✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24/01/2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव*💥 ठळक घडामोडी :- १९७२ -गुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.१९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.💥 जन्म :-१९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.१९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.१९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.२०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिवसानिमित्त अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांचं केलं नामकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीड : बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणारे 52 शिक्षक निलंबित; बदलीसाठीची लढवलेली शक्कल गुरूजींच्या अंगलट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यपाल कोश्यारींचं मोदींना राजीनामापत्र, मुंबई दौऱ्यातच पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती, केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *साखरेच्या उत्पादनात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट; निर्यातीवर केंद्र सरकारनं बंधन लावल्यानं कारखानदार अडचणीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बाळासाहेबांच्या जयंतीला शिवसेना आणि वंचितच्या युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती स्वीकारतील, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *500 कोटी रुपये खर्च करुनही पुण्यातील टेमघर धरणाची पाणी गळती सुरुच, जलसंपदा विभागाकडून आणखी 200 कोटींची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या विराट कोहली, सुर्यकुमार यादव आणि हार्दीक पांड्या या 3 खेळाडूंना मिळालं स्थान!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/R1OdLe3NCes~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव निमित्ताने प्रासंगिक लेख*पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत : महर्षी मार्कंडेय*ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे भृगु महर्षी. या भृगु महर्षी आणि त्यांची पत्नी कयार्थी यांना भार्गवी, धाता आणि विधाता अशी तीन अपत्ये होती. भार्गवी म्हणजे लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. धाता व अयाती यांना प्राणूडु नावाचा पुत्र होता. तर विधाता आणि नियती यांच्या पुत्राचे नाव होते मृकंड. ..........वरील माहिती पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_7.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *पंडित भीमसेन जोशी*पंडित भीमसेन जोशी (फेब्रुवारी ४, इ.स. १९२२; गदग, कर्नाटक - जानेवारी २४ इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्याषष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.अशा या महान गायकाचे  सोमवार  दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) नव्या संसद भवनातील लोकसभा कक्षात बसण्यासाठी एकूण सिटे किती आहेत ?२) गोव्यातील कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफिल्ड विमानतळ पुरस्कार मिळाला आहे ?३) युरोपचे रणक्षेत्र कोणत्या देशास म्हणतात ?४) केंद्र सरकारने २०२३ हे कोणते वर्ष म्हणून जाहीर केले आहे ?५) एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे द्विशतकवीर किती व कोणते ?*उत्तरे :-* १) ८८८ सीटे २) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ३) बेल्जियम ४) तृणधान्य वर्ष ५) पाच - रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ईशान किशन व शुभमन गिल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 राहुल तांबे, मुंबई👤 मेघा हिंगमिरे👤 आशिष कोटगिरे👤 सोनू राजेंद्र येरमलवाड👤 प्रशांत उकिरडे, सहशिक्षक, बार्शी👤 रेश्मा कासार, पुणे👤 सिध्दांत मनूरकर, पाथर्डी👤 योगेश फत्तेपुरे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••बहू हिंपुटी होईजे मायपोटी। नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं ॥२०॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बहिणाबाई अशिक्षित, अडाणी पण प्रतिभासंपन्न होत्या. पैशानं गरिब मात्र विचारांची, भावनांची श्रीमंती प्रचंड होती. त्यांचा मुलगा सोपानला शाळेतील एका स्पर्धेत, स्वामी विवेकानंदाचा फोटो बक्षिस मिळाला. भगवी वस्त्र, भगवा फेटा, तेजपुंज चेहरा, पाणीदार डोळे, रूबाबदार उभं राहणं. गंमत म्हणून त्यानं आईला विचारलं, ओळख बरं कुणाचा आहे हा फोटो ? शेतात दिवसभर राबणारी एक स्त्री,, तिला कसं माहित असणार विवेकानंद ? तो फोटो बारकाईनं पाहिला व पटकन् म्हणाल्या..." देवाला कुणी रं फेटा बांधलाय ? झ्याक दिसतयं."**विवेकानंदाचं वर्णन यापेक्षा उत्तम शब्दांत दुसरं असूच शकत नाही. किती योग्य, किती नेमकं वर्णन ! खरंच, विवेकानंद देवंच होते आध्यात्मातले ! ते देवत्व नेमकेपणानं बहिणाबाई पाहू शकल्या याचं कारण त्यांची 'संवेदनशिलता.' ना शाळेचा परिचय, ना शहराची ओळख, साध्या खेड्यात राहणारी स्त्री. मात्र त्यांची प्रत्येक कविता म्हणजे मराठी भाषेच्या खजिन्यातलं रत्न; जणू कोहिनूर हिराच ! आचार्य अत्रेंनी बहिणाबाईच्या कवितांना 'मोहरांचा हंडा' म्हटलयं याचं कारण बहिणाबाईंचं 'संवेदनशिल मन !'*              ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुम्ही या जगात आलात आणि तुमची ओळख माणूस म्हणूनच झाली.जन्मानंतर आपल्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो.तिथूनमात्र आपण आपल्यासाठी काहीना काही करायला लागतो आणि कशाच्यातरी मोहात पडतो.हे माझं ते माझं म्हणत म्हणत सारं आयुष्य संपवतो. शेवटी आपण जन्माला येताना सोबत काहीच आणले नव्हते आणि शेवटी जे काही मिळवले ते इथेच सोडून गेले.मग मनुष्य जन्माला येऊन काय केले ? असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा उत्तर काहीच सापडत नाही. याचे जर खरेच काही उत्तर मिळवायचे असेल तर आयुष्यात चांगले जगायचे असेल तर,आपल्या पश्चात इतरांसाठी काही ठेवायचे असेल तर पहिल्यांदा कोणत्याही गोष्टींचा मोह टाळायला शिका, आपल्यातला मीपणा नष्ट करा,एकटेपणात जीवन जगण्यापेक्षा इतरांमध्ये जगायला शिका.पैसा आणि संपत्तीच्या मोहापायी आपले सुंदर जीवन दु:खाच्या खाईत लोटू नका,इतरांमध्ये सामील होऊन सुखदु:खांदा मदतीचा हात पुढे करा, इतरांपेक्षा आपण जन्माला आलो आणि वेगळे काही करून आपला ठसा जनमानसावर उमटवा जेणेकरून तुम्ही मनुष्यजीवनाला येऊन आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल. पुन्हा आपल्याला ही संधी कधीच मिळणार नाही हे लक्षात असू द्या.मग तुमच्याच लक्षात येईल की, आपणास काय करायचे आणि काय करावे लागणार याचा नक्कीच उलगडा होईल आणि अनेक मोहापासून आपली सुटका होईल.आपले जीवन अधिक सुसह्य होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*प्रामाणिक पहारेकरी*एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खुप दूर होता. पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहचणं शक्य नव्हतं. सहाजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका गढीवजा किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते.' आता काय करायचं ?' असा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते. ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झालेत हे पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, " कोण आहे रे पलीकडे ? दार उघड. " " तुमी कोण हायसा ? " पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं. पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरही हसू दाबत महाराज म्हणाले, " आम्ही महाराज आहोत. "पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार. त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय.तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा आवाज दिला, "आरे,उघड की दरवाजा. "" तुमी कुणी बी असा पण दरवाजा उघडाया न्हाय जमायचं पाव्हणं. आवं सांजच्यापासून तांबडं फुटूस्तोवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा न्हायी आसा शिवाजी महाराजाचाच हुकुम हाय. आन आमचं महाराज काय बी झालं तरी सवताचा हुकूम सवता कधीच मोडाय सांगत नाहीत असं समदी म्हणत्यात. आवं कुणी बी लुंग्या सुंग्या यईल आन महाराजांचं नाव घिवून दार उघडाया सांगण. आमाला एवढ कळना व्ह्य. तवा तुमी कुणी बी असा रातभर भायीरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय आसन ते. "महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी आख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली.सकाळ झाली. गडाला जाग आली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करूनत्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याच्या कळालं कि ज्यांना रात्री आपण दरवाजावर आडवलं ते खरोखरच महाराजच होते तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट  दिसू लागला. चेहरा भीतीने पंधरा पडला.पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला. आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या  प्रामाणिक सोबत्यांच्या जिवावरच आमचं स्वराज्य उभं आहे. "*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment