✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 31-01-2023💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :-  १९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.💥 जन्म :- १८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी. १९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार १९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-  १९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक. २००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते. २००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा मान, प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर बहुमान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच विमानात तांत्रिक बिघाड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौरा; 10-12 दिवस आधीच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला तर पोलीस आयुक्तांकडून तब्बल चार तास पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *2 फेब्रुवारीला मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *राज्यात होणार 'स्मार्ट अंगणवाडी', 800 हून अधिक संस्थांचा अंगणवाडी दत्तक घेण्यास पुढाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी 86 टक्के मतदान; सर्वाधिक मतदान उस्मानाबाद जिल्ह्यात, 2 तारखेला लागणार निकाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा माजी सलामीवीर मुरली विजयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ट्विटरने केली निवृत्ती जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/__Ncdqx8jeo~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लघुकथा - व्यसन* http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_10.htmlलघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *आम्लपित्त*आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधीना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना आम्लतेचा नेहमी त्रास होतो. अशांना वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. आम्लता किंवा आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. या जादा आम्लामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ अशा तक्रारी निर्माण होतात. कधीकधी जठरातले पदार्थ उलटीवाटे बाहेर पडतात.खालील कारणांनी आम्लता येऊ शकते. - • नेहमी जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे. • मानसिक ताण, काळजी, सदैव घाई-गडबड. • अनियमित जेवणाची सवय आणि जागरण • धूम्रपान, तंबाखूसेवन, दारूसेवन, इत्यादी. • काही औषधांमुळे आम्लता होते. उदा. ऍस्पिरीन, सांधेदुखीची औषधे. • हेलिकोबॅक्टर नावाच्या एका जिवाणूंशी आम्लता आणि जठरव्रणाचा संबंध आढळला आहे. जठरव्रणापैकी साठसत्तर टक्के जठरव्रण हे या जिवाणूंमुळे होतात. (यासाठी डॉक्सी किंवा ऍमॉक्सिसिलीन हे औषध पाच दिवस देऊन पहावे.) • आम्लपित्तामुळे पुढे अल्सर (जठरव्रण) निर्माण होऊ शकतो. अल्सर असेल तर पोटात एका ठरावीक जागी दुखत राहते. जेवणामुळे हे दुखणे थांबते तरी किंवा वाढते तरी. आम्लपित्तावर उपचार करताना तो अल्सर नाही याच्याबद्दल खात्री करून घ्यावी.उपचार - • जेवणात नियमितता ठेवावी. • साधा आहार घ्यावा. • तेलकट, तिखट पदार्थ टाळावेत. • मानसिक ताण, काळजी, सदैव चिंता यांच्यावर नियंत्रण ठेवावे. (व्यायाम, विश्रांती, करमणूक वगैरेमुळे उपयोग होईल.) • आम्लविरोधी (ऍंटासिड) गोळया घेतल्यावर जळजळ कमी होते. • दुधामुळे काही जणांची आम्लता कमी होते तर काही जणांची वाढते.( इंटरनेटवर मिळालेली माहिती )••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) २०२३ या वर्षी किती व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे ?२) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा कोणी दिली ?३) ई - गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे मोड होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे ?४) आंतर सरकारी तांत्रिक कार्यगटाच्या १२ व्या सत्रात उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली ?५) राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सहा २) भंते चंद्रमणी महास्थविर ३) जम्मू काश्मीर ४) भारत ५) १९४८*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विनायक हिरवे, सहशिक्षक, कोल्हापूर👤 👤 हिलाल पाटील*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा। गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥।। जय जय रघुवीर समर्थ ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जन्माला आल्यापासून आपल्या शरीराचे आणि मनाचे भरणपोषण तर करायचे आणि कोणत्याही गोष्टींचा अतिरेक टाळायचे अतिशय अवघड कार्य आपल्याला करायचे असते. विकारांचे हे मोहमयी विश्व आपल्याला सतत आकर्षित करून घेत असते. अशावेळी डोंबा-याच्या खेळातील दोरावरच्या मुलीच्या हातातील काठीकडे आणि तिच्या हालचालींकडे पाहायचे किती शिताफीने ती आपले संतुलन साधत असते. पण अशावेळी आपण संभ्रमित होतो. कोणताही अचूक निर्णय आपल्याला घेता येत नाही.* *आयुष्याच्या या खेळात हजारदा बाद होण्याच्या शक्यता उद्भभवतात. मग महाभारतातल्या युद्धक्षेत्रावर प्रारंभी गलितगात्र झालेल्या अर्जुनासारखी आपली अवस्था होते. भगवद् गीता इथे उपयोगी पडते. शंकाकुल अर्जनाच्या एकेक प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्ण देतो आणि त्याला जाणता अर्जुन, आपला प्रिय शिष्यत्तोम बनवतो. भगवद् गीतेच्या प्रारंभी भेटणारा अर्जुन आणि शेवटी भेटणारा ज्ञानी अर्जुन. यात श्रीकृष्णाने स्व-स्वरूपाची जाणीव करून त्याला ज्ञाता अर्जुन केलेले. जणू श्रीकृष्णाचे ते दुसरे रूपच. आपण मात्र श्रीकृष्णाची वाट पाहत स्वयं अध्ययनाने आपला मार्ग शोधायचा..!*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या जगात कोणताही जीव जन्माला आला की,त्याचा जीवनप्रवास ख-या अर्थाने सुरू होतो.त्याला त्याचे जीवन कसे जगायचे यासाठी परमेश्वराने त्यांच्यासोबत मन आणि बुद्धी ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला म्हणजे विशेष करुन मानवाला आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी भेट म्हणून बहाल केली आहे. ह्याचा आधार घेऊनच जीवन कसे जगायचे याचे तंत्र तो शिकतो.त्यानंतर तो आपल्या मनाचा आणि बुध्दीचा चांगला सदुपयोग केला तर नक्कीच जीवनाचा प्रवास सुखावह करतो आणि जर का दुरुपयोग करायला लागला तर जीवनप्रवास दु:खमय व्हायला लागतो.ह्या दोन गोष्टी मन आणि बुद्धी यावरच अवलंबून आहेत.मग मानवरुपी जीवाने आपले जीवन कसे जगायचे आणि आपले जीवन जगण्यासोबत इतर जीवांना आपण न दुखवता कसे जगवायचे हे जरी कौशल्य मनाच्या आणि बुध्दीच्या सृजनशील कौशल्याने हाताळायला आले तरी परमेश्वराने दिलेल्या जन्माचे नक्कीच सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.हा जन्म परत येणार नाही हे तर संत्र्याच्या आहेच.यानंतर आपले शरीररुपी अस्तित्व संपणार आहे पण आपण आपल्या जीवनात केलेले चांगले कार्य येणा-या जीवांच्या जीवनासाठी प्रेरणा ठेवून जाणार आहे अर्थात तुम्ही तुमच्या कार्याने अमर राहणार आहेत हे लक्षात असू द्यावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समयसुचकता*एकदा अरण्याचा राजा सिंह याने आपल्या प्रजाजनांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम सोडला. त्याप्रमाणे बहुतेक प्राणी सिंहाच्या दरबारी आले. अस्वलाला सिंहाच्या स्वयंपाक घरातून येणारा वास सहन न झाल्याने त्याने आपले नाक दाबून धरले. हा त्याचा उद्धटपणा पाहून सिंह रागावला व त्याने आपल्या पंजाच्या एका तडाख्यात अस्वलाला मारले. हा भयंकर प्रकार पाहून माकड भितीने थरथर कापू लागले. मग काहीतरी बोलायचे म्हणून ते सिंहास म्हणाले, 'राजेसरकारांच्या स्वयंपाक घरातून येणारा सुवास निरनिराळ्या उंची मसाल्याचा आहे. तो त्या मूर्ख अस्वलाला सहन झाला नाही. हे त्याचं दुर्दैव होय. राजे सरकारांचे पंजे तर फारच सुंदर आहेत, तसे इतर कोणाचेही नसतील.' माकडाचे हे बोलणे ऐकून सिंहाचे समाधान तर झाले नाहीच पण तो इतका चिडला की, एका क्षणात त्याने त्या माकडाच्या चिंधड्या उडविल्या. नंतर तो कोल्ह्याकडे वळून त्याला म्हणाला, 'कसे काय कोल्हेदादा ? माझ्या स्वयंपाकघरातून येणारा वास कशाचा असावा असं तुला वाटतं ?' त्यावर तो कोल्हा धूर्तपणे म्हणाला, 'महाराजाधिराज, नुसत्या वासावरून तो वास कशाचा आहे हे सांगता येण्याइतकं माझं नाक आधीच तीक्ष्ण नाही त्यातून मला आज पडसं झालेलं असल्यामुळे आपल्या घरातून येणार्‍या वासासंबंधाने अभिप्राय देण्याचं धाडस मी करत नाही.'तात्पर्य :-प्रसंगावधान व समयसूचकता या गुणांच्या बळावर माणुस वाटेल तसल्या संकटातून मुक्त होऊ शकतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment