✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04/01/2023💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन*💥 ठळक घडामोडी :- १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.२००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.💥 जन्म :-१८०९ - ब्रेल लुई १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री१९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.२०२२ - अनाथांची आई सिंधुताई सपकाळ*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भाषण स्वातंत्र्यावर अतिरिक्त निर्बंध लादले जाऊ शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप मागे, हजारो रुग्णांना मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोकण शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर, 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतात बेरोजगारीच्या आकड्यानं गाठला 16 महिन्यातील उच्चांक, डिसेंबर 2022 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.30 वर पोहोचलाय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने झाले निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 सामन्यात भारताचा दोन धावानी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/6V4e-IEAeEc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *बोलण्याचे संस्कार*आपल्यावर बोलण्याचे संस्कार आहेत काय ?असे कोणी विचारणा केली तर आपण संभ्रमात पडतो. बोलण्यासाठी कोणत्या संस्काराची गरज आहे ? किंवा तसे संस्कार करता येतात काय ? याविषयी आपण लहान असताना नकळत विचार करतो मात्र त्यास बोलण्याचे संस्कार..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*कवयित्री इंदिरा संत*इंदिरा संत ( जन्म ४ जानेवारी १९१४ - मृत्यू १३ जुलै २००० ) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.सौजन्य :- इंटरनेट••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) सूर्योदयाच्या काही काळ अगोदर आणि सूर्यास्तानंतर काही काळ आपल्याला एक विशिष्ट रंगाचा प्रकाश मिळत असतो त्याला काय म्हणतात ?२) ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू राहिलेले माजी पोप बेनेडिक्ट हे कितवे पोप होते ?३) स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या कारकिर्दीत स्थापन झाल्या ?४) सरदार वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही उपाधी कोणी दिली ?५) 'चर्पटपंजरी' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?*उत्तरे :-* १) संधिप्रकाश २) १६ वे ३) लॉर्ड रिपन ४) महात्मा गांधी ५) वायफळ बडबड करणे.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी डिगोळे, सहशिक्षक, अहमदपूर👤 अंकुशराजे जाधव👤 माधव बोइनवाड, येवती👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद👤 राजेश कुकूटलवार👤 निलेश आळंदे👤 माधव सूर्यवंशी, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.**तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनंदिन जीवनात नाना प्रकारची माणसे सहवासात येतात. त्यापैकी काही माणसांचा सहवास नित्य हवासा वाटतो कारण त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिकायला मिळते. ते उदार अंतःकरणाने कशाचीही अपेक्षा न करता देत असतात. ते कधीही गर्वाने किंवा कसल्याही अपेक्षेने कार्य करत नाही. ते स्वत:ही शांत आणि संयमी वृत्तीने वागत असल्याने जणू विशाल सागराप्रमाणेच रहाणे पसंत करतात. प्रत्यक्ष जीवनात इतरांनाही घेऊन चालतात.अशांचा सहवास लाभणे म्हणजे एक भाग्यच असावे लागते.तर काही माणसे अशी भेटतात की,त्यांचा सहवास नकोसा वाटतो. त्याचे कारणही तसेच असते. सतत काही ना काही काम नसताना निरर्थक बोलणारी, मी म्हणजेच सारे काही म्हणणारी अहंकाराने भरलेली, जे काही चालते ते माझ्यामुळेच अशी म्हणणारी, अशा माणसांचा स्वभाव म्हणजे एखाद्या उथळ पाण्यासारखा खळखळणारा असतो तो काही काळ खळखळ वाहतो आणि नंतर आवाज बंद होतो. अशा माणसांकडून काय अपेक्षा करणार आणि त्यांचा कोणता गुण घेणार असा प्रश्न उपस्थित राहतो. अशांचा सहवास आपल्या जीवनात कधीकधी घातक होऊ शकत़ो. म्हणून आपल्या जीवनाचे खरेच सार्थक करुन घ्यायचे असेल तर योग्य विचार करुनच योग्य सहवासाची निवड करावी व आपले जीवन चांगल्या पध्दतीने जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *स्वतः मध्ये बदल**कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'**तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment