कथा क्रमांक ९२

📝📚📝📚📝📚📝📚📝📚
*शिक्षणवारी नागपूर दि.8 ते 10 डिसेंबर दरम्यान अवश्य भेट द्या.*
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ९२ 📚*
〰〰〰〰〰〰
*♻ खरे स्वरूप* ♻
=================
〰〰〰〰〰〰

*एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास वाटले व त्याने मेंढ्या विकून एक गलबत विकत घेतले व तो माल भरून व्यापारास निघाला. परंतु वाटेत मोठे वादळ झाले व त्यामुळे गलबत बुडू नये म्हणून सगळा माल त्याला समुद्रात फेकून द्यावा लागला. शेवटी त्याचे जहाज एका  खडकावर आपटून फुटले व तो कसाबसा वाचला*.

*यानंतर त्याने ज्या माणसाला आपल्या मेंढ्या विकल्या होत्या, त्याच्याकडे तो मेंढ्या राखण्यासाठी चाकरी करू लागला. असाच एकदा पुन्हा तो समुद्रकाठी आला असता समुद्राकडे बघून म्हणाला.*

 *'आता काही मी तुला विसरणार नाही. तुझं स्वरूप मला चांगलं समजलं आहे.'*
 *तात्पर्यः ज्याने आपल्याला एकदा फसविले त्याचा पुन्हा विश्वास धरणे धोक्याचे आहे*.
〰〰〰〰〰〰〰
*📝 शब्दांकन/संकलन*

जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:

Post a Comment