहर *५) ओझोनचं आवरण कशाला रोखतं ?* अतिनील किरणोत्सार *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● मोहन रेड्डी ● संजय गायकवाड ● गोविंद राखेवार ● शेख इरफान ● राजरेड्डी गडमोड ● अहमद शेख ● शेख समीर ● शंकर कुऱ्हाडे ● कृष्णा तिम्मापुरे ● विलास थोरमोठे ● राजू माळगे ● आतिष पाटील ● भास्कर यमेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *लक्षण* नाव मोठे अन् लक्षण खोटे असतात मोठे वाटणारांचे मन मात्र छोटे असतात दिसत त्या पेक्षा सारे वेगळे असते विश्वास बसणार नाही असे हे सगळे असते   शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *पावसाळा म्हणजे सृष्टीत चौफेर कसे चैतन्य भरलेलं असतं. नानाप्रकारचे चैतन्यकिडे, हिरव्या हिरव्या झुडपांमध्ये, नाजुक नक्षीदार वेलींवरती कसे मस्त रमलेले दिसतात. पानांआड लपून एकसारखा झीणझणझण आवाज हा ऐकायला येतो. पण एक दृष्टीभेट मात्र अलभ्य. एका वेलीच्या पानावर बघा कशी अंडी घातली होती. त्या अंड्यातल्या जीवाला मायेची ऊब देत एक मादी बसली होती. पण तेवढ्यात एका पक्षानं अचूक नेम धरला...बघता बघता किटक मादी बिचारी आकस्मिकपणे आपल्या न जन्मलेल्या जीवांना सोडून गेली. जीव बिचारे अनाथ पोरके झाले. पण त्यांना आधार होता तो हिरव्यागार पानांचा.* *मानवेतर प्राण्यांमध्ये जन्ममृत्यूचा हा खेळ असा आकस्मिक घडत असतो. हिरव्या पानांच्या उबदार पाळण्यात अंडी सुरक्षित होती. त्या अंड्यांतून जीव जन्माला येईल. जगण्याची एकाकी धडपड त्या जीवाची सुरू होईल. अल्पकाळ का होईना आईच्या प्रेमाची उब त्या अंड्यातल्या जीवाला मिळाली. कदाचित हीच निसर्गाची शिकवण असावी. एकटंच यायचं या जगात. जगायचा संघर्षही एकट्यानेच करायचा. त्या जगण्याचा भरभरून आनंदही घ्यायचा आणि एकट्यानेच परतायचं. हेच खरं जीवनाचं सूत्र.* *कवीने म्हटल्यानुसार या बिनभिंतीच्या शाळेत, अर्थात निसर्गात जशी वैविध्यपूर्ण समृद्ध उधळण असते, तशी मैत्रीची भावना देणारी ऊबही मिळते आणि गुरूसारखी शिकवणसुद्धा. त्यामुळे हेच खरं जगण्याचं सूत्र, असं म्हणणं संयुक्तिक नाही का ?*     ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸         *संजय नलावडे, मुंबई*        *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ऊँचे पानी ना टिके , नीचे ही ठहराय | नीचा हो सो भारी पी , ऊँचा प्यासा जाय || अर्थ : माणसाला नम्रतेने व शालीनतेने ज्ञानाची प्राप्ती करता येते . गुरूसोबत नम्रतेने वागायला पाहिजे. ताठर ,उद्धट व मी पणाचा अहंकार मिरवणार्‍याला गर्विष्ठपणाशिवाय काही प्राप्त करता येत नाही.उगाच फुशारकीचा रिकामा ताठा मिरवणार्‍याचा भ्रमाचा फुगा फार काळ टिकत नाही. वाकणार्‍या नरम लोखंडालाच हवा तसा आकार देता येतो . पोलादाचा ताठरपणा त्याचे तुकडे व्हायला कारण ठरतो. महात्मा कबीरांनी सुंदर दाखला देत सांगितलंय की पाणी उंच जागेवर कधी थांबतं का? ते सदैव खोलगट जागेकडं धाव घेतं व तिकडंच वास्तव्य करतं. उंच माळरानावर व हवेत वावरणार्‍यांना तहाणेनं तरमळावं लागतं. मात्र खोलगट, सखल जागी वस्ती करणार्‍याला पावसाळ्यात थोडे कष्ट जरूर परंतु उन्हाळ्यात भरपेट पाणी मिळतं. त्याची तहाण भागते.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        काही लोकांचा स्वत:कडे आणि दुस-याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो ते पहा.स्वत:च्या बाबतीत काही बरेवाईट घडले तर तो आपले नशीब म्हणून स्वीकारतो.आपल्या नशिबात होते त्याला काय करणार असे म्हणतो.तर इतरांच्या बाबतीत काही बरेवाईट घडले तर तो म्हणतो की,त्याच्या कर्माचे त्याला फळ मिळाले म्हणून त्याला भोगावे लागत आहे.कर्म आणि नशीब यांचा संबंध तो आपल्या मनातल्या वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवून त्याचे मंथन करुन लोकांसमोर मांडतो.तेव्हा त्याच्या मनाचीच एक विकृत अवस्था पहायला मिळते.असा विचार न करता कोणतीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला सामोरे जाऊन धैर्याने तोंड द्यायला शिकले पाहिजे अशी प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे. जीवनात समस्या, संकटं तर येणारच.त्याला नशीबावर किंवा कर्मावर न लोटता आपल्या जीवनाचा तो एक खडतड प्रवास आहे.त्या प्रवासातून आपण चांगला मार्ग शोधून काढून ब-यावाईट गोष्टीतून जीवन जगायला शिकले तरच जगण्याचे खरे कौशल्य आणि महत्त्व कळेल.मग जग कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही.कोणत्याही संकटाला न घाबरता माघार न घेता तेवढ्याच हिमतीने आणि कौशल्याने मार्ग काढून जीवन जगायला शिकले पाहिजे तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल.मग कोणीही आणि कसाही अर्थ काढू द्या.त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही.त्यांची आपल्याकडे पाहण्याची विकृत दृष्टी आहे असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष द्यावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥ संकलन - सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *लठ्ठ कोंबडी व बारीक कोंबडी* एका माणसाच्या घरी टोपलीत काही कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यातील एक अगदीच लठ्ठ व एक अगदीच बारीक होती. ती लठ्ठ कोंबडी बारीक कोंबडीची नेहमी चेष्टा करून हिणवीत असे. एकदा त्या माणसाकडे मेजवानी होती. तेव्हा त्याने नोकराला सांगितले की, ''हय़ा कोंबड्यात जी लठ्ठ कोंबडी असेल तिला मारून तिची कढी करा.'' त्याप्रमाणे नोकर जेव्हा त्या लठ्ठ कोंबडीला मारू लागला तेव्हा ती आपल्याच मनाशी म्हणाली, ''मी जर त्या दुसर्‍या कोंबडीसारखी बारीक असते, तर आज माझ्यावर हा प्रसंग नक्कीच आला नसता.'' तात्पर्य : ज्या गोष्टीमुळे माणसाला गर्व येतो तीच गोष्ट दु:खाला पण कारणीभूत होऊ शकते हे विसरू नये. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/02/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्‍याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन. 💥 जन्म :- १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य. २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सादर केला अर्थसंकल्प 2019* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पाच लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारने मध्यमवर्गींयांना दिले गिफ्ट.* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *रामायण महाकाव्याने जगाला मूल्ये व नवी दिशा दिली. हाच विचार जगभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पोस्ट आणि बँकांमधील बचतीवरील 40 हजारांपर्यंतचे व्याज करमुक्त होणार - पीयूष गोयल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *डहाणू - शुक्रवारी सकाळपासून डहाणूत भूकंपाचे पाच भूकंपाचे धक्के, पाचवा धक्का काल दुपारी जाणवला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बंगळूरुतील एचएएलच्या विमानतळावर शुक्रवारी सकाळी मिराज 2000 हे लढाऊ विमान कोसळून दोन पायलटांचा मृत्यू झाला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधीच दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना आठ गड्यांनी गमावला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बोलण्याचे संस्कार* आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अण्णासाहेब पटवर्धन*        अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे नाव जानकीबाई असे होते. ४ मे १८४७ रोजी अण्णासाहेबांचा जन्म झाला. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने त्यांचे नाव विनायक असे ठेवण्यात आले. अण्णासाहेब १०-१२ वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. ज्या काळात अण्णासाहेबांचे शालेय शिक्षण झाले तो काळ राजकीयदृष्ट्या अत्यंत बिकट होता. १८५७चे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी मोडून काढले होते व त्यामुळे इंग्रजांची सत्ता बळकट झाली होती. या वातावरणात अण्णासाहेब १८६४मध्ये मॅट्रिक झाले. पुढे १८६८मध्ये अण्णासाहेब डेक्कन कॉलेजमधून बीए झाले. नंतर मुंबईत ‘एलएलबी’साठी प्रवेश घेतला. आपले मित्र अण्णा मोरेश्वर कुंटे यांच्या आग्रहाखातर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ‘एलएमअँडएस’साठी प्रवेश घेतला आणि एकाच वेळी दोन्ही परीक्षांचा अभ्यास सुरू केला. याबरोबर मुंबईत त्यांच्या सामाजिक कार्यासंबंधी उलाढाली चालूच असत. सुरुवातीचे काही दिवस त्यांनी न्या. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित यांच्याबरोबर स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह याबद्दल खूप काम केले; परंतु थोड्याच दिवसात या सुधारक लोकांचे व त्यांचे मतभेद झाले. राजकारण, सामाजिक कार्य याबाबत ते लोकमान्य टिळकांशी गुप्त मसलती करत. १९१७ मध्ये माघ शु. ११ या तिथीला अण्णासाहेब जग सोडून गेले. ओंकारेश्वजवळ नदीपात्रालगत त्यांचे अंत्यसंस्कार झाले. त्याजागी लोकमान्यांच्या पुढाकाराने समाधी बांधण्यात आली. दर वर्षी माघ शुद्ध पंचमी ते एकादशी या काळात त्यांचा समाधी उत्सव साजरा होतो. या वर्षी अण्णासाहेबांना जाऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या स्मृतीला अभिवादन     *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आरसा हा आपला सर्वोत्तम मित्र आहे कारण आपण जेव्हा रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *१) पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?* पत्रकारिता, साहित्य, संगीत *२) लोसांग नामक उत्सव कोणत्या देशात साजरा होतो?* तैवान *३) फोबोस हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे?* मंगळ *४) ऋतू प्रवास ही संकल्पना कोणत्या जमातीत आहे?* भूतिया *५) 'थर्ड आय' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?