✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 01/02/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥ठळक घडामोडी⌛ १८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचीपहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.💥 जन्म :-⌛१८८४ : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.💥 मृत्यू :-⌛२००३ : कल्पना चावला, महिला अंतराळवीर.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *'विशाखापट्टणम' आंध्र प्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर न्यायालयाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील अस्थिर राजकारणाचा परिणाम राज्याला भोगावा लागतोय : आमदार बच्चू कडू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील पोटनिवडणुका महाविकास आघाडी लढवणार, अजित पवारांनी केलं स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 56 टेबलवर उद्या होणार मतमोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्कार रकमेत वाढ, दहा लाख वरून पंचवीस लाख करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा nirnayq*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/aB0Ipn0I8RE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंतराळवीर कल्पना चावला*• काही लोक निधनांनतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात. अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे.• 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.• 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982 साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनीअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या.• 1984 मध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनीअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.• अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था The National Aeronautics and Space Administration (NASA) इथं कल्पना यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.• नासामध्ये काम केल्यानंतर ओवरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या. त्याठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले.• नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला. मार्च 1995 साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉनसन एरोनॉटिक्स सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं.• त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या 15 व्या फळीत ठेवण्यात आलं. तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम देण्यात आलं.• नोव्हेंबर 1996 मध्ये नासानं एक घोषणा केली. त्यामध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना याच्याकडं सोपवण्यात आली.• शेवटी तो दिवस उजाडला. 19 नोव्हेंबर 1997. त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यावेळी त्यांनी 376 तास आणि 34 मिनिटं अंतराळात घालवली.• एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला 252 फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.*कल्पना यांचा शेवटचा प्रवास*• नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला 7 सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्याच्याकडं देण्यात आली.• जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेषतज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले होते.• 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.• त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.• 22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.• तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.।। विनम्र अभिवादन ।।संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत ?२) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ( UNEP ) चे मुख्यालय कोठे आहे ?३) 'विक्टर सिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो ?५) ऑस्ट्रेलियन महिला ओपन टेनिस स्पर्धा २०२३ चे जेतेपद कोणी पटकावले ?*उत्तरे :-* १) ५३ २) नैरोबी, केनिया ३) सलमान रश्दी ४) २५ जानेवारी ५) आर्यना सबालेंका, बेलारूस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख👤 नारायण गायकवाड👤 शिवानंद सूर्यवंशी👤 कवी गजानन काळे👤 अतुल भुसारे👤 शिवम पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रघुनायकावीण वांया शिणावे। जनासारिखे व्यर्थ कां वोसणावें॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे। अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥२४॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.**देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.**"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या  जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल.ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सम्राट आणि साधू*एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.*तात्पर्य*मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31-01-2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-  १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-  १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान, प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर बहुमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरा; 10-12 दिवस आधीच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला तर पोलीस आयुक्तांकडून तब्बल चार तास पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2 फेब्रुवारीला मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात होणार 'स्मार्ट अंगणवाडी', 800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात, 2 तारखेला लागणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा माजी सलामीवीर मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ट्विटरने केली निवृत्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/__Ncdqx8jeo~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - व्यसन* http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ या वर्षी किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे ?२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा कोणी दिली ?३) ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे मोड होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे ?४) आंतर सरकारी तांत्रिक कार्यगटाच्या १२ व्या सत्रात उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली ?५) राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सहा २) भंते चंद्रमणी महास्थविर ३) जम्मू काश्मीर ४) भारत ५) १९४८*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 👤 हिलाल पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :-प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *हुतात्मा दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.१९९९: पण्डित रविशंकर यांना भारतरत्‍न जाहीर.💥 जन्म :-१९२९: हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म.💥 मृत्यू :- १९४८: राष्ट्रपिता महात्मा गांधी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा किशोर दास यांचा अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकानं केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक! MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे मतदान आज, 5 मतदारसंघात चुरस*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *70 टक्के मागण्या पूर्ण झाल्यानं लिंगायत समाजाचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित, मात्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी लढा सुरुच राहणार असल्याचं जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनमध्ये नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले विक्रमी २२ वे ग्रँडस्लॅम जेतेपद, राफेल नडालच्या विक्रमाशी साधली बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेत भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकलं, अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकात भारताचा विजय, इंग्लंडवर ७ विकेट्सनी मात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/zI_Z8omB9No~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लघुकथा - वेळ नाही मला*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_14.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *नबा किशोर दास*ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि  बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते.  दास यांच्यावर अपोलो हॉस्पिटमलमध्ये उपचार सुरु होते.नबा किशोर दास यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ओडिशातील झारसागुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुका जिंकत विजयाची हॅट्रिक केली.सध्या ते बिजू जनता दलमध्ये होते. ते नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक होते. मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळातील ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते. काही दिवसांपूर्वीच नबा किशोर दास यांनी शनिशिंगणापूरच्या शनि देवाला एक कोटी रुपयाचा कलश अर्पण केला होता. एक किलो सातशे ग्रॅम सोने आणि पाच किलो चांदीचा उपयोग करून हा कलश तयार करण्यात आला होता.💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••"मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जास्वंद हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ?२) आंतरराष्ट्रीय टी - २० मध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?३) सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्रे उपलब्ध करून देणारा देशातील पहिला जिल्हा कोण ठरला आहे ?४) भारताने पुन्हा कोणत्या देशासोबत १०० हून अधिक चित्ते हस्तांतरित करण्याचा करार केला आहे ?५) आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) मलेशिया व दक्षिण कोरिया २) सूर्यकुमार यादव, भारत ( ६८ षटकार ) ३) वायनाड ४) दक्षिण आफ्रिका ५) २४ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 प्रा. बालाजी कोंपलवार, सामाजिक कार्यकर्ते, धर्माबाद👤 राजेश पटकोटवार, धर्माबाद👤 सचिन रामदिनवार, मुखेड👤 सौ. सारिका सब्बनवार, कुंडलवाडी👤 बालाजी पुलकंठवार, धर्माबाद👤 मगदूम अत्तार, सहशिक्षक👤 देवराज बायस👤 सुरज एडके👤 सतीश गणलोड👤 शिवकुमार माचेवार👤 अंकुश निरावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••न बोलें मना राघवेवीण कांहीं। जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो। देहांतीं तुला कोण सोडूं पहातो? ॥२३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंगीकारलेली माणुसकीची वागणूक*एका सिंहाने एक हरिण मारले व त्यास तो फाडून खाणार इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता. तो चोर सिंहाला म्हणाला, 'अरे सिंहा, या हरणाचं अर्ध मांस तुझ व अर्ध माझं.' हे ऐकून सिंह त्यास म्हणाला, 'अरे, निगरगट्ट माणसा, तुझा इथे काहीही संबंध नसता, एकदम पुढे येऊन मी मारलेल्या हरणाचं अर्ध मांस तू मागतोस, या तुझ्या वागण्याबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू इथून चालता हो, नाही तर फुकट मरशील.' हे ऐकून तो चोर भिऊन पळून गेला.इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने चालला असता सिंहाला पाहून त्याला टाळण्यासाठी दुसर्‍या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंहाने त्याला आदराने हाक मारली व म्हणाला, 'अरे भल्या माणसा, भिऊ नकोस. तुझ्या चांगल्या वागण्यामुळे या हरणाच्या मांसाचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस. ये आणि हा वाटा घेऊन जा.' सिंहाने दोन वाटे केले. एक त्यास देऊन दुसरा त्याने स्वतः खाल्ला व अरण्यात निघून गेला.*तात्पर्यः**माणसाची एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाचे वागणे पाहून सभ्य व भिडस्त लोकांना इतरजण आपण होऊन मान देतात त्या दिलेल्या  मानाचा मान टिकवून ठेवणे हे आपल्या वागण्यावर असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 28/01/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी● २००० - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणाऱ्या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन● २००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर💥जन्म● १८६५ - लाला लजपतराय, भारतीय क्रांतिकारक● १९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.● १९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.● १९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.💥मृत्यू● १९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक● १९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र!*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *"मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत, तसेच लायसन्स मिळण्याची प्रक्रिया अधिक कठोर करावी मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील चार शेतकऱ्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या चार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दक्षिण अफ्रिका पुढील दशकभरात 100 आफ्रिकन चित्ते भारतात पाठवणार, पर्यावरण मंत्रालयाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात होणार साजरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जुन्या पेन्शनचा प्रश्न सुटला नाही तर, राजकारणातून संन्यास घेईन, अपक्ष उमेदवार सुरेश पवारांचा निर्धार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. न्यूझीलंड T-20 सामन्यात भारताचा 21 धावानी झाला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wqweh0BpWEw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - पाथरवट*https://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_22.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कर्करोग वा कॅन्सर हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा रोग आहे.प्रत्यक्षात कॅन्सर म्हणजे एक रोग नाही. दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आज ठाऊक आहेत. कॅन्सर कोणत्याही पेशीमध्ये, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवामध्ये होऊ शकतो. सर्व कॅन्सर मधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ. सामान्यपणे पेशी विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. पेशी विभाजनाची ही नेहमीची पद्धत आहे. कधी कधी पेशी विभाजन नव्या पेशीँची आवशकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींचे गाठोडे म्हणजे अर्बुद किंवा ट्यूमर. अर्बुदाचे दोन प्रकार आहेत.बिनाइन ट्यूमर म्हणजे कर्करोगाची गाठ. ही गाठ सहज काढून टाकता येते. अशा बिनाइन ट्यूमरच्या पेशी बाहेर पडून नव्या अवयवामध्ये नव्याने कर्करोगाच्या गाठी तयार करीत नाहीत. बहुतेक बिनाइन ट्यूमर प्राणघातक नाहीत.मारक गाठी (मॅलिग्नंट) कर्करोग. कर्करोगाच्या अनियमित आणि अनिर्बंध वाढणार्‍या पेशींच्या गाठीपासून मारक गाठी बनतात. या गाठी सभोवतालच्या उती आणि अवयवामध्ये पसरतात. गाठीमधून बाहेर पडलेल्यापेशी लसिका संस्थेमार्फत किंवा रक्तवाहिन्यामधून इतर अवयवांमध्ये प्रवेशतात. त्यामुळे मूळ ज्या अवयवामध्ये मारक गाठी झालेल्या असतात त्याहून वेगळ्या अवयवामध्ये कर्करोग पसरतो. या प्रकारास कर्कप्रक्षेप म्हणतात.जेव्हा कर्करोग मूळ अवयवामधून दुसर्‍या अवयवामध्ये प्रक्षेपित होतो त्यावेळी दुसर्‍या अवयवामधील कर्करोग पेशी मूळ अवयवामधील कर्कपेशीप्रमाणेच असतात. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा कर्करोग मेंदूमध्ये स्थालांतरित झाल्यास मेंदूमधील कर्कपेशी या फुफ्फुस कर्कपेशीच असतात. अशा आजारास प्रक्षेपित फुफ्फु्स-कर्करोग म्हणतात.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) आयसीसीने २०२२ या वर्षातील सर्वोत्तम टी - २० क्रिकेटपटू म्हणून कोणाला निवडले ?२) जीवनविद्या मिशनचे प्रणेते कोण ?३) कोणत्या फळाला पिकवण्यासाठी ३ वर्षे लागतात ?४) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ( ILO ) मुख्यालय कोठे आहे ?५) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना कोणत्या देशाची आहे ?*उत्तरे :-* १) सूर्यकुमार यादव, भारत २) सद्गुरू वामनराव पै ३) अननस ४) जिनिव्हा ५) भारत ( BCCI )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अनिल सोनकांबळे👤 राजेश अर्गे👤 सलीम शेख👤 मोगलाजी मरकटवाड👤 राम पाटील ढगे👤 सोपानराव डोंगरे👤 श्रीनिवास सितावार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सज्जना हीत माझें करावें। रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा। जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.* *समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.* *"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका बेडकाचे पोर नदीकाठी बसून तेथे एका वेताच्या जाळीकडे मोठ्या कौतुकाने पाहात होते. त्याची आई जवळच होती. तिच्याजवळ त्याने त्या वेताच्या हिरव्या पानांची व त्यांच्या भक्कम कांडांची फार स्तुती केली. काही वेळाने मोठे वादळ झाले आणि त्याच्या जोराने ती वेताची जाळी उपटली गेली व सगळे वेत नदीतून सैरावैरा वाहू लागले. त्यातला एक मोडका वेत त्या बेडकीच्या हाती लागला. तो आपल्या पोरास दाखवून ती म्हणाली, 'मघाशी जो वेत तुला इतका भक्कम दिसत होता, त्याची आता काय स्थिती झाली आहे ती पाहिलीस का ?'तात्पर्यः- नाम बडे दर्शन छोटे ! अशा वस्तू बर्‍याच असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ दि. 27/01/2023 वार - शुक्रवार=========ஜ۩۞۩ஜ=========🌷    .  *दिनविशेष* .   🌷=========ஜ۩۞۩ஜ=========💥 ठळक घडामोडी :- १९६७: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था बालभारती या नावाने ओळखली जाते.💥 जन्म :-१९०१: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी१९२२: हिन्दी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित१९२६: भारताचे १३ वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य💥 मृत्यू :- २००९: भारताचे ८ वे राष्ट्रपती आर. वेंकटरमण *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9404277298=========ஜ۩۞۩ஜ=========   🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷=========ஜ۩۞۩ஜ=========1⃣ *देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, कर्तव्यपथावर देशाच्या सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन*-----------------------------------------------------2⃣ *इस्रोचे  यान बदलणार युद्धाची पद्धत, अंतराळात भारताची ताकद वाढणार*-----------------------------------------------------3⃣ *पुण्यात स्वारगेट परिसरात दुकानांना भीषण आग, 3 दुकाने आगीत जळून खाक*-----------------------------------------------------4⃣ *दहावी-बारावी परीक्षा शुल्कातून बोर्डाला मिळाले तब्बल साडेतेरा कोटी रुपये; शुक्रवारपासून मिळेल प्रवेशपत्र*-----------------------------------------------------5⃣ *देशात धर्म-जातीच्या नावावर जास्त दिवस राजकारण चालणार नाही; कॉंग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांची भाजपवर टीका*-----------------------------------------------------6⃣ *आज रांचीच्या मैदानात खेळविला जाणार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 सामना*-----------------------------------------------------7⃣ *Hockey World Cup 2023 : भारताकडून जपानचा दारुण पराभव, 8-0 च्या फरकाने सामना घातला खिशात*-----------------------------------------------------*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300=========ஜ۩۞۩ஜ========= 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*=========ஜ۩۞۩ஜ=========*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/sQ9gjdaKcrE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========         *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*=========ஜ۩۞۩ஜ=========               *कमवा आणि शिका*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlआपले अभिप्राय जरूर द्यावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*~~~~~~~~~~~~~~~~~~~=========ஜ۩۞۩ஜ=========          🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃=========ஜ۩۞۩ஜ=========           *तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी*तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता.  वेद, उपनिषदे, रामायण, महाभारतइत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.*संकलन*=========ஜ۩۞۩ஜ=========              *""फ्रेश सुविचार""*=========ஜ۩۞۩ஜ=========ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.=========ஜ۩۞۩ஜ=========            *आजची प्रश्नमंजुषा*=========ஜ۩۞۩ஜ=========१) नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताने न्यूझीलंडला किती फरकाने हरविले ?२) बॅटरी निर्मितीत जगातील अव्वल क्रमांकाचा देश कोणता ?३) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते ?४) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा २३ जानेवारी हा जन्मदिवस कोणता दिवस साजरा केला जातो ?५) ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?*उत्तरे :-* १) ३ - ० २) चीन ३) शिपकीला पास ४) पराक्रम दिवस ५) महाराष्ट्र *संकलन* जैपाल भै. ठाकूर जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)=========ஜ۩۞۩ஜ=========🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂=========ஜ۩۞۩ஜ=========👤 दत्तराम बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ]*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*📱9423625769=========ஜ۩۞۩ஜ=========🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟=========ஜ۩۞۩ஜ=========*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.**आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*   ••●🍁‼ *रामकृष्णहरी* ‼🍁●••             🍁🍁🍁🍁🍁🍁    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*         📱 9167937040=========ஜ۩۞۩ஜ=========      *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*=========ஜ۩۞۩ஜ=========इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे. त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद..९४२१८३९५९०/            ८०८७९१७०६३.=========ஜ۩۞۩ஜ=========🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭=========ஜ۩۞۩ஜ=========               *जंगलचा राजा !*एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.अस्वलाला वाटलं...'आपण ही जंगलचा राजा व्हावं. सिंहासारखं रुबाबात फिरावं.'अस्वलानं ठरवलं... आता आपण रोज सिंहाचा पाठलाग करायचा. तो कसा चालतो? तो कसा बसतो? तो कसा खातो? तो कसा फिरतो? हे नीट पाहायचं. मग आपण ही तसंच करायचं. जंगलचा राजा व्हायचं. तेव्हापासून रोज ते अस्वल, सिंहाच्या पाळतीवर राहिलं. लांबून झाडामागून सिंहाच्या बारीक सारीक गोष्टी पाहू लागलं.सिंहाचं ऐटित चालणं. झाडाखाली त्याचं डौलदार बसणं. सिंहाची भरदार आयाळ. त्याचं राजा सारखं जंगलात फिरणं.पण, चार-पाच दिवसात अस्वल कंटाळलं. अस्वलाला वाटलं...खरं म्हणजे जंगलचा राजा मीच व्हायला पाहिजे. कारण सिंहापेक्षा मी जाडजूड आहे. सिंहाला तर फक्त मानेवरच आयाळ आहे.माझ्यातर सर्व अंगावर सिंहासारखी आयाळ आहे. आणि मी पण झाडाखाली डौलात बसतोच की! जंगलामधे फिरतोच की!पण...मला सिंहासारखं चालता येत नाही म्हणून मी जंगलचा राजा होत नाही! मी सरळ चालतना मागे वळून पाहात नाही म्हणून जंगलचा राजा होत नाही!बस्स!! आता ठरलं तर... आज पासून चालताना मधे-मधे मागे वळून पाहायचं आणि जंगलचा राजा व्हायचं. त्या दिवसापासून ते अस्वल चालताना मागे वळून पाहू लागलं. आपण चालताना मागे वळून पाहातो, हे इतर प्राणी पाहतात की नाही? हे पण पाहू लागलं.'मी किती जाडजूड आहे पाहा. माझी अंगभर आयाळ पाहा. माझं रुबाबदार चालणं पाहा. आता तरी मला राजा म्हणा..असं भेटेल त्या प्राण्यांना सांगू लागलं.पण...तरीही जंगलातले छोटे मोठे प्राणी त्याला राजा म्हणेनात.अस्वलाच्या पाठी हेच प्राणी ख्वॅ ख्वॅ, फॅक्वॅक फॅक्वॅक करुन हसायचे. शेपट्या हलवून, तोंडं वाकडी करुन त्याला चिडवायचे.अस्वल वैतागलं. भलतंच चिडलं. चराचरा केस खाजवत, कराकरा दात चावू लागलं.अस्वलाने ठरवलं... 'आजच काय तो फैसला करू.जंगलातल्या या चुटूक पुटूक प्राण्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपला रुबाब, आपली चाल त्या सिंहालाच दाखवू. सिंहाशीच सरळ सरळ पंगा घेऊ. माझी राजेशाही चाल पाहताच सिंह आपोआपच मान खाली घालून जंगलातून निघून जाईल. मग या जंगलचा मीच राजा होईन!! अस्वल जे घरातून उठलं ते तरातरा सिंहासमोरच गेलं. सिंह झाडाखाली सुस्तावला होता. अस्वल सिंहाच्या सरळ समोर जाऊन ऊभं राहिलं. सिंहाने शेपटी उडवत अंगावरच्या माशा हाकलल्या. मान वाकडी करत डाव्या पायाने आयाळ खाजवली.अस्वल सिंहासमोरच सिंहासारखं चाललं. म्हणजे थोडसं चालून त्याने पुन्हा पुन्हा मागे वळून पाहिलं. चालताना सिंहासारखं ऐटित चालण्याचा प्रयत्न केला.आता...'हा कोण नवीन रुबाबदार राजा?' असं म्हणत सिंह चवताळून उठेल. किंवा... आपली ऐटबाज चाल पाहून सिंह हे जंगल सोडून पळूनच जाईल, असं अस्वलाला वाटलं होतं.पण....सिंहाने अस्वलाकडे पाहिलं ही नाही! त्याला काही किंमतच दिली नाही. सिंह आपल्याच मस्तीत होता. सिंह आरामात शेपटी उडवत माशा हाकलवत होता. आता मात्र अस्वल भलतं म्हणजे भलतंच चिडलं. त्याच्या अंगावरचे केस ताठ झाले. त्याने उजव्या हाताची नखं झाडावर कराकरा घासली. अस्वलाने ठरवलं... आता आपण सिंहापेक्षा वरचढ व्हायचंच. राजा सिंह सरळ चालताना मधे मधे मागे वळून पाहातो. ठीक आहे. पण आपण आता.. मागे मागे बघतच सरळ चालायचं. आणि जंगलचा राजा व्हायचं. अस्वल मागे मागे पाहात पुढे चालू लागलं. राजा होईन म्हणता म्हणता सरळ खड्यात पडलं!〰〰〰〰〰〰〰〰〰*📝   संकलन*  📝*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेडजि.प.प्रा.शा.गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 25/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.१९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.💥 जन्म :-१८६३: सेवा सदनच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे💥 मृत्यू :- १६६५: सोनोपंत डबीर १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते१९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार२००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे२०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *औरंगाबाद महानगरपालिकेचा अतिक्रमण हटावचा धमाका सुरूच; मकबऱ्यासमोरील 30 अतिक्रमण जमीनदोस्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *ऑस्करमध्ये आरआरआरचा धमाका!  नाटू नाटू गाण्याला मिळालं नॉमिनेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताचे दिग्गज वास्तुविशारद डॉ. दोशी यांचे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशीमा मित्तल यांचे संकल्पनेतून आयआयटी मुंबई यांच्याव्दारे बालकांचे कुपोषण व स्तनपान विषयक महत्त्वकांक्षी उपक्रम नाशिक जिल्हयात राबविण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मेक इन इंडियाची थेट गूगलला टक्कर, BharOS ऑपरेटिंग सिस्टमची यशस्वी चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND Vs NZ : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 90 धावानी पराभव करत भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vjtbarLmu00~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* मतदार राजा जागा हो....!इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्या नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाले. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देश प्रजासत्ताक झाले. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगात सर्वात यशस्वी लोकशाही.......वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_22.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *रमाबाई रानडे*रमाबाई रानडे (जानेवारी २५, इ.स. १८६२ : देवराष्ट्रे, सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत – २६ एप्रिल, इ.स. १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी साताराजिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला. रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्‍नीस शिक्षित केले. रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता. लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदीआणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.संकलन••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २६ जाने.२०२३ ला आपण कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत ?२) भारतीय हॉकी पुरुष संघाचा विश्वचषक स्पर्धेच्या क्रॉसओव्हर लढतीत कोणत्या संघाविरुद्ध ४ - ५ असा पराभव झाला ?३) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके कोणी झळकावली आहेत ?४) नव्या संसद भवनातील राज्यसभा कक्षात बसण्यासाठी एकूण सिटे किती आहेत ?५) दहा ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहितात ?*उत्तरे :-* १) ७४ वा २) न्यूझीलंड ३) वीरेंद्र सेहवाग ( ३ द्विशतके ) ४) ३८४ सिटे ५) X*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीमती कल्पना दत्ता हेलसकर, जालना👤  प्रा. वैशाली देशमुख, कुही नागपूर👤 ललेश पाटील मंगनाळीकर👤 राजीव सेवेकर👤 महेबूब पठाण👤 अंबादास कदम👤 राहुल आवळे👤 नरेश दंडवते*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना वासना चूकवीं येरझारा। मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं। मना सज्जना भेटवीं राघवासीं ॥२१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कवी कुसुमाग्रज, अब्दुल कलाम, आगरकर किंवा तुकोबा यांना काय म्हणावं, ही खरंच वेगळी माणसं होती का? 'वेडी' होती का? आणि हे 'वेड' असलंच तर ते कोणत्या प्रकारचं होतं? ही एवढी बुद्धिमान, कर्तबगार माणसं पण 'अर्थप्राप्ती' ला त्यांच्या जीवनात नगण्य स्थान होतं. 'जोडोनिय धन उत्तम व्यवहारे' हे त्यांना कळलं नसेल का?**जगरहाटी वेगळी असते. लिओ टाॅलस्टाॅय यांची 'हाऊ मच लँड डज ए मॅन नीड?' ही कथा आहे. पाखोम हा शेतकरी तीचा नायक. त्याला जमीन घेण्याचं वेड आहे. शेवटी त्याची बश्कीर समुदायाच्या लोकांशी ओळख होते. ते पाखोमला अत्यल्प किंमतीला जमीन विकायला तयार होतात. मात्र एक अट असते. पाखोमने सूर्योदयाला धावायला सुरूवात करायची आणि सूर्यास्ताला थांबायचे. त्या दरम्यान जितकी जागा तो चालेल, तेवढी त्याला मिळेल. दुस-या दिवशी पाखोम धावू लागतो. सूर्यास्तापूर्वी तो मूळ जागेवर बश्कीरना भेटायला आणि आपण किती अंतर तुडवले हे सांगायला परततोही. बश्कीरांना तो ते सांगतोही. पण अतिश्रमाने तो कोसळतो.**वर उल्लेखिलेल्या ध्येय वेड्यांच्या अगदी विरूद्ध टोकाची वृत्ती पाखोमची. माणसाला जन्मत:च काही मूलभूत वृत्ती प्राप्त झालेल्या असतात. काही स्वत:साठी झटतात; काही दुस-यांसाठी. अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्त्या' नावाचा सुंदर लघुनिबंध लिहिला आहे. त्यात रात्रभर तेवत राहून इतरांना प्रकाश देणारी एक आणि जिचा काहीच उपयोग न झाल्याने सडून, कुरतडून गेलेली दुसरी अशा मेणबत्त्यांचे सुरेख दर्शन घडवले आहे. शेवटी ज्याने त्याने आपली मेणबत्ती कोणती हे ठरवायचे आहे !*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या जगात सर्वात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोण असेल तर या प्रश्नांचे उत्तर अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे देऊ शकतील.पण माझ्या मते सगळ्यात जास्त वेगवान आणि गतीमान जर कोणी असेल तर फक्त मानवी मनच आहे.पहा ह्या मनाची आतापर्यंत कुणीही वेग आणि गती मोजली नाही.बहिणाबाईंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं,किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर......मन पाखरू पाखरू तयाची काय सांगू मात आता व्हतं भूइवर गेलं गेलं आभायात... अशा या मनाची गती एवढी आहे की ती मोजता येणेच अवघड आहे.अशा या मनाला जर का आपण आपल्या जीवनात आपल्या वशमध्ये ठेवले तर तो यशस्वी होतो आणि नाही ठेवले तर जीवन जगण्यात अपयशी ठरतो.अशा सर्वश्रेष्ठ मनाला आपल्या वशमध्ये ठेवण्याचा अधिक प्रयत्न करायला हवा.म्हणजेच आपल्या जीवनाचा खरा अर्थही कळेल आणि सुखही मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *कृती महत्वाची*स्वावामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली.एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. ’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश!सर्व श्रोते थक्क झाले.तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24/01/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव*💥 ठळक घडामोडी :- १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.१९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.💥 जन्म :-१९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.१९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.१९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.२०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिवसानिमित्त अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांचं केलं नामकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे 52 शिक्षक निलंबित; बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या अंगलट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपाल कोश्यारींचं मोदींना राजीनामापत्र, मुंबई दौऱ्यातच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती, केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *साखरेच्या उत्पादनात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट; निर्यातीवर केंद्र सरकारनं बंधन लावल्यानं कारखानदार अडचणीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बाळासाहेबांच्या जयंतीला शिवसेना आणि वंचितच्या युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती स्वीकारतील, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *500 कोटी रुपये खर्च करुनही पुण्यातील टेमघर धरणाची पाणी गळती सुरुच, जलसंपदा विभागाकडून आणखी 200 कोटींची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या विराट कोहली, सुर्यकुमार यादव आणि हार्दीक पांड्या या 3 खेळाडूंना मिळालं स्थान!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/R1OdLe3NCes~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्ताने प्रासंगिक लेख*पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत : महर्षी मार्कंडेय*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. ..........वरील माहिती पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *पंडित भीमसेन जोशी*पंडित भीमसेन जोशी (फेब्रुवारी ४, इ.स. १९२२; गदग, कर्नाटक - जानेवारी २४ इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्याषष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.अशा या महान गायकाचे  सोमवार  दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नव्या संसद भवनातील लोकसभा कक्षात बसण्यासाठी एकूण सिटे किती आहेत ?२) गोव्यातील कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार मिळाला आहे ?३) युरोपचे रणक्षेत्र कोणत्या देशास म्हणतात ?४) केंद्र सरकारने २०२३ हे कोणते वर्ष म्हणून जाहीर केले आहे ?५) एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे द्विशतकवीर किती व कोणते ?*उत्तरे :-* १) ८८८ सीटे २) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ३) बेल्जियम ४) तृणधान्य वर्ष ५) पाच - रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ईशान किशन व शुभमन गिल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."**विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशिल मन !'*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली.जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.तिथूनमात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो.हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले.मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर,आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका.पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका,इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांदा मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या.मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल.आपले जीवन अधिक सुसह्य होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रामाणिक पहारेकरी*एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.' आता काय करायचं ?' असा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड. " " तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं. पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, " आम्ही महाराज आहोत. "पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे,उघड की दरवाजा. "" तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. "महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट  दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या  प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 16/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.१९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.२००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण💥 जन्म :-१९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता. मृत्यू१९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ१९०५ - दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर १९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.१९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.२००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.२००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपत💥 मृत्यू :- १९३८: बंगाली साहित्यिक शरदचंद्र चटोपाध्याय१९५४: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर२०१४ - दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नेपाळमध्ये यति एअरलाईन्सरचं विमान कोसळलं, 68  प्रवाशांचा मृत्यू, यात पाच भारतीयांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईच्या एनटिसी मिलच्या जागेवरील चाळींच्या पुर्नविकासाचा मार्ग मोकळा, म्हाडाकडून होणार पुर्नविकास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यभरात मकरसंक्रातीचा सण मोठ्या उत्सवात साजरा झाला. नांदेडमध्ये लहानथोरासह मोठ्यांनी देखील लुटला पतंग उडवण्याचा आनंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *उमेदवारी देऊनही अर्ज भरला नाही, काँग्रेसचा डॉ. सुधीर तांबेंना हिसका, चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वाढली थंडी ; महागली अंडी, अंड्यांच्या दरानं सर्व विक्रम मोडीत काढले, एक डझन अंड्याचा दर पोहोचला तब्बल ९० रुपयांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *थिरुवनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/j4UGjxOJN0E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षणभिंत हवे*प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असते. पूर्वीच्या शाळा कोणाच्या घरात, ओसरीवर किंवा झाडाखाली भरविली जात असे आणि सर्वाना शिकवायला एकच शिक्षक असायचा. मात्र ......वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर*द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६)हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.महाविद्यालयीन स्तरावर अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध होतात, पण शालेय स्तरावर आणि शाळा मास्तरांकडून असे लेख लिहिले जाणे अतिशय अपवादात्मक असते. दत्तात्रेरय रामचंद्र कापरेकर यांचे लेख हे त्यांतले एक होते.१९७५ साली अमेरिकेतील प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि त्यांच्या संशोधनावर आधारित Mathematical Games या सदराखाली Scientific American या मासिकात लेख लिहिला, आणि द.रा. कापरेकर भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नाटू नाटू' या गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारा पहिला आशियाई चित्रपट कोणता ?२) भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?३) जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?४) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार कोणी पटकावले ? ५) ७३ तासांत ७ खंडाचा प्रवास करण्याचा विश्वविक्रम कोणत्या दोन भारतीयांनी केला ?*उत्तरे :-* १) आरआरआर २) १८८१ ३) ८५ वा ( ५९ देशात व्हिसामुक्त प्रवेश ) ४) सचिन तेंडुलकर, भारत ५) सुजॉय कुमार मित्रा व डॉ. अली इराणी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 वैभव तुपे, नाशिक👤 रमेश सरोदे👤 ज्ञानेश्वर मोकमवार👤 सचिन होरे, धर्माबाद👤 किरण शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना सांग पां रावणा काय जाले। अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥ म्हणोनी कुडी वासना सांड वेगीं। बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.**याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील,  विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली नावाखालीही विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••इतरांना त्रास देऊन जर आपण आपले जीवन चांगल्याप्रकारे जगू म्हटले तर ते अयोग्यच आहे.कारण त्यांनी परिश्रमातून जे काही मिळवलेले असते ते गुण्यागोविंदाने जगण्याचे स्वप्न साकारत असतात.हे त्यांचे बघवत नाही आणि आपल्याने होत नाही म्हणून इतरांना त्रास देऊन त्यांचे सुख हिरावून घेणे हे वामवृत्तीचे लक्षणच म्हणावे.त्यामध्ये आपण सुखी होऊ शकतो का ? आपल्या बाबतीत इतरांनी असे केले तर आपणास कसे वाटेल ? ते आपल्या मनाला समाधान देते का ? ह्या सा-या गोष्टीचा आपण विचार केला तर नक्कीच त्याचे उत्तर सापडेल आणि पुन्हा आपण ती चूक करणार नाही याची नक्कीच जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.इतरांच्याही सुखस्वप्नात आपणही सहभागी व्हावे हाच आपला माणुसकीचा खरा धर्म आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *सुंदर माझे घर*बिट्टी बेडकुळी कितीतरी वेळ कमळाच्या पानावर लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळया तळयात 'टिप...टिप..' आवाज येत होता, हवा कशी गार गार झाली होती. बिट्टीला मजेत गाणे गावेसे वाटत होते. तिने त्याप्रमाणे तोंड उघडलेही. इतक्यात पलीकडच्या झाडावरून मंजुळ स्वर ऐकू आले. बिट्टीने तिकडे पाहिले. एक छोटीशी मुनिया आपले घरटे विणीत होती. नाजुक, नाजुक काडयांचे विणकाम करताना मधेच गाणे गुणगुणत होती. आता मात्र बिट्टीला राहवले नाही. एका उडीतच तिने पलीकडचा काठ गाठला. म्हंटले 'माझे घर पाहिले कां केवढे मोठे आहे ते?आत कशी रंगीबेरंगी कमळे फुललीत. 'ती कौतुकाने तळयाकडे पाहत म्हणाली. 'शी! हे कसले सुंदर घर? आत भरला आहे गाळ अन् चिखल!' मुनिया नाक मुरडत म्हणाली. बिट्टी मग टुणटुणत पुढे निघाली. आज सगळीकडे कसा मऊ मऊ चिखल पसरला होता. त्यात घसरगुंडी खेळाविशी वाटत होती. बिट्टीला एक भलामोठा दगड दिसला. त्यावर उडी मारताच आतून आवाज आला, 'कोण आहे?' पाठोपाठ कासवदादा मान बाहेर काढून इकडेतिकडे पाहू लागले. 'अगबाई! कासवदादा तुम्ही त्यात राहता वाटते?' बिट्टीने विचारले. 'तर काय! हेच माझे घर!' पुन्हा आत शिरत ते म्हणाले. मजाच आहे नाही? बिट्टी मनाशी विचार करत पुढे जाऊ लागली. वाटेत झाडावर एक मधाचे मोठ्ठे पोळे लोंबत होते. त्याभोवती मधमाशा उडत होत्या. काही जात होत्या, तर काही येत होत्या. 'बायांनो! तुम्ही इतक्याजणी ह्या छोटयाशा घरात कशा ग राहता?' बिट्टीने विचारले. 'छोटेसे आहे कां ते? आत कशा षट्कोनी खोल्याच खोल्या आहेत! अगदी आरामात राहता येते सर्वांना!'. बिट्टीभोवती गुणगुणत एका माशीने उत्तर दिले. बिट्टी तिथेच थांबून इकडची तिकडची मजा बघत होती. किती गंमतीदार घरे आहेत नाही प्रत्येकाची, ती स्वत:शी म्हणत होती. रस्त्यावर फळांनी लगडलेले एक भलेमोठे झाड होते. त्यावर सुगरणींची लोंबती घरे होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत! सुगरणबाई उडत येऊन खालून वर जात होत्या. आपल्या इवल्याशा चोचीने विणकाम करत होत्या. बापरे! एवढया वा-यावादळातही घर कसे पडत नाही? बिट्टी वर पाहत असताना जवळून आवाज आला. 'माझे घर कित्ती छान आहे! खाऊच्याच घरात मी राहते.' बिट्टीने ह्या टोकाकडून त्या टोकाकडे डोळा फिरवत शोधाशोध केली.शेजारी एक भलामोठा पेरू पडला होता. त्यातून एक अळी डोके बाहेर काढून बिट्टीशी बोलत होती. 'हो! हे बाकी खरेच!' बिट्टीने मान डोलावली. इतक्यात आभाळातून पुन्हा गडाड-गुडूम आवाज आला व पाऊस पडू लागला. समोर एक भली मोठी छत्री उगवली होती. बिट्टी पळत पळत जाऊन त्याखाली उभी राहिली. आता मात्र तिला पुन्हा एकदा गाणे म्हणावेसे वाटले व त्या आनंदात ती गाऊ लागली. 'गार गार वारा अन् पावसाच्या धारा, भिजलेली राने अन् पानोपानी गाणे, झुळझुळणा-या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळयात सुंदर सुंदर माझेच घर !! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14/01/2023💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*भूगोल दिन* *मकरसंक्रांत*💥 ठळक घडामोडी :- १९२३ - विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.१९४८ - लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.१९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.१९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर.💥 जन्म :-१८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. १८९२ - क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर शतायुषी क्रिकेट खेळाडू.१८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री. भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर१९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.१९०८ - द्वा.भ. कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.१९१९ - सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार१९२३ - चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते.१९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.१९३१ - सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज’, ऊर्दू शायर.१९७७ - नारायण कार्तिकेयन, भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग चालक.💥 मृत्यू :- १९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.२०१४ - पं. पुरुषोत्तम वालावलकर, भारतीय हार्मोनियमवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *31 जानेवारी ते 6 एप्रिल, यंदा 66 दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरकार गव्हावरील निर्यातबंदी हटवणार, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *फी न भरल्याने विद्यार्थिनीला अपमानित करुन परीक्षेला बसू दिलं नाही, पालकांची तक्रार; दादरच्या शारदाश्रम शाळेने आरोप फेटाळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी वितरीत, लवकरच होणार वेतन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये सिन्नर - शिर्डी मार्गावर भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-अनुला काय काय दिसतं**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/a0v-UeZYldc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मकर संक्रांती निमित्त लेख**गोड गोड बोलण्याचा सण*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अभिनेत्री दुर्गा खोटे*दुर्गा खोटे ( जन्म १४ जानेवारी १९०५ - मृत्यू २२ सप्टेंबर १९९१ ) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.दुर्गाबाई यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ साली झाला. दुर्गा यांना लहानपणी बानू असे म्हणत होते. त्यांना दोन बहिणी होत्या. एका बहिणीचे नाव इंदू व दुसऱ्या बहिणीचे नाव शालू असे होते. कांदेवाडी या गावात दुगाबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा तेथे वाडा होता. तो वाडा लहान बानू यांना खूप आवडायचा. तेथील वातावरण अतिशय आनंदी होते. दुर्गा यांची काकू काकीबाई ह्यांनी सर्व पोरांचा सांभाळ केला. त्या खूप प्रेमळ होत्या. दुर्गाबाई यांच्या वडिलांचे पूर्ण नाव पांडुरंग शामराव लाड असे होते. दुर्गाबाई यांच्या आईचे नाव मंजुळाबाई असे होते.दुर्गाबाई यांचे वडील मुंबई येथे येऊन सॉलिसिटर झाले. दुर्गाबाईंचे वडील प्रेमळ होते व त्यांची विचारसरणी उदार होती.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला' असे हिंदू धर्माच्या कोणत्या सणात म्हटले जाते ?२) नैसर्गिक ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोणता ?३) कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा जगातील पहिला 'रोबो वकील' कोणत्या देशात पक्षकारांना सल्ला देणार आहे ?४) देशातील पहिले बाल न्यायालय कोठे आहे ?५) महिलांना कामासाठी उत्तम दर्जाचे वातावरण आणि संधी उपलब्ध करून देण्यात भारतातील अव्वल स्थानी कोणते शहर आहे ?*उत्तरे :-* १) मकरसंक्रांत २) सूर्य ३) अमेरिका ४) दिल्ली ५) चेन्नई*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शिवहार चपळे👤 दीपक उशलवार👤 स्वप्नील अबुज👤 सुधाकर एम. कदम👤 तानाजी कांबळे👤 कैलास तालोड👤 रमेश बंडे👤 पवनकुमार तिकटे👤 सुनील मुंडकर👤 राजू वाघमारे👤 गौतम सोनकांबळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना मानसीं दु:ख आणूं नको रे। मना सर्वथा शोक चिंता नको रे॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी। विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आजची संक्रांत ही काही निराळी नाही. दरवर्षी संक्रांत येते, जाते. पण क्रांती मात्र व्हायची तशीच राहते. ज्यावेळेला तुम्ही काळाची क्रांती मोजता, त्यावेळी फक्त ढोबळ रूपाने क्रांती लक्षात येते. या सापेक्ष  जगामध्ये 'क्रांती' काळरूप करून चालणार नाही; तर संज्ञारूप करायला हवी. 'संज्ञा' म्हणजे नुसती व्याख्या नव्हे, तर तुम्हाला चांगलं ज्ञान झालं पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी, 'तिळगुळ घ्या', याचा अर्थ, तिळा तिळाने माणूस जमवा. माझं ह्रदय दुसर्‍यासाठी तीळ-तीळ तुटलं पाहिजे. दुसरा चुकतो कसा, आणि मी डंख कसा मारतो... विंचवाच्या जिभा करून आम्ही जर वागलो, तर काय उपयोग आहे सगळ्याचा?**एका तिळगुळाच्या वडीवर वर्षभर गोड बोलायला सांगत असाल तर काही अर्थ नाही. ते प्रतीक आहे. - गूळ म्हणजे गोडीचं, एकत्र बांधून ठेवण्याचं; आणि तीळ हे स्नेहाचं. प्रतीकात्मक आहे ते. त्याप्रमाणे वर्तन करा. प्रत्येक दोषी माणसाला त्याचे दोष चांगलेच माहीत असतात. दुसर्‍याने काही दाखवायचंच असेल, तर गुण दाखवायचे असतात. आपण थोडं एकमेकाला सांभाळून घेऊ शकलो, तर काय होईल? 'संक्रांत' याचा अर्थ,'सम+क्रांत' असा सुद्धा आहे. क्रांती केव्हा होते? समतेने होते.* *एका कवीने सांगून ठेवलंय ते लक्षात ठेवा-*         *"दुर्दम्य होतील आशा आकांक्षा*         *होतील संग्राम गीते पुरी।*         *देशार्थ होतील त्यागी विरागी*         *होईल संक्रांत तेव्हा खरी ॥"* *नुसत्या तीळगुळाने, हलव्याने होणार नाही. 'स्वत:च्या मनाला हलवा', असं ज्यावेळी मी स्वत:ला सांगेन, त्या दिवशी खरी संक्रांत साजरी होईल.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता,प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात.पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चतूर न्यायमुर्ती*एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, 'अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?'जुना मालक म्हणाला, 'मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.' या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, 'तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?'जुना मालक - होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.न्यायमुर्ती - तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे. जुना मालक - (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !न्यायमुर्ती - ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.'न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13/01/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.१९६६ - मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली२०११ - भारतातील पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळला💥 जन्म :-१९३८ - पंडित शिवकुमार शर्मा१९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.१९४९ - राकेश शर्मा💥 मृत्यू :- १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.२०११ : मराठी अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं.  *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढणार, पारा 4 अंशापर्यंत जाण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एमपीएससी विद्यार्थ्यांचे आज राज्यव्यापी आंदोलन, त्रंबकेश्वर देवस्थान आजपासून भाविकांना खुले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य दिवस; नगर प्रदक्षिणेसह तैलाभिषक सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डिसेंबर महिन्यात सोने आयातीत 79 टक्क्यांची घट, 20 वर्षातील नीचांकी आयात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन झालं आहे. 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. श्रीलंका - केएल राहुलची यशस्वी झुंज, अर्धशतकाच्या जोरावर भारताचा 4 गडी राखून विजय, मालिकेतही विजयी आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FxKHBNMx6ys~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *तरुण भारत देश*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *राकेश शर्मा*हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.पटियाला येथे जन्मलेले राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होते.नंतरच्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिले सोलर शहर कोणते ?२) जगात सर्वात जास्त डेटा कोणत्या देशात स्वस्त मिळतो ?३) पृथ्वीच्या केंद्रस्थानाचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस असेल असे अनुमान आहे ?४) कोणत्या जातीचा डास चावल्याने हत्तीपाय हा आजार होतो ?५) भारतातील कोणत्या राज्यात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन होते ?*उत्तरे :-* १) मलकापूर, सातारा २) इजरायल ३) सुमारे ५००० अंश सेल्सिअस ४) क्युलेक्स डास ५) उत्तरप्रदेश ( २९ % )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कु. मित दर्शन भोईर, रायगड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, बिलोली👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 विजयकुमार चिकलोड👤 बालाजी देशमाने*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मानवी' नात्यांमधील  दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया  आत्मशुद्धीकडे नेणारी असते.**बरेचदा आपल्या पुढाकारातून  व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात  पण त्याकरिता मुखवटे उतरवून  माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडल्याशिवाय राहणार नाही. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....*                                   *" कुछ इस तरह मैने*         *जिंदगी को आसान कर दिया,*                    *किसी से मांग ली माफी,*          *किसी को माफ कर दिया !"*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••शब्द हे शस्त्रापेक्षाही धारदार असतात.शस्त्राची जखम शरीरावर होते नि काही काळ राहून ती मिटूनही जाते. परंतु एखादा शब्द जर आपण विचार पूर्वक न वापरला तर तो थेट काळजाला जाऊन लागतो आणि त्याची एवढी जखम होते की,ती आयुष्यभर तशीच काळजाला चिकटून राहते कधीच कमी होत नाही.म्हणून दैनंदिन जीवनव्यवहारात वावरत असताना मोजक्या आणि योग्य शब्दांचा,कुणालाही न लागणा-या शब्दांचा वापर करून आपण आणि इतरांनाही समाधानी रुपात रहावे.जेणेकरुन दोघांच्याही जीवनात आनंद आणि एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले पाहिजे.केवळ तुम्ही विचार न करता बोललेल्या एकाच शब्दाने वैरत्वाची भावना निर्माण होते तर त्याच एका शब्दाने इतरांची मने जिंकून जगावर राज्य करण्याची ताकद निर्माण होते. म्हणून शस्त्रापेक्षाही शब्दांना आपल्या जीवनात अधिक जास्त जपले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आरसा*       एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता.मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’*तात्‍पर्य : आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12/01/2023💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय युवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.💥 जन्म :-१५९८ - छत्रपती शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई१८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद, १९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.💥 मृत्यू :- १९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; सेंद्रीय आणि देशी बीजोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी शिखर संस्था स्थापन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भीम अँप आणि रुपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची मोठी योजना, 2600 कोटींची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 मिनिटात ! ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून होणार खुला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'ऑस्कर' सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीत 'मी वसंतराव'चा समावेश होणं अभिमानास्पद : निपुण धर्माधिकारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून नागो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी, आज भरणार अर्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबई आणि आसाम यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्याचा पृथ्वी शॉ चे त्रिशतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/bo1oFJXBWAY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजमाता जिजाऊ जयंती विशेष**आई असावी जिजाऊसारखी*जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाईवरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_11.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *स्वामी विवेकानंद*स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे,  कला,  साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यानी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्यांनी व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यानी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'राष्ट्रीय युवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ कोठे साठवले जातात ?३) कोणता त्रिभुज प्रदेश 'हरित त्रिभुज प्रदेश' म्हणून ओळखला जातो ?४) अमेरीकेत पहिल्या शीख महिला न्यायाधीश बनण्याचा बहुमान कोणाला प्राप्त झाला ?५) राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था कोठे आहे ?*उत्तरे :-* १) १२ जानेवारी २) पानांमध्ये ३) गंगा ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश ४) भारतीय वंशाची मनप्रीत मोनिका सिंग ५) भोसरी, पुणे*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुधाकर थडके, सहशिक्षक  संचालक, सहकारी पतपेढी, नांदेड👤 डी. बी. शेख, लोहा👤 कन्हैया भांडारकर, गोंदिया👤 रत्नाकर जोशी, साहित्यिक, जिंतूर👤 सुरेश गभाले👤 भारत राठोड👤 नागनाथ भिडे👤 गणेश पाटील भुतावळे👤 अरशद शेख👤 नरेश परकोटवार👤 अमरदीप वाघमारे👤 राहुल दुबे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥देहेदु:ख ते सूख मानीत जावे।विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.**ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सागरातल्या रौद्ररुप धारण केलेल्या लाटांकडून फायद्याची अपेक्षा कधीच करु नये,कारण त्यांच्याकडून नुकसानच होते.ते कधीही शांत नसतातच.अशा सागरी लाटांपासून सावध रहा असा संदेश सागर किनारी असणा-या लोकांना इशारा दिला जातो.त्याचप्रकारे रौद्ररूप धारण करणारी माणसेदेखील सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसांचे कोणत्याही वेळी नुकसानच करतात.याउलट शांत आणि एका लयीमध्ये सागरातून किना-याकडे येणा-या लाटा सागराचे आणि किना-याचे सौंदर्य वाढवतात.ते कधीही कुणाचे नुकसान करत नाहीत. म्हणून माणसाने रौद्ररूप धारण करणा-या लाटांपेक्षा शांत तरंगणा-या लाटांप्रमाणे जीवनात स्थान निर्माण करुन सुंदर आयुष्य घडवावे आणि सुखी समाधानी व्हावे.जीवनात खुप काही सकारात्मक जीवन जगण्याची अपेक्षा निर्माण होते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बुझणारा घोडा*  एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्‍न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'*तात्पर्य* : - मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.💥 जन्म :-१८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.💥 मृत्यू :- १९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठा निर्णय, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळनं बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्य सरकारच्या 75 हजार नोकऱ्यांच्या भरतीत अडथळा येण्याची शक्यता, एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी दोन्ही नियुक्त कंपन्या असमर्थ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा सेवा संघाचं निमंत्रण नाही, मात्र नगरपालिकेकडून रितसर निमंत्रण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जानेवारी महिन्याची 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही, कामगार संघटना आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, तर मुंबईत 13 ते 14 जानेवारीदरम्यान तापमानात घट होण्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मिस्टर इंडियाला गायब करणारे प्रसिद्ध सिनेमॅफोटोग्राफर ट्रिक फोटोग्राफी मास्टर पीटर परेरा यांचं निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *IND vs SL, 1st ODI : पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 67 धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/n7FC58bV-9g~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*शिक्षक आनंदी तर मुले आनंदी*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/09/blog-post_12.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विष्णू सखाराम खांडेकर*(जन्म : ११ जानेवारी १८९८ - मृत्यू ०२ सप्टेंबर १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.इ.स. १९२० साली खांडेकरांनी  महाराष्ट्रातल्या  सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इ.स. १९३८ पर्यंत काम केले. ह्या काळात मिळालेल्या फावल्या वेळेत त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केलेआपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्यावि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)पद्मभूषण पुरस्कार (१९६८)ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठीकोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) एक मोठे झाड प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत दरवर्षी किती किलो ऑक्सीजन देते ?२) वॉटर व्हिजन @२०२७ या थीमसह पाण्यावरील पहिली अखिल भारतीय वार्षिक राज्यमंत्री परीषद कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती ?३) पृथ्वीवर सर्वात पहिले सजीव केव्हा आढळले ?४) सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?५) पृथ्वीचा ऑक्सीजनचा सर्वात मोठा स्त्रोत कोण आहे ?*उत्तरे :-* १) १४ किलो २) जलशक्ती मंत्रालय ३) सुमारे चार अब्ज वर्षांपूर्वी ४) नर्मदा व तापी नदी ५) समुद्री शेवाळ*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी पुलकंठवार, सहशिक्षक, धर्माबाद👤 सिध्देश्वर मोकमपल्ले👤 हणमंत पांडे👤 राहूल ढगे, सहशिक्षक👤 लोकेश येलगंटवार👤 साई यादव, येवती*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे। अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे। न होतां मनासारिखें दु:ख मोठे ॥९॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खरंतर घरात छोट्या छोट्या गोष्टींची देवाणघेवाण सहज व्हायला हवी, ज्यासाठी पैसे नाही लागत , पण 'नातं' विणलं जातं, गुंफलं जातं त्यामुळे !**यामुळे देणा-याला वाटतं आपण काहीच दिलं नाही नि घेणा-याला वाटतं आपल्याला किती मिळालं ?**घर गुंफलं जाण्यासाठी सगळ्यांनीच टिव्हीपासून उठून एकमेकांच्यासमोर काहीवेळ तरी बसू या, दिवसभराबद्दल  बोलू या, जरा हसू या, कधी फुंकर मारू या, कसं छान हलकं-फुलकं वाटतं मग !*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आत्मा आणि ईश्वर हे एक असून ज्यांचे अंत:करणं शुद्ध आणि पवित्र आहे अशा ठिकाणीच परमेश्वर वास करत असतो.म्हणून नेहमी आपल्या अंतःकरणाला शुद्ध विचार,पवित्र मन,इतर जीवांना न दुखवता प्रसन्न ठेवणे,इतरांविषयी वाईट भावना न ठेवता जगणे,ह्या सा-यां गोष्टी आपल्या अंत:करणातून पवित्र मनाने जपल्या तर परमेश्वराशी नातं एकरुप होऊन एक आगळा वेगळा अनुभव आपल्या प्रत्ययास आल्याशिवाय राहत नाही.म्हणून आपले अंत:करण,आचार नि विचार पवित्र ठेवण्यास सदैव प्रयत्नशील असावे© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वानर व कोल्हा*        एकदा एक 🐒वानर व कोल्हा 🐕यांची अरण्यात🌳☘🌿🌱🍃🍀🌳🌴🍂🍁☘🌿🌱🌴🌳🌳 गाठ पडली तेव्हा वानर🐒 कोल्ह्याला म्हणाला, 'अरे, तुझ्या झुपकेदार शेपटाचा काही भाग तू मला देशील तर तो मी लावून वार्‍यापासून माझं रक्षण करीन. तुझे शेपूट तुला पुरून उरण्यासारख आहे. नाही तरी तू ते धुळीत मळवतोस. तर त्यातलं थोडं मला दिलस तर तुझी फारशी अडचण होणार नाही अन् माझंही काम होईल. हे ऐकून कोल्हा म्हणाला, 'अरे वानरा, तू म्हणतोस त्याप्रमाणे माझं शेपूट कदाचित मोठं असलं, तरी ते मी जन्मभर असंच धुळीत मळवीन पण त्यातला एक केसही तुला देणार नाही.'      तात्पर्यःकाही माणसांजवळ बरेच ऐश्वर्य असते पण ते स्वतः त्याचा उपयोग घेण्यास समर्थ नसतात, पण त्यांचा स्वभाव मात्र विलक्षण असतो की, त्या ऐश्वर्याचा ते नाश होऊ देतील पण दुसर्‍याला कधीही देणार नाहीत.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10/01/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.💥 जन्म :-१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे१९१९: संस्कृत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास💥 मृत्यू :- १९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *दहावी- बारावी परीक्षेत यंदा चेकिंग स्कॉड पूर्णवेळ हजर राहणार; गैरप्रकारांना बसणार आळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोनाबाबतची कामं वगळून इतर कामांची कॅग चौकशी; रस्ते दुरुस्ती, जमीन खरेदीच्या कामांची चौकशी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *चंदा आणि दिपक कोचरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, एक लाखांच्या जामीनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच लिंगायत समाजाचा मुंबईत निघणार महामोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *देशातल्या पाच राज्यांमध्ये थंडीचा रेड अलर्ट; महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rW-1XabWegk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राष्ट्रगीत आणि राष्ट्रभक्ती*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *गणेश हरी खरे*गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म १० जानेवारी १९०१ - मृत्यू ०५ जून १९८५)  हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.सौजन्य : इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) टी - २० मध्ये नो बॉल हॅट्ट्रिक करणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ?२) १०८ वी 'इंडियन सायन्स काँग्रेस' नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती ?३) जगातील कोणत्या देशात सर्वाधिक लष्करी सेवा सक्तीची आहे ?४) पाळीव प्राण्यांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा कोणता ?५) संदेशवहनाची साधने कोणती ?*उत्तरे :-* १) अर्शदीप सिंग २) नागपूर ३) उत्तर कोरिया ( ८ ते १० वर्षे ) ४) गुंथर सहा, जर्मन शेफर्ड ( संपत्ती - ४१३२ कोटी ) ५) वर्तमानपत्रे, रेडिओ, टि. व्ही., मोबाईल, संगणक, पत्र इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 श्रीनिवास रेड्डी, धर्माबाद👤 साईनाथ सोनटक्के👤 राजेश कुंटोलू👤 गणेश वाघमारे👤 शत्रूघन झुरे👤 स्वरूप खांडरे👤 आकाश क्षीरसागर, सालेगाव*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी। मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे। परी अंतरीं सज्जना नीववावे ॥८॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गीतेच्या दुस-या आध्ययात दुस-याच श्लोकात भगवंताने असे सांगितले आहे की, " मनुष्य जसा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्म्याचेही असते." याच विधानात आपल्याला नकारात्मकतेचे वस्त्र फेकून देत सकारात्मकतेचे वस्त्र परिधान करणा-यांना शोधावे, पाहावे लागेल.**गीतेतला हा विचार सर्वोच्चतेची भाषा बोलणारा आहे; पण जीवन बदलाच्या विचारात तो ताडून बघायला हवा. सामान्यपणे जीवनात दोन मनं कार्यरत असतात. एक चांगले आणि दुसरे वाईट. जर वाईट बाजू प्रबळ झाली, तर षङरिपु घेरू लागतात आणि माणूस इंद्रियसुखाच्या आहारी जातो. उलट चांगली बाजू बलवान झाली, तर व्यक्ती संतोषी, संयमी, निर्व्यसनी, स्थिरचित्त होऊन जीवनाच्या वळणवाटा सहज पार करू शकतो. अशा वळणवाटा सहजसाध्य होणे म्हणजे सुखी होणे. यालाच सुखाची व्यापक व्याख्या म्हणता येईल.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्याप्रमाणे प्रत्येक फुलाचा आकार, रंग आणि सुगंध वेगवेगळा असतो त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींची शारिरीक रचना,आचार आणि विचार हे वेगवेगळे असतात.याचे कारण जरी वेगळे असले तरी  आपण एकमेकांना आपल्या जीवनात स्वभावानुसार समजाऊन घेऊन आपले जीवन व्यवहार अगदी व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करायला हवा.काही अंशी कमी-जास्त असलेतरी ते आपण आपल्या स्वभावानुसार आणि विचारानुसार ओळखून जीवनात एकोप्याने राहण्यातच आपले खरे कौशल्य आहे.म्हणून कुणालाही आपल्यापेक्षा कमी लेखून आपले वर्चस्व इतरांवर लादू नये.त्यातील एखादा आपल्याला हवा असलेला गुण शोधून आपल्या जीवनात आचरणात आणून एकमेकांना समजावून घेऊन आपल्या जीवनाबरोबर घेऊन आनंदी जीवन जगण्यात धन्यता मानावी.हाच आपला व आपल्या माणुसकीचा खरा धर्म आहे. ज्या विविधतेत एकता असते त्या  एकमेकांच्या भावना दुखावण्यात नसते.तेव्हा आपण वेगवेगळे जरी असलो तरी अनेक विचारांना एकत्रीत बांधून एकतेचे दर्शन घडवू शकतो.हा विचार नित्यासाठी आचरणात आणायला हवा.त्यात आपल्यातही दडलेल्या चांगल्या विचारालासुध्दा इतरांमध्ये सामावून घेण्याची संधी मिळेल.एकमेकांना हीन समजून 'मी 'चे अस्तित्व वृध्दिंगत करणे अयोग्य आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••     *गुरू ,परीक्षा ,शिष्य*गुरुकुलातून तीन शिष्य  उत्तीर्ण होणार होते. त्यांच्या अंतिम परीक्षा सुरू होत्या. गुरू म्हणाले, “एक परीक्षा तुम्हाला न सांगता होईल. तीच तुमची खरी अंतिम परीक्षा असेल..आणि या परीक्षेत तुम्ही पास झाला तर तुमचे जीवन यशस्वी व सत्कारणी लागेल.आता आपल्या गुरुकुलातल्या सगळ्या परीक्षा झाल्या. ती विशेष  परीक्षा काही झाली नाही. गुरुकुलात सत्कार   सोहळाही झाला. प्रथेप्रमाणे तिन्ही विद्यार्थी पुढील जीवनातील आयुष्य यशस्वी करण्यासाठी बाहेर पडले. एके दिवशी ते संध्यासमयी जंगलातुन जात होती.आणखी काही क्षणांमध्ये  काळोख पसरणार होता .राञ होणार अंधार पडणार आणि त्या काळोखातुन त्यांना जंगल पार करून गावी  परतायचे होते . झपझप चालून पुढचं जंगल पार करायचं होतं, मुक्कामाचं गाव गाठायचं होतं. अचानक पुढे चालणारा विद्यार्थी  थबकला. वाटेत एक काटेरी झुडूप आडवं पडलं होतं. तो दोन पावलं मागे आला आणि धावत पुढे जाऊन त्याने एका झेपेत ते झुडुप पार केलं.दुसऱ्याने अंदाज घेतला आणि रस्ता सोडून खाली उतरून त्याने काटे पार केले आणि तो पलीकडच्या बाजूला पुन्हा वाटेवर आला..तिसरा मात्र थांबून काटे वेचू लागला. बाजूला एका छोट्या खड्ड्यात ते लोटू लागला. दोघे मित्र म्हणाले, “अरे, ही काटे वेचायची वेळ आहे का? कोणत्याही क्षणी अंधार पडेल.आता सांज होत आहे.अशा या संध्यासमयी  आपल्याला लवकरात लवकर  मुक्कामाचं गाव गाठायचं आहे. रस्त्यात कुठे वाट चुकलो, तर जंगलात भटकत राहू. चल लवकर..तिसरा युवक म्हणाला, अंधार पडणार आहे, म्हणूनच हे काटे वेचले पाहिजेत. आपल्याला ते दिसले तरी. आपल्यामागून जो वाटसरू  येईल, त्याला काटे दिसणारच नाहीत. त्याच्या पायात काटा घुसला तर त्याची इथे या भयाण जंगलात काय अवस्था होईल, विचार करा. तुम्ही पुढे निघा. मी हे काटे बाजूला करून गाठतोच तुम्हाला धावत..ते दोघे पुढे निघतात, तोच शेजारच्या झाडामागून गुरू बाहेर आले आणि म्हणाले, तुम्हा दोघांना पुन्हा गुरुकुलात यावं लागेल तुमचं शिक्षण अजून अपूर्ण आहे.*तात्पर्यः*अंतिम परीक्षा ज्ञानाची नव्हती, प्रेमाची होती,भावनिकतेची होती , अनुकंपेची होती, सहवेदनेची होती,दुःख वाटून घेण्याची होती.तुम्ही दोघेजण ज्ञान खूप शिकलात, प्रेम अजून शिकणं बाकी आहे.भावनिकतेची जोपासना होणे बाकी आहे.बस तेवढी जोपासयला शिका.मगच जीवनात सर्वोतोपरी यशस्वी व्हाल.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 09/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- २००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.💥 जन्म :-१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोबिंद खुराना १९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर 💥 मृत्यू :- १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर २००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी; भारताला मिळणार नवी ओळख*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *उत्तराखंडमध्ये जोशीमठमधील 500 घरांना तडे, पंतप्रधान मोदींनी दिलं मदतीचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला फटका; महाराष्ट्रात करपा रोगामुळं शेतकरी चिंतेत, अनेक जिल्ह्यात धुक्याची चादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारमध्ये शनिवारी जातीनिहाय जनगणना सुरु झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की बीएसएनएल एप्रिल 2024 पर्यंत त्यांची 5G सेवा सुरू करेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी झाली निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचे कमबॅक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jE5SQ1jz6dY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पार्श्वगायक महेन्द्र कपूर*(९ जनवरी १९३४-२७ सितंबर २००८) हिन्दी फ़िल्मों के एक प्रसिद्ध पार्श्वगायक थे। उन्होंने बी आर चोपड़ा की फिल्मों हमराज़, ग़ुमराह, धूल का फूल, वक़्त, धुंध में विशेष रूप से यादगार गाने गाए। संगीतकार रवि ने इनमें से अधिकाश फ़िल्मों में संगीत दिया।महेंद्र कपूर का जन्म अमृतसर में हुआ था। पार्श्वगायन में कैरियर बनाने के लिए वे कम उम्र में ही मुंबई आ गए थे। 1953 की फिल्म ‘मदमस्त’ के साहिर लुधियानवी के गीत आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया से उन्होंने फिल्मी करियर की शुरुआत की थी। २७ सितंबर २००८ को बीमारी से लड़ने के पश्चात उनका देहावसान हो गया।*पुरस्कार और सम्मान*1963 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - चलो इक बार फ़िर से (ग़ुमराह)1967 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नीले गगन के तले (हमराज़)1974 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नहीं नहीं (रोटी कपड़ा और मकान)••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय सैन्यात भरती होणारी पहिली महिला कोण ?२) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२२ मध्ये पहिल्या क्रमांकाचे तीन देश कोणते ?३) 'सुपर मॉम' ह्या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?४) सूर्यकिरणांमधील कोणती किरणे जंतुनाशक असतात ?५) इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणत्या कंपनीची स्थापना केली होती ?*उत्तरे :-* १) प्रिया जिंघन २) स्वित्झलंड, अमेरिका, स्वीडन ३) मेरी कोम ४) अल्ट्राव्हायोलेट ५) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ( इ. स. १६०० )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुहास अनिल देशमुख👤 माधव नरवाडे👤 आमिर अली शेख👤 अजित राठोड👤 राजेश रामगिरवार👤 गजानन सोनटक्के👤 सुप्रिया ठाकूर👤 श्याम कुमारे👤 विष्णुकांत इंगळे👤 शिवकुमार पंतुलवार👤 हमीदसाब शेख👤 चालू अर्गे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.**शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.* *"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात जशी चांगल्या विचारांची गरज आहे तशीच चांगल्या माणसांच्या सहवासाची गरज आहे.हे दोघेही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असून ते आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.यांना कधीही अंतर देऊ नका.त्यांची आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी गरज लागते.परंतु गरजेपुरता वापर करत असताल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी कठीण होऊन बसेल.त्यांना आपल्या नात्यांप्रमाणे जपायला हवे.तरच तुमचे जीवन कृतार्थ बनेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *छोटी-छोटी बातें*     पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चिनत हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्र  यास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण।   कील न ठुकाई, घोडा मरा।   स्वार न पहुंचा देश हारा॥*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06/01/2023💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● १९२४ - वि.दा. सावरकर यांची जन्मठेपेतून सुटका.💥 जन्म :-● १८१२ - दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर● १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९६६ - संगीतकार ए. आर. रेहमान💥मृत्यू● २०१० - प्र. ई. सोनकांबळे, लेखक● १८५२ - ब्रेल लुई*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2024 मध्ये होणार गगनयानचे प्रक्षेपण, इस्रोचे अध्यक्ष डॉ.एस सोमनाथ यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण ! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी *•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *धुळ्यातील जनावरांचे बाजार पूर्वीप्रमाणे भरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पोलिस भरतीसाठी चक्क बीएचएमएस-एमडी अन् बी-टेकचे विद्यार्थी, औरंगाबादमध्ये तब्बल 1631 उच्चशिक्षित उमेदवार पोलिस भरतीच्या रांगेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या; काँग्रेसची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे निधन; अमेरिकेतील मराठी आवाज हरपला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुण्याच्या एमसीए क्रिकेट मैदानात खेळल्या गेलेल्या T20 सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय, मालिका बरोबरीत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/kemVs2B0MZU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *आचार्य बाळशास्त्री जांभेकर*बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर अर्थात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म दिनांक ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले या गावी एका गरीब ब्राम्हण घरात झाला. लहानपणापासूनच ते अतिशय हुशार, चुणचुणीत  व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. म्हणूनच त्यांनी अगदी लहान वयातच अनेक विषयातील शिष्यवृत्ती मिळवली आणि संशोधन सुद्धा केले. त्यांना माहित होते कि, ब्रिटिशांना भारतातून हाकालायचे असेल तर लोकांना जागरूक करणे अत्यंत करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी वर्तमानपत्र हे माध्यम सर्वात चांगले आहे. म्हणून त्यांनी गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांच्या सहकार्याने वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण ‘ नावाचे वर्तमानपत्र प्रकाशन करण्यास सुरुवात केली...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_5.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कपिलदेव निखंज*कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेत्रुत्वात भारताने इंग्लंड मध्ये 1983 मध्ये पहिला  क्रिकेट  विश्वचषक जिंकला होता. क्रिकेट क्षेत्रातील योगदान - कपिल देव हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत. यांच्याच नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौर्‍यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौर्‍यावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या. १९८३ च्या विश्वचषकातील अजिंक्यपद हा कपिलच्या कारकिर्दीचा कळसाध्याय होता.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) रणजी करंडकाच्या इतिहासात डावाच्या पहिल्या षटकात हॅटट्रिक घेणारा पहिला फलंदाज कोण ठरला ?२) महाराष्ट्राचे वनमंत्री कोण आहेत ?३) जगातले सर्वात स्वच्छ ( शुध्द पाणी, हवा आणि स्वच्छता ) प्रथम तीन देश कोणते ?४) पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?५) ग्रहमाला सूर्यकेंद्रीत आहे असे कोणी प्रतिपादित केले ?*उत्तरे :-* १) जयदेव उनाडकट २) सुधीर मुनगंटीवार ३) डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्वित्झलंड ४) हिरड्या ५) निकोलस कोपर्निकस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अभिषेक अडकटलवार👤 साईनाथ जगदमवार👤 भगवान चव्हाण 👤 रितेश जोंधळे👤 बजरंग माने👤 सुदर्शन कोंपलवार👤 श्रीनिवास गंगुलवार👤 मोहन घोसले*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *प्रतिबिंबांचं देखणेपण आधिक भावतं माणसाला. म्हणूनच बाहेर पडण्याआधी, एखाद्या समारंभाला जाण्याआधी आपण आरशातील आपलं प्रतिबिंब पुन्हा पुन्हा निरखून पाहत असतो. मनाची खात्री झाल्यावर दर्पणाच्या मोहातून मुक्त होत असतो. हे आपण असं का करीत असतो तर स्वत:सह इतर बघ्यांनाही बरं वाटावं म्हणून.**स्त्रियांप्रमाणे पुरूषांनाही असं नीट-नेटकंपण राखून समूहात मिरवायला आवडत असतं. अशावेळी महिलांना महिलांकडून मिळणा-या दादेपेक्षा एखाद्या नजरेत भरणा-या अनोळखी पुरूषानं नजरेनं वा उदगारानं दिलेली दाद स्त्रियांनी दिलेल्या दादेपेक्षा खूप हुरळून टाकणारी असते. त्यावेळी ती स्त्री धन्यतेने कधी स्वत:कडे तर कधी त्या पुरूषाच्या नजरेकडे नजर सोडवत पाहत असते. अशावेळी स्वत:कडे पुन्हा पुन्हा कौतुकानं निरखून पाहणं हे आरशातील प्रतिबिंबाकडे पाहण्याच्या अनेकपट सुंदर असतं. ज्या उद्देशानं आरशात वारंवार पाहून ती व्यक्ती बाहेर पडलेली असते, त्याची मनभावक फलश्रुती त्या व्यक्तीने अनुभवलेली असते. हेच पुरूषांच्या बाबतीतही घडतं. पण या मनाच्या सहजधर्म व्यवहारात पुरूषाला महिलेनं द्यावयाची दाद जरा संभाळून द्यायची असते. कारण पुरूषी नजर सळसळून तिच्या नजरेवर रेंगाळायला फार काळजी घेत नाही. लवकरच ती नजर 'आपलीशी' वाटायला लागते. कारण स्त्रियांइतका पुरूषी संकोच सावध नसतो.* *मुक्त मनाच्या अशा तरलतरंगी लहरी-लहरा प्रत्येक जण अनुभवत असतो. म्हणून स्त्री-पुरूषानं, त्याहीपेक्षा पती-पत्नीनं परस्परांच्या प्रतिबिंबाला जपावं. ते इतरांच्या नजरेत खुपावं असं काही घडू नये.*            ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून.अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात.म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार गोनू*मिथिला नगरीत राहणार्‍या गोनूच्या हुशारीमुळे राजाची त्याच्यावर अतिशय मर्जी बसली होती. दरबारातल्या काही जणांना हे सहन होत नव्हते. अशांपैकी एक असलेला असूयानंद शास्त्री हा एकदा राजाच्या कानात कुजबुजला, 'महाराज, तसे पाहता चातुर्यात आम्ही इतर दरबारी मंडळीही काही कमी नाही, पण गोनूप्रमाणे उठल्या-बसल्या आपल्या चातुर्याचे प्रदर्शन करणे आम्हाला आवडत नसल्याने आपली मर्जी त्या गोनूवर कारण नसता जडली आहे. गोनू जर खरोखरच चतुर असेल, तर चिंचोळय़ा तोंडाच्या साधारण मोठय़ा मडक्यात बरोबर मावेल एवढय़ा आकाराचा काळा भोपळा ते मडके न फोडता भरून दाखवायला त्याला सांगा.'शास्त्रीबुवांच्या सुचनेनुसार एके दिवशी राजा गोनूला म्हणाला, 'गोनू, अद्यापपर्यंत मी तुला बरीच इनामे दिली, पण आता मला तुझ्याकडून एक भेट हवी आहे. ते बघ तिथे चिंचोळय़ा तोंडाचे मडके व मध्यम आकाराचा काळा भोपळा आहे. तू ते मडके न फोडता त्या मडक्यात तो भोपळा भरून आणून दे. माझी मागणी सामान्य आहे ना? करशील ती पूर्ण तू?'गोनू म्हणाला, 'का नाही पुरी करणार? अवश्य करीन, पण सध्या मी एका धार्मिक ग्रंथाचे पारायण करायला घेतले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत मला कशी ती सवड नाही. त्या पारायणातून मोकळा झालो रे झालो की, आपल्याला हवी असलेली भेट मी घेऊन येईन, मात्र तोवर ते मडके मी माझ्या घरी नेऊन ठेवून येतो, म्हणजे मला आपल्या मागणीचा विसर पडणार नाही.'आपली विनंती राजाने मान्य करताच गोनू ते मडके घेऊन घरी गेला. त्याच दिवशी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा तर्‍हेने ते मडके झाकून घेऊन तो जवळच असलेल्या खेड्यातील एका ओळखीच्या शेतकर्‍याकडे गेला. त्याच्या झोपडीच्या गवताने शाकारलेल्या छपरावर काळय़ा भोपळय़ाचा वेल चढला होता व त्या वेलावर मूठ मूठ आकाराचे कोवळे कोवळे भोपळे लागले होते.स्वत: गोनू त्या मडक्यासह त्या छपरावर चढला आणि त्याने एक मूठभर आकाराचा भोपळा त्याच्या वेलासकट त्या पक्क्या मडक्याच्या चिंचोळय़ा तोंडातून आत ढकलला. एवढे झाल्यावर त्याने त्या शेतकर्‍याला ती गोष्ट पूर्णपणे गुप्त ठेवायला सांगून त्याचा निरोप घेतला.तो भोपळा प्रतिदिवशी मडक्यातल्या मडक्यात थोडाथोडा वाहू लागला. त्याच्यावर नजर टाकण्यासाठी गोनू आठवड्यातून एक फेरी त्या शेतकर्‍याकडे मारत होताच. दोन-अडीच महिन्यांत जेव्हा त्या भोपळय़ाने त्या मडक्याचा बहुतांश अंतर्भाग व्यापून टाकला, तेव्हा 'आता अधिक दिवस हा भोपळा अशाच स्थितीत राहू दिला, तर हा मडके फोडून टाकेल, असा विचार करून गोनूने तो देठात कापला आणि एके दिवशी तो ते मडके दरबारात घेऊन गेला.आपण दिलेल्या पक्क्या मडक्याचे तोंड एवढे चिंचोळे असताना त्यात एवढा मोठा भोपळा गोनूने कसा घातला? असा पेच राजापुढे पडला. त्याने गोनूला 'तू हा चमत्कार कसा केलास?' अशी पृच्छा केली. आपण अवलंबिलेल्या युक्तीची कल्पना गोनूने देताच राजा त्याच्यावर प्रसन्न झाला. त्याला 1,000 मोहरा देत तो त्याला म्हणाला, 'गोनू, या तुझ्या चातुर्यावर प्रसन्न होऊन मी तुला 1,000 मोहरा तर देत आहेच, शिवाय तुझ्यावर जळणार्‍या ज्या असूयानंद शास्त्रांनी तुला या पेचात टाकण्याचा मला सल्ला दिला, त्या शास्त्रीबुवांनीही तुला 500 मोहरा द्याव्यात, अशी मी त्यांना आज्ञा करीत आहे.' *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन*💥 ठळक घडामोडी :- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.२००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.💥 जन्म :-१८०९ - ब्रेल लुई १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री१९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.२०२२ - अनाथांची आई सिंधुताई सपकाळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाषण स्वातंत्र्यावर अतिरिक्त निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, हजारो रुग्णांना मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतात बेरोजगारीच्या आकड्यानं गाठला 16 महिन्यातील उच्चांक, डिसेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.30 वर पोहोचलाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 सामन्यात भारताचा दोन धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/6V4e-IEAeEc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कवयित्री इंदिरा संत*इंदिरा संत ( जन्म ४ जानेवारी १९१४ - मृत्यू १३ जुलै २००० ) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्योदयाच्या काही काळ अगोदर आणि सूर्यास्तानंतर काही काळ आपल्याला एक विशिष्ट रंगाचा प्रकाश मिळत असतो त्याला काय म्हणतात ?२) ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू राहिलेले माजी पोप बेनेडिक्ट हे कितवे पोप होते ?३) स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या कारकिर्दीत स्थापन झाल्या ?४) सरदार वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही उपाधी कोणी दिली ?५) 'चर्पटपंजरी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?*उत्तरे :-* १) संधिप्रकाश २) १६ वे ३) लॉर्ड रिपन ४) महात्मा गांधी ५) वायफळ बडबड करणे.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.**तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात. त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात. ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात. प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते.तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो. त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी, मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली, जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो. अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *स्वतः मध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 07:00 वा.         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02/01/2023💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ★ १८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.★ १८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.★ १९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.💥 जन्म :-★ १९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद★ १९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा 💥 मृत्यू :- ★ २००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल★ २०१५: भारतीय शास्रज्ञ वसंत गोवारीकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवीन वर्ष नवी मेगाभरती ; बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी लवकरच होणार भरती प्रक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नव्या उत्साहात, नव्या जोमात... नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत, रोषणाई अन् आतिषबाजीनं उजळला देश, नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं, सुट्टीचा दिवस असल्याने राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अग्नितांडवाचा थरार! इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीत बॉयलरच्या स्फोटामुळे भीषण आग,  दोन महिलांचा मृत्यू तर, 17 जखमी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल, अनुचित घटना टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांचं घरातूनच डॉ. आंबेडकरांना अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि शेकापचे जेष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांचे औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात झाले निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 102 वर्ष होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाखो विद्यार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता, राज्यातील 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अपडेट नसल्याची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडिया उतरणार मैदानात, श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-8वा/ The Golden chain कविता👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Uu-z5s1S0TE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना.........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *वसंत गोवारीकर*वसंत रणछोड गोवारीकर ( जन्म २५ मार्च१९३३ मृत्यू - २ जानेवारी, इ.स. २०१५) हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. ते इ.स. १९९१ ते इ.स. १९९३ या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. वसंत गोवारीकर इ.स. १९९४ ते इ.स. २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. ते ज्ञान प्रबोधिनी संस्थेशी दीर्घ काळ निगडीत होते. हराळी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या शाळेतील विज्ञान प्रयोगशाळेला डॉ. गोवारीकरांचे नाव देण्यात आले आहे.वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापुरातल्या हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूल या शाळांत झाले. कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.एस्सी. आणि सैद्धान्तिक भौतिकीमध्ये एम.एस्सी. पूर्ण केले.*सौजन्य :- इंटरनेट*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतात पहिला वीर बाल दिवस केव्हा साजरा केला गेला ?२) पश्चिम बंगालमधील पहिली 'वंदे भारत एक्स्प्रेस' कोणत्या दोन स्टेशनदरम्यान धावली ?३) माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचे नाव काय आहे ?४) पृथ्वी व सूर्यातील अंतर कमी असणे या खगोलीय घटनेला काय म्हणतात ?५) टेस्ट एटलॉस या वेबसाईटने तयार केलेल्या यादीनुसार सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करण्यात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?*उत्तरे :-* १) २६ डिसेंबर २०२२ २) हावडा ते न्यू जलपायगुडी ३) सदैव अटल ४) उपसूर्य ५) पाचवा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संदीप ढाकणे, साहित्यिक, औरंगाबाद👤 मो. विखार, शिक्षक, धर्माबाद👤 कविता जोशी, शिक्षिका👤 साईनाथ ईबीतवार पांचाळ, येवती👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 मोगरे शंकर👤 श्रीकांत काटेलवार👤 आनंदराव धोंड👤 रवी खांडरे👤 अक्षय घाटे👤 सचिन कौटवाड👤 संजय पांचाळ👤 संजय फडसे👤 महेंद्रकुमार पद्मावार👤 प्रदीप ढगे👤 नरसिंग पेंटम👤 शहाजी पालवे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.* *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा.ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान.जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *शासन*महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला.तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला.लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'.स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~