✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 .🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.★ १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.★ १९७४ - लॉकहीड एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड (चित्रीत) प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर (~५५७० कि.मी) १ तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.★ १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.💥 जन्म :-★ १८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.★ १९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.★ १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.★ १९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.★ १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.★ १९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.★ १९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-★ ११५९ - पोप एड्रियान चौथा.★ १२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.★ १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.★ १५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.★ १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा गणेशोत्सवाला वेगळाच रंग चढला. देशभरात गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले! टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचं वेतन रोखण्याच्या कारवाईला शिक्षकांकडून उच्च न्यायालयात आव्हान*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणाची घटनात्मक परीक्षा, 13 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अँपची निर्मिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचा 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोव्हिएत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन. ते 91 वर्षांचे होते. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात टीम इंडियाने हाँगकाँगचा 40 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the domestic animal पाळीव प्राण्यांची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/JcL5UTf7DcM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नजर हटी, दुर्घटना घटी*वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालकांची थोडीशी चूक आपल्यासोबत इतरांना संकटात टाकू शकते. अपघातात गमावलेले जीव कधीही परत येत नाही. ....... पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिद्धेश्वर मंदीर - बारामती* बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.सन 1723 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.मंदिराची वैभवशाली परंपरा...बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे. .. विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) साहित्य अकादमीच्या वतीने मराठी भाषेसाठी प्रसिध्द बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांच्या कोणत्या साहित्यकृतीला बहुमान प्राप्त झाला आहे ?२) एका कसोटीत दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या आहेत ?३) क्रांतिकारक राजगुरू यांचे मूळ गाव कोणते ?४) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?५) भारतात नुकतीच उध्वस्त करण्यात आलेली सर्वात उंच इमारत कोणती ?*उत्तरे :-* १) पियुची वही २) ग्रॅहम गुच, इंग्लंड ( पहिल्या डावात ३३३ व दुसऱ्या डावात १२३ धावा - ४५६ धावा भारताच्या विरोधात ) ३) खेड, जि. पुणे ४) प्रतल ५) ट्वीन टॉवर, नोएडा, ३२ मजली *संकलन* जैपाल भै. ठाकूर जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● विजय भगत, वाशीम● प्रल्हाद जाधव● संभाजी कोंडलवाडे● नागनाथ कौडगावे● दिनेश सारंगी● रामेश्वर चिंतलवाड● नवनाथ पिसे● गणेश गिरी, धर्माबाद● सुनिता गायकवाड● आर. के. उन्हाळे● शिवाजी पाटील येडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे whatsapp करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.**माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.**"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."**~~‼॥ रामकृष्णहरी ॥‼~~*🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गणरायाचे आगमन*गणरायाच्या आगमनानेघरात पसरले चैतन्यसुख, समृद्धी जीवनातअजून काय पाहिजे अन्यफक्त दीड दिवसांसाठीगजानन येतो घरीआनंद पसरवून जातोबालगोपालांच्या उरीवर्षातून एकदाच येतोश्री गणेशा हर्षोल्लासातसमाधान देऊन जातोप्रत्येकाच्या तनामनातआबालापासून वृद्धापर्यंतसर्वानाच असते प्रतीक्षासुखदुःखाच्या क्षणीतोच श्री तर करतो रक्षादंगा न करता गणेशोत्सवआनंदात साजरी करू याचला, एका सुरात म्हणू गणपती बाप्पा मोरया .....- नासा येवतीकर, धर्माबाद•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वाहत जाणा-या पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक जीवजंतू,केरकचरा आणि इतर अनावश्यक वस्तूंना पाणी सोबत घेऊन जाते असे पाहणा-यांना वाटते. परंतू पाणी ह्या सा-यांना जेव्हा सोबत घेऊन जाते तेव्हा काही काळापर्यंतच.कारण हे सारे सतत वाहणा-या प्रवाहाबरोबर तग धरु शकत नाहीत.त्यांना माहित असते की,आपण निकामी आहोत आपला काही उपयोग नाही आणि इतरांच्या फायद्याचे आपण नाहीत.त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर तोच प्रवाह आपल्याला बाजूला टाकून पुढे पुढे जाणार आहे.अर्थात पाण्याचा प्रवाह हाच इतरांच्या जीवनासाठी उपयोगी येणार आहे.जे इतरांच्या उपयोगी येणार आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहू शकते.पाणीजसे सर्वांसाठी संजीवन आहे त्याचप्रमाणे चांगली सज्जन माणसे देखील समाजातील आपल्या चांगल्या विचारांबरोबर इतरांना घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करत असतात.जी कच-याप्रमाणे अर्थात वाईट वर्तन असणारी माणसे सज्जनांच्या सहवासात मिळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते जमत नाही आणि जुळवूनही घेत नाहीत ती माणसे आपोआपच बाहेर पडतात.अशा कचरारुपी वाईट माणसांना आपल्या प्रवाहात घेऊनही जर सुधारत नसतील तर त्यांना बाजूलाच ठेवून पुढे जाणे हे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ*एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते.त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता.त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,“तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.”त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा…*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 30/08/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.💥 जन्म :-● १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.● १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी'● १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. ● १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 *9604481084*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईकरासाठी दूध महागलं; सुट्या दुधाच्या किंमतीत पाच रुपयांची वाढ, दूध उत्पादक महासंघाचा निर्णय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भाजपने लोकांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 'अच्छे दिन' आले नाहीत; आकडेवारीचा संदर्भ देत शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तब्बल 151 अशैक्षणिक कामे करावी लागणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा कशी करता; एका शिक्षकाचं आमदार प्रशांत बंब यांना खरमरीत पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस पुण्यात दारु विक्रीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट, पाटण्यात होणार 2024 च्या निवडणुकीवर चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the names of Games खेळांची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/GER_spd2wv0~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधी वंदू तुज मोरया* ...पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....!https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post_83.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ?कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात.आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो.आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते. शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते.आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ग्रामसभेसाठी बायोमेट्रिकचा वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?२) शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती प्रमाणात असते ?३) काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात ?४) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?५) 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले गेले आहे ?*उत्तरे :-* १) मान्याची वाडी, सातारा २) ९ % ३) विशालकोन ४) अमावस्येची रात्र ५) मुंडक उपनिषद*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागभूषण मॅकावाड● नागभूषण दुर्गम, नांदेड● अरुण चव्हाण● गणेश बोळसेकर● दिलीप झरेकर● कृष्णा श्याम दाभडकर● माधुरी हातनुरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?**आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?**"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••गणपती बाप्पाबाप्पाला पाहताक्षणीमनाचा लागतो शोधगणपती बाप्पा माझामला देतो किती मोदत्याच्या येण्याची उत्सुकतामला लागते वर्षभरतो आला वाजत गाजत की उत्साह पसरतो घरभरतयारी चाले आगमनाचीमग काम करी दिवसभरत्याच्याकडे पाहून माझासंपतो सगळा क्रोधगणपती बाप्पा माझामला देतो किती मोदअकरा दिवस चाले त्याची पूजा आराधनारोज वेगळा कार्यक्रमरोज आगळा सामनाबाप्पा खुश व्हावा म्हणूनआम्ही सारे करतो साधनाउत्सवातील सेवा करूनकमी होतो सर्वांचा रोधगणपती बाप्पा माझामला देतो किती मोद- ना. सा. येवतीकर, विषय शिक्षककन्या शाळा धर्माबाद 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063.🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे*डाॕ.अब्दुल कलाम यांच्या वडिलांची शिकवणस्वातंत्र्यानंतर डाॕ.अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले.कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले.ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 27/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान💥 जन्म :-◆१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक◆ १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय मल्ल.◆ १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू◆१९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री💥 मृत्यू :-●१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या पाथर्डीत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने काढला मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिवसेनेची थेट संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय युती*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणाऱ्या आरोग्य विभागातील गट क च्या भरतीचे वेळापत्रक जाहीर, 15 आणि 16 ऑक्टोबरला गट क या पदांसाठी घेतली जाणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या 29 ऑगस्ट 2022 रोजी रिलायन्सची होणारी ही 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये मुकेश अंबानी 5G सेवा कधीपासून उपलब्ध होईल याची घोषणा करु शकतात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नरेंद्र मोदी हेच 'विश्वगुरू'; 75 टक्के रेटिंग मिळवून लोकप्रियतेत 'जगात भारी'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आज निवृत्त होत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*विविध आकाराची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jgUSyrEp3os~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आईचा श्याम - लघुकथा*श्याम नावाच्या एका संस्कारी मुलाची कथा,जरूर वाचाhttps://m.facebook.com/story.php?story_fbid=4017979838328760&id=100003503492582प्रतिक्रिया जरूर comment करा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ लेखन - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम.'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय.असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत ?२) भारतात पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?३) चंद्रशेखर आझाद ( तिवारी ) यांचा जन्म केव्हा झाला ?४) दिशा पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?५) कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी कोणाच्या नावावर आहे ?*उत्तरे :-* १) सुधीर मुनगंटीवार २) ८४ % ३) २३ जुलै १९०६ ( भाबर, मध्यप्रदेश ) ४) होकायंत्र ५) डॉन ब्रॅडमन ( पहिल्या ८० डावात ९९.९४ सरासरी )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संतोषजी बदरखे ● अतुल वैद्य● दत्तप्रसाद सुरुकुटवार● प्रशांत वीरभद्र रुईकर● दिगंबर सोळंके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर' कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.**कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मैत्री तुझी माझी*मैत्री तुझी माझीआरसा नितळ,दिसे प्रतिबिंबअगदी निर्मळ...संकटात नित्यधावते वेळीच,तुझी आणि माझीमैत्री वेगळीच...नाते ग आपले हे जगावेगळे, बंध हे मनाचेआहेत आगळे...मनातील माझ्याओळखते कशी,आहे अशी मैत्रीही बावनकशी...जन्मोजन्मी हीचमैत्रीण मिळावी,सुखी माझी सखीसदैव असावी...मैत्रीचा हा हातहाती राहो नित्य,अखंड ही मैत्रीहेच खरे सत्य...© सौ.गौरी शिरसाट मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही.त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समर्पण*एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 26/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर💥 जन्म :-◆१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित◆१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ◆ १९४४ : अनिल अवचट लेखक व सामाजिक कार्यकर्ते💥 मृत्यू :-◆१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक◆१९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक◆१९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू◆१९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते◆ २०१२ : ए. के. हंगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिकसंकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये आर्थिक मदत देणार, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नोंदणीकृत स्कूल बसशिवाय विशिष्ट स्कूलबससाठीची सक्ती शाळांना महागात पडणार, अशा शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी होणार, सरकारची माहिती*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *घोषणाबाजी आणि अभूतपूर्व गोंधळामुळे गाजलेल्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *घटनापीठासमोर होणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिश्चिततेचं सावट, ठाकरे आणि शिंदे गटातील वादावरच्या अनेक घटनात्मक प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त जागा भरणार, शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती, मराठा समाजातील 1200 उमेदवारांना आरक्षित पदावर नियुक्त्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टीईटी परीक्षेत शिक्षण अधिकाऱ्याची मुलगी अपात्र असताना पात्र केल्याचा आरोप, अधिकाऱ्याकडून आरोपाचं खंडन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक, पुढच्या रणनितीवर होणार चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*इंग्रजी महिन्याची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gZjoOzwNoTs~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा फळा-माझी लेखणी*हा उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. .........https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_25.html*संकल्पना - नासा येवतीकर*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग*--------------------------------------सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.*या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत.*ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.*त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :*१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.----------------------------------*त्र्यंबकेश्वरला कसे जाल?*-----------------------------------हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.बसमार्ग - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मीनाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात.तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताने अवकाशात एकाच वेळी किती उपग्रह पाठविण्याचा विक्रम केला होता ?२) सूर्यमालेतील बटूग्रह कोणता ?३) क्रांतिकारक भगतसिंह यांना केव्हा फाशी देण्यात आली ?४) नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १९२ धावा काढणारे सलामीवीर कोण ?५) राजू श्रीवास्तव हे कोण आहेत ?*उत्तरे :-* १) १०४ उपग्रह ( १५ फेब्रुवारी २०१७ ) २) प्लूटो ३) २३ मार्च १९३१ ४) शिखर धवन ( ८१ धावा ) व शुभमन गिल ( ८२ धावा ) ५) प्रख्यात विनोदी कलाकार*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिगंबर खपाटे बन्नाळीकर● प्रशांत इबितवार येवती● संदीप आवरे चिकना● विशाल कन्हेरकर अमरावती● नारायण शिंदे, रत्नागिरी● प्रशांत कोकणे● मधुकर बोईनवाड● संदीप सोनकांबळे● सुमेध वाघमारे● मारोती ताकलोर● दत्ता बोंदलवाड● अभय रन्नावरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.**माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••बालकविता - माझी नानी--------------------------------माझी लाडकी नानीसांगे रोज कहाणीगाई छानशी अंगाईमी गाढ झोपी जाई ।।म्हणे माझी नानीपहाटे की रे उठावेसांगितलेले ते ऐकावेआचरणात आणावे ।।भले व्हावे आपुले हेनानीचे सांगणे खरेवागू या आपण चांगलेआपल्यासाठी के बरे ।।---------------------------------अरुण वि.देशपांडे- पुणे(आली आली परीराणी संग्रह-2012)•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात दुःख किती जरी असले तरी ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे तोच आपल्या जीवनात दुःखावर मात करुन यशस्वी होऊ शकतो .© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद - ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रोधाला संयमाने जिंका*एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 24/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 .🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.◆१९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.💥 जन्म :-◆१८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक.◆१८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक.◆ १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक.💥 मृत्यू :-◆१९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ◆ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू◆ २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी नाही, पुढच्या तारखेकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी करा, विनायक मेटेंच्या अपघातावर विधानसभेत चर्चेदरम्यान अजित पवारांची मागणी, चालकाच्या बदलत्या जबाबाची नेत्यांकडून दखल*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई, ठाण्यात लहान मुलांमध्ये टॉमॅटो फ्लूचा प्रसार अधिक, चिकनगुन्या आणि डेंगूसदृश लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डोंबिवलीतील गायकवाडवाडी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन महिलांसह पाच वर्षाचा मुलगा जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बॉक्सऑफिसवर आपटलेल्या लालसिंग चड्डा सिनेमाला ओटीटीवरही भाव मिळेना, नेटफिक्ससोबतची बोलणी फिसकटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंतप्रधान मोदीं आज हरियाणा-पंजाब दौऱ्यावर; महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन करणार, सुरक्षेबाबत पोलीस सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धत्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवत आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी प्रगती केली असून भारताला एका गुणाचा फायदा झाला आता भारताची रेटिंग 111 झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the Occupation👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/XQiONqjbUmM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोशल मीडिया आणि आधार*https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_23.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकवर जरूर द्यावे~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत.उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष.उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?२) 'पाचोळा' ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली ?३) १ ते १०० मध्ये एकूण दोन अंकी मूळसंख्या किती ?४) युवा क्रांतिकारक भगतसिंह यांचा जन्म केव्हा झाला ?५) आग्रा ( उत्तरप्रदेश ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे ?*उत्तरे :-* १) दीपक केसरकर २) प्राचार्य रा. र. बोराडे ३) २१ मूळसंख्या ४) २८ सप्टेंबर १९०७ ५) १०० फूट*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्याम ठाणेदार, पुणे● श्रीकांत भुजबळ साहेब● हणमंत बोलचेटवार● संजय पाटील, पुणे● ऋषिकेश शिंदे● गोपाल ऐनवाले● सुनीलकुमार बावसकर● प्रितिष पाटील● भाऊराव शिंदे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाईल स्तोत्रं* लागते ओढ होता प्रातःकाळतसे पाहता,नसे ओढीची वेळ ...||१||सर्वांठायी लावूनी वेढ तू गोडसहान थोर भोवती तुझ्या सर्वकाळ ..||२||क्षणाक्षणा वाढे आतुरता होई घालमेलपाहत राही कोणता मॅसेज,कोणाचा मेल ..||३||प्रभाते कर दर्शनमचा सहज पडला विसरमुल्य वाटे ना कशाचे तूचं वाटे अग्रेसर ..||४||जातील डोळे, स्थूल शरीर,लागेल चष्माकळते सारे परी तुझाच राहील वरचष्मा ...||५||अतिशहाणे झाले जन तुझ्याचमुळेपसरु दे चौफेर तुझे तुझेच जाळे ...||६||डोके हॅंग झाले तरी चालेल देवातू नको तसे राहू, चाखू दे मेवा ...||७||मन मुके झाले,शब्द बोलते केले...जग जवळ आले,जवळचे दूर गेले ...||८||बेचैन जीवाची बेचैनी वाढते क्षणाक्षणालाध्यास लागला लागला हरेक जीवाला ...||९||मन हरवले धन जाऊ दे तुझ्या ठायी, तुझं पायीइति आदिदेवमोबाईल स्तोत्रं संपूर्णम् ...॥१०।। *हणमंत पडवळ, उस्मानाबाद.*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता*जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही.*तात्‍पर्य :- ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/08/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ २०१२- राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.◆ १९६६- 'लुनार ऑरबिटर -१' या मानवरहीत अंतराळ यानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे पाठविले.◆ १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.◆१९२९ - हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.💥 जन्म :-◆१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. ◆ १९४४- सायरा बानू ,हिन्दी चित्रपट अभिनेत्री.◆ १९१८- विदा करंदीकर, लेखक,कवी.💥 मृत्यू :-◆१९९४- आरती साहा, इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरण पटू.◆ १३८७ - ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.◆१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद.. शिक्षण संचालकांचा निर्णय.. शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण.. नगरपरिषद सुधारणा विधेयक बहुमताने संमत*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अग्निसुरक्षा नियमांच्या शिफारस करण्यासाठी अखेर राज्य सरकारनं चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले असून 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना देणार प्रशिक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ; चंद्रकांत पाटलांची घोषणा .. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क होणार माफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अगदी अखेरच्या 2 षटकात कमाल गोलंदाजी केल्याने 13 धावांनी भारत जिंकला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Humpty Dumpty👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/MVvqgTsRddk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*लघुकथा - पंगूम लंघयते गिरीम*दिव्यांग व्यक्तीची यशस्वी कथा.http://kathamaala.blogspot.com/2021/03/blog-post_31.htmlकथालेखन - नासा येवतीकर, धर्माबाद•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?* 📙जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक. वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते.जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात.ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो.संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळजोडणी असलेले देशातील पहिले राज्य कोणते ?३) युवा क्रांतिकारक मंगल पांडे यांना केव्हा फाशी देण्यात आली ?४) 'आधुनिक आर्यभट्ट' कोणाला म्हणतात ?५) भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान कोण आहे ?*उत्तरे :-* १) हेमंत सोरेन २) गोवा ३) ८ एप्रिल १८५७ ४) विक्रम साराभाई ५) हरमनप्रीत कौर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सचिन बोरसे● आनंद यादव● अनिलकुमार शिंदे● रामदास पेंडपवार,● सुनील बेंडे● भारत सर्वे● भोजन्ना चिंचलोड● बाबुराव पिराईवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?**कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••☀☀☀☀☀☀☀☀☀संजय नलावडे, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बालकविता*पाळण्यात पापामारतो गप्पाखातो धप्पाममीचामुळूमुळू रडतोदुधच पितोमटकन झोपतोबब-याचांदवा झुलतोमोर डोलतोपोपट बोलतोवेदूलाखुळखूळा खणखणपैंजण रूणझुणबाजूबंद छनछनबाळाचेदुडूदुडू चालणेअंगणी नाचणेबोबडे बोलणेछकुल्याचे- वीरभद्र मिरेवाड, नायगाव, नांदेड( फेसबुक साभार )•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••रस्ता कितीही अरुंद असला तरीही माणूस तो रस्ता पार करुन जातो त्याप्रमाणे जीवनात कितीही अडचण असली तरीही त्या अडचणीवर मात करुन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण जीवन हे सहजासहजी जगणे सामान्य माणसासाठी अवघडच आहे.अवघड आहे म्हणून सोडता येणार नाही किंवा निराश आणि हताशही होऊन बसता येणार नाही.स्तब्धपणे बसलात तर मार्ग काढणेही अवघड आहे.त्यातून काही ना काहीतरी युक्ती सुचता आली पाहिजे अन्यथा संकटं अंगावर झेलून लाखमोलाचे जीवन जगण्यात काही अर्थ राहणार नाही.प्रयत्न,सातत्य,सकारात्मक विचार ह्यातूनच जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०.🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहवे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 22/08/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९४४- दुसरे महायुद्ध,सोवियत युनियन ने रोमानिया जिंकले.💥 जन्म :-◆१९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.◆१९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.◆१९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.💥 मृत्यू :-◆ १९९९-सूर्यकांत मांडरे,मराठी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा ; गणेशमुर्तींना उंचीचं बंधन नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ, दोन कॅबिनेट मंत्र्यांची खाती काढून घेतली*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात 7 सप्टेंबरपासून यात्रेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ? राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूषखबर, एसटी महामंडळाकडून यंदा कोकणात जाण्यासाठी 2 हजार 310 गाड्या सोडण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिमाचलमध्ये ढगफुटी, २४ तासांत १९ जणांचा मृत्यू, उत्तराखंडमध्येही पावसाचा हाहाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *झिम्बाब्वे विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्याची मालिका भारतानं जिंकली; दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्सनं विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Letter With its Sound👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/7VFkn5D_EZc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक*http://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_24.html•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते.इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे.स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो.इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" Hard times are the moments of reflection. "* *(कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) युवा क्रांतिकारक मंगल पांडे यांनी कोणाला ठार केले ?३) RBI ने पहिल्यांदा १ रूपयाची नोट कोणत्या साली छापली ?४) 'इंडिया गेट'चे वास्तुविशारद कोण होते ?५) १५० वर्ष झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करण्यात येतो ?*उत्तरे :-* १) प्रमोद सावंत २) मेजर ह्युसन, ब्रिटिश अधिकारी ३) १९४० ४) एडविन लँडसियर ल्युटन्स ५) सार्ध शती महोत्सव*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गजानन पाटील, हिंगोली● शिवा संजय गैनवार● नागराज यंबरवार● आशिष देशपांडे● गुरुदास आकेमवाड, बरबडेकर● शंकर गंगुलवार● मुजीब शेख● आकांक्षा नागेश तांबोळी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.**परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.*•• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••बालकविता *वाहतुकीचे नियम*🚲🚕🏎️🏍️मित्रांनो लक्षात ठेवा कायमसाधे सोपे वाहतुकीचे नियमआधी उजवी,मग डावीकडेबघू रस्ता ओलांडताना गडेकरू सुलभतेने पार अंतरपाळत झेब्रा क्रॉसिंगचे नियममित्रांनो लक्षात ठेवा कायमसाधे सोपे वाहतुकीचे नियम"थांब जरा"लाल म्हणतो"हो तयार" पिवळा सांगतो"जा" हिरवा करतो इशारारंगीत "सिग्नल लाईट " नियममित्रांनो लक्षात ठेवा कायम साधे सोपे वाहतुकीचे नियमवळणावर सुचक त्रिकोणातपुल,खाई,डोंगर नकाशातसहाय्यक नागमोडी वाटेवरहे "आदेशात्मक चिन्ह" नियममित्रांनो लक्षात ठेवा कायम साधे सोपे वाहतुकीचे नियमप्रवास करू अपघात टाळूनसिटबेल्ट बांधून,हेल्मेट घालूनमाझी सुरक्षा माझी जबाबदारीअंगीकारू सुरक्षिततेचा नियममित्रांनो लक्षात ठेवा कायम साधे सोपे वाहतुकीचे नियमशैलजा गोरडे ( फेसबुक साभार )•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात.अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासारविचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी, मासा, युक्ती*एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.कोळ्याची ही युक्ती कामी आली.तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 20/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ *भारतीय अक्षय ऊर्जा दिन* ◆ *सद्भावना दिन* ◆ *जागतिक डास दिन*💥 ठळक घडामोडी :-◆ २००८- कुस्तीगीर सुशीलकुमार याला बीजिंग ओलीम्पिक मध्ये ब्रॉंझ पदक मिळाले.◆१९९७ - सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.💥 जन्म :-◆१९४४ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान.◆ १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.💥 मृत्यू :-◆ २०१३-नरेंद्र दाभोळकर ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व थोर समाजसुधारक,विचारवंत यांची पुणे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.◆ २०१३- जयंत साळगावकर, ज्योतिर्भास्कार,लेखक व उद्योजक.◆१९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शिर्डीच्या साईमंदिरात पारंपरिक पद्धतीने दहिहंडी फोडण्यात आली. दहिहंडी फोडल्यानंतर दुुपारची आरती पार पडली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कर्जबुडव्या निरव मोदीच्या मुंबईतील HCL हाऊसचा 23 सप्टेंबरला लिलाव, कर्जवसुली लवादाचा आदेश*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथील मैदानात खेळवला जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव, बुलढाण्यात आढळले 9 रुग्ण, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाकरे सरकारनं लागू केलेले सीबीआय तपासावरचे निर्बंध उठण्याची शक्यता, राज्य सरकारच्या अनुमतीशिवाय सीबीआयला तपासाचे अधिकार मिळण्याची चिन्ह*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धोका वाढला; मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजार पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स हा भारतातील गरीब मुलांना मदत करणार आहे. यासाठी त्याने भारतातील एका संस्थेसोबत एक करार केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो भारातातील वंचित मुलांना मदत करणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*तूच आहेस का सुतार पक्षी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/J6J8bdtnsIc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक फोटोग्राफी दिन - 19 ऑगस्ट*https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_19.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय ?* 📙सूक्ष्मदर्शक भिंगाचा वापर प्रथम लहान वस्तू बघण्यासाठी केला गेला. मग जिवाणूंचा शोध लावला गेला. त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू असतानाच पेशींच्या अंतर्गत हालचालींबद्दल औत्सुक्य निर्माण झाले होते. पण सूक्ष्मदर्शक यंत्रांची ताकद कमी पडू लागली होती. पेशीतील न्युक्लियस दिसत होता; पण त्याच्या पुढे फारसे जाता येत नव्हते. याच सुमाराला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला.हा काम कसा करतो ? अतिशय काळजीपूर्वक व जास्तीत जास्त पातळ गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर करतात. अगदी पातळ असा केस या मायक्रोस्कोपखाली बघितल्यास जाड मनगटाएवढ्या दोरखंडासारखा दिसतो. सर्वसाधारणपणे १०,००० ते ५०,००० पट मोठी प्रतिमा करण्याची याची शक्ती असते.एका तीव्र स्रोतातून इलेक्ट्रॉनचा झोत चुंबकीय क्षेत्रातून एकवटून पाहावयाच्या गोष्टींवर सोडला जातो. तपासणी करावयाच्या वस्तूंमधील प्रत्येक अणूची दखल हा झोत घेतो व त्याचा एक आराखडा समोरच असलेल्या इलेक्ट्रॉन शोधकातर्फे टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागतो. योग्य त्या पद्धतीत झोताचे केंद्रीकरण झाल्यावर गरजेप्रमाणे त्याचे फोटो घेता येतात. झोतातले इलेक्ट्रॉन्स नेमके काय करतात ? प्रकाश लहरींपेक्षा यांची पृथक्करण शक्ती कितीतरी पटींनी जास्त असल्याने वस्तूची प्रतिमा जवळपास एक लक्ष पट मोठी दिसू शकते. मुख्यत्वेकरून जेनेटिक्समधील संशोधन, डीएनए व आरएनए या संदर्भातील प्रयोग, विषाणूंचा शोध यांसाठी या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. भारतातील फार मोठय़ा शहरांतील मोजक्या प्रयोगशाळांत अत्यंत कुशल वैज्ञानिक यांचा उपयोग करतात.HIV वरचे संशोधन, H1 N1 या विषाणूने होणाऱ्या स्वाइन फ्लू बद्दलचे संशोधन हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय शक्य नव्हते. बायोटेक्नॉलॉजी संदर्भातही अनेक बाबतीत याचा वापर अत्यावश्यक ठरतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'अक्षय ऊर्जा दिवस' कधी साजरा केला जातो ?२) १२५ वर्षे झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?३) कोणत्या शासकाने 'रुपया' या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला ?४) 'आगाखान पॅलेस' ही वास्तू कोठे आहे ?५) १९५३ साली संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या जगातील पहिल्या महिला कोण ?*उत्तरे :-* १) २० ऑगस्ट २) शतकोत्तर रौप्य महोत्सव ३) शेरशाह सुरी, सुरी वंश ४) पुणे ५) विजयालक्ष्मी पंडित *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हरीश बुटले, संपादक, पुणे● इरेश्याम झंपलकर, कुंडलवाडी● विजय दिंडे, हुनगुंदा● गणेश येवतीकर, येवती● शशांक बामनपल्ले, नायगाव● दीपक पाटील● सतीश दिंडे● जयपाल दावनगीरकर● विवेक सारडे● प्रमोद मुधोळकर● आदित्य रावजीवार● कांतीलाल घोडके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.**स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.* *॥ रामकृष्णहरी ॥*☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कृष्ण जन्मला ..*श्रावण अष्टमी रात पावसाळीबेहोशी निद्रेची निशा काळी काळीअलौकिक भाग्यवंत आठवा आला देवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..वसुदेव देवकी अपार आनंदानेअंतरातूनी त्रासूनी कंस भयानेवाचवू कसे काळजाच्या तुकड्यालादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..तुटल्या कड्या ,दारे उघडली कारागृहातूनी बाहेर पडलीपुत्रास घेवूनी वसुदेव निघालादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..यमुनेला महापूर पाणीच पाणी कंसापासून वाचविणे निग्रह मनीबालजीव डोईवर ,झरझर चालला देवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..गोकुळी वसुदेव मित्र नंदाकडेपुत्रास ठेऊनी रक्षणाचे साकडेनंदाची कन्या घेऊनी आलादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..यशोदा माता पुत्रास बघूनीधन्य धन्य झाली ती जीवनीआनंदी आनंद गोकुळी झालादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..नंदाचा नंदलाल यशोदेचा कान्हा देवकीला फुटे मायेचा पान्हाहर्षानंद घेऊनी गोपाल आलादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..धावू लागला ,खेळू लागलाबोल बोबडे बोलू लागलानंदाघरी दिव्य स्वर्ग अवतरलादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..मीना खोंड, लंडन7799564212•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ*एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणेएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणेपुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📷 *जागतिक छायाचित्रण दिन* 💥 ठळक घडामोडी :-◆ १९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.◆ १९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.💥 जन्म :-◆१९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.◆ १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.◆ १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-◆ १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंच्या आरक्षणासाठीही गोंविदा पात्र, दहीहंडी दरम्यान अपघात झाला तर मिळणार आर्थिक मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *खऱ्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने; अमरावतीमध्ये युनियन बँकेच्या लॉकरमधील तीन कोटींचे दागिने बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार, काश्मीरमध्ये बाहेरच्या 25 लाख मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारकडून 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक; 7 भारतीय आणि 1 पाकिस्तानच्या चॅनलचा समावेश, प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी यूट्यूबचा केला जात होता वापर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न? श्रीवर्धनमध्ये एका बोटीत आढळल्या एके-47, ओमानमधून एके-47 सह बोट रायगडच्या किनाऱ्यावर, सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिखर-शुभमनची अभेद्य भागिदारी, भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Body Parts Class 3rd Chapter 1.2👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/YP-bqnOfJMA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - कुलदीपक* शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात.........लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_16.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पिटूनिया*फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या शास्त्रीय नावाच्या वंशातील काही जाती बागेत शोभेकरिता विशेषेकरून लावलेल्या आढळतात. एकूण जाती सु. ४० (ए.बी. रेंडेल यांच्या मते १४) असून त्यांचा प्रसार द. आणि उ. अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आहे. भारतात काही जाती बाहेरून आणून लावल्या आहेत.बागेतील शोभा वाढविण्यासाठी अनेक संकरज प्रकार आज उपलब्ध आहेत; तथापि त्या सर्वांचा उगम अर्जेंटिनातील पिटूनियाच्या निक्टॅजिनिफ्योरा, व्हायोलॅशिया, अक्सिलॅरिस व इंटिग्रिफोलिया या जातींच्या संकरात आहे. दुहेरी पाकळ्यांचे व अनेक भडक रंगांचे आधुनिक प्रकार संकरातून व निवडीने काढले गेले आहेत. मूळच्या जाती सु. ३०-४५ सेंमी. उंच, सरळ वाढणार्‍या, वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणार्‍या) ओषधी [ ® ओषधि ] असून पाने साधी, मध्यम आकारमानाची, आयत, समोरासमोर आणि खोडाच्या टोकाकडे बिनदेठाची तर बुंध्याकडे लांब देठाची, कधी सर्वच आखूड किंवा बिनदेठाची असतात.सर्व भागांवर प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले एकेकटी, विविध रंगांची, तुतारीसारखी व कक्षास्थ (पानांच्याबगलेत) असतात; केसरदले पाच असून इतर सामान्य शारीरिक लक्षणे ð सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया अथवा दाब कलमांनी करतात. बी ऑगस्ट ते ऑक्टोबरात किंवा मैदानी प्रदेशात मार्च ते जूनमध्ये व डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलमध्ये पेरतात; महिन्याने रोपे दुसरीकडे वाफ्यात (कडेने किंवा मध्ये) लावतात. दुहेरी पाकळ्यांच्या जातींची लागवड कलमांनी करतात.लावल्यापासून तीन ते चार महिन्यांनी फुले येऊ लागतात व ती बराच काळ येत राहतात. खिडकीजवळ केलेल्या वाफ्यांत ही झाडे अधिक शोभिवंत दिसतात; कुंड्यांतूनही लावतात. पिटूनिया हायब्रिडा हा संकरज प्रकार लोकप्रिय आहे. टोमॅटो व बटाट्याजवळ ही झाडे लावू नयेत कारण उपद्रवकारक अशा कीटकांपासून त्यांना इजा पोहोचणे शक्य असते *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" उत्तम चरित्र आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन असते..! "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे भारतीय प्रधानमंत्री कोण ?२) संस्कृतच्या कोणत्या शब्दापासून 'रुपया' हा शब्द बनला आहे ?३) RBI ने पहिली नोट कोणती व केव्हा छापली ?४) निर्माणाधिन जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची किती मीटर आहे ?५) गिनीज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झालेली राष्ट्रध्वजाच्या आकारातील जगातील सर्वात मोठी मानवी साखळी कोठे तयार करण्यात आली ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) रुप्यकम ३) ५ रू. ( १९३८ ) ४) ३५९ मी. ५) चंदीगड क्रिकेट स्टेडियम, ( ५८८५ विद्यार्थी ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● उत्तम सदाकाळ, साहित्यिक● संभाजी पाटील● महेश हातझडे, गोंदिया● शिवा टाले, नांदेड● संदीपराजे गायकवाड, बिलोली● योगेश मठपती● प्रीती माडेकर, यवतमाळ● संतोष कडवाईकर● मन्मथ चपळे● मोहन शिंदे● विलास वाघमारे● अमोल चव्हाण● आकाश बोर्डे● मोहनराव पाठक, पुणे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.**लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सोहळा कृष्णजन्माष्टमीचाश्रीकृष्णजन्माष्टमीचा सणबाळकृष्णाचा हा जन्मदिनपाळण्यात हलवूनी कान्हागाऊया श्रीहरीचे गुणगानसावळा हा मुरली मनोहरयशोदेचा लडिवाळ कान्हाअवखळअल्लड खोड्यांनीफुटतो यशोदेला प्रेमपान्हासुंदर हासरे ते मुखकमलशांत निजला वेणूगोपाळशोभे हातात सुवर्ण कंकनपायी वाजवितो तोडे चाळमूर्तिमंत डोळे आकर्षतीबाळाची स्नेहाळ ती दृष्टी बाजूबंद शोभे दंडामध्येमुखकमलांतच वसे सृष्टी कुरळे कुंतल तान्हुल्याचेत्यावर मोरपिसाची मायायशोदामैयाची प्रेमपाखरकन्हैया वर जणू छत्रछायासौ.भारती सावंत, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अधिकचा मोठेपणा सांगणे*एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला. व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून आणि अधिकाधिक मोठेपणा करून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. म्हणून माणसाने मोठेपणाचा जास्त आव आणून वागू नये आणि बोलू नये. वाजवीपेक्षा जास्त बढायी करणे म्हणजे फजीती करणे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 18/08/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १२०१ - रिगा शहराची स्थापना.★ १९७१ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.★ २००८ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.💥 जन्म :-★ १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.★ १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.★ १७५० - अँतोनियो सालियेरी, इटालियन संगीतकार.★ १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.★ १९६२ - फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-★ १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट.★ १९४० - वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.★ १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.★ १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.★ २००८ - नारायण धारप, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी ,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विमानात प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, कोरोनाची वाढता रुग्णसंख्या पाहता मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल नागरी हवाई वाहतूक संचालनालयानाचे निर्देश*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळ जाहीर, फडणवीसांना संधी तर गडकरींना वगळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जायकवाडी धरणातून तब्बल 66 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यात 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार 68 जणांचा मृत्यू झालाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंद्रकांत पंडीत यांच्यावर केकेआरच्या मुख्यप्रशिक्षकपदाची जबाबदारी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचं बिझी शेड्युल! पुढील चार वर्षात खेळणार 183 आंतरराष्ट्रीय सामने; आयसीसीकडून 'फ्यूचर टूर प्रोग्राम' जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Class 1st Chapter 1.7👇**My Name**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/pksmVILbWOQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नपा हद्दीतील सरकारी शाळा*लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.http://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_60.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬*प्रश्न - संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करावयास लावणे शक्य आहे काय?**उत्तर-* ज्या व्यक्तीने पूर्व - आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही वा चोरी करणे पाप आहे असा पक्का समज ज्या व्यक्तीचा आहे, अशा व्यक्तींकडून संमोहित अवस्थेत चोरी करून घेणे अशक्य आहे. संमोहन अवस्थेत व्यक्ती स्वतःला अनैतिक वाटणाऱ्या सूचना स्वीकारत नाही. अशा सूचना मिळाल्यास एकतर संमोहन अवस्थेतून ती जागृत अवस्थेत येते अथवा त्या अवस्थेत राहूनही त्या विशिष्ट सूचनांप्रमाणे वर्तन करणे नाकारते.समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही.*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे**'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महामहिम द्रौपदी मुर्मू यांना अधिकृत अध्यक्षीय वाहन म्हणून कोणती गाडी देण्यात आली आहे ?२) निर्माणाधिन जगातील सर्वात लांब रेल्वे पुलाची लांबी किती आहे ?३) 'दि सॅटनिक व्हर्सेस' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) भारतीय चलनास कोणत्या नावाने संबोधतात ?५) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत अब्दुल राउफ अजहर याला दहशतवादी घोषित करावे या भारत व अमेरिकेच्या प्रस्तावाला कोणत्या देशाने विरोध केला ?*उत्तरे :-* १) मर्सिडीज - बेन्झ एस ६०० २) १.३१५ किमी ३) सलमान रश्दी ४) रुपया ५) चीन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● शेख समदानी, बिलोली● रोहित जंगलेकर● गजानन देवकर● अगस्त्या तावरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.**सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कृष्ण जन्मला ग सखेअष्टमीच्या रात्री ग आनंदी आनंद जाहला चोहीकडे,आज कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला,तिमिर दाटला चोहीकडे,बरसत होत्या जलधारा,यमुनेलाही होता पूर ग सखये,चिंतित जाहली देवकी,धडधडले अंतःकरण दिधला निरोप संचित होऊनी,डोईवरी ठेवुनी बाळ कृष्णाला, वसुदेव जाई यमुना पार,कोसळणाऱ्या जलधारा, अन् विद्युलतेचा लखलखाट,धडकी भरवी वासुदेवाच्या मनी,क्षणात प्रभुच्या रक्षणार्थ शेष आला धावुनी,छत्र धरीले तयाने फणांचे भगवंताच्या डोइवरी,अन वाटही केली यमुनेंनेही, कृष्ण मुरारीला,कृष्ण जन्मला ग सखे आज कृष्ण जन्मला.- योगेश सराफ (लेखणी वेडा)Facebook वॉल वरून साभार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जबाबदारीने कार्य करणे.*राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.साभार - इंटरनेट*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 17/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.★ १९६० - गॅबनला (झेंडा चित्रीत) फ्रांस पासून स्वातंत्र्य.★ १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्‍यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.★ १९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.★ १९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.💥 जन्म :-★ १८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.★ १९२६ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.★ १९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.★ १९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.★ १९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.💥 मृत्यू :-★ १३०४ - फुकाकुसा, जपानी सम्राट.★ १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★ १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत आज सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत होणार, सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे राज्यशासनाचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी प्रति किलो ६ रुपये, तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. त्यात राजदच्या १६, तर जदयूच्या ११ जणांना मंत्रीपद; बिहारमध्ये विस्तारात काँग्रेसच्या दोघांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार ? अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव आणि झारखंड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *‘फिफा’ची भारतावर बंदी ! न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निर्णय ; कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद गमावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••Class 5th chapter 1.7*Talking about things 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/ExuBsAJzRis~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पौर्णिमा - अमावस्या*https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आम्ल म्हणजे काय ?* 📙चिंच कशी आंबट असते ? हिरवीगार चिंच खाल्ली, तर दात अगदी आंबून जातात. लिंबाचा आंबटपणा मात्र काही वेळा हवाहवासा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात तर तो आवडतोच. ताकाचा आंबटगोडपणा तर पाहिजेच असतो. अगदी मधुर ताक समोर आले, तर पिववत नाही. या सर्व आंबटपणाचे कारण काय असते ?या प्रत्येकात एक अाम्ल असते. आम्लाचे (Acid) विविध प्रकार आहेत. आज जगात शेकडो प्रकारची आम्ले शोधली गेली आहेत, वापरातही आहेत. आपल्या पोटातही एक प्रमुख अाम्ल सतत स्रवत असते. पोटातल्या आम्लाचे नाव हायड्रोक्लोरिक अॅसिड. फळांमध्ये असते ते सायट्रिक अॅसिड, तर दुग्धजन्य खाद्यपदार्थात तयार होते ते लॅक्टिक अॅसिड. या आम्लांची चव आंबटसर लागते. अर्थातच त्यांची तीव्रता जेव्हा कमी असते, तेव्हाच. अन्यथा चक्क जीभ भाजली जाते. जीभच काय पण एखादे तीव्र अंमल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे, असे आम्ल जेव्हा कातडीच्या, कापडाच्या, लाकडाच्या किंवा लोकरीच्या संपर्कात येते, तेव्हा ती वस्तू चक्क त्यात विरघळून नष्ट होऊ लागते. तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमुळे तर कातडी चक्क जळते. म्हणूनच त्याला तेजाब असे म्हणतात.सल्फ्यूरिक, नायट्रिक व हायड्रोक्लोरिक अशी तीन प्रमुख तीव्र आम्ले आहेत. आम्लपदार्थ म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त द्रवच येतो. पण ते खरे नव्हे. कित्येक आम्ले घनरूपही असतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची - सर्व आम्लांमध्ये हायड्रोजनचा अणू असतोच. एखादे आम्ल जेव्हा धातूबरोबर संयुक्त पावते, तेव्हा हायड्रोजनचा अणू सुटा होऊन वायूरूप धारण करतो.एखादी वस्तू वा द्रव हा आम्लधर्मी असेल, तर लिटमसच्या कागदाच्या सहाय्याने तो पारखून बघता येतो. द्रवामध्ये लिटमस कागद बुडवला, तर निळा लिटमस लाल होतो. घन आम्ल असेल, तर कागद ओला करून वापरला जातो. आम्लाची तीव्रता ठरवण्यासाठी pH हे परिमाण ठरवले गेले आहे. ० ते ७ च्या दरम्यान सर्व आम्ल व ७ ते ‍१४ या दरम्यान सर्व अल्क पदार्थ मोडतात. शुद्ध पाणी हे सात pH चे असते. सर्वात तीव्र आम्ल ० परिमाण दाखवते, तर अतितीव्र अल्क १४ परिमाणात मोडते. दोन्ही एकमेकांच्या विरुद्धगुणी असतात.उद्योगधंद्यांमध्ये सल्फ्युरिक अॅसिड प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. खते, रंग, बॅटरीमधील पाणी, स्फोटके, साबण, प्लॅस्टिक या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अॅसिडचा विविध स्फोटकांत वापर करतात. हायड्रोक्लोरिक अॅसिड तर पोटात सतत काम करतच असते. त्याचा साठा पोटात गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्यास घशाशी जळजळते व आंबट व ढेकरा येतात. पण याच अाम्लामुळे खाल्लेल्या अन्नातील सर्व जंतूंचा प्रथम नाश होतो. अर्थातच शरीराला त्रास देऊ शकणारे सर्व अपायकारक घटक इथेच नष्ट केले जातात.मानवाला आम्ल पदार्थ अनेक वर्षांपासून माहित आहेत. कृत्रिमरीत्या तयार केलेली आम्ले जरी फक्त गेली काही शतकेच ज्ञात असली तरी पुरातन धातूयुगापासूनच नैसर्गिक आम्लपदार्थांंचे ज्ञान मानवाला असावे. तांबे, पितळ, लोखंड, ब्राँझ इत्यादी विविध धातूंच्या वस्तू चकचकीत ठेवणे, आकर्षक ठेवणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. चांदीच्या वस्तूंना झळाळी देणे, सोन्याला चकाकी आणणे या प्रकारासाठीसुद्धा आम्लांचा उपयोग चालूच राहील.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता ?२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - २०२२ मध्ये भारताने एकूण किती पदके मिळविली ?३) व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये जगात सर्वाधिक स्त्री वैमानिक कोणत्या देशाचे आहेत ?४) आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन केव्हा साजरे केले जाते ?५) महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) तानाजी २) ६१ पदके ( २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य ) ३) भारत ४) १३ ऑगस्ट ५) चंद्रशेखर बावनकुळे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● मीना खोंड, साहित्यिक● बालाजी मदन इंगळे, साहित्यिक● राजेश कुंटुरकर● रवींद्र धुप्पे● अरुणा भोसले● सचिन एडके● बालाजी बरडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !**दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?**दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माझा भारत महान*पराक्रमी देश माझाशूरवीर जवानांचा क्रांतिवीर देशभक्तअभिमान आम्हां यांचा..१सुजलाम सुफलामसुबत्तेची धान्यराशीशांती एकता बंधुतासौख्य नांदे मजपाशी..२घुमे नाद आसमंतीमावळ्यांचा इतिहासजय भवानी मातेचाआशीर्वाद हमखास..३ध्वज लहरे आकाशीहोई जल्लोष गगनीमिळो आनंद अंतरीसत्यमेव ब्रीद मनी..४अशा भारत देशाचाजगी वाढवूया मानभारतीय असल्याचाआहे सार्थ अभिमान..५*©® सुचित्रा कुंचमवार✍️**नवी मुंबई*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंधारात कसा चढणार डोंगर*तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला....इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!वाट पाहात बसून कशाला राहायचं?जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. प्रत्येकाजवळ किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश असतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी पुरेसा असतो. फक्त जिद्द असावी लागते ध्येयापर्यंत पोहचण्याची.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १२८१ - जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.◆ १८३३ - शिकागो शहराची स्थापना.◆ १९०८ - सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.◆ २००० - रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.◆ २००५ - श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या💥 जन्म :-◆ १८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.◆ १८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.◆ १९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.◆ १९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.◆ १९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार💥 मृत्यू :-*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जम्मू-काश्मीरच्या राजौरीत दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद, चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, आत्मघातकी हल्ल्याचा कट उघडकीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जालना-स्टील कंपनीच्या मालकाच्या घरी-कार्यालयावर आयकरचे छापे, 390 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश, 58 कोटींची रोख, 32 किलो सोनं जप्त*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आरबीआयकडून पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द, तर लक्ष्मी बँकेवरचे निर्बंध तीन महिन्यांनी वाढवले, ठेवीदारांची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठानंतर नागपूर विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या चारही जिल्ह्यातील परीक्षा रद्द, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, आजही जोर कायम राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रक्षाबंधनानिमित्त भावाचं तोंड गोड करण्यासाठी मुंबईतल्या भगिनींची मिठाईच्या दुकानात गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, सरकारनं तोंडाला पानं पुसल्याची अजित पवारांची टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*प्रसिद्ध महिलांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FpDuS4HGmyM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱996021703~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळेचे नियोजन*वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून......पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अँपिअर म्हणजे काय ?* 📙विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे.विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल.मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय.अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो.घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते.वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मूळ गाव कोणते ?२) बंगालचे वनरुपी डॉक्टर म्हणून कोणाला ओळखले जात असे ?३) जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो ?४) पेशीभित्तिका असणाऱ्या व प्रकाश संश्लेषण करणाऱ्यांना काय म्हणतात ?५) 'द लाईन' नावाचे जगातील पहिले व्हर्टिकल शहर कुठे स्थापित केले जाणार आहे ?*उत्तरे :-* १) किठाना, जि. झुंझुनू , राजस्थान २) सुशोवन बंडोपाध्याय ३) ९ ऑगस्ट ४) वनस्पती ५) सौदी अरेबिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रविकुमार येळवीकर● वसंत हंकारे● पांडुरंग गायकवाड● बालाजी घायाळ● आशिष अग्रवाल● पोतन्ना लखमावाड, पत्रकार● भीमा भंडारी● दीपक कोकरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.**याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••।। भारत देश महान ।। विविध पंथ धर्म नि जातीचे लोकंयेथे नांदतात गुण्यागोविंदाने छाननाना लहान सहान प्रांताने बनला देशगर्वाने म्हणू माझा भारत देश महान .....१भारताला लाभली गौरवशाली परंपरापाहिले अनेक क्रांतीवीर नि शूरवीरात्यांचे नाव घेता वाटे आम्हा अभिमानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान .....२आमच्या अज्ञानाचा फायदा घेउनीदीडशे वर्षे राज्य केले इंग्रजांनीचलेजाव लढ्याने जागा झाला स्वाभिमानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान .....३गुलामगिरी समूळ नष्ट करण्यासाठीदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीअनेकांनी दिले आपल्या प्राणांचे बलिदानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान.....४अनेकांचे कष्ट अखेर आले फळालास्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टलाएकमुखाने गाऊ भारतमातेचे गुणगानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान ....५- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्णाची दानशुरता* कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नव्हता.एकदाचा हा प्रसंग एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.'' पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले. त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?'' पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले. मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली.केवढी ही महानता दानशुरता. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे. आपणही समाजाचे देणे लागतो ह्या हेतूने जगावे..*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 10/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९९९-औषधांच्या दुकानांवर विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.◆१९८८ - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.◆ १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.💥 जन्म :-◆ १८९४- व्ही.व्ही. गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती◆१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.◆१९६०-देवांग मेहता,भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व.💥 मृत्यू :-◆१९४२-हुतात्मा शिरीषकुमार.◆ १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.◆१९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण, शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी, राज्यभरात फटाके फोडून जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांचा भाजपला धक्का देत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, जेडीयू एनडीएमधून बाहेर*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारतात जुलै महिन्यात 59 हजार 586 ट्रॅक्टरची विक्री, उत्तरप्रदेश व राजस्थान नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांती दिनानिमित्त तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांसह पालकांकडून सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये शिक्षक संघटनेकडून विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *CWG 2022 : भारताला अथलेटिक्समध्ये अच्छे दिन, कॉमनवेल्थमध्ये 8 पदकं जिंकत रचले अनेक रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Sea Animals समुद्री जीव ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/8xLWx9D-JVA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात.........पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर clik करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) 'जीवनशिक्षण' हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते ?३) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतो ?४) अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?५) पृथ्वीचा परिवलन कालावधी किती तास असतो ?*उत्तरे :-* १) मा. जगदीप धनखड २) विद्या प्राधिकरण ३) उपराष्ट्रपती ४) परजीवी वनस्पती ५) २४ तास*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हेमंत पापळे, अकोला● गणेश मोहिते● राहुल मगरे● रामदास देशमुख● तुकाराम यनगंदलवार● अशोक मगरे● व्यंकटेश पुलकंठवार● माधव परसुरे● अविनाश गायकवाड ● सचिन सुरबुलवाड● दिगंबर भीमराव सावंत● गोविंदराव शिवशेट्टे● संतोष येवतीकर● डॉ. चंद्रकांत पांचाळ● नागराज आहिरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.**अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✍🏻 लेखणी ✒️* (मराठी कविता) असता सखे तु सोबतीलानकोच वाटते कुणी.. तूझ्यातुन बहरता शब्द प्रेमाचेअन ती मधुर वाणी.. तुझ्या सहवासा गुंतल्यावर अबोलही बोलायला लागतात.. निशब्द जरी बोलणे त्यांचे तुलाच तर कळायला लागतात.. तू असताना सोबतीलामी स्वतःच हरवून जाते.. कदाचित हेच प्रेम असावंअन मी तुझ्यात रंगून जाते.. प्रेम करायला शिकविले तू अन जगण्यास शिकवले.. खचताना मला सखे तू पुन्हा उगण्यास शिकवले..क्रांतीचे शस्त्र तूअन रूपाने देखणी.. वास्तवाचे चित्र तूअन प्रिय माझी लेखणी.. *_कु प्रतिक्षा गजानन मांडवकर_🌹*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते आणि तीच गोष्ट तुमच्या जीवनात मागे खेचण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.ती म्हणजे तुमचे मन.जर तुमचे मन सतत चिंतनशील, प्रयत्नशील, कृतीशील आणि येणाऱ्या प्रत्येक वेळेला तुम्हाला धैर्य देऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते तसेच तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करुन चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते त्या मनाची सकारात्मक बाजू बळकट करणे ही एक तुमच्या जीवनातल्या जमेची गोष्ट आहे.ही ऊर्जा जोपर्यंत तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच मागे खेचनार नाही.जर का तुमची काहीच काम करण्याची इच्छा होत नाही,काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला करावेसे वाटत नाही,आजचे काम उद्याला करु,आज नाही केले तर काय बिघडले अशी जेव्हा तुमच्या नकारात्मकतेची उर्जा तुमच्या जीवनात बळावते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाला एका अधोगतीकडे घेऊन जात आहात हे सिद्ध होते.अशी जेव्हा तुमच्या जीवनात एकाच मनातल्या दोन बाजू जेव्हा तुमच्या जीवनात घालमेल करुन तुमची मानसिकता बदलून टाकतात अशावेळी आपण काही वेळ शांत रहावे आणि आपल्या हातून काही अनुचित घटना होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.आपल्या जीवनाला कोणते मन चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाणार आहे त्याचा विचार करावा.मग आपल्या जीवनाचे जेथे कल्याण होईल त्या चांगल्या सशक्त मनाच्या गोष्टींचा जरुर विचार करावा आणि जीवन समृद्ध करावे.एखादी गोष्ट जरी नकारात्मक विचार करत असेल तर तुमच्या चांगल्या विचारांमुळे ती टिकून शकत नाही आणि मग तुम्ही सातत्याने चांगल्याच गोष्टींचा विचार जीवनात अमलात आणाल हे खात्रीने तुम्ही सांगू शकताल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर*सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?'सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठ असाव हे ही तितकेच खरयं.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 06/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 . 🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.◆ १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.💥 जन्म :-◆ १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.◆ १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.💥 मृत्यू :-◆ १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.◆ २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 50 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता 14.2 किलोचं एक सिलेंडर 999.50 रुपये म्हणजेच जवळपास 1000 रुपयांना मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेचीही शक्यता आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंचा राजीनामा नामंजूर, कारवाईची टांगती तलवार कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यभर सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत गोविंदांसाठी आता 10 लाखांचा विमा, देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून भाजपची मोहीम, नितेश राणेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारत २० पदकासह पदकतालिकेत सातव्या स्थानावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीर स्मृती मानधनानं 2 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Insects Name कीटकांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/CYdSAiXcBsE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते............पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.........https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल.स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ कोणते ?२) भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती कोण ?३) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात ?४) फ्यूज तार कशापासून बनवलेली असते ?५) सर्वात लवकर येणारे पिक कोणते ?*उत्तरे :-* १) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ २) रामनाथ कोविंद ३) दिनमान ४) शिसे व टिन ५) मका *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नरसिंह पावडे देशमुख● सुदर्शन पा. जोगदंड● शंकरलाल जैस्वाल● राजेंद्र पोकलवार● गंगाधर दगडे● दीपक पा. हिवराळे● हर्ष पाटील● इरेश वंचेवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.**दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पुढील आठवड्यासाठी विषय*" रक्षाबंधन / स्वातंत्र्य दिन / तिरंगा "**श्रावण सम्राट* ( अष्टाक्षरी रचना )येता श्रावण सम्राटसडा सांडतो प्राजक्त,भ्रमरांची ती विमानंनिलांबरी ही आरक्त //१//लेकीबाई माहेरालाचिऊताई खेळे पाणी,सणवार, खेळ, झोकेदुग्ध गाभारा कहाणी //२//खेळ ऊन पावसाचाधरा पिकं नक्षीदार,अन् रंगीत फुलांचानेसे शालू बुट्टेदार //३//श्रावणाच्या स्वागतालासप्तरंगी इंद्रधनू,पोथी, पुराणं अंगणीतृप्त सर्जा, कामधेनू //४//घट दुधाचे सांडतीभूमी पुष्प अलंकृत,गंधाळला गाभाराहीसुवासिनी सालंकृत //५//सौ. सरोज सुरेश गाजरे.भाईंदर, ठाणे९८६७३९४००१•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोक तुम्ही तुमच्या जात असलेल्या चांगल्या ध्येयाकडेही वेगळ्या दृष्टीने पाहत असतात आणि आपल्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्नही करतात,परंतु त्यांच्या अशा वृत्तीमुळे आपण आपले चांगले ध्येय सोडायचे नाही.लोक तर या जगात चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटालाही नाव ठेवतात.त्यांच्याकडे पाहून आपण काहीही करायचे नाही जे आपणास आणि आपल्या मनास योग्य आहे आणि लोकांना फायद्याचे आहे आपण निश्चित केलेल्या ध्येयापासून त्रास होणारे नसेल तर नक्कीच त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावे. तरच आपले आणि इतरांचे कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मासा आणि हंस*एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.*तात्पर्य :-*मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-१९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला१९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले💥 जन्म :-१८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.१९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-८८२ - लुई तिसरा, फ्रांसचा राजा*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठवाड्यात 66 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; 35 लाख हेक्टरला विमा कवच*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात गुरुवारपासून CNG दरात 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासूनची ही सातवी दरवाढ आहे. 91 रुपये प्रति किलोने पुण्यात सीएनजी विकला जात आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय धडाधड रद्द का केले? शिंदे-फडणवीस सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महामार्गांच्या गुणवत्तापूर्ण निरीक्षणासाठी Mobile Inspection Vans; गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये हा प्रोजेक्ट सुरू होणार असून भविष्यात संपूर्ण देशभर लागू करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीला पुन्हा धक्का; मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रविण दरेकर यांचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवस अखेर भारताने ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह १८ पदक जिंकली आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय हॉकी संघानं वेल्सला 4-1 नं नमवलं, सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत, वेल्सविरुद्ध 4-1 असा विजय नोंदवून भारतीय पुरुष हॉकी संघानं बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the vehicles वाहनांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/pr3i029iAQU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या* आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवेचे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात.........https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *खडकाचं वय कसं मोजतात ?* 📙 जगातली सजीवसृष्टी कार्बनच्या मेरूदंडावर उभी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक अवयवात कार्बनची रसायनं उपस्थित असतात. याचाच आधार घेऊन विलार्ड लिबी यांनी सजीवांच्या पुरातन अवशेषांचं वय शोधण्याची एक प्रक्रिया विकसित केली. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला.हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती कार्बोदकं तयार करतात. प्रत्येक सजीवांच्या अन्नसाखळीची सुरुवात तिथूनच होते. हवेत कार्बनची दोन रूपं उपस्थित असतात. एक स्थिर आणि बहुसंख्य असलेलं बारा अणुभाराचं समस्थानिक आणि दुसरं अस्थिर व किरणोत्सर्गी असलेलं चौदा अणुभाराचं समस्थानिक. या दोन्हींच्या वस्तुमानात फरक असल्यामुळे त्यांची वेगवेगळी ओळख पटवणं सोपं जातं; पण त्यात दोन्हींचेही रासायनिक गुणधर्म सारखेच असल्याने हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेताना वनस्पती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्यामुळे हवेत या दोन रुपांचं आपापसात जे गुणोत्तर असतं तेच जिवंत वनस्पतींमध्येही दिसून येतं. कारण किरणोत्सर्गामुळे जरी त्यातल्या चौदा अणुभाराच्या रूपाचा थोडासा र्‍हास होत असला तरी सतत हवेतून त्याची भरपाई होत असल्यामुळे जोवर ती वनस्पती जिवंत आहे तोवर त्यांच्या अंगचं या दोन रूपांचं आपापसातलं गुणोत्तर हवेतल्या त्यांच्या गुणोत्तराइतकंच राहतं.ती वनस्पती मृत पावली की परिस्थिती बदलते. आता हवेतून नव्यानं कार्बनडायऑक्साइड अंगात शिरत नसल्याने त्यातल्या १४ अणुभाराच्या रूपाच्या र्‍हासाची भरपाई होत नाही. ज्या वेगानं तो क्षय होतो त्याच वेगानं त्यांचं गुणोत्तरही बदलत जातं. किरणोत्सर्गी रूपाचा र्‍हास त्याच्या अर्धायनात मोजला जातो. जेवढ्या काळात मूळ राशीतला पन्नास टक्के भागाचा र्‍हास होतो त्या कालावधीला त्या रूपाचं अर्धायन असं म्हणतात. चौदा अणुभाराच्या कार्बनचं अर्धायन ५७६० वर्ष आहे. म्हणजेच तेवढा कालावधी उलटला की त्या वनस्पतीच्या अवशेषातील बारा अणुभाराच्या रूपाची मात्रा तेवढीच राहते; पण चौदा अणुभाराच्या रूपाची मात्रा निम्मी होते. म्हणजेच गुणोत्तर दुपटीनं वाढतं. तसं झाल्यास त्या अवशेषाचं वय ५७६० वर्षे आहे, असं निदान करता येतं. या पद्धतीलाच रेडिओकार्बन डेटिंग असे म्हणतात.सर्वच पुरातन अवशेषांमध्ये कार्बन असतोच असं नाही. उदारणार्थ, खडकांसारख्या असेंद्रिय निर्जीव पदार्थांमध्ये कार्बन नसतो. शिवाय किरणोत्सारी कार्बनचं अर्धायन तेवढंसं जास्त नसल्यामुळे त्याच्या दसपटीने म्हणजेच साधारण ५० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांच्या वयाचं निदान अचूकपणे करता येतं. त्याहून पुरातन असलेल्या पदार्थांबाबतच्या निदानात संदेह निर्माण होतो.एक स्थिर आणि एक किरणोत्सारी अशा दोन मूलद्रव्यांच्या जोड्या मिळाल्या तर हीच पद्धत अवलंबली जाऊ शकते. अशा अनेक जोड्या आता शोधून काढल्या गेल्या आहेत. युरेनियमची खनिजं खडकांमध्ये असतात. त्याच्या क्षयमालिकेत अशा जोड्या सापडतात. त्यांचा आधार घेऊन खडकांचं वय मोजण्याची रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धत विकसित केली गेली आहे. तिची मदत घेऊन कोणत्याही खडकाचं वय किती हे आता अचूकपणे सांगता येणं शक्य झालं आहे.- *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) अमेरिकेने अफगाणिस्तानात नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यात कोणाचा खात्मा केला ?२) हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते ?३) जागतिक नागरी सरंक्षण दिन २०२२ ची थीम काय आहे ?४) बुद्धिबळ स्पर्धेत जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा भारतातील सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे ?५) देवदार, पाईन ह्या वनस्पती कोणत्या प्रदेशात आढळतात ?*उत्तरे :-* १) अयमान अलजवाहिरी, अल कायदाचा प्रमुख २) खोडापासून ३) प्रत्येक घरात नागरी सरंक्षण आणि प्रथमोपचार ४) रमेशबाबू प्रज्ञानानंद ५) हिम प्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीराम पा. जगदंबे, धर्माबाद● अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक● सय्यद जाफर● दत्तात्रय सितावार● किरण सोनकांबळे● साईनाथ जायेवाड● देवराव कोलावाड● मनोज मानधनी● सचिन वसरणीकर● शेख वाजीद● विकास कांबळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.**रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🤝 मैत्री 🤝*मैत्रीचे बंधन चिवट अतुटनसे पडे मनीकधी वैर फूट येई मित्र सदासंकटी धावून धास्तावल्या जिवाघेई सावरून निष्पाप मैत्रीचेप्रेमळ सुमनसान्निध्यात नित्य फुलवी जीवनऋणानुबंधाचाघट्ट असा धागा ह्रदय कप्प्यातएकमेव जागा✍️ *अर्चना गरूड**ता.किनवट,जि.नांदेड*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमच्या मनात चार विचार येत असतील तर त्यातील एक चांगला विचार निवडून त्याचा मनातून स्वीकार करा आणि पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग करा नक्कीच ते पूर्ण होईल.कारण तो विचार हा तुमचे ध्येय असेल.कारण ध्येय असणारी माणसे कधीच मागे हटत नाहीत.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म हीच पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.**'कर्मे ईशू भजावा.'**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ *क्रांतिसिंह नाना पाटील जयंती*💥 ठळक घडामोडी :-■२००४-राज्यपाल महमंद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.■ १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.■ १९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार. ■ १९४८-भारतीय अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली.(Indian Atomic Energy Commission)💥 *जन्म* :-●१९००-क्रांतिसिंह नाना पाटील,स्वातंत्र्य सैनिक ,समाजसुधारक.● १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.● १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :-◆ १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.◆ २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.◆ १९५७-देवदास गांधी,पत्रकार,हिंदुस्थान टाईम्स चे संस्थापक,महात्मा गांधींचे पुत्र.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे आणि जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अभिजीत चौधरींनी पदभार स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : जिल्ह्यातल्या प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचे नाव आलेच पाहिजे. यासाठी मतपरिवर्तन करून प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांचा दृष्टीकोण बदलण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांमध्ये जनजागृती करा, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसई पूर्वेतील रहिवाशी असलेल्या आलिया पवार यांनी गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी सुरु केली आहे. दोन सत्रांत झोपडपट्टीतील सुमारे 30 ते 40 मुलांना त्या मोफत शिकवणी देत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने पाचव्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदक खिशात घातली असून दोन रौप्य पदकंही जिंकली आहेत. एकूण 13 पदकं जिंकली आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••8️⃣ *भारताने वेस्ट इंडीजवर मिळवलेल्या या विजयाने भारताने मालिकेत 2-1 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Birds Name👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EmGAyBlKj0Q~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सलामत तो ......* हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे....https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आपल्या शरीरात एकूण किती जनुकं आहेत ?* 📙आपल्या यच्चयावत अनुवांशिक गुणधर्मांचा आराखडा डीएनए या रसायनाच्या रेणूंमध्ये सांकेतिक रूपात साठवलेला असतो. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात असलेल्या डीएनएमध्ये ही माहिती साठवलेली असते. या डीएनएची रचना दुहेरी गोफासारखी किंवा गोल गोल जिन्यांसारखी असते. या जिन्याच्या पायऱ्या समोरासमोरच्या कठड्यांना जोडलेल्या नायट्रोजनयुक्त घटक रेणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक पायरी ही समोरासमोरच्या दोन रेणूंच्या जोडगोळीची बनलेली असते. या घटक रेणूंच्या अनुक्रमाक अनुवांशिक गुणधर्मांची माहिती साठवलेली असते. या माहितीचा एकक म्हणजे एक जनुक.आपल्या शरीरातल्या डीएनएमध्ये एकूण तीन अब्ज पायऱ्या म्हणजेच नायट्रोजनयुक्त घटक असतात. तीन पायऱ्या मिळून जो एक कोडाॅन होतो तो प्रथिनांच्या साखळीतील एका घटकाविषयीचा आराखडा सांकेतिक रूपात आपल्यात दडवून ठेवतो. याचा अर्थ झाला की असे किमान एक अब्ज कोडाॅनं आपल्या शरीरात असतात. जनुकं अशा काही कोडाॅनची बनलेली असतात. काही जनुकं थोड्याच कोडाॅनची असतात, तर काहींची लांबी त्याच्या कितीतरी पट असते. त्यामुळे शरीरात एकूण नक्की किती कोडाॅन आहेत याची माहिती नव्हती; पण एकूण कोडाॅनच्या संख्येवरून किमान एक लाख तरी जनुकं शरीरात असावीत, असा अंदाज केला गेला होता. मानवाच्या यच्चयावत जनुकसंचयाचं वाचन करण्याचा 'ह्युमन जीनोम' हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यापूर्वी मूषक वगैरेसारख्या काही प्राण्यांच्या जीनोमचं वाचन करण्यात आलं होतं. त्यातून त्या प्राण्यांच्या शरीरातल्या एकूण जनुकांच्या संख्येची माहिती मिळाली होती. त्यावरूनही हा अंदाज योग्य वाटत होता.पण प्रत्यक्षात जेव्हा मानवी जनुकसंचयाचं वाचन सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसा वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं दिसून आलं. आजमितीला अशी चाळीस हजार जनुक असावीत असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या बहुतेक वैज्ञानिकांचे मत आहे. ते सर्व मान्य आहे असं नाही. कारण ऐकून डीएनएपैकी कितीतरी भाग कोणत्याच प्रथिनाच्या उत्पादनात सहभागी नसल्याचं दिसून आलं आहे. याला जंक डीएनए किंवा इन्ट्राॅन असं म्हणतात. प्रथिनांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या डीएनएला एक्झॉन असे म्हणतात. या दोन्हींची एकमेकांमध्ये गुंफण झालेली आहे. म्हणजे दोन एक्झॉनच्यामध्ये काही इन्ट्राॅन आहेत. तसंच एका जनुकामध्ये एकाहून अधिक एक्झॉन असतात आणि ते काही इन्ट्राॅनमुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात, हेही दिसून आलं आहे. म्हणूनच काही वैज्ञानिक या ४० हजारांच्या आकड्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मते खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक असावी; आणि ७० ते ८० हजार जनुकं शरीरात असावीत, असा त्यांचा दावा आहे. जसजशी हय़ुमन जिनोमची अधिक तपशीलवार माहिती हाती येत आहे तसतसा यापैकी कोणता दावा खरा आहे यावर अधिक प्रकाश पडणार आहे.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते ?२) बुद्धिबळ खेळाचा विश्वचषक समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा पहिल्यांदाच कोणत्या देशात सुरू आहे ?३) 'रानपिंगळा सरंक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?४) कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?५) लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागातून मिळतो ?*उत्तरे :-* १) के. आर. नारायणन २) भारत ( १८८ देश, १७०० खेळाडू ) ३) २४ ऑक्टोबर ४) कार्बन, हायड्रोजन, प्राणवायू ५) फुलांपासून *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● अजय बिरारी● पोतन्ना चिंचलोड, येवती● प्रदीप कार्ले● उत्तमराव नरवाडे● भवरसिंग*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.**देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*पाऊस*आला आला महापूर झाला हाहाकारपूरामध्ये वाहून गेला जगण्याचा सार ...मित्रा, पूरामध्ये वाहून गेलाजगण्याचा सार ...व्हरका वासे वापरलेलं गोदाकाठी घर होतंभान हरपून सारं कसं घरासाठी जगनं होतंउध्वस्त झालं घर वाहून गेला संसार ...पूराच्या त्या पाण्यानं घर निघालं न्हाऊनघराचं अस्तित्व माझ्या सारं गेलं वाहूनअस्तित्वासाठी आता फिरतो दारोदार ...माहित नाही कसा असतोजमीनीचा सातबारामाझ्या जवळ नाही की होआठाचा ही उतारारहिवासी इथला मी ना ओळख ना आधार ...*अनुरत्न वाघमारे, नांदेड*9673643276•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या प्रगतीकडे नेण्याचे काम करते.- व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...**त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.**मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.**बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💐 *_फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा_* 🌹 वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात व कमी कालावधीत अनेकापर्यंत पोहोचण्याचा उत्तम माध्यम आहे. आणि हे सर्व आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे आणि मी ते दररोज वाचतो व हजारो मित्रांना शेअर करीत असताना मनस्वी आनंद होतो.महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे अंधकारमय जीवन पुन्हा प्रकाशमय झाल्याचे उदाहरणे आहेत.एकंदरीत आपल्या समुहाच्या माध्यमातून एक उत्तम समाजसेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे श्री येवतीकर सरांसह सर्वांचे मनःपूर्वक आभार.पुढील वाटचलीस मंगलमय शुभेच्छा...🙏✍ _श्री शिवानंद चौगुले,चिंचवड_ _विशेष कार्यकारी अधिकारी_•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 02/08/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *वायु सेना दिन - रशिया*◆💥 ठळक घडामोडी :- ■ १७९०- अमेरिकेत पहिली जनगणना सुरू.■ १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.■ १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.💥 *जन्म* :-◆१८६१-प्रफुल्लचंद्र रे,बंगालमधील प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ,◆ १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. ◆१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 *मृत्यू* :-● १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.● १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई.● १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाविकास आघाडीचे निर्णय रद्द केल्याबद्दल शिंदे सरकारविरोधात हायकोर्टात याचिका, याचिकेवर याच आठवड्यात सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार? भारताचा 116 देशांसोबत करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संजय राऊत यांची ईडी आज चौकशी करणार; राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार, बायडेन म्हणाले, "आता खरा न्याय झाला"*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरचा कांस्य पदकावर कब्जा, कॉमनवेल्थमध्ये भारतानं नववं पदक जिंकलं!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडीज 5 गडी राखून विजयी, मालिकेतही साधली बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*A to Z👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wjpvRBVPoaI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखीदेखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. .......पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷🍃 *काव्यांगण रोज एक कविता* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*श्रावण*पानापानांत श्रावणमनामनात श्रावणपशुपक्षी झाडेवेलीगेली चिंबचिंब होऊन! सप्तरंगी इंद्रधनू आले नभात रंगून आळस निराशा मनीच्या टाकू चला झटकून! साज पोपटी लेवूननवचैतन्य दाटलेनववधू समान धरती आकाश भेटले! कड्या कपारी मधून खळाळती हे निर्झर भान हरून रानात नाच करीती मयुर!सणउत्सव घेऊनआला पहा श्रावणपोथीपुराणांचे चालेघरोघरी पारायण! भजन किर्तनाची धुन घुमे मंदिरा मधून धुंद फुलांच्या गंधाने गेले चराचर मोहून! चिंब श्रावणसरीने गेली मोहरून काया आला श्रावण श्रावण अवघी धरा जगवाया ! श्रीमती सुनिता वाव्हळजि.प.प्रा.शाळा कुरुळीता.खेड जि.पुणे.Mob. 8080362939•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शपथविधी समारंभात भाषणाची सुरुवात कोणत्या शब्दाने केली ?२) एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला पहिल्यांदा त्यांच्या भूमीत 'व्हाइटवॉश' देणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता ?३) सारस पक्ष्यबाबत माहिती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया कडून कोणत्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे ?४) ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली ?५) 'कॉस्टिक सोडा' चे शास्त्रीय नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) जोहार २) शिखर धवन ३) 'सारसाची सुरस कहाणी' ४) १९२९ ५) सोडिअम हायड्राक्सईड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दयानंद भुत्ते● रवींद्र वाघमारे● दिगंबर वाघमारे● कैलाश चंदोड● काशीनाथ उशकलवार● जी. पी. मिसाळे● आनंद पाटील धानोरकर● शिलानंद गायकवाड● प्रतीक गाडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.**माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐विचार करा💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~