*              क्रिकेट *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ∆ डॉ. देविदास तारू ∆ विनोद गुडेटवार ∆ गजानन वासमकर ∆ राजू जगदंबे ∆ पोतन्ना चिंचलोड ∆ कामाजी पाटील ∆ किरण बासरकर ∆ संदीप वंजारी ∆ शंकर गोपत वाड ∆ पोतन्ना लखमावाड ∆ चेतन घाटे ∆ बालाजी गोजे ∆ संजय ढगे ∆ रुकमाजी भोगावार ∆ साहेबराव वानखेडे ∆ मल्लेश गुंटोड ∆ रवी नंदगमलू ∆ दत्ता लिंगमपल्ले ∆ चक्रधर ढगे ∆ शिवाजी कौठकर ∆ रोहित लकडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाटेकरी* अपयशाच खापर दुस-यावर फोडतात आपली जबाबदारी लोकांवर सोडतात जबाबदारी झटकून दूर पळता येत नसते अपयशाचे वाटेकरी कोण माहित होत असते शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपण मित्राला बोलतो, 'उद्या मला सकाळी फोन कर, मग आपण ठरवू या.' असं म्हणताना आजची रात्र सुखरूप पार करून उद्याची सकाळ आपण अनुभवणार आहोत यावर आपला ठाम विश्वास असतो. असे छोटे छोटे विश्वास ठेवल्याशिवाय गाडा पुढे हाकता येत नाही.* *एक बस स्टँडच्या फलाटाला लागते. आपण गावाच्या नावाची पाटी वाचून खात्री करून घेतो आणि बसमध्ये चढतो. तिकीट काढतो. सोबतचा घडी केलेला पेपर उघडून वाचायला लागतो किंवा डोळे बंद करून डुलक्या घेतो. हलणा-या बसमध्ये निवांतपणे खिडकीतून बाहेर बघत बसतो. काही वेळा चिल्लर पैशांवरून कंडक्टरशी वाद होतात. वळण घाटाचा रस्ता पार करून आपल्या थांब्यावर बस आणून सोडते. या सगळ्या प्रवासात बस चालवणा-या ड्रायव्हरचा चेहराही आपण पाहिलेला नसतो. त्या ड्रायव्हरच्या भरोशावर आपण बसमध्ये निवांतपणे बसलेलो असतो. कंडक्टरशी रुपया आठाण्यावरून वाद करणारा प्रवासी स्वत:चा जीव, चेहराही न पाहिलेल्या ड्रायव्हरच्या हवाली करतो. किती विश्वास ठेवतो आपण अनोळखी माणसावर.. 'विश्वास' फार महत्वाचा असतो.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     तन को जोगी सब करे , मन को बिरला कोय | सहजी सब बिधि पिये , जो मन जोगी होय || अर्थ : देहा सुलभ लेपन तुटे कशी रे वासना । सिद्धि होई वशीभूत रोख उधळ्या मना ।। महात्मा कबीरांचं भविष्यवेत्तेपण वरील दोह्यात दिसून येतं. हल्ली माणूस माणूसपण विसरून जाती धर्माच्या आहारी जाऊन मातीशीच गद्दारी करतोय. स्त्री-पुरूष या दोनंच जाती परंतु स्वार्थीपणा, महत्त्वाकांक्षा व सत्ता लोलुपतेने माणसात माणूस राहिलेला नाही. शारीरिक ठेवणीत बदल , मानवात भेद करून अंगाला रंगाने रंगवता येतं. कपड्याचीही विविधता जपणं सोपं आहे. इत्तरांना उपदेश केल्याप्रमााणे खरंच मानवाचे स्वतःचे आचरण असते का ! असा माणूस एखाद दुसराच असतो. ज्याने स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा मिळवलेला असतो. मनालाच योगी म्हणजे विरक्त बनवले आहे. मनाला मोकाट उधळू देत नाही. त्याला मात्र सर्व सिद्धी सहज अवगत झालेल्या असतात.     एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात मौल्यवान वस्तू सांभाळून त्यात वेळ वाया घालवतो, त्यामुळे मानसिक अवस्थाही चलबिचल होते, एवढे सांभाळूनही कधी कधी जीवाला ही धोका पत्करावा लागतो आणि आपली झोपही उडून जाते.हे सांभाळण्यापेक्षा जीवनात चांगली माणसं भेटली तर त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण ती आपल्या जीवनात आलेल्या कोणत्याही संकटकाळात आपल्या मदतीला धावून येतील.तीच खरी आपली मौल्यवान संपत्ती आहे. त्यांना आपल्या जीवनात मौल्यवान दागिण्यापेक्षा अधिक जपायला हवे.त्यांच्यापासून आपल्या जीवीताचे रक्षणही होईल,मन चलबिचल होणार नाही , निवांतही झोप लागेल आणि चांगली माणसे आपल्या जीवनात आली म्हणून समाधानही वाटेल.अशा माणसांना आपल्या काळजामध्ये स्थान देऊन त्यांचे जतन केले पाहिजे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~