कथा क्रमांक ११२

अभ्यास कथा भाग ११२

   .       कथा
उपकार
एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात.

खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली.

कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले.

पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली.

एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.

 तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात

 पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.

मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही.

 आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस.
 तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली.

एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली.

 उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.

एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात.

ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो.

उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो.

 उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.

चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.

बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"

बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली
बोध   :-
 "उपकार पण वाघासारख्यावर करावेत उंदरासारख्यावर नाही कारण असे *लोक नेहमी ते विसरण्यात धन्यता मानतात* आणि बहादूर लोक ते लक्षात ठेवतात"

म्हणी व अर्थ भाग १६

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १६ )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.*

अर्थ - हट्टी मनुष्याचे नुकसान झाले तरी , त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.


*📝२) बैल गेला अन् झोपा केला.*

अर्थ - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.


*📝३) दृष्टीआड सृष्टी*

अर्थ - आपल्यामागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करणे.


*📝४) चोरावर मोर.*

अर्थ - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰

सुविचार भाग १६

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १६ )*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖

*📚१) मोठमोठी कामे केवळ  ताकदीने होत नाहीत , तर ती सहनशक्तीने होतात.*


*📚२) क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे.*


*📚३) करुणा आपल्याला ईश्वरतुल्य बनवते.*

*📚४) दयाशील अंतःकरण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच होय.*

➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
  http://www.pramilasenkude.blogspot.in

सोबत

"सोबत"...

आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?
ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
 "स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
 "आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते.

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं.

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं.

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते...

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.
आणि सोबत छंदांची जोड....

आयुष्य नक्कीच परिपूर्ण होईल...!
               -  

जीवन विचार

      *" दर्पण " जब चेहरे    का*
               *" दाग " दिखाता है,*
               *तब हम " दर्पण " नहीं तोडते,*
               *बल्की " दाग " साफ करते हैं |*

               *उसी प्रकार,  हमारी*
               *" कमी " बताने वाले*
              *पर " क्रोध " करने के*
              *बजाय अपनी " कमी* "
                *को दूर करना*
                 *"श्रेष्ठ " हैं !!

   

जीवन विचार

*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰*
गन्ने में जहाँ गाँठ होती है वहां रस नहीं होता
जहाँ रस होता है वहाँ गाँठ नहीं होती।
बस जीवन भी ऐसा ही है- यदि मन में किसी के लिये नफरत की गाँठ होगी तो हमारा जीवन भी बिना रस का बन जायेगा.....
और

जीवन का रस बनाये रखना हो तो नफरत की गाँठ को निकालना ही होगा.....
〰〰〰〰〰〰〰
*

कथा क्रमांक १११

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग १११. 📚*
〰〰〰〰〰〰〰
  *🌺 व्यापारी व उंट*🌺
〰〰〰〰〰〰〰
एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे...  अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली... रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले...  मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो... दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो., एका उंटाला दोरीने बांधतो... मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते., आता काय करावे...?  पंचाईत झाली...  उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते...  व्यापारी परेशान झाला...  इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला., ती काही दिसेना...

त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे., पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध...
महाराज, पण दोरी नाहीये ना...
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर".,
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली...  आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला...

सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला...  झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली.,  तो उंट उभा राहिला....

दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले...  पण तो दुसरा उंट काही उठेना., व्यापारी पुन्हा परेशान...

तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला... तो म्हणाला, अरे, तो उठणार नाही... कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस...?
पण महाराज., मी दोरी बांधलीच कुठे होती...?  नुसते नाटक केले होते ना...

पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होते., पण त्याला तर ते खरेच वाटले होते ना...  म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव., मग पहा...
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले.,  आणि काय आश्चर्य...? तो दुसरा उंट तटकन उठला की..., व्यापारी चकित झाला...!

पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत...

"ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण दुसऱ्या आनंदाचा गावी जाणार कसे?

*तात्पर्य*:

आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही...

निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पाहूया.., आपण नक्की आनंदी होऊ.
*-----------------------------------*
       *📝 संकलन*📝

Rhythming words

🗣           Rhyming words         🗣
               

🌶 ack -
back, lack, pack, rack, sack, tack, yak, black, knack, quack, slack, smack, snack, stack, track, whack, attack

🏌ail -
bale, fail, hail, mail, male, nail, pail, tale, rail, sail, stale, scale, snail, whale, detail, email

🏍 air -
air, bare, care, chair, dare, fair, hair, pair, rare, wear, chair, flare, stare, scare, share, spare, square, there, where, aware, beware, compare, declare, despair, prepare, repair, unfair

🖌 ake -
ache, bake, fake, lake, make, rake, take, brake, break, flake, quake, snake, steak, awake, mistake

 🗑all -
all, ball, call, doll, hall, fall, tall, crawl, small, baseball, football

🏹 an -
an, can, fan, man, pan, ran, tan, van, plan, scan, span, began

🛐 and -
and, band, hand, land, sand, bland, command, demand, expand, stand, understand

⏸ap -
cap, gap, map, nap, tap, zap, chap, clap, flap, slap, snap, strap, trap, wrap

🕳 ar -
are, bar, car, far, jar, tar, star, scar, afar, guitar

🕶 at -
at, bat, fat, mat, pat, rat, sat, flat, that, splat, combat

🛍 ate -
ate, date, fate, mate, late, gate, rate, wait, crate, great, plate, skate, slate, state, straight, trait, weight, create

🐔ed -
bed, dead, fed, head, led, read, red, said, bread, fled, spread, thread, tread, instead

�� ell -
bell, fell, sell, well, yell, shell, smell, spell, farewell, hotel, motel

🍈 en -
den, hen, men, pen, ten, glen, then, when, wren, again

🍋et -
bet, get, jet, let, met, pet, set, vet, wet, yet, threat, barrette, reset, upset

🍉in -
bin, chin, in, pin, tin, grin, thin, twin, skin, begin, within

🍒ing -
king, ring, sing, wing, zing, bring, cling, fling, sling, spring, sting, string, swing, thing

🍟it -
bit, fit, hit, it, kit, lit, pit, sit, flit, knit, quit, skit, slit, spit, split, admit, commit, permit

🍝ite -
bite, kite, bright, fight, fright, knight, night, might, right, tight, white, write, delight, tonight

🍡oh -
go, hoe, low, mow, row, sew, toe, blow, crow, dough, flow, know, glow, grow, know, show, slow, snow, stow, though, throw, ago, although, below

🍶ot -
cot, dot, got, hot, lot, not, pot, rot, tot, bought, fought, knot, taught, shot, spot, squat, forgot

🍭ound -
crowned, found, ground, hound, mound, pound, round, sound, wound, around, surround

🍹oze -
bows, hose, nose, rose, toes, blows, flows, froze, grows, those

🍽 ub -
cub, rub, sub, tub, club, stub, scrub, shrub

🏖 un -
bun, fun, gun, one, run, son, sun, ton, won, done, none, begun, outdone, undone
~~~~~~~~~~~~~~~~~~~

जीवन विचार

*"अंदाज" चुकिचा असू शकतो पण
"अनुभव " कधीच चुकिचा असू शकत नाही ,

कारण...

"अंदाज" आपल्य मनाची "कल्पना" आहे
"अनुभव"आपल्या जीवनातील "सत्य"आहे .*
 
          

जीवन विचार


" *जीव  लावणारे  शब्द  आयुष्य  घडवतात  तर  जिव्हारी  लागणारे  शब्द  आयुष्य  बिघडवतात*

       " *शब्द  प्रेम  देतात  शब्द  प्रेरणा  देतात        
शब्द  यश  देतात  शब्द  नातं   देतात*.

      " *शब्द  आयुष्यभर  आणि  आयुष्यानंतरही मनामनात  जपणारी  भावना  देतात*"

" *शब्दांचं  मोल  जपलं की आपली नाती आणि आपलं  आयुष्यही अनमोल  होतं*"


जीवन विचार


 *'वाद'आणि 'चर्चा' यात फरक काय..?*

वादातून  "भांडणं" होतात;
चर्चेतून "गोष्टी स्पष्ट" होतात.

वाद "अहंकार आणि  संकुचित  मनातून" होतो;  तर चर्चा "मोकळ्या मनातून" होते.....

वादात "अज्ञानाची देवाणघेवाण" होते,  तर चर्चेत "ज्ञानाची देवाण घेवाण" होते.

वाद ही "रागाची अभिव्यक्ती" आहे;
तर चर्चाही "तर्काची अभिव्यक्ती" आहे...

वादातून कोण बरोबर हे "सिध्द  करण्याचा प्रयत्न होतो"
तर चर्चेतून' "काय बरोबर हे सिध्द करण्याचा" प्रयत्न होतो

वाद "निरर्थकच" असतो..

*"वादा" पेक्षा "चर्चेने" आणि "चर्चे" पेक्षा, "संवादाने" प्रश्न "मार्गी" लागतात.*



सुविचार भाग १५

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १५)*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖

*📚१) सापाच्या दातात , माशीच्या डोक्यात आणि विंचवाच्या शेपटीत जहर असते ; परंतु दुर्जनाच्या अंगोपांगात विष भिनलेले असते.*


*📚२) शौर्याचा अर्क म्हणजे कीर्ती.*


*📚३) ज्ञान आणि कर्म हे जीवनाचे पंख आहेत. यामुळे सुखरुपी आकाशात मनुष्य सहजतेने उडू शकतो.*

*📚४) ज्ञानाचा संचय केल्याने ते कमी होते ; परंतु ते दुसऱ्यांना दिल्यास अधिक वाढते .*

➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

म्हणी व अर्थ भाग १५

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १५ )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) कोल्हा काकडीला राजी.*

अर्थ - सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र  वस्तूंच्या प्राप्तनेही संतुष्ट होतात.


*📝२) इकडे आड तिकडे विहीर.*

अर्थ - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.


*📝३) उंदराला मांजर साक्ष.*

अर्थ - एकमेकांचे साक्षीदार असणे.


*📝४) माकडाच्या हाती कोलीत.*

अर्थ -- मूर्खाला नको ते अधिकार देणे.
➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰


जीवन मार्ग

हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........

👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात......✍

👌आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खुष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा...✍

👌काल एक व्यक्ती भाकरी मागून घेवून गेला आणि करोडोंचे आशिर्वाद देवून गेला, माहितीच पडत नव्हतं कि गरीब तो होता का मी.....✍

👌आयुष्याचं गाठोड सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेवून जायच आहे ते कमवलच नाही.....✍

👌मी त्या नशीबाचे सगळ्यात आवडीच खेळणं आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी...✍

👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे...✍

👌लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे....✍

👌हरवलोय आपण स्वतः पण देवाला शोधत बसलोय.......✍

👌गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा.......✍

👌आयुष्याची पण गजब खेळी आहे....सावरली तर "जन्नत"....नाहीतर फक्त तमाशाच आहे.....✍

👌आनंद हा नशीबातच असतो...कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात.....✍

👌आयुष्यपण व्हिडिओ गेम सारखं झाल आहे, एक लेवल पार केली तर पुढची लेवल ही त्याहीपेक्षा मुश्कील येते......✍

👌एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहापणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हावस वाटत....✍

👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....✍

👌दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात स्वतः संपून जाल
त्या मुळे स्वतः च्या प्रगती कडे लक्ष दया!!!.....✍

👌जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं.
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी......✍

👌क्षेत्र कोणतेही असो...
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले....
की यशालाही पर्याय नाही..✍🏻

👌केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं....✍

👌"माणुस" स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे...,
लोकांच काय लोक " चुका"
तर "देवात" पण काढतात.....✍

👌सुखासाठी कोणाकडे हात ­जोडू नका,वेळ वाया जाईल....­
हि दुनिया मतलबी झाली ­आहे,त्यापेक्षा दुःखाशी दो­न हात करा,चांगली वेळ येईल....✍

👌जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.....✍

👌विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही...!!
तुम्ही चांगले कार्य करु लागले की विरोधक आपोआप तयार होतात...!!✍

👌कर्तृत्ववान व्यक्तींचा पराक्रम बघितला जात नाही...,
पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतय याकडे मात्र सर्वाचे लक्ष असते.....✍

👌एक मात्र नक्की खंर आहे की,चांगल्या रस्त्याला गतिरोधक,आणि......चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच.....✍

👌चांगल्या कामाला मांजरां पेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.....✍

👌एक सत्य  . . . 👇"नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ".....✍

👌असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.....✍

👌"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर उपचार आहे परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर कोणताच उपचार नाही.".....✍

👌क‍‍‌‌‌‍धी‍ही मिठासारखं आयुष्य जगु नका,की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करुन घेतील.....✍

👌आयुष्यात स्वत:ला कधी उध्वस्त होउ देऊ नका
          कारण
लोक ढासाळलेल्या घराच्या वीटा सुद्धा सोडत नाही.....✍

🌺💐🌺💐

म्हणी व अर्थ भाग १४

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १४ )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) डोंगर पोखरुन उंदीर काढणे.*

अर्थ - कष्ट फार लाभ कमी.


*📝२) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.*

अर्थ - मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.


*📝३) उचलली जीभ लावली टाळ्याला.*

अर्थ - दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे.


*📝४) वरातीमागून घोडे.*

अर्थ - एखादी गोष्ट घडल्यावर त्याबाबत उपाय करणे व्यर्थ असते.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*

सुविचार भाग १४

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १४)*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖

*📚१) सुंदर मुख हे व्यक्तीचे शिफारसपञ आहे , तर सुंदर हृदय हे विश्वासपञ आहे.*


*📚२) विद्यारुपी अंगठीमध्ये विनयरुपी रत्न चमकत असते.*


*📚३) वैचारिक घुमट म्हणजे स्वर्गातला राजवाडा.*

*📚४) मातेच्या ममतेचा एक बिंदूही अमृताच्या समुद्रापेक्षा मधुर आहे.*

➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*🙏 शब्दांकन/  संकलन  🙏*

अभ्यासदौरा मनसळ

*🙏सस्नेह नमस्कार🙏*

*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.*
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव ता.हदगाव.जि.नांदेड. 🔰🌷🔰🌷🔰🌷🔰

  *📕✍अभ्यास दौरा*📕

*दि.२६-१२-२०१६ रोजी जि.प.प्रा.शाळा मनसळ ता.पुसद जिल्हा यवतमाळ*
येथे मी शाळा भेटीसाठी गेली असता शाळा भेटीतील माझे काही थोडक्यात  अनुभव. 👇👇
येथील मुले अतिशय बोलकी , चंचल, गुणात्मक दृष्टीने तर एकदम बुद्धिमत्ताधारक. 👉ज्ञानरचनावादानुसार अध्यापन पध्दती *मा.श्री विश्वकर्मा*सरांनी मला विद्यार्थ्यांसाठी जे काही उपक्रम घेता येतील 👉 ते  विद्यार्थ्यांनी सर्व महत्त्वपूर्ण
 उपक्रम अगदी सहजतेने करून दाखविले.
👉 त्यानंतर  मुलांना  खाऊवाटप करून त्यांचे  कौतुक म्हणून शिघ्र कविता केलेल्या मुलांना पुस्तके भेट दिली.📗📕📗📕📕📗
👉अतिशय छान  वाटले मुक्त वातावरणात मुले आनंदी उत्साही पाहून. मा.विश्वकर्मा सर यांनी  घेत असलेले उपक्रम खरोखरच माझासाठी मोलाचे व उपयुक्त आहेत.
मा.सरांचा कार्याला , मेहनतीला माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏करीत प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी आणखी  मेहनतीने कार्य करण्याची ग्वाही व प्रेरणादायी मी  वसा घेतला.
👉त्यानंतर आम्ही  शाळा सुटल्यानंतर सर्वजण आनंदाने घरी परतलो.🙏🙏
 *काही क्षणचिञे.*👇👇

वाचनिय पुस्तकांचा नावाचे संकलन

🌺वाचावीत अशी १०० पुस्तके🌺
      📚✍🏻📕📗🗞📖🗃
०१.) ययाती = वि. स. खांडेकर
०२.) वळीव = शंकर पाटील
०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर
०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती
०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात
०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले
०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर
०८.) तीन मुले = साने गुरुजी
०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.
१०.) आय डेअर = किरण बेदी
११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे
१२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत
१३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे
१४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे
१५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर
१६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद
१७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद
१८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू
१९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
२०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
२१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान
२२.) राजयोग = स्वामी विवेकानंद
२३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद
२४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी
२५.) योगासने = व. ग. देवकुळे
२६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे
२७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद
२८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री
२९.) रणांगण = विश्राम बेडेकर
३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे
३१.) श्यामची आई = साने गुरुजी
३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे
३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल
३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे
३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर
३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड
३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर
३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर
३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर
४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर
४१.) झोंबी = आनंद यादव
४२.) इल्लम = शंकर पाटील
४३.) ऊन = शंकर पाटील
४४.) झाडाझडती = विश्वास पाटील
४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर
४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट
४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात
४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे
४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे
५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे
५१.) आई = मोकझिम गार्की
५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी
५३.) बलुत = दया पवार
५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर
५५.) स्वामी = रणजीत देसाई
५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे
५७.) पांगिरा = विश्वास पाटील
५८.) पानिपत = विश्वास पाटील
५९.) युंगंधर = शिवाजी सावंत
६०.) छावा = शिवाजी सावंत
६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई
६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले
६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले
६४.) चंगीजखान = उषा परांडे
६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक
६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू
६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती
६८.) वाईज अंड आदर वाईज
६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे
७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे
७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा
७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव
७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे
७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख
७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी
७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते
७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे
७८.) महानायक = विश्वास पाटील
७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर
८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग
८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे
८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे
८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे
८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे
८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे
८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी
९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई
९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने
९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने
९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने
९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड
९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने
९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले
९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे
९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने
९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट
१००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

जीवन विचार


जीवन विचार

"माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ ,फुले फक्त त्या त्या ऋतूमाना प्रमाणेच येतात"*

*"म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार. 

जीवन विचार

💐 जीवन विचार

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।।।।
"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल...
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल.....

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 जीवन विचार🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰
एकाग्रता साध्य करण्यासाठी
मनुष्याच्या डोळ्यांपुढे एखादे विधायक ध्येय आणि त्याला अनुरुप विधायक साधना पाहिजे.

पर्वताच्या माथ्यावर पडणारे पाणी जर नाना दिशांना वाहत गेले , तर ते कोठेच राहत नाही, सारे नाहीसे होते.

परंतु तेच पाणी जर एका दिशेने वाहत जाईल तर त्या पाण्याची पुढे नदी होईल , तिच्यातून शक्ती उत्पन्न होईल,  तिचा देशाला उपयोग होईल.

 त्याप्रमाणे मनुष्य आपली शक्ती नाना प्रकारच्या उद्योगांत न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील तरच त्याच्या हातून काही कार्य होईल.
यालाच गीतेने🙏 ' स्वधर्म '  हे नाव दिले आहे.

=====================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰〰
🙏🏼 शब्दांकन /संकलन/ 🙏🏼

कथा क्रमांक ११०

*माझी शाळा माझे उपक्रम*

*🌷🌷🌷कथा🌷🌷🌷*
*📚अभ्यास कथा भाग ११०. 📚*
〰〰〰〰〰〰〰
     *🌺 योग्य शिक्षा 🌺*
=================
〰〰〰〰〰〰〰
*पिंपळावर बसलेल्या एका कबुतराला एक शिकारी हाततल्या बंदुकीने गोळी मारणार, इतक्यात एका सापाने त्या शिकार्याच्या पायाला कडकडून चावा घेतला.*

*साहजीकच सापाचे विष अंगात चढू लागल्यामुळे त्या शिकार्याच्या हातातली बंदूक जमिनीवर पडून , स्वतः तोही खाली कोसळला व मृत्यूपंथाला लागला.*

*मरता मरता तो स्वतःशी म्हणाला , " निरपराध अशा प्राण्याचा जीव घ्यायला गेलो , त्याची ही योग्य शिक्षा मला मिळाली."*

*तात्पर्यः  जो नाहक दुसऱ्याचा जीव घेतो, तो एके दिवशी स्वतःचे प्राण गमावून बसतो.*


सामान्य ज्ञान माहिती संकलन

भारतातील राज्ये आणि त्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार

• महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

• तामिळनाडू --- भरतनाट्यम

• केरळ --- कथकली

• आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

• पंजाब --- भांगडा, गिद्धा

• गुजरात --- गरबा, रास

• ओरिसा --- ओडिसी

• जम्मू आणी काश्मीर --- रौफ

• आसाम --- बिहू, जुमर नाच

• उत्तरखंड --- गर्वाली

• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

• मेघालय --- लाहो

• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

• मिझोरम --- खान्तुंम

• गोवा --- मंडो

• मणिपूर --- मणिपुरी

• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

• झारखंड- कर्मा

• छत्तीसगढ --- पंथी

• राजस्थान --- घूमर

• पश्चिम बंगाल --- गंभीरा

• उत्तर प्रदेश --- कथक

कथा क्रमांक १०९

अभ्यास कथा भाग १०९
     कथा
*दैव आणि कर्म*

      आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे
पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.
       एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.
        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.
          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.
         *यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.*
👍

साने गुरूजी

मातृह्रदयी साने गुरुजी

`खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे', हा मंत्र देणारे साने गुरुजी यांचा आज जन्मदिन.

समाजकारण, राजकारण, साहित्य निर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण जगापुढे स्वत:च्या उदाहरणाने जगासमोर ठेवणारे साने गुरूजी ही नियतीची मानवतेला दिलेली अलौकिक देणगी होती. 1899ला जन्माला आलेल्या साने गुरुजींनी वयाच्या अवघ्या 51व्या वर्षीच आपली जीवनयात्रा संपवली. पण त्यांच्या कर्तृत्वाच्या छटा आजही महाराष्ट्रातील पिढ्यांवर पाहायला मिळतात, ही त्यांची थोरवी.

कोकणात पालगड गावात एका सुखवस्तु खोताच्या कुटुंबात साने गुरुजींचा जन्म झाला. त्यांचे नाव पांडुरंग सदाशीव साने. पुढे घरची सुबत्ता जाऊन दारिद््य आले. अत्यंत हालाखीत साने बंधू जगले व शिकले. पुढे पुण्यात येऊन त्यांनी पदवी मिळवली व शिक्षकी पेशा स्वीकारला. तेव्हापासून `गुरुजी' हे बिरुद त्यांच्या नावापुढे चिकटले, ते कायमचेच.

शिक्षकी करतानाच साने गुरुजींनी विद्यार्थ्यांचे संघटन सुरू केले व ब्रिटिश सरकारविरुद्ध गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन उभारले. त्यात त्यांना वारंवार तुरुंगवास भोगावा लागला. कारागृहातच त्यांची प्रतिभा जागृत झाली. त्यांनी अनेक कथा व कविता लिहिल्या. त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचे सुलभ मराठीत भाषांतरही केले. कृष्णा हाथीसिंग यांच्या आत्मचरित्राचे `ना खंत ना खेद' हे भाषांतर विशेष गाजले. त्यांच्या `तीन मुले' या कथेवर आधारित राज कपूर यांचा `संगम' हिंदी चित्रपटातील `मैलाचा दगड' ठरला. त्यांच्या `मोलकरीण' या कथेवरील मराठी चित्रपटही गाजला.

वर्ध्याच्या तुरुंगात ते विनोबा भावेंसोबत होते. या काळात विनोबाजी रोज़ संध्याकाळी कैद्यांसमोर गीतेवर भाष्य करीत. ही भाषणे साने गुरुजी लिहून काढत. त्या विचार मंथनातूनच 'गीता प्रवचने' हा सुंदर ग्रंथ साकारला.
`सुंदर पत्रे' लिहिणाऱ्या साने गुरुजींनी `साधना' या साप्ताहिकाची स्थापना करून त्याचे संपादकपद अखेरपर्यंत सांभाळले. साने गुरुजींचे मुलांवर विशेष प्रेम होते. `करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयांचे' हे सूत्र त्यांनी जगाला दिले. स्वतंत्र भारतातील प्राथमिक शिक्षणाच्या मूळ आकृतीबंधात अमूलाग्र बदल हवा, असे ते सांगत असत. `बल सागर भारत होवो, विश्वात शोभूनि राहो' हे राष्ट्रभक्तीपर गीत त्यांचेच. ते पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रात:प्रार्थनेतील प्रार्थनागीत बनले.

सामाजिक सुधारणा हे साने गुरुजींच्या कार्याचे मुख्य सूत्र. पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर शेकडो वर्षे दलीत, हरिजन मागासवर्गीयांना बंद होते. साने गुरुजींनी त्यासाठी राज्यभर प्रचार केला. अखेर 1946 साली त्यांनी विठ्ठलाच्या पायाशीच प्राणांतिक उपोषण आरंभले. पांडुरंगाच्या साक्षीने पांडुरंगानेच जीवाची बाजी लावली. सारा महाराष्ट्र पेटून उठला. अखेर हे मंदिर सर्वांना खुले करावे लागले. ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्रांती होती. या अभूतपूर्व प्रसंगावर शाहीर साबळेंनी काव्य रचले, `हरिजन भेटी हरी रंगला, पंढरी झाली दंग, झाला कृतार्थ पांडुरंग..'
असे साने गुरुजी. समाजातील अनेक रिपू व वादांनी कंटाळले व 11 जून 1950 रोजी त्यांनी स्वत:चा शेवट करून घेतला. मानवतेचा एक सच्चा सेवक कायमचा निघून गेला.

त्यांच्या प्रेमळ व प्रेरणादायक स्मृतींना आदरांजली !

पुज्य सानेगुरुजी

सानेगुरूजी................................
साने गुरुजींची मानवी जीवनमूल्यांवर नितांत श्रध्दा होती.ध्येयवादाच्या अढळ ताऱ्यावर त्यांची दृष्टी सतत खिळलेली असायची. समाजहिताची अखंड कळवळ, देशहिताची निरंतर तळमळ असणारे साने गुरुजी समाजाला नवनवीन ज्ञानकण देण्यास उत्सुक असत. समानता, लोकशाही मूल्यांवर आधारलेला समाज निर्माण होऊन सर्वांना अन्न,वस्त्र,निवारा प्राप्त व्हावा,ही त्यांची तळमळ होती.गुरूजींनी आपला जीवनबिंदु अनंताच्या सिंधूत मिसळून टाकला. त्यांची विशिष्ट अशी जीवनदृष्टी होती.साऱ्या अभागी,दुःखी कष्टी लोकांचे अश्रू त्यांच्या डोळ्यांत एकवटले होते.अश्रू हाच त्यांचा अनमोल ठेवा होता.ते कवितेत म्हणत -
नको माझे अश्रू कधी नेऊ देवा !
हाचि थोर ठेवा,माझा एक
बाकी सारे नेई धन सुख समान
परि हे लोचन राखी ओले !!
      गुरुजींची आई त्यांना नेहमी म्हणत असे अरे जवळ जे असेल ते दुसऱ्याना द्यावे,दुसऱ्याचे अश्रु पुसावे त्याला हसवावे.या आनंदासारखा दुसरा आनंद नाही.
     जगात दुःख,यातना,कुरूपता अनंत आहे.ते वाढविण्याचा आपण प्रयत्न करु नये,दुसऱ्याचे
दुःख मोठे आहे.त्याच्या तुलनेत आपले अगदी नगण्य आहे. आपले दुःख नेहमी कुरवाळत
बसण्यापेक्षा दुसऱ्याच्या दुःखाचा भार हलका करावा,खरी माणुसकी तीच,त्यातच खरी कृतज्ञता आहे.
         साने गुरुजींनी विषमता,ध्येयशून्यता,अन्याय जुलुम नष्ट करण्यासाठी आपली लेखणी झिजवली.जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ते साधकाच्या निष्ठेने वावरले.
 स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई
सुखवू प्रियतम भारत आई
         अशी स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक तरुणाच्या मनात पेटवीणारी ही कविता साने गुरुजींच्या अजरामर लेखणीतून निर्माण झाली.आईची महती ते अशी व्यक्त करतात -
आई माझा गुरू ! आई कल्पतरू
तिला मी कसा विसरू
   अशी नितांत सुंदर कविता जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा आईचे प्रेम काय असते याची प्रचिती आपल्याला येऊ लागते.साहित्यात गुरुजींची पुस्तके अजरामर आहेत. प्रामुख्याने "श्यामची आई",मिरी,
गोप्या,दुःखी मनुबाबा, दुर्दैवी, आस्तिक,बेबी सरोजा,फुलांचा प्रयोग,नदी शेवटी सागरास मिळेल,चित्रा नि चारु,गोड गोड गोष्टी भाग १ ते १०,सुंदर पत्रे,रामाचा शेला,भारतीय संस्कृती अशी महत्वाची पुस्तके येतील.यात मुलांना आवडणारी खास श्यामची आई,मिरी,गोप्या, बेबी सरोजा,गोड गोड गोष्टी ही पुस्तके होत.
       साने गुरुजी मुलांना नेहमी म्हणत,तुम्ही फुलांप्रमाणे आहात स्वतःतर आनंदी राहाच,दुसऱ्याना ही आनंदी ठेवा.मुले म्हणजे देवाघरची फुले,राष्ट्राची ठेव,मुलांवर संस्कार केले जावेत.
मुलेच उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत.गुरुजींनी जे संस्काराचे विचार जीवनात दिले ते तीन मुले,क्रांती आणि सती यासारख्या काव्य पुस्तकांतून विशेषतः "श्यामची आई" हे पुस्तक तर आजही मोठ्या प्रमाणात वाचकप्रिय आहे.
      मी जीवनाचा नम्र उपासक आहे.सभोवतालच्या सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा हीच माझी तळमळ आणि माझे लिहिणे वा बोलणे,माझे विचार माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.म्हणूनच ते आपल्या काव्यात म्हणतात 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' अशा प्रकारच्या प्रार्थनेतुन साऱ्या विश्वालाच प्रेमाचा संदेश देतात.मुला-फुलांच्या ओठांवर प्रार्थना प्रिय करून देतात त्याचप्रमाणे.........
" बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो "
    यासारखी सुंदर काव्यरचना रसिकता आणि सौंदर्यसॄष्टीच्या अनुभवातून आलेली दिसते.आईकडून लाभलेला वात्सल्यरूपी पेला त्यांनी समाजव्यापी बनविला. जनमाणसात वेगळे स्थान निर्माण करीत कोकणचा निसर्ग आणि खानदेशातील माणसे, खानदेशची माती यांच्याशी मातृवात्सल्याच्या नात्यानेच वागत असत.आज त्यांचा जन्मदिवस त्यानिमित्त या पूज्य ज्ञानमाऊलीस विनम्र अभिवादन!

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸

*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰〰*
*🙏पुज्य सानेगुरुजी🙏💐💐*

*"ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो."*

*आपल जीवन महान बनविण्यासाठी आपणास एखाद्या ध्येयाशी तन्मय रहावे लागतं.एखाद्या कार्यासाठी स्वतःला झोकून देण्याची तन्मयता,समरसता, एकाग्रचित्तता, मग्नता, प्रसन्नचित्तता, उत्कटता आणि रममाणता असली की माणूस ते कार्य मजेन करतो.*


*माणूस हा आपल्या भाग्याचा शिल्पकार असतो.म्हणून माणसाने एक निश्चित ध्येय ठरवावे आणि ध्येयाचा ध्यास मनी बाळगून आपला जीवन मार्ग सुखकर करावा.कारण ध्येय हे एक असे रामबाण औषध आहे , की ज्यामुळे दुःखात देखील आनंद वाटतो.*
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

http://www.pramilasenkude.blogspot.in

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 जीवन विचार🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...
पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !
====================
🌻 जयमहाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰

मी कधी कुणाला कळले नाही ......कविता संकलन

*"मी कुणाला कळले नाही"*


*मित्र कोण आणि शत्रू कोण*
*गणित साधे कळले नाही..*

*नाही भेटला कोण असा*
*ज्याने मला छळले नाही...*

*सुगंध सारा वाटीत गेलो*
*मी कधीच दरवळले नाही..*

*ऋतू नाही असा कोणता*
*ज्यात मी होरपळले नाही..*

*केला सामना वादळाशी*
*त्याच्या पासून पळाले नाही..*

*सामोरा गेलो संकटाना*
*त्यांना पाहून वळले नाही..*

*पचऊन टाकले दु:ख सारे*
*कधीच मी हळहळले नाही..*

*आले जीवनी सुख जरी*
*कधीच मी हुरळले नाही..*

*कधी ना सोडली कास सत्याची*
*खोट्यात कधीच मळले नाही..*

*सोडून गेले माझेच मला*
*"मी कुणाला कळलेच नाही.."*

*"मी कुणाला कळलेच नाही"*
 🌹🌹

बहिण भाऊ विचार सांगड

भाऊ "तुला हे स्थळ पसंत आहे का ?"
तिच्या भाऊ ने तिला विचारलं.
बहीण "हो छानच आहे. नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?"
.
भाऊ "हो , पण घर बघितलंस का , कसलं साधं आहे ? दगडमातीचं !
त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत."
.
बहीण "म्हणून काय झालं ?"
.
भाऊ "त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ?
एवढा मोठा बंगला , नोकर चाकर , दहावीस गाड्या !
नुसता आरामच आराम !"
.
बहीण "ते स्थळ नको."
.
भाऊ "का ?"
.
बहीण " मी त्या मुलाशी बोललेय.
त्याचे काही प्लॅनच
नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी.
तिथं गेले तर
माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही.
सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय . नवीन काय करायचं
म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका !
त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही..
त्याउलट आजचं स्थळ बघा ना !
सगळ्या गोष्टी अजून
प्राथमिक स्टेजला आहेत.
चांगलं घर नाही , घरात
कुठल्याही सुखसोयी नाहीत ,
स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !"
"
.
भाऊ... पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल.
धारा काढाव्या लागतील , गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल."
.
बहीण "मला आवडेल.
स्वतःचा संसार उभा करायचा तर
कामं ही करावी लागणारच.
यश आणि सुख हे
सहजासहजी मिळत नाही."
.
भाऊ "अगं ,पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना ,
परवाच्या स्थळाचा विचार केलास तर !"

बहीण "तेच तर नकोय.
मी केवळ इतरांनी मिळवलेल्या
ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले तर माझं अस्तित्व कुठं राहिलं ? "
.
भाऊ "म्हणजे ?"
.
बहीण "मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतः
प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधीही सर्वत्र मिळत नाही.
हा मुलगा चांगला आहे.निर्व्यसनी
आहे.स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे.
लहानपणी वडील वारले ही खूप मोठी हानी झाली त्याची.
बापाचं छत्र नसतानाही तो डगमगला
नाही , भरकटला नाही.स्थिर राहिला.
एक दिवस जगात माझंही नाव करून दाखवीन म्हणाला.
सगळे माझे विचार.
एकमेकांचे विचार जुळले की संसार
सुखाचाच होणार.
.
बहीण,.. एक बैल कामसू आणि दुसरा
आळशी झाला की चांगली मशागत कधीच होणार नाही.
तसंच संसाराचंही आहे.
आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही.
पण दहावीस वर्षांनंतर आमच्याकडेही गाडी असेल ,बंगला असेल ;
त्यावेळी आम्हांला
अभिमानाने सांगता येईल की
यातली प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही आमच्या कष्टाने
मिळवलेली आहे.
अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी
मजा असते !
नुसतं खाऊन पिऊन लोळणं याला जर
कुणी सुख म्हणत असतील तर ते सुख मला नकोय .
🙏🏻🙏🏻🙏🏻

म्हणी व अर्थ भाग १३

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १३ )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) मनात मांडे पदरात धोंडे*

अर्थ - केवळ मोठमोठी मनोराज्ये करायची ; परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती.


*📝२) राजा बोले दळ हले.*
अर्थ - धन्याच्या आज्ञेप्रमाणे सेवक काम करतात.


*📝३) दुभत्या गाईच्या लाथा गोड*

अर्थ - ज्याच्यापासून काही लाभ होतो , त्याचा ञासदेखील मनुष्य सहन करतो.


*📝४) देश  तसा वेश*

अर्थ - परिस्थितीप्रमाणे बदलणारे लोक.


सुविचार भाग १३

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १३ )*
*✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖➖

*📚१) राष्ट्र जगायला हवे असेल तर राष्ट्राच्या मुळाला पाणी घालावयाला सर्वांनी उठले पाहिजे.*


*📚२) जी शक्ती माणसाचा जीवनाला गती देते तीला श्रद्धा म्हणतात.*


*📚३) मृत्यू आहे म्हणूनच जीवनसागराचं पाणी खराब होत नाही.*

*📚४) स्त्री शिकल्याशिवाय समाजाची प्रगती होणे शक्य नाही.*

*📚५)  आत्मविश्वासासारखा दुसरा मित्र नाही.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

कथा क्रमांक १०८


अभ्यास कथा भाग १०८

कथा
कुरतडलेला पेरु

एक  छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभी ! तिची आई हसतहसत म्हणाली,"बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात तिने तो पेरू दाताने कुरतडला.तिची आई काहीच बोलली नाही. मुलीने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या मुलीची ही कृती बघून तिची आई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या मुलीने चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाली,  "आई, हा घे.हा जास्त गोड आहे." आईच्या डोळ्यात पाणी आले.
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही...
*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून* गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते...!!
     💐💐

कथा क्रमांक १०७

अभ्यास  कथा भाग १०७

कथा

स्वतः वरील विश्वास

एक चित्रकार होता.
गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता.
गुरू व स्वत:च्या  कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता.

पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा.

तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’
हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला.

एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली,
मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले?
यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’

लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला.
संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला,
‘मी हरलो.
मी खूप वाईट चित्रकार आहे.
मी चित्रकला सोडायला हवी.
मी संपलो.’

हे ऐकून गुरूने म्हटले,
‘तू व्यर्थ नाहीस.
तू फार चांगला चित्रकार आहेस.
मी ते सिद्ध करू शकतो.
असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये.

तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली,
‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले.

संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता.
सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले.

यावर गुरू म्हणाले,
‘फुल्ल्या मारणे सोपे असते,
पण दुरुस्ती करणे कठीण असते.’
तात्पर्य ः
दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.
सगळ्यांची मतं ऐका,

पण इतरांच्या मतांनी तुटू नका.

मी कोण आणि कसा
हे पहिल्यांदा स्वत:ला विचारा...

आपला आत्मविश्वास सगळयात महत्वाचा...

जीवन विचार

जीवन विचार

 प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस
चुकीचा असतोच असे नाही
किंवा असेही नाही की
तो कमजोर आहे.

फरक इतकाच असतो की,
त्यांना स्वतःच्या ego पेक्षा
नाती जपत असतांना एक पाऊलं
मागे का होईना येण्यात कमीपणा
अथवा कोणत्याही स्वरूपाचा
संकोच वाटत नाही.
       
  *माणसे कमविण्यात* *जो आनंद आहे,*
*तो पैसा कमविण्यात नाही*

कविता संकलन

बापाचे काळीज
----------------------------------------------

पोरीची पसंती आली की
बापाचं काळीज धडधडतं
चिमणी घरटं सोडणार म्हणून
आतल्या आत खूप रडतं

हसरे खेळकर बाबा एकदम
धीर गंभीर दिसू लागतात
पोरीला पाणी मागण्या पेक्षा
स्वतःच उठून घेऊ लागतात

या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो
म्हणून बाप लेक झोपल्यावर
तिच्याकडे पाहून रडत असतो

अंबुच्या लिंबूच्या करत करत
मोठी कधी झाली कळलं नाही
बाप सांगतो तिलासोडून
मला पाणीही गिळलं नाही

दिवसातून एकदा तरी
मायेनं जवळ घ्यावं वाटतं
परक्याचं धन असलं तरी
द्यायला मात्र नको वाटतं

उठल्या पासून झोपे पर्यंत
बाबाची काळजी घेत असते
आज ना उद्या जाणार म्हणून
पोरगी जास्तच लाडाची असते

पोरगी जाणार म्हणलंकी
बाप आतून तुटून जातो
कळत नाही बैठकीतून
अचानक का उठून जातो ?

इकडे तिकडे जाऊन बाबा
गुपचूप डोळे पुसत असतात
लेकीचं कल्याण झालं म्हणून
पुन्हा बैठकीत हसत असतात

तिचा सगळा जीवनपट
क्षणाक्षणाला आठवत राहतो
डोळ्यात येणाऱ्या आसवांना
बाबा वापस पाठवत राहतो

बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून
कोण कशाला दटवील गं ?

बाबा कुणाचं ऐकत नाहित पण
पोरीला नकार देत नाहीत
तिने रागात पाहिलं की मग
ताटात गुलाबजाम घेत नाहीत

एका अर्थानं पोरगी म्हणजे
काळजी करणारी आईच असते
पोटचा गोळा देणाऱ्याची
कहाणी फार वेगळी असते


कथा क्रमांक १०६

अभ्यास कथा क्रमांक १०६

    *कुत्रा व सुसर*
〰〰〰〰〰〰
*इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी* नदी आहे. त्या नदीत खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे पिऊ लागला.
          कुत्र्याचे असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले डोके पाण्यावर काढून त्याला म्हणाली, 'अरे, तुला फार घाई झाली आहे का ? तू एका जागी उभा राहून पाणी का पीत नाहीस ? तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार दिवसांची इच्छा पुरी होत आहे. तुझ्या ओळखीने मला फार आनंद होतो आहे.'
          सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला उत्तर दिले, 'तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो. पण खरंच बोलायचं झालं तर मी असा जो घाईघाईने पाणी पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच.
〰〰〰〰〰〰
*तात्पर्य*- वाईट स्वभाव असलेल्याशी आपला संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे.

कथा क्रमांक १०५

अभ्यास कथा क्रमांक १०५
 प्रवास जीवनाचा

एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.
शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'
एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"
तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"
शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"
"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.
खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.
त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.
त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"
ही गोष्ट आपल्याला सांगते की
तात्पर्य ः चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.


श्रीनिवास रामानुजम महान गणिती माहिती (संकलन)



*महान गणिती श्रीनिवास रामानुजन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*

पूर्ण नाव :- श्रीनिवास रामानुजन अय्यंगार
जन्म :-डिसेंबर २२, १८८७
इरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत

 मृत्यू :- एप्रिल २६, १९२०
मद्रास, ब्रिटिश
 भारत निवासस्थान कुंभकोणम नागरिकत्व भारतीय धर्म हिंदु कार्यक्षेत्र गणित प्रशिक्षणट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, युनायटेड किंग्डमडॉक्टरेटचे मार्गदर्शकजी.एच्.हार्डीख्यातीलांडाउ-रामानुजन स्थिरांक, रामानुजन मूळ संख्या, रामानुजन थीटा फंक्शनवडीलके. श्रीनिवासआईकोमलताम्मापत्नीएस. जानकीअम्मा

श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.

रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

जन्म व संशोधनसंपादन करा

या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

मृत्युसंपादन करा

१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.

म्हणी व अर्थ भाग १२

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १२ )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) पी हळद हो गोरी.*

अर्थ - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.


*📝२) पिंडी तो ब्रम्हांडी.*

अर्थ - जे आपल्या येथे आहे तेच सर्व जगात असते.


*📝३) पाचा मुखी परमेश्वर.*

अर्थ - सगळे बोलतात ती गोष्ट खरी मानावी.



*📝४) देखल्या देवा दंडवत.*

अर्थ - एखादी व्यक्ती सहज भेटली तर केवळ खुशाली विचारणे.

सुविचार भाग १२

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक १२)*
  ✍ *🌻सुविचार मौक्तिके*🌻
➖➖➖➖➖➖➖

*📚१) विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे.*


*📚२) भाषण रुपेरी आहे , तर मौन सोनेरी आहे.*


*📚३) मैत्री म्हणजे ईश्वराने मनुष्याला दिलेले बक्षिस आहे.*

*📚४) माता म्हणजे मनुष्याच्या जीवनातील गंगाजळ होय.*

*📚५) प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्मामुळेच सुख किंवा दुःख प्राप्त होत असते.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

कथा क्रमांक १०४

अभ्यास कथा भाग १०४
आईचे प्रेम

एका गावात एक बाई
आपल्या छोट्या मुलाबरोबर
एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून
दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नसते. तो तिचा नेहमी तिरस्कार करत असतो;
कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत
असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.

एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही. रागाचा एक कटाक्ष टाकूनतो तिथून पळून जातो. घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो. "कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील?
मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत
नाहीस.'' वगैरे वगैरे.

आई काहीही बोलत नाही.
आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो.

रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते. पण
त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.

त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथूनबाहेर पडायचे.
त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत
विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत
मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो. एका सुंदर
मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक
मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे
सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे
नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो.
अतिशय सुखात असतो.

एक दिवस त्याच्याघराचे दार वाजते. दारात एका माणसा बरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, "कोण आहेस तू ? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.''
""मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,'' असे
काहीसे पुटपुटत आई निघून जाते.

तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?)
मुलगा दार लावून घेतो.
काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून
पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत
असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो. संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीनेत्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते.

शेजारची बाई त्याला ओळखते आणि  एक पत्र देते. ते पत्रत्याच्या आईचे असते. तो वाचू लागतो,


"मी खूप आयुष्य जगले.
 तुझ्याकडे आता मी परत
कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे.

शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण
तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले.
कारण मला माहिती आहे,
एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही.
मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान
होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण
आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात
झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले
आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप
अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही. "तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,' असाच विचार मी करते.
कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू
मला नेहमी आठवतोस...''

पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली,
स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चात्ताप झाला,तो आईला मोठमोठ्याने
हाका मारू लागला;पण आता त्याचा काय उपयोग
होता....??

मित्रानो आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा.
पण.
कोणत्याही गोष्टीसाठी
आई-वडिलांना सोडू
नका. . .


स्वतःचे परीक्षण

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्यचकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

*पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????*

यासाठी प्रत्येकजण शवपेटीच्या जवळ जाऊ लागला.शवपेटीत डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फरले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण शवपेटीत एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

शवपेटीच्या जवळच एक बोर्ड ठेवला होता,

*"या जगात तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः"*

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही फक्त स्वतःसाठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

*तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचे ठरवाल.अन्यथा या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाही शक्य नाही.*

संघर्ष

 बॅड पॅच- एक संघर्ष..

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

 करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

 नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

 व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

 पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
 काय बोलतो,
काय करतो,
 काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
 आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी, सामान्य माणसं, असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र, हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

 यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!🙏🏼

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
   *🌺 जीवन विचार* 🌺
〰〰〰〰〰〰〰〰
जीवनकलेचा उपासक आपल्या हृदयाशी काही निष्ठा बाळगत असतो.पहिली निष्ठा आहे सत्यनिष्ठा.कला ही कशाची नक्कल नसते, ती अस्सल असते. ती प्रतिकृती वा अनुकृती नाही , स्वतंत्र निर्मिती आहे.

दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेणे त्याला शब्दनिष्ठा म्हणतात, स्वतःच्या अनुभवाने निष्कर्षाप्रत येणे याला सत्यनिष्ठा म्हणतात.

सत्यनिष्ठ माणूस जीवनात सारखे प्रयोग करीत असतो. प्रयोगातून चिंतन , चिंतनातून प्रयोग अशी त्याची साधना चालू असते.
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र विभूती आहे, हे लक्षात  घेऊन  माणसाने दुसऱ्यांचे अनुकरण करु नये तर आपले स्वतःचे स्वत्व ओळखून ते विकसित करण्याचा प्रयत्न करावा.
*We must learn to be ourselves*.
🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼
〰〰〰〰〰〰〰〰

सामान्यज्ञान माहिती संकलन

32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.
33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.
34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.
35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.
36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.
37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.
38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.
39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.
40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.
41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.
42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.
43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.
44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.
45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.
46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.
47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.
48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.
49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.
50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.
51)आकियो मोरिता – sony कंपनीचे संस्थापक.(जपान)
52)आग्रा – सुप्रसिद्ध ताजमहाल या शहरामध्ये आहे.
53)आनंदपूर साहेब – गुरु तेगबहादूर यांनी स्थापन केलेले पंजाब मधील खेडे.
54)आनंदवन – समाजसेवक स्व.बाबा आमटे यांचा आश्रम येथे आहे.
55)आफ्रा बेन – गुलामांविषयी कळकळीने लिहिणा-या पहिल्या ब्रिटिश लेखिका.
56)आयसोबार्स – नकाशावर समानहवेचा दाब जोडणा-या जगाच्या रेषा.
57)आयोडीन – गॉयटर हा रोग आहारातील …. या घटका अभावी होतो.
58)आरती शहा – इंग्लीश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला.
59)आर्द्रता – हवेतील बाष्पाचा अंश.
60)आर्यभट्ट – भारतातील पहिला उपग्रह.
61)आर्यभट्ट – यांनी शुन्य़ाचा शोध लावला.
62)आळंदी – संत ज्ञानेश्वरांची समाधी येथे आहे.
63)आवली – संत तुकारामांची पत्नी.

सुविचार भाग ११

🌷🍁♻🍁♻🍁♻🌷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
     *भाग  ( क्रमांक ११)*
 *✍🌻सुविचार मौक्तिके 🌻*
➖➖➖➖➖➖➖

*📚१) युवकांना असे शिक्षण मिळणे आवश्यक आहे की, ज्यामुळे ते स्वतःपुढे उत्तम आदर्श ठेवू शकतील.*


*📚२) शिक्षण म्हणजे व्यक्तीचा समाजोपयोगी विकास.*


*📚३) आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी समर्थ असते तेच शिक्षण होय.*

*📚४) मनुष्याची सुखद व स्वाभाविक स्थिती म्हणजे शांती.*

*📚५) शञूची व रोगाची उपेक्षा करु नये.*
➖➖➖➖➖➖➖➖🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
 http://www.pramilasenkude.blogspot.in

म्हणी व अर्थ भाग ११

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷
➖➖➖➖➖➖➖➖
*🚩माझी शाळा माझे उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖➖
   *भाग  ( क्रमांक ११ )*
       *✍म्हणी व अर्थ *
➖➖➖➖➖➖➖

*📝१) पुराणातली वांगी पुराणात.*

अर्थ - जुन्या गोष्टी त्याच ठिकाणी चांगल्या.


*📝२) आईजीच्या जिवावर बाईजी उदार.*

अर्थ - दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.


*📝३) असंगाशी संग प्राणाशी गाठ.*

अर्थ - संगत करण्यास अयोग्य माणसाशी संगत केल्यास वेळप्रसंगी आपलेच प्राण गमवावे लागते.


*📝४) आगीतून फोफाट्यात पडणे.*

अर्थ - लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.

➖➖➖➖➖➖➖➖🔰🎀🔰🎀🔰🎀🔰
.in

संत गाडगेबाबा यांची माहिती व कार्य

हातात खराटा घेवुन समाजातील लोकांची डोकी साफ करणारे राष्ट्रसंत डेबुजी(गाडगेबाबा) यांच्या पुण्यतिथीला माझे  लाख लाख दंडवत.
💐💐💐💐💐💐💐
निष्काम कर्म, समाजसेवा व मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे संत गाडगे
महाराज हे आधुनिक संत होते. त्यांनी माणुसकीचा संदेश देत स्वच्छता व
मानवतेचा नवा धर्म समाजात रुजवला. समृध्द समाज घडवण्यासाठी, तळागाळातील
अंध, अपंग, रोगी, दीन-दलित, दुःखितांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते आयुष्यभर
झगडले. सेवा प्रमुख धर्म हा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. आयुष्यभर चिंध्यांचे
वस्त्र पांघरणारा, सारे गाव स्वच्छ केल्यावर तळहातावर भाकरी घेऊन खाणारा, मोठमोठ्या धर्मशाळा, वसतिगृहे, आदिवासी आश्रमशाळा, महाविद्यालये
बांधूनही आयुष्यभर झोपडीत राहणारा, श्रमाची उपासना करायला सांगणारा,
कोट्यवधी रुपयांच्या देणग्या लाभल्या तरी एका पैशाचादेखील मोह न ठेवणारा,
आयुष्यभर कीर्तनाद्वारे गोरगरिबांना समुपदेशन करणार्या थोर निष्काम
कर्मयोगी संत गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील
भुलेश्वरी नदीच्या तीरावरील शेंडगाव येथे २३ ङ्गेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर. रंगीत चिंध्या हेच त्यांचे महावस्त्र. गाडगे,
काठी, कानात कवडी आणि पायात दोन प्रकारच्या चपला हे त्यांचे अलंकार. त्यांचे भोजन म्हणजे कांदा, मिरची, भाकरी. बाबांचे कार्य परीट समाजापुरते सीमित न राहता संबंध मानवजातीला नतमस्तक करायला भाग पाडणारे आहे. मानवी मनावर
बसलेल्या अंधश्रध्देच्या भुताचा बीमोड करण्यासाठी गावा-गावात कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले. देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका,
सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवर्षी, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, अशी शिकवण आयुष्यभर
त्यांनी मानव समाजाला दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यातून रंजल्या-गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात
ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम बांधले. गाडगेबाबांचा शिक्षणाशी संबंध नसताना कार्यकृतीच्या बळावर गावागावाच्या सङ्गाईसोबत तिथे
राहणार्या लोकांच्या मनाची सङ्गाई करुन त्यांनी आपल्या अंगी असलेल्या विद्वत्तेचे सदैव दर्शन दिले. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवातच गाडगेबाबा अधिक रमत. त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. त्यांच्या जिभेवर साक्षात तुकोबांचे अभंग नाचत. बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते तसेच
तथाकथित सुशिक्षितांसाठी, दुःखीतांसाठीही होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या,
भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उध्दाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन. ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने
साङ्ग करत. रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साङ्ग करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की, शब्दांचा, साहित्याचा,
सद्विचारांचा असा काही मारा करत की, ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक
ठिकाणी गोरक्षण संस्था व शाळा-कॉलेजेस काढली. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरुंसाठी सोय त्यांनी केली. दुःख, दारिद्य्र, अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाने ते मंत्रमुग्ध करत. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्म-
शताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या होत्या की, परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करुन मानवतेवर अनंत उपकार केले आहेत, मात्र
मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी, लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही.
अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संतांबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक
झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यंाना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतावादी संत आहेत. माणसाने
माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. कोंबडे-बकर्या खाणारा देव नसून सैतानच आहे हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभुत संत. भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रध्दा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यंनी केले ते म्हणतात, देव देवळात नाही, दगडात नाही, माणसात आहे.
माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा. माणसामधल्या परमेश्वराची पूजा करणार्या या संतांने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक प्रचंड सामर्थ्य निर्माण
केले. गाडगेबाबांना विचार करण्याची अङ्गाट दूरदृष्टी होती. आपल्या बुध्दीकौशल्याने निःस्वार्थ निरंतर सेवाभाव ठेवून त्यांनी समाजात प्रत्यक्ष कृतिशील राहून
कार्य करण्यास प्रारंभ केला. एखाद्या गावात प्रवेश करतानाच हातात खराटा घेऊन गाडगेबाबा संपूर्ण गाव स्वच्छ करायचे. संपूर्ण गाव स्वच्छ झाल्याशिवाय ते
भाकरीलाही हात लावत नसत. रात्री गावातील स्त्री-पुरुष, तरुणांना चावडी, मैदानावर एकत्र करत. अंधश्रध्दा, लोकशिक्षण व व्यसनाविषयी समाजात
असलेल्या अनिष्ट रुढी, परंपरा, अंधविश्वास, जातीयता, व्यसनाधिनता, स्वच्छता याविषयी लोकजागृती व समाज प्रबोधन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पायी भ्रमण करुन सामाजिक प्रबोधनचे महान कार्य आपल्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत केले. ५ मे १९२३ रोजी गाडगेबाबांचा मुक्काम
खारेपाटणा (रत्नागिरी) येथे होता. कीर्तनापूर्वी त्यांना त्यांचा मुलगा गोविंद याच्या निधनाची बातमी कळाली. पुत्रनिधनाने ते स्तब्ध झाले. स्वतःला सावरत
दुःखाची छटा चेहर्यावर न दिसू देता गावातून भाकरी मागत पुन्हा कीर्तनास प्रारंभ केला. समाजाच्या दुःखापुढे माझे दुःख ते काय? असे म्हणत, समाजातील
लाखो घरांचे दुःख दूर करायचे आहे असे सांगत. सन १९०५मध्ये गाडगेबाबांनी ऐन तारुण्यात संसाराचा त्याग केला. पुढे महाराष्ट्रामध्ये गावोगावी, खेड्यापाड्यातून
जनस्थितीची पाहणी केली. बाबांचे शरीर जर्जर झाले. अखेर २० डिसेंबर १९५६ रोजी या महान राष्ट्रसंतांने अखेरचा निरोप घेतला. ते शरीराने जरी साक्षात नसले
तरी त्यांचे अद्वितीय कार्य जगाचे अंतिम सत्य ठरले आहे एवढे मात्र खरे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

हाँ मै शिक्षक हूँ कविता संकलन

हाँ मैं शिक्षक हूँ।
हाँ मैं शिक्षक हूँ।

उन डाक्टरो के पीछे , मैं था ।
उन अर्थशास्त्रीयो के पीछे , मैं था ।।
उन अंतरिक्ष विज्ञानियो के पीछे , मैं था
 ज्ञान का प्रकाश लेकर ।।
भले ही वे मेरा मजाक उङाये।।

हाँ मैं शिक्षक हूँ ।।
मेरे पास महंगा घर नही है ; पर हाँ मैं शिक्षक हूँ ।।।।

कभी कभी मैं उलझ जाता हूँ मेरे अधिकारी और राजनेताओ की बदलती नीतियो में ।
जो बताते हैं कि मुझे कैसे पढ़ाना है ।।।
पर फिर भी मैं शिक्षक हूँ और पढा रहा हूँ।

जिस दिन वेतन मिलता है ,मैँ औरो की तरह नही हँस पाता हूँ ।
पर अगले दिन मुझे मुस्कुराके जाना होता है उनके लिये जिन्हे मैं पढ़ाता हूँ ।।
क्योकि मै शिक्षक हँ ।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।

मेरे संतोष का कारण है जब मैं देखता हूँ अपने छात्रों को आगे बढते हुए , सफल होते हुए , सब कुछ प्राप्त करते हुए , दुनिया का मुकाबला करते हुए।।।
और मैं कहता हूँ गुगल के जमाने में भी मैंनें पढ़ाया है ।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।

कोई बात नहीं वो मुझे किस नजर से देखते हैं ।
कोई बात नहीं वो मुझसे कितना ज्यादा कमाते हैं ।
कोई बात नहीं वो मेरी कितनी इज्जत करते हैं और मानते है।।
वो कारों में घूमते हैं , आलीशान घरो में रहते है
पर सीना मेरा चौड़ा होता है क्योंकि मैं उनका शिक्षक हूँ ।।

हाँ मैं शिक्षक हूँ ।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।

प्रमुख वचन और नारे. संकलन

** प्रमुख वचन और नारे ** 👌
------------------
1. जय जवान जय किसान
Ans-लाल बहादुर शास्त्री
2. मारो फिरंगी को
Ans-मंगल पांडे
3. जय जगत
Ansविनोबा भावे
4. कर मत दो
Ans-सरदार बल्लभभाई पटले
5. संपूर्ण क्रांति
Ans-जयप्रकाश नारायण
6. विजय विश्व तिरंगा प्यारा
Ans-श्यामलाल गुप्ता पार्षद
7. वंदे मातरम्
Ans-बंकिमचंद्र चटर्जी
8. जय गण मन
Ans-रवींद्रनाथ टैगोर
9. सम्राज्यवाद का नाश हो
Ans-भगत सिंह
10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
Ans-बाल गंगाधर तिलक
11.इंकलाब जिंदाबाद
Ans- भगत सिंह
12. दिल्ली चलो
Ans-सुभाषचंद्र बोस
13. करो या मरो
Ans-महात्मा गांधी
14. जय हिंद
Ans-सुभाषचंद्र बोस
15. पूर्ण स्वराज
Ans-जवाहरलाल नेहरू
16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
Ans-भारतेंदू हरिशचंद्र
17. वेदों की ओर लौटो
Ans-दयानंद सरस्वती
18. आराम हराम है
Ans-जवाहरलाल नेहरू
19. हे राम
Ans-महात्मा गांधी
20. भारत छोड़ो
Ans-महात्मा गांधी
21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
Ans-रामप्रसाद बिस्मिल
22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
Ans-इकबाल
23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
Ans-सुभाषचंद्र बोस
24. साइमन कमीशन वापस जाओ
Ans-लाला लाजपत राय
25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
Ans -जवाहरलाल नेहरू

संत गाडगे महाराजांची किर्तने

*संत गाडगे महाराज आणि त्यांची कीर्तने* !!

गाडगेबाबा हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयाञा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. स्वच्छता, करुणा आणि शिक्षण विवेकनिष्ठ मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य केले. बाबांचे काही वैचारिक कीर्तने..

*किर्तन १*

बाबा :-  देव किती?
श्रोते :-  एक.
बाबा :-  तुमच्या गावी खंडोबा आहे का?
श्रोते :-  आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- दोन
बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग आता देव किती झाले?
श्रोते :-  तीन
बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- चार
बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन २*

बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड?
श्रोते :- श्रीखंड
बाबा :- बासुंदी चांगली का बोकड?
श्रोते :- बासुंदी
बाबा :- दूध चांगले का बोकड?
श्रोते :- दूध
बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती मारवाडी कधी देवाला बकरे कापतात का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग त्यांना देव कसा पावतो? अन् तुम्हाला का पावत नाही? एकेका गुजरातीच्या दहा दहा मजली इमारती आहेत अन् तुम्ही फूटपाथवर झोपता. शेटजीच्या बायकोचे पाच फुटी पातळ पाचशे रुपयांचे त्यातला परकर तीनशेचा अन् तुमच्या बायकोच्या नऊवारी पातळाची किंमत किती? पाच रुपये अन् पावली.

देवाला बकरे द्यायचे तर त्याच्या देवळात सोडून द्या त्याच्या पोटात सुरी कशाला खुपसता? तुम्ही त्याचा इकडे मसाला वाटता अन् यम तिकडे तुमचा मसाला वाटणार. बोला गोपाला गोपाला� देवकी नंदन गोपाला।

*किर्तन ३*

बाबा :- देव कसा आहे? जसं वारं.
वायु असे सकळ ठायी परि त्याचे बि-हाडची नाही ।
वारं आहे ना वारं पृथ्वीवर आहे घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारं आहे. पण कोणी असं नाही सांगत की रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता. सांगतं का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही तसा परमेश्वर आहे. अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत. जञा में फञा बिठाया तीरथ बनाया पाणी..
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये.. दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ मग सांगा जञेत देव कशाचा आहे?
श्रोते :- दगडाचा
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही पैशाचा नाश खाना खराब आ�हे. गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन ४*

बाबा :- देवळात देव नाही
नहीं मसजिद में नहीं देवलमे
देऊळ तयार झाले मूर्ती आणावी लागती का नाही?
श्रोते :- होय
बाबा :- बोला
श्रोते :- होय बाबा
बाबा :- मग मूर्ती इकात का फुकट?
श्रोते :- विकत
बाबा :- देव विकत भेटतो का? त्यापेक्षा सूर्यनमस्कार घ्यावा? जेवढे पैसे पडतील तेवढे पडूद्या. अन् आपल्या घरात आणून बसवून टाका. देव विकत भेटतो का? तो काय मेथीची भाजी आहे का कांदे बटाटे आहेत? हे ज्या माणसाले समजत नाही तो माणूस कसला? बरं आणले देव बसवले देवळात. तुमच्या देवाले अंग धुता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- ज्याले अंग धुवायची अक्कल नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाले धोतर नेसता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- ज्याले धोतरही नेसता येत नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाला निवद ठेवला अन् कुञ भिडलं तर त्याला हाणता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- अरे कुञाही हाणायची ताकद ज्याच्या अंगात नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाचा देवळापुरता तरी आत उजेड पडतो का?
श्रोते :- नाही
बाबा :- इजला दिवा मंडळी आली बापू दिवा लावा दिवा. मंडळी दर्शनाला आली. आणा दिवा. मग सांगा देव कोणी दावला?
श्रोते :- दिव्यानं दावला.
बाबा :- मग दिवा मोठा का देव?
श्रोते :- दिवा मोठा
बाबा :- मग कळलं ना देव देवळात नाही या जगात आहे तुमच्या माझ्यात आहे. जगाची सेवा करा?
बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला...
           
*किर्तन ५*

बाबा :- ब्रिटिश सरकारने आपल्यावर एक मोठं अरिष्ठ आणलं होतं. मग सत्याग्रह केला का नाही लोकांनी?
श्रोते :- होय केला
बाबा :- का कोणी देवळातले देव आले होते मदत कराले? वान्द्रयाचे राम, दादरचे इठोबा का वरळीचे पहिलवान मारूती आले होते?
श्रोते :- कोणी नाही आले
बाबा :- शिंगणापूरचे महादेव आले होते का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग कोण सत्याग्रह आंदूलन केला?
श्रोते :-  माणसांनी केलं
बाबा :- कोणी कोणी ब्रिटिशाच्या गोळ्या झेलले?
श्रोते :- माणसांनी झेलले
बाबा :- मग त्या ब्रिटिशाले कोणी हाकलून लावले बप्पाहो?
श्रोते :- माणसांनी बाबा
बाबा :- मग देव कुठे राहतोय?
श्रोते :- माणसात
बाबा :- मग माणसाची सेवा करा बप्पाहो. एकवेळ पोटाले नाही मिळलं तरी चालेल पण पोरांना साळा शिकवा. देवा दगड धोंड्याच्य नादी नका लागू. आपला जवळपास घाणकचरा नको टाकू. परिसर चांगला ठेवा. हरामचं खाऊ नका. तानलेल्याला पाणी पाजा भूकेल्याला घास द्या बप्पाहो तेच देव हाये त्याचा आशिर्वाद घे. बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला..

मिञांनो किती आशयपूर्ण किर्तन बाबांनी मांडले आहे. अक्षर ओळख नसताना सुद्धा बाबांना खऱ्या देवाचा शोध लागला होता. चला, आपणही एक पाऊल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने टाकूया. देवळातल्या दगडापुढे आपण आपला माथा टेकवून लोकांना लाथा मारण्यापेक्षा पुरोगामी  भारताची निर्मिती करुया. तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवूया.

कथा क्रमांक १०३

माझी शाळा माझे उपक्रम
अभ्यास कथा भाग १०३
....आत्मविश्वास.........!

एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता.
धनको त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावत होते.
असाच तो एका बगिच्यातील बेंचवर हातांनी डोके धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे
त्याला खूप वाटत होते.
अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर
उभा राहिला.
मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, तो म्हणाला. मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.
व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक.
या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला.
आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने
तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला.
त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर
करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले.
काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.
बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन
आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला. व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशोगाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स
तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुम्हाला मी पकडलेच! व्यावसायिकाकडे बघून ती नर्स ओरडून म्हणाली. याने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात
असतो आणि लोकांना सांगत बसतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून.
असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले.
व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले
की, त्याचे आयुष्य बदलवून
टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वातच नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-
आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते
🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏

स्मृती दिन संत गाडगेबाबा

*माझी शाळा माझे उपक्रम*. 🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
*दि.२० डिसेंबर...२०१६ महान कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचा  *जि.प.प्रा.शाळा वाटेगाव* *येथे ६० वा स्मृती दिन साजरा करण्यात आला आहे.*
💐💐💐💐💐💐💐💐
*कण कण करूनी कोटी केले कण न खर्चीला स्व हितासाठी वन वन करुनी कण कण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी...अशा मानवतेचे पुजारी*
*गाडगेबाबा महाराज* *यांच्या प्रतिमेचे पुजन मा.मु.अ.श्री चव्हाण सरांनी  केले.*
*त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व आणि संत गाडगेमहाराज यांचे समाजकार्य सांगून आणि   गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत गाडगे महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🙏🙏🙏💐💐💐💐 करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.*

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
        *✍शब्दांकन*
  श्रीमती प्रमिला सेनकुडे
जि.प.प्रा.शाळा वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰
*🙏मानवतेचे महान पुजारी यांना विनम्र अभिवादन*🙏

  *🌺जीवन विचार*🌺
〰〰〰〰〰〰〰
जीवनात स्वच्छता , आचार -विचारात स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून खराटा, केरसुणी, खापर आणि खोरं ही तर निर्मळतेची धन्य धन्य  साधनं आहेत. ही झाडूची भावडंच आहेत.

संत गाडगेबाबा, महात्मा गांधी आणि सेनापती बापट या महापुरुषांनी आपल्या हाती झाडू घेतला.
संत गाडगेबाबांचा खराटा मनुष्याच्या अंतर्बाह्य स्वच्छ जीवनाचे प्रतीक आहे.स्वच्छता , समता आणि बंधुत्व या ञिवेणी संगमावरील तीर्थस्थान होतं गाडगेबाबांचं !
स्वातंत्र्य,  स्वावलंबन, स्वाध्याय आणि स्वाभीमान ही स्वच्छतेच्या पुस्तकातील पाने आहेत.
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात स्वच्छतेचे स्फुल्लिंग निर्माण झालं तर सुखी आणि संपन्न देशाचं भाग्य जवळ आलं अस
म्हटलं पाहिजे !!
*श्री संत गाडगेबाबा*
 🙏🙏💐💐🙏🙏
====================
🌻सुप्रभात महाराष्ट्र🌻
〰〰〰〰〰〰〰
〰〰〰〰〰〰〰

गणीत विषयावर उखाणा उपक्रम

गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी *उखाणा* उपक्रम.

१) महादेवाच्या पिंडीसमोर
     उभा आहे नंदी
    आयताचे क्षेञफळ =
     लांबी x रूंदी.

२) हिमालयातील काश्मिर
     म्हणजे भूलोकातील स्वर्ग,
     चौरसाचे क्षेञफळ म्हणजे
      बाजूंचा वर्ग.

३) देवीची ओटी भरू    
     खणानारळाची,
    ञिकोणाचे क्षेञफळ =
      १/२xपायाxउंची.

४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे
     १९४२ ची चळवळ,
     (सहा बाजू) वर्ग.....
      हे घनाचे पृष्ठफळ

५) तीन पानांचा बेल त्याला
     येते बेलफळ
    लांबीxरूंदीxउंची..... हे
    इष्टिकाचीतीचे घनफळ.

६) जुन्या हजार पाचशेच्या
     बंद झाल्या नोटा,
     खरेदी वजा विक्री
     बरोबर होईल तोटा

७) मी आणि माझे विद्यार्थी
     दररोज खातो काजू ...
     चौरसाची परिमिती =
     4 × बाजु.

 ८) खोप्यात खोपा
      सुगरणीचा खोपा
      विक्री वजा खरेदी
       बरोबर होईल नफा

९) दहा किलो म्हणजे
     एक मण...!!
     घनाचे घनफळ
      बाजूचा घन....!!

१०) *जीवाला जीव देतो तोच    खरा मित्र*
*गणित सोडवायला माहिती  हवीत सुत्र*

११) सम आणि व्यस्त हे
        चलनाचे प्रकार
       पहिल्यात असते गुणोत्तर
        तर दुसर्यात गुणाकार

१२) "गोड" म्हणजे "स्वीट"..
       "कडू" म्हणजे "बीटर"..!!
        एक घनमीटर म्हणजे..
         एक हजार लीटर....!!!!

१३) रविवार नंतर सोमवार
       येतो,
       रविवार नंतर सोमवार
        येतो.....
       प्रत्येक ऋण संख्येचा
        वर्ग ...
        नेहमीच धन होतो.

१४)महादेवाला आवडते
      बेलाचे पान...
      कोणत्याही ञिकोणात
      एक बाजू...
      दोन बाजूच्या बेरजेपेक्षा
       लहान....!!😊

१५) दोनचा वर्ग चार.... !!
       चार चा वर्ग सोळा.... !!!!
       गणिताचे उखाणे    
        घ्यायला,
   सुवासिनी झाल्या गोळा..!!!

💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻

जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸

*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷

*आनंद आणि दुःख दोन्हीही अविभाज्य असतात.खरं तर ती अनेकदा बरोबरच येतात. जेव्हा आम्ही आनंदानं पाटावर जेवायला बसलेले असतो तेव्हा दुःख त्या पाटाखाली दडून बसलेलं असतं.*

      *आपल्या जीवनात तराजूच्या पारड्याप्रमाणं सुख- दुःख लोंबकळत राहतं.आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण व्हावेत म्हणून सर्वांची सतत धडपड चाललेली असते.जीवनात दुःखाशिवाय आनंदाची किंमत कळत नाही.जसे तापलेल्या लोखंडाला हातोड्याचे घाव सहन करावे लागतात मग त्याला हत्याराचा आकार लाभतो.यासाठी प्रथम आपण आपल्या अंतःकरणाचा गाभारा आनंदानं भरुन टाकावा आणि नंतर जगात आनंद उधळायला सुरूवात करावी. जीवनात हे सत्य लक्षात ठेवले तर आनंदाने जगता येईल!!*

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

कथा क्रमांक १०२

अभ्यास कथा भाग १०२

आरसा!

एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’

तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही.

कथा क्रमांक १०१

अभ्यास कथा भाग १०१
  चाबी

किसी गाँव में एक ताले वाले की दुकान थी। ताले वाला रोजाना अनेकों चाबियाँ 🔑🔑बनाया करता था। ताले वाले की दुकान में एक हथौड़ा 🔨भी था| वो हथौड़ा रोज देखा करता कि ये चाभी इतने मजबूत ताले🔒 को भी कितनी आसानी से खोल देती है।

एक दिन हथौड़े ने चाभी से पूछा कि मैं तुमसे ज्यादा शक्तिशाली हूँ, मेरे अंदर लोहा भी तुमसे ज्यादा है और आकार में भी तुमसे बड़ा हूँ लेकिन फिर भी मुझे ताला तोड़ने में बहुत समय लगता है और तुम इतनी छोटी हो फिर भी इतनी आसानी से मजबूत ताला कैसे खोल देती हो।

चाभी ने मुस्कुरा के ताले से कहा कि तुम ताले पर ऊपर से प्रहार करते हो और उसे तोड़ने की कोशिश करते हो लेकिन मैं ताले के अंदर तक जाती हूँ, उसके अंतर्मन को छूती हूँ और घूमकर ताले से निवेदन करती हूँ और ताला खुल जाया करता है।

वाह! कितनी गूढ़ बात कही है चाभी ने कि मैं ताले के अंतर्मन को छूती हूँ और वो खुल जाया करता है।

आप कितने भी शक्तिशाली हो या कितनी भी आपके पास ताकत हो, लेकिन जब तक आप लोगों के दिल में नहीं उतरेंगे, उनके अंतर्मन को नहीं छुयेंगे तब तक कोई आपकी इज्जत नहीं करेगा।

हथौड़े के प्रहार से ताला खुलता नहीं बल्कि टूट जाता है ठीक वैसे ही अगर आप शक्ति के बल पर कुछ काम करना चाहते हैं तो आप 100% नाकामयाब रहेंगे क्योंकि शक्ति ने आप किसी के दिल को नहीं छू सकते।

चाभी बन जाये,सबके दिल की ....

कथा क्रमांक १००

अभ्यास कथा भाग १००.
उमीद मातापिता की.

विश्वास साहब अपने आपको भाग्यशाली मानते थे। कारण यह था कि उनके दोनो पुत्र आई.आई.टी. करने के बाद लगभग एक करोड़ रुपये का वेतन अमेरिका में प्राप्त कर रहे थे। विश्वास साहब जब सेवा निवृत्त हुए तो उनकी इच्छा हुई कि उनका एक पुत्र भारत लौट आए और उनके साथ ही रहे ; परन्तु अमेरिका जाने के बाद कोई पुत्र भारत आने को तैयार नहीं हुआ, उल्टे उन्होंने विश्वास साहब को अमेरिका आकर बसने की सलाह दी। विश्वास साहब अपनी पत्नी भावना के साथ अमेरिका गये ; परन्तु उनका मन वहाँ पर बिल्कुल नहीं लगा और वे भारत लौट आए।
दुर्भाग्य से विश्वास साहब की पत्नी को लकवा हो गया और पत्नी पूर्णत: पति की सेवा पर निर्भर हो गई। प्रात: नित्यकर्म से लेकर खिलाने–पिलाने, दवाई देने आदि का सम्पूर्ण कार्य विश्वास साहब के भरोसे पर था। पत्नी की जुबान भी लकवे के कारण चली गई थी। विश्वास साहब पूर्ण निष्ठा और स्नेह से पति धर्म का निर्वहन कर रहे थे।
एक रात्रि विश्वास साहब ने दवाई वगैरह देकर भावना को सुलाया और स्वयं भी पास लगे हुए पलंग पर सोने चले गए। रात्रि के लगभग दो बजे हार्ट अटैक से विश्वास साहब की मौत हो गई। पत्नी प्रात: 6 बजे जब जागी तो इन्तजार करने लगी कि पति आकर नित्य कर्म से निवृत्त होने मे उसकी मदद करेंगे। इन्तजार करते करते पत्नी को किसी अनिष्ट की आशंका हुई। चूँकि पत्नी स्वयं चलने में असमर्थ थी , उसने अपने आपको पलंग से नीचे गिराया और फिर घसीटते हुए अपने पति के पलंग के पास पहुँची। उसने पति को हिलाया–डुलाया पर कोई हलचल नहीं हुई। पत्नी समझ गई कि विश्वास साहब नहीं रहे। पत्नी की जुबान लकवे के कारण चली गई थी ; अत: किसी को आवाज देकर बुलाना भी पत्नी के वश में नहीं था। घर पर और कोई सदस्य भी नहीं था। फोन बाहर ड्राइंग रूम मे लगा हुआ था। पत्नी ने पड़ोसी को सूचना देने के लिए घसीटते हुए फोन की तरफ बढ़ना शुरू किया। लगभग चार घण्टे की मशक्कत के बाद वह फोन तक पहुँची और उसने फोन के तार को खींचकर उसे नीचे गिराया। पड़ोसी के नंबर जैसे तैसे लगाये। पड़ौसी भला इंसान था, फोन पर कोई बोल नहीं रहा था, पर फोन आया था, अत: वह समझ गया कि मामला गंभीर है। उसने आस–पड़ोस के लोगों को सूचना देकर इकट्ठा किया, दरवाजा तोड़कर सभी लोग घर में घुसे। उन्होने देखा -विश्वास साहब पलंग पर मृत पड़े थे तथा पत्नी भावना टेलीफोन के पास मृत पड़ी थी। पहले *विश्वास और फिर भावना की मौत* हुई। जनाजा दोनों का साथ–साथ निकला। *पूरा मोहल्ला कंधा दे रहा था परन्तु दो कंधे मौजूद नहीं थे जिसकी माँ–बाप को उम्मीद थी। शायद वे कंधे करोड़ो रुपये की कमाई के भार के साथ अति महत्वकांक्षा से पहले ही दबे हुए थे।*

लोग बाग लगाते हैं फल के लिए
औलाद पालते हैं बुढापे के लिए
लेकिन ......

कुछ ही औलाद अपना फर्ज निभा पाते हैं ।। 🌟अति सुन्दर कहा है एक कवि ने....

"मत शिक्षा दो इन बच्चों को चांद- सितारे छूने की।
चांद- सितारे छूने वाले छूमंतर हो जाएंगे।
अगर दे सको, शिक्षा दो तुम इन्हें चरण छू लेने की,
जो मिट्टी से जुङे रहेंगे, रिश्ते वही निभाएंगे....🌟
 🙏🏻

जीवन विचार

*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷
*〰〰〰〰〰〰〰*
गन्ने में जहाँ गाँठ होती है वहां रस नहीं होता
जहाँ रस होता है वहाँ गाँठ नहीं होती।
बस जीवन भी ऐसा ही है- यदि मन में किसी के लिये नफरत की गाँठ होगी तो हमारा जीवन भी बिना रस का बन जायेगा.....
और
जीवन का रस बनाये रखना हो तो नफरत की गाँठ को निकालना ही होगा.....

जीवन विचार

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

➖➖➖➖➖➖➖➖➖
  🌺 *जीवन विचार* 🌺
➖➖➖➖➖➖➖➖
जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो.

 आजचा दिवस मी उमेदीने, हिमतीने, जिद्दीने आणि मनापासून जगेन, कारण हा दिवस माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही, हे मला ठाऊक आहे.  
➖➖➖➖➖➖➖
  *🌻जय महाराष्ट्र🌻*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~*

कथा क्रमांक ९९

अभ्यास कथा भाग ९९.
कर्मो का लेखा जोखा"

*एक महिला बहुत ही धार्मिक थी* ओर उसने ने नाम दान भी लिया हुआ था और बहुत ज्यादा भजन सिमरन और सेवा भी करती थी किसी को कभी गलत न बोलना , सब से प्रेम से मिलकर रहना उस की आदत बन चुकी थी. वो सिर्फ एक चीज़ से दुखी थी के उस का आदमी उस को रोज़ किसी न किसी बात पर लड़ाई झगड़ा करता। उस आदमी ने उसे कई बार इतना मारा की उस की हडी भी टूट गई थी। लेकिन उस आदमी का रोज़ का काम था। झगडा करना। उस महिला ने अपने गुरु महाराज जी से अरज की हे सचे पातशाह मेरे से कोन भूल हो गई है। मै सत्संग भी जाती हूँ सेवा भी करती हूँ। भजन सिमरन भी आप के हुक्म के अनुसार करती हूँ।
लेकिन मेरा आदमी मुझे रोज़ मारता है। मै क्या करूँ। गुरु महाराज जी ने कहा क्या वो तुझे रोटी देता है बीबी ने कहा हाँ जी देता है।गुरु महाराज जी ने कहा फिर ठीक है। कोई बात नहीं। उस बीबी ने सोचा अब शायद गुरु की कोई दया मेहर हो जाए और वो उस को मारना पीटना छोड़ दे। लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। उस की तो आदत बन गई ही रोज़ अपनी घरवाली की पिटाई करना। कुछ साल और निकल गए उस ने फिर महाराज जी से कहा की मेरा आदमी मुजे रोज़ पीटता है। मेरा कसूर क्या है।गुरु महाराज जी ने फिर कहा क्या वो तुम्हे रोटी देता है। उस बीबी ने कहा हांजी देता है। तो महाराज जी ने कहा फिर ठीक है। तुम अपने घर जाओ। बीबी बहुत निराश हुई के महाराज जी ने कहा ठीक है। वो घर आ गई लेकिन उस के पति के स्वभाव वैसे का वैसा रहा रोज़ उस ने लड़ाई झगडा करना। वो महिला बहुत तंग आ गई। कुछ एक साल गुज़रे फिर गुरु महाराज जी के पास गई के वो मुझे अभी भी मारता है। मेरी हाथ की हड्डी भी टूट गई है। मेरा कसूर क्या है। मै सेवा भी करती हूँ। सिमरन भी करती हूँ फिर भी मुझे जिंदगी में सुख क्यों नहीं मिल रहा। गुरु महाराज जी ने फिर कहा वो तुजे रोटी देता है। उस ने कहा हांजी देता है। महाराज जी ने कहा फिर ठीक है।फर इस बार वो महिला जोर जोर से रोने लगी और बोली की महाराज जी मुझे मेरा कसूर तो बता दो मैंने कभी किसी के साथ बुरा नहीं किया फिर मेरे साथ ऐसा क्यों हो रहा है। महाराज कुछ देर शांत हुए और फिर बोले बीबी तेरा पति पिछले जन्म में तेरा बेटा था। तू उस की सोतेली माँ थी। तू रोज़ उस को सुबह शाम मारती रहती थी। और उस को कई कई दिन तक भूखा रखती थी। शुक्र मना के इस जन्म में वो तुझे रोटी तो दे रहा है। ये बात सुन कर बीबी एक दम चुप हो गई। गुरु महाराज जी ने कहा बेटा जो कर्म तुमने किए है उस का भुगतान तो तुम्हें अवश्य करना ही पड़ेगा फिर उस महिला ने कभी महाराज से शिकायत नहीं की क्यों की वो सच को जान गई थी।
                    *इसलिए हमे भी कभी किसी का बुरा नहीं करना चाहिए सब से प्रेम प्यार के साथ रहना चाहिए। हमारी जिन्दगी में जो कुछ भी हो रहा है सब हमारे कर्मो का लेखा जोखा है। जिस का हिसाब किताब तो हमे देना ही पड़ेगा।

                *🙏🏼 जय श्री कृष्ण 🙏🏼*