मी कधी कुणाला कळले नाही ......कविता संकलन

*"मी कुणाला कळले नाही"*


*मित्र कोण आणि शत्रू कोण*
*गणित साधे कळले नाही..*

*नाही भेटला कोण असा*
*ज्याने मला छळले नाही...*

*सुगंध सारा वाटीत गेलो*
*मी कधीच दरवळले नाही..*

*ऋतू नाही असा कोणता*
*ज्यात मी होरपळले नाही..*

*केला सामना वादळाशी*
*त्याच्या पासून पळाले नाही..*

*सामोरा गेलो संकटाना*
*त्यांना पाहून वळले नाही..*

*पचऊन टाकले दु:ख सारे*
*कधीच मी हळहळले नाही..*

*आले जीवनी सुख जरी*
*कधीच मी हुरळले नाही..*

*कधी ना सोडली कास सत्याची*
*खोट्यात कधीच मळले नाही..*

*सोडून गेले माझेच मला*
*"मी कुणाला कळलेच नाही.."*

*"मी कुणाला कळलेच नाही"*
 🌹🌹

1 comment